Tumgik
#इच्छामरणाची
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 07 March 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश.
नाशिकच्या शेतकऱ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी; अहमदनगरच्या शेतकऱ्यांकडून पंतप्रधानांना कांद्यांची भेट.
नवी मुंबईत वाशी इथं उद्यापासून राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला प्रारंभ.
आणि
मराठवाड्यासह राज्यभरात धुलिवंदन पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरे.
****
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश दिले. ठाणे, पालघर, वाशीम, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीनंही प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात टिटाने खोरी या गावात काल जोरदार गारपीट होऊन कांदा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार मंजुळा गावित, खासदार सुभाष भामरे आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज तातडीनं नुकसानग्रस्त भागात जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. नुकसानाचे पंचनामे करण्यात येतील आणि राज्य सरकार योग्य ती मदत शेतकऱ्यांना देईल, असं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजही पहाटेपासून पाऊस सुरु आहे. वैजापूर गंगापूर, पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचं नुकसान झालं. पैठण तालुक्यातल्या वडजी इथं वीज पडून एक बैल दगावला.
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या पानकनेरगाव इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विलास गव्हाणे असं या शेतकऱ्याचं नाव असून, शेतात जाऊन गव्हाची सुडी झाकण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. जिल्ह्यात कळमनुरी तसंच औंढा तालुक्यातही आज पाऊस झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये अकोले तालुक्यातील कोतुळ या भागात अवकाळी पावसासह गारा पडल्यामुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, झेंडू यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे
****
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातल्या एकशे एक शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र आणि राज्य सरकार कांदा, द्राक्षं तसंच भाजीपाल्यासह शेतमालाला योग्य आणि रास्त बाजारभाव देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. अत्यल्प दरामुळे उत्पन्न खर्चही निघत नाही, डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे, कुटूंबाचे पालन पोषण अशक्य झालं आहे, त्यामुळे इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा आशयाचं पत्र या शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना कांदे पाठवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशाच्या ईशान्य भागात येत्या एकवीस तारखेपासून सुरू होणार असलेल्या भारत गौरव ट्रेनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा एक रंजक आणि संस्मरणीय प्रवास असेल, ईशान्य भारत जाणून घेण्याची ही एक अनोखी संधी असेल असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं "नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी: बियॉन्ड गुवाहाटी" अर्थात “गुवाहाटी पलिकडे ईशान्येकडील शोध” ही गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एकवीस तारखेला ही गाडी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि पंधरा दिवसात गुवाहाटी, शिवसागर, आसाममधील जोरहाट आणि काझीरंगा, त्रिपुरामधील उनाकोटी,  आगरतळा आणि उदयपूर, नागालँडमधील दिमापूर आणि कोहिमा आणि मेघालयातील शिलाँग आणि चेरापुंजी या ठिकाणांची सफर घडवेल.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या भाषणातून भारताच्या लोकशाहीचा, राजकारणाचा, न्यायपालिकेचा आणि सुरक्षा धोरणाचा अपमान केला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. भारतातली जनता गांधी यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून ते परदेशात जाऊन भारतातली लोकशाही धोक्यात असल्याचं सांगतात, असं मत भाजप प्रवक्ता रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
दरम्यान, राहुल गांधी यांनी लंडनच्या चथम हाऊस इथे झालेल्या एका कार्यक्रमात देशाच्या सगळ्या स्वायत्त संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ताबा मिळवल्यानं भारताच्या लोकशाहीचं स्वरूप बदलल्याचा, तसंच भारतातली माध्यमं, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग यांचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप केला आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं कालपासून 'प्रत्येक पेमेंट डिजिटल' या अभियानाची सुरुवात केली. 'डिजिटल पेमेंट जागृती आठवडा 2023' या योजनेच्या निमित्तानं हे अभियान येत्या बारा तारखेपर्यंत राबवलं जाणार आहे. 'डिजिटल पेमेंटचा अवलंब करा आणि इतरांनाही शिकवा' हा या अभियानाचा विषय आहे. डिजिटल पेमेंटची सुलभता आणि सुविधा अधिक मजबूत करणं आणि नवीन ग्राहकांना त्याची सुलभता पटवून त्याच्या वापराकडे वळवणं, असं या अभियानाचं उद्दीष्ट आहे.
****
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने नवी मुंबईत वाशी इथं उद्यापासून राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2023” ला प्रारंभ होत आहे. १९ मार्चपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी नवी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये साधारण पाचशेहून स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून साडे तीनशे, देशातल्या अन्य राज्यांतून साधारण ११९ तर नाबार्डचे ५० स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणींचे खाद्यपदार्थांचे ७० स्टॉलही या प्रदर्शनात असतील.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथे येत्या चोवीस ते सव्वीस मार्च दरम्यान 'महापशुधन एक्सपो २०२३' चं आयोजन करण्यात आलं आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. देशी गोवंश संवर्धनाचं महत्त्व पटवून देऊन देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणं, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रदर्शनात पशूतज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं कुटूंबीय तसंच कार्यकर्त्यांसह कोरड्या रंगांनी धुळवडीचा आनंद लुटला. उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांसह धुलिवंदन साजरं केलं.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनीही कुटूंबीय तसंच कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली. शहरात नागरिकांमध्ये धुळवडीचा उत्साह दिसून आला.
बीड जिल्ह्यात विडा इथं जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आजही पाळली गेली. जालना शहरातूनही हत्ती रिसाला मिरवणूक काढण्यात आली. १३४ वर्षांची परंपरा असलेल्या या मिरवणुकीत हत्तीवर बसलेल्या राजाने नागरिकांच्या दिशेने रेवड्या आणि फुलांची उधळण केली. या मिरवणुकीनंतर नागरिक रंग खेळणं थांबवतात अशी परंपरा आहे.  मराठवाड्यात इतरत्रही धुलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
****
धाराशीव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथे उद्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या, गुलामीच्या प्रत्येक विचारापासून मुक्ती, भारताच्या गौरवशाली वारशाचा अभिमान, एकता, अखंडता आणि नागरिकांकडून कर्तव्याचं पालन, या पंचसूत्रांवर आधारित चित्रकला, कविता लेखन, भाषण आणि छायाचित्र स्पर्धा यावेळी घेण्यात येणार आहेत. या महोत्सवात आरोग्य विभागानं युवतींसाठी आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रस्ता रुंदीकरणात अन्याय झाल्याचा आरोप करीत इच्छामरणाची मागणी; जेजुरीतील बाधित कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र
रस्ता रुंदीकरणात अन्याय झाल्याचा आरोप करीत इच्छामरणाची मागणी; जेजुरीतील बाधित कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र
रस्ता रुंदीकरणात अन्याय झाल्याचा आरोप करीत इच्छामरणाची मागणी; जेजुरीतील बाधित कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र जेजुरी : पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित रुंदीकरणामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप करीत जेजुरीतील बाधित कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे. बाह्यवळण मार्ग टाळून जेजुरी शहरातूनच होत असलेल्या रुंदीकरणाबाबतही आक्षेप घेतला जात आहे. रामभाऊ शंकर काकडे,…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
मला इच्छा मरणाची परवानगी द्या; मुलाचं राष्ट्र्पतींना पत्र
मला इच्छा मरणाची परवानगी द्या; मुलाचं राष्ट्र्पतींना पत्र
बिहारच्या भागलपूर जिल्‍ह्‍यातील एका (१५ वर्षीय) मुलाने कौटुंबिक कलहाला कंटाळून इच्छामरणाची मागणी केली आहे. या मुलाने राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनंतीचे पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. राष्‍ट्रपतींकडून पंतप्रधान कार्यालयाला हे पत्र पाठविण्यात आले आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाकडून जिल्‍हा प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  कृषने लिहिलेल्‍या पत्रात त्‍याला त्‍याच्या…
View On WordPress
0 notes
Text
मदत करू शकत नसाल, तर किमान इच्छामरणाची परवानगी द्या, -शेतकऱ्याचं योगी आदित्यनाथ यांना पत्र
मदत करू शकत नसाल, तर किमान इच्छामरणाची परवानगी द्या, -शेतकऱ्याचं योगी आदित्यनाथ यांना पत्र
लखनऊ | 39 वर्षीय बटाटा उत्पादक शेतकरी प्रदीप शर्मा यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून मिळालेली 2 हजारांची तुटपुंजी रक्कम योगी आदित्यनाथ यांना परत पाठवून दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून अवघ्या दोन हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्यानं इच्छामरणाची परवानगी योगी आदित्यनाथ यांना मागितली आहे. 
दरम्यान, आग्र्यातील एका कर्जबाजारी शेतकऱ्यानं त्याला मिळालेली तुटपुंजी मदत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
“आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”, एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं पत्र!
“आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”, एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं पत्र!
“आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”, एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं पत्र! इच्छामरणाचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत राहिल्याचं दिसून आलं आहे. जगभरात अशा प्रकारच्या अनेक मागण्या झाल्याचं देखील समोर आलं आहे. भारतात इच्छामरणाची परवानगी नसताना देखील अनेकदा अशा मागण्या झाल्या असून त्या वेळोवेळी फेटाळण्यात आल्या आहेत. मात्र, आता काही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनीच इच्छामरणाची मागणी केल्याचं समोर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
इच्छामरण:पाथरीत एसटीच्या 130 कर्मचाऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी
इच्छामरण:पाथरीत एसटीच्या 130 कर्मचाऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी
इच्छामरण:पाथरीत एसटीच्या 130 कर्मचाऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी https://divyamarathi.bhaskar.com/rss-v1–category-5492.xml
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
लग्न ठरत नसल्याने पुण्यातील तरूणाचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र
लग्नास वारंवार नकार मिळत असल्याने पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने  थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये मुलाने इच्छामरणाची मागणी केली आहे.
पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पत्राची दखल घेत पुणे आयुक्तांना याबाबत कळविले. यानंतर स्थानिक दत्तवाडी पोलिसांनी तरूणाशी संपर्क करत त्याचे मन वळवले.
मुलाचे पत्र – 
मी माझ्या नाकर्तेपणामुळे आनंदाने इच्छा मरणाची मागणी करत…
View On WordPress
0 notes