Tumgik
#कान चित्रपट महोत्सव
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
एनडीएचा राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा-रविवारी नव्या सरकारचा शपथविधी
सुशासनासह नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेपाला प्राधान्य-पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या १५ ते २१ जून दरम्यान आयोजन
आणि
ज्ञानराधा पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे तसंच अर्चना कुटे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
****
भाजपचे नेते नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात सायंकाळी सहा वाजता हा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएच्या नेत्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला, त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.
त्यापूर्वी, संसदेच्या केंद्रीय सभागृहात झालेल्या एनडीएच्या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तेलगूदेशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलतांना मोदी यांनी, एनडीए फक्त राजकीय पक्षांचा गट नाही तर ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वानं एकत्रित आलेला कटीबद्ध समूह असल्याचं प्रतिपादन केलं. सुशासन, विकास, जीवनमान दर्जा उंचावणं आणि नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप याला सरकारचं प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, एनडीएच्या बैठकीनंतर मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
****
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात १७ जागा लढवून १४ जागांवर विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं यश असल्याचं, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य असून, त्यातही असाच लढा देऊ, असा निर्धार चेन्नीथला यांनी व्यक्त केला
****
राज्य विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे. मनसेतर्फे अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आज मुदतीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे, भाजपचे निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अमित सरैय्या रिंगणात आहेत.
दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
****
१८ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते २१ जून, दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, पुणे, तसंच कोलकाता इथं केलं जाणार असल्याचं, जाजू यांनी सांगितलं. यंदा या महोत्सवाच्या स्पर्धा विभागात ३८ देशांमधून ६५ भाषांमधील तब्ब्ल एक हजार १८ चित्रपटांची नोंदणी झाली आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि यंदा ७७ व्या कान चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलेला “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो" हा लघुपटही या महोत्सवात दाखवला जाणार आहे.
****
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना बीड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे बीड पोलिसांनी कुटे यांच्या पुण्यात हिंजवडी इथल्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं.
‘द कुटे उद्योग समूहा’चे प्रमुख असलेले सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीत महाराष्ट्राच्या विविध भागांसह इंदूरपर्यंत ५० शाखा आणि साडेसहा लाख ठेवीदार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कुटे समूहाची आयकर विभागाने तसंच सक्तवसुली संचालनालयाने तपासणी केल्यावर ज्ञानराधा पतसंस्थेतून ठेवीदारांनी ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटे यांनी पतसंस्थेच्या सर्व शाखा बंद करत, ठराविक मुदतीत ठेवीदारांना पैसे परत करण्याची आश्वासनं दिली, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. या प्रकरणी कुटे यांच्याविरोधात माजलगाव इथं दोन गुन्हे दाखल झाले.
****
महावितरण कंपनीच्या वतीनं राज्यभरात लवकरच विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. समाज माध्यमांवर वीजमीटर विरोधात जन समर्थन एकत्रित करण्याचं काम याद्वारे सुरू करण्यात आलं आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी मीटर विरोधात सविस्तर पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले असून शासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे
****
तलाठी हा महसूल यंत्रणेचा गावपातळीवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असून हे पद महसूल प्रशासनाचा पाया आहे. त्यामुळे तलाठ्यांनी विश्वस्त म्हण���न काम करावं अशी अपेक्षा छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनात नव्यानं रुजू झालेल्या ५३ तलाठ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. नवनियुक्त तलाठ्यांना सुप्रशासन, जबाबदारी, कार्यपद्धत या विषयावर याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यामधील, नवनियुक्त ३८२ शिक्षकांना नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यशाळेत शिक्षकाचं कार्य-कर्तृत्व, जवाबदारी, जिल्हा परिषदेच्या सेवा शर्ती अधिनियम, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, नवीन शैक्षणिक धोरण या विषयी पवित्र प्रणाली च्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असं प्रशिक्षण देणारी ही राज्यातली पहिलीच जिल्हा परिषद ठरली असल्याचं, जिल्हा परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या शेतकऱ्यांनी आज नरसी इथल्या ३३ किलोव्हॅट उपकेंद्रासमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केलं. या परिसरातील हनवतखेडा, कडती, चांगेफळ या भागात मागील दोन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळं शेतात विजेचे खांब पडले, वीज वाहिन्या देखील तुटून पडल्या आहेत. मात्र दोन महिन्यापासून हे खांब उचलण्यात आले नाहीत, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतीच्या मशागतीस त्याचा अडथळा निर्माण होत असल्यानं आज हे आंदोलन केल्याचं, शेतकऱ्यांनी सांगितलं.
****
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राज्यातल्या ११५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसंच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यामध्ये बीड इथले पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिळे यांनाही राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात मुंबई-नागपूर महामार्गावर आज सकाळी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सिंदखेड राजा आणि जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजिक असलेल्या फारोळा इथल्या महावितरणच्या उपकेंद्रातील विद्युत यंत्रात बिघाड झाल्यानं आज शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. या असुविधेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही कोरडा दिवस पाळण्यासह इतर उपायांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ११ जूनपर्यंत धर्माबाद - मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
सुनील ग्रोव्हरने त्याचा एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
सुनील ग्रोव्हरने त्याचा एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर नेहमी लोकांचे मनोरंजन करत असतो. पुन्हा एकदा त्याने आ��ल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला. ज्याने त्याचा हा फोटो पाहिला त्याला हसू आवरता आले नाही. वास्तविक, सुनील ग्रोव्हरने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरून आपला फोटो दाखवला आहे. मात्र, त्याचे हे चित्र मॉर्फ करण्यात आले आहे. सुनील ग्रोव्हरने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Deepika Padukone | दीपिका आणि रणवीरने कान्स 2022 च्या पार्टीत केली खूप मजा
#Deepika_Padukone | दीपिका आणि रणवीरने कान्स 2022 च्या पार्टीत केली खूप मजा #Bollywood #RanveerSingh #Entertainment #Music #Movies #Canes
दीपिका पदुकोण रणवीर सिंग कॅनीज पार्टी: दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये तिच्या स्वभावाचा प्रसार करण्यात व्यस्त आहे. दीपिका ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी सदस्य आहे. त्यामुळेच त्याला अनेक कार्यक्रम आणि अनेक पार्ट्यांमध्ये जाण्याची संधी मिळत आहे. रविवारी दीपिका दोन शानदार लूकमध्ये दिसली. त्यांच्या पार्टीचे फोटोही आता समोर आले आहेत. दीपिका पदुकोणने काळ्या रंगाच्या अतिशय सुंदर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ६९ पूर्णांक १६ शतांश टक्के मतदान झालं. निवडणूक आयोगानं ही सुधारित आकडेवारी काल जाहीर केली. १३ तारखेला झालेल्या चौथ्या टप्प्यात पुरुष मतदारांचं प्रमाण ६९ पूर्णांक ५८ शतांश टक्के, महिला मतदारांचं प्रमाण ६८ पूर्णांक ७६ टक्के, तर तृतीयपंथी मतदारांचं प्रमाण ३४ पूर्णांक २३ शतांश टक्के इतकं आहे.
****
फ्रान्समध्ये ७७ व्या कान चित्रपट महोत्सवात, ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अर्थात इफ्फीच्या अधिकृत पोस्टरचं अनावरण, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते काल झालं. यावर्षी पहिल्यांदाच कान चित्रपट महोत्सवात भारत पर्वाचं यजमानपद भारत भूषवत आहे.
****
नायगाव - जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरीवली, कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी दिल्याची माहिती, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते काल मुंबईत कांदिवली इथं कोकणवासियांच्या मेळाव्यात बोलत होते. हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सीमा शुल्क विभागाने १३ ते १६ मे दरम्यान, मुंबई विमानतळावरून ११ किलो ३९० ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधित सिगारेट्स असा सुमारे सात कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विव���ध २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
मुंबईतल्या घाटकोपर इथं फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी फलकाचा मालक भावेश भिंडे याला दंडाधिकारी न्यायालयानं २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १३ तारखेला झालेल्या या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
आषाढी वारीसाठी सोलापुरात येणारे वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, पालखी मार्गावरील तसंच पंढरपूर शहरातले बेकायदा जाहिरात फलक तत्काळ हटवावेत, तसंच अधिकृत फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश, सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले आहेत. आषाढ वारी पूर्वनियोजनाबाबत झालेल्या बैठकीत त्या काल बोलत होत्या.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानमधल्या झूंझनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील १५ कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल रात्री  कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळं हे सर्वजण खाणीत अडकले होते.
****
७७ व्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात झाली. या महोत्सवात भारत मंडपम् या भारतीय दालनाचं उद्घघाटन आज चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या  महोत्सवात प्रथमच “भारत पर्व”चं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत. गोव्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचं अधिकृत फलक आणि ट्रेलरचं अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये होणार आहे.
****
भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काळे यांना गाझा पट्टीत रफाह इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र-यूएनच्या  सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळं कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली  अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे. महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून इंधन गळती होत आहे, तसंच कोसळलेल्या फलकामुळं पेट्रोल पंप प्रभावित झाल्यानं उपाययोजनेसाठीचे उपकरणं वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
घाटकोपर इथं होर्डींग दुर्घटनेनंतर नंदुरबार शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार नगरपरिष�� कार्यवाही करत आहे. शहरातील २२ खाजगी इमारतींवर होर्डींग उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडीट, आणि होर्डींग्ज स्थिरता प्रमाणपत्र पंधरा दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. कुठेही धोकादायक किंवा विना परवानगी होर्डीग आढल्यास तात्काळ कारवाई होणार असल्याची माहीती नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नवीन योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. शहराला येत्या डिसेंबरपासून पाणी पुरवठा केला जाणार असून याबाबतचं वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केलं आहे. या अनुषंगानं औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची बिडकीन परिसरात काल पाहणी केली.
गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी, तसंच सर्व जलवाहिनीची कामं सुव्यवस्थित व्यवस्थापन करुनच व्हावी, अशा सुचनाही न्यायमुर्तींनी कंत्राटदारांना दिल्या आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या २०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान  केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
दुरसंचार विभाग किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कॉल बनावट आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कोणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा कॉलसंदर्भात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण सरकारी अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटसअॅप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी केली आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १९ धावांनी पराभव केला. 
****
0 notes
loksutra · 2 years
Text
टुडे टीव्ही न्यूज अंकिता लोखंडे विकी जैन हिना खान कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लग्नानंतर अडचणीत आहे
टुडे टीव्ही न्यूज अंकिता लोखंडे विकी जैन हिना खान कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लग्नानंतर अडचणीत आहे
आज टीव्ही बातम्या: टीव्हीच्या दुनियेत नेहमीप्रमाणे आजही धांदल सुरूच होती. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 12’ या शोसाठी आणखी एक हसीनाची पुष्टी झाली असताना, ‘खतरों के खतरा’च्या सेटवर करण कुंद्राने असे कृत्य केले की तेजस्वी प्रकाश ती शरमेने लाल झाली. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही चटपटीत आणि चटपटीत बातम्या घेऊन आलो आहोत, ज्या वाचून तुम्हाला आनंद आणि आश्चर्य वाटेल. चला तर मग त्या बातम्यांवर एक नजर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
पायल रोहतगीने कंगना राणौतच्या धक्कडवर लक्ष वेधले- करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश मीडियासमोर मिठी मारताना दिसले, दिशा परमार मित्रांसह पार्टीसाठी बाहेर गेली
पायल रोहतगीने कंगना राणौतच्या धक्कडवर लक्ष वेधले- करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश मीडियासमोर मिठी मारताना दिसले, दिशा परमार मित्रांसह पार्टीसाठी बाहेर गेली
टुडे टीव्ही न्यूज: सोशल मीडियावर टीव्ही स्टार्सचा बोलबाला नसेल असा एकही दिवस जात नाही. आजही अनेक टीव्ही स्टार्स सोशल मीडियावर बॉलिवूड स्टार्सना टक्कर देत आहेत. आदित्य नारायणने आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दुसरीकडे, हिना खानच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे रोमँटिक फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. चला जाणून…
Tumblr media
View On WordPress
0 notes