The term Sarvodaya literally means the uplift of all beings and Samaj means the society. It reflects the ideology of Mahatma Gandhi and his close associate Acharya Vinoba Bhave.
Don't wanna be here? Send us removal request.
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, १२.
साम्यसूत्र,
४. ऋजुबुद्धेस्तु ।
वृत्ति,
१६. ऋजुबुद्धिरर्जुनः ।
४. ऋजु बुद्धीचा अधिकारी.
१६. पुढील सर्व गीता समजून घेण्यास अर्जुनाची ही भूमिका आपल्या उपयोगी पडली म्हणून आपण तिचे आभार मानू. त्याच्याशिवाय आणखीहि तिचा उपकार आहे. अर्जुनाच्या ह्या भूमिकेत त्याच्या मनाची ऋजुता दिसून येत आहे. 'अर्जुन' ह्या शब्दाचा अर्थच ऋजु किंवा सरळ स्वभावाचा असा आहे. त्याच्या मनात जे काही विकार आणि विचार आले ते सर्व त्याने मोकळ्या मनाने कृष्णापुढे मांडले. त्याने चित्तात काही ठेवले नाही आणि शेवटी तो कृष्णाला शरण गेला. वस्तुतः तो आधीच कृष्ण-शरण होता. कृष्णाला सारथि बनवून ज्या वेळेस त्याने आपल्या घोड्याचे लगाम त्याच्या हातात दिले, त्याच वेळी त्याने आपल्या मनोवृत्तीचेहि लगाम त्याच्या हातात सोपविण्याची तयारी केली होती. आपणही असेच करू या. अर्जुनाजवळ कृष्ण होता, आपल्याला कृष्ण कोठून लाभणार, असे आपण म्हणू नये. कृष्ण म्हणून कोणी एक व्यक्ति आहे अशा ऐतिहासिक उर्फ भ्रामक समजुतीत आपण सापडू नये. अंतर्यामीरूपाने कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहे. जवळात जवळ तोच आहे. आपल्या हृदयातील खळमळ आपण त्याच्यापुढे मांडू आणि म्हणू, "देवा, मी तुला शरण आहे. तू माझा अनन्य गुरु आहेस. मला काय तो मार्ग दाखीव. तू दाखवशील त्याच मार्गाने मी जाईन." आपण असे करू तर तो पार्थसारथि आपलेहि सारथ्य करील. आपल्या श्रीमुखाने तो आपल्याला गीता ऐकवील आणि विजय-लाभ करून देईल.
रविवार, २१-२-१९३२.
1 note
·
View note
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, ११.
साम्यसूत्र,
३. प्रयोजनवत्त्वात् ।
वृत्ति,
१४. भगवान् भक्त-सापेक्षः ।
१५. मोहमोचनमेव प्रयोजनम् ।
१४. पण कोणी भाविक विचारतात, "संन्यास जर युद्ध करण्याच्या धर्माहून केव्हाहि श्रेष्ठच आहे, तर भगवंतांनी अर्जुनाला खरा संन्यासी का बनविले नाही? त्यांना काय ते अशक्य होते?" त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण त्यात अर्जुनाचा पुरुषार्थ तो काय राहिला असता? परमेश्वर मोकळीक देणारा आहे. ज्याने त्याने धडपड करावी. त्यातच गोडी आहे. लहान मुलाला स्वतः चित्र काढण्यात आनंद असतो. त्याचा हात धरलेला त्याला आवडत नाही. शिक्षक जर मुलांना भराभर गणिते सोडवून देऊ लागला तर मुलांची बुद्धि कशी वाढणार? आईबापांनी, गुरूंनी, सूचना द्याव्या. परमेश्वर आतून सूचना देत असतो. ह्याहून अधिक तो काही करीत नाही. देवाने कुंभाराप्रमाणे ठोकून, पिटून किंवा थापून प्रत्येकाचे मडके तयार करण्यात काय स्वारस्य? आपण मडकी नाही. आपण चिन्मय आहोत.
१५. ह्या सर्व विवेचनावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड येणारा जो मोह, त्याच्या निवारणार्थ आहे. अर्जुन धर्म-संमूढ झाला होता. स्वधर्माच्या बाबतीत त्याला मोह पडला होता. ही गोष्ट कृष्णाने दिलेल्या पहिल्या ठपक्यानंतर अर्जुन स्वतःच कबूल करीत आहे. तो मोह, ते ममत्व, ती आसक्ति दूर करणे हे गीतेचे मुख्य काम. सारी गीता सांगितल्यावर भगवंतांनी प्रश्न केला, "अर्जुना, गेला मोह?" अर्जुन म्हणाला, "देवा मोह मेला, स्वधर्माचे भान झाले." अशा प्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पाहिल्यास मोह-निराकरण हेच फलित निघते. गीतेचेच नव्हे, तर महाभारताचेहि हेच उद्दिष्ट आहे. व्यासांनी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविण्यासाठी मी हा इतिहास-प्रदीप पेटवीत आहे.
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, १०.
साम्यसूत्र,
३. प्रयोजनवत्त्वात् ।
वृत्ति,
१२. परधर्मः श्रेष्ठ इति न ग्राह्य: ।
१३. सुकर इति न स्वीकार्यः ।
१२. दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते. सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे. त्या प्रकाशाने माझी वाढ होते. सूर्य मला वंदनीय आहे. पण म्हणून मी पृथ्वीवरचे वास्तव्य सोडून त्याच्याजवळ जाऊ पाहीन तर जळून जाईन. उलट पृथ्वीवर राहणे विगुण असेल, पृथ्वी सूर्यापुढे अगदीच तुच्छ असेल, ती स्वयंप्रकाशी नसेल, तथापि जोपर्यंत सूर्याचे तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करून घेतला पाहिजे. माशाला जर कोणी म्हणेल, पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे, दुधात रहा, तर मासा ते कबूल करील का? मासा पाण्यातच वाचेल, दुधात मरेल.
१३. दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनहि स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायकामुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल, तर ते ढोंग होईल व जडहि जाईल. संधि सापडताच त्याच्या वासना जोर करतील. संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्यवृत्ति असेल तर संन्यासातहि कठिण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सांगणारीहि स्मृतिवचने तर आहेतच. पण मुख्य मुद्दा वृत्तीचा आहे. ज्याची जी खरी वृत्ति असेल तदनुसार त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ-कनिष्ठ, सोपे-कठिण, हा प्रश्न नाही. खरा विकास हवा. खरी परिणति हवी.
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, ९.
साम्यसूत्र,
३. प्रयोजनवत्त्वात ।
वृत्ति,
११. अर्जुनस्य संन्यासो न स्वधर्मः ।
३. गीतेचे प्रयोजन : स्वधर्मविरोधी मोहाचा निरास
११. अर्जुन अहिंसेचीच काय,पण संन्यासाचीहि भाषा बोलू लागला होता. ह्या रक्तलांछित क्षात्रधर्मापेक्षा संन्यास बरा असे अर्जुन म्हणतो. पण अर्जुनाचा तो स्वधर्म होता का? ती त्याची वृत्ति होती का? अर्जुनाला संन्याशाचा वेश सहज घेता आला असता; पण संन्याशाची वृत्ति कशी घेता आली असती? संन्यासाच्या नावाने जर तो रानात जाऊन राहता तर तेथे तो हरणे मारू लागला असता. भगवान स्पष्टच म्हणाले, "अर्जुना, अरे लढाई करणार नाही म्हणतोस, तो तुझा भ्रम आहे. तुझा आजपर्यंतचा बनलेला स्वभाव तुला लढायला लावल्याशिवाय राहणार नाही."
अर्जुनाला स्वधर्म विगुण वाटू लागतो; पण स्वधर्म कितीही विगुण असला तरी त्यात राहूनच माणसाने आपला विकास करून घेतला पाहिजे. कारण त्यात राहूनच विकास होऊ शकतो. ह्यात अभिमानाचा प्रश्न नाही. हे विकासाचे सूत्र आहे. स्वधर्म मोठा म्हणून घ्यायचा नसतो आणि लहान म्हणून टाकायचा नसतो. वस्तुतः तो मोठाहि नसतो, आणि लहानहि नसतो. तो माझ्या बेताचा असतो. 'श्रेयान् स्वधर्मो विगुणः' ह्या गीतावचनातील 'धर्म' शब्दाचा अर्थ हिंदु धर्म, मुसलमानी धर्म, ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही. प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. माझ्यासमोर असलेल्या दोनशे लोकांचे दोनशे धर्म आहेत. माझाहि धर्म दहा वर्षांपूर्वी होता तो आज नाही. आजचा दहा वर्षांनंतर टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ति पालटत जाते तसतसा पूर्वीचा धर्म गळत जातो आणि नवीन लाभत असतो. हट्टाने काहीच करावयाचे नसते.
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, ८.
साम्यसूत्र,
२. संबंधेन ।
वृत्ति,
१०. प्रज्ञावादः ।
१०. अर्जुनाची ह्या न्यायाधीशासारखी गत झाली. त्याने मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते. गेल्या महायुद्धाचे नेमके हेच परिणाम जगाने पाहिले. पण विचाराची गोष्ट इतकीच की अर्जुनाचे ते तत्त्वज्ञान नव्हते, तो त्याचा प्रज्ञावाद होता. कृष्ण हे जाणून होता. म्हणून त्या मुद्यांची मुळीच दखल न घेता त्याने मोहनाशाचा उपाय अवलंबिला. अर्जुन जर खरोखर अहिंसावादी झालेला असता तर अवांतर ज्ञान-विज्ञाने कोणी कितीही सांगितली तरी मूळ मुद्यांचे उत्तर मिळाल्याशिवाय त्याचे समाधान झाले नसते. पण सबंध गीतेत ह्या मुद्यांचे उत्तर नाही आणि अर्जुनाचे समाधान झालेले आहे. ह्या सर्वांचा भावार्थ इतकाच की अर्जुनाची अहिंसावृत्ति नव्हती, तो युद्ध-प्रवृत्तच होता. युद्ध त्याच्या दृष्टीने त्याचे स्वभाव प्राप्त आणि अपरिहार्य ठरलेले कर्तव्य होते. ते कर्तव्य आता तो मोहाने टाळू पाहत होता. आणि गीतेची ह्या मोहावरच मुख्य गदा आहे.
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, ७.
साम्यसूत्र,
२. संबंधेन ।
वृत्ति,
९. मोहांध-न्यायाधीशवत् ।
९. मला ह्या ठिकाणी एका न्यायाधीशाची गोष्ट आठवते. एक न्यायाधीश होता. शेकडो अपराध्यांना त्याने फाशीची शिक्षा दिली होती. परंतु एके दिवशी त्याचा स्वतःचा मुलगा खुनी म्हणून त्याच्यासमोर उभा करण्यात आला. त्याच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची न्यायाधीशावर पाळी आली. पण तसे करताना तो न्यायाधीश कचरला. तो आता बुद्धिवाद बोलू लागला, "फाशीची शिक्षा अमानुष आहे. ती देणे मनुष्याला शोभत नाही. मनुष्याला सुधारण्याची आशा त्यामुळे नष्ट होते. खून करणाऱ्याने भावनेच्या भरात खून केला. परंतु त्याच्या डोळ्यावरचा खून उतरल्यावर त्या माणसाला गंभीरपणे उचलून फासावर लटकवून मारावयाचे हे समाजाच्या माणुसकीला लाजिरवाणे व काळिमा फासणारे आहे," वगैरे मुद्दे तो न्यायाधीश मांडू लागला. तो मुलगा समोर न येता तर मरेपर्यंत न्यायाधीशसाहेब खुशाल फाशीची शिक्षा देत राहिले असते. मुलाबद्दलच्या ममत्वामुळे न्यायाधीश असे बोलू लागला. ते बोलणे आंतरिक नव्हते. ते आसक्तिजन्य होते. 'हा माझा मुलगा' ह्या ममत्वातून निर्माण झालेले ते वाङ्मय होते.
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, ६.
साम्यसूत्र,
२. संबंधेन ।
वृत्ति,
८. अहिंसकवत् भाषते एव ।
८. दुसरे काही म्हणतात, अर्जुनाची अहिंसा-वृत्ति दूर करून त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे. माझ्या दृष्टीने हेहि म्हणणे बरोबर नाही. ते कसे, हे पाह��्यासाठी आपणाला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे. त्या कामी पहिला अध्याय आणि त्याचे दुसऱ्या अध्यायात शिरलेले आखात फार उपयोगी आहे.
अर्जुन रणांगणावर उभा राहिला तो कृतनिश्चयाने आणि कर्तव्यभावनेने उभा राहिला होता. क्षात्र-वृत्ति त्याच्या स्वभावात होती. युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न करून ते टळले नव्हते. कमीत कमी मागणी व कृष्णासारख्याची मध्यस्थी दोन्ही वाया गेल्या होत्या. अशा स्थितीत देशोदेशींचे राजे जमवून आणि कृष्णाला सारथ्य पत्करायला लावून तो रणांगणावर उभा राहतो आणि वीर-वृत्तीच्या उत्साहाने कृष्णाला म्हणतो, "दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर, म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत त्यांची तोंडे एकदा मी पाहून घेतो." कृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि अर्जुन सभोवार नजर फिरवितो, तो त्याला काय दिसते? दोन्ही बाजूंना आपल्याच नातेवाईकांचा, सग्यासोयऱ्यांचा प्रचंड मेळावा उभा आहे. 'आजे, बाप, मुले, नातू' - आप्तसंबंधाच्या चार पिढ्या मारण-मरणाच्या अंतिम निश्चयाने एकत्र झाल्या आहेत असे त्याला दिसते. ह्या गोष्टीची कल्पना आधी त्याला नसेल असे नाही. पण प्रत्यक्ष दर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो. तो सारा स्वजनसमूह पाहून त्याच्या हृदयाची कालवाकालव सुरू होते. त्याला फार वाईट वाटते. आजपर्यंत त्याने अनेक लढायात असंख्य वीरांचा संहार केला होता. त्या वेळी त्याला वाईट वाटले नाही. त्याचे गांडीव गळून पडले नाही, त्याच्या शरीराला कापरे भरले नाही, त्याचे डोळे ओले झाले नाहीत; मग आत्ताच असे का? त्याच्या ठिकाणी का अशोकाप्रमाणे अहिंसावृत्तीचा उदय झाला होता? नाही, ही सारी स्वजनासक्ति होती. आजच्या घटकेलाहि जर समोर गुरु, बंधु, आप्त नसते तर त्याने शत्रूंची मुंडकी चेंडूप्रमाणे उडविली असती. पण आसक्तिजन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली आणि मग त्याला तत्त्वज्ञान आठवले. कर्तव्यनिष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला तरी नागडी कर्तव्यच्युति त्याला सहन होत नाही. तो तिला एखादा सद्विचार नेसवितो. अर्जुनाचे असेच झाले. तो आता युद्धच मुळात पाप आहे असे उसने प्रतिपादन करू लागला. युद्धाने कुलक्षय होईल, धर्म लोपेल, स्वैराचार माजेल, व्यभिचार-वाद पसरेल, दुर्भिक्ष ओढवेल, समाजावर संकटे येतील असे अनेक मुद्दे तो कृष्णालाच समजावून सांगू लागला.
0 notes
Text
गीता प्रवचने रोजचा विचार, ५.
साम्यसूत्र,
२. संबंधेन ।
वृत्ति,
७. वीरवृत्तिः ।
७. अर्जुनाचे क्लैब्य दूर करून त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली असे काही लोक म्हणतात. त्यांच्या मते गीता कर्मयोग सांगणारी आहे. एवढेच नव्हे तर ती युद्धयोग सांगणारी आहे. जरा विचार केला तर ह्या म्हणण्यातील चूक दिसून येईल. अठरा अक्षौहिणी सैन्य लढायला सिद्ध होते. अर्जुनाला सबंध गीता ऐकवून त्या सैन्याच्या लायकीचे केले असे का आपण म्हणणार? अर्जुन घाबरला. ते सैन्य घाबरले नव्हते. ते का अर्जुनाहून अधिक योग्यतेचे? ही तर कल्पनाच करवत नाही. अर्जुन लढाईपासून परावृत्त होत होता तो भित्रा म्हणून नव्हे. शेकडो लढाया खेळलेला तो महावीर होता. उत्तर-गोग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म-द्रोण-कर्णांना हतबल केले होते. नेहमी विजय मिळविणारा, सर्व नरांतील एकच खरा नर अशी त्याची ख्याती होती. वीरवृत्ति त्याच्या रोमरोमांत होती. अर्जुनाला डिवचण्यासाठी क्लैब्याचा आरोप तर कृष्णानेहि करून पाहिला. पण तो बाण वाया जाऊन पुढे वेगळ्याच मुद्यांवर ज्ञान-विज्ञानांची अनेक व्याख्याने द्यावी लागली आहेत. तेव्हा क्लैब्य-निरसनाइतके सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित आहे.
0 notes
Text
गीता प्रवचने, रोजचा विचार, ४.
साम्यसूत्र,
२. संबंधेन ।
वृत्ति,
६. अर्जुनस्य भूमिका ।
६. अर्जुनाच्या भूमिकेचा संबंध.
६. कित्येकांना वाटते, गीतेचा आरंभ दुसऱ्या अध्यायापासून धरावा. दुसऱ्या अध्यायाच्या ११ व्या श्लोकापासून प्रत्यक्ष उपदेशाला सुरुवात होते. तेथूनच आरंभ समजायला काय हरकत आहे? एक जण तर मला म्हणाला - "अक्षरात अकार ही ईश्वरी विभूति भगवंतांनी सांगितली आहे. 'अशोच्यानन्वशोचस्तवम्'च्या आरंभी आयताच अकारहि आहे.तेथूनच आरंभ धरावा. ही कोटी सोडून दिली तरी तो आरंभ अनेक प्रकारे योग्य आहे यात शंका नाही. तरीपण तत्पूर्वीच्या प्रास्ताविक भागाचेही महत्त्व आहेच. अर्जुन कोणत्या भूमिकेवर आहे, कोणती गोष्ट सांगण्यासाठी गीतेची निर्मिती झाली आहे, हे हा प्रास्ताविक कथाभाग नसता तर लक्षात येते ना.
0 notes
Text
गीता प्रवचने, रोजचा विचार, ३.
साम्यसूत्र,
१. अभिधेयं परम-साम्यम् ।
वृत्ति,
४. व्यासमुनेर् मननसारः ।
५. कृष्णत्रयी ।
४. एवढे महाभारत व्यासांनी लिहिले; पण व्यासांना स्वतःचे असे काही सांगावयाचे होते की नाही? त्यांचा विशिष्ट संदेश त्यांनी कोठे सांगितला आहे का? कोणत्या ठिकाणी व्यासांची समाधि लागली आहे? ठिकठिकाणी अनेक तत्त्वज्ञानांची आणि उपदेशांची जंगलेच्या जंगले महाभारतात आली आहेत. पण ह्या सर्व तत्त्वज्ञानाचे, उपदेशांचे आणि एकंदर ग्रंथाचे सारभूत रहस्य त्यांनी कोठे मांडले का? होय, समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गगीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि मननाची संपूर्ण साठवण आहे. हिच्याच आधारे 'मुनींत मुनि मी व्यास' ही विभूति सार्थ ठरावयाची आहे. प्राचीन काळापासून गीतेला 'उपनिषद्' ही पदवी मिळाली आहे. गीता उपनिषदांचेहि उपनिषद् आहे. कारण सर्व उपनिषदांचे दोहन करून हे गीतारूपी दूध भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगताला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत येऊन गेला आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे असे अनुभवी पुरुषांनी म्हटले आहे. गीता हा लहानसाच पण हिंदुधर्माचा मुख्य ग्रंथ आहे.
५. गीता श्रीकृष्णाने सांगितली हे तर सर्वांना माहीतच आहे. ही थोर शिकवण ऐकणारा भक्त अर्जुन ह्या शिकवणीशी इतका समरस झाला, की त्यालाही 'कृष्ण' संज्ञा प्राप्त झाली. देवा-भक्तांचे हे हृद्गत प्रगट करीत असता व्यासदेव इतके विरघळून गेले की त्यांनाही लोक 'कृष्ण' ह्याच नावाने ओळखू लागले. सांगणारा कृष्ण, ऐकणारा कृष्ण, रचणारा कृष्ण असे तिघात जणू अद्वैत उत्पन्न झाले. तिघांची जणू समाधि लागली. गीतेच्या अभ्यासकाला अशीच एकाग्रता पाहिजे.
0 notes
Text
गीता प्रवचने, रोजचा विचार २.
साम्यसूत्र,
१. अभिधेयं परम-साम्यम् ।
वृत्ति,
३. रामायण-भारतयोर् वैशिष्ट्यम् ।
३. महाभारत व रामायण हे आमचे राष्ट्रीय ग्रंथ आहेत. त्यातील व्यक्ति आमच्या जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. राम, सीता, धर्म, द्रौपदी, भीष्म, हनुमान इत्यादि रामायण-महाभारतातील चरित्रांनी सर्व भारतीय जीवन आज हजारो वर्षे भारून टाकले आहे. जगातील इतर महाकाव्यातील पात्रे अशी लोक-जीवनात मिसळून गेलेली दिसत नाहीत. ह्या दृष्टीने महाभारत आणि रामायण हे नि:संशय अद्भुत ग्रंथ आहेत. रामायण हे मधुर नीतिकाव्य आहे तर महाभारत हे व्यापक समाजशास्त्र आहे. व्यासांनी एक लक्ष संहिता लिहून असंख्य चित्रे, चरित्रे व चारित्र्ये मोठ्या कौशल्याने यथावत् रेखाटली आहेत. केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही; पण तसेच ह्या जगात दोषपूर्ण असेहि काही नाही, ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगत आहे. भीष्म-युधिष्ठिर अशासारख्यांचे येथे दोष दाखविले आहेत. उलट कर्ण-दुर्योधनादिकांचेहि गुण प्रगट केले आहेत. मानवी जीवन हे पांढऱ्या व काळ्या तंतूंचा पट आहे ही गोष्ट महाभारत सांगत आहे. अलिप्त राहून भगवान् व्यास जगातील विराट् संसाराचे छायाप्रकाशमय चित्र दाखवीत आहेत. व्यासांच्या ह्या अत्यंत अलिप्त व उदात्त ग्रथन-कौशल्यामुळे महाभारत ग्रंथ म्हणजे एक सोन्याची प्रचंड खाण बनला आहे. शोधन करून भरपूर सोने लुटून घ्यावे.
0 notes
Text
गीता - प्रवचने रोजचा विचार, १.
अध्याय पहिला
प्रास्ताविक आख्यायिका -
अर्जुनाचा विषाद.
साम्यसूत्र,
१. अभिधेयं परम - साम्यम् ।
वृत्ति,
१. अथ गीतानुशासनम् ।
२. दीपस्तंभवत् ।
१. मध्ये महाभारतम्
१. प्रिय बंधुनो! आजपासून मी श्रीमद्भगवतगीतेविषयी सांगणार आहे. गीतेचा व माझा संबध तर्कापलीकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाहि माझे हृदय व बुद्धि यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. जिव्हाळ्याचा जेथे संबध असतो तेथे तर्कास वाव नसतो. तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो. मी प्रायः गीतेच्याच वातावरणात असतो. गीता म्हणजे माझे प्राण-तत्त्व. मी गीतेविषयी इतरांशी कधी बोलतो तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो, आणि एकटा असतो त्या वेळेस त्या अमृतसमुद्रात खोल बुडी मारून बसतो. अशा या गीतामाउलीचे चरित्र दर रविवारी मी सांगावे असे ठरविण्यात आले आहे.
२. गीतेची योजना महाभारतात केलेली आहे. गीता महाभारताच्या मध्यभागी सर्व महाभारतावर प्रकाश पाडीत उंच दीपाप्रमाणे उभी आहे. एकीकडे सहा पर्वें, दुसरीकडे बारा पर्वें अशा मध्यभागी, तसेच एकीकडे सात अक्षौहिणी सैन्य, दुसरीकडे अकरा अक्षौहिणी,अशाहि मध्यभागी गीता उपदेशिली जात आहे.
0 notes