Tumgik
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते… वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ💪🏿
एका मराठी हिंदुत्वनिष्ठासाठी किती अभिमानाचा क्षण !
मुंबई ते अंदमान थेट विमान प्रवास !
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यकारिणीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'कार्यकर्ता आणि संपर्क' या विषयावर बोलताना, माझे मनोगत व्यक्त केले. राष्ट्राच्या उन्नतीसाठीचे दत्तोपंत ठेंगडी जी यांचे प्रेरणादायी विचार सांगताना, कार्यकर्त्यांची जडणघडण आणि त्यांच्या दांडग्या संपर्काबद्दल यावेळी माहिती दिली!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
‘समरसता सेवा पुरस्कार’ सोहळा
ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त जी यांनी दिग्दर्शित केलेला 'देवकी नंदन गोपाला…' हा चित्रपट पाहिला आणि मला त्यावेळी गाडगेबाबा यांच्या विषयी अधिक माहिती झाली, अशा भावना काल व्यक्त केल्या. वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समरसता सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात मा. राजदत्त जी आणि डॉक्टर के लक्ष्मण जी यांच्यासह मान्यवरांचे विचार ऐकण्याचे सौभाग्य लाभले.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media
स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताह प्रारंभनिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘सावरकर दौड’ कार्यक्रमात सहभागी झालो. निगडीतील भक्तीशक्ती उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानापर्यंत ही दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती समारोह समितीने काल आयोजित केलेल्या ‘समरसता सेवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर नाना नाशिककर यांचा विशेष सन्मान करण्याचे भाग्य लाभले.
गाडगेबाबा यांनी समाज जागृतीचे कार्य केले असून, एकप्रकारे त्यांचा हा विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य नानांनी केलेले आहे.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समरसता सेवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त जी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मा. राजदत्त जी यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करता आला, हा आपल्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
विज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन अधिक समृद्ध करणाऱ्या, तसेच देशाला प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे नेणाऱ्या सर्व शास्त्रज्ञ बंधू व विज्ञानप्रेमी नागरिकांना ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! देशाचे संविधान, संस्कार आणि संस्कृती या तिन्हीचे रक्षण राष्ट्रपतींनी कसे करावे, याचा परिपाठ त्यांनी घालून दिला होता.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
देशाच्या स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीला आपल्या बलिदानाने बळ देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार संत शिरोमणी श्री संत नरहरी सोनार यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
नि:स्वार्थ भावनेतून समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करत असलेल्या सर्व स्वयंसेवी संस्थाना व स्वयंसेवकांना ‘जागतिक स्वयंसेवी संस्था दिना’निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! मानवामध्ये असलेल्या नारायणाची आपण सर्व जण सेवा करत आहात, देशाच्या उज्ज्वल व निरोगी भविष्यासाठी आपण देत असलेले योगदान फार मोठे आहे.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
“ग्रामविकासाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण गाव”, हा नवा आदर्श निर्माण करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भारतरत्न नानाजी देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! संघटनेबरोबरच समाजामध्ये धोरणात्मक विकास घडविण्यामध्ये नानाजींचा फार मोठा हात आहे. विकासावर आधारित राजकारण ही त्यांची कार्यपद्धती सर्व कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहे
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी प्रेमी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा! कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! आपल्या मराठीची ही गोडी आपणा सर्वांच्या मुखात कायम रहावी, हीच सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
सूर्याचे तेज जसे झाकले जाऊ शकत नाही, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार देखील झाकले जाऊ शकत नाहीत. हिंदूतेजसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्य स्मृतीस कोटी कोटी वंदन!
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताह प्रारंभनिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘सावरकर दौड’ कार्यक्रमात सहभागी झालो. निगडीतील भक्तीशक्ती उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानापर्यंत ही दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media
वेडात मराठे वीर दौडले सात… नेसरीच्या लढाईत बहलोल खानाविरुद्ध शौर्य गाजवताना वीरगती मिळालेले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह, त्यांचे ६ सहकारी धारातीर्थी पडले. या वीरांना त्रिवार वंदन! 🙏
0 notes