Tumgik
#मयुरी देशमुख
loksutra · 2 years
Text
मालिनी इमलीच्या आयुष्यात कहर निर्माण करेल
मालिनी इमलीच्या आयुष्यात कहर निर्माण करेल
इमली स्पॉयलर अलर्ट 19 ऑगस्ट 2022: गुल खानची लोकप्रिय टीव्ही मालिका इम्लीने ट्विस्ट आणि टर्नच्या बाबतीत वेग पकडला आहे. मालिकेच्या मागील ट्रॅकबद्दल प्रेक्षकांनी प्रचंड निराशा व्यक्त केली. अशा परिस्थितीत सुंबुल तौकीर खान आणि फहमन खान स्टारर सिरियल इमलीचे निर्माते आता कथेत रोज नवे ट्विस्ट आणत आहेत. इमलीच्या आगामी एपिसोडमध्ये आर्यन आणि इमली यांच्यात जोरदार वाद होणार आहे. दुसरीकडे, चिंचेची सर्वात मोठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years
Text
चार चाकीत देशमुख-माळवदे, दुचाकीत खैरनार-काळे जोडी अजिंक्य
चार चाकीत देशमुख-माळवदे, दुचाकीत खैरनार-काळे जोडी अजिंक्य
वीसा `टीएसडी रन ऑफ नाशिक`- महिला गटात कुलकर्णी-पाटीलचे यश नाशिकः वेळ,वेग आणि अंतराचा मेळ साधणाऱ्या `वीसा` च्या `टीएसडी रन ऑफ नाशिक`मध्ये चारचाकीच्या गटात सूरज देशमुख-समीर माळवदे या जोडीने तर दुचाकीमध्ये लीना खैरनार-अंकिता काळे या जोडीने वर्चस्व राखत अजिंक्यपद पटकावले. प्रमोशनसाठी सहभागी झालेल्या ई-बाईक्स गटात अबीद- जहीद यांनी बाजी मारली तर महिलांच्या विशेष गटात मयुरी कुलकर्णी- योगिता पाटील ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी कोविड योद्ध्यांचं लसीकरण मोफत - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची घोषणा.
·      कोविड लसीकरणाची देशभरात रंगीत तालीम; राज्यात चार जिल्ह्यांमध्ये सराव चाचणी यशस्वी.
·      राज्यात तीन हजार दोनशे अठरा नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २२५ रुग्णांची नोंद.
·      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी होणार.
·      दहावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आटीआयची विशेष प्रवेश फेरी.
आणि
·      राज्यात महापालिका हद्दीत नववी-दहावीच्या वर्गांना उद्यापासून प्रारंभ.
****
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी कोविड योद्ध्यांचं लसीकरण मोफत करणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केलं आहे. ते काल दिल्लीत कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. येत्या जुलैपर्यंत २७ कोटी नागरिकांना प्राधान्यानं लस देण्याचं नियोजन केलं जात असल्याची माहिती, डॉ हर्षवर्धन यांनी दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याची खात्री करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं हर्षवर्धन यांनी नमूद केलं.
****
कोविड लसीकरणाची काल देशभरात रंगीत तालीम घेण्यात आली. राज्यात पुणे, नागपूर, नंदूरबार आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये ही रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. नागपूर महानगरपालिकेंतर्गत केटी नगर, डागा रुग्णालय तसंच कामठी उपजिल्हा रुग्णालयात तर पुण्यात औंध रुग्णालय, माण इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड इथल्या जिजामाता रुग्णालयात ही रंगीत तालीम घेण्यात आली.
आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातही लसीकरणाची सराव चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. नंदूरबार इथलं जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी निवड झालेल्या पहिल्या परिचारिका रेश्मा चाफेटकर यांनी, कोविड लस उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रंगीत तालिमीची पाहणी करून, लसीकरण प्रक्रियेची माहिती दिली. प्रत्येक लसीकरण केंद्रावर तीन कक्ष असतील. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल, दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लस टोचण्यात येईल. तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाने परवानगी दिल्यास प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना कोविड लस मोफत मिळायला हवी, असं टोपे यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
आम्ही असं अभिप्रेत करतो की भारत देशाला सगळ्यांनाच फ्री दिलं पाहिजे खरं तर. पण ठीक आहे, त्यांनीच जर असं सांगितलं असेल आता सध्या तर की फक्त हेल्थ वर्कर्स आणि फ्रंट लायनर्स यांना आपण देणार. तर कदाचित तो क्वांटम फार कमी होईल. यापेक्षाही महत्वाचा क्वांटम आहे तो ३५ टक्के जे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली राहतात, त्यांची मला सगळ्यात जास्त काळजी वाटते. त्यांना आपण फ्री दिलंच पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं गर्व्हनमेंट ऑफ इंडियाने फ्री द्या��ं त्यांना सुध्दा.
****
कोविड-19 वरील दोन लसींना, तातडीच्या वापरासाठी ठराविक अटींसह परवानगी देण्याची शिफारस, भारतीय औषध महानियंत्रकांच्या विषय तज्ज्ञ समितीनं केली आहे. यामध्ये पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या कोविशील्ड आणि हैदराबाद इथली भारत बायोटेक कंपनी उत्पादित करत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश आहे. देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा, अशा विविध नियामक अटी या समितीनं या संस्थांना घातल्या आहेत. अहमदाबाद इथल्या कॅडिला हेल्थकेअर कंपनीलाही आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय परीक्षणाला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, औषध महानियंत्रक आज सकाळी अकरा वाजता याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. औरंगाबादचे विभागीय वनाधिकारी विजय सातपुते यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्यात काल तीन हजार दोनशे अठरा नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख अडतीस हजार आठशे चोपन्न झाली आहे. काल एक्कावन्न रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार सहाशे एकतीस झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे. काल दोन हजार एकशे दहा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख चौतीस हजार नऊशे पस्तीस रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६४ शतांश टक्के इतका आहे. सध्या राज्यात त्रेपन्न हजार एकशे सदतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २२५ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका कोविडग्रस्तांचा समावेश आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ७६ कोविडग्रस्त आढळले, बीड जिल्ह्यात ४४, नांदेड २२, उस्मानाबाद २३, लातूर २६, जालना १८, परभणी ११, तर हिंगोली जिल्ह्यात काल पाच नवीन कोविड बाधितांची नोंद झाली.
****
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. हा दिवस 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्तानं शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येईल. स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना सावित्रीबाई यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यात ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. ‘उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी, मिन��� अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे पुरस्कार आज सायंकाळी प्रदान करण्यात येणार आहेत. शहरातल्या हेडगेवार रुग्णालयातल्या दामुअण्णा दाते सभागृहात सायंकाळी साडे चार वाजता हा कार्यक्रम होईल. यंदा डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी राजहंस यांना तर डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार प्रसित्र नृत्यगुरु आणि औरंगाबाद इथल्या महागामी गुरुकुलाच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना जाहीर झाला आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री बुटा सिंग यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. ते गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोमात होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुटासिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
केंद्र सरकारने तयार केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकरी हिताचे असल्याचा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. ते काल नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते. हे कायदे लागू झाल्यावरही कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द होणार नाहीत, तर शेतकरी आपला शेतमाल बाजार समित्यांच्या बाहेरही जादा दराने विकू शकेल. कंत्राटी शेतीमध्येही शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळू शकतात, शेतकऱ्यांचा जर फायदा होत असेल, तर त्याला विरोध करण्याचं कारण काय असा प्रश्न ही चौहान यांनी केला.
****
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा तसंच महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते काल औरंगाबादहून रवाना झाले. औरंगाबाद तसंच अहमदनगर जिल्ह्यातले हे कार्यकर्ते उद्या नागपूरहून मध्यप्रदेशातल्या गुनाकडे रवाना होतील, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांची परवा चार जानेवारी रोजी चर्चेची आठवी फेरी होणार असून, या चर्चेतून योग्य तोडगा निघाला नाही, तर ही वाहन यात्रा सहा तारखेला दिल्लीत धडकणार आहे.
****
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संधीवर मर्यादा घालण्याचा निर्णय मराठा समाजावर अन्यायकारक असल्याचं, संभाजी ब्रिगेडचे माजी बीड जिल्हाध्यक्ष विधीज्ञ राहुल वायकर यांनी म्हटलं आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांना ही परीक्षा देण्याची संधी सहा वेळा, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना नऊ वेळा तर इतर प्रवर्गातल्या उमेदवारांना परीक्षा देण्याच्या संधीवर कमाल मर्यादा लागू नसेल, असा निर्णय आयोगानं घेतला आहे.
****
दहावी पुरवणी परीक्षेतल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आटीआयमधल्या रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना उद्या चार जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करणं, तसंच प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातल्या शासकीय तसंच खासगी 'आयटीआय'मधल्या प्रवेशाच्या नियमित चार फेऱ्या तसंच समुपदेशन फेरीही पूर्ण झाली आहे. मात्र दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात महापालिका हद्दीतल्या शाळांमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग उद्या सोमवारपासून सुरु होत आहेत. राज्य शासनानं काल याबाबतचा आदेश जारी केला. या अनुषंगानं सबंधित शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी केली जात आहे. औरंगाबाद इथं कालपर्यंत ९९३ शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली, त्यामध्ये एक जण कोविड बाधित असल्याचं आढळलं.
****
एसटी बसच्या चालकाला मारहाण प्रकरणी लातूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोन आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील शेळके आणि जयराम लोंढे असं या दोघांचं नाव असून, त्यांनी १९ डिसेंबर २०१६ रोजी बार्शी - मुरूड बसच्या चालकाला मारहाण केली होती.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन परभणी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.  
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
****
स्वच्छ आणि हरित लातूर हा नवा पॅटर्न आपण निर्माण करू शकू, असा विश्वास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत लातूर शहर महानरपालिकेच्या शपथ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महापालिकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांनी पदाधिकारी तसंच अधिकाऱ्यांचं कौतुक केलं
****
परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह प्रलंबित विकास प्रश्नांबाबत लोकचळवळ उभारण्याचा संकल्प परभणीकर संघर्ष समितीनं केला आहे. काल समितीची बैठक झाली. महानगरातील सर्व भागातल्या नागरिकांपर्यंत पोहचून त्यांचंही समर्थन मिळविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
****
नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष पी आर धुळे यांचं काल निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी नांदेड इथं अत्यंसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याला विरोध करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात काल औरंगाबाद इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात, थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
****
0 notes
bollywoodpapa · 4 years
Text
मराठी फिल्म अभिनेता आशुतोष भाकरे ने की आत्महत्या, घर में फांसी लगा कर दी अपनी जान!
New Post has been published on https://bollywoodpapa.com/278634/marathi-actress-mayuri-deshmukh-husband-ashutosh-bhakre-commited-suicide/
मराठी फिल्म अभिनेता आशुतोष भाकरे ने की आत्महत्या, घर में फांसी लगा कर दी अपनी जान!
दोस्तों पिछले महीने बॉलीवुड के अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने आत्महत्या कर सभी को हैरानी में दाल दिया था, आज भी उनके चाहने वाले उनके ग़म में डूबे हुए है, ऐसे मराठी फिल्म इंडस्ट्री से भी एक बुरी खबरे सुनने में आ रही है। मराठी एक्टर आशुतोष भाकरे ने सुसाइड कर लिया है। आशुतोष 32 साल के थे। आशुतोष ने कथित तौर पर महाराष्ट्र के नांदेड़ स्थित अपने घर में फांसी लगाकर जान दे दी।
पुलिस के मुताबिक, आशुतोष का शव नांदेड़ स्थित उनके बंगले में लटका हुआ मिला। आशुतोष एक महीने पहले नांदेड़ आए थे। मराठी फिल्म इंडस्ट्री में आशुतोष के निधन से शोक की लहर है। आशुतोष के अचानक चले जाने से फैंस सदमे में हैं। आशुतोष ने इतना बड़ा कदम क्यों उठाया ये अभी साफ नहीं हो पाया है।
बता दें कि आशुतोश फिल्म एंड टीवी एक्ट्रेस मयुरी देशमुख के पति थे। 21 जनवरी 2016 को मयुरी और आशुतोष शादी के बंधन में बंधे थे। दोनों की बॉन्डिंग शानदार थी। उनका नांदेड़ के गणेश नगर इलाके में बंगला था। कुछ दिनों पहले ही दोनों अपने घर आए थे। मयुरी भी मराठी इंडस्ट्री की फेमस एक्ट्रेस हैं।
आपको बता दे की आशुतोष इंडस्ट्री में काफी चर्चित एक्टर थे। उन्होंने Ecchar Tharla Pakka नाम की फिल्म की थी। इस फिल्म को काफी पसंद किया गया। उन्हें सीरियल Khulta Kali Khulena से घर-घर में पहचान मिली। दोनों की एक्टिंग को काफी पसंद किया जाता है।
0 notes
megamarathi · 6 years
Photo
Tumblr media
अभिनेत्री - मयुरी देशमुख 💝💝 http://bit.ly/MayuriDeshmukhPhotos #mayurideshmukh #actress #cute #dimplegirl
0 notes
Photo
Tumblr media
कडक लुक अभिनेत्री मयुरी देशमुख <3
0 notes
webmaharashtra-blog · 8 years
Photo
Tumblr media
अशी रंगली होम मिनिस्टरची मकरसंक्रांत ! मुंबई :  महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेली आणि ज्यात आपणही सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे 'होम मिनिस्टर'. संध्याकाळी ६.३० ची वेळ ही प्रत्येक घरासाठी हक्काची असते. आपली हीच लोकप्रियता टिकवत हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे.सणाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या भागांचं वैशिष्ट्य तर काही औरच. वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकरसंक्रांत. या गोड सणानिमित्त होम मिनिस्टरचा एक खास सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ज्यात सहभागी होणार आहेत झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील तुमच्या आवडत्या प्रमुख जोड्या. येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे. डोंबिवली जिमखानामधील मैदानावर होम मिनिस्टरचा हा संक्रांत स्पेशल खेळ रंगला. ज्यात झी मराठीच्या नायक नायिकांसह सामान्य महिलांनाही सहभागी होण्याची आणि पैठणीचा मान जिंकण्याची संधी मिळाली.‘जय मल्हार’ मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि बानूची भूमिका साकारणारी ईशा केसकर, ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिका - अनिता दाते, शनाया - रसिका, गुरुनाथ - अभिजित खांडकेकर, ‘खुलता कळी खुलेना’ मधील विक्रांत - ओमप्रक्राश शिंदे, मानसी - मयुरी देशमुख, मोनिका - अभिज्ञा भावे,
0 notes
digimakacademy · 4 years
Text
मयुरी-आशुतोषच्या प्रेमाची कळी 'अशी' खुलली होती!!
मयुरी-आशुतोषच्या प्रेमाची कळी ‘अशी’ खुलली होती!!
[ad_1]
मुंबई: काल म्हणजेच बुधवारी २९ जुलै रोजी मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अभिनेता आणि अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भोकरे यानं आत्महत्या केली. नांदेड इथल्या राहत्या घरी गळफास लावून त्यांनं जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलं नाही.
मयुरी आणि आशुतोषमध्ये काही मतभेद नव्हे; असं त्याच्या एका…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या
धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या
[ad_1]
नांदेड : ‘खुलता खळी खुलेना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आशुतोषनं राहत्या घरी गळफास घेतला असून या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
प्रसाद ओकला वाटतोय लेकाचा अभिमान; दहावीच्या परिक्षेत मिळवले ‘इतके’ टक्के
आशुतोषच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलं नाही. काही दिवसांपूर्वी आशुतोषनं…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
इमली मयुरी देशमुख फहमन खान आणि सुंबुल टोकीर शोमध्ये परतली
इमली मयुरी देशमुख फहमन खान आणि सुंबुल टोकीर शोमध्ये परतली
इमली शो: स्टार प्लस शो ‘इमली’ने सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. आर्यन आणि चिंचेची जोडी लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, जरी आदित्यने अद्याप त्यांचे नाते स्वीकारले नाही. दरम्यान, या शोबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘आदित्य’ म्हणजेच मनस्वी वशिष्ठ लवकरच शोमधून बाहेर पडणार आहे, तर मालिनी म्हणजेच मयुरी देशमुख पुन्हा परतणार आहे. शोच्या आगामी भागात मालिनी पुन्हा एकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
अर्पिता आर्यनला इमलीवर किती प्रेम करते याची जाणीव करून देईल
अर्पिता आर्यनला इमलीवर किती प्रेम करते याची जाणीव करून देईल
इम्ली आजचा स्पॉयलर 14 मार्च 2021: टीव्ही मालिका ‘इमली’ मी आर्यन चिंचेवर फास घट्ट करत आहे. आर्यनने जाहीर केले आहे की तो चिंचेशीच लग्न करणार आहे. मात्र, आर्यनचा हा मार्ग तितका सोपा असणार नाही. मनस्वी वशिस्त, मयुरी देशमुख आणि सुंबूल तौकीर खान स्टारर मालिका ‘इमली’ (इमली लेटेस्ट एपिसोड) मध्ये तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल, चिंचेने आर्यनची पत्नी बनून घरात प्रवेश केला आहे. आर्यन आणि चिंचेच्या लग्नाची…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
airnews-arngbad · 4 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ३० जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता ****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९६ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात महानगरपालिका हद्दीतल्या २३ आणि ग्रामीण भागातल्या ७३ रूग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची एकूण संख्या तेरा हजार सहाशे बासष्ट झाली आहे.
****
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या योजनांमधे गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध विभागानं कडक करावाई सुरु केली आहे. अशा दोन प्रकरणांची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
****
मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांनी काल नांदेड इथं राहत्या घरी आत्महत्या केली, ते ३५ वर्षांचे होते. आशुतोष यांनी “भाकर”, “ईचार केला पक्का” या चित्रपटात काम केलं आहे. मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचे ते पती होत.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात काल जोरदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातल्या लिंबाळा इथल्या ओढ्याला पूर आला आहे.
लातूर जिल्ह्यात कालपर्यंत २२ पूर्णांक ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ४८ पूर्णांक ७९ टक्के इतका पाऊस झाला आहे.
जालना तसंच औरंगाबाद जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात पैठणखेडा - चितेगाव रस्त्यावर कोल्ही नदीच्या पुलावरुन जाताना दोन युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. स्थानिक नागरीक आणि बिडकीन पोलीस रात्री उशीरापर्यंत या दोघांचा शोध घेत होते.
****
जालना इथल्या महावितरणच्या ग्रामीण शाखेचा कनिष्ठ अभियंता नूर मोहम्मद सिद्दीकी याला दोन हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. तक्रारदारानं आपल्या मालकीच्या जागेवरील विद्युत खांब विनापरवानगी हटवल्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अभियंता सिद्दीकी यानं ही लाच मागितली होती.
****
परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यंवशी यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 February 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.
• राज्यांना नुकसान भरपाई देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेची मंजुरी. • राज्यातल्या दहा महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठीचा प्रचार आज संपणार. • स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचं निधन. आणि • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. **** वस्तू आणि सेवाकर कायदा लागू झाल्यानंतर राज्यांना नुकसान भरपाई देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेनं काल मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थानमध्ये उदयपूर इथं झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत सर्व राज्यांचं या मसुद्यावर एकमत झालं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हा मसुदा मांडला जाईल. केंद्रीय जीएसटी, एकीकृत जीएसटी आणि राज्य जीएसटी विधेयकाच्या मसुद्याबाबत मात्र कालच्या परिषदेत एकमत झालं नाही, यासाठी येत्या चार आणि पाच मार्चला परिषदेची बैठक होणार आहे. **** राज्यातल्या दहा महापालिका आणि अकरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठीचा प्रचार आज संपणार आहे. या सर्व ठिकाणी परवा मंगळवारी मतदान होणार आहे. महापालिकांसाठी आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर जिल्हा परिषदांसांठी आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. **** शिवसेनेनं राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नसल्याचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जाहिरातींवर अत्याधिक खर्च करत असल्याची टीका त्यांनी केली. विमुद्रीकरणामुळे शेती आणि लहान उद्योगांना मोठा फटका बसल्याचं, पवार म्हणाले. **** महाविद्यालयीन आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विभागातील शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं काल यासंदर्भात नवी दिल्लीत एक पत्रक जारी केलं. **** स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचं काल पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. विधानसभेवर पाच वेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आलेले धोटे यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही आक्रमकपणे मांडले. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’ असंही संबोधलं जातं. २००२ साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. धोटे यांच्या निधनानं शेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारं लढवय्या आणि वादळी व्यक्तिमत्त्व हरपलं अशा शब्दांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. **** स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमात मराठवाडा विभाग मागं असून वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या एकूण उद्दीष्टापैकी पन्नास टक्के उद्दीष्टंच पूर्ण झालं असल्याची माहिती, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोतम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल मराठवाड्यातले नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात शौचालयांचं काम कमी प्रमाणात झालं असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पातल्या योजनेअंतर्गत तसंच योजनेतर खर्चाच्या एकत्रीकरणासाठी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य येत्या २० तारखेला राज्य शासनाला आपला अभिप्राय सादर करणार आहेत असं भापकर यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं काल मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. **** माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कुसुम चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नांदेड इथं संगीत शंकर दरबार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथं आयोजित वार्ताहर परिषदेत आमदार डी.पी.सावंत यांनी काल ही माहिती दिली. या तीन दिवसीय महोत्सवात, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तु.शं.कुलकर्णी, मिस इंडिया नवेली देशमुख, ज्येष्ठ गायक पंडित टी.एम.देशमुख, अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिनेता नुपूर नाथा चितळे यांना गौरवण्यात येणार आहे. **** या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. या अनुषंगानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. औरंगाबाद इथं शिवजन्मोत्सव संयोजन समितीच्या वतीनं पिसादेवी परिसरात तीन दिवसीय शिवजन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काल सायंकाळी “गर्जा जय जय महाराष्ट्र माझा” हा लोककला दर्शनाचा कार्यक्रम सादर झाला. आज सकाळी भव्य शोभायात्रा निघणार असून सायंकाळी शिवबा हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. शिवजयंतीनिमित्त लातूर इथं दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद शहरात काढण्यात येत असलेल्या मिरवणुकांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मिरवणुका संस्थान गणपती ते क्रांती चौक, तसंच टिव्ही सेंटर ते सिडको हडको आणि गजानन महाराज मंदिर या परिसरातून काढण्यात येणार असल्यानं, तिथले वाहतुकीचे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. **** राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ-नाफेडमार्फत नांदेड इथं ठप्प झालेली तूर खरेदी तत्काळ सुरू न केल्यास, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी काल नांदेड इथं यासंदर्भात बोलताना, सरकारनं या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, असं आवाहन केलं. नाफेडनं सुरू केलेली ही तूर खरेदीची आठ केंद्र बारदानाअभावी तसंच गोदाम रिकामं नसल्यामु��े गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. **** समाजानं पारंपारिक शिक्षणाऐवजी कृतीशील शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे असं प्रतिपादन, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर यांनी केलं आहे. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आयोजित मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र आणि वाणिज्य या विषयांवरच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. विद्यार्थ्यांनी सतत अशा चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करावा, असं कुलगुरुंनी यावेळी सांगितलं. **** अहिंसा हे तत्व महात्मा गांधींनी दुबळ्यांपासून सुरू करून सबळांपर्यंत नेल्याचं मत, सामाजिक कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारवंत डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित ‘वर्तमानकाळात महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. गांधीजींविषयी समाजात समजाऐवजी गैरसमज जास्त असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. **** लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या सिध्दार्थ औद्योगिक सहकारी संस्थेविरोधात सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपाला अज्ञातांनी लावलेल्या आगीची चौकशी सुरू असल्याची माहिती, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.एम.हिरमुखे यांनी दिली. उपोषणकर्त्या सविता बिराजदार यांनी कांही संशयितांची नावं दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. सिध्दार्थ औद्योगिक सहकारी संस्थेच्या विरोधात सविता बिराजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. अज्ञात इसमांनी काल पहाटे या उपोषण मंडपाला आग लावली. **** गेल्या १६ तारखेला, जालना जिल्ह्यातल्या पाटोदा इथं, मतदान प्रक्रिया चालू असताना मतदान केंद्रावर येऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी, भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाटोदा गावातल्या मतदान केंद्र अध्यक्षांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. **** महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि रोटरी क्लबच्या वतीनं औरंगाबाद मधल्या कलाग्राम इथं आयोजित ऋतुरंग महोत्सवात काल मणिपूर, त्रिपुरा आणि नागालँड इथल्या लोकनृत्याचं सादरीकरण, पंडित मिश्रा आणि सचिन नेवपूरकर यांचं शास्त्रीय गायन, असे कार्यक्रम झाले. आज कलाग्राम इथं देबप्रिया अधिकारी आणि समन्वय सरकार यांची गायन तसंच सतार जुगलबंदी, रचना यांचं कथ्थक, तर पूर्वांचल राज्यातली लोककला या कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे. **** अहमदनगर इथल्या भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित मदनगोपाल व्यास पुरस्कार लातूरच्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठाणला काल प्रदान करण्यात आला. ४१ हजार रुपये आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरुप असून प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य डॉक्टर अशोक कुकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. **** हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या सिंदगी जिल्हा परिषद गटातल्या येहळेगाव इथं १६ तारखेला झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं, या ठिकाणी परवा २१ तारखेला फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. ****
0 notes