Don't wanna be here? Send us removal request.
Photo

लोहगड...! शेजारच्या बौद्धकालीन भाजे लेणी सोबतच जवळपास इ. स.पूर्व सातशे वर्षांपूर्वीपासूनचा अखंड इतिहास लाभलेला... सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी अनुभवणारा अतिमजबूत, बुलंद व कणखर बाण्याचा लोहगड......! खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मित्रमंडळींची प्लानला संमती... आयफोनवाला ऋष्या, इंजिनिअर शुभ्या व समंजस सन्या.. यांच्या साथीने.. शनिवारची उत्साही सकाळ... पुणे स्टेशन ते तळेगाव दाभाडे व पुढे मळवली पर्यंत लोकलचे हळूवार धक्के अनुभवत मळवलीत आगमन.. घाटातून होणाऱ्या गडाच्या प्रत्येक दर्शनाने अंगात नवीन उर्जेचा संचार... जास्तीची पायपीट टाळण्यासाठी झाडाझुडपांतून रस्ता... मग डोंगरातील झऱ्यांच्या पाऊलखुणांनी बनलेल्या अरूंद वाटेचा सहारा... उन्हाचा चटका... मग शीतपेयाचा सहारा घेऊन चालतोय तोवरच पावसाची हजेरी... पत्र्याचा सुखद आडोसा... पायथ्याशी वाफाळत्या चहाचा सहारा... ऊर्जेचा संचार पुन्हा एकदा (एक कप चहाने)... निरंतर... वाट चालावी चालावी... गडाच्या पायऱ्या चढणीच्या वेळेस आपल्या पुर्वजांची भेट... त्यांच्या माकडचाळ्यांना प्रतिसाद... हौशी पर्यटक व प्रेमी युगुलांची मांदियाळी... स्पॉट वरील फोटोसेशन... परत चढाई... चालता चालताच बॅगेतील व तळेगावातून स्टाॅकने पोटोबा... व अखेर गडाच्या सर्वोच्च स्थानी Top of the world चा भास... . परतीच्या मार्गावर पावसाची मजबूत साथ... पावसात कुडकुडणाऱ्या कुत्र्याला गरम रेनकोट चा ऊबदार सहारा.. अन् मांजरीसोबतचा डबल चहा... . एकूण एक... मस्तच... निसर्गाच्या हिरवळीत आनंदाला उधाण... मोकळेपणाचा खास फिल... रंग बदलणाऱ्या सरड्यासारखेच किंवा निवडणुकीपूर्वी आवाहनांचा रतीब लावून निवडून आल्यावर लगेच हात झटकणाऱ्या सरकारासारखाच रंग बदलणारे विस्तीर्ण आकाश... त्याला एखाद्या प्रेयसीसारखीच साथ देणारी हिरवी दाटी... त्या निसर्गाच्या गर्भात नांदणारे असंख्य जीव... त्यांचा आवाज... विशेषतः पक्षांचा गुंजारव... दूर तिकडे रूळावर निरंतर धावणारी रेल्वे... लगतचा पुणे मुंबई एक्स्प्रेस-वे व या सर्वांच्या संगनमताने निर्माण होणारे लयबद्ध संगीत... (पर्यटन स्थळी पर्यटकांद्वारे वाजवल्या जाणाऱ्या हॉलिवूड साँग्जपेक्षा उत्तमच) . किल्ल्याची पडझड... असुरक्षित जागा... खंत... असो! . गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा, हनुमान दरवाजा, लक्ष्मीकोठी, शिवमंदिर, अष्टकोनी तळे अन विंचूकाटा कडा.... सबंध इतिहास जगून वर्तमानात जीर्ण अवस्थेत उभ्या असलेली ही नावे वाचून वर्तमानातून इतिहासात असंख्य वेळा येरझारा मारणारे मन... आदिलशाही, निजामशाही अन अप्रतिम शिवशाही अनुभवणारा.. पुरंदरच्या तहातील त्याग असो वा सुरतेच्या लुटेतील खजिन्याचा सांभाळ अशा अनेक सोनेरी क्षणांची साक्ष लाभलेला हा दुर्ग आजही तेवढ्याच दिमाखात आहे.....! आज अनुभवला यासाठी..... क्या बात.. क्या बात... जिंदगी.....!
0 notes
Text
Type करायला खूप कष्ट घेतलेत, वाचायलाही घ्या. अगदीच साधल्यासारखं वाटेल.. Win-win situation... पाच वर्षांपूर्वी........... 16 डिसेंबर 2012, 1:54 am अर्थातच मध्यरात्रीच्या सुमारास एक घटना घडली ज्याने............. ज्याने सबंध देश हादरून गेला...... आम्ही (मी) नवोदय मध्ये नवव्या वर्गात असताना #Migration या scheme मुळे JNV Solan, हिम��चल प्रदेश येथे शैक्षणिक वर्षांसाठी होतो. डिसेंबरमध्ये हिवाळी सुट्ट्यांनिमित्त महाराष्ट्रात परतत असताना हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक, नवी दिल्ली येथून लांब पल्ल्याचे reservation होते. Goa express ने पुणे station पर्यंत येणार होतो. जाताना दिल्लीत फिरायचे म्हणून plan नुसार Jnv solan हून कुनिहार-चंदिगढ-(हरियाणा-पंजाब) अशा टप्प्यात अगदी 7-8 तास आधी आम्ही दिल्लीत पोहोचलो. Express ची वेळ दुपारी 3 ची होती. ठरल्याप्रमाणे आम्ही ताज महाल, लाल किल्ला, आग्रा किल्ला, लोटस टेम्पल, मिनी बझार व #India_gate फिरलो (पाहिलं-उरंकलं)... तारीख (exact आठवत नाही पण) जवळपास 7-8 डिसेंबर 2012 होती. सर्वच अनुभव भारी होता पण या सगळ्यांत #India_gate चांगलच स्मरणात राहीलं. तेही वाईट कारणामुळे....😢 घरी आल्यावर आठवड्या भरातच TV वर ही वास्तू पाहून 7-8 दिवसापूर्वीच्या प्रवासात बुडणार होतो पण बातमी विस्तृत पणे पाहिली अन् मन सुन्न झाले................... लोकांचे ताफेच्या ताफे India gate च्या दिशेने जात होते. हातात मेणबत्त्या, poster सोबत मनात संताप ज्याला खूप मोठया आशेची जोड होती. पाणावलेले डोळे #Jyoti_singh नावाच्या एका युवतीसाठी प्रार्थना करत होते. राजकारणी तेव्हा काय करत होतं माहीत नाही पण एखाद्या पंचतारांकित हॉटेल मध्ये किंवा बंगल्यावर बसून विरोधी पक्षनेते सरकारची कशी गळचेपी करायची व सरकारही विरोधी पक्षाच्या प्रश्नास काय उत्तरे द्यायची व स्वतःस कार्यक्षम दाखवायचे अशा कल्पनांचे मनोरे रचत असावेत..... शेताच्या बांधावर, पारावर, नळावर, चहाच्या टपरीवर, बस स्टॉपवर, मैदानावर, दुकानात, वर्गात, स्टाफ रूममध्ये या व अशा अनेक ठिकाणी एकच चर्चा होती.. #निर्भया... घटनेनंतर या ताईने तब्बल 13 दिवस प्राणपणाने म्रुत्यूला झुंज दिली. पण दुर्दैव तिचं अन् आपलही........प्राणज्योत मालवली तिची.......अन् सार्या भारतीयांना हळहळ लावून गेली... काल सर्वोच्च न्यायालयाने या घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवली. आज 5 वर्षांनी #ज्योतीला न्याय मिळाला... पगारवाढीचं विधेयक लगेच मंजूर होतं. आता बलात्कार या मानवजातीला काळिमा फासणाऱ्या संकल्पनेसाठीही अजून क्रांतिकारी विधेयक संसदेत मांडण्यात यावं या अपेक्षेने निर्भयास भावपूर्ण श्रद्धांजली.....! - सचिन शेरखाने
0 notes