Tumgik
#जीवशास्त्र
darshaknews · 2 years
Text
लखनौ:- प्रादेशिक विज्ञान शहर हे विज्ञानाचे असे केंद्र आहे जिथे मुले खेळ आणि खेळातून विज्ञानातील बारकावे शिकतात.
लखनौ:- प्रादेशिक विज्ञान शहर हे विज्ञानाचे असे केंद्र आहे जिथे मुले खेळ आणि खेळातून विज्ञानातील बारकावे शिकतात.
प्रादेशिक विज्ञान शहर अलीगंज, लखनौ येथे स्थित आहे, जे सुमारे 9 एकरमध्ये पसरलेले आहे. त्याची स्थापना 1989 मध्ये झाली आणि तिची दुसरी गॅलरी 2007 मध्ये स्थापन झाली. यात सुमारे 9 गॅलरी आणि 2 विज्ञान उद्यान आहेत. हे क्षेत्रीय विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. या सायन्स सिटीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे येथे विज्ञानाचे संपूर्ण ज्ञान आहे. सहज शिका. प्रादेशिक विज्ञाननगरीत दूरदूरच्या शाळांचे विद्यार्थी…
View On WordPress
0 notes
nandedlive · 10 months
Text
Career in Agriculture Sector | शेतकऱ्यांच्या पोरांनो! शेतीचा अभ्यास करूनही मिळताहेत लाखोंच्या नोकऱ्या; जाणून घ्या योग्यता
Tumblr media
Career in Agriculture Sector | काळानुसार कृषी क्षेत्रातील शक्यता वाढल्या आहेत. आधुनिक शेतीमुळे तरुणांसाठी सुवर्ण भविष्याची दारे खुली झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. तरुणाईचा कलही या क्षेत्राकडे वाढला आहे. आजकाल कृषी क्षेत्रातील अनेक कोर्सेस टॉप ट्रेंडमध्ये आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हीही कृषी क्षेत्रात (Career in Agriculture Sector) लाखोंची नोकरी मिळवू शकता. शेतीतील करिअरमधून मोठी कमाई देशातील मोठी लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. वैज्ञानिक शेतीमुळे शेतकरी स्वावलंबी होत आहेत. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही ते प्रभावी ठरते. शेतकरी आपल्या शेतातील माती इत्यादी तपासल्यानंतरच शेतीमध्ये किती प्रमाणात खते टाकायची हे ठरवत आहेत. ठिकठिकाणी कृषी विज्ञान केंद्रे उघडण्यात आली असून शेतातील माती इत्यादीचे आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासले जात आहे. अशा परिस्थितीत कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फलोत्पादन, अन्न आणि गृहविज्ञान अशा कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेऊन तुम्ही तुमचे करिअर वाढवू शकता. कृषी क्षेत्रातील विपणन आणि व्यवस्थापन क्षेत्रातही चांगले करिअर करता येते. हे विशेष अभ्यासक्रम आहेत - कृषी भौतिकशास्त्र - शेती व्यवसाय - वनस्पती पॅथॉलॉजी - वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी - वृक्षारोपण व्यवस्थापन येथून कोर्स करा - भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली - भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था - राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था - अलाहाबाद कृषी संस्था - इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ - जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ - भारतीय कृषी संशोधन संस्था योग्यता काय आहे? तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शास्त्रज्ञ होण्यासाठी बीई किंवा डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर करावे लागते. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संबंधित विषयात स्पेशलायझेशन असावे. कृषी क्षेत्रात भरपूर नोकऱ्या तरुणांना दरवर्षी कृषी क्षेत्रात रोजगाराच्या सर्व संधी मिळतात. ICAR भारतीय कृषी संशोधन परिषदेत दरवर्षी नोकरीची संधी उपलब्ध असते. UPSC कृषी तज्ञाच्या नियुक्तीसाठी परीक्षा घेते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही शेतीशी संबंधित इतर क्षेत्रातील नोकऱ्या शोधू शकता. अनेक कंपन्या कृषी पदवीधरांना नोकऱ्या देतात. हे पदवीधर शेतकर्‍यांना बँकेतील किसान क्रेडिट कार्ड, कर्ज आदी कामात मदत करू शकतात. शेतीचा अनुभव असलेली व्यक्ती बँकेत फील्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी चांगली मानली जाते. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
 ·      ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी तर सिनेमागृहातले खाद्यपदार्थ तसंच कर्करोगाच्या औषधांवरील करात कपात
·      विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली
·      काँग्रेस पक्षाकडून येत्या सप्टेंबर महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा
·      औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण वाढवण्याचे प्रशासनाचे निर्देश
·      चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारत अव्वल स्थानी
आणि
·      बांग्लादेशासोबत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी
****
ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात विविध वस्तुंवरचा कर वाढवण्यात आला आहे. ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत, कॅसिनो यावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य, एलडी स्लॅग, कच्चे किंवा तळलेले, वाळवलेले चिप्स तसंच तत्सम पदार्थ, आणि सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. कर्करोगाशी लढणारी औषधं, दुर्मीळ आजारांवरील औषधं, यासह खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सात अपिलीय न्यायाधीकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्तानं विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी, मुनगंटीवार यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे "होन" काढले होते. या होनाची प्रतिकृती असलेलं विशेष नाणं साडे तीनशेव्या राज्यभिषेक दिनाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राज्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
****
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमुळे, ही नियुक्ती दोन वर्षांपासून होत नव्हती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती, त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. या प्रकारात राज्यपालांनी घटनेचं उल्लंघन केल्याचा दावा करत, ठाकरे सरकारची यादीच कायम ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयानं दिली, तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्यानं याचिका दाखल करायला सांगितलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वीसहून अधिक याचिकांवर, काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री, खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे तांदळाची किरकोळ दरवाढ रोखता येणं शक्य होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते येत्या सप्टेंबर महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढणार असल्याची माहिती, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली. ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, याविरुद्ध काँग्रेस लढा देत राहील, असा इशारा वेणुगोपाल यांनी यावेळी दिला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रिजर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी काल मुंबईत खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलतांना, जागतिक स्तरावर होत असलेल्या काही नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँका���नी चांगली कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात बँकांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे, असंही दास म्हणाले.
****
जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यानं वापर करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक परिषदेचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांना काम करावंच लागेल, मात्र त्याचवेळी सर्वोत्तमही रहावंच लागेल, आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे, असं मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
कोल्हापूर इथल्या चित्रनगरीतली विकास कामं वेगानं मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश, मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या चित्रनगरीतल्या प्रस्तावित विकास कामात बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, वसतीगृहं, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडियो अशी चित्रीकरण स्थळं, तसंच अंतर्गत रस्ते, वीज तसंच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि पर्यटन स्थळंही या चित्रनगरीत विकसित करण्यात येणार आहेत.
****
जी-20 च्या डब्ल्यू-20 उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात, शिरगाव इथं येत्या १५ जुलैला, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत, महिलांसाठी प्रशिक्षण आणि परिषद आयोजित केली आहे. ‘महिला विकासांतर्गत-तळागाळातल्या महिलांचं नेतृत्त्व हा त्याचा मुख्य विषय आहे. ‘डिजिटल मार्केटिंग’ संदर्भातल्या कार्यशाळेचं आयोजन ही यावेळी करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यल्प असून, ते वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा, मीना यांच्या हस्ते काल गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ.विवेक कांबळे यांना प्रथम, डॉ.सतीश साबळे यांना द्वितीय, आणि डॉ.हश्मी यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उस्मानाबाद इथं गुणगौरव कार्यक्रम झाला. यावेळी कुटुंब नियोजनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकेचा प्रथम पुरस्कार रहिमुन्निसा शब्बीर शेख, द्वितीय क्रमांक डीग्री इथल्या दैवता सोनकांबळे, तर तृतीय पुरस्कार अणदूर इथल्या इंदुबाई कबाडे यांना प्रदान करण्यात आला. एकूण १७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प अंतर्गत मानचिन्ह आणि प्रामाणपत्र देवून गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत कर्ज प्रकरण घोटाळा उघडकीस आला आहे. यासंदर्भात शहरातल्या सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत. बहुतांश कर्जदारांकडून अपूर्ण स्थितीतले कर्ज मागणी अर्ज स्वीकारल्याचं, कर्जदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणाची पडताळणी न केल्याचं तसंच बहुतांश कर्ज प्रकरणात तारण न ठेवता कर्ज वाटप केल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये १०८ कर्जदारांचा सहभाग असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदकं जिंकत, भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या विज्ञान ऑलिंपियाडच्या राष्ट्रीय समन्वयकांनी, ही माहिती दिली. भारताच्या चारही विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली आहे. या स्पर्धकांमध्ये जालन्याचा मेघ छाबडा, बेंगलुरुचा ध्रुव अडानी, कोट्याचा इशान पेडणेकर आणि छत्तीसगढ मधल्या रिसालीचा रोहित पांडा यांचा समावेश आहे. या स्पर्धेत शहात्तर देशांमधल्या दोनशे त्र्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतासोबतच सिंगापूरनंही या स्पर्धेत चार सुवर्णपदकं मिळवली असून, भारत पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.
****
बांग्लादेशासोबत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामनाही जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. काल ढाक्यात झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद ९५ धावा केल्या. ९६ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला बांग्लादेशाचा संघ ८७ धावातच तंबूत परतला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं सात गडी राखून जिंकला होता. तिसरा आणि अंतिम सामना उद्या होणार आहे.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल या जोडीने नेदरलँडचा डेविल पेल आणि अमेरिकेचा रीज स्टॅल्डर या जोडीचा सात - पाच, चार - सहा, सात - सहा असा पराभव केला.
****
आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात २१ वर्षांखालच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा खेळाडू पार्थ साळुंके, याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत दोन्ही विद्यापीठामध्ये तांत्रिक आणि शास्त्रीय ज्ञानाची देवाण घेवाण करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा अभियानाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानातून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या, तसंच सरळ सेवा परिक्षांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून, यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नाही. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नांदेड डॉट स्पर्धा मिशन डॉट कॉम या लिंकवरून अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभागानं अर्ज मागवले आहेत. यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अवॉर्ड्स डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्जच विचारात घेतले जाणार असून, या पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै ही असल्याचं औरंगाबाद जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या तुळजाभवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्र���त शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. अठरा ते चाळीस वर्षं वयोगटातल्या दिव्यांग, मूकबधीर तसंच मतिमंद व्यक्ती यासाठी प्रवेश घेऊ शकतात. या संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाची सोय विनामूल्य करण्यात येते. यासाठी इच्छुक असलेल्यांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत या केंद्राशी संपर्क करावा, असं आवाहन तुळजा भवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या कर्मशाळा अधीक्षकांनी केलं आहे.
****
पूर्णा ते तिरुपती विशेष रेल्वेगाडी काही दिवस अंशत: रद्द करण्यात आली आहे. तिरुपती रेल्वे स्थानकावर काम सुरू असल्यानं, पूर्णा-तिरुपती विशेष गाडी येत्या १७, २४, ३१ जुलै आणि सात ऑगस्ट या दिवशी रेणीगुंठ्यापर्यंतच धावणार असून, रेणीगुंठा ते तिरुपती दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर, तिरुपती-पूर्णा विशेष गाडी येत्या १८, २५ जुलै तसंच एक आणि आठ ऑगस्टला रेणीगुंठ्याहून सुटणार असून, तिरुपती ते रेणीगुंठा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
केंद्र सरकार पुरस्कृत ‘नव साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ औरंगाबाद जिल्ह्यातल्या, १५ वर्षांहून अधिक वयोगटातल्या निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उद्यापासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत येणारे शैक्षणिक प्रवाह तसेच इतर शिक्षणाच्या संधी याची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केलं आहे. पाठक यांनी काल लोहारा आणि उमरगा तालुक्यातल्या महाविद्यालयांना सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
MHT CET निकाल 2022 अद्यतने पीसीएम पीसीबी स्कोअरकार्ड कसे आणि कोठे डाउनलोड करावे cetcell mahacet org
MHT CET निकाल 2022 अद्यतने पीसीएम पीसीबी स्कोअरकार्ड कसे आणि कोठे डाउनलोड करावे cetcell mahacet org
पीसीएम आणि पीसीबी अद्यतनांसाठी एमएचटी सीईटी निकाल 2022: महाराष्ट्र राज्य सामरिक प्रवेश आव्हानाचा (१५ सप्टेंबर) ला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीबीसी) या विषयासाठी आज निकाली निकाल लागला आहे. cetcell.mahacet.org. या अधिकृत साइटवर मार्कशीट डाउनलोड करा. पीसीएम गटासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान आयोजित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
MHT CET Admit Card: MHT-CET PCM चं ॲडमिट कार्ड आज जारी होणार! समजा ॲडमिट कार्डात चुका झाल्या तर…? वाचा
MHT CET Admit Card: MHT-CET PCM चं ॲडमिट कार्ड आज जारी होणार! समजा ॲडमिट कार्डात चुका झाल्या तर…? वाचा
MHT CET Admit Card: MHT-CET PCM चं ॲडमिट कार्ड आज जारी होणार! समजा ॲडमिट कार्डात चुका झाल्या तर…? वाचा ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग पीसीएम गटासाठी एमएचटी सीईटी 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र एमएचटी सीईटी 2022 चे…
View On WordPress
0 notes
jobmarathi · 2 years
Text
शिक्षक भरती 2022 ऑनलाइन 15000 पदवीधर प्राथमिक शिक्षकांसाठी पोस्ट चेक अपडेटसाठी अर्ज करा
शिक्षक भरती 2022 ऑनलाइन 15000 पदवीधर प्राथमिक शिक्षकांसाठी पोस्ट चेक अपडेटसाठी अर्ज करा
शिक्षक भरती 2022: कर्नाटक सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी बंपर भरती हाती घेतली आहे. या अंतर्गत इयत्ता 6 वी ते 8 वी साठी पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 21 मार्च ते 22 एप्रिल 2022 पर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवार schooleducation.kar.nic.in पंख schooleducation.kar.nic.in वर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत इंग्रजी, गणित, विज्ञान, जीवशास्त्र आणि सामाजिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
पर्यावरणपूरक होळी साजरी करा, जिजामाता विद्यालयाने केले विद्यार्थ्यांना आवाहन
पर्यावरणपूरक होळी साजरी करा, जिजामाता विद्यालयाने केले विद्यार्थ्यांना आवाहन
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, प्रतिनिधी उमेश लहाने करंजी (वाशिम) दि.16 मार्च :- विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे येथे 16 मार्च रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमा��� हरित सेना प्रमुख तथा विज्ञान शिक्षक नवनाथ मुठाळ, जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. योगेश कावरे यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mazyagoshti · 3 years
Text
पृथ्वी २.० : भाग ४
त्या नंतर रात्री पुन्हा एक यान मला घ्यायला आले. पण हे यान पूर्वी आलेल्या याना पेक्षा वेगळे आणि मोठे होते. बाकी पृथ्वीवरील इतर सहकारी ही त्या यानात होते. त्यांनी आमच्या कडून ते भ्रूण घेतले आणि त्यांच्याकडे असलेल्या एका दुसऱ्या केस मध्ये ठेवले. आता आम्ही सर्वजण त्या दुसऱ्या ग्रहावर जाणार होतो. तो ग्रह कसा असेल, तेथे वसणारी नवी मानव वस्ती कशी असेल? यासारखे प्रश्न आमच्या मनात होते. ते यान आम्हा सर्वांना घेऊन निघाले त्याच्या पुढच्या प्रवासाला पण या वेळेस यानाचा मार्ग जरा वेगळा होता. आम्ही सूर्यमालेच्या विरुध्द बाजूने जात होतो. ते यान सूर्यमालेच्या टोकाला जाऊन थांबले. तेथे एक पोर्टल उघडल. त्या यांनाच कप्तान आमच्या जवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी प्रमुखांचा संदेश आहे त्यांना तुम्हाला पुढचा प्लान सांगायचा आहे.” असे म्हणून तो गेला. आमच्या समोर त्या प्रमुखाची एक प्रतिकृती त��ार झाली आणि ते आमच्याशी संवाद साधू लागले “आता तुम्ही तुमच्या ध्येयाच्या फार जवळ आहात. ही एक नवी सुरवात आहे. तुम्हाला नव्याने जीवनाची रचना करायची आहे, या पोर्टलच्या मागे असलेल्या ग्रहमालेतील एक ग्रहाची आम्ही तुमच्यासाठी नवीन ग्रह म्हणून निवड केली आहे. तेथे तुम्हाला जीवनाचे नवीन बीज रोवायचे आहेत. आमची एक टीम अगोदरच तिथे पाठवली आहे. तुमचा बेस तिथे तयार आहे. आता पुढे सर्वकाही तुम्हालाच करायचं आहे. तुम्हाला तेथे एक नवीन वस्ती वसवायची आहे. तुम्हाला एक सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की आम्ही या मिशनसाठी तुमचीच निवड का केली? खरं तर तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रा मधले तज्ञ आहात आणि सर्वांत महत्वाचा म्हणजे तुम्ही तुमची देशात याच मिशन वर काम करत होतात. पण यश काही मिळत नव्हत म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतोय. या नव्या जगाची रचना तुम्हालाच करयची आहे. इथले सर्व नियम अटी तुम्हालाच ठरवायचे आहेत. आता सर्व काही तुमच्या हातात आहे, या नव्या ग्रहाचे भविष्य तुमच्या हातात आहे. ह्या नव्या ग्रहावरचे लोक नक्की प्रगती करतील भेटू पुन्हा, गुड लक !” असे म्हणून ती प्रतिमा गायब होते. यानाचा कप्तान म्हणतो “ चला नव्या विश्वात एक नवीन सुरवात करायला. ” आम्ही त्या पोर्टल मध्ये प्रवेश केला. ते यान आम्हाला त्या ग्रहावर घेऊन गेला. तो ग्रह जवळपास पृथ्वीच्या आकाराचा होता. तेथले वातावरण ही पृथ्वीप्रमाणेच होते. तेथे बेस अगोदरच तयार होता. ती जागा जीवनासाठी अतिशय योग्य होती. सर्वत्र हिरवेगार जंगल, शुद्ध पाणी, स्वच्छ हवा, नयनरम्य परिसर. आम्ही सार्वजण अगदी मोहून गेलो. ते यान हळूहळू बेसच्या ठिकाणी उतरलं आम्ही सर्वजण यानातून बाहेर आलो, फार वेगळ वाटत होत. ही एक सुरुवात होती नव्या युगाची एका नव्या जीवनाची. तो ग्रह आम्हाला पृथ्वीप्रमाणे विकसित करायचा होता पण पृथ्वीसारखा नाही. जी चूक आम्ही आधी केली ती चूक पुन्हा इथल्या लोकांना करू द्याची नव्हती. एक सुसज्ज असं सर्व सुख सोई युक्त सुंदर शहर आम्हाला तेथे वास्वायचा होत. आम्ही आमच्या कामाला सुरवात केली त्या सर्व भ्रूणांना लगेच इनक्यूबेशन चेंबर मध्ये ठेवल. त्याची सर्व कामाची जबाबदारी आमच्या पैकी एका व्यक्तीची होती कारण ती एक बायोलॉजीतील तज्ञ होती. आमच्या टीम मधे सर्व क्षेत्रातील तज्ञ अशी मंडळी होती. आमच्यात भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, अभियांत्रिक , एवढाच काय तर साहित्य,कला या क्षेत्रातील देखील तज्ञ मंडळी अमच्या टीम मध्ये होती. सर्व मिळून आमचा २५ जणांचा चमू होता. आमचा काम होता त्या नव्या ग्रहावर एक शहर वसवायचं. आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून एक नवनिर्मिती करायची होती. आम्हाला सर्वांना एकत्र काम करायचे होते, त्या ग्रहाला सुंदर, त्याबरोबरच प्रगत बनवायचे होते. आम्ही आसपासच्या परिसराची पाहणी केली. सर्वांच्या डोक्यात नवनवीन कल्पना येत होत्या. आम्ही त्या परग्राहयाच्या ग्रहाचा आदर्श समोर ठेऊन, त्याप्रमाणेच त्या शहराची रचना करायची असे ठरवले. आम्ही जेव्हा त्यांच्या ग्रहावर होतो तेव्हा वेळोवेळी तेथे आम्हाला पृथ्वीचाच भास होत होता. जेव्हा आम्ही त्यांच्या शहरांना भेट दिली, तेव्हा आम्ही तेथल्या त्या सौंदर्याने आणि रचनेतील सुबकता, अचूकता याने अगदी मोहून गेलो. त्यांची जी शहराची रचना होती आधीच प्लान केलेली होती. त्याला अनुसरून आम्ही एक छान प्लान तयार केला आणि कामला सुरुवात केली, तेथील साधन संपत्तीचा योग्य वापर करणे आणि भविष्यात तेथील लोकांना करायला लावणे ही आमची जबाबदारी होती. त्या पराग्रह्यांच्या मदतीने थोड्याच कालावधीत आम्ही एका सुंदर वस्तीची निर्मिती केली. आता पुढे ही सर्व जबाबदारी होती ती ह्या नव्या पिढीची. आम्ही आमचं काम केल होत. आम्ही इथले सगळे नियम तिथल्या लोकांना समजून सांगितले. तेथली सर्व कामे वाटून आणि समजून सांगितली. कारण ते लोक इथले भविष्य होते. हे सर्व त्यांनाच पुढे न्यायचे होते. आवश्यक तेवढे सर्व ज्ञान आम्ही त्यांना दिले आणि पुढील सर्व जबाबदारी त्यांच्याव��� सोपवली. आता ते लोक या नव्या ग्रहावर सुखाने नांदत आहेत आणि त्यांचा विकास करत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी पृथ्वीवरील सर्व ज्ञान त्यांच्या पुढील पिढीसाठी लिखित स्वरुपात जतन करून ठेवलाय. पृथ्वीविषयी सर्व माहिती आम्ही त्यांना त्यांना सांगितली, त्यांच्या इथल्या जन्मच रहस्य, आणि त्यांच्या आमच्या मूळ जन्म स्थान विषयी सर्व माहीती आम्ही त्यांना दिली आणि जतन करून ही ठेवली आहे. त्यांचा इतिहास पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलाय. पण राहून राहून मनात एक प्रश्न राहिलाच ते कोण होते? ते पृथ्वीवर का आले होते? त्यांनी आपल्याला का मदत केली? यात त्यांचा काय फायदा? यासारखे अनेक प्रश्न आमच्या मनात होते? ज्यांची उत्तरे आम्हाला मिळाली नव्हती. इथे सगळ मार्गी लाऊन ते निघून गेले. आम्ही सार्वजण इथेच थांबलो, या सर्वांसोबत आयुष्याच्या शेवट पर्यंत आमच्याया निर्मितीसोबत त्याच गूढ प्रश्नांचा विचार करत. पृथ्वीवरील जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती. ते जीवन आज इथे समृद्ध होत आहे. प्रगती करत आहे. खरंच जीवनाची व्याख्या ही आपण समजतो त्यापेक्ष्या फारच वेगळी आहे. कारण एक मार्ग बंद झाल्यावर दुसरा मार्ग अपोआप उघडतो. कधीकधी आपणच तो उघडतो. ***
0 notes
wbkincnews · 3 years
Photo
Tumblr media
महामारीतील धक्कादायक स्टडी:हैदराबादच्या हुसेन सागर तलावामध्ये आढळले कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल; परंतु संसर्गाचा धोका नाही दुसर्‍या देशातही स्टडी, परंतु पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा नाही देशात कोरोना महामारीमुळे नवीन रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच हैदराबाद येथील हुसेन सागर तलावामध्ये कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळले आहे. हे एका अभ्यासातून समोर आले आहे. परंतु, त्या स्टडीमधून कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल पाण्यामधून संक्रमित होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय हे जेनेटिक मटेरियल हैदराबादमधील हुसेन सागर तलावासह नाचाराम पेड्डा चेरुवा आणि निजाम तलावामध्येदेखील आढळले आहे. याची सुरुवात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत झाली असून पाण्यामध्ये मिसळण्याचे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात वाढले असल्याचे स्टडीमधून समोर आले आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था, सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र, वैज्ञानिक आणि अभिनव संशोधन अकादमी यांनी मिळून हा स्टडी केला आहे. 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ झालेल्या या स्टडीमध्ये पहिल्यांदा कोरोनाची पहिल्या आणि दुसर्‍या लाटेला कव्हर करण्यात आले आहे. पाण्यात सापडलेल्या मटेरियलवरुन पुढील लाटेचा अंदाज बांधणे शक्य या स्टडीनुसार, लोकांच्या वस्तीतून जे अनट्रीटेड आणि घाणरडे पाणी आले, त्याव्दारे जेनेटिक मटेरियल तलावांमध्ये मिसळले आहे. अशावेळी सध्यातरी कोरोना व्हायरसचा प्रसार होत नसल्याचे समोर येत आहे. परंतु, यामुळे सध्याच्या लाटेच्या परिणामाचा आणि येणार्‍या लहरीचा अंदाज बांधता येऊ शकतो. दुसर्‍या देशातही स्टडी, परंतु पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा नाही यावर जगातील दुसर्‍या देशातही स्टडी होत असल्याचे सीसीएमबीच्या संचालकाने एका वेबसाइटला बातमी देताना सांगितले. परंतु, पाण्यातील मटेरियलमुळे संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरवा अद्याप नसल्याचे ते म्हणाले. अशावेळी पाण्याद्वारे चेहरा किंवा तोंडातून संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे. #haidrabad #telangananews https://www.instagram.com/p/CO3IQo9pfpf/?igshid=p75qkxyuzqj5
0 notes
onlinekhabarapp · 5 years
Text
एसईईमा कुन ग्रेड ल्याउनेले कुन विषय पढ्न पाउँछन् ?
१३ असार, काठमाडौं । माध्यमिक शिक्षा परीक्षा (एसईई) मा सहभागी विद्यार्थीको लब्धांक पत्रमा अनुत्तीर्ण लेखिदैन । तर सबै विद्यार्थीले कक्षा ११ मा भर्ना हुन भने पाउँदैनन् ।
तत्कालिन उच्च माध्यमिक शिक्षा परिषद्ले २०७३ असार १५ गते र शिक्षा मन्त्रालयले २०७४ असार ५ गते गरेको निर्णयअनुसार न्यूनतम जीपीए १.६ निर्धारण गरिएको छ ।
१.६ भन्दा कम जीपीए पाउनेहरूले भने कक्षा ११ मा भर्ना हुन पाउँदैनन् । यसवर्ष ५६ हजार ७ सय ३९ जनाले १.६ भन्दा कम जीपीए प्राप्त गरेका छन् । उनीहरुले कक्षा ११ मा भर्ना हुन पाउँदैनन् ।
त्यससँगै सम्बन्धित विषयमा न्यूनतम ‘डी प्लस’ वा ‘सी प्लस’ नल्याउनेले पनि कक्षा ११ भर्ना हुन पाउँदैनन् । प्राविधिक विषयतर्फ भने विषयगत न्यूनतम ग्रेड तोकिएको छैन । भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, कम्प्युटर साइन्स र कृषि पढ्न भने न्यूनतम जीपीए २.०० निर्धारण गरिएको छ । त्यससँगै विज्ञान र गणितमा न्यूनतम ‘सी प्लस’ ल्याउनुपर्छ ।
अधिकांश विषय पढ्न अंग्रेजी र सामाजिक शिक्षामा न्यूनतम ‘डी प्लस’ प्राप्त गरेको हुनुपर्नेछ ।
एसईई २०७५ मा १७ हजार ५८० जनाले ३.६ देखि ४.००, ५१ हजार १ सय ३७ जनाले ३.० देखि ३.६, ६३ हजार ७ सय ४१ जनाले २.८ देखि ३.२ सम्म जीपीए ल्याएका छन् । त्यस्तै, २.०० देखि २.४ ल्याउने ९८ हजार २०७, १.६ देखि २.० ल्याउने ९५ हजार ३०७, १.२ देखि १.६ ल्याउने ४३ हजार ८४१ विद्यार्थी छन् ।
राष्ट्रिय परीक्षा बोर्डका अनुसार नियमिततर्फ सैद्धान्तिक विषयको बढीमा दुई विषयसम्म ‘सी’ वा ‘सी’ भन्दा तल्लो ग्रेड प्राप्त गरेका वा दुई विषयसम्म अनुपस्थित भएमा परीक्षार्थीहरूले ग्रेडवृद्धिका लागि पूरक ग्रेडवृद्धि परीक्षा दिन पाइन्छ ।
0 notes
amhikastkar · 4 years
Text
तमिळनाडू कृषी विद्यापीठात नारळाची उती संवर्धित रोपे निर्मितीचे तंत्र विकसित
तमिळनाडू कृषी विद्यापीठात नारळाची उती संवर्धित रोपे निर्मितीचे तंत्र विकसित
[ad_1]
तमिळनाडू कृषी विद्यापीठाने नारळांच्या रोपांची पैदास वेगाने करण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण तंत्र विकसित केले आहे. नारळातील गर्भ कोंबाची वाढ प्रयोगशाळेमध्ये करण्यात येऊन, त्याचे रूपांतर रोपांमध्ये केले जाते.
विद्यापीठाच्या वनस्पती मुलद्रव्यीय जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान केंद्राद्वारे सुरू असलेल्या या संशोधनासाठी तमिळनाडू राज्याच्या नियोजन आयोगाच्या नावीन्यपूर्ण पुढाकार…
View On WordPress
0 notes
kavitadatir · 4 years
Text
किमयागार
किमयागार (लेखक : अच्युत गोडबोले) पुस्तक परिचय / चि त्रा क्ष रे #chitrakshare #गोष्टक्रिएशन्स #गोष्ट #saaradmajkur #marathi #marathisahitya #मराठीसाहित्य #pustakparikshan #pustake #पुस्तक #pustakparichay #मराठी #साहित्य #achyutgodbole #NowReading #वाचनीय
पदार्थविज्ञान, भूगर्भ शास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त मारून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृतांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळ्या विषयातले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतन सहजपणे एकहाती लिहिलं आहे.
एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तस हे…
View On WordPress
0 notes
thereliableacademy · 4 years
Text
एमपीएससी: दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Tumblr media
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा म्हणजेच दुय्यम सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन घटकातील विषयांच्या तयारीबाबत या आधीच्या लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये मागील तीन वर्षे सामान्य विज्ञान या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
मागील वर्षी विचारण्यात आलेले काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. या प्रश्नांतील योग्य उत्तरांचे पर्याय ठळक के लेले आहेत.
प्रश्न १ –  दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर   ————
१) प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये समान असेल.
२) न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये समान असेल.
३) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये समान असेल.
४) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल.
प्रश्न  २. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनण्ट लसीचे उत्पादन व वितरण करते?
१) मिसल्स लस
२) डिफ्थेरीया, टिटॅनस, परटय़ुसिस व हेपेटायटीस बीची लस
३) हेपेटायटीस बीची लस
४) रेपॉयटीन
प्रश्न ३. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
अ. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.
ब. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातात.
पर्यायी उत्तरे:
१) विधाने अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत.
२) विधान अ सत्य असून ब असत्य आहे.
३) विधान अ असत्य असून ब सत्य आहे.
४) विधाने अ आणि ब दोन्हीही असत्य आहेत.
प्रश्न ४. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ. टेनिया सोलियमला हुक जंत असेही म्हतले जाते.
ब. फॅस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते.
क. अ‍ॅसन्कालोस्टोमा डय़ुडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते.
ड, नेरेस चिल्कॅनसिस हे सामान्यत: चिंधी असे म्हणतात.
पर्यायी उत्तरे
१) क फक्त      २) ब आणि ड फक्त
३) अ फक्त      ४) अ आणि क फक्त
प्रश्न ५. खालीलपैकी कोणती विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत?
अ. ध्वनी तरंग हे अवतरंग असतात.
ब. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता २० हर्ट्झ इतकी असते.
क. ध्वनी तरंगांच्या प्रसारण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
ड. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते.
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब   २) अ आणि क
३) ब आणि क   ४) क आणि ड
प्रश्न ६. जेव्हा वितळलेल्या सोडीयम क्लोराइडमधून १०० अ विद्युत प्रवाह ९६५ से. करिता प्रवाहित केला तर (Na = २३; Cl’ = ३५.५)
१) २३ ग्रॅम सोडीयम अँनोडवर निक्षेप होईल आणि ३५.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा कॅथोडवर निकास होईल.
२) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि ३५.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.
३) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि १७.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.
४) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि ७१ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.
प्रश्न ७. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे?
१) राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम
२) राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम
३) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
४) राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
वरील उदाहरणांवरून एखाद्या मुद्द्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याची कल्पना येते. तसेच अभ्यास करताना नेमके काय वाचावे, कसे वाचावे आणि नोट्समध्ये कशाचा अंतर्भाव करावा याची कल्पना येते. प्रश्नांचे विश्लेषण केल्यास महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले आहेत किंवा प्रश्न किती सोपे, किती अवघड आहेत हे लक्षात येते. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून समोर येणारे मुद्दे पुढीलप्रमाणे:
सामान्य विज्ञानाच्या एकूण १५ प्रश्नांपैकी प्रत्येकी तीन तीन प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर विचारलेले आहेत. तर जीवशास्त्र विषयावर ९ प्रश्न विचारलेले आहेत. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमातील घटकांवर प्रत्येकी तीन प्रश्न असे विभाजन आहे.
सर्व घटकांमधील मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे. बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. मात्र प्रश्नातील मुद्द्याची नेमकी माहिती असेल तर प्रश्न सोडविता येतील अशी काठिण्यपातळी असल्याने अभ्यास बारकाईने आणि समजून घेऊन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रश्नांचा दर्जा पदवीचा आहे हे लक्षात येते.
चालू घडामोडींवर फारसे प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत. मात्र दरवर्षी एखादा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित मुद्द्यावर विचारलेला दिसून येतो.
सर्व विषया��च्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि आवश्यक तेथे तथ्यात्मक बाबींच्या नोट्स काढणे या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली.
अयोध्येतल्या नव्या श्री राम मंदिरात येत्या पंधरा ते चोवीस जानेवारी दरम्यान श्रीराममूर्तीची स्थापना.
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारत अव्वल स्थानी.
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण वाढवण्याचे प्रशासनाचे निर्देश.
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमुळे ही नियुक्ती दोन वर्ष���ंपासून होत नव्हती. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती, त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. या प्रकारात राज्यपालांनी घटनेचं उल्लंघन केल्याचा दावा करत, ठाकरे सरकारची यादीच कायम ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयानं दिली, तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्यानं याचिका दाखल करायला सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वीसहून जास्त याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं आज सांगितलं. आजच्या सुनावणीआधी एक दिवस, म्हणजे काल, केंद्र सरकारनं यासंदर्भात नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला दहशतवाद संपवण्यासाठी कलम ३७० हटवणं, हा एकमेव मार्ग होता, असं म्हटलं आहे.
****
अयोध्येतल्या नव्या श्री राम मंदिरात येत्या पंधरा ते चोवीस जानेवारी दरम्यान भगवान श्रीरामांची मूर्ती स्थापन केली जाईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत रॉय यांनी दिली आहे. मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून इतर कामं येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिरात भगवान श्रीरामांची मूर्ती पाच वर्षांच्या बालकाच्या स्वरूपात स्थापन केली जाणार असून मंदिराच्या तळमजल्यावर राम दरबार स्थापित केला जाईल, असंही रॉय यांनी सांगितलं. पुढची अनेक शतकं देखभालीची आवश्यकता भासू नये, अशा रीतीनं मंदिराची निर्मिती होत असल्याचं रॉय यांनी सांगितलं.
****
चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा खात्याचे सचिव संजीव चोपडा यांनी ही माहिती दिली आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून यामुळे तांदुळाची किरकोळ दरवाढ रोखता येईल, असं ते म्हणाले. सध्या महामंडळाकडे पुरेसा तांदूळ असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार, चालू हंगामातला तिसरा ई लिलाव उद्या सुरू होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे.ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांसोबत आज एक बैठक केल्याचं, तसंच या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, याविरुद्ध काँग्रेस लढा देत राहील, असं प्रतिपादन वेणुगोपाल यांनी यावेळी केलं. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांनी आजच्या बैठकीत चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात २१ वर्षांखालच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा खेळाडू पार्थ साळुंके याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दात त्याचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी पार्थला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या विज्ञान ऑलिंपियाडच्या राष्ट्रीय समन्वयकांनी ही माहिती दिली आहे. भारताच्या चारही विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धकांमध्ये जालन्याचा मेघ छाबडा, बेंगलुरुचा ध्रुव अडानी, कोट्याचा इशान पेडणेकर आणि रिसालीचा रोहित पांडा यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीत ऐन शहर���त तीन जुलैपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत शहात्तर देशांमधल्या दोनशे त्र्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतासोबतच सिंगापूरनंही या स्पर्धेत चार सुवर्णपदकं मिळवली असून, भारत पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यल्प असून ते वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा मीना यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ.विवेक कांबळे यांना प्रथम डॉ.सतीश साबळे यांना द्वितीय आणि डॉ.हश्मी यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं. राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम आणि मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयक योजना, यासंदर्भात यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा अभियानाचा लाभ नांदेड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानातून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच सरळ सेवा परिक्षांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून यासाठी कोणतीही प्रवेश परिक्षा नाही. या उपक्रमात राज्यातले तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी nanded.spardhamission.com या लिंकवरून अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभागानं अर्ज मागवले आहेत. यासाठी www.awards.gov.in या पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्जच विचारात घेतले जाणार असून, या पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै ही असल्याचं औरंगाबाद जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या तुळजा भवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. अठरा ते चाळीस वर्षं वयोगटातल्या दिव्यांग, मूकबधीर तसंच मतिमंद व्यक्ती यासाठी प्रवेश घेऊ शकतात. या संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाची सोय विनामूल्य करण्यात येते.
****
0 notes
rupeerains · 4 years
Text
Maharashtra State Education Board
Maharashtra State Education Board
Maharashtra State Education Board HSC(std XII) Time Table changes in written examination Feb/March 2013 सरळसेवा भरती (सन २०१२- २०१३) – कनिष्ठ लिपिक इयत्ता    १०वी  ऑक्टोबर २०१२ निकाल   इयत्ता    १२ वी  ऑक्टोबर २०१२ निकाल  २०१२-२०१३   ICT प्रशिक्षण ICT Training 2012-2013  इ १२ वी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, व गणित  आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग – २) या विषयाच्या पाठ्यपुस्तकातील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल आज जाहीर झाला. पीसीएम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित तसच पीसीबी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विभागाच्या गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जन्मतारीख आणि अर्ज क्रमांक टाकून विद्यार्थ्यांना आपापला निकाल पाहता येणार आहे. यंदा एमएचटी सीईटीच्या परीक्षेसाठी ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
****
ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून लहान मुलांचं धर्मांतरण करणारा आरोपी शहनवाज याला आज उत्तरप्रदेश पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलं. शहनवाजला ���ाल अलिबाग इथून अटक केल्यानंतर आज त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर शाहनवाजला ताब्यात घेतलं आहे. धर्मांतर करण्याचं प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केलं होतं. ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरुन त्यांना सुरुवातीला या खेळात हरवलं जायचं, त्यांनंतर धर्मांतराच्या उद्देशाने मन परिवर्तन केलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे जगासमोर मोठं संकट उभं राहीलं असून, पर्यावरणाच्या बदलामुळे ऋतुमानात दिवसेंदिवस बदल होत आहेत, उद्रेक होण्याआधीच हे रोखायला हवं, असं अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. अहमदनगर सायकलिंग असोसिएशन आणि सायकलिंग क्लब यांच्या वतीने पंढरपूर सायकलवारी काढत पर्यावरणाची जनजागृती करण्यात येत आहेत, त्या संदर्भातल्या एका कार्यक्रमात जगताप बोलत होते. वायू प्रदूषण निर्माण करण्याऱ्या वाहनांचा वापर टाळून सायकलचा वापर करणं ही काळाची गरज आहे, असं जगताप म्हणाले.
****
शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून मिश्र पिकांवर भर देत शेतमालाच्या मूल्यवर्धनावर भर द्यावा, असं मत शेतकरी माझाचे संचालक, लेखक, दिग्दर्शक प्रमोद प्रभूलकर यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या काळवाडी इथं डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक, ग्रामपंचायत, महिला बचत गट आणि शेतकरी माझा यांच्या वतीने किमान हमीभाव या विषयावरच्या चर्चासत्रात प्रभूलकर आज बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी गटशेती हा योग्य पर्याय असल्याचं प्रभूलकर यांनी सांगितलं.
****
छत्रपती शाहू महाराज संस्था प्रशिक्षण आणि मानव विकास -सारथी या संस्थेच्या वतीनं शेतकरी कंपनीच्या लक्षीत गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयातज्ज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, साहित्य, क्षेत्रीय भेट इत्यादी बाबींचा समावेश आहे. राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर आणि रत्नागिरीत दापोली इथं हे प्रशिक्षण होणार असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढे दोन वर्षे निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र इच्छुकांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सारथी हायफन महाराष्ट्र गव्ह डॉट कॉम तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू महा एम सी डी सी डॉट कॉम या संकेतस्थळावरून अर्ज भरून सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ आज पाळण्यात येत आहे. बालमजुरी विरोधाच्या चळवळीला प्रेरणा देणं हा यामागचा उद्देश आहे. यंदाच्या ��ागतिक दिनाचे घोषवाक्य, ‘सर्वांसाठी सामाजिक न्याय आणि बालमजुरी संपवा’ असं आहे.
****
अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त हिंगोली इथं सामाजिक न्याय भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज अंमली पदार्थांचं प्रतिकात्मक दहन करुन अंमली पदार्थ विरोधी पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात वसमत-औंढा तालुक्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या मेळाव्यात नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी व्यसनमुक्तीचा संकल्प दिला. नशाबंदी मंडळानं भरवलेल्या व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अवलोकन केलं.
****
जालना जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी व्यसन न करण्याची शपथ दिली. या अभियानांर्तत १२ ते २६ जून या कालावधीत शाळा, महाविद्यालयं, सेवाभावी संस्था, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
****
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात लातूर जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी मिळालेला ३०२ कोटी रुपये निधी पूर्णपणे खर्च झाला आहे. आता २०२३-२४ या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी मंजूर निधी मागणीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, असं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत पालकमंत्री महाजन बोलत होते. पालकमंत्र्यांनी पीकविमा, नुकसान भरपाई, शासन आपल्या दारी, आदी योजनांचा आढावा घेतला
****
नांदेड जिल्ह्यात येत्या १५ जून रोजी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांचं दमदार स्वागत करण्याची तयारी शाळांनी सुरू केली आहे. हर घर नर्सरी हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत असून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाडाचं रोप देऊन स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांमधल्या तीन लाख ५३ हजार ५२४ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे.
****
सेलू-ढेंगळी पिंपळगाव – मानवत रोड दरम्यान उद्या १३ आणि शनिवार १७ जून रोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान १३५ मिनिटे उशिरा धावेल. नांदेड -पुणे एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान ५० मिनिटे, काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान तीन तास दहा मिनिटे, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान दीड तास उशिरा धावेल. धर्माबाद इथून सुटणारी धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस गाडी १४ आणि १८ जून रोजी तिच्या नियोजित वेळेऐवजी एक तास उशिरा म्हणजे पहाटे पाच वाजता सुटेल.
****
0 notes