Tumgik
#महापालिका
rebel-bulletin · 2 years
Text
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश मुंबई, दि.११ : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हडपसर सह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करा – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर
हडपसर सह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करा – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर
हडपसर सह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करा – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर हडपसर – महापालिकेत जी अकरा गावे समाविष्ट करण्यात आली आहेत ती अकरा गावे आणि हवेलीतील उर्वरित भाग एकत्र करून नवीन महापालिका स्थापन केली तर तो निर्णय सगळ्यांच्या हिताचा ठरणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा अर्धवट निर्णय घेण्यापेक्षा हडपसर सह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 24 days
Text
कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? 'या' महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह
Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे. हायलाइट्स: मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम महाराष्ट्र टाइम्सganesh…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 9 hours
Text
Pimpri : महापालिका सेवांमध्ये सुसूत्रता आणा; आयुक्तांचे निर्देश
Pimpri : महापालिका सेवांमध्ये सुसूत्रता आणा; आयुक्तांचे निर्देश – MPC…
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर;विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित
आणि
मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील. भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्याचं आर्थिक केंद्र होण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान, केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या वाढवण तसंच ग्रेट निकोबार बेटावरच्या गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत आहेत. केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या ५ वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वासही सोनोवाल यांनी वर्तवला.
****
जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या दहा वर्षात मजबूत पायाभूत आराखडा निर्माण केल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स च्या एकोणसत्तराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या जागा वाढवणं आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणं, अशी पावलं सरकारने उचलल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज मुंबईत मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड महापालिका कार्यालयातही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या चकमकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं मत, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं यावेळी बजावलं.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथे नागरिकांनी आज कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. यावेळी गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यानं कसोटी क्रिकेटच्या टॉप टेन मानांकन यादीत पुनरागमन केलं असून, तो आता या यादीत भारताच्याच यशस्वी जैस्वालसोबत पाचव्या स्थानावर आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पाच स्थानांच्या घसरणीनंतरही या यादीत स्थान राखलं असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १४ दरवाजे अर्धा फूट तर चार दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून, धरणातून अकरा हजार ५२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता परवा सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यातून निवृत्तीवेतन तसंच स्पर्श योजनेसंबंधित सगळ्या अडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी परिसरातल्या सर्वत्रा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
****
0 notes
news-34 · 5 days
Text
0 notes
imranjalna · 3 months
Text
जालना शहरातील लाईट, गटर, मीटर आणि वाटर यानागरी समस्यांवरून शिंदेंची शिवसेना आक्रमक..
जालना महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या देत नागरी समस्या तातडीने उपलब्ध करून देण्याची केली विनंती… शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट… Shinde’s Shiv Sena is aggressive over the problems of light, gutter, meter and water in Jalna city. जालना शहरातील लाईट, गटर, मीटर आणि वाटर या नागरी समस्यांवरून आज शिंदेंची शिवसेना आक्रमक झालीय. यावेळी शिवसेना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
नाशिक होल्डिंग संदर्भात महापालिका उपयुक्तांना निवेदन..
0 notes
digitalbharat12 · 9 months
Text
नेताजी सुभाषचन्द्र बोस (Subhas Chandra Bose) का जन्म 23 जनवरी सन् 1897 को ओड़िशा के कटक शहर में हिन्दू कायस्थ परिवार में हुआ था। उनके पिता का नाम जानकीनाथ बोस और माँ का नाम प्रभावती था। जानकीनाथ बोस कटक शहर के मशहूर वकील थे। पहले वे सरकारी वकील थे मगर बाद में उन्होंने निजी प्रैक्टिस शुरू कर दी थी। उन्होंने कटक की महापालिका में लम्बे समय तक काम किया था और वे बंगाल विधानसभा के सदस्य भी रहे थे। अंग्रेज़ सरकार ने उन्हें रायबहादुर का खिताब दिया था। प्रभावती देवी के पिता का नाम गंगानारायण दत्त था। दत्त परिवार को कोलकाता का एक कुलीन परिवार माना जाता था। प्रभावती और जानकीनाथ बोस की कुल मिलाकर 14 सन्तानें थी जिसमें 6 बेटियाँ और 8 बेटे थे। सुभाष उनकी नौवीं सन्तान और पाँचवें बेटे थे। अपने सभी भाइयों में से सुभाष को सबसे अधिक लगाव शरद चन्द्र से था।
Read more...
1 note · View note
gajananjogdand45 · 10 months
Link
https://marmikmaharashtra.com/otherwise-confiscation-proceedings-against-pets-the-owners-will-also-have-to-pay-the-fine-order-issued-by-chhatrapati-sambhajinagar-municipal-corporation/
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
मनपा अधिकाऱ्याला ' पद्धतशीर ' बोलण्यात गुंगवल अन.. , तोफखान्यात गुन्हा दाखल
नगर इथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून आपण बोलत आहोत असे सांगत एका व्यक्तीने तीनवेळा ट्रांजेक्शन करत महापालिका अधिकाऱ्याची तब्बल एक लाख १८ हजार रुपयांनी रुपयांची फसवणूक केलेली आहे. तोफखाना पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर अधिकाऱ्याने तोफखाना पोलिसात दाखल होत तक्रार दिलेली असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे चार मे रोजी मोबाईलवर एका अनोळखी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची विजयी घोडदौड; भाजपचे पसमांदा कार्ड फेल
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची विजयी घोडदौड; भाजपचे पसमांदा कार्ड फेल
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची विजयी घोडदौड; भाजपचे पसमांदा कार्ड फेल नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाची  पुन्हा एकदा  जादू चालली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजप कडवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 8 months
Text
बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत अचानक एका बाजूला झुकली आहे. अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या या इमारतीला खालच्या बाजूने सपोर्ट देण्यात आला असून ही इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही इमारत कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे या इमारतीच्या आजूबाजूचा रस्ता आणि परिसर रिकामा करण्यात आला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 9 days
Text
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
कर्करोग मूनशॉट उपक्रमाला भारताची मदत, भारत-अमेरिकेदरम्यान सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध उपक्रमांचं आयोजन
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज नांदेड आणि लातूर इथं सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन
बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच पटकावलं सुवर्णपदक
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत
 एक - शून्यनं आघाडी
सविस्तर बातम्या
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते काल बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत भारत-अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला. नवीन सेमिकंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार, लष्करी आयुधं आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून,या प्रकल्पामुळे भारत चीप निर्मिती करणारा देश ठरेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रकल्पांमध्ये नोकरीसाठी भूमीपूत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे, हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबई इथं आयोजित कोळी भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी बोलत होते. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झालं असून, सरकारने प्रकल्पांना चालना दिली, तसंच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, असं शिंदे म्हणाले. "वाढवण" बंदराच्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देशातलं सर्वात मोठं पॅकेज देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
***
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना काल नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्या, अशी मागणी केली आहे.
****
राज्यात सध्या विरोधी पक्षांकडून रिन्यू पॉवर लिमिटेड हा उद्योग प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा दावा करणारं वक्तव्य राज्याची प्रतिमा मालिन करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. रीन्यू कंपनीने देखील विरोधी पक्षांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.  या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये काल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.  नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली.
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए सरकारनं तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात सरकारनं, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रीत करून, पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. शहरात झाडांचं प्रमाण वाढविण्यासाठी, नगर व्हॅनलाही सरकारनं मंजुरी दिली आहे.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात काल सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर आणि नांदेड जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काल धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण प्रकरणी कुणबी नोंदी बाबत तसंच हैदराबाद गॅझेटीयरसह उपलब्ध झालेल्या इतर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत जेष्ठ कायदे सल्लागार आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी आग्रही विनंती तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. या कागदपत्रांच्या अनुषंगानं पुढच्या  आठवड्यात धाराशिवच्या जिल्हाधिका-यांसोबतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने खुल्या आणि महिला गटात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या डी. गुकेश आणि अर्जुन एरीगैसी या दोघांनी स्लोव्हेनियाविरुद्धच्या आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात अझरबैजानविरुद्धच्या सामन्यांत दिव्या देशमुख हिनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर. अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनाविर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिल्याचं ते यावेळी म्हणाले. उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या विविध रस्ते कामांचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते काल झालं.
****
नांदेड इथं श्रीकर प्रतिष्ठानच्या वतीने दि. मा. देशमुख लिखित गंध मातीचा, शब्द हुंकार, आणि शब्दवेध या तीन कविता संग्रहांचं प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात प्रमुख समिक्षक तसंच वक्ते म्हणून  संत साहित्याचे अभ्यासक, लेखक डॉ. मार्तंड कुलकर्णी हे होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नगरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
पुढचे पाच दिवस हाज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
news-34 · 23 days
Text
0 notes