Tumgik
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
सुरज ठोंबरे टोळीतील मोक्का अंतर्गत फरार आरोपी समर्थ पोलिसांकडून जेरबंद. पुणे, दि. १६ मार्च : नाना पेठेतील सराईत गुंड सुरज ठोंबरे याच्या टोळीतील मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना काल दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ८.५० वा. घडली आहे. गोट्या उर्फ नरसिंग भिमा माने असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. नाना पेठेतील सराईत गुंड सुरज ठोंबरे व त्याच्या टोळीवर नुकतीच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबाबत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आलेली आहेत. या गुन्ह्याचा तपास फरासखाना पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर करीत आहेत.पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार, वरील आरोपी त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी मंगळवार पेठेतील बारणे रोडवरील कलमाडी शाळेजवळ आला असताना समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक मोहिते, पोलीस शिपाई निलेश साबळे, सुमित खुट्टे व महेश जाधव यांनी सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेप्रमाणे आरोपीस पळून जाण्याची संधी न देता, घेराव करून ताब्यात घेतले व फरासखाना पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या समोर हजर केले. गोट्या उर्फ नरसिंग भिमा माने हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगवी पोलीस स्टेशन व फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांत तो पाहिजे असलेला आरोपी आहे. गोट्या उर्फ नरसिंग भिमा माने याला अटक करण्यात आली असून, मा. न्यायालयाने त्याला २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMgbksel54m/?igshid=1r8ne32lsgz6m
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
सचिन पोटे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई पुणे, दि. १६ मार्च : संघटीतपणे गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या सचिन पोटे व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या आदेशानंतर मुंढव्यातील एका पबमध्ये गोळीबार केल्याच्या प्रकरणी सचिन पोटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सचिन निवृत्ती पोटे (वय-४०), दगडू भीमराव वैद्य (वय-३६, दोघेही रा. जोशीवाडा, नवी पेठ), अजय अनिल शिंदे (वय-३६, रा. जॉगस पार्क, कल्याणीनगर, येरवडा), विठ्ठल महादेव शेलार (वय-३८, रा. उरवडे, मुळशी), अजिंक्य राजाराम पायगुडे (वय-२८, रा. मानाजीनगर, नऱ्हे), अनुप अशोक कांबळे (वय-३६, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, येरवडा), अतिक इस्माईल शेख (वय-३३, रा. आदर्शनगर, वडगावशेरी), मुन्ना उर्फ हेमंत मारुती कानगुडे (वय-३५, रा. खिलारेवाडी, कोथरूड), अंकुश धारू निवेकर (वय-२६, पौड फाटा, कोथरूड), अमोल सतीश चव्हाण (वय-३१, रा. बुधवार पेठ) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.मुंढव्यातील टिक्की लाउंज हॉटेलमध्ये दोन वर्षांपूर्वी (दि. १५ जून २०१८) फिर्यादी त्याच्या पत्नीसह तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी पोटे व काही लोकांमध्ये तेथे वाद झाले. या वादातून पोटेने फिर्यादीवर गोळीबार केला. परंतु फिर्यादींनी गोळी चुकविल्याने त्यांना गोळी लागली नाही. त्यावेळी पोटेच्या इतर साथीदारांनी गोळीबार करून जाताना त्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर घेऊन गेले होते. पोटेच्या दहशतीमुळे फिर्यादीने त्यावेळी फिर्याद दिली नव्हती. नंतर दि. ४ मार्च २०२१ ला फिर्यादी विशाल मोदी याने गुन्हे शाखा युनिट-४ कडे तक्रार दिली. त्यानुसार मुंढवा पोलीस स्टेशन येथे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य पायगुडे, अनुप कांबळे, अतिक शेख, मुन्ना कानगुडे व अंकुश निवेकर यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल व पाच राउंड जप्त करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा-२ चे सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे करीत आहेत. आरोपी सचिन पोटे हा त्याच्या साथीदारांसमवेत गुन्हेगारी संघटन तयार करून खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शस्त्राचा धाक दाखवणे, लोकांमध्ये दहशत पसरविणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी संघटीत टोळीच्या माध्यमातून #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMgbbJKFbYe/?igshid=114qz6hi7zwuo
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
शिरूर पोलिसांची वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई; दोन ट्रकसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त शिरूर, दि. १६ मार्च : अवैध वाळू धंद्यांविरोधात शिरूर पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून, वाळूचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई केली आहे. ही कारवाई आज (१६ मार्च) रोजी पहाटे ५.१० ते ५.२० वा.च्या सुमारास करण्यात आली आहे. या कारवाईत दोन ट्रक, दोन कार व वाळू असा ४८,३५,०००/- चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी ट्रक व कार चालक व मालक अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक १) पराजी झुंबर नागवे (वय-४० वर्षे, रा. वडगाव दरेकर, ता. दौंड), हायवा ट्रकचालक २) वसंत बाळासाहेब येळे (रा. पारोडी, ता. शिरूर), क्रिएटा कारचालक, ३) नितीन अशोक कवडे (रा. आजनुज, श्रीगोंदा, अहमदनगर), आय २० कारचालक, ४) दिलीप निवृत्ती येळे (रा. पारोडी, शिरूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई योगेश गुंड यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना पहाटे ४.०० वा. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक पहाटेच्या सुमारास मांडवगण फराटा येथून नागरगावच्या दिशेने जाणार असल्याची बातमी मिळाली. तसेच ते ट्रक पकडले जाऊ नयेत म्हणून एक क्रीएटा कार व एक आय २० कार त्यांची पायलटींग करणार असल्याचेही समजले. त्यांनतर पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोसई जगदाळे, पो.ना. संजू जाधव, पोलीस शिपाई प्रवीण जाधव, योगेश गुंड यांना त्या ठिकाणी रवाना केले. त्यानंतर शिरूर पोलिसांनी वडगाव रासाई येथील चौकात नाकेबंदी चालू केली. त्यावेळी पहाटे ५.१० वा. च्या सुमारास एक क्रिएटा कार व तिच्या पाठोपाठ एक ट्रक येत असल्याचे दिसले. पोलिसांनी ती वाहने थांबवून पाहणी केली असता ट्रकच्या हौदामध्ये ३ ब्रास वाळूचा साठा सापडला. त्यानंतर ५.२० वा.च्या सुमारास आणखी एक आय २० कार व तिच्या पाठीमागे एक हायवा ट्रक येताना दिसला. त्यामध्येही पोलिसांना ४ ब्रास वाळू सापडली. आरोपींकडे कारबाबत चौकशी केली असता हे वाळूचे ट्रक पोलिसांनी पकडू नये म्हणून दोन्ही कार चालक हे लोकेशन घेत असल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींकडून दोन वाळूचे ट्रक, ७ ब्रास वाळू व दोन कार असा एकूण ४८,३५,०००/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMgbLfqljFj/?igshid=1sn98qylkhc26
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
डॉक्टरच्या घरी वॉचमनने केली १९ लाख ७२ हजारांची चोरी जुन्नर, दि. १५ मार्च : जुन्नर तालुक्यातील नारायणगांव येथील एका हॉस्पिटलच्या वर असलेल्या फ्लॅटमध्ये १९ लाख ७२ हजारांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉस्पिटलच्या वॉचमनसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलचा वॉचमन प्रकाश नेपाळी, त्याची पत्नी व दिनेशकुमार नेपाळी अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पवन सोपान गोसावी (वय-४३ वर्षे, रा. नारायणगांव, ता. जुन्नर, पुणे) यांनी नारायणगांव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नारायणगांव येथील खोडद रोडला स्वामी विवेकानंद हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फिर्यादी यांचे आईवडील राहतात. त्यांचे आईवडील बाहेरगावी गेलेले असताना त्यांनी फ्लॅटच्या चाव्या फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी हॉस्पिटलचा वॉचमन व त्याच्या पत्नीजवळ दिल्या होत्या. परंतु त्यांच्या संमतीशिवाय वॉचमन व त्यांच्या पत्नीने फ्लॅट उघडून फ्लॅटच्या बेडरूमधील तिजोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बँकेच्या ठेवी असलेल्या पावत्या असा एकूण १९,७२,०००/- रु. किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMgbAeNle4z/?igshid=107qmlso6dgaz
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; नऊ जणांवर गुन्हा दाखल. निगडी, दि. १४ मार्च : निगडी येथील मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत नऊ जणांवर निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) शत्रुघन कठारे (वय-५०, रा. चिंचवड), २) इरफान शेख (वय-४२), ३) माणिक शिखरे (वय-५०), ४) उमर शेख (वय-६५, तिघेही रा. ओटास्कीम, निगडी), ५) शफिक शेख (वय-४०, रा. चिंचवड), ६) दत्तात्रय कोटकर (वय-६६, रा. प्राधिकरण, निगडी), ७) नारायण नरोटे (वय-३६), ८) सुखदेव लोंढे (वय-५२, दोघे रा. रुपीनगर, निगडी), ९) अनिल पवार (वय-२९, रा. चिखली) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक भगवंता मुठे यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथील अंकुश चौकातील ओटास्कीम पत्राशेड झोपडपट्टीत भुजंग भडांगे यांच्या घराच्या मागे मोकळ्या जागेत वरील आरोपी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून अवैधरीत्या कल्याण नावाचा मटका खेळत होते. याची सामाजिक सुरक्षा पथकाला बातमी मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून वरील आरोपींना पकडले. त्यांच्याजवळून मटका खेळण्यासाठी लागणारे चिठ्ठी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ४५,६६८/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक बांबळे करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbcINAFQQE/?igshid=1ofnnhatzxbrr
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
मोबाईल चोरल्याच्या रागातून एकाचा खून पुणे, दि. १४ मार्च : मोबाईल चोरल्याचा राग मनात धरून एका हॉटेल मालकाने व त्यांच्या कामगाराने एकाचा लाथाबुक्क्यांनी मारून खून केला आहे. ही घटना हडपसर येथील गोपाळपट्टी भागात घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेल मालक अनिल अंकूश मोरे (वय-३५ वर्षे) व कामगार बाबुराव रघुनाथ जाधव (वय-२९ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सुरेश राठोड (वय-२८ वर्षे, रा. गोडबोले वस्ती, मांजरी बु.) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल मोरे यांचे गोपाळपट्टी भागात शिवशाही व्हेज-नॉनव्हेज नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये फिर्यादी यांचा मित्र रवी राठोड हा इडलीची डिलिवरी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे असलेला हॉटेल मालकाचा मोबाईल त्याने चोरला. ही चोरी हॉटेल मालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी व हॉटेलमधल्या कामगाराने मांजरी रेल्वेपठरीपर्यंत त्याचा पाठलाग केला. त्याला पकडून पोटात, पाठीवर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbb68aFrjM/?igshid=1u9m5m90szrbv
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण. पिंपरी चिंचवड, दि. १४ मार्च : पिंपरी चिंचवड परिसरातील देहूरोड, वाकड, सांगवीमधून तीन अल्पवयीन मुलींचे अज्ञात आरोपींकडून अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. अपहरणाची पहिली घटना देहूरोड येथे १२ मार्चला सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या मुलीला राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेले आहे. याचा पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशनचे कणसे करीत आहेत. अपहरणाची दुसरी घटना वाकड येथे १२ मार्चला दु. १.३० वा. च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला त्यांच्या घरासमोरून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कोणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक लोहार करीत आहेत. अपहरणाची तिसरी घटना सांगवीमधील पिंपळे निलख येथील क्रांतीनगर, अतुल निवास सोसायटीत शनिवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वा. घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अज्ञान आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शेंडकर करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbbriwlpCd/?igshid=17q5f0gv6r9a0
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; सात जणांवर गुन्हा दाखल पिंपरी चिंचवड, दि. १४ मार्च : आंब्याच्या झाडाखाली पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सात जणांवर पोलिसांनी छापा टाकला. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळीगावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १) अनिल मोरे (वय-४०, रा. हापसे वस्ती, कुरुळी), २) नागनाथ साळुंखे (वय-३५, रा. तुळजापूर, उस्मानाबाद), ३) राहुल येवले (वय- ३२, रा. कान्हेवाडी, खेड), ४) सोपान शिळवणे (वय-४२, रा. खराबवाडी, खेड), ५) जनार्धन भालेराव (वय-४८, रा. तळवडे, पुणे), ६) सुरेश शेट्टी (वय-���८, रा. तळवडे, पुणे), ७) चंदन साफी (वय-३२, रा. रुपीनगर, तळवडे, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस शिपाई शेखर खराडे यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुरुळी गावातील हापसे वस्तीमध्ये हापसे यांच्या मोकळ्या जागेत आंब्याच्या झाडाखाली वरील आरोपी पत्त्यांचा जुगार खेळत होते. ही खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून वरील सातही आरोपींना जुगार खेळताना पकडले आहे. त्यांच्याकडून पत्त्यांची १०४ पाने व रोख ११,२४०/- रुपये असा एकूण ११,३४०/- रु. माल जप्त केला आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक नाईकरे करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbbXjwlfUO/?igshid=1sfslj1zsag4f
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
तडीपार गुंडाकडून पोलिसास धक्काबुक्की. भोसरी, दि. १४ मार्च : दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाने कारवाई होऊ नये म्हणून पोलिसास धक्काबुक्की केल्याची घटना घडली घडली आहे. हा प्रकार शनिवार दि. १४ मार्च रोजी ४.३० वा. च्या सुमारास भोसरी येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तडीपार गुंडास अटक केली आहे. पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय-३० वर्षे, रा. खंडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी, पुणे) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचा युनिट-३ चे पोलीस शिपाई शशिकांत नांगरे यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भोंड यास पिंपरी चिंचवड परिमंडळ-१ चे मा.पोलीस उपायुक्त यांनी दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. परंतु १४ मार्चला तो भोसरी येथील बोपखेलमधील रामनगर भागात पोलिसांना आढळून आला. पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता कारवाई होऊ नये म्हणून त्याने पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. त्याने शासनाची पूर्व परवानगी न घेता शहरात प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक साबळे करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbbKktloEe/?igshid=1p0l3skw4qvdl
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
मजुरांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना थरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडले पुणे, दि. १३ मार्च : पुणे रेल्वे स्टेशन येथे बिहारला जाण्यासाठी आलेल्या मजुरांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले. ही घटना शुक्रवार दि. १२ मार्च रोजी रात्री ३.०० वा.च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. १. दिप उर्फ राजू सुखलाल सरकार (वय-२१ वर्षे) २. मनोज सुरेश परते (वय-२६ वर्षे), ३. मंगेश अशोक गव्हाणे (वय-३२ वर्षे, तिघेही रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत गौतम लक्ष्मीनाथ कुमार (वय-२० वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौतम कुमार हे रात्री १.३० वा. त्यांचे मित्र सोनुकुमार व त्रिभुवन यांच्यासोबत कराड, सातारा येथून त्यांच्या मूळ गावी बिहारला जाण्यासाठी एसटी ने स्वारगेट येथे आले. त्यानंतर ते पायी चालत स्वारगेटवरून पुणे स्टेशन येथील स्वामी समर्थ मंदिराच्या इथे आले असता आरोपी रिक्षामधून तेथे आले व त्यांनी फिर्यादी व त्यांचा मित्रांना ब्लेड, चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम रु. १०,१००/- जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र मदतीसाठी पुणे स्टेशन चौकाकडे धावत गेले. तेथे नाकाबंदी करीत असणारे पोलीस उप निरीक्षक राहुल पवार त्यांना भेटले. फिर्यादींनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. राहुल पवार हे फिर्यादी व रात्रपाळी ड्युटीवर असणारे पुणे स्टेशन मार्शल, कौन्सिल हॉल मार्शल, तपास पथकातील कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलिसांना पाहून रिक्षातील आरोपी मालधक्का चौकाकडे पळून जाऊ लागले. राहुल पवार यांनी पुणे स्टेशन मार्शलवरील पोलिसांना फोन करून मालधक्का चौकाकडून येणारी रिक्षा अडविण्यास सांगितली. त्यानुसार रिक्षा अडविण्यात आली असता रिक्षामधील आरोपी पळून जाऊ लागले. परंतु पोलिसांनी पाठलाग करून तीन आरोपींना पकडले. त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले असून यांचा शोध सुरु आहे. पकडलेल्या आरोपींकडून रोख रक्कम व रिक्षा जप्त करण्यात आली असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक राम दळवी करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbaTyFFI2N/?igshid=4ygdtm09k9mw
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
दोन खून करून ९ वर्षे फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट-३ ने ठोकल्या बेड्या पुणे, दि. १३ मार्च : विरार येथे दोन सख्ख्या भावांचा खून करून ९ वर्षे फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलिसांनी हडपसर येथील रामटेकडी येथून आज (दि. १३ मार्च) अटक केली आहे. जितेंद्रसिंग सेवासिंग उर्फ सुभासिंग जुनी (वय-५५ वर्षे, रा. रामटेकडी, कोठारी व्हील्सजवळ, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जितेंद्रसिंग हा मूळचा मुंबई येथील विरारचा रहिवासी आहे. त्याने आठ वर्षांपूर्वी विरार येथील चेगनसिंग घुंगरूसिंग टाक (वय-२४) याचा साथीदारांच्या मदतीने खून केला होता. त्या गुन्ह्यातील तो फरार आरोपी होता. याबाबत त्याच्यावर विरार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आरोपीने २५ ऑगस्ट २०२० रोजी चेगनसिंग टाक याचा विरार येथे राहणारा भाऊ फिल्लासिंग घुंगरूसिंग टाक (वय-४०) याचाही साथीदाराच्या मदतीने खून केला होता व पुन्हा फरार झाला होता. अशाप्रकारे आरोपी जितेंद्रसिंग हा आठ वर्षांच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा खून करून फरार झाला होता. विरार पोलीस गेली आठ वर्षे त्याचा शोध घेत होते. परंतु आरोपी अटक टाळण्यासाठी राजस्थान, हैद्राबाद अशा ठिकाणी फिरत होता. दि. १३ मार्चला गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर यांना विरार पोलीस स्टेशनच्या दोन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्रसिंग सेवासिंग उर्फ सुभासिंग जुनी हा हडपसर येथील रामटेकडी या भागात राहात असल्याची खबर मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने छापा टाकून त्याला पकडले. पुढील कारवाईसाठी आरोपीला विरार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-१चे सहा. पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे, गुंगा जगताप, अंमलदार दीपक क्षीरसाग��, राजेंद्र मारणे, दीपक मते, रामदास गोणते, सुजित पवार, कैलास साळुंके यांनी केली आहे. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbYiBMlFfP/?igshid=1hhok9pclrffm
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीसह २८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल पिंपरी, दि. १३ मार्च : पिंपरी येथील दि सेवा विकास बँकेने बेकायदेशीरपणे १ कोटी २५ लाखांचे कर्ज मंजूर केले. याप्रकरणी बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीसह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी, २) मनोहर मूलचंदानी, ३) अॅड. अशोक मूलचंदानी, ४) सौ. दया अशोक मूलचंदानी, ५) दीपा जितु मंगतानी, ६) राजेश पी. सावंत, ७) चंद्रशेखर अहिरराव, ८) नरेंद्र पी. ब्रम्हणकर, ९) प्रकाश नंदभारती, १०) धीरज एस. भोजवानी व इतर सर्व पदाधिकारी व अधिकारी, ११) मुख्य सी.ई.ओ. ब्रॅन्च मॅनेजर, १२) कर्ज अधिकारी विनय आरान्हा, १३) दत्तात्रय डोके, १४) अश्विन कामत, १५) मयूर श्राफ, १६) किशोर केसवानी, १७) भल्ला उर्फ महादेव साबळे, १८) गणेश वर्मा, १९) निखील शर्मा, २०) कालिदास सुतार, २१) हितेश ढगे, २२) कोमल लुल्ला, २३) डॉली सेवानी, २४) राजू तनवानी, २५) चंदनसिंग, २६) अॅडलॅब एन्टरटेन्मेंट लि.चे सर्व भागीदार व संचालक, २७) भुमिक एन्टरप्रायजेसचे सर्व भागीदार व संचालक, २८) कर्ज प्रकरणातील जामीनदार प्रशांत अरुण पाटील व जुन रेयान फर्नांडीस व इतर अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिता किशोर चव्हाण (वय-६० वर्षे, रा. एन.आय.बी.एम. रोड, महम्मदवाडी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील साधू वासवानी गार्डनजवळ दि सेवा विकास को. ऑप. बँकेचे मुख्य कार्यालय आहे. तेथे वरील आरोपींनी फिर्यादी यांच्या सिंहगड रोडवरील बिल्डींगवर कर्ज काढण्यासाठी फिर्यादी यांच्या नावाचे खोटे पॅनकार्ड व बनावट कागदपत्रे बनविली. पिंपरी-चिंचवड येथील मा. सह दुय्यम निबंधक, हवेली क्र. १८ यांच्या कार्यालयात फिर्यादी यांच्या नावाने बनावट महिला उभी करून दस्त नोंदणीकृत केला. तसेच फिर्यादी यांच्या पतीला बनावट महिलेकडून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व त्यांना ब्लॅकमेल करून मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांच्या नावाने बँकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी इतर व्यक्तींशी संगनमत करून रु. १ कोटी २५ लाख इतक्या रकमेचे कर्ज मंजूर करून घेतले. ती रक्कम सगळ्यांनी आपापसात खात्यामध्ये जमा केली. रोख रक्कम २५,००,०००/- रु. खात्यामधून काढून चेअरमन व इतर यांनी आपापसात वाटून घेतली. वरील आरोपींनी फिर्यादी यांच्या नावाने खोटी कागदपत्रे जमा करून कर्ज मंजूर करून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbYZAul7nH/?igshid=i4wk6m3pzgjn
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले दोन पोलीस अंमलदार निलंबित पालघर, दि. १२ मार्च : मनोर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना पोलीस दलातून निलंबित केले गेले आहे. पालघर येथील वसई पोलीस स्टेशन येथे दोघेही शिस्तप्रिय जबाबदार पदावर कार्यरत होते. पोलीस शिपाई विकास वसंत पष्टे व महिला पोलीस शिपाई स्नेहल सुधाकर पाटील अशी निलंबित केलेल्या आरोपी पोलिसांची नावे आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbYNvXlRon/?igshid=1oyaz9f4wsktf
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा पुणे, दि. १२ मार्च : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ येथील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक) करण्‍यात आला. हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल, आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय पुरातत्‍व विभागाचे राजेंद्र यादव, राजेश पांडे, नेहरु युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नीलम महाजन आदी उपस्थित होते. [15/03, 10:12 am] Shiny: भारतीय पुरातत्‍व विभाग, सांस्‍कृतिक मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, राष्‍ट्रीय सेवा योजना, जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ पदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. पदयात्रा आगाखान पॅलेस, शांतीनगर चौक, एअरपोर्ट रोड (अंडरग्राऊंड ब्रीज), मोरिगा शॉपी, हयात हॉटेल, नगर रोड, आगाखान पॅलेस या मार्गावरुन काढण्‍यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्‍यात आले होते. प्रारंभी नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी प्रास्‍ताविक केले.हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल यांनी देशाला राजकीय स्‍वातंत्र्य मिळाले तथापि, प्रत्‍येकाला आर्थिक स्‍वातंत्र्य मिळण्‍याची गरज प्रतिपादन केली. स्‍वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना त्‍यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्वांना शुभेच्‍छा देवून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्‍याचे आवाहन केले. पदयात्रेत राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होत #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbXeoClCHg/?igshid=79puzwonbbnt
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा पुणे, दि. १२ मार्च : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ येथील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक) करण्‍यात आला. हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल, आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय पुरातत्‍व विभागाचे राजेंद्र यादव, राजेश पांडे, नेहरु युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नीलम महाजन आदी उपस्थित होते. [15/03, 10:12 am] Shiny: भारतीय पुरातत्‍व विभाग, सांस्‍कृतिक मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, राष्‍ट्रीय सेवा योजना, जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ पदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. पदयात्रा आगाखान पॅलेस, शांतीनगर चौक, एअरपोर्ट रोड (अंडरग्राऊंड ब्रीज), मोरिगा शॉपी, हयात हॉटेल, नगर रोड, आगाखान पॅलेस या मार्गावरुन काढण्‍यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्‍यात आले होते. प्रारंभी नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी प्रास्‍ताविक केले.हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल यांनी देशाला राजकीय स्‍वातंत्र्य मिळाले तथापि, प्रत्‍येकाला आर्थिक स्‍वातंत्र्य मिळण्‍याची गरज प्रतिपादन केली. स्‍वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना त्‍यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्वांना शुभेच्‍छा देवून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्‍याचे आवाहन केले. पदयात्रेत राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbW6ujFtA6/?igshid=1hexcex14ejnj
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
विनामास्क कारवाईदरम्यान पोलिसाची फाडली वर्दी पुणे, दि. १२ मार्च : कोरोनाचे संक्रमण शहरात वेगाने होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बंधनकारक केले आहे. तरीही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरताना दिसत आहेत. पोलीस त्यांच्यावर कारवाई करीत आहेत. अश्याच एका मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करताना पोलिसांची वर्दी फाडली गेली आहे. ही घटना स्वारगेट येथील जेधे चौकात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गणेश अंकुश मोरे (वय-३८ वर्षे, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सलमान इस्माईल मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील जेधे चौकात दि. १० मार्च रोजी रात्री ११.३० वा.च्या सुमारास फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला, पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस नाईक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल घोडके असे सर्वजण गस्त घालीत होते. त्यावेळी आरोपी मोरे हा विनामास्क फिरताना पोलिसांना आढळला. पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. या गोष्टीचा आरोपी मोरे याला राग आला व त्याने मुल्ला यांचा गणवेश फाडून तिथे असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपीने स्वतःच्या गाडीतील पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर ��ुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस स्टेशनच्या महिला सहा. पोलीस निरीक्षक शबनम शेख करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbWJgCFq3x/?igshid=on7a8cyxwe3k
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
वीज कनेक्शन तोडण्याच्या रागातून महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण देहुरोड, दि. १२ मार्च : वीजबिल थकीत असल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आलेल्या व्यावसायिकांनी महावितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. ११ मार्च रोजी ११.१५ ते १२.४० वा.च्या दरम्यान देहुगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. १) दीपक पांडुरंग चव्हाण (वय-३६), २) निखील पांडुरंग चव्हाण (वय-२८), ३) विक्रम पांडुरंग चव्हाण (वय-३०, सर्व रा. महालक्ष्मीनगर, देहुगाव कमानीजवळ, देहुगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्या देहुरोड शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप विठ्ठल रोडे (वय-२६ वर्षे, रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचा देहुगाव येथे व्यवसाय आहे. त्याचे वीजबिल मागील काही महिन्यांपासून थकीत असल्याने फिर्यादी व त्यांचे सहकारी सहायक तंत्रज्ञ मारोती किशनराव गडदे यांनी त्यांचे वीज कनेक्शन तोडले होते. त्याचा राग आल्याने आरोपींनी महावितरण कंपनीच्या देहुरोड शाखेतील कार्यालयात जाऊन फिर्यादी व गडदे यांना हाताने चापटी मारून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आरोपींविरुद्ध देहुरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहुरोड पोलीस स्टेशनचे पोसई रामेकर करीत आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CMbVkAHl4-T/?igshid=1vcb6gt8ehbhx
0 notes