Tumgik
saamtv · 2 years
Link
0 notes
saamtv · 2 years
Text
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधी वनस्पती उपयोगी ठरतील
पावसाळ्यात या औषधी वनस्पतींनी रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
Tumblr media
मुंबई : पावसाळा हा प्रत्येकाला आवडणारा ऋतू आहे. सर्व वयोगटातील लोक याचा आनंद घेत असतात. या दिवसात अनेक तरळलेले पदार्थ, चहा पिण्याची आपल्या जीभेला चटक लागते.
बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात अनेक साथीचे आजारांना आपण बळी पडू शकतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, डायरिया आणि डेंग्यू हे या हवामानासोबतचे काही सामान्य आजारही आहेत. अशावेळी आपण या काही औषधी वनस्पतीचा वापर करायला हवा.
१. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-एजिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुळशी ही जितकी धार्मिक कार्यात उपयोगी असते तितकीच ती आयुर्वेदातही महत्त्वाची आहे. पावसाळ्यात आपल्याला सर्दी-खोकला झाला असेल तर, तुळशीचा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि संक्रमणाशी लढू शकतो.
२. गुळवेल या औषधी वनस्पतींद्वारे हंगामी फ्लू सहज बरा होऊ शकतो. याच्या सेवनाने आपली प्रतिकारशक्ती कमी वेळात वाढते. गुळवेलामुळे पावसाळ्यात (Monsoon) त्वचेला चमकदार पोत येऊन डिटॉक्सिफिकेशन करता येते. हे हायपोग्लाइसेमिक एजंट टाइप २ मधुमेहाशी लढा देण्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि सिस्टममधून विषारी पदार्थ काढून टाकतात.
३. भारतीय स्वयंपाकघरात हमखार आढळणारा मसाला हळदी (Turmeric) त्वचेची काळजी घेणार्‍या अनेक उत्पादनांमध्ये हा मुख्य घटक असतो. गरम दुधासोबत घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेक जखमा बरे करते आणि शरीराच्या तीव्र वेदनांमध्ये आराम देते. पावसाळ्यात हळद कोरड्या त्वचेला आर्द्रता देते. पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील चयापचय दर वाढवतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
0 notes
saamtv · 2 years
Link
0 notes
saamtv · 2 years
Link
0 notes
saamtv · 2 years
Photo
Tumblr media
Top 3 Foods To Avoid In Rainy Season | Saam TV
पावसाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घ्या.
मुंबई : पावसाळा म्हटलं की, अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. सर्दी, ताप व खोकल्यासारख्या अनेक आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो.
पावसाळ्यात आपल्याला अनेक थंड-गरम पदार्थांची चव चाखायला मिळते. यादरम्यान आपल्यातला खाद्यप्रेमी जागा होतो त्यामुळे आपल्याला नवनवीन पदार्थ सतत खाण्याची इच्छा होत असते. परंतु, या ऋतूमध्ये आपल्याला अनेक आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे अतिसार, अपचन किंवा पोटदुखीची समस्या सुरु होते. पावस���ळ्यात आपण रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ सेवन टाळायला हवे हे जाणून घेऊया. (Monsoon Diet)
१. अनेकदा आपण संध्याकाळी किंवा रात्री बाहेर पडून पावसाळ्याच्या आनंद घेत असतो. रस्त्यालगत असणाऱ्या स्टॉल्सवरुन आपण भजी, समोसे आणि वडापाव खायला आपल्याला आवडते. या तेलकट पदार्थांचे (Food) सेवन केल्यामुळे आपण आजारी पडू शकतो. तसेच हे पदार्थ पचण्यासाठी देखील जड असतात त्यासाठी ते घरी बनवून खायला हवे.
२. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जात असले तरी पावसाळा आला की ते टाळणेच योग्य आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी ते अजिबात खाऊ नये. या हंगामात हिरव्या भाज्यांच्या पानांमध्ये आपल्याला हानी पोहोचवणारे कीटक असू शकतात. जर हे रात्री बनवले तर ते आपल्याला त्यात किटक दिसणार नाही त्यामुळे आजारी पडू शकतो.
३. दही हे प्रोबायोटिक असल्यामुळे प्रत्येकाने त्याचा आहारात समावेश करायला हवा. परंतु, ते खाण्याची योग्य वेळ कोणते हे आपण जाणून घ्यायला हवे. दह्यात कूलिंग इफेक्ट असतो आणि त्यामुळे पावसाळ्यात रात्रीच्या आहारापासून दूर ठेवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. विशेषत: ज्या लोकांना आधीच सर्दीचा त्रास आहे त्यांनी दही अजिबात खाऊ नये. (Foods To Avoid In Rainy Season)
४. पावसाळ्यात (Monsoon) समुद्रातील खाद्यपदार्थ पूर्णपणे टाळावेत, वेळ कोणतीही असो. आपण सीफूड प्रेमी असाल, तरीही आपल्याला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक, पावसाळ्यात पाणी दूषित होते अशावेळी आपण जे मासे किंवा कोळंबी खातो त्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
0 notes
saamtv · 2 years
Text
OBC Reservation :मोठी बातमी! अर्ज भरले नसतील तिथे निवडणूका पुढे ढकला; सुप्रीम कोर्टाचे आदेश
ओबीसी आरक्षणा संदर्भात मोठी बातमी आली आहे.
Tumblr media
नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणा संदर्भात मोठी बातमी आली आहे. ज्या ठिकाणी निवडणुकासाठी अर्ज भरलेले नाहीत त्या ठिकाणी त्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. राज्यातील ९२ नगरपरिषदांसाठी नव्या सूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. आता पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे. काही दिवसापूर्वी राज्यात ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. (Supreme Court Judgement On OBC Reservation)
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने काल राज्यातील ९२ नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. अनेक दिवसांपासून या निवडणुका रखडल्या असताना सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं होतं.अखेर काल हा निर्णय आयोगाकडून देण्यात आला.पण निवडणुका जाहीर जरी झाल्या असल्या तरी राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा. गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेऊ नये असा सूर सर्वच राजकीय पक्ष आणि ओबीसी नेत्यांकडून उमटत होता. त्यामुळे ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले होते.
मुख्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंगकर यांनी निवडणुकीची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.या निवडणुकीसाठी मतदान १८ ऑगस्टला मतदान आणि १९ ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे.ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना होईल का यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. (OBC Reservation News)
त्यात राज्यात आता नुकतंच नवीन शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. त्यामुळे या सरकार समोरही हे आव्हान असणार आहे.या निवडणूका जाहीर झाल्यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नकोत, असं राजकीय पक्ष आणि ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे.
0 notes
saamtv · 2 years
Link
0 notes
saamtv · 2 years
Link
घरच्या घरी जर आपल्याला काही झटपट बनवायचे असल्यास आपण मिल्कमेडची मदत घेऊ शकतो.
0 notes
saamtv · 2 years
Link
मुंबई: बऱ्याचदा आपण घरात अधिकचे सामान भरुन ठेवतो. त्यामुळे त्यांना साठवताना आपल्याला बराच त्रास होतो. पावसाळ्यात स्नॅक्स कसे टिकवून ठेवाल ? ते खरेदी करताना काय काळजी घ्याल ? दमट हवामानात स्नॅक्स कसे टिकवून ठेवाल ?
0 notes
saamtv · 2 years
Text
WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतरही करता येणार एडिट! येतंय नवीन फिचर...
व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवल्यानंतरही तुम्ही एडिट करू शकणार आहात..
Tumblr media
WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला दररोज उत्तम फीचर्स ऑफर करते आणि आता ही कंपनी अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये एडिट बटणाची टेस्ट करत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतेही एडिट बटण नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात पण एडिट केले जाऊ शकत नाहीत, पण येत्या फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकणार आहेत. (Latest Tech News in Marathi)
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप मेसेज रिअॅक्शन फीचरनंतर आता व्हॉट्सअॅप टेक्स्ट मेसेज एडिटिंग फीचर देत आहे, जे येत्या अपडेटसह लॉन्च केले जाऊ शकते.
To Read More >> Click Here
0 notes
saamtv · 2 years
Text
हृदयविकाराच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; त्रास जाणवल्यास त्वरित करा 'हे' 3 काम
केके या नावाने प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे असे सध्या तरी सांगण्यात येत आहे. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मोठ्या चिंतेचे कारण असतात.
Tumblr media
Heart Attack: केके या नावाने प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे असे सध्या तरी सांगण्यात येत आहे. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 31 मे रोजी रात्री केके यांना लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मोठ्या चिंतेचे कारण असतात. (heart attack symptoms in Marathi)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागे तणाव, खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे हे प्रमुख कारण असू शकते. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो किंवा तो थांबतो. याला वैद्यकीय भाषेत मायोकेरियल इम्पेक्शन (myocherial impaction) म्हणतात.
To Read More >> Click Here
0 notes
saamtv · 2 years
Link
डेटिंग अँप्सवर फोटो अपलोड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
0 notes
saamtv · 2 years
Link
कमी बजेटमध्ये परफेक्ट कूलिंग देण्यासाठी कूलर हा चांगला पर्याय आहे.
0 notes
saamtv · 2 years
Link
शरीरातील आतडे नीट असतील तर आपले आरोग्यही नीट राहते हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पचनक्रिया (Digestion) व्यवस्थित होण्यासाठी आहार आणि शारीरिक हालचालींचा जितका मोठा वाटा आहे, तितकाच आपल्या रोजच्या सवयीचा विचार करणे गरजेचे असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांगतात की, रोजच्या काही सामान्य चुका आपल्या पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम करतात. या चुका सुधारल्या तर औषधांवर पैसे न खर्च करता पचनक्रिया सुधारता येते.
Read More>>Click Here
0 notes
saamtv · 2 years
Link
0 notes
saamtv · 2 years
Link
Read and watch Latest Breaking News in Marathi from Maharashtra, India and the World.
0 notes
saamtv · 2 years
Link
Marathi News / Top Stories: Read and watch Marathi News / Top Stories from Maharashtra, India and world.
0 notes