Tumgik
#गैरहजेरीत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
निर्णायक कसोटीत भारत घेणार धाडसी निर्णय; रोहितच्या गैरहजेरीत मयंक नव्हे दिग्गज करेल ओपनिंग
निर्णायक कसोटीत भारत घेणार धाडसी निर्णय; रोहितच्या गैरहजेरीत मयंक नव्हे दिग्गज करेल ओपनिंग
निर्णायक कसोटीत भारत घेणार धाडसी निर्णय; रोहितच्या गैरहजेरीत मयंक नव्हे दिग्गज करेल ओपनिंग IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. एजबॅस्टन येथे गेल्या वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील पाचवा सामना यावर्षी पूर्ण केला जाईल. पण त्यापूर्वी भारतीय संघासमोर मोठी डोकेदुखी म्हणजे प्लेइंग इलेव्हन निवडणे आहे, विशेषतः जेव्हा कर्णधार रोहित शर्माच्या…
View On WordPress
0 notes
aksharkshudha · 2 years
Photo
Tumblr media
सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. #calligraphymarathi #calligraphylove #devanagaricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/CdctbDBjQg9/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेल्या १२४ व्या घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी  यवतमाळ इथं सुरू असलेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप  पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणीसाठी शंभर रुपये देणगी शुल्क आकारण्याचा निर्णय  ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव आणि  खेलो इंडिया स्पर्धेत एकूण ११६ पदकं जिंकत महाराष्ट्राचं वर्चस्व कायम ***** आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेल्या १२४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाला आता कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. लोकसभेत ३२३ जणांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ आणि तीन खासदारांनी विरोधात तर राज्यसभेत १६५ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर ७ जणांनी विरोधात मतदान केलं. या कायद्यातल्या तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि शासकीय नोकरीत दहा टक्के जागा राखीव असतील. **** पारदर्शी व्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरु असून, गेल्या चार वर्षात विकास कामांना गती मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसनं शेतकऱ्यांचा मतपेटी म्हणून वापर केला, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना, भाजप सरकारनं सामाजिक समानतेबरोबरच आर्थिक समानताही आणल्याचं नमूद केलं. देशाच्या सुरक्षेला, महिला सक्षमीकरणाला सरकारनं प्राधान्य दिल्याचं सांगतानाच गेल्या चार वर्षात दहशतवाद, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचंही ते म्हणाले. **** भारताची धोरणं ही व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीनं पुरक असल्यानंच संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल २५ व्या भागिदारी शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उदारीकरण - खाजगीकरण - जागतिकीकरण ही सध्याची महत्वाची सूत्र असून, त्यामुळे जग अधिक जवळ आलं आहे, असं ते म्हणाले. **** मतदानाच्या आधी ४८ तास निवडणूक प्रचार आणि डिजिटल माध्यमांच्या उपयोगावर प्रतिबंध लावण्याबाबत विचार करण्यासाठी निवडणूक आयोगानं नियुक्त केलेल्या समितीनं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. डिजिटल माध्यमाच्या प्रभावामुळे मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद करणं अवघड होत असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेवर दुष्परिणाम होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. कायद्याच्या उपाययोजनांबरोबरच सर्व राजकीय पक्ष, तसंच निवडणुकीसंबंधित इतर घटकांनीही सातत्यानं प्रयत्न करुन यावर उपाययोजना करण्याची गरज आयोगानं व्यक्त केली. **** यवतमाळ इथं सुरू असलेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. या संमेलनात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. संमेलनात काल, “माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?” तसंच “कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का” या विषयावर परिसंवाद घेण्यात आले. याशिवाय काल आयोजित वऱ्हाडी बोली कवी संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करताना शंभर रुपये देणगी शुल्क आकारलं जाणार आहे. आतापर्यंत ही सुविधा मोफत होती. या नव्या देणगी आकारणीमुळे मंदिर समितीला वर्षाला १५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. वर्षभरात सुमारे १५ लाख भाविक ऑनलाईन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेतात. मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शन, महाप्रसाद आणि राहण्याची सुविधा माफक दरात उपलब्ध करुन देणं शक्य होणार आहे. मात्र, मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या गैरहजेरीत सहअध्यक्षांनी हा निर्णय घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांनी घडवलेल्या सुरूंग स्फोटात वीरमरण आलेले पुण्याचे मेजर शशीधरन नायर यांचं पार्थिव काल पुण्यात आणण्यात आलं. घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली. नायर यांनी आपल्या ११ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक धाडसी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. आज सकाळी दहा वाजता पुणे इथं नायर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. **** राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच�� जयंती काल सर्वत्र साजरी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी, तर परभणी महानगरपालिकेत महापौर मीना वरपुडकर यांनी, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. पाथरी तालुक्यातल्या तुरा इथं जिजाऊ जयंतीनिमित्त महिला बचट गट मेळावा घेण्यात आला तर जालना इथं जिजाऊ जयंतीनिमित्त दुचाकी फेरी काढण्यात आली. लातूर जिल्ह्यात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. उस्मानाबाद इथं जिजाऊ आणि विवेकांनद यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५३ जणांनी रक्तदान केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठींबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. या नगरसेवकांनी पक्षादेशाचा भंग केल्यानं ही कारवाई केल्याचं या आदेशात म्हटलं आहे. **** हैदराबाद प्रांताचा समग्र इतिहास लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांनी म्हटलं आहे. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन च्या वतीनं औरंगाबाद इथं काल आयोजित हैदराबाद मुक्तीची संघर्षमय गाथा, या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या सह अनेकांनी हैदराबाद प्रांताच्या इतिहास लेखनाचा प्रयत्न केला, मात्र ते कार्य पूर्ण होऊ शकलं नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. **** भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतासमोर २८९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. रोहीत शर्माच्या १३३ धावांच्या खेळीनंतरही भारतीय संघ निर्धारित षटकात नऊ बाद २५४ धावांच करू शकला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी घेतली आहे. **** पुणे इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया या युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं ४१ सुवर्ण , ३३ रौप्य आणि ४२ कांस्य पदकांसह एकूण ११६ पदकं जिंकत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. काल या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण आणि जिम्नॅस्टिक या प्रकारात प्रत्येकी चार सुवर्णपदकं पटकावली. दिल्लीचा संघ एकूण ८३ पदकांसह दुसऱ्या तर हरियाणाचा संघ एकूण ९० पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. **** राज्यभरात काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र महास्वच्छता फेऱ्या काढण्यात आल्या. लातूरमध्ये सरस्वती विद्यालयातून निघालेल्या महास्वच्छता फेरीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन इटणकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. शाळांनी मूल्यशिक्षणासोबतच स्वच्छतेचं महत्त्व सांगण्याचं आवाहन त्यांनी केलं. औरंगाबाद शहरातही अशाच स्वरूपाची महारॅली काढण्यात आली. जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महास्वच्छता अभियान प्रभात फेरीचा शुभारंभ केला. स्वच्छता अभियान घरापुरतं मर्यादीत न ठेवता त्याला व्यापक स्वरुप देण्याची गरज खोतकर यांनी व्यक्त केली. नांदेड इथं काल महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा उत्सव साजरा करण्यात आला. शहरातल्या गुजराती शाळेपासून निघालेल्या स्वच्छता फेरीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. **** धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी आज धर्माबाद ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते मनमाड दरम्यान ही गाडी निर्धारित वेळेनुसार धावणार आहे. मनमाडहून धर्माबादकडे येणारी गाडी चार तास दहा मिनीटं उशीरा धावत असल्यामुळे, ती नांदेड ते धर्माबाद दरम्यान रद्द करावी लागत असल्याचं, दक्षिण मध्ये रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं सांगितलं आहे. ***** ***
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नांदेडमधील नुकसानीच्या पाहणीसाठी पवारांची धाव; पण अशोक चव्हाणांची पाठ
नांदेडमधील नुकसानीच्या पाहणीसाठी पवारांची धाव; पण अशोक चव्हाणांची पाठ
नांदेडमधील नुकसानीच्या पाहणीसाठी पवारांची धाव; पण अशोक चव्हाणांची पाठ अजित पवार यांचा विरोधी बाकावर आल्यानंतरचा पहिला नांदेड दौरा चव्हाणांच्या गैरहजेरीत पार पडला. -संजीव कुळकर्णी जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात प्रचंड हानी झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही भागातील नुकसानीची शनिवारी पाहणी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी परिवाराच्या व्यथा त्यांनी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही
बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही
बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही Virat Kohli vs James Anderson: भारत आणि इंग्लंड पाचव्या निर्णायक कसोटी सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराहकडे संघाची धुरा असेल, तर सर्वांचे लक्ष स्टार फलंदाज विराट कोहलीवर असेल. याशिवाय यजमान इंग्लंडला त्यांचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनकडून मोठ्या अपेक्षा असतील.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 March 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ मार्च २०१७ दुपारी १.००वा. ***** भारतानं बॉर्डर गावसकर चषक जिंकला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं झालेला अखेरचा सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. सामन्याच्या आज चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज लोकेश राहुल आणि मुरली विजयनं कालच्या बिनबाद १९ धावसंख्येवरून पुढे खेळ सुरू केला. मुरली विजय आठ धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. मात्र विराट कोहलीच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य राहणेच्या साथीनं लोकेश राहुलनं अर्धशतक झळकावत, भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतानं ही मालिकाही दोन एक अशा फरकानं जिंकली. भारताचा हा सलग सातवा कसोटी मालिका विजय आहे. या मालिकेत फलंदाजी तसंच गोलंदाजीत उत्तम कामगिरी करणारा रवींद्र जडेजा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उमेश यादव, स्टीव्ह स्मिथ यांना प्रायोजकांचा विशेष खेळाडू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि एक दशलक्ष डॉलर्सचा धनादेश प्रदान करण्यात आला. **** अल्पसंख्याक आयोगासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग आयोगातल्या रिक्त जागांच्या मुद्यावरून राज्यसभेचं कामकाज आजही दुपारी साडे बारा वाजेपर्यंत तीन वेळा आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देशवासियांना आज गुढीपाडवा, उगादी, चेटीचंडसह नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दिव्यांगांसाठी सार्वभौम ओळखपत्र तयार करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. दिव्यांगांसाठीच्या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देशभरात हे ओळखपत्र स्वीकार्य असेल, असं त्यांनी सांगितलं. देशभरात अर्धसैनिक दलातल्या सैनिकांना अत्याधुनिक उपकरणं देण्यात येत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ते लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. **** जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून सुरक्षा जवानांनी इथं शोधमोहीम सुरू केली, त्यादरम्यान, दहशतवाद��यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला, त्याला सुरक्षा जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या परिसरात सुरक्षा जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या कारवाईत एक जण मारला गेला. **** पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काल रात्री लागलेल्या आगीत रासायनिक प्रयोग शाळेची दहा हजार चौरस फुट क्षेत्रफळावर उभी इमारत जळून खाक झाली. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. **** शिर्डीच्या साईमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चालण्यातून वीज निर्मिती केली जाणार आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली. या फ्लोअर तसंच सौर प्रकल्पाच्या माध्यमातून दहा मेगावॅट वीज निर्मिती होणार असल्याचं, हावरे यांनी सांगितलं. मंदिरात वाहिलेल्या गुलाब फुलांपासून बचत गटांच्या माध्यमातून अगरबत्ती बनवली जाणार असल्याची माहिती हावरे यांनी दिली. मंदिरात रोखरहित व्यवहारांसाठी साई वॉलेट योजना सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर महाराष्ट्र चालत असून मानवता धर्म जिवंत ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आळंदी इथल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेसाठी राज्य शासनाच्यावतीनं एक कोटी रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली. ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यावेळी उपस्थित होते. या संस्थेत मिळणारं, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारं दर्जेदार शिक्षण समाजासाठी उपयुक्त असल्याचं हजारे यांनी नमूद केलं. **** राज्य शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने २०१५-२०१६ साठीचे विविध साहित्य पुरस्कार काल मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. लातूर इथले डॉ. अंबादास देशमुख यांना गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. **** लातूर इथं हिंदू नववर्षाचं विविध सामाजिक संस्था, मंडळांनी मिरवणुका काढुन जल्लोषात स्वागत केलं. शहरातल्या दक्षिणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात मराठी संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या मंगलध्वज परिक्रमेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैद्यनाथ मंदिरापासुनही शोभा यात्रा काढण्यात आली. //*******//
0 notes