Don't wanna be here? Send us removal request.
Text
पनीर लबाबदार
तेल जिरा , तेज पत्ता , १ लवंग ,१ हिरवी वेलची , दालचिनी , आलं , 2 लसूण , शिमला मिरची,
3 टोमॅटो 3 कांदे लाल मिरची पावडर १/२ चमचा , गरम मसाला १/२ चमचा , मटार , पनीर,पाणी , मीठ १/२ चमचा कोथिंबीर .
पनीर लबाबदार
0 notes
Text
Post 11
टाळी दोन्ही हाताने वाजते मग नातं जपण्याची जबाबदारी ही दोघांची. मग नातं कोणतंही असो . #vidyamslife
0 notes
Text
Post 10
Facebook उत्तम माध्यम आहे आपली कला सादर करायला , व्यक्त व्हायला. वपू बोलतात तसं कोणी चोवीस तास एका भूमिकेत नसतं. उदाहरण कवी चोवीस तास कवी नसतो किंवा कोणताही कलाकार. कलाकार आवडला म्हणजे त्याच्यातल्या माणसाला आपण ओळखतो असं कुठ��� असतं. म्हणून ती व्यक्ती कशी आहे हे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ती चांगली आहे का वाईट ह्याचे अंदाज बांधणे योग्य नाही वाटतं. संवादा पेक्षा देहबोली ८०% बोलकी असते म्हणून भेटीगाठी करून माणूस ओळखणं उत्तम . आपण चांगलं वागलं म्हणजे दुसरी व्यक्ती चांगली वागेल हे गृहीत धरूच नये. चुकातून शिकत जायचं इतकंच माणसांच्या हाती असतं. इथे कोणी वाईट बोललं तर लगेच screenshot घेणार समोरची व्यक्ती. मग बदनामी व्हायला किती वेळ लागतो. Social media वर सगळे सावध पणे बोलतात.चांगल्या पण मोजक्याच व्यक्तीं सोबत मैत्री झाली तर आपलं नशीब समजायचं . जे आपले नाहीत त्यांना सरळ निरोप द्यायचा कायमचा. प्रत्येका सोबत wavelength जुळायलाच हवी असा अट्टहास नसावा. #vidyamslife
0 notes
Text
Post 9
जे स्वतः ला जमतं । जे स्वतः ला आवडतं तिचं गोष्ट इतरांना करायला सुचवलं जातं । क्रिकेटर कधी म्हणत नाही तू गाणं शिक म्हणून । #vidyamslife
People will suggest u to do things which are like by them. No cricketer will guide u or suggest u to be singer. #quotes
0 notes
Text
Possessive बायकांची लक्षण
१. मैत्रिणीच्या भेटी गाठी ला नकार
२. जोडीदाराच्या मैत्रिणीला add friend करून माहिती काढून unfriend म्हणजे त्या जगायला मोकळ्या
३. जुन्या मैत्रिणींना चक्क नवऱ्याच्या fb a/c मधून block करतात
भगवान बचाए इन दोस्तों को । ☺️
Post 8
0 notes
Text
Post 7
माणसं बदलत नसतात.वय वाढत जातं तसा निरागसता कमी कमी होत जाते!त्यातले मोजकेच निरागसता जपतात!
#vidyamslife
0 notes
Text
Post 6
महाराष्ट्र राज्यात घरात समाजात इंग्रजी बोलणे म्हणजे उच्चभृ समजलं जातं. कपड्या पासून भाषे पासून सगळं परकीय हवं.
ज्या घरात आई वडील यांना आई बाबा निदान पप्पा तरी म्हणतात ते संस्कृती जपतात म्हणायचं.
आता गुढीपाडवा जवळ येतोय आयुष्यभर western cloth घालणारे फेटे घालून साडी नेसून bike वरून बायका मिरवणूक काढतील संस्कृती कमी fashion show जास्त वाटतो.
बायकांनी फेटा घालणं आपली संस्कृती नाही मुळात.
पुण्यात तर ज्याचं जसं कर्म त्यावरून फेटे बांधायचे.
केरळ मध्ये लुंगी घालतात चित्रपट बघायला जाताना किंवा tv वरच्या मुलखात देताना त्याला म्हणतात संस्कृती जपणं.
दक्षिण भारतीय महाराष्ट्र राज्यात येऊन सुध्दा त्यांची भाषा आणि संस्कृती विसरत नाहीत.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरी वेगळे वर्ग लावतात भाषा शिकवण्यासाठी, भारतीय नृत्य ही शिकवतात .
संस्कृती जपण्याच काम गाव करतात शहरं नाही.
© #vidyamslife
0 notes
Text
Post 5
भाषा समृद्ध करायची असेल तर वाचन करावं. गुरू ठाकूर ला परीक्षेत कमी मार्क मिळालेले ५० च्या आसपास पण आज मराठी गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले.
त्याच्या घरी आजोबा धार्मिक ग्रंथ वाचायचे.
#vidyamslife
0 notes
Text
Post 4
स्वतः ची fb profile lock करणारे इतरांनी frnd request करताना profile lock करू नये अश्या अपेक्षा.
🤣 अनोळखी अश्या profile ला frnd request करत असतील तर धन्यच म्हणायचं.
0 notes
Text
Post 3
फ्लॅट मध्ये दोन प्रकारची माणसं रहातात. माणूस हवा असतो नाहीतर माणूस घाणी यांच्या कडे पैश्याची श्रीमंती असते फक्त मनाची नाही. शेजारी कोण रहात हे पण माहित नसतं. दरवाज्यावर गेलो काम असतं म्हणून शेजारी ला काका काकी म्हणतात की तर आमच्या इथल्या society च्या सेक्रेटरी ची बायको कोण साहेब हवेत का इथपासून सुरुवात ..पाणी वगैरे विचारण तर दूरच.
यांच्या मुलांकडे मित्र मंडळी नसतात पण कुत्रे असतात फिरवायला .
आपल्या इथे तसही प्राण्यांना दान देणारे जास्त असतात पण रस्त्यातला गरिबाला मदत करणारे कमीच. का तर तो माणूस म्हणून जन्माला आला.
©
#vidyamslife
0 notes
Text
Post 2
सगळेच समजसेवा करणारे चांगलेच असतात माणूस म्हणून असं काही नसतं. मुखवटा घालून माणूस समोरचा कसा आहे त्यावरून या लोकांचं वागणं बदलत. काही जण समाजात मिरवण्यासाठी करतात.
कलाकार सुध्दा तसाच चांगलं लेखन करतो म्हणून माणूस म्हणून चांगला असेलच असेल असं काही नाही.
वपु च्या भाषेत कोण चोवीस तास कलाकार नसतो.सामान्य माणूस च असतात ते ही इतर वेळी.
© #vidyamslife
0 notes
Text
Hotel च बिल भरताना feminist कुठे जातात? बिल पुरुषांनी भरायचं असतं.
आज chef kunal kapoor चा divorceझाला का तर बायको सगळ्यांना त्रास द्यायची. मुलगा आहे त्याला. खर्च ही तो करतो.पण custody त्याच्या बायको कडे.
सलील कुलकर्णी यांनी ही बाप म्हणून चांगलं काम केलं की मुलं आई कडेच असावीत बापाकडे नको हा काळ जुना झाला की.
काही जोडपी एकमेकांना तलाक सुद्धा देत नाहीत. नुसतं कोर्ट मध्ये जाऊन मानसिक त्रास एकमेकांना देऊन काय सुख मिळत माहीत नाही.
आपल्या इथे माणसं emotionalजास्त practical कमी असतात. हे सगळं culture बाहेरून आलं आहे.
नाही पटलं तर शांतपणे नात्यातून बाहेर पडणारे चांगले म्हणायचे.
इकडे तर social media वर एकमेकांना दोष देऊन घरातले वाद चव्हाट्यावर आणतात.
नैसर्गिक समाज तर नाही आपला.
इकडे फावल्या वेळात दुसऱ्या च्या आयुष्यात काय चालले आहे. ही लोक वेगळी का झाली मूल चुकीचा की मुलगी यावर चर्चा सुरू.
काही जण लग्न घरातले सांगतात म्हणून करतात नंतर महिना भरात त्यांना हवं त्या मुली सोबत लग्न करतात आणि दुसऱ्या मुलीच आयुष्य संसार संपवतात स्वतः च्या स्वार्थासाठी.
काही जण तर मुलांसाठी तलाक घेत नाही काही समाज काय बोलेल म्हणून संसार सुरू ठेवतात. विवाहित असून अविवाहित असणारे. तर काही जण वेगवेगळ्या व्यक्ती सोबत affair ठेवणारे आणि बाहेर नवरा बायको म्हणून खोट वावरणारे. लग्न संस्थेत दम नाही राहिला म्हणायचं..
©
#vidyamslife
4/5 Apr 12.58 am
1 note
·
View note