Tumgik
#चर्चेवर
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 03 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
बदलत्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असावं-राष्ट्रपतींचं आवाहन
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाला परवा पाच डिसेंबरपासून प्रारंभ
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागासाठी उद्या आणि परवा दोन दिवस मुदतवाढ 
गंगापूर इथं आयोजित त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप
आणि
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारतीय जोडी अंतिम फेरीत दाखल
****
औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट नसून वेगाने बदलत्या जगात निरंतर शिक्षण हेच प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ काल राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती आपला महाराष्ट्र दौरा पूर्ण करून दिल्लीला रवाना झाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. नौदल दिन कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. या अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून विरोधकांनी सकारात्मक चर्चेवर भर द्यावा, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. हे अधिवेशन उद्या चार डिसेंबरपासून २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सात ते २० डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार आहे.
या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची काल विधीमंडळात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या प्रश्नांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा परवा पाच डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या अभियानात महानगरपालिका क्षेत्रात विभाग तसंच राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढवणं, शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणं, आदी  या अभियानाचे उद्देश आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना पोहोचवण्याचं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात इटावा इथं विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कराड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं. ड्रोन उडवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील संदलापूर इथले शेतकरी विठ्ठल काकडे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. काल संदलपूर इथं विकसित भारत संकल्प यात्रा आली असता, त्यांनी याबाबत माहिती दिली...
****
कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबत कागदपत्रांच्या छाननीसोबतच पुरोहित संघासारख्या संस्थांची तसेच भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना, यासंदर्भात स्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिले आहेत. ते काल नाशिक इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, निकालही जाहीर होणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी होणार आहे.
****
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा उद्या आणि परवा दोन दिवस भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपली होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हे पोर्टल दोन दिवस सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती.
****
राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही मुदत ३० नोव्हेंबरला संपली होती.
****
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथल्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात काल या संमेलनाचा प्रारंभ झाला. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष जगदीश कदम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मराठवाडा साहित्य परिषदेनं खेड्यातून आलेल्या लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसंच समाजातला वैचारिक संभ्रम साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून दूर केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन आदी कार्यक्रमांना साहित्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
धाराशिव तालुक्यातल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणी जिल्हा न्यायालयानं तत्कालीन संचालक स्वर्गीय पवन राजेनिंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. २००१ मध्ये चुकीच्या पद्धतीनं साखर विक्रीचा आरोप करत या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. २००२ साली गुन्हे अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता.
****
लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रेस्टो ही जोडी अंतिम फेरीत दाखल झाली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना जपानच्या रिन इवानागा आणि काई नाकानिशी यांच्याशी होणार आहे.
****
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-ट्वेंटी क्रिकेटच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला पाचवा सामना आज खेळला जाणार आहे. बंगळुरु इथं आज संध्याकळी सात वाजता सामना सुरु होईल. भारतानं मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
३७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत केनियाच्या धावपटूनं पहिला क्रमांक पटकावला आहे. थोड्यावेळापूर्वीच ही स्पर्धा पूर्ण झाली. पर्यावरण संवर्धनासाठी धाव असं यंदाच्या या स्पर्धेचं घोषवाक्य होतं. इथिओपियाच्या धावपटूंनी या स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. १०, पाच आणि तीन किलोमीटर अशा विविध अंतरासाठी झालेल्या या स्पर्धेत शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला.
दरम्यान, लातूर इथं सध्या मॅराथॉन स्पर्धा घेण्यात येत आहे. एक धाव व्यसनमुक्तीसाठी या संकल्पनेतून लातूरच्या पोलिस दलातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलावरून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
****
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे तर उपाध्यक्षपदी भाजपचे भीमराव जावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान निवडणुकीनंतर आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
****
0 notes
shrikrishna-jug · 1 year
Text
नेतेगीरी
माझ्या मागच्या एका लेखात मी माझ्या एका मित्राच्या, मित्र परिवार संभाळून ठेवण्याच्या कौशल्याबद्द, त्याच्याशी झालेल्या चर्चेवर बराच उहापोह केला होता.आता त्याने आपली एक संघटना बांधली आहे.आणि मला तो त्याच्या नेतेगीेरी बदल चार गोष्टी सांगत आहे. मला म्हणाला,“संघटना यशस्वी होण्यामागे महान नेतृत्व कारणीभूत असतं, असा माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे की महान नेते त्यांच्या सर्व अनुयायांना सकारात्मक…
View On WordPress
0 notes
Text
‘तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाही’; अजित पवारांच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
https://bharatlive.news/?p=88710 ‘तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाही’; अजित पवारांच्या चर्चेवर शरद ...
0 notes
nashikfast · 3 years
Text
पंतप्रधान फक्त १५ मिनिटांत अस्वस्थ?, शेतकऱ्यांनी तर वर्षभर आंदोलन केले ; नवज्योत सिंग सिद्धू
पंतप्रधान फक्त १५ मिनिटांत अस्वस्थ?, शेतकऱ्यांनी तर वर्षभर आंदोलन केले ; नवज्योत सिंग सिद्धू
पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चेवर आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल ​​जेव्हा पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी नैतिक शिक्षण दिशादर्शक-राष्ट्रपतींचं प्रतिपादन
विकसित भारत संकल्प यात्रेतून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचं आवाहन
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं प्रारंभ
आणि
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
****
'डीप फेक' सारख्या समाज विघातक प्रकारांसाठी तंत्रज्ञानाचा दुरुपयोग टाळण्याकरता नैतिक शिक्षण दिशादर्शक ठरेल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ आज राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जेव्हा तंत्रज्ञानाचा सदुपयोग होतो तेव्हा देश आणि समाजाला त्याचा फायदा होतो, मात्र या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग झाल्यास मानवतेची हानी होते, असं त्या म्हणाल्या. मुलींच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करणं हे देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती आपला महाराष्ट्र दौरा पूर्ण करून दिल्लीला रवाना झाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. नौदल दिन कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. या अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून विरोधकांनी सकारात्मक चर्चेवर भर द्यावा, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हे अधिवेशन चार डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना पोहोचवण्याचं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात इटावा इथं विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जनसंवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे निर्देश कराड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कराड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं. ड्रोन उडवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज धुळे तालुक्यातल्या बोरिस आणि लामकानी इथं पोहोचली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभास देवरे आणि गावकऱ्यांनी या यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं तसंच विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
सांगली जिल्ह्यात आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता हीच सेवा मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ३३ स्मशानभूमी आणि दफनभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत मनपा कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या चार जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि पुण्याच्या कुतुहल संस्थेच्या मदतीने विज्ञान कृती केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना गावखेड्यावरच विज्ञानाच्या अभिरुची वाढावी यासाठी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रहांचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे.
****
कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबत कागदपत्रांच्या छाननीसोबतच पुरोहित संघासारख्या संस्थांची तसेच भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना, यासंदर्भात स्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नाशिक इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागात तपासण्यात आलेली कागदपत्रं तसंच कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळलेल्या नोंदीबाबतची माहिती दिली.
****
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार असून, निकालही जाहीर होणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परव सोमवारी होणार आहे.
****
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
यंदाचं ५८ वं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नवी मुंबई इथं होणार आहे. मराठी विज्ञान परिषद आणि वाशी इथल्या मराठी साहित्य संकृती कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर कुलकर्णी यांनी आज वाशी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन आणि उद्योग आणि पर्यावरण हे या अधिवेशनाचे मुख्य विषय असणार आहेत.
****
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथल्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात हे संमेलन भरवण्यात आलं आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह मराठवाड्यातील प्रसिद्ध लेखक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष जगदीश कदम यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात मराठवाडा साहित्य परिषदेनं खेड्यातून आलेल्या लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसंच समाजातला वैचारिक संभ्रम साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून दूर केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, सकाळी ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात झाली. संमलेनाचे मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते यांच्या हस्ते ग्रंथनगरीचं उद्घाटन झालं. ग्रंथदिंडीत सहभागी बालवारकऱ्यांसह विविध देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली इथं आज गर्भवती महिला आहार विषयक शिबीर घेण्यात आलं. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि गायत्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात गर्भवतींची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
****
आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्यावतीनं सहा ते अठरा वयोगटातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यात अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले. उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांचा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते मनपा वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात हरंगुळ इथं संवेदना या पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं आज उद्घाटन झालं. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी राज्य शासनामार्फत संस्थेला एक कोटी रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द केला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केलं. तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे तर उपाध्यक्षपदी भाजपचे भीमराव जावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष आ��ि उपाध्यक्ष पदासाठी सतीश टोपे आणि भीमराव जावळे यांचेच अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे जाहीर केली. दरम्यान, निवडणुकीनंतर आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
****
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी १५ तारखेला लातूर-नांदेड या महामार्गावरील शिरूर ताजबंद इथं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जय मल्हार संघटनेचे नेते लहूजी शेळके यांनी दिला आहे. लातूर इथं आज झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
0 notes
Text
अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले, त्याबद्दल मला माहिती नाही
https://bharatlive.news/?p=85697 अजित पवार भाजपसोबत ज���ण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले, त्याबद्दल मला ...
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर दिलं उत्तर   ​मुंबई : राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी​चे​ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे म्हणाले....
भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे म्हणाले….
उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच संभाव्य भाजपप्रवेशावर सुरु असणाऱ्या चर्चेवर भाष्य केलं आहे. भाजपा प्रवेशाचं काही माहिती नाही असं त्यांनी म्हटलं आहे. फलटणमध्ये उदयनराजे आणि रणजित निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रणजित निंबाळकर हे भाजपाचे माढ्यामधून खासदार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंबंधी बोलताना उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की, “भाजपा प्रवेशाचं काही माहिती नाही. पूरग्रस्तांच्या…
View On WordPress
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
24 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/y2upchq9 चालू घडामोडी (24 जून 2019) RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे. तसेच विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. 23 जानेवारी 2017 ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे. याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर महिन्यात काही खासगी कारणांमुळे राजीनामा दिला होता. विरल आचार्य यांचा समावेश आरबीआयच्या त्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये होतो जे उर्जित पटेल यांच्या टीमचे सदस्य होते. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर विरल आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स���टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत. भारताचा इस्त्रायल बरोबरचा 50 कोटी डॉलर्सचा क्षेपणास्त्र करार रद्द : डीआरडीओच्या आश्वासनानंतर भारताने इस्त्रायली कंपनी राफेल अडव्हान्स डिफेन्स सिस्टिमबरोबर केलेला 50 कोटी डॉलर्सचा स्पाइक क्षेपणास्त्र खरेदीचा करार रद्द केला आहे. स्पाइक हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने स्पाइकला पर्याय ठरणारे क्षेपणास्त्र दोन वर्षांच्या आत विकसित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच व्हीईएम टेक्नोलॉजीस लिमिटेडसोबत मिळून डीआरडीओ कमी किंमतीत स्पाइक सारखेच क्षेपणास्त्र विकसित करत आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अहमदनगर रेंजवर एमपीएटीजीएमची यशस्वी चाचणी केल्याचा दावाडीआरडीओने केला आहे. सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्था अमेरिकेच्या काळ्या यादीत : सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्थांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे. लष्कराशी संबंधित उपकरणांवर काम करणाऱ्या या संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. या चर्चेवर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संस्थांत सुपर कॉम्प्युटर निर्माती संस्था सुगॉनचा समावेश आहे. सुगॉन ही कंपनी मोठ्या प्रमाणात अमेरिकी पुरवठ्यावर अवलंबून आहे. सुगॉनच्या पुरवठादारांत इंटेल, एनव्हिडिया आणि अ‍ॅडव्हॉन्सड मायक्रो डिव्हायसेस यांचा समावेश आहे. याशिवाय वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सुगॉनच्या तीन उपकंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकी वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, सुगॉन आणि वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट या संस्था चीनच्या लष्करी संशोधन संस्थेच्या मालकीच्या आहेत. चिनी लष्करासाठी पुढील पिढीतील उच्चक्षमता असलेली संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम या संस्था करीत आहेत. दिनविशेष : 24 जून 1441 मध्ये इटन कॉलेजची स्थापना. फ्रान्समधील पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब 24 जून 1793 मध्ये केला गेला. 24 जून 1939 मध्ये सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले. कर्नाटकातील सर्व शाळांत 24 जून 1982 मध्ये कन्नड शिकविण्याची सक्ती. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
तंत्रज्ञानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी नैतिक शिक्षण दिशादर्शक-राष्ट्रपतींचं प्रतिपादन
विकसित भारत संकल्प यात्रेतून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचं आवाहन
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं प्रारंभ
आणि
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
****
'डीप फेक' सारख्या समाज विघातक प्रकारांसाठी तंत्रज्ञानाचा दुरुपयोग टाळण्याकरता नैतिक शिक्षण दिशादर्शक ठरेल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा एकशे अकरावा दीक्षांत समारंभ आज राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जेव्हा तंत्रज्ञानाचा सदुपयोग होतो तेव्हा देश आणि समाजाला त्याचा फायदा होतो, मात्र या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग झाल्यास मानवतेची हानी होते, असं त्या म्हणाल्या. मुलींच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करणं हे देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती आपला महाराष्ट्र दौरा पूर्ण करून दिल्लीला रवाना झाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. नौदल दिन कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. या अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून विरोधकांनी सकारात्मक चर्चेवर भर द्यावा, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हे अधिवेशन चार डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह गावागावात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना पोहोचवण्याचं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात इटावा इथं विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जनसंवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे निर्देश कराड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कराड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं. ड्रोन उडवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज धुळे तालुक्यातल्या बोरिस आणि लामकानी इथं पोहोचली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभास देवरे आणि गावकऱ्यांनी या यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं तसंच विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
सांगली जिल्ह्यात आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता हीच सेवा मोहिमेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ३३ स्मशानभूमी आणि दफनभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत मनपा कर्मचारी, अधिकारी, सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या चार जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि पुण्याच्या कुतुहल संस्थेच्या मदतीने विज्ञान कृती केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना गावखेड्यावरच विज्ञानाच्या अभिरुची वाढावी यासाठी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रहांचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे.
****
कुणबी-मराठा, मराठा- कुणबी या जात नोंदणीबाबत कागदपत्रांच्या छाननीसोबतच पुरोहित संघासारख्या संस्थांची तसेच भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना, यासंदर्भात स्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नाशिक इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागात तपासण्यात आलेली कागदपत्रं तसंच कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळलेल्या नोंदीबाबतची माहिती दिली.
****
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार असून, निकालही जाहीर होणार आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परव सोमवारी होणार आहे.
****
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सात डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
यंदाचं ५८ वं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नवी मुंबई इथं होणार आहे. मराठी विज्ञान परिषद आणि वाशी इथल्या मराठी साहित्य संकृती कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर कुलकर्णी यांनी आज वाशी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन आणि उद्योग आणि पर्यावरण हे या अधिवेशनाचे मुख्य विषय असणार आहेत.
****
त्रेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथल्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात हे संमेलन भरवण्यात आलं आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह मराठवाड्यातील प्रसिद्ध लेखक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष जगदीश कदम यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात मराठवाडा साहित्य परिषदेनं खेड्यातून आलेल्या लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसंच समाजातला वैचारिक संभ्रम साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून दूर केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, सकाळी ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात झाली. संमलेनाचे मावळते अध्यक्ष शेषराव मोहिते यांच्या हस्ते ग्रंथनगरीचं उद्घाटन झालं. ग्रंथदिंडीत सहभागी बालवारकऱ्यांसह विविध देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, तसंच काव्यगायन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली इथं आज गर्भवती महिला आहार विषयक शिबीर घेण्यात आलं. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि गायत्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात गर्भवतींची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
****
आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्यावतीनं सहा ते अठरा वयोगटातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यात अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले. उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांचा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते मनपा वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात हरंगुळ इथं संवेदना या पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं आज उद्घाटन झालं. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनण्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास लोढा यांनी यावेळी व्यक्त केला. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी राज्य शासनामार्फत संस्थेला एक कोटी रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द केला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केलं. तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे तर उपाध्यक्षपदी भाजपचे भीमराव जावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सतीश टोपे आणि भीमराव जावळे यांचेच अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे जाहीर केली. दरम्यान, निवडणुकीनंतर आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
****
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी १५ तारखेला लातूर-नांदेड या महामार्गावरील शिरूर ताजबंद इथं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जय मल्हार संघटनेचे नेते लहूजी शेळके यांनी दिला आहे. लातूर इथं आज झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छता अभियानात लोकचळवळीची आवश्यकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त.
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणतीही औपचारिकता पूर्ण करून घेतली जाणार नसल्याचं भारतीय स्टेट बँकेकडून स्पष्ट.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
आणि
७१व्या राज्य वरिष्ठ गट मैदानी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून पुण्यात प्रारंभ.
****
स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत जुहू इथं समुद्र किनाऱ्यावर जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहीम राबवण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याची तसंच प्रदूषण आणि कचऱ्यापासून समुद्राचं रक्षण करण्याची शपथ देवून जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. नागरिकांनी परिसर स्वच्छतेसाठी दररोज एक मिनीट देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे. एक मिनिट प्रत्येकाने आपल्या जीवनातला दिला पाहिजे, दररोज एक मिनिट जर प्रत्येक नागरिकाने दिला तर पर्यावरणाचा समतोल राहील. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आणि आज जे आपण क्लायमेट चेंज ग्लोबल वार्मिंग हे सगळं जे काही अनुभवतोय ह्याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.
जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. शाश्वत-पर्यावरणीयदृष्ट्या लवचिक नील अर्थव्यवस्था आणि त्यासंबंधीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यासह धोरणं, शासन आणि सहभाग तसंच अर्थकारण अशा विविध पैलूंवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा प्रस्तावित आहे. महासागरांची जपणूक आणि त्यांची हानी थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि आपल्या सागरी स्त्रोतांच्या रक्षणासाठीच्या चर्चेवर या परिसंवादात भर दिला जाणार आहे. याप्रसंगी सागर सुरक्षेत जनसहभागाच्या जागरुकतेच्या दृष्टीनं ‘ओशन-ट्वेंटी’ हा परिसंवादही यावेळी घेण्यात आला.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी संवर्धन करण्यासाठीं सर्वोच्च न्यायालयाने ६२ कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्षांचे घरटे असेल, त्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये देण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून सारस पक्षांची ओळखला जातो. कायम जोडीने राहणाऱ्या या पक्ष्याचा जोडीदार दगावल्यास, दुसरा पक्षी सुध्दा मरण पावतो. दिवसेंदिवस सारस पक्षांच्या संख्येत घट होत असली तरीही, भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या शेतांमध्ये सारस पक्षांचा अधिवास आढळून येत आहे. सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी शासनानं ही योजना सुरू केली आहे.
****
शेताला दिवसा पाणी देणं शक्य करणाऱ्या सौर कृषिपंप वितरणाच्या पंतप्रधान कुसूम सौर योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कूपनलिका, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाल्यांजवळ तसंच शेततळं अथवा पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे तसंच पारंपरिक वीज जोडणी उपलब्ध नसलेले शेतकरी या योजनेत अर्जासाठी पात्र असतील. अडीच एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती, पाच एकरसाठी पाच अश्वशक्ती, तर त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना साडेसात अश्वशक्ती तसंच अधिक क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अनुदान देय असेल. शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणं या कृषी पंपाला जोडता येतील. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत ५६ हजार सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत.
****
शेतकऱ्यांच्या समस्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समर्पक उत्तर देण्यासह त्यांना विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी तयार झालेल्या ‘डॉक्टर किसान मोबाईल ॲप्लिकेशनचा’ शुभारंभ आज झाला. नाशिक इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलं. भ्रमणध्वनीवर वापराच्या या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला, मार्गदर्शन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, हवामानाविषयी माहिती मिळणार आहे. दरम्यान, कांद्याच्या दराच्या प्रश्नावर बोलतांना नाफेडमार्फत यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असल्याचं त्या म्हणाल्या.
****
राज्यातील युवकांना रोजगार देण्याच्या योजना विद्यमान सरकार आखत असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं आयोजित दोन दिवसीय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन हा उद्योग प्रकल्प मागील महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे गुजरातमध्ये हलवण्यात आला. त्याचं खापर सध्याच्या सरकावर फोडण्यात येत आहे. याबाबतची श्वे‍तपत्रिका लवकरच जनतेसमोर मांडली जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. आज या मेळाव्याला पाच हजारांहून जास्त युवकांनी भेट दिली. यातील निवड झालेल्या उमेदवारांना उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते तत्काळ नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली.
****
देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठातील पदवी प्रवेशांसाठी घेतली जाणारी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परिक्षा -सी.यु.ई.टी. आज पासून देशभरात सुरु झाली आहे. देशभरातून जवळपास १४ लाख, ९९ हजार उमेदवार ही परीक्षा देत आहेत.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांकडून कोणतीही औपचारिकता पूर्ण करून घेतली जाणार नसल्याचं, भारतीय स्टेट बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक एस मुरलीधरन यांनी यासंदर्भात बँकेच्या सर्व शाखांना याबाबत पत्र लिहून ही बाब सूचित केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी कोणाकडूनही ओळखपत्र अथवा कोणतंही चलन भरून देण्याची मागणी करण्यात येणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे. एका व्यक्तीला एका वेळी दोन हजार रुपये कि��मतीच्या दहा नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत.
****
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्रीय दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी बलिदान दिन म्हणून आजचा दिवस पाळण्यात येतो. या निमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दिवंगत राजीव गांधीं यांना स्मृती दिना निमित्त आदरांजली वाहिली.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्याच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर सौनिक यांनी उपस्थितांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ दिली.
नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. यावेळी कुलगुरु माधुरी कानिटकर यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी दहशतवाद विरोधी दिनाच्या प्रतिज्ञेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.
औरंगाबाद इथं जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीच्या वतीनं राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
****
जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलायशाच्या स्वच्छता मोहिमेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सहभाग घेतला. 'या सारे श्रमदान करुया' या मोहिमेअंतर्गत मुंबई इथली समस्त महाजन ट्रस्ट आणि शहरातल्या विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दर रविवारी सकाळी ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्यास, सांडव्याची दुरुस्ती करून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली. शहरातले नागरिक या स्वच्छता मोहितेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
****
७१व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट मैदानी खेळ अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. पुणे इथं महाळूंगे बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल इथं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत ३३ जिल्हा अॅथलेटिक्स संघटनांचे एकूण ७१५ खेळाडू सहभागी होत आहेत. येत्या २३ मे पर्यंत सुरु असलेल्या स्पर्धेतून ओडीशा इथं, होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करत २०० धावा करत मुंबई संघासमोर २०१ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या स्पर्धेत, आज दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या संघां दरम्यान बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा
यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा
यूपीआय व्यवहारावर शुल्क नाही; अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेवर पडदा नवी दिल्ली – यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून देशात लाखो नागरिक रोज छोटे-मोठे डिजिटल व्यवहार करीत आहेत. या व्यवहारावर शुल्क लावण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अर्थ मंत्रालयाने अशा प्रकारचे कसलेही शुल्क यूपीआय व्यवहारावर लागणार नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
डेटींगच्या चर्चेवर स्पष्टच बोलली शहनाज गिल, म्हणाली तुम्ही एखाद्यासोबत...
डेटींगच्या चर्चेवर स्पष्टच बोलली शहनाज गिल, म्हणाली तुम्ही एखाद्यासोबत…
डेटींगच्या चर्चेवर स्पष्टच बोलली शहनाज गिल, म्हणाली तुम्ही एखाद्यासोबत… Shehnaaz Gill Dating dating rumors: ‘बिग बॉस’मधून लोकप्रियता मिळवलेली ‘पंजाबची कतरिना कैफ’ अर्थात शहनाझ गिल पुन्हा एकदा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा आहेत. पण यासंदर्भात तिनं मोठा खुलासाही केलाय. Shehnaaz Gill Dating dating rumors: ‘बिग बॉस’मधून लोकप्रियता मिळवलेली ‘पंजाबची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? चर्चेवर आदित्य यांची पहिली प्रतिक्रिया
तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? चर्चेवर आदित्य यांची पहिली प्रतिक्रिया
तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? चर्चेवर आदित्य यांची पहिली प्रतिक्रिया Tejas Thackeray Shivsena : आदित्य ठाकरे यांनी बंधू तेजस ठाकरे यांच्या सक्रिय राजकारणातील एण्ट्रीची चर्चा फेटाळून लावली आहे. तसंच बंडखोर आमदार आणि खासदारांवर पुन्हा टीका केली आहे. Tejas Thackeray Shivsena : आदित्य ठाकरे यांनी बंधू तेजस ठाकरे यांच्या सक्रिय राजकारणातील एण्ट्रीची चर्चा फेटाळून लावली आहे. तसंच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज ठाकरेंना मोदी सरकार सुरक्षा पुरवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले “जर त्यांच्या…”
राज ठाकरेंना मोदी सरकार सुरक्षा पुरवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले “जर त्यांच्या…”
राज ठाकरेंना मोदी सरकार सुरक्षा पुरवणार असल्याच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले “जर त्यांच्या…” मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्राचे सुरक्षा कवच मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांना येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी मनसेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
महाविकास आघाडी-एमआयएम युतीसंदर्भात चर्चेवर संजय राऊत यांचं स्पष्ट उत्तर
महाविकास आघाडी-एमआयएम युतीसंदर्भात चर्चेवर संजय राऊत यांचं स्पष्ट उत्तर
महाविकास आघाडी-एमआयएम युतीसंदर्भात चर्चेवर संजय राऊत यांचं स्पष्ट उत्तर महाविकास आघाडीत एमआयएमने जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यासंंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत एमआयएमने जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यासंंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी…
View On WordPress
0 notes