#marathiserial
Explore tagged Tumblr posts
nazartaaza · 3 months ago
Text
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
वानप्रस्थ: अर्धविराम
प्रिय वाचकहो, नमस्कार!
लाडकी लेक जयश्री( i.e.जयू) हिचं बाळंतपण आटपून शुभदा आणि अनंत घरी परत येईपर्यंत आतां त्यांच्या गोतावळ्याशी आपली भेट होणं नाहीं! त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर मी आज 'वानप्रस्थ ' ला अर्धविराम देत आहे!
अधुनमधून कांंही अपरिहार्य कारणास्तव पडलेले ६ खंड वगळतां जवळजवळ वर्षाहून अधिक काळ मी दर गुरुवारी WhatsApp वर सादर केलेल्या या लेखमालेला आपुलकीचं पाठबळ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
0 notes
artistwhoworkshonestly · 1 year ago
Text
“काहीही हा श्री” 💀🤣🤣🤣🤣
@oldersiblingcurse❤️🤣
#Marathiserial #TVshows #love
7 notes · View notes
famegaze · 2 years ago
Text
1 note · View note
marathifilm · 4 years ago
Link
"Swabhimaan स्वाभिमान" Star Pravha serial is a remake of a Bengali TV series Mohor, serial stars Pooja Birari and Akshar Kothari in a lead role
0 notes
miniaturedanceartexpert · 5 years ago
Video
ALMOST SUFAL SAMPURNA' SERIAL TITLE SONG out now!!♥️ Watch the full dance video of this amazing song on my YouTube Channel, link in bio.✌️ • • • All credits to the singers for such an amazing marathi title song!😍 • • • Song - Almost Sufal Sampurna Serial Title Song @almostsufalsampurn_official • Music - Sameer Saptiskar • Playerback Singers - Kaushik Despande, Shruti Bujarbaruva • Choreographed & Performed by @proceedinstyle Edited by @proceedinstyle • • Hope you like it guys! • • My favourites in this title song❤️ @nikhil_damle @gaurikulkarniofficial @zeeyuva • • #almostsufalsampurna #marathiserial #zeeyuva #dancecover #choreographer #ishwarikale #dancerlife #dance #choreography #choreo #shoes #friday #fridaymood #fridayvibes #dancer #dancelove #artistxish #youtuber #youtube #video #dancing #english #loveit #favourite #punedancers #newvideo #punekar #proceedinstyle https://www.instagram.com/p/CFj-zmsjKXH/?igshid=j8c4p6ax6rd8
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
डॉ. डॉन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला..  ​लॉकडाऊनच्या काळात सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. मनोरंजन विश्वाचे चित्रीकरण सुद्धा संपूर्णपणे बंद होते. कामापासून दूर राहिल्यामुळे कलाकारांना सुद्धा आता कंटाळा येऊ लागला आहे.
0 notes
siddhi143 · 6 years ago
Photo
Tumblr media
#siddhipatne #shreegurudevadutta #starpravah #ishwarivision #deepakdewoolkar #nishigandhawad #marathiserial https://www.instagram.com/p/BzKVePgggep/?igshid=bdbyygqa54wh
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्‍याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार क��डे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
curlynerdylady-blog · 8 years ago
Text
THE STUFF THAT ANNOYS ME WHILE INTERVIEWING A CELEB!
It’s my first blog and the topic is quite trouble-maker, but here  I am just sharing my learning experience and not my advice.
I am film journalist, show producer and film critic for Marathi film industry since last 4 years. 
Feel free to express! 
I was watching few interviews related Mani Ratnam’s new film Kaatru Veliyidai which is set to release on April 7.  The lead cast of the film – Aditi Rao Hydari and Karthi – were interviewed by Hindu. For the self study, I was checking the type of questions asked by the reporter. Questions were absolutely simple. The thing which really impressed me was the way they have answered the simple questions with interesting details.
As a film journalist, I always put my creativity in making good questions for celebs. Many of Marathi celebs (specifically Marathi film directors) have complimented on the quality of my questions. But what did not work for me most of the time was the way my questions were entertained by celebs. It’s not a complaint, but the requirement of a film journalist. Most of the times, celebs lack good stories and insight for the film, and this results into boring interviews. 
In the interview mentioned above, Karthi and Aditi were asked a simple question – Which is the first Mani Ratnam’s film they saw on TV or in a Theatre? Both of them actually improvised the answer of  this question which could have been answered in a word. They discussed about that first film they saw, the characters in the film, the layers of the film as well as the characters. Also, how they found themselves into the canvas of the film. Eventually, the whole interview offers informative and entertaining content .
Here, the point is - Breaking the monotony in film promotion is not just the journalist’s job but also of the actor!  The few things that disturbed  me in last four years of my film journalism -
1 - ‘Tech Tech Tar bolayachay’ -
Most of the celebs set their mind with an idea that they just need to repeat the content in all  interviews. Even though the journalists ask different questions they will end up saying same stuff in every interview. So now it is two-way institutionalized process - ‘you know what I know and I know what you know’, that’s fine, but don’t make it obvious for the audience. Here we dumbed down the credibility as a whole.
2 – ‘Tu film baddal interview segment nahi karat?’ –
After doing 3-4 similar types of interview segments with celebs for same film, I would like to do some entertaining yet different. But celebs will always demand for that one monotonous 30 minutes interview where they talk all the same stuff that they have said before. Maintaining the diversity in the pattern of interviews is the need  of  the web, but artists do it as if it’s in their ‘To-do’ list!
3- ‘Ee he nako yaar mala nahi jamat he games type interview, aapan proper interview karu!’ -
As the web world is developing, we need to understand the demands of web space & audience are different than the television. Web is the medium which offers the feeling of ‘watching the video in personal sphere’, hence the content should be raw and less dramatic and non repetitive. I have seen celebs were annoyed because I did not conduct ‘the 30 minutes  interview segment’. 
4- ‘Me sagal bollo ki ekaa fatakyaat, aata kaay?’ –
Of course, I have seen the good quality in most of the highly popular stars – they don’t do long talk on one single question, they are too spontaneous on any question asked by journalists, sometimes they outsmart the reporter - which is healthy sign of communication. But, on the other side, I have met few celebs who fumble or feel offended by out of the box question. And sometimes, they give out all the information of a film while answering the first question. Few of them have a pre-set mind that they have to ‘copy+paste’ the same content everywhere.
Tumblr media
So... these are my few concerns or hurdles while interviewing the celebs. I do not blame them completely, but at the same time both the sides – celebs and journalists – should understand that the good and enriching content will hold the audience. I am not talking about the box office success of their film. I am talking about niche stuff i.e. credibility of an actor! Audience should take their star little more seriously, like - he/she is just beyond taking a selfie.
1 note · View note
marathifilm · 4 years ago
Link
"Sang Tu Ahes Ka सांग तू आहेस का" Star Pravah horror drama serial starring Siddharth Chandekar, Saaniya Chaudhari and Shivani Rangole in lead role, serial has been directed by Aniket Shivaji Kolpe and produce by Vidyadhar Pathare under production company Iris Productions.
0 notes
marathicelebscom · 4 years ago
Video
instagram
स्वामी प्रकटदिनाच्या मंगलमुहूर्तावर स्वामी देणार आदीमायेच्या रुपात दर्शन 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 💗 @colorsmarathiofficial #JaiJaiSwamiSamartha #ColorsMarathi #Devi #Ambabai #JJSS #MarathiSerial #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CNh4f94BJaf/?igshid=bosmvuw31m5w
0 notes
mysangeet2016 · 5 years ago
Photo
Tumblr media
Sasarla HI  Bahin Negali - Nesali Maherachi Sadi -  Lyrics | सासरला हि बहिण निघाली  - नेसली माहेरची साडी… |  Maherchi Sadi Marathi Movie | माहरेची साडी – मराठी चित्रपट  
0 notes
kangenwaterway2health · 5 years ago
Photo
Tumblr media
जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल... राम कृष्ण हरी... #ashadhiekadashi #vari #varkari #ekadashi #वारकरी #वारकरीसंप्रदाय #varkarisampraday #pandharpur #vitthalrakhumai #vitthal #jaijaivitthaljaiharivitthal #jaijaivitthal #विठ्ठलरखुमाई #चंद्रभागेच्यातीरी #अाषाढीएकादशी #संततुकाराम #santtukaram #marathiserial #drsatish #drsatishsuryawanshi (at Vidyanagar(Karad)) https://www.instagram.com/p/CCFeCzTJEWz/?igshid=1nlfqu0fk2p45
0 notes
siddhi143 · 6 years ago
Photo
Tumblr media
#siddhipatne #shreegurudevdatta #ishwarivision #starpravah #marathiserial #parvati #deviparvati #parvatidevi #mahakali https://www.instagram.com/p/BzKUf_BAhwo/?igshid=1szm0zfd4jh6k
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४९
सकाळीं पायीं फिरण्याचा फेरफटका आटपून अनंत घरी परतला, तेव्हां नाश्ता तयारच होता. नाश्ता संपवून त्याने बाल्कनीच्या दारासमोर खुर्ची ओढून घेतली आणि एकीकडे गरमागरम चहाचे घुटके घेत तो वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या हेडलाईन्स पाहूं लागला. तेवढ्यांत बाजूलाच ठेवलेला मोबाईल वाजला. येत असलेला काॅल कुणाचा पाहून तो घेत, कीचनमधे चहा-नाश्त्याची भांडी हातासरशी धुुवीत असलेल्या शुभदाला त्याने आवाज दिला, "शुभदा, लौकर बाहेर ये. योगेशचा फोन आला आहे, तो मी स्पीकरवर टाकतोय्!" "गुड माॅर्निंग, बाबा!" पलीकडून अभिवादन करीत योगेशने विचारलं, "आई जवळपास नाहींत कां?" "अरे ती कीचनमधे आहे! येईलच इतक्यात. तुझा फोन आल्याचं मी तिला सांगीतलं आहे" "तर मग आधी स्पीकर बंद करा, प्लीज!" योगेश घाईघाईने म्हणाला, "मला जे कांही सांगायचं आहे ते बोलून झाल्यावर स्पीकर पुन: ऑन करा!" योगेशला आपल्या एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे हे ओळखून अनंतने चट्कन स्पीकर बंद केला आणि मोबाईल कानाच्या अगदी जवळ नेऊन हलकेच म्हणाला , "केला बंद स्पीकर! आतां तूं सरळ बोलत रहा योगेश! शुभदा मधेच बाहेर आली तरी मी सांभाळून घेईन. आज जयूऐवजी तूं काॅल केलेला बघितल्यावरच वाटलं होतं की तुला तसंच महत्वाचं कांही बोलायचं असणार! काय विशेष?" त्यानंतर जवळ-जवळ ��-७ मिनिटे योगेश अनंतशी दबत्या आवाजांत बोलत राहिला! त्यांत खंड पडला तो फक्त शुभदाच्या बाहेर येण्याने. ती आली तशी अनंत निर्विकार मुद्रेनं चुकचुकत तिला म्हणाला, "कट झाला बहुतेक! पण योगेश पुन: लगेच करीलच. तोपर्यंत तूं कीचनमधे जे काय काम राहिलं आहे ते उरकून लगेच बाहेर येऊन बस;--म्हणजे पुन्हां ये-जा करायला नको!" जे महत्वाचं सांगायचं होतं ते बोलून झाल्यावर योगेश म्हणाला, "आतां हा काॅल कट करून मी पुन्हां नव्याने करतो, तेव्हां तुम्ही स्पीकर ऑन करा. म्हणजे चौघांनाही एकत्र बोलतां येईल! हो, जयश्रीही बाजूलाच आहे!"
दोनच मिनिटांत योगेशचा नव्याने फोन आला तेव्हां लगबगीने बाहेर येत शुभदा म्हणाली, "आज योगेश फोन करतोय् म्हणजे नक्कीच कांहीतरी खास असणार!" "योगेश, शुभदा आली आहे आणि फोनही स्पीकरवर आहे! तूं बोल आतां!" "आई आणि बाबा, जयश्री माझ्या बाजूलाच बसली आहे! पण ती स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे, म्हणून मीच सांगतो! तुम्ही लौकरच आजी-आजोबा होणार आहांत!!" अनंत आणि शुभदा चकीत झाल्यागत एकमेकांकडे बघतच राहिले! पण स्वत:ला चट्कन सांवरीत अनंतने दोघांचं उत्साहाने अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या तर शुभदा थरथरत्या आवाजांत उद्गारली, "अग्गोबाई! खरंच की काय!" आनंदाच्या आवेगात तिला कांंही क्षण पुढे बोलायला सुधरेचना! आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पुसत शुभदा मग म्हणाली, "जयू, तूं आणि योगेश खोटं सांगणार नाहीं याची खात्री असली तरी, अजूनही जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नाहीं ग!" "तसं होणं साहजिक असलं तरी योगेशने सांगीतलं ते १०० % खरं आहे, आई! आम्ही दोघांनीही डॉक्टरांकडून पक्की खात्री करून घेतल्यावरच तुम्हांला आज ही हवीहवीशी बातमी कळवली आहे!" एकीकडे स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवायचे आटोकाट प्रयत्न करीत, पण तरीही भरल्या गळ्याने आईला आश्वस्त करीत जयश्री म्हणाली. यावर काय बोलावं ते अनंत वा शुभदा दोघांनाही न सुचल्याने आणखी कांही क्षण अवघडल्या शांततेत गेल्यावर योगेश समजूतदारपणे म्हणाला, "आई आणि बाबा, तुमच्यासाठी हा धक्का कितीही सुखद असला तरी आकस्मिक आणि अनपेक्षित आहे! त्यामुळे तुमच्या मनांत काय काय प्रश्न उपस्थित होतील याचा विचार करून मी तुमच्या विविध संभाव्य प्रश्नांची उत्तरे देणारी एक खुलासेवार मेल तयार केली आहे! बाबा, मी तुम्हांला ती लगेच पाठवतो. तुम्ही दोघांनी ती शांतपणे वाचा, समजून घ्या आणि विचार करा! मग आपण उद्यां सकाळी याच सुमारास त्याबद्दल ��ांत चित्ताने पुन: बोलुयां!"
खरं तर मेल वगैरे न पाठवतां योगेशने फोनवरच आवश्यक ते सर्व तपशील अनंतला समजावून सांगीतले होते! पण शुभदासमोर तर ठरल्यानुसार मेलचं लटकं नाटक करणं भाग होतं! त्यासाठी अनंत बेडरूममधून आपला लॅपटॉप घेऊन आला आणि तो चार्जिगसाठी लावला. अजूनही किंकर्तव्यमूढ अवस्थेत असलेल्या शुभदाच्या जवळ बसत तिला ऐकूं जावं इतपत मोठ्या आवाजांत अनंत म्हणाला, " १५-२० मिनिटांनी मेल चेक करून बघुयां योगेशने एवढा कसला खुलासा केला आहे!" त्याच्या आवाजाने शुभदा खाडकन् भानावर आली! दोन्हीं भुंवयावरचा कपाळाचा भाग गच्च दाबून धरीत, खेदाने मान हलवीत ती म्हणाली, " मला तर कांहीच सुधरत नाहींये! लग्नानंतर म्हणे दोघांनी विचारपूर्वक ठरवलं होतं की आपल्याला मूलच नको! पहिली ५-७ वर्षें मी दातांच्या कण्या केल्या की बाबांनो वेळच्या वेळी मूल व्हायला हवं! पण जयू म्हणजे मुलुखाची हट्टी, 'एकदां ठरवलं ते पक्कं' बाण्याची!! भरीस भर म्हणजे तिला योगेशची साथ! मग काय, एवढी वर्षं वायां घालवली आणि आतां चाळिशीच्या उंबरठ्यावर दोघे आई-बाबा व्हायला निघालेत! -- आणि वरातीमागून घोडी नाचायला हवीत तसे आपण आजी आणि आजोबा!" शुभदाच्या अस्वस्थ मनाची घालमेल आणि चिडचिड लक्षांत येऊन तिला समजवायचा प्रयत्न करीत अनंत म्हणाला, "शुभदा, आपण त्रागा करण्यांत काय अर्थ आहे? योगेश आणि जयू दोघेही चांगले शिकलेले आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रांत झोकून देऊन काम करताहेत! म्हणजे दोघेही साधक-बाधक विचार करण्याएवढे सुजाण आणि सक्षम आहेत ना? मग त्यांनी एकमताने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आपण विरोध कां करायचा? लग्नानंतर त्यांनी मुलांबद्दल घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील मग भले ती आपल्याला पटोत वा न पटोत! -- आणि आतां जर तो निर्णय त्यांनी बदलला असेल तर त्याची कारणं आपण समजून तरी घ्यायला हवीत ना?"
२७ जुलै २०२३
0 notes