Tumgik
#परीक्षा अर्ज तपशील
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र
राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरु केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयानं ठरवली रद्दबातल
आणि
छत्रपती संभाजीनगर इसिस मॉड्यूल प्रकरणी एन आय ए कडून एकाला अटक
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय पक्ष असल्याचा निर्णय दिला आहे. त्यासोबतच आमदार अपात्रता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या याचिका देखील विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज निर्णय देताना नार्वेकर यांनी, पक्षघटना, नेतृत्व रचना आणि विधीमंडळातलं बहुमत हे मुद्दे लक्षात घेतल्याचं सांगितलं. विधीमंडळातलं बहुमत, हाच महत्वाचा निकष असून, ते अजित पवार यांच्याकडे असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.
****
आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, यांनी आज मुंबईत विधानभवनात नामनिर्देशन दाखल केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी भाजप चौथा उमेदवार देणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. गरज पडल्यास या निवडणुकीसाठी येत्या २७ तारखेला मतदान होणार आहे.
****
राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. आपण कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही असं त्यांनी सांगितलं.
****
निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरु केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने आज हा निर्णय दिला. ही योजना नागरिकांच्या माहिती अधिकाराचं उल्लघंन करत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. काळ्या पैशाला आळा घालणं आणि देणगीदाराची ओळख गुप्त ठेवणं या उद्दिष्टांनी सरकारने ही योजना सुरु केली होती. बँकांनी निवडणूक रोख्यांची विक्री ताबडतोब थांबवावी आणि आतापर्यंत उभारलेल्या निधीचा तपशील स्टेट बँकेनं केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करावा, असं न्यायालयाने सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंट च्या जुडियो सोबत आज मुंबईत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ टाटा ट्रेंट च्या जूडियो साठी लागणारं मनुष्यबळ यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. आगामी पाच वर्षात किमान पाच हजार रोजगार या माध्यमातून निर्माण होतील, असं लोढा यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो येत्या शनिवारी १७ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता, इन्सेट थ्री डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अंदाज मिळवण्यासाठीच्या इन्सेट-थ्री मालिकेतल्या उपग्रहामधल्या सहा वेगवेगळ्या भूस्थिर उपग्रहांपैकी हा सहावा उपग्रह आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मंडळानं विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहावीच्या परीक्षा १३ मार्चपर्यंत आणि बारावीच्या परीक्षा दोन एप्रिल पर्यंत चालणार आहेत. एकूण ३५ लाख विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा देत आहेत.
****
भारतीय लष्कराकडून अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. उमेदवार भारतीय लष्कराच्या जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर २२ मार्च २०२४ पर्यंत नोंदणी करु शकतात.
****
राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं छत्रपती संभाजीनगर इथं इसिस मॉड्यूल प्रकरणी केलेल्या छापेमारीनंतर आज मोहम्मद झोयब शेख या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कागदपत्रं हस्तगत केली आहेत. मोहम्मद झोयब खान याने त्याच्या साथीदारांसह इसिस खलिफाशी 'बयाथ' म्हणजेच प्रतिज्ञा घेतली होती. तसंच इसिसमध्ये सामील होण्यासाठी आणि हिंसक विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी प्रत्यक्षरित्या आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून युवकांची भरती करण्यातही त्याचा सहभाग होता. याप्रकरणी एनआयएनं त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, आणखी तपास सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं पालकमंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, तसचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी नंगारा भवनातल्या सेवाध्वजास पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. पोहरादेवीचा तीर्थस्थळ म्हण��न विकास करण्यासाठी राज्य शासनानं ५९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, इथल्या विविध विकास कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
संत सेवालाल महाराज जयंतनिमित्त यवतमाळ शहरातल्या प्रत्येक बंजारा तांड्यावर उत्सव साजरा करण्यात आला.
****
काँग्रेसचं दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर उद्यापासून लोणावळा इथं होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होईल. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह प्रमुख नेते या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून, जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. आंदोलनस्थळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आहेत.
****
दरम्यान, जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार संवेदनशील असून या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असं राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सरफ यांनी न्यायालयात सांगितलं. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या उपोषणा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव शहरात आज सलग दुसऱ्या दिवशीही बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी बैलगाडी मोर्चा काढला.
****
नांदेडमध्ये आज महासंस्कृती महोत्सवाला रोमहर्षक शिवकालीन साहसी क्रीडा प्रकारांनी सुरुवात झाली. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आमदार मोहन हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत या खेळांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. यात खो-खो, कबड्डी, लेझीम, कुस्ती, मल्लखांब, आट्यापाट्या, लाटीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी या खेळांच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात उद्या 'महाराष्ट्राचा लोकोत्सव' हा कार्यक्रम होणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात पाच बाद ३२६ धावा झाल्या.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
UPPCL भर्ती 2022: upenergy.in वर कार्यकारी सहाय्यक पदांसाठी अर्ज करा.
UPPCL भर्ती 2022: upenergy.in वर कार्यकारी सहाय्यक पदांसाठी अर्ज करा.
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, UPPCL ने 19 ऑगस्ट रोजी कार्यकारी सहाय्यक पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ​​सप्टेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार upenergy.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. UPPCL कार्यकारी सहाय्यक परीक्षा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. UPPCL भरती 2022 रिक्त जागा तपशील: कार्यकारी सहाय्यक पदांच्या 416 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years
Text
Government Job: नॅशनल फर्टीलायझर्समध्ये भरती, परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर -
Government Job: नॅशनल फर्टीलायझर्समध्ये भरती, परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर –
हायलाइट्स: नॅशनल फर्टीलायझर्समध्ये विविध पदांची भरती ऑनलाइन परीक्षेसाठी तात्पुरते प्रवेशपत्र जाहीर परीक्षेचे शहर आणि तारखेचा तपशील तपासा NFL Recruitment 2021: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये मार्केटिंग आणि एचआरमधील मॅनेजमेंट ट्रेनी पदाची भरती केली जात आहे. याची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निवड प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahanmks-blog · 5 years
Text
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020
MPSC Bharti 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांच्या ८०६ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.
पोस्ट बद्दल सविस्तर माहिती
MPSC Bharti 2020 पदाचे नाव पद संख्या सहाय्यक कक्ष अधिकारी, गट-ब 67 राज्य कर निरीक्षक, गट-ब 89 पोलीस उपनिरीक्षक, गट-ब 650 एकुण8…
View On WordPress
0 notes
nmkresult · 5 years
Text
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020
MPSC Bharti 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांच्या ८०६ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.
पोस्ट बद्दल सविस्तर माहिती
MPSC Bharti 2020 पदाचे नाव पद संख्या सहाय्यक कक्ष अधिकारी, गट-ब 67 राज्य कर निरीक्षक, गट-ब 89 पोलीस उपनिरीक्षक, गट-ब 650 एकुण8…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 19 September 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
आज गणेश चतुर्थी. राज्यासह देशभरात अत्यंत उत्साहात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे.  घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी शास्त्रानुसार माध्यन्हापर्यंत, दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनीटांपर्यंत मुहूर्तासाठीची वेळ आहे. घरगुती गणेशांसह राज्यात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे.
****
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून संसदेचे कामकाज संसदेच्या नवीन इमारतीत सुरू होत आहे. घटनेची प्रत घेऊन पंतप्रधान संसदेच्या खासदारांससोबत जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जात आहेत.
****
जुन्या संसद भवनास यापुढे आपण संविधान सदन म्हणून लक्षात ठेवायला हवे. भावी पिढीला आपण ही भेट म्हणून द्यायला हवी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनास निरोप देण्याच्या प्रसंगी सर्व संसद सदस्यांना केले. त्याला उपस्थित सर्व खासदारांनी बाके वाजवून जोरदारपणे अनुमोदन दिले. अत्यंत भावूक असा हा प्रसंग होता. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लीकार्जून खार्गे यांची उपस्थिती होती. या संसद भवनातील कामकाजाच्या समारोप वंदे मातरम या राष्ट्रगिताने करण्यात आला.
****
विशेष अधिवेशना दरम्यान भारतीय संसदेच्या सदस्यांनी भावूक वातावरणात जुन्या संसद भवनाला निरोप दिला. या प्रसंगी लोकसभेचे व राज्यसभेचे सर्व खासदार उपस्थित होते. याप्रसंगी सकाळी जुन्या संसदेच्या मुख्य सभागृहात सर्व खासदारांचे छायाचित्र काढण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभागृहास निरोप देताना संसद सदस्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्हाला वैश्विक मापदंड पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करावे लागणार आहे. आत्मनिर्भर भारताबाबत आम्ही सांगितले होते, तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. मात्र, अवघ्या पाच वर्षात अवघ्या जगाने भारताची ताकद मान्य केली आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीपथावर आम्ही मार्गस्थ झालो आहोत. आता आम्हाला आमच्या विचारांची कक्षा आणखी मोठी करावी लागेल. जगात आम्ही सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहोतच त्यासोबतच सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देशही आपणच आहोत. हेच युवक अत्यंत गतीने भारताला विकसीत राष्ट्राचे उद्दिष्ट गाठून देऊ शकतात.
****
जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथं झालेल्या विविध ऐतिहासिक कायद्यांना उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले की, या संसदेने तीन तलाखविरुद्धचा कायदा पास केला आणि मुस्लिम भगिनींना मोठा दिलासा दिला. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना कलम ३७० पासून मुक्ती देण्याचे कामही याच संसदेने केले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आज शांतता नांदत असून येथील नागरिक विकासाच्या मार्गक्रमण करू लागले आहेत. असे अनेक ऐतिहासिक कायदे या संसदेत झाले आहेत. भारत आज नव्या उर्जेने कार्यमग्न झाला आहे. ही संसद त्याची साक्षीदार आहे. माझा विश्वास आहे की, जे उद्दिष्ट घेऊन भारत मार्गस्थ झाला आहे ते आपल्याला निश्चितच साध्य होणार आहे. आम्ही जेवढे गतीमान होऊन काम करून त्याचे परिणाम आपल्याला तेवढेच लवकर मिळतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
संसदेचे हे विशेष अधिवेशन पाच दिवस चालणार असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नव्या संसद भवनाच्या इमारतीत आजपासून सुरू झाले आहे. काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली होती. आजच हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. ��द्या लोकसभेत तर गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होणार आहे. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यास देशाच्या इतिहासातील ती एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील १८ संवर्गातील परीक्षेकरिता मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०१९ अंतर्गत होणारी महाभरती प्रक्रिया रद्द झाली आहे.या अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगानं ५ सप्टेंबर पासून अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे.अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी या संकेतस्थळावरील लिंकवर बँक खात्याचा अचूक तपशील नोंदवण्याचं आवाहन  जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
कॅनडातील हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य भारतानं आज फेटाळून लावले. एका निवेदनात, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आणि प्रेरित आहे. यापूर्वीही असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांवर केले होते.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
LIC HFL भरती 2022: 80 असिस्टंट/ असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ऑफर
LIC HFL भरती 2022: 80 असिस्टंट/ असिस्टंट मॅनेजर पदा���साठी ऑफर
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया ४ जुलैपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे. ही परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणार आहे. LIC HFL भरती 2022 रिक्त जागा तपशील: भरती मोहिमेद्वारे 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, त्यापैकी 50 रिक्त जागा सहाय्यक आणि 30 सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
MPPEB 2022 गट 3 भरती 2022: 2557 रिक्त जागा अधिसूचित, तपशील येथे
MPPEB 2022 गट 3 भरती 2022: 2557 रिक्त जागा अधिसूचित, तपशील येथे
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने (MPPEB) गट-03 उपअभियंता, ड्राफ्ट्समन आणि इतर पदांसाठी अधिसूचित केले आहे. अर्जाची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू होईल आणि अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक उमेदवार peb.mp.gov.in वर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. भरती परीक्षा 24 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 ते 12 आणि दुपारी 2.30 ते 5.30 या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्य सरकारनं २२ ते २४ जून या कालावधीत काढलेले शासन निर्णय आणि परिपत्रकांबद्दल माहिती द्यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि शासन निर्णय हे मंत्रालयात घाईघाईत मंजूर करण्यात आल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. अल्पमतात दिसणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारकडून बिनदिक्कतपणे जारी करण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी, दरेकर यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शासन निर्णयांचा तपशील मागवला आहे.
****
२०२२-२३ या वर्षासाठी रब्बी हंगामामध्ये केंद्र सरकारने आत्तापर्यंत १८७ लाख ८६ हजार मेट्रीक टन गव्हाची खरेदी केली आहे. ३७ हजार ८५२ कोटीपेक्षा अधिक किमान आधारभूत मूल्य असलेल्या, सुमारे १७ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. ७५५ लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक खरीप पीक आणि १०५ लाख मेट्रीक टन रब्बी पिकांसह सुमारे ८६० लाख मेट्रीक टन पेक्षा अधिक धान्याची खरेदी आत्तापर्यंत करण्यात आली आहे. याचा फायदा १२५ लाख शेतकऱ्यांना १६८ कोटी किमान आधारभूत किंमतींसह झाला आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १९ लाख २१ हजार ८११ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ३१ लाख ४३ हजार १९६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या ११ हजार ७९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नऊ हजार ४८६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९६ हजार ७०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं काल सर्व जिल्ह्यांसाठी २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जाहीर केला आहे. या निर्देशांकामुळ�� राज्याच्या शिक्षण विभागाला जिल्हास्तरीय शिक्षणातील तफावत ओळखण्यास आणि त्यांच्या कामगिरीत विकेंद्रीत पद्धतीने सुधारणा करण्यात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जुलै - ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या ३० जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह चार जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०२२ साठी पदवीधर मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, ३० जून पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सध्या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परिक्षा सुरू असल्यानं मतदार नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी, विद्यापीठ विकास मंच च्या वतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
****
राज्य शासनाच्या “सर्वंकष माहितीकोश २०२१” या पुरस्कारासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, औरंगाबाद पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांचा उद्या, सांख्यिकी दिनी गौरव करण्यात येणार आहे. गिते यांनी नियत प्रशासन शाखा, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, शहर वाहतूक शाखा, महिला तक्रार निवारण शाखा, अशा लहान मोठ्या ४० जबाबदाऱ्या पार पाडताना, अतिरिक्त जिल्हा समादेशक, होमगार्ड औरंगाबाद ही सुद्धा जबाबदारी तितक्याच ताकदीने आणि सक्षमपणे सांभाळून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, त्यांना गौरवण्यात येणार आहे.
****
कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातल्या मौजे वानेवाडी इथं शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख यांनी शेतकऱ्यांना पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी माहिती दिली. तालुका तंत्रज्ञान समन्वयक नागेश उगलमुगले यांनी यावेळी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या औजार बँक आणि गोदाम योजना तसंच आत्मा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केलं.
****
मध्य रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, यामध्ये लातूर - पंढरपूर रेल्वे गाडीचा समावेश आहे. ही गाडी पाच, सहा, आठ, ११, १२ आणि १३ जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी याच दिवशी पंढरपूर इथून दुपारी दोन वाजून ३२ मिनिटांनी सुटेल आणि लातूरला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
****
किरगिस्तानच्या विश्केक इथं सुरू असलेल्या तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ८६ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात, टोकियो ऑलिम्पिक विजेत्या दीपक पुनिया यानं मकसात सॅटीबाल्डी याला मात देत कास्य पदक पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत दहा सुवर्ण पदकांसह २५ पदकं मिळवली आहेत.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
UPSC CDS, NDA अधिसूचना 2022 उद्या निघणार आहे, तपशील येथे पहा
UPSC CDS, NDA अधिसूचना 2022 उद्या निघणार आहे, तपशील येथे पहा
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 18 मे 2022 रोजी NDA आणि CDS साठी अधिसूचना जारी करेल अशी अपेक्षा आहे. NDA आणि NA CDS परीक्षा (II), अधिसूचना UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज उद्या, 18 मे आणि शेवटची तारीख 7 जून रोजी सुरू होईल. NDA आणि NA CDS परीक्षा (II), रविवार, 4 सप्टेंबर रोजी घेतली जाईल. UPSC CDS 2 साठी महत्त्वाच्या तारखा येथे पहा UPSC CDS, NDA अधिसूचना 18 मे 2022…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
TBJEE 2022 नोंदणीची तारीख वाढवली, तपशील येथे पहा
TBJEE 2022 नोंदणीची तारीख वाढवली, तपशील येथे पहा
त्रिपुरा बोर्ड ऑफ जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (TBJEE) ने त्यांच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची अंतिम मुदत मार्च 7 पर्यंत वाढवली आहे. जे उमेदवार अद्याप उपस्थित झाले नाहीत ते TBJEE च्या अधिकृत वेबसाइट tbjee.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी TBJEE 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च होती. त्रिपुरा संयुक्त प्रवेश परीक्षा 27 एप्रिल रोजी घेतली जाईल. TBJEE 2022 अर्ज फी: सर्वसाधारण पुरुष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
JEE Advanced 2022: परीक्षा 3 जुलै रोजी होणार आहे, jeeadv.ac.in वर तपशील तपासा
JEE Advanced 2022: परीक्षा 3 जुलै रोजी होणार आहे, jeeadv.ac.in वर तपशील तपासा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT बॉम्बेने JEE Advanced 2022 तारीख जाहीर केली आहे. वेळापत्रकानुसार JEE Advanced 2022 परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार आहे. नोंदणी प्रक्रिया 8 जूनपासून सुरू होईल आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 जून आहे. JEE अॅडव्हान्स परीक्षेत दोन पेपर असतील म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 9 ते 12 IST दरम्यान होईल. पेपर 2 14:30 ते 17:30 IST दरम्यान आयोजित केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes