pratiklambat007
pratiklambat007
Pratik
2 posts
Don't wanna be here? Send us removal request.
pratiklambat007 · 1 year ago
Text
एमजीएम विद्यापीठात सुरु असलेल्या 'गांधी जयंतीच्या' पूर्वतयारीचा आढावा...
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठात प्रार्थना सभा, गांधीजींचे प्रिय भजन व देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्टेंबर 24 , 2024
Tumblr media
देशभरात दर वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non Violence) म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं सरकार आणि विविध संस्था कार्यक्रमांचं आयोजन करतात. या दिवशी महात्मा गांधी यांच्या विचारांचं स्मरण केलं जातं. आजच्या काळात खरं तर वाढदिवस साजरा करण्याची व्याख्या बदलली आहे. तसंच वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूपही बदललं आहे. परंतू एमजीएम विद्यापीठाने कायमच गांधींचे विचार व त्यांचा वारसा अंगीकारला आहे.
Tumblr media
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता विद्यापीठातील विविध परिसरात व सेव्हन हिल्स येथे श्रमदान केले जाणार आहे. ८ वाजेपासून रुक्मिणी सभागृहात गांधी जयंतीचा मुख्य कार्यक्रम सुरु होणार आहे. यात सुरुवातीला प्रार्थना, खादीपासून निर्माण करण्यात आलेल्या वस्त्रांचे सादरीकरण होईल. त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यान व मार्गदर्शन देखिल होणार आहे. आणि शहरातील वरीष्ठ लोकांचे संदेश देखिल सांगण्यात येणार आहे.महत्वाचे म्हणजे एमजीएम विद्यापीठात यावर्षी एक नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तो उपक्रम म्हणजे दोन हजार विद्यार्थी मिळून चरखा फिरणार आहे त्याला मास चरखा स्पिनिंग अस म्हटल्या जाते. विविध आठ शाखे��ील प्रत्येकी दोनशे पन्नास विद्यार्थी एका नंतर एक चरखा फिरवनार आहे. चार तासात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, हा उपक्रम इतरत्र कुठेही राबवला गेला नाही म्हणून या उपक्रमाची दखल आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली जाईल असे सांगण्यात येतं आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या ग्राउंड परीसरात घेतला जाईल. या उपक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध डिझायनर व आयआयटी प्राध्यापक डॉ. कीर्ती त्रिवेदी येणार असल्याचं सांगण्यात आल आहे.
Tumblr media
यावेळी महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, रजिस्टार आशिष गाडेकर व विविध शाखेतील अधिष्ठाता व प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर शहरांतील व्यक्ती, व विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
प्रतीक लांबट
1 note · View note
pratiklambat007 · 2 years ago
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झा���े आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यां��ध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes · View notes