Tumgik
#निर्धार
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार
Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार चेन्नई :- अण्णा द्रमुक पक्षाचे तामिळनाडूत सध्या दोन गट कार्यरत आहेत. यातील एक गट पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या दोन्ही गटांना एकत्र आणून जयललितांचा राजकीय वारसा भक्कम करण्याचा निर्धार दिवंगत जयललितांच्या निकटच्या सहकारी शशिकला यांनी व्यक्त केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
subhashdagar123 · 30 days
Text
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
कर्करोग मूनशॉट उपक्रमाला भारताची मदत, भारत-अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध उपक्रमांचं आयोजन
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड आणि लातूर इथं सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन
बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच पटकावलं सुवर्णपदक
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत
 एक - शून्यनं आघाडी
सविस्तर बातम्या
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते काल बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत भारत-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुधं आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून,या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी भूमीपूत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबई इथं आयोजित कोळी भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी बोलत होते. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झालं असून, सरकारने प्रकल्पांना चालना दिली, तसंच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असं शिंदे म्हणाले. "वाढवण" बंदराच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देशातलं सर्वात मोठं पॅकेज देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
***
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्या, अशी मागणी केली आहे.
****
राज्यात सध्या विरोधी पक्षांकडून रिन्यू पॉवर लिमिटेड हा उद्योग प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा दावा करणारं वक्तव्य राज्याची प्रतिमा मालिन करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. रीन्यू कंपनीने देखील विरोधी पक्षांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.  या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये काल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.  नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली.
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए सरकारनं तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करून, पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. शहरात झाडांचं प्रमाण वाढविण्यासाठी, नगर व्हॅनलाही सरकारनं मंजुरी दिली आहे.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात काल सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर आणि नांदेड जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काल धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण प्रकरणी कुणबी नोंदी बाबत तसंच हैदराबाद गॅझेटीयरसह उपलब्ध झालेल्या इतर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत जेष्ठ कायदे सल्लागार आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही विनंती तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. या कागदपत्रांच्या अनुषंगानं पुढच्या  आठवड्यात धाराशिवच्या जिल्हाधिका-यांसोबतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर. अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनाविर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या विविध रस्ते कामांचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते काल झालं.
****
नांदेड इथं श्रीकर प्रतिष्ठानच्या वतीने दि. मा. देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, आणि शब्दवेध या तीन कविता संग्रहांचं प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रमुख समिक्षक तसंच वक्ते म्हणून  संत साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ. मार्तंड कुलकर्णी हे होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नगरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढचे पाच दिवस हाज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
news-34 · 7 days
Text
0 notes
imranjalna · 2 months
Text
आ. कैलास गोरंटयाल यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटणार
जालन्यातील बैठकीत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार Congress will meet party leaders for the candidature of MLA Kailas Gorantyal जालना दि.११(प्रतिनीधी) काँग्रेस  पक्षाशी एकनिष्ठ असलेले विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांना जालना विधानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करत काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी छत्रपती…
0 notes
Video
youtube
निर्धार विकासाचा, संकल्प महायुतीच्या महाविजयाचा..
0 notes
gajananjogdand45 · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/massive-march-of-depositors-of-bankrupt-banks-to-the-office-of-the-divisional-commissioner/
0 notes
iyemarathichiyenagari · 8 months
Text
अध्यात्म चिंतामुक्त जीवन जगण्यास शिकवते -
एकतरी ओवी अनुभवावी ...वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून
अध्यात्म चिंतामुक्त जीवन जगण्यास शिकवते -
एकतरी ओवी अनुभवावी ...वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून
0 notes
kvksagroli · 9 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
शेळ्यांमधील साथीचे आजार आणि प्रतिबंध उपाययोजना संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र आणि BCRC प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/१/०२४ रोजी गाव भोसी ता.बिलोली येथे शेळ्यांचे आजार व लक्षणे आणि उपचार या विषयी शेळीपालक यांचे प्रशिक्षण झाले. या गावात शेळ्यांना साथीचा आजार झालेला आहे अशी माहिती तिथल्या पशू सखीनी डॉ. निहाल मुल्ला यांना दिली आणि त्या माध्यमातून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नि��ोजन करण्यात आले. मागील काळात गावपातळीवर कार्य करू शकणाऱ्या निवडक महिलांना "पशूसखी" करिता यापूर्वी प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र आणि BCRC दोघां मार्फत दिलेले होते. यातूनच तयार झालेल्या पशू सखी कडून उपाय योजना करण्या हेतूने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी डॉ. निहाल मुल्ला यांनी आजारी शेळयाचा उपचार याविषयी माहिती दिली. तसेच ता. प्रकल्प समन्वयक यांनी SSM RF BCRC Project, Sagroli यांच्या वतीने राबवित सलेले उपक्रम, हवामान अनुकूल शेतीपद्धती याविषयी माहिती दिली. यावेळी पशुसखी सौ.सविता इरना बासरे यांनी उत्कृष्ट सहकार्य केले. एकूण १९ शेळी पालकानी कार्यक्रमात सहभाग घेतला. पुढील औषधोपचार व उपाययोजना बाबत मदत करण्याचा निर्धार सौ. सविता यांनी व्यक्त केला. #animalrescue #animalwelfare #careanimals🐏🐰🐴🐼🐱🐶 #goatary #farmwomen
1 note · View note
icnnetwork · 9 months
Text
#UP-प्रयागराज में माघ मेले की तैयारियाँ ज़ोरो पर,पुलिस अफ़सरो ने पुलिस को दिया प्रशिक्षण
#Uppolice #UpPolicemitra #prayagrajpolice
#IndiaCoreNews
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा
“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा
“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले आहेत. खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज…
View On WordPress
0 notes
subhashdagar123 · 30 days
Text
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची पंतप्रधानांची घोषणा
समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन, नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेडमध्ये गोदावरी नदी स्वच्छता मोहिम
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या बंदला जालना आणि परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत एक - शून्य अशी आघाडी
****
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भिख्कू महासंघांचे राज्यभरातून भंतेजी आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन, सामूहिक प्रार्थना झाली. अखिल भारतीय भिख्कू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो यावेळी उपस्थित होते.
****
पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून, ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाला केल्या आहेत.
****
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना आज नागपूर��ध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत गडकरी यांनी त्यांची प्रशंसा केली.
****
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा चार जागा मागणार असून, राज्यातल्या एकूण अपेक्षीत जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं पवार म्हणाले.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत एक पेड माँ के नाम, स्वच्छता क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता जागृती साठी नाटक, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम, कचरा वर्गीकरण आदी कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये देखील आज स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली –
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
मुंबईत वांद्रे इथं उभारण्यात येणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़. मराठा समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर उद्या सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं. या सर्व आमदारांकडून ‘धनगड’ नामोल्लेखाला समर्थन असल्याचं पत्रही आंदोलकांनी घेतलं.
लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर.अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
 ****
नांदेड पोलीस परीक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर धाडी टाकून जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत हातभार लावावा असं आवाहन पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली, तसंच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना फार्मसी टिचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत तीन दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
लोहमार्ग निरीक्षणासह दुरूस्तीसाठीच्या लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद-पंढरपूर ही गाडी उद्या निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे.
****
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
education-posts-313 · 10 months
Text
मराठी समानार्थी शब्द
समानार्थी शब्द हा व्याकरणाचा महत्त्वाचा भाग आहे. समानार्थी शब्द दोन किंवा अधिक शब्द आहेत ज्यांचा समान अर्थ आहे. तुम्ही "समानार्थी" देखील म्हणता जे समानार्थी आहेत.
समानार्थी शब्द वापरल्याने तुमच्या भाषेचे सौंदर्य वाढते, तुमच्या लिखाणात विविधता येते आणि तुमच्या भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. तुमचे लेखन वैविध्यपूर्ण आणि तुमची भाषा समृद्ध असती.
Marathi Sansarthi Shabd: शालेय विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तीसाठी मराठी भाषा आणि व्याकरणाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. थेट भरती (Talathi Bharti, Police Bharti, Gramsevak Bharti, ZP Bharti) आणि नागरी सेवा मुख्य परीक्षा, बँकिंग परीक्षा आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षेत मराठी व्याकरणाच्या "समानार्थी" किंवा घटक भागांचे 2 ते 3 प्रश्न विचारले जातात.
Marathi Sansarthi Shabd: जर तुम्हाला समानार्थी शब्द किंवा घटकांमध्ये गुण मिळवायचे होते ; Samanarthi Shabd Marathi ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही 100 पेक्षा जास्त समानार्थी किंवा रिक्त पृष्ठे आहेत जी तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये समानार्थी शब्द किंवा घटक कव्हर गुण देण्यास मदत करतील.
हे पन वाचा
Marathi Grammar
विरुद्धार्थी शब्द मराठी
मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
मराठी समानार्थी शब्द
भोजन X खाना
नाच X नृत्य
अंत X शेवट
गयावया X काकुळती
स्वीकार X मान्य
अंतरिक्ष X अवकाश
चिल्लापिल्ली X मुलेबाळे
कपाळ X ललाट
अंग X शरीर, तन, काया
मदत X सहाय्य
काळ X समय
अंगण X आवार
कन्या X मुलगी
अंगण X विस्तव
खुषी X संतोष
अंघोळ X स्नान
प्रकाश X उजेड
कल्याण X हित
अंधार X काळोख
गस्त X पहारा
चप X गप्प
अंधुक X पुसट
गार X थंड
करार X वचन, ठराव, कबुली
आई X माता, माय, जननी, माऊली, जन्मदात्री
प्रवास X सफर, फेरफटका, पर्यटन
चरितार्थ X उदरनिर्वाह
ममता X माया
गाय X धेनू, गो, गोमाता
चरण X पाय, पाऊल
आजारी X पीड़ित, रोगी
निश्चय X निर्धार
कठोर X निर्दयी, निष्ठूर
चाकर X नोकर, सेवक, गडी, दास, गुलाम
आयुष्य X जीवन, हयात
पिशवी X थैली
कवच X आच्छादन, आवरण, टरफल
गदारोळ X गोंधळ, ओरड
आनंद X संतोष, मोद, हर्ष, तोष, प्रमोद
चंद्र X सोम, निशानाथ, चंद्रमा, हिमांशु
सामर्थ्य X शक्ति, बळ
आकर्षण X मोह, ओढ, पाश
कविता X काव्य, पद्य
मैत्री X दोस्ती
ओबडधोबड X बेढव, बेडौल, खरबरीत, रांगडे
चपल X चलाख, वेगवान, तल्लख, हुशार
मुलुख X देश, प्रांत, परगणा
कसूर X कुचराई, चूक, न्यूनता, दोष
आवाज X नाद, निनाद, रव
गोपाळ X कन्हैया, कृष्ण, मोहन, मुरलीधर, गोविंद, गिरीधर
मेहनत X कष्ट, श्रम, परिश्रम
आवश्यकता X गरज, जरूरी
कणव X दया, माया, कृपा, कीव, करूणा
आग्रह X हट्ट
मौज X मजा, गंमत
चांदणे X कौमुदी, ज्योत्सना, चंद्रिका
साहित्य X लिखाण
आक्रमण X हल्ला, चढाई, स्वारी, मोहीम
कमळ X पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी
ग्रह X कल्पना, समजूत, भावना
आवाहन X विनंती, बोलवणे, आमंत्रण
मुद्रा X चेहरा, मुख, तोंड, वदन
चांदी के रूपे
आश्चर्य X नवल, विस्मय, अचंबा
कबूल X मान्य, संमत, पसंत, अभिमत
मित्र X दोस्त, साथी, सखा, सवंगडी
आहार X खाना, भोजन, अन्न
मिष्टान्न X गोडधोड
मुख X तोंड, चेहरा
कपाळ X ललाट, भाल, निढळ, निटिल
गडप X अदृश्य
चाणाक्ष X हुशार, चतुर, धूर्त, चलाख, चालाख
सेवा X शुश्रूषा
कबूल X संमत, मान्य, पसंत, मंजूर, अनुकूल
पुस्तक X ग्रंथ
चाचणी X परीक्षा, तपासणी, पारख
मुलगा X पुत्र, सुत, तनय
इमानी - प्रामाणिक, नेक, एकनिष्ठ
मुलगी X कन्या, तनया
गरीब X दीन, लाचार, पामर, दुबळा
इंद्र X सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष
चटकन X झपाझप, झरझर, त्वरीत, चटदिशी, झटपट
परिश्रम X कष्ट, मेहनत
पती X नवरा, वर
पत्र X टपाल
पहाट X उषा
चबुतरा X चौथरा, कट्टा
1 note · View note
Video
youtube
लोकशाही टिकवण्यासाठी निर्धार नव पर्वाचा - धनंजय मुंडे.. #dhananjaymunde ...
0 notes