Tumgik
#आफ्रिकन
dyanmevaarutm · 15 days
Text
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
जगातील सर्वात काळी नदी!
https://bharatlive.news/?p=175614&wpwautoposter=1698055477 जगातील सर्वात काळी नदी!
झुरिच : आफ्रिकन देश कांगो येथे रुकी नदी वाहते. ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 10 September 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० सप्टेंबर  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
जी ट्वेंटी परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं मंजूर;भारत-पश्चिम आशिया-यूरोप कनेक्टिव्हीटी कॉरीडॉरची घोषणा 
देश एकसंध ठेवण्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वपूर्ण योगदान-राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन
येत्या १६ सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक;विविध कार्यक्रमांचं आयोजन
मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आमरण उपोषण सुरुच ठेवणार-मनोज जरांगे पाटील
यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ यांना समारंभपूर्वक प्रदान
उस्मानाबाद इथं राष्ट्रीय लोकअदालतीत सुमारे १५ कोटीहून अधिकची प्रकरणं निकाली
      आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान लढत
****
जी ट्वेंटी परिषदेनं नवी दिल्ली जाहीरनाम्याचा मसूदा एकमतानं मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. दिल्लीत सुरू असलेल्या अठराव्या जी ट्वेंटी परिषदेत काल शिखर बैठकीच्या एक कुटुंब या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले...
‘‘फ्रेंडस्‌ एक खुशखबरी मिली है, हमारी टीम्स के हार्डवर्क से और आप सभी के सहयोग से नई दिल्ली G-20 लीडर्स समिट डिक्लेरेशन पर सहमती बनी है। मेरा प्रस्ताव है की इस लीडर्स डिक्लेरेशन को भी ॲडाप्ट किया जाए। मैं इस डिक्लेरेशन को ॲडाप्ट करने की घोषणा करता हूं।’’
शाश���वत, संतुलित, सर्वसमावेशक आणि मजबूत विकास, परिसंस्थांचं संरक्षण-संवर्धन-शाश्वतरित्या वापर आणि पुनर्संचय, स्वच्छ-शाश्वत-परवडणाऱ्या सर्वसमावेशक ऊर्जेचं संक्रमण, हरित विकास, जागतिक आरोग्याचं बळकटीकरण, भूक आणि कुपोषण निर्मूलन आदी मुद्यांवर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.  देशा-देशांमधील समस्या शांततेच्या मार्गाने सोडवल्या गेल्या पाहिजेत. तरच, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हे सूत्रही खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल, असं या जाहीरनाम्यात नमुद केलं.
जगभरात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ‘जी २०’च्या सदस्य देशांना करण्यात आलं.
आफ्रिकन युनियनला जी- ट्वेंटी मध्ये स्थायी सदस्यत्व देण्याच्या भारताच्या प्रस्तावाला जी- ट्वेंटी शिखर परिषदेत मंजुरी देण्यात आली.
भारत पश्चिम आशिया यूरोप कनेक्टिव्हीटी कॉरीडॉर उभारण्याची घोषणा या परिषदेत करण्यात आली.  या योजनेमुळे पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यात आर्थिक एकीकरणासाठी भारत हा माध्यम बनेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी ही महत्त्वपूर्ण योजना असल्याचं सांगत तिचं स्वागत केलं आहे.
जी-ट्वेंटी शिखर परिषदेच्या अनुषंगानं केंद्र सरकारतर्फे नवी दिल्लीत हस्तव्यवसाय बाजार हे भव्य प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल, पंजाबची फुलकारी, बिहारची मधुबनी चित्रकला, आंध्र प्रदेशची कलमकारी आणि मध्य प्रदेशची चंदेरी अशा विविध कलाकुसर असलेल्या वस्त्रांसह अनेक वस्तु या ठिकाणी मांडण्यात आल्या  आहेत. या प्रदर्शनातून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना एकाच छताखाली भारतीय परंपरांची अनोखी झलक पहायला मिळत आहे.
****
राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वकीली सुरू करायला काल १०० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त मुंबई विद्यापीठात काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'चिंतनातील क्रांतिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर' तसंच 'करवीर संस्थान, बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत' या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाबासाहेबांनी 'हिंदू कोड बिल' तयार करुन समाजातली असमानता दूर केली, बाबासाहेब हे न्यायाविद, समाज सुधारक आणि उपेक्षित समाजाचे मुक्तिदाते होते असं ते म्हणाले.
****
राज्यात देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्यात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीण तसंच तळीये इथं यापूर्वी घडलेल्या घटनांप्रमाणे यंदाच्या पावसाळयात खालापूरच्या ईरशाळवाडीत भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला. सह्याद्रीच्या भूगर्भात होत असलेल्या बदलांचा साकल्याने अभ्यास करण्याच्या गरजेकडे भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं होतं. महाराष्ट्रातील भूस्खलन प्रवण प्रदेश आणि त्याला सामोरे जाण्यासाठी धोरणं-उपाय योजना विकसित करण्याचं काम या संस्थेद्वारे करणं प्रस्तावित असेल.
****
सक्तवसुली संचालनालय-इडीने कोरोना साथरोगाच्या काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी मुंबई महापालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि अन्य अज्ञात सरकारी कर्मचारी यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोविड काळात मृतदेहांसाठीच्या थैल्या महानगरपालिकेला इतर रुग्णालयांच्या तुलनेत तिप्पट भावाने विकल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
****
येत्या १६ सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसंच विविध योजना मार्गी लागण्यासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची ठरेल, असा विश्वास पालकमंत्री भुमरे यांनी या प्रसंगी व्यक्त केला. दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १५, १६ आणि १७ सप्टेंबरला औरंगाबाद इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेलं आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथल्या उपोषणस्थळी त्यांनी ही माहिती दिली. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वात मनोज जरांगे पाटील यांच्या एका शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत परवा रात्री बैठक झाली. त्यानंतर एक नवीन शासकीय निर्णयही शासनानं जारी केला. परंतु त्यातही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात स्पष्टता नसल्याचं सांगत जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं.
आम्हाला सरकारवर अविश्वास दाखवायचा नसून चर्चेतून मार्ग काढायचा, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे, असं सांगत, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ असं मान्य केल्यास आपण उपोषण सोडू असं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान,माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी याबाबत बोलतांना, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनानं एक समिती स्थापन केली असून ही समिती औरंगाबाद इथं याबाबत अभ्यास करणार असल्याची माहिती दिली. जरांगे पाटील यांचा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी या समितीला काम करण्याची संधी द्यावी, जरांगे यांची आजची भूमिका आपण सरकारपर्यंत पोहचवू, असंही खोतकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल बीड इथं प्राध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण, परभणी जिल्ह्यात मुंडण आंदोलन तसंच रास्ता रोको, हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव इथं रास्ता रोको, लातूर इथं शैक्षणिक बंद पाळण्यात आला. नांदेड, औरंगाबाद तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली.
****
यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार काल औरंगाबाद इथं ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ यांना तितर बितर या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते सराफ यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राजकीय पक्षांची बांधणी, कार्यकर्त्यांचा प्रवास, पत्रकारिता या सर्व स्थित्यंतरांना केंद्र बिंदू ठेवून तितर -बितर कांदबरीचं लिखाण केल्याची भावना श्रीकांत सराफ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. सामाजिक, साहित्यिक, तसंच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले चार परभणीकर नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये अनंत उमरीकर, हनुमान ��ास वर्मा, डॉ मंगला वैष्णव आणि शरद देऊळगावकर यांचा समावेश आहे. ग‌. दि. माडगूळकर लिखित गीत गोपाळ वर आधारित संगीत नृत्य नाटिकेचं यावेळी सादरीकरण झालं.
****
लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रस्ता बांधकामांचं भूमिपूजन काल, खासदार सुधाकर शृंगारे तसंच राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जळकोट तालुक्यात चौदा किलो मीटर लांबीच्या रस्त्याचं भूमिपूजन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते झालं. रस्ते अधिक काळ टिकण्यासाठी सी.टी.डी. या नवतंत्रज्ञानाचा वापर या कामी केला जाणार आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना, जळकोट  तालुक्यात सिंचनासाठी बांध, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, नवीन प्रशासकीय इमारत ही सर्व कामं  पूर्ण झाली असून थोड्याच दिवसात याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
****
“मिशन इंद्रधनुष्य पाच अंतर्गत बालकांसह गर्भवतींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यानुसार, लातूर महापालिकेतर्फे सोळा सप्टेंबरपर्यंत मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील अर्धवट लसीकरण झालेली तसंच लसीकरण न झालेल्या बालकांचं सर्वेक्षण करून लसीकरण पूर्ण करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आपल्या भागातील केंद्रातून लसीकरण  करून बालकास विवीध आजारांपासून संरक्षित करून घेण्याचं आवाहन लातूर महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये प्रलंबित एक हजार तीनशे एक्कावन्न तर दावापूर्व दोन हजार तीनशे पन्नास प्रकरणं तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. सुमारे १५ कोटी ५९ लाख रुपयांहून अधिकची प्रकरणं निकाली निघाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर आणि हदगाव इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांच्या नूतन इमारतीचं आज उद्घाटन होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते  हे उद्‌घाटन होणार आहे. न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. हिमायतनगर इथं सकाळी साडे दहा वाजता तर  हदगाव इथं दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
तलाठी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी औरंगाबाद इथं दोन पर्यवेक्षकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे चौघे परीक्षा सुरू असताना, कागदावर उत्तरं लिहून उमेदवारांना पुरवत असल्याचं निदर्शनास आल्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथं आज पहिलं नांदेड जिल्हा मराठी साहित्य संमेलन होणार आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार दासू वैद्य हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. एकदिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद तसंच कथाकथन आणि कविसंमेलन होणार आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघादरम्यान कोलंबो इथं सामना होणार आहे. सुपर-चार मधील हा सामना आज पाऊस आल्यास उद्या खेळला जाईल.या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे, उद्याही पाऊस आल्यास दोन्ही संघांना एक एक गुण देण्याचा निर्णय आशियायी क्रिकेट परिषदेने घेतला आहे. या आधी २ सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना पावसामुळे  रद्द करण्यात आला होता.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बीड इथं पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं बालविवाह प्रतिबंध तसंच मराठवाडा मुक्तीसंग्राम ह्या दोन विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत, कल्पकतेनं सुंदर चित्रं काढली.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ इथं काल एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आलं. मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी संमेलनाध्यक्ष धनंजय गुडसूरकर यांनी केली. मुक्तीसंग्रामाचा लढा केवळ या प्रांताचा नव्हता तर या लढ्याने एकात्म भारताची निर्मिती केली, असंही संमेलनाध्यक्षांनी नमूद केलं.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
Dengue vaccine | मोठी बातमी! आता डेंग्यूचा होणार अंत; वर्षभरात येणारं लस, सायरस पूनावाला यांची घोषणा
Tumblr media
Dengue vaccine | भारतातील लस किंग सायरस पूनावाला यांनी एक मोठे विधान केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की ते एका वर्षात डेंग्यूवर बरा करणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी सांगितले की, वर्षभरात आम्ही डेंग्यू उपचार आणि डेंग्यूची लस (Dengue vaccine ) विकसित करू. आफ्रिकन देश आणि भारतात या नवीन लसीची खूप गरज आहे, जिथे लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे. Malaria vaccine Covishield च्या यशानंतर, SII जगात प्रथमच मलेरियाची लस लॉन्च करणार आहे. या लसीची आफ्रिकन देशांमध्ये आणि भारताच्या अंतर्गत भागातही नितांत गरज आहे, जिथे लाखो लोकांना या सामग्रीमुळे संसर्ग होत आहे. मोठ्या संख्येने स्त्रियांना संक्रमित करणाऱ्या रोगासाठी एक लस आहे, ही एक लस आहे जी गर्भाशयाला संक्रमित करते. Work started at SII Serum Institute of India एसआयआय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये काम सुरू सायरस पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत डेंग्यूसंदर्भात मोठी घोषणा केली. पूनावाला यांनी डेंग्यूच्या लसीची नितांत गरज सांगितली. सिरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या लसीवर दीर्घकाळापासून काम करत आहे. आफ्रिकन देशांव्यतिरिक्त, संपूर्ण आशिया आणि भारतात डेंग्यूमुळे बरेच लोक मरतात. अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूटच्या अहवालाने निष्कर्ष काढला की डेंग्यू लसीचा एकच डोस प्रौढांमध्ये सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सहन केला जातो. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सतत चाचणी आणि काम केले जात आहे. There will be a vaccine for all four types या चारही प्रकारांसाठी लस असेल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणण्याची घोषणा केली आहे. यामध्ये डेंग्यूच्या चारही प्रकारांवर उपचार केले जातील. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या प्रक्रियेकडे पावले टाकू शकते. देशात औषधाच्या प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे. सीरमने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूएस स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत सहकार्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी 10 ते 40 कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
पहिलं वहिलं मराठी आफ्रिकन गाणं!'सनी'मधील 'तिरकीट जेम्बे हो' गाणं प्रदर्शित
पहिलं वहिलं मराठी आफ्रिकन गाणं!’सनी’मधील ‘तिरकीट जेम्बे हो’ गाणं प्रदर्शित
प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘सनी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच या चित्रपटातील ‘तिरकीट जेम्बे हो !’ हे धमाल गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. घराचा कायापालट होत असतानाच मैत्रीही बहरवणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं असून सौमिल – सिद्धार्थ यांचं संगीत लाभलं आहे. सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं हे गाणं सनी, संतोष आणि डिकॅम्बे म्हणजेच ललित प्रभाकर, अभिषेक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
'चष्मा'वर फ्रिकन आवडनी केला आबाला डान्स; व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, पहा व्हायरल व्हिडिओ | 'काला चष्मा'वर आफ्रिकन मुलांनी धमाकेदार नृत्य सादर केले; या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली, पाहा व्हायरल व्हिडिओ
‘चष्मा’वर फ्रिकन आवडनी केला आबाला डान्स; व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, पहा व्हायरल व्हिडिओ | ‘काला चष्मा’वर आफ्रिकन मुलांनी धमाकेदार नृत्य सादर केले; या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली, पाहा व्हायरल व्हिडिओ
काला चष्माची क्रेझ दिवसेंदिवस चालू आहे. सोशल मीडिया अशाप्रकारे आणि व्हिडीओंनी भरला आहे, ज्यामध्ये लोक या गाण्यावर धमाकेदार नाचताना आहेत. लहानापासून ते वृद्ध ते वेडेपणाने फिरत आहेत. या गाण्यावर नाच संपूर्ण आंटींचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. नुकता तो खूप व्हायरल होता. या गाण्याची क्रेज फक्त भारतापुरती नसून आफ्रिकेतही स्वीकारली आहे. , काही आफ्रिकन पक्षाचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
20000 डंख मारून मधमाशांनी माणसाला बनवले 'भूत'... आठवडाभरानंतर कोमातून बाहेर आले
20000 डंख मारून मधमाशांनी माणसाला बनवले ‘भूत’… आठवडाभरानंतर कोमातून बाहेर आले
अमेरिकेतील ओहायोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीवर आफ्रिकन किलर मधमाश्यांनी अशा प्रकारे हल्ला केला की ती व्यक्ती आठवडाभर कोमात गेली. मधमाश्यांनी त्या माणसाला कोमात आणले होते प्रतिमा क्रेडिट स्रोत: फेसबुक मधमाशीचा मध जितका गोड असतो तितकाच त्याचा डंक जास्त घातक असतो. मधमाशी चावल्यास कोणीही मरू शकतो. यासोबतच त्याचा डंख कोठे टोचला आहे शरीर च्या त्या भागावर मत्सर आणि सूज पण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
आफ्रिकन स्वाईन फिवरविषयी केंद्र शासनाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश
आफ्रिकन स्वाईन फिवरविषयी केंद्र शासनाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश
मुंबई, दि. 4  :देशातील पूर्वोत्तर राज्यांत तसेच उत्तरप्रदेश व बिहार या राज्यामध्ये वराह प्रजातीत ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने या राज्यांना जैव सुरक्षा, उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच इतर राज्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ हा…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
आफ्रिकन स्वाईन फिवरविषयी केंद्र शासनाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश
आफ्रिकन स्वाईन फिवरविषयी केंद्र शासनाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश
मुंबई, दि. 4  :देशातील पूर्वोत्तर राज्यांत तसेच उत्तरप्रदेश व बिहार या राज्यामध्ये वराह प्रजातीत ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने या राज्यांना जैव सुरक्षा, उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच इतर राज्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ हा…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यास मुकली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यास मुकली
ऋषभ पंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली T20I दिल्ली: दिल्लीत खेळल्या गेलेल्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने 19.1 षटकांतच लक्ष्य गाठले. आफ्रिकन कॅम्पसाठी डेव्हिड मिलरने तुफानी खेळी केली. टीम इंडियासाठी हा सामना खूप खास होता. त्याला विशेष विश्वविक्रम करण्याची संधी होती. पण…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
जगातील सर्वात काळी नदी!
https://bharatlive.news/?p=175614 जगातील सर्वात काळी नदी!
झुरिच : आफ्रिकन देश कांगो येथे रुकी नदी वाहते. ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
जी ट्वेंटी परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याचा मसूदा मंजूर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.
येत्या १६ सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक.
मराठा आरक्षणासाठी पुकारलेलं आमरण उपोषण सुरुच ठेवणार-मनोज जरांगे पाटील.
आणि
देशातील पहिली "भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था" राज्यात स्थापन होणार.
****
जी ट्वेंटी परिषदेनं नवी दिल्ली जाहीरनाम्याचा मसूदा एकमतानं मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. दिल्लीत सुरू असलेल्या अठराव्या जी ट्वेंटी परिषदेच्या शिखर बैठकीच्या 'एक कुटुंब' या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले -
फ्रेंडस्‌ एक खुशखबरी मिली है, हमारी टीम्स के हार्डवर्क से और आप सभी के सहयोग से नई दिल्ली G-20 लीडर्स समिट डिक्लेरेशन पर सहमती बनी है। मेरा प्रस्ताव है की इस लीडर्स डिक्लेरेशन को भी ॲडाप्ट किया जाए। मैं इस डिक्लेरेशन को ॲडाप्ट करने की घोषणा करता हूं।
शाश्वत, संतुलित, सर्वसमावेशक विकास, परिसंस्थांचं संरक्षण-संवर्धन-शाश्वतरित्या वापर आणि पुनर्संचय, स्वच्छ-शाश्वत-परवडणाऱ्या सर्वसमावेशक ऊर्जेचं संक्रमण, हरित विकास, जागतिक आरोग्याचं बळकटीकरण, भूक आणि कुपोषण निर्मूलन आदी मुद्यांवर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.
दरम्यान, या परिषदेच्या वन अर्थ अर्थात एक पृथ्वी या पहिल्या सत्रात बोलतांना पंतप्रधानांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली, त्याचप्रमाणे एकत्र येऊन जागतिक अविश्वासावर मात करूया, असं आवाहन केलं. अन्न आणि इंधन व्यवस्थापन, दहशतवाद, सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा, जलसुरक्षा अशा समस्यांवर भावी पिढ्यांसाठी ठोस उपाय शोधण्याची गरज पंतप्रधानांनी नमूद केली.
आफ्रिकन युनियनला जी-ट्वेंटी मध्ये स्थायी सदस्यत्व देण्याच्या भारताच्या प्रस्तावाला जी-ट्वेंटी शिखर परिषदेत मंजुरी देण्यात आली.
****
जी-ट्वेंटी शिखर परिषदेच्या अनुषंगानं केंद्र सरकारतर्फे नवी दिल्लीत हस्तव्यवसाय बाजार हे भव्य प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल, पंजाबची फुलकारी, बिहारची मधुबनी चित्रकला, आंध्र प्रदेशची कलमकारी आणि मध्य प्रदेशची चंदेरी अशा विविध कलाकुसर असलेल्या वस्त्रांसह अनेक वस्तु या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनातून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना एकाच छताखाली भारतीय परंपरांची अनोखी झलक पहायला मिळत आहे.
****
येत्या १६ सप्टेंबरला औरंगाबाद इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचे रोजगार हमी मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसंच विविध योजना मार्गी लागण्यासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची ठरेल, असा विश्वास पालकमंत्री भुमरे यांनी या प्रसंगी व्यक्त केला. दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १५, १६ आणि १७ सप्टेंबरला औरंगाबाद इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेलं आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथल्या उपोषणस्थळी त्यांनी ही माहिती दिली. काल रात्री माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वात मनोज जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर एक नवीन शासकीय निर्णयही शासनानं जारी केला. परंतु त्यातही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात स्पष्टता नसल्याचं सांगत जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं.
आम्हाला सरकारवर अविश्वास दाखवायचा नसून चर्चेतून मार्ग काढायचा, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे, असं सांगत, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ असं मान्य केल्यास आपण उपोषण सोडू असं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी याबाबत बोलतांना, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनानं एक समिती स्थापन केली असून ही समिती औरंगाबाद इथं याबाबत अभ्यास करणार असल्याची माहिती दिली. जरांगे पाटील यांचा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी या समितीला काम करण्याची संधी द्यावी, जरांगे यांची आजची भूमिका आपण सरकारपर्यंत पोहचवू, असंही खोतकर यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात देशातील पहिली राज्यस्तरीय "भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था" स्थापन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूरच्या ईरशाळवाडीत भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला. सह्याद्रीच्या भूगर्भात होत असलेल्या बदलांचा साकल्याने अभ्यास करण्याच्या गरजेकडे भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं होतं. महाराष्ट्रातील भूस्खलन प्रवण प्रदेश आणि त्याला सामोरे जाण्यासाठी धोरणं-उपाय योजना विकसित करण्याचं काम या संस्थेद्वारे करणं प्रस्तावित असेल.
****
नाशिक शहर आणि परिसरात दोन दिवसांनंतर आज पावसाचा जोर कमी झाला आहे. गंगापूर धरण ९५ टक्के भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. आज पावसाचा जोर कमी झाल्यानं, गंगापूर धरणातून तसंच नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दरम्यान दारणा धरणातून होणारा विसर्ग मात्र वाढवण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड शहर आणि परिसरात आज दुपारी साडेबारापासून एक तासांहून अधिक काळ संततधार पाऊस झाला. मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण होतं आणि काल रात्री जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्याला २४ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
औरंगाबाद शहर परिसरातही आज सकाळपासून सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत.
****
रायगड जिल्ह्याला परवा ११ सप्टेंबर पर्यत हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
****
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानं जलाशयामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळी अक्कलपाडा धरणाचे पाच  दरवाजे अर्ध्या मीटर उंचीनं उघडण्यात येवून पाच हजार दशलक्ष घनमीटर पाणी पांझरा नदी पात्रत सोडण्यात येत आहे.
****
येत्या छत्तीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
उस्मानाबाद तालुक्याच्या वरवंटी भागातील महादेव टेकडी इथं आज वृक्ष लागवड अभियानाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांच्या हस्ते झालं. आर्ट ऑफ लिव्हिंग, जिल्हा पोलीस प्रशासन आणि स्थनिक ग्रामस्थांतर्फे टेकडी आणि परिसरात वीस हजार विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. आज या ठिकाणी दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातील "सकल मराठा शिक्षक, प्राध्यापक, खासगी शिकवणी प्राध्यापक तसंच शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती"तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. मराठा आरक्षण मागणीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं.
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव इथं हिंगोली ते सेनगाव रस्त्यावर बसस्थानक इथं सकल मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या म��गणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. दोन तास चाललेल्या या आंदोलनात नर्सी, केसापूर, काळकोंडी, जवळा, नांदुरा, आदी परिसरातील मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथं उद्या पहिलं नांदेड जिल्हा मराठी साहित्य संमेलन होणार आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार दासू वैद्य हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. एकदिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद तसंच कथाकथन आणि कविसंमेलन होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात १४ ते १७ सप्टेंबर २०२३ या चार दिवसांमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये कवी संमेलन, क्रीडा तसंच विविध स्पर्धा, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाउंडेशन च्या वतीने नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं औरंगाबाद इथं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या ०३ ते ०७ जानेवारी २०२४ दरम्यान प्रोझोन मॉल मध्ये हा महोत्सव होणार आहे.
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
हे देश उपासमारीच्या काठावर पोहोचले, लोकांनी पाने व टोळ खाण्यास भाग पाडले, अशी चिंता यूएनने व्यक्त केली
हे देश उपासमारीच्या काठावर पोहोचले, लोकांनी पाने व टोळ खाण्यास भाग पाडले, अशी चिंता यूएनने व्यक्त केली
आफ्रिकन देश हे हृदयस्पर्शी चित्र काळजीपूर्वक पहा. काळजीपूर्वक जेणेकरून यामुळे आपल्या सौंदर्य बौद्ध धर्मास दुखापत होणार नाही. हे चित्र रडताना, ओरडताना आणि चौपदरी लोकांना प्रश्न विचारताना दिसत आहे, ज्याला आपण आपला देश म्हणतो. जर आपण चुकलो नाही तर आपण इतके असहाय्यता आणि असहायता चित्रात कधीच पाहिली नसती? अविश्वसनीय, आजही अशी छायाचित्रे आमच्या कॅमे .्यात जेडीमध्ये येऊ शकतात. जिथे जिथे चंद्रापर्यंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
नायजेरियन नववधूने देशी शैलीत वेशभूषा केली, व्हिडिओ पाहून लोकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले
नायजेरियन नववधूने देशी शैलीत वेशभूषा केली, व्हिडिओ पाहून लोकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले
हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘एका आफ्रिकन मुलीला भारतीय वधू बनवण्याचे माझे स्वप्न होते. मी यासाठी आफ्रिकन मॉडेल शोधत होतो, तेव्हा मला ही खरी वधू सापडली. नायजेरियन नववधू देसी स्टाईलमध्ये परिधान केली होती प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram सामाजिक माध्यमे पण लग्नाशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, त्यातील काही खूप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years
Text
आफ्रिकन कोरोना भारतात केला प्रवेश
आफ्रिकन कोरोना भारतात केला प्रवेश
  नवी दिल्ली – पीटीआय जानेवारी महिन्यात कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकन स्ट्रेनची बाधा झालेले 4 रुग्ण भारतात आढळून आले आहेत; तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एक जण ब्राझिलियन स्ट्रेनने बाधित झाल्याचे आढळले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. दक्षिण आफ्रिकन स्ट्रेनची लागण झालेल्या चौघांपैकी एक जण अंगोला येथून, दुसरा टांझानियातून, इतर दोघे दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
मोरोक्को हसन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकाने चांगल्या मार्कांच्या नावाखाली आपल्या विद्यार्थिनींवर हल्ला केला
मोरोक्को हसन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकाने चांगल्या मार्कांच्या नावाखाली आपल्या विद्यार्थिनींवर हल्ला केला
व्हायरल बातम्या: गुरू आणि शिष्याचे नाते अत्यंत पवित्र आणि महत्त��वाचे आहे. गुरूला देवाचा दर्जा दिला जातो. शिक्षकच मुलाचे भविष्य ठरवतात, पण कधी कधी काही शिक्षक असे असतात जे या नात्याला कलंक लावतात. आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे विद्यापीठातील एका प्राध्यापकाला आपल्याच विद्यार्थिनींशी संबंध ठेवल्याप्रकरणी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. परीक्षेत चांगले गुण देण्याच्या बदल्यात…
View On WordPress
0 notes