Tumgik
#कोसळला
rahulmarathiblog · 2 years
Text
घटस्फोटाचा निकाल लागला अन पती कोसळला , पुण्यातील घटना
पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या दिघी परिसरात एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आपल्या मुलावर अतिरिक्त दबाव टाकला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप करत मयत मुलाच्या नातेवाईकांनी दिघी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवला आणि त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. उपलब्ध माहितीनुसार , वृषभ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
घटस्फोटाचा निकाल लागला अन पती कोसळला , पुण्यातील घटना
पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या दिघी परिसरात एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आपल्या मुलावर अतिरिक्त दबाव टाकला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप करत मयत मुलाच्या नातेवाईकांनी दिघी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवला आणि त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. उपलब्ध माहितीनुसार , वृषभ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू
ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू
ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू पंढरपुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला असून ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू झाला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत लातूर इथं महिला सक्षमीकरण मेळावा होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं.
तत्पूर्वी राष्ट्रपतींनी उदगीर इथं विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं.
राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी नांदेड विमानतळावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांनी स्वागत केलं.
सायंकाळी साडे चार वाजेदरम्यान, राष्ट्रपती पुन्हा नांदेडला येणार असून, सव्वा पाच वाजता त्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देणार आहेत. सायंकाळी सहा वाजेदरम्यान नांदेड विमानतळावरून राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करतील.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकीया यांच्यात आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. भारत आणि ब्रुनेई यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण झाली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधनिर्माण, क्षमता निर्माण, संस्कृती आणि लोकांशी सं��ंध या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. भारत विस्तारवादाच्या नाही तर विकासवादाच्या धोरणाचं समर्थन करतो, भारत आणि ब्रुनेई या उभय देशांदरम्यान व्यापारी आणि वाणिज्यीक संबंधांचा विस्तार करण्यात येईल, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ब्रुनेईच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना झाले.
****
देशाची निर्यात जर वाढवायची असेल तर आपल्याला लॉजिस्टिक खर्च कमी करावा लागेल, त्यासाठी आपल्याला इंधनाचे इतर पर्याय निवडायला लागतील, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत फिक्कीच्या वतीनं आयोजित दुसऱ्या टनेलिंग इंडिया परिषदेत ते बोलत होते. समुद्राजवळ पूल उभारताना बांधकामात गंजरोधक स्टेनलेस स्टिलचा वापर व्हायला हवा, असं सांगून गडकरी यांनी, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टिल वापरलं असतं तर तो कधीच कोसळला नसता, असं मत व्यक्त केलं.
****
राज्य परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत आज मुंबईत बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या चर्चेतून मार्ग काढू, कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या मंडळ अधिकाऱ्याला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. जयंत गायकवाड असं त्याचं नाव असून, तक्रारदाराच्या शेतात सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॅायल्टी भरुन घेऊन कोणतीही कारवाई न करण्यासाठी, त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातली पूर परिस्थिती ओसरू लागली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आता सहा दरवाजे उघडे आहेत. ६२ हजार २९४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणीपातळीही ३५५ मीटरवरून ३५० मीटरवर आली आहे. त्यामुळे नांदेड शहरात गोदावरी काठावरील अनेक सखल भागातलं पाणी आता ओसरत आहे.
हिंगोली जिल्ह्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा ९० टक्क्याच्या वर गेला आहे.
वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वाशिम शहराजवळील केकतउमरा शेत शिवारातील एकबुर्जी हा लघु जलसंचय प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण आज सकाळी शंभर टक्के भरलं आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे एका फुटानं उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
****
0 notes
news-34 · 29 days
Text
0 notes
6nikhilum6 · 30 days
Text
Pimpri : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही - काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील (Pimpri) राजकोट परिसरामध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान…
0 notes
Video
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला प्रवक्ते दुबे यांचा महायुतीवर घणाघात..
0 notes
news2024news · 4 months
Text
Tumblr media
मराठी गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर, अवधूत गुप्तेच्या आईचं निधन http://dlvr.it/T84k0s
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
ट्रॅक्टर तीस फूट खोल चुलबंद नदीपात्रात कोसळला; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर
भंडारा : सावरगाव येथून कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर पुलावर अनियंत्रित होऊन थेट तीस फूट खोल चुलबंद नदीपात्रात कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली. अण्णा रामचंद्र पारधी (५०) असे मृताचे नाव असून, राधेश्याम मधुकर ढोरे (२३) व राष्ट्रपाल सावजी ठाकरे ( ५०) हे गंभीर जखमी असून, तिघेही सावरगाव येथील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
गर्जुनी आभाळी देवेंद्र हासला भयंकर अगदी भयंकर कोसळला... वासरु घाबरुनी बिलगले गाईला, गाय मात्र निवांत होती शेतकरी रुपात कृष्णच होता सोबतीला... . ✍️🚩 📸 by @mechakarmani ⚠️™️ No repost please 🚫 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून पोस्ट आवडल्यास नक्की Like करा अन कोकणातील असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #krishna #beauty_nature #naturegeography #indianfarmer #konkangram #naturehome #marathiquotes #kokanchi_shan #animallovers #morningvibes #nature_perfections #roadtrip #konkanphotographers #maharashtra_clickers #konkan_photo #kokancha_nisarga #shetkari #india_ig #india_undiscovered #discover_india #khed #konkan_ig #chiplun #kokan #konkan #shetkari_raja #maharastra ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . (at Khed, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CmLPm2VNGy5/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nandedlive · 2 years
Text
गुजरातमधील पूल कोसळल्यानंतर नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय!
Tumblr media Tumblr media
Photo Courtesy- Twitter/ Narendra Modi गुजरात | गुजरातमध्ये मोठी घटना घडली. मोरबीमधील प्रसिध्द झुलता पूल कोसळला. या पुलावर सुमारे 100 पेक्षा अधिक पर्यटक उपस्थित होते. मात्र, अचानक हा पुल मच्छु नदीमध्ये पडला आणि त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. (Morbi Bridge Collapse) माध्यमांच्या माहितीनुसार या दुर्घाटनेमध्ये एकूण 140 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोरबी येथील झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला. अहमदाबाद येथे मोदींचा रोड शो रद्द करण्यात आला आहे. याशिवाय, 1 नव्हेंबर रोजी गांधीनगर येथे मोदींचा कार्यक्रम आयेजित करण्यात आला होता मात्र, त्यांचा हा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आला. तर मोदी फक्त लाॅंचिंग कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. झुलता पुल येथे झालेल्या घटनेत, गुजरातचे मुख्यमंत्री अमित शहा यांनी घटना स्थळी जाऊन दखल घेतली. मंगळवारी पंतप्रधान मोदी घडलेल्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती समोर आली. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळला, वाहन चालकांना वाटले पूल कोसळला; अन्…
पुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळला, वाहन चालकांना वाटले पूल कोसळला; अन्…
पुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळला, वाहन चालकांना वाटले पूल कोसळला; अन्… मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर विक्रोळी गाधीनगर येथे उड्डानपुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळल्याने एकच खळबळ माजली. पेव्हर ब्लॉक पडल्याने वाहन चालकांना वाटले पूल कोसळला, म्हणून सर्व वाहनचालक आपल्या गाड्या सोडून पळाले. मात्र नंतर जवळ जाऊन पाहिले असता तो पेव्हर ब्लॉक होता. यानंतर वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आज दुपारी 12.45…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह-गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी
राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना
महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भर चौकात शिक्षा द्यावी-आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आणि
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला. त्यापार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता, असं नमूद करत, श्रेय घेण्याच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इत��� पोलीस कर्मचारी असून, त्यात तांत्रिक-वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबई इथं आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच आणखी चार जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे.
****
दिल्ली मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून, यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळेल, ६ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
0 notes
news-34 · 29 days
Text
0 notes
Video
youtube
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला..
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पोलीस तक्रार लिहून घेत असतानाच ' तो ' कोसळला , तिघेजण ताब्यात
पोलीस तक्रार लिहून घेत असतानाच ‘ तो ‘ कोसळला , तिघेजण ताब्यात
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर सोमवारी दुपारी एका व्यक्तीने प्राण गमावले आहेत. रामसिंग मोहन चव्हाण ( वय 47) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या नात्यातील काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केली म्हणून तक्रार देण्यासाठी ते पोलिस ठाण्यात गेले होते. पोलीस ठाण्यात पोहोचताच ते जागीच कोसळले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असे खारघर पोलिसांचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes