Tumgik
#गर्भपात बंदी
marathinewslive · 2 years
Text
गर्भपात प्रकरणात फेसबुकने चॅट इतिहास शेअर केला, यूएसमध्ये संताप पसरला
गर्भपात प्रकरणात फेसबुकने चॅट इतिहास शेअर केला, यूएसमध्ये संताप पसरला
फेसबुक मालक मेटा यांनी न्यायालयाच्या आदेशाची दखल घेऊन “गर्भपाताचा अजिबात उल्लेख केला नाही” असा बचाव केला. (फाइल) सॅन फ्रान्सिस्को: गर्भपात प्रकरणाची चौकशी करणार्‍या यूएस पोलिसांचे पालन करून फेसबुकने संताप व्यक्त केला, प्लॅटफॉर्म प्रक्रियेवर क्लॅम्पिंग करण्याचे साधन असेल अशी भीती वाढवत आहे. सोशल नेटवर्किंग दिग्गजाने एका आईवर तिच्या मुलीच्या गर्भपाताचा गुन्हेगारी आरोप लावल्याचा संदेश कळवला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अमेरिकेत गर्भपात बंदी: अधिकार नसेल तर शारीरिक संबंधही नाहीत – अमेरिकेतील महिलांनी स्पष्टपणे
अमेरिकेत गर्भपात बंदी: अधिकार नसेल तर शारीरिक संबंधही नाहीत – अमेरिकेतील महिलांनी स्पष्टपणे
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपातावर बंदी घालण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter Twitter वर Abstinence Trend: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जुना निर्णय उलटवत गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द केला आहे. या निर्णयानंतर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने स्वतःचा 50 वर्षे जुना निर्णय बदलून गर्भपाताचा घटनात्मक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 30 September 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मराठवाड्यातल्या नांदेड वगळता सर्व जिल्ह्यांचा समावेश
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर आता वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त दोन सिलेंडर्स मिळणार
अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट
भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ
राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नांदेडला अभिजित राऊत तर उस्मानाबादला सचिन ओंबासे नवे जिल्हाधिकारी
केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद आणि बीडमधील कार्यालयांना टाळं
आणि
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा
सविस्तर बातम्या
अतिवृष्टीच्या निकषांत न बसणाऱ्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून जवळपास ७५५ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. निकषात बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं यापूर्वीच मदत घोषित केली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे साडे चार हजार कोटी रुपयांच्या निधीचं शासनानं वाटप केलं आहे. या निर्णयाचा मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना, तसंच यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना लाभ होईल. राज्य आपत्ती निवारण दलाच्या निकषाप्रमाणे जर मदतीचं वाटप केलं असतं, तर केवळ दीड हजार कोटी रुपयांची मदत वाटप झाली असती. मात्र निकषाच्या पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना, वर्षभरात अमर्यादित सिलेंडर्स मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस जोडणी धारकांना वर्षभरात फक्त १२ सिलेंडर्स मिळणार असून, त्याहून अधिक सिलेंडर्सची गरज भासल्यास जास्तीचे सिलेंडर्स विनाअनुदानित दरानं घेता येईल. सिलेंडर संदर्भातल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून, याची तातडीनं अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी करण्यासंदर्भातील अनेक तक्रारी येत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
****
अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र असून, त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणं असंवैधानिक असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भधारणेच्या २० ते २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मिळेल, असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं सांगितलं. बलात्कारानंतर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याच्या तरतुदीअंतर्गत वैवाहिक संबंधांतून झालेल्या बलात्काराचाही समावेश करता येईल. मात्र त्यासाठी बलात्कार झाल्याचं सिद्ध व्हावं लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. समाजातल्या संकुचित पितृ सत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
चारचाकी वाहनामध्ये सहा `एअरबॅग` अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची पुढील वर्षी एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक पुरवठा स��खळीच्या संकटानंतर वाहन उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात, भारतीय टपाल खात्याच्या तिसऱ्या तिमाहीसाठी, बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान विकास पत्रावरील व्याज दरामध्ये सहा पूर्णांक नऊ टक्क्यांवरुन सात टक्के वाढ करण्यात आली असून, त्याचा कालावधी १२३ महिने इतका करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदर सात पूर्णांक सहा टक्के तर, मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर सहा पूर्णांक सात टक्के करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक सात टक्के तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच पूर्णांक आठ टक्के इतका व्याजदर देण्यात येणार आहे. मात्र एक वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात, तसंच पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बचत पत्रांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
****
गावांमध्ये कायम स्वच्छता आणि ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असं आवाहन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. स्वच्छता के लिए एकजुट भारत मोहिमेअंतर्गत, ऑनलाईन सरपंच संवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. गावातल्या कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा घ्याव्यात, पाणवठ्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, इत्यादी विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असं आवाहन पाटील यांनी केलं.
****
राज्य सरकारनं काल ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विकास मीना यांची, तर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून सचिन ओंबासे, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी अभिजित राऊत, तर नांदेड महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. भगवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. लातूर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल आणि किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांची देखील बदली झाली आहे.
****
औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यात भगरीच्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्यात भगर विक्री करणाऱ्या सर्व उत्पादक आणि विक्रेत्यांकडील प्रति जिल्हा दहा नमुने तपासणी करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. अन्न, औषध तसंच सौदर्य प्रसाधनांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
२०१४ साली एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं असेल तर त्यात तथ्य असणं स्वाभाविक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २० हजार ९५४ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३३८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ६०४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६९ हजार ३४० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २१, औरंगाबाद ११, लातूर दहा, जालना चार, नांदेड दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया- पीएफआय या संघटनेच्या औरंगाबाद शहरातल्या जिन्सी भागातल्या कार्यालयाला पोलिसांनी काल टाळं ठोकलं. पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं ही टाळेबंदी करण्यात आली. या संदर्भात कार्यालयाला नोटीस देण्यात आली असून, केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय स्थानिक पोलिसही पीएफआयविरुद्ध कारवाई करत आहेत. कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा -एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथकानं औरंगाबादच्या अनेक भागात छापे टाकून पीएफआयच्या १३ सदस्यांना अटक केली आहे.
बीड इथल्या पीआयएफच्या जिल्हा कार्यालयाला देखील टाळं ठोकण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानं पालक गमावलेली बालकं शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांचे चारशे पंचवीस अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव करून खरी शिवसेना वाचवल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. जालना इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात ते काल बोलत होते. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागल असून, मुख्यमंत्र्यांची अपेक्षापूर्ती होईल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी यासारख्या विषयांवर गीतरचना करुन लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची दोन ते पाच मिनिटांची ध्वनि चित्रफीत ३१ ऑक्टोबर पर्यंत पाठवावी. विजेत्यांना रोख बक्षिसं, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. प्रवेश अर्ज तसंच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या संकेत स्थळावर संपर्क करण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
किन्नरांचा आदर करून त्यांनाही आपल्या प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी म्हटलं आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीनं निर्मिती करण्यात आलेल्या, “मिशन गौरी”, या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर, ते काल बोलत होते. या विद्यापिठाअंतर्गत उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा किंन्नरांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासनही भोसले यांनी यावेळी दिलं.
****
बीड जिल्ह्यात सेवा पंधरवडा अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीनं तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्रासाठीची कार्यपद्धती सांगितली. तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं. यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.
****
जालना जिल्हा परिषदेतच्या सभागृहात काल जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा घेण्यात आली. सर्व ग्रामपंचायतींनी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत गावात प्लॉस्टिक वापरावर बंदीचा ठराव घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांनी यावेळी केलं. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत गावात स्वच्छता, प्लॉस्टिक वापरावर बंदी यासह कचरा संकलन, वृक्ष लागवड आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितलं. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला उद्यापासून सुरुवात होत आहे. ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशी यातली प्रमुख मागणी आहे.
****
0 notes
digimakacademy · 4 years
Text
पोलंडमध्ये गर्भपातास बंदी; कोर्टाविरोधात हजारोंची निदर्शने
पोलंडमध्ये गर्भपातास बंदी; कोर्टाविरोधात हजारोंची निदर्शने
[ad_1]
Tumblr media
वॉरसो:पोलंडमध्ये गर्भपात करण्यास बंदी घालण्याचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर लोकांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. करोना महासाथीचा आजार असतानाही हजारोजणांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पोलंडच्या संवैधानिक लवादाने सध्या अस्तित्वात असलेला गर्भपात कायदा जिवनाचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचे म्हणत कायदा रद्द केला. भ्रूण पूर्णपणे, व्यवस्थित विकसित झाले नसल्यास गर्भपात करण्यास या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 August 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १८ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्या दिवशी देखील विरोधकांनी विधीमंडळाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना मदतीची मागणी यावेळी करण्यात आली.
बीड जिल्ह्यातल्या बक्करवाडी इथं गर्भपात करताना महिलेचा झालेल्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितलं. बीड जिल्ह्यात पुन्हा सर्व गर्भलिंग निदान केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात आंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध व्यवसाय प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्यानं त्यांना निलंबित करण्यात आल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यातल्या परिचारिकांच्या वेतनासाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाला दिले जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली.
मुंबई - गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिलं. या विषयावर सुनील प्रभू यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चेदरम्यान ते बोलत होते.
****
अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा काँग्रसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावात यावर चर्चा करा असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात दोन अर्भकांचा झालेला मृत्यू, दुर्गम भागात नसलेले रस्ते हे मुद्दे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केले. राज्य शासन अशा घटनांवर गंभीर असून, आदिवासी भागात असे मृत्यू होणार नाही, दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सर्व कामकाज बाजूला ठेवून तातडीने चर्चा करावी ही मागणी करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ केला.  त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं. हा स्थगन प्रस्ताव मांडताना शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला. या विषय��वर सरकार चर्चेला तयार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आठ युट्यूब चॅनलवर बंदी आणली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. मंत्रालयानं एक फेसबूक अकाउंट आणि दोन फेसबूक पोस्ट देखील ब्लॉक केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३८ लाख ६४ हजार ४१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०८ कोटी ९५ लाख ७९ हजार ७२२ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६ हजार २५१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख एक हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं मास्क वापराच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास बजावलं आहे. संपूर्ण विमान प्रवासादरम्यान प्रवासी मास्क योग्य रितीने वापरत आहेत, तसंच स्वच्छतेचे नियम पाळत आहेत याची खातरजमा विमान कंपन्यांनी करुन घ्यावी, तसंच निर्देशांचं पालन न करणार्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते, असं संचालनालयानं म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उद्या गोपाळकाल्यानिमित्त सुटी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालयं, जिल्ह्यातली कोषागारे, महामंडळाची कार्यालये आणि इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना सुटी लागू राहील, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी जारी केलेल्या अधिसुचनेत नमुद केलं आहे.
****
​पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन, किंवा नमो ॲप आणि माय जीओव्ही ओपम फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
****
0 notes
marathinewslive · 3 years
Text
लिफ्ट, उबेर टेक्सास कायद्यांतर्गत खटला चालकांसाठी फी कव्हर करण्यासाठी
लिफ्ट, उबेर टेक्सास कायद्यांतर्गत खटला चालकांसाठी फी कव्हर करण्यासाठी
न्यूयॉर्क: राइड-हेलिंग कंपन्या उबर आणि लिफ्ट यांनी शुक्रवारी सांगितले की ते टेक्सासमध्ये बहुतेक गर्भपात करण्यास मनाई करणाऱ्या नवीन कायद्यानुसार खटला चालवणाऱ्या कोणत्याही चालकाची कायदेशीर फी भरतील. टेक्सास कायद्याने एकदा वैद्यकीय व्यावसायिकांना हृदयविकाराचा शोध लागला की गर्भपात करण्यास बंदी घातली जाते, साधारणपणे सहा आठवड्यांच्या आसपास आणि अनेकदा महिलांना गर्भवती असल्याचे कळण्यापूर्वी. सरकारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ जून २०१८ सकाळी ६.५० मि. ****  बेरोजगार युवक-युवतींसाठी राज्यशासन प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत रोजगार मोहीम राबवणार  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सर्व प्रादेशिक भाषांमधून घेण्याचे केंद्रीय शिक्षण मंडळाला निर्देश  माल वाहतूकदारांचा देशव्यापी बेमुदत संप कालपासून सुरू  वर्धा- यवतमाळ -नांदेड या नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला येत्या पंधरा दिवसात प्रारंभ होणार आणि  बेकायदा गर्भपात प्रकरणी बीड जिल्ह्यात दोन रुग्णालयांचे परवाने निलंबित **** प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बेरोजगार युवक-युवतींना लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात रोजगार मोहिम सुरू करणार असल्याची माहिती, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुनगंटीवार यांनी काल राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वनाधिकारी यांच्याशी दूर दृष्य संवाद प्रणाली मार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी मुद्रा योजनेअंतर्गत देशभरात तीन लाख कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यातील अधिकाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळवता यावा, यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न आणि सूक्ष्म नियोजन करावं, प्रत्येक जिल्ह्यात मुद्रा बँक समन्वय समितीमध्ये अशासकीय सदस्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या. **** केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सर्व २० प्रादेशिक भाषांमधून घेण्यात यावी, असे निर्देश, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं, केंद्रीय शिक्षण मंडळाला दिले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, प्रकाश जावडेकर यांनी काल ट्वीट करून ही माहिती दिली. केंद्रीय अभ्यास मंडळानं यापूर्वी ही परीक्षा प्रादेशिक भाषामधून न घेता फक्त तीन भाषांमधून घेण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयावर अनेक राज्यांमधून टीका झाली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षात संशोधनावर भर दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन झाल्याचा दावा जावडेकर यांनी केला आहे. नवी दिल्लीत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय पोषण आहार योजनेची तरतूद वाढवण्यात आली असून, भारतीय व्यवस्थापन संस्थांना स्वायत्तता देण्यात येणार असल्याची माहीतीही जावडेकर यांनी दिली. **** उघड्यावर शौचापासून मुक्त गावांचं प्रमाणीकरण जून अखेरपर्यंत पूर्ण करावं, अशी सूचना, केंद्रीय पाणी पुरवठा, आणि स्वच्छता विभागाचे सचिव, परमेश्वर अय्यर यांनी केली आहे. मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उघड्यावर शौचापासून मुक्ती, स्वच्छता या क्षेत्रात महाराष्ट्राचं काम देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. **** मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार मंदिराचे सध्याचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. **** डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात माल वाहतूकदारांनी कालपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्यानं इंधन दरवाढ करण्यात आल्याचं कारण सरकार देत आहे. मात्र प्रत्यक्षात सरकारी करांमुळे ही दरवाढ झाल्याची टीका ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी केली आहे. **** नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा खरेदी होण्यापूर्वीच खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना सर��कट दोन हजार ५०० रूपये फरकाची रक्कम देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर इथं तूर आणि हरभरा खरेदीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं ते म्हणाले. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली. यात दहा नेते तर १२ सरचिटणीसांचा समावेश आहे. नेत्यांमध्ये माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दीपक पायगुडे, जयप्रकाश बावीस्कर, यांचा तर सरचिटणीसांमध्ये आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, शालिनी ठाकरे आदींचा समावेश आहे. **** बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या या परीक्षेची विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत काल संपणार होती, मात्र ही मुदत पुढच्या सोमवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** वर्धा- यवतमाळ -नांदेड या नवीन रेल्वेमार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून, येत्या पंधरा दिवसात रेल्वेच्या कळंब ते यवतमाळ दरम्यान रुळ टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या माती कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी काल वर्धा- नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. **** बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी, बीड जिल्ह्याच्या माजलगाव इथल्या दोन महिला डॉक्टरांच्या रुग्णालयातलं गर्भापात आणि कुटुंब कल्याण केंद्र निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्यात येत असून समितीचा अहवाल आल्यानंतर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असं ते म्हणाले. **** ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथं बोलत होते. शेतमालाला हमीभावासाठी अनुकुल निर्यात धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवत असल्याचं ते म्हणाले. **** यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी काल कोल्हापूर इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप असून, येत्या २६ तारखेला, शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तो प्रदान करण्यात येईल. **** लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना उद्या बुधवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संसदेच्या अधिवेशन काळात शंभर टक्के उपस्थिती लावून प्रत्येक चर्चेत सहभाग नोंदवला, त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. **** नांदेड जिल्ह्यातल्या चार तालुक्यांना सोयाबीन पिक विम्यातून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनानं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना देण्यात आलं. **** हिंगोली नगरपरिषदेनं प्लॉस्टिक बंदी विरोधात काल मोहीम राबवत सहा क्विंटल ७० किलो प्लॉस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यापाऱ्यांकडून सहा हजार चारशे रूपयांचा दंडही वसूल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं काल दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला. सहा आणि आठ वर्ष वयाची ही दोन्ही मुलं, स्वच्छतेसाठी तलावात उतरली होती. **** सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत, लातूर जिल्ह्यात सक्रीय क्षय रुग्ण शोध मोहिमेच्या पहिल्या फेरीस कालपासून सुरुवात झाली. यावेळी आशा कार्यकर्ती यांना उपस्थित मान्यवराच्या हस्ते सक्रीय शोध मोहिमेचं साहित्य वितरीत करण्यात आलं. ३० जून पर्यंत हे अभियान सुरू असेल. **** अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बीड जिल्हा सत्र न्यायालयानं, आरोपीला बारा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती. **** राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, पाशा पटेल यांची भारतीय जनता पक्षाच्या अखिल भारतीय किसान मोर्चाचे गुजरात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाशा पटेल हे अखिल भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. **** नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातल्या नागरी सुविधांची कामं त्वरीत सुरु करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 March 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि. ****
• सैनिक पत्नींचं अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परीषदेत गदारोळ, कामकाज तहकूब • कांदा आणि तूर डाळीच्या हमी भावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवन परिसरात आंदोलन • नक्षलवाद्यांना मदत करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन.साईबाबा याच्यासह चार जणांना आजन्म कारावासाची शिक्षा आणि • दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ७५ धावांनी विजय **** सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल आमदार प्रशांत परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी काल दुसऱ्या दिवशीही विधान परीषदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली. परिचारक यांचं सदस्यत्व रद्द केलं जात नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू दिलं जाणार नाही, असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं. परिचारक यांचं वक्तव्य निंदनीय असून, याचं समर्थन कोणीच करु शकत नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यासंदर्भात सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या गट नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत चिंता व्यक्त करत, कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान, आमदार परिचारक यांनी वकिलाच्या माध्यमातून महिला आयोगासमोर बिनशर्त माफी मागितली आहे. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.   **** अंमली पदार्थ तस्करांविरोधात विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेला आणखी मनुष्यबळ आणि विशेष पोलीस ठाणं देण्यात येईल असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार  झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी दिली. तर जलयुक्तचं काम उत्कृष्ट असून काही ठिकाणी कागदावरच काम झाल्याचा आरोप विरोधी पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी केला. बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत काल एकमतानं मंजूर झालं. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या महापौरांच्या निवासस्थानी हे स्मारक उभारण्यात येणार आहे.   **** कांदा आणि तूर डाळीला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल विधान भवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी शेट्टी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांनी यावेळी कांदा आणि तूर डाळ रस्त्यावर फेकली. **** नक्षलवाद्यांना मदत करत असल्याच्या संशयावरुन तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन.साईबाबा याच्यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी आणि पांडू नरोटे यांना काल गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. यातील अन्य एक आरोपी, विजय तिरकी याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतल्या युवा कार्यकर्त्यांना तयार करणं, त्यांना गडचिरोलीतल्या जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणं, माओवादी कट्टर विचारांचा प्रसार करणं या आरोपाखाली साईबाबाला  २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, सीडी, कागदपत्रे, व्हिडिओ टेप, माओवादाचं प्रसार साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं होतं. **** सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं झालेल्या गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी काल बेळगाव इथं अटक केली. म्हैसाळ इथल्या गर्भपात केंद्रावर छापा टाकल्यानंतर तिथे १९ भ्रूण पुरलेले आढळल्याप्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर खिद्रापुरे तीन दिवसांपूर्वी फरार झाला होता. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी पाच डॉक्टर आणि तीन दलाल कार्यरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. खिद्रापुरे याला मिरजच्या न्यायालयानं १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. **** आधार क्रमांक मिळेपर्यंत इतर कोणत्याही ओळखपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असं सरकारनं काल स्पष्ट केलं. कोणत्याही व्यक्तीला केवळ त्याच्याकडे आधार क्रमांक नाही म्हणून त्याला सरकारी योजंनाच्या लाभांपासून वंचित ठेवता येणार नाही, असं यासंदर्भात काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. शासकीय योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ ���ेण्यासाठी तसंच यंत्रणेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारनं कल्याणकारी योजना आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून सरकारनं काल हे स्पष्टीकरण जारी केलं आहे. **** आज जागतिक महिला दिन. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज देशातल्या ३१ महिलांना २०१६ चा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहेत. महिला सशक्तीकरणाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. मराठवाड्यातही जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठवाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत एक हजार पाचशे कोटी रूपयांपर्यंतची कामं करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. औरंगाबाद विभागात ६ मार्च ते १२ मार्च या कालावधीत मनरेगा सप्ताह साजरा केला जात आहे. आज या सप्ताहांतर्गत महिला दिनानिमित्त मराठवाड्यातल्या सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. गुरूवारी सर्वसाधारण सभाही घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सागितलं. **** उस्मानाबाद इथं होणारं ९७वं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे संमेलन आता २१, २२ आणि २३ एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी ते सात ते नऊ एप्रिलदरम्यान होणार होतं. नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे वेळापत्रक पाहता स्थानिक नाट्यप्रेमी कलाकारांना या संमेलनात सहभागी होण्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून हे संमेलन पुढे ढकललं असल्याचं त्यांनी सांगितलं. **** ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचं काल पुण्यात एका खाजगी दवाखान्यात निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात पुद्दुचेरी इथं व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आग्रा, कानपूरची भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. कुलगुरू म्हणून काम करत असताना त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. परदेशातल्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन उच्च शिक्षणाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी या काळात केलं. **** बंगळुरु क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत काल एक-एक अशी बरोबरी साधली. कसोटी सामन्यात एका डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम पंचविसाव्या वेळेस करणारा रविचंद्रन अश्विन, फलंदाज के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे या विजयाचे शिल्पकार ठरले. भारतीय संघानं पहिल्या डावात १८९ तर दुसऱ्या डावात २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात २७६ करत भारतावर ८७ धावांची आघाडी घेतली होती. मात्र आर अश्विनच्या फिरकी माऱ्यापुढे त्यांचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांमध्ये आटोपला. **** राज्यात काल दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. भ्रमणध्वनीच्या मदतीनं प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार लक्षात घेता केंद्र संचालक आणि परिरक्षकांशिवाय अन्य व्यक्तींना भमणध्वनी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कालच्या पहिल्या दिवशी या परीक्षेत नकला करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं. **** युपीआय हे मोबाईल बँकींगचे ॲप्लीकेशन वापरून फसवणूक करण्याचे एक हजार २१४ प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. हा प्रकार महाराष्ट्र बँकांच्या शाखांमध्ये घडला असून यामाध्यमातून ९ कोटी ४३ लाख रूपयांचा व्यवहार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या ॲप्लीकेशनमध्ये एक लाख रूपये कर्ज काढण्याची सुविधा असून तिचा वापर करून सायबर भामट्यांनी या महाराष्ट्र बँकेतून पैसे काढले आणि ते एचडीएफसी बँकेत भरले. बँकेच्या नोटीसा आल्यानंतर खातेदारांच्या लक्षात हा प्रकार आला, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. **** महाराष्ट्र विकास आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांनी युती करून लातूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काल लातूर इथं या दोन पक्षांची संयुक्त जाहीर सभा झाली. यावेळी बोलतांना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असद्दुदिन ओवेसी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवल्यामुळे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह भाजप आणि इतर राजकीय पक्षावर टिका करत, आपल्याला  धर्मनिरपेक्षता शिकवू नये असं सांगितलं. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील, ताहेर सय्यद, आणि बसवंत उबाळे यांची भाषणे झाली. //*******//
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 6 March 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ६ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत प्रारंभ झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरूवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्यानंतर त्यांनी चार अध्यादेश आणि तीन शासकीय विधेयकं मांडली. विधानसभेतल्या माजी सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला अनुमोदन दिलं. दरम्यान, राज्य विधान परिषदेचं कामकाज कागदरहित करण्यात येणार असून, सदस्यांना टॅबलेट देण्यात येणार असल्याचं, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. या टॅबलेटच्या माध्यमातून सर्व सदस्य तारांकीत प्रश्न, समितीचे अहवाल पाहू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘ड��जिटल इंडिया’ या उपक्रमाकडे, ही एक वाटचाल असल्याचं निंबाळकर म्हणाले.     **** राज्याच्या सीमा भागात अवैधरीत्या गर्भपात करुन, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या वैद्यांचा शोध घेण्यासाठी, राज्य सरकार कर्नाटक सरकारसोबत संयुक्त मोहिम राबवणार आहे. आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्र-  कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात, एका रुग्णालयाच्या परिसरात १९ मृत अर्भकं सापडल्यानंतर, सीमेपलिकडे अवैधरित्या गर्भपात होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. म्हैसाळ इथं गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, त्याठिकाणी अवैध गर्भपात होत असल्याचं समोर आलं. या प्रकरणातला आरोपी डॉक्टर फरार असून, त्याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. **** विमुद्रीकरणामध्ये बंदी घालण्यात आलेलं चलन भारतीय रिझर्व्ह बँक नियमानुसार जमा करून घेत नसल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली असून, बंद करण्यात आलेलं हे चलन ३१ मार्चपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँक जमा करून घेईल, असं सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र प्रत्यक्षात बँक हे चलन जमा करून घेत नसल्याची तक्रार, या याचिकेत करण्यात आली आहे. यावर न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला आपलं म्हणणं दाखल करण्यास सांगितलं आहे. या याचिकेची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे.   **** महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र - दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होत आहे. यंदा या परीक्षेला राज्यातल्या २१ हजार सहाशे शहाऐंशी शाळांमधून, १७ लाख ६६ हजार ९८ विद्यार्थी बसले आहेत. यासाठी चार हजार सातशे अठ्ठावीस परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी, आज पुणे इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. परीक्षा काळात गैरव्यवहार रोखण्यासाठी २५० भरारी पथकं नेमण्यात आल्याचं ते म्हणाले.   दरम्यान, गेल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली, त्याचा पोलिसाच्या सायबर विभागामार्फत तपास सुरू असून यापुढे अशा बाबतीत परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवरही नजर ठेवली जाणार असल्याचं म्हामणे यांनी सांगितलं. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसरा दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात चार गडी बाद २१३ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा ७९ तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे शहात्तर धावांवर संपुष्टात आला असून, सध्या भारत १२६ धावांनी आघाडीवर आहे. **** पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर इथं झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं प्रथम क्रमांक पटकावला. आज झालेल्या अंतिम फेरीत नांदेड विद्यापीठाच्या संघानं मुंबई विद्यापीठाच्या संघाचा दोन गुणांनी पराभव केला. नांदेड संघानं सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. **** संशोधनासाठी गणित हा विषय महत्वाचा असल्याचं, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित, आंतरराष्ट्रीय गणित परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत, देश विदेशातले जवळपास २७० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यावेळी दक्षिण कोरियाचे डॉक्टर जे.एम.किम यांनी, ही परिषद गणितातल्या संशोधनासाठी भविष्यकाळात अत्यंत महत्वाची आणि उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते, मराठवाड्यातल्या बालाघाट मॅथेमॅटीक सोसायटीचे जेष्ठ सदस्य बी सी ढगे आणि जे एन साळुंके यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेच्या निमित्तानं आलेल्या शोध निबंधाच्या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. ****
0 notes