Tumgik
#डी. एस. हॉस्पिटल
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
अणुऊर्जा विभागाच्या संशोधनातून कर्करुग्णांच्या उपचारासाठी ॲक्टोसाइट गोळीचा शोध, रेडिओथेरपी घेणाऱ्या कर्करुग्णांचं जीवनमान उंचावणार
राज्य विधानपरिषदेच्या चार जागांसाठी ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
पक्षविरोधी कारवाया प्रकरणी प्रदेश काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांसह तिघे निलंबित
खरीपाच्या पेरण्यांची सर्वत्र लगबग, बियाणे आणि खत वापरासंबंधी कृषी विभागाकडून सूचना
आणि
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा अमेरिकेवर सात गडी राखून विजय, अंतिम आठ मध्ये स्थान निश्चित
****
अणुऊर्जा विभागाच्या अनेक दशकांच्या संशोधनातून कर्करुग्णांच्या उपचारात देशानं मोठं यश संपादित केलं आहे. या संशोधनातून तयार झालेल्या ॲक्टोसाइट या गोळीमुळे, रेडिओथेरपी घेणाऱ्या कर्करुग्णांचं जीवनमान उंचावणार आहे. काल मुंबईत एका कार्यक्रमात ही गोळी बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आली. भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कर्करोगाच्या उपचारादरम्यान किरणोत्सारामुळे निरोगी ऊतींचं होणारं नुकसान रोखण्यासाठी ही गोळी लाभदायक ठरणार असल्याचं, भसीन यांनी सांगितलं. मुंबईचं भाभा अणु संशोधन केंद्र, नवी मुंबईचं कर्करोग संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि बंगळुरू इथली आय डी आर एस प्रयोगशाळा यांच्या संशोधनातून तयार झालेली ही गोळी, भारतात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होत आहे. किमोथेरपीच्या दुष्परिणामांवरसुद्धा ही गोळी परिणामकारक आहे का, याची चाचपणी सध्या सुरू आहे. या गोळीला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची मंजुरी मिळाली असून, भारतीय औषध नियामक प्राधिकरणाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरु होणार आहे. या अधिवेशनाची अधिसूचना राज्यपाल रमेश बैस यांनी काल जारी केली.
****
राज्यात पणन महासंघासह इतर संस्थांनी आवश्यकतेनुसार खत साठ्याची संपूर्ण उचल करावी, तसंच त्यानंतरही आवश्यकता असल्यास कृषी विभागानं पणन महासंघाला अतिरिक्त कोटा मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. कृषीमंत्री धनंजय मुंडे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
दरम्यान, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पणन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. काल मुंबईत राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या १५२ व्या संचालक मंडळाच्या सभेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड तसंच श्रीरामपूरसह राज्यात उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यातलं मिरचीचं उत्पादन आणि गुणवत्ता विचारात घेऊन तिथं मिरचीसाठी सुविधा केंद्र निर्माण करावं, यासह विविध सूचनाही मंत्री सत्तार त्यांनी यावेळी केल्या.
****
राज्य विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ५५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात आठ, कोकण पदवीधर १३, नाशिक विभाग शिक्षक २१, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या चार जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती थेट लढत होणार असून, मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे किरण शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यात लढत होईल. तर, मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे शिवनाथ दराडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे अशी चौरंगी लढत होणार आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं काल जाहीर करण्यात आलं. या मतदार संघातून डॉ. राजेंद्र विखे, काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांच्यासह १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता संदीप गुळवे, शिवसेनेचे किशोर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे या मतदारसांघात महायुतीचे निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात थेट लढत होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सचिव प्रशांत गावंडे, सरचिटणीस सत्संग नारायणराव मुंडे, तसंच माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचं, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपण राज्यव्यापी दौरे करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीतली उणीव भरून काढून आम्ही विधानसभा निवडणुकींना सामोरं जाऊ, असं तटकरे यांनी सांगितलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. सकाळी अकरा वाजता समारंभाला सुरूवात होईल, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन या समारंभाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेतंर्गत गट-क संवर्गातल्या रिक्त पदांची भरती करण्यासाठीची परीक्षा आजपासून १६ जूनदरम्यान होत आहे. जिल्ह्यातल्या तीन उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून, प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी संगीता टकले यांनी या सर्व ��रीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याची खात्री करून खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात करावी असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे, यंदा मृगाचा पाऊस वेळेवर झाला असल्यामुळे उडीद, मूग यासारख्या पिकांनाही भरपूर वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात चालू वर्षी आतापर्यंत १२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात बोगस बियाणे तसंच बनावट खतांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागानं सतर्क राहून काम करावं, अशा सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. त्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. बोगस बियाणांवर कारवाईसाठी भरारी पथकं स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
****
बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ८० हजार मेट्रिक टन खताची गरज असून, आतापर्यंत १ लाख ५१ हजार ६६४ मेट्रिक टन खत बाजारात उपलब्ध झालं आहे. उपलब्ध खताची तालुकानिहाय, विक्रेतेनिहाय साठ्याची माहिती कृषक ॲपवर दररोज अद्ययावत केली जात आहे. शेतकऱ्यांनी या माहितीचा वापर करुन खतं खरेदी करावीत, विशिष्ट ग्रेडच्या खताचा आग्रह धरु नये, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांच्या मागणीनुसार डीएपी खताची उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट तसंच युरियाचा वापर करावा, असा सल्ला कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा साडे चार लाख हेक्‍टरवर सोयाबीन लागवडीची शक्यता आहे. दरम्यान, कपाशी उत्पादकांनी पेरणी करतानाच बोंड अळी येणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने अमेरिकेवर सात गडी राखून विजय मिळवत, अंतिम आठ मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. काल न्यूयॉर्क इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात आठ बाद ११० धावा केल्या. अर्शदीप सिंहनं चार, हार्दिक पंड्यानं दोन, तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. प्रत्यूत्तरादाखल भारताने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १९व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. चार गडी बाद करणारा अर्शदीप सिंह प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडदरम्यान सामना सुरु आहे.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आज बीड इथं सामाजिक सद्भावना फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत, या फेरीत सहभागी व्हावं, असं आवाहन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं आहे.
****
लातूर शहर महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गात कार्यरत एकूण ३२ कर्मचाऱ्यांना कार्यालयांतर्गत पदोन्नती देण्यात आली. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते त्यांना पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले.
****
0 notes
ds-hospital · 2 years
Text
Tumblr media
0 notes
prakhar-pravakta · 2 years
Text
क्षेत्रीय समस्याओं एवं रात्रिकालीन डॉक्टर व्यवस्था हेतु लिखा कलेक्टर को पत्र =:मंडल अध्यक्ष परशुराम गुप्ता
क्षेत्रीय समस्याओं एवं रात्रिकालीन डॉक्टर व्यवस्था हेतु लिखा कलेक्टर को पत्र =:मंडल अध्यक्ष परशुराम गुप्ता
सतना। मझगवां ब्लॉक का सर्वाधिक आबादी वाला क्षेत्र है बिरसिंहपुर स्वास्थ्य केंद्र में ब्लॉक की सभी पीएससी अस्पतालों में यहां तक कि मझगामा की पी एस सी की अपेक्षा ज्यादा ओ पी डी पर्चियां कटती हैं और यहां डिलीवरी भी सबसे ज्यादा होती है ऐसा शासकीय आंकड़ा भी दर्शाता है इतने बड़े क्षेत्र में आए दिन कुछ ना कुछ अप्रिय घटनाएं होती हैं और जब लोग इलाज के लिए हॉस्पिटल जाते हैं तो रात में डॉक्टर नदारद रहते हैं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
manojsingh08 · 4 years
Photo
Tumblr media
गोल्फ ग्रीन में निवेश क्यो करे। * रेरा से स्वीकृत आवासीय परिसर। * सर्वसुविधायुक्त कैंपस। * विशेष सुविधाएं जैसे कि क्लब हाउस, जिम, स्पा, स्विमिंग पूल, इंडोर बैडमिंटन डुएल कोर्ट,टेनिस कोर्ट, बॉलीबाल सैंड कोर्ट,ओपन एयर एमपीथेटर,मिनी गोल्फ कोर्स, चिल्ड्रन प्ले एरिया, ओपन जिम, मंदिर, और सुंदर गार्डन्स। * एडुकेशनल हब, होलिक्रोस स्कूल, के पी एस स्कूल, आर के शारडा स्कूल,जी डी गोइन्का स्कूल,इंडस वर्ल्ड स्कूल ,गौरमेंट इंजीनियरिंग कॉलेज,आई आई एम कैंपस, शंकराचार्य कॉलेज। *आर डी ए के 1600 एकर की कॉलोनी कमल विहार के नजदीक एवं अन्य आवासीय कॉलोनियों के बीच मे स्थित। * राज्य के सबसे बड़े सिटी पार्क 225 एकर्स जिसमे की 125 एकर्स की वाटर एक्टिविटी है के नजदीक। * जयस्तंभ चौक से मात्र 9 किमी। * रिंग रोड न. 1 से मात्र 5 किमी। * स्टेशन एवं एयरपोर्ट से मात्र 20 मिनट की ड्राइव। * होलसेल मार्केट के नज़दीक। * हॉस्पिटल एवं अन्य सुविधाएं भी नज़दीक। *आकर्षक दाम। * बैंक फाइनेंस की सुविधा। फिर निवेश क्यो ना करे? Call 9301205100 https://www.instagram.com/p/CD0zj3JhkCH/?igshid=15kk9m3k46xqv
0 notes
newswave-kota · 5 years
Text
युवाओं को ‘डिप्लोमा इन ट्रेनिंग एंड डवलपमेंट’ से मिलेंगे रोजगार
Tumblr media
आईएसटीडी कोटा चेप्टर की वार्षिक आमसभा एव सम्मान समारोह, वी के जेटली आउटस्टेंडिंग मेंटर एवार्ड से सम्मानित। न्यूजवेव@ कोटा इंडियन सोसाइटी फॉर ट्रेनिंग एंड डवलपमेंट कोटा चेप्टर की वार्षिक आमसभा एवं सम्मान समारोह रविवार को आयोजित किया गया। चेप्टर अध्यक्ष सुश्री अनिता चौहान ने बताया कि आईएसटीडी के स्वर्णजयंती वर्ष में कोटा में नये कॅरिअर विकल्प के रूप में दूरस्थ शिक्षा में ट्रेनिंग और डेवलपमेन्ट में डिप्लोमा प्रारंभ किया जा रहा है। यह डिप्लोमा 18 माह की अवधि का होगा। नये डिप्लोमा कोर्स के लिये ओम कोठारी इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च को स्टडी सेंटर बनाया गया है।
Tumblr media
उन्होंने बताया कि जुलाई से नया बैच प्रारंभ होगा, जिसमें आवेदन की अंतिम तिथी 15 जून है। वर्ष में दो बार जनवरी एवं जुलाई माह में एडमिशन दिए जायेंगे। डिप्लोमाधारी विद्यार्थियों को एच आर एवं ट्रेनिंग के क्षेत्र में जॉब के नये अवसर मिलेंगे। इसे डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्स से मान्यता प्रदान की गई है, जिससे कॉर्पोरेट सेक्टर एवं सार्वजनिक उपक्रमों में डिप्लोमा धारियों को प्राथमिकता दी जाएगी। स्किल डेवलपमेंट के तहत वर्तमान में ट्रेनिंग व एच आर के क्षेत्र में प्रशिक्षित युवाओं की डिमांड तेजी से बढ रही है। सचिव डॉ.अमित सिंह राठौर ने वार्षिक प्रतिवेदन प्रस्तुत करते हुये बताया कि कोटा चेप्टर ने ट्रेनिंग एंड डवलपमेंट प्रोग्राम आयोजित कर शहर की विभिन्न संस्थाओं, शहरवासियों, स्कूल कॉलेजों के स्टूडेंट्स में जागरूकता पैदा की। देश में आईएसटीडी के सभी 50 चेप्टर्स में सर्वाधिक प्रोग्राम कोटा में आयोजित किये गये। कोटा चेप्टर द्वारा अगले वर्ष से ट्रेनिंग एवं डेवलपमेंट के क्षेत्र में विशिष्ट योगदान हेतु ‘यंग अचीवर अवार्ड’ देने की घोषणा की गई। वी के जेटली को ‘आउटस्टेंडिंग मेंटर अवार्ड’
Tumblr media
समारोह में श्रीराम रेयन्स उद्योग के यूनिट हेड एवं कोटा चेप्टर के संरक्षक वी के जेटली को ‘आउटस्टेंडिंग मेंटर अवार्ड’ तथा चेप्टर के संस्थापक सदस्य व कोषाध्यक्ष अशोक सक्सेना को ‘लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड’ से समानित किया गया। राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व चेप्टर के पूर्व अध्यक्ष के एम टंडन ने जेटली के लिए ‘पेन पोरट्रेट’ का वाचन किया। संरक्षक वरिष्ठ उद्यमी गोविंद राम मित्तल, सदस्य समाजसेवी जी डी पटेल, प्रेम भाटिया ने वी के जेटली को सम्मानित किया।
Tumblr media
चेप्टर के विभिन्न कार्यक्रमों में विशिष्ट योगदान के लिये नरेंद्र शुक्ला, डॉ.मोनिका दुबे, डॉ.नीरजा श्रीवास्तव, यज्ञदत्त हाड़ा, समोद सिंह एवं चेप्टर प्रोग्राम में सर्वाधिक उपस्थिति के लिए अनिता गौतम, प्रदीप कुलश्रेष्ठ, संदीप शारदा, रावतभाटा से डॉ.ए के वर्मा, कृष्णा कंजोलिया को प्रश��्ति पत्र देकर सम्मांनित किया गया। आईएसटीडी कोटा चेप्टर को वर्षपर्यंत सहयोग प्रदान करने हेतु मोदी इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी के डॉ.जोशी, सर्वोदय एजुकेशनल ग्रुप के डॉ.अजहर मिर्जा, ओम कोठारी इंस्टिट्यूट के डॉ.अमित सिंह राठौड़, एस एस आई एसोसिएशन के कमलदीप सिंह मान को धन्यवाद विशिष्ट प्रशस्ति पत्र प्रदान किये गए। सुसाइड प्रिवेंशन पर होगी नेशनल कॉन्फ्रेंस चेप्टर के उपाध्यक्ष डॉ एम.एल.अग्रवाल ने कहा कि अक्टूबर,2019 में चेप्टर द्वारा कोटा में ‘सुसाइड प्रिवेंशन एंड कंट्रोल’ थीम पर नेशनल कॉन्फ्रेंस होगी। आई एस टी डी और अग्रवाल न्यूरो हॉस्पिटल द्वारा आयोजित इस नेशनल कॉन्फ्रेंस के माध्यम से शिक्षा नगरी कोटा में बाहर से आने वाले कोचिंग विद्यार्थियों में बढ़ रहे तनाव एवं मानसिक अवसाद को रोकने के लिए देशभर के विशेषज्ञ वैचारिक मंथन करेंगे तथा विद्यार्थियों को सकारात्मक उर्जा की दिशा की ओर प्रेरित करेंगे। अभिभावको व शिक्षकों के लिए विशेष प्रशिक्षण की आवश्यकता को देखते हुये सुसाइड रोकथाम पर एक्सपर्ट पैनल डिस्कशन भी होगा। हर क्षेत्र के द्रोणाचार्य आईएसटीडी से जुडे संरक्षक गोविन्द राम मित्तल ने कहा कि कोटा शहर को ट्रेनिंग एंड डवलपमेंट के क्षेत्र में नई पहचान दिलाने के लिये चेप्टर ने टीम भावना से सराहनीय कार्य किया है। सभी सदस्यों ने निशुल्क सेवाएं देकर सामाजिक विकास को नई दिशा दी है। चेप्टर सरक्षक श्रीराम रेयोंस के यूनिट हेड वी के जेटली ने कहा कि आई एस टी डी इकलौती ऐसी संस्था है जिससे हर क्षेत्र के द्रोणाचार्य जुड़े हुए हैं। इनसे मिलकर हम निरंतर संवाद बनाए रखे और अपनी सम्पूर्ण उर्जा जीवन के सकारात्मक कार्यों में लगायें। मुझे गर्व है मैं भी इस संस्था से जुड़ा हूँ। संचालन डॉ.नीरजा श्रीवास्तव व अनीता गौतम ने किया। रिटा.कर्नल आर एम जैन ने सबका आभार जताया। Read the full article
0 notes
smarthulchal · 6 years
Photo
Tumblr media
सोनी हॉस्पिटल मे 7वा गणतंत्र दिवस हर्षोल्लास से मनाया भीलवाड़ा । (धर्मेन्द्र कोठारी )  सोनी हॉस्पिटल मैं 26 जनवरी के अवसर पर 70 वां गणतंत्र दिवस बड़ी धूमधाम से मनाया गया।कार्यक्रम के मुख्य अतिथि उद्योगपति एवं लायंस क्लब भीलवाड़ा टेक्सटाइल सिटी भीलवाड़ा अध्यक्ष अनिल छाजेड़ को गार्ड ऑफ ऑनर दिया। इसके बाद दीप प्रज्वलित करके मुख्य अतिथि ने 9:00 बजे सोनी हॉस्पिटल में ध्वजारोहण किया। साथ ही राष्ट्र गान बोला गया। इसके बाद विभिन्न प्रकार की प्रस्तुतियां दी गई और मुख्य अतिथि ने उद्बोधन में कहा गणतंत्र दिवस की 70 वींसालगिरह का हिन्दोस्तां मुबारक हो । आओ देश के संविधान का सम्मान करते हुए देश की उन्नति,तरक्की और सौहार्द के साथी बनें, आओ देश को हमारी ज़रूरत है, हम सब (हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई) मिल कर इसे एक शांतिपूर्ण, सेहतमंद और उन्नत राष्ट्र बनाने में अपनी भागीदारी निभाएं ।सोनी हॉस्पिटल परिवार द्वारा सभी अतिथियों का स्वागत किया गया। सांस्कृतिक प्रस्तुति ज़ाकिर ,श्याम सुंदर वर्मा , नारु के नेतृत्व में किया ।मंच संचालन पायल जैन ने किया कार्यक्रम के अंत में सी॰ई॰ओ॰ श्याम बिड़ला द्वारा सबका धन्यवाद किया गया ,साथ ही मरीजों को हॉस्पिटल में बिस्कुट मिठाइयां एवं फल वितरित किए गए और कार्यक्रम में ,गरिमापूर्ण उपस्थिति लायंस क्लब के रीजनल चेर्मेन डी॰आर॰ शर्मा , नाथू लाल छाज़ेड ,एस॰के॰ जैन , मंजू पोखरना ,कैलाश काबरा, हरीश पोरवाल डॉ प्रशांत आगाल , डॉ स्वाति दाधीच , सौविक विश्वास ,अर्चना सोनी , निशा सोनी ,मीडिया प्रभारी महावीर मीना ,शाहपुरा पायल जैन सहित शहर के कई गणमान्य लोग उपस्थित थे।
0 notes
Text
सौरभ सागर सेवा संस्थान कर रहा है गरीबों को भोजन वितरित
सौरभ सागर सेवा संस्थान कर रहा है गरीबों को भोजन वितरित
ग़ाज़ियाबाद। लॉकडाउन को लेकर दिहाड़ी मज़दूरों की परेशानियों को देखते हुए सौरभ सागर सेवा संस्थान के तत्वावधान में चल रहा जीवन आशा हॉस्पिटल एवं एस एस डी जैन पब्लिक स्कूल कविनगर के द्वारा प्रतिदिन 15 सौ से लेकर 2000 तक खाने के पैकेट बनवाकर बँटवाए जा रहे हैं। यह शुद्ध भोजन के पैकेट बिना लहसुन प्याज़ के जैन मंदिर में बनाए जा रहे हैं।
इनका वितरण गोविंदपुरम, दीनदयालपुरी, विजयनगर, राकेश मार्ग, नंदग्राम,…
View On WordPress
0 notes
ds-hospital · 2 years
Text
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 March 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ मार्च २०२० सायंकाळी ६.०० **** राज्यातलं सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार असून त्यासाठी जनतेनं सूचना कराव्यात, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिम��त्तच्या शुभेच्छा संदेशात त्यांनी हे आवाहन केलं आहे. आपल्या समाज माध्यमावरील खात्याद्वारे या सूचना करता येतील, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. **** कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वैद्यकीय मदत आणि अन्य सहकार्य मिळावं याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं खात्री करून घ्यावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. इराणमधील कोम शहरात चाळीसहून अधिक भारतीय नागरिक अडकले असून त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्यानं आपण या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी लक्ष घालावं, अशी विनंती केली असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. **** आजार होण्यापुर्वीच त्यांना प्रतिबंध घालणं आवश्यक असून आजारांविषयी जागृती आणि उपचार करण्यासाठी आता आरोग्य उपकेद्रांतही डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं एमआयटी हॉस्पिटल अॅ्ण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते. सर्वाधिक निधी आरोग्य योजनांवर खर्च व्हावा, अशी अपेक्षा यावेळी खासदार इम्तीयाज जलील यांनी व्यक्त केली. **** येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर मुंबईतील न्यायालयानं अकरा मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनलयाची कोठडी सुनावली आहे. डी. एच. एफ. एल. या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं सहाशे कोटी रुपयांचं कर्ज वितरित केल्याचा आरोप राणावर आहे. काही कंपन्यांना बेकायदेशीररित्या कर्ज दिल्यानंतर राणाच्या पत्नीच्या खात्यावर लाच मिळल्याचाही आरोप आहे. **** जागतिक महिला दिनी आज गडचिरोलीच्या मेंढा - लेखा इथं गावातल्या महिलांची सभा आयोजित करण्यात आली होती. यात महिलांनी महिला सक्षमीकरणावर चर्चा करुन सात ठराव पारित केले. **** महिलांचं मनोबल अधिकाधिक वाढावं या उद्देशानं आज वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे महिला दिनानिमित्त उपक्रम राबवण्यात आला आणि तुळशीराम जाधव शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिकत असलेल्या चारिका समाधान जाधव हिला एक दिवसाची पोलिस अधीक्षक बनवून पोलिस कार्य आणि प्रशासनाची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर पोलीस अधिक्षक वसंत परदेशी याच्या संकल्पनेतून, जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये एक दिवस विद्यार्थिनींना पदभार देऊन महिलांचा सन्मान केला. **** जालना औद्योगिक वसाहतीमधल्या ओम साईराम स्टील कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतल्या मृत आठ कामगारांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी अकरा लाख रुपये आणि एका वारसाला कारखान्यात कायमस्वरुपी नोकरी देण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं आज एका निवेदनाद्वारे याची माहिती देण्यात आली. या दुर्घटनेत जखमी कामगारांचा सर्व वैद्यकीय खर्च कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात येत असल्याचंही व्यवस्थापनानं म्हटलं आहे. चार दिवसांपूर्वी या कारखान्यातल्या लोखंड वितळण्याच्या भट्टीत स्फोट होऊन अकरा कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. **** गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं आयसीसी महिला टी -२० विश्वचषक विक्रमी पाचव्यांदा जिंकताना आज अंतिम लढतीत भारतावर ८५ धावांनी विजय नोंदवला. मेलबर्न इथं झालेल्या या सामन्यात ऑस्टेलियानं भारतासमोर १८५ धावाचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ ९९ धावांत बाद झाला. **** होळीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. आज मध्यरात्रीनंतर बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी गाडी सुटेल, तर हीच गाडी परतीच्या प्रवासासाठी दहा मार्चला दुपारी पावणेतीन वाजता रत्नागिरीहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी सुटेल. ***** ***
0 notes
omgdilipsoni · 5 years
Text
जोधपुर: सत्यम हॉस्पिटल में डायबिटिज, डेन्टल, पोषण व अस्थि रोग की निःशुल्क जांच की गयी
#जोधपुर: सत्यम हॉस्पिटल में डायबिटिज, डेन्टल, पोषण व अस्थि रोग की निःशुल्क जांच की गयी
#Jodhpur news:  विश्व मधुमेह दिवस पर जोधपुर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (जेएसपीएच)  एवं  सत्यम  हॉस्पिटल एण्ड रिसर्च सेंटर, जोधपुर  की संयुक्त सहभागिता से एक दिवसीय निःशुल्क जांच शिविर सत्यम अस्पताल परिसर में गुरुवार को आयोजित किया गया।
शिविर में 110 मरीजों को लाभान्वित किया गया । शिविर को सफल बनाने में डॉ. कामदार नेत्र अस्पताल का विशेष योगदान रहा। इसके अलावा एम एस डी फार्मा , अब्बोट हेल्थ केयर,…
View On WordPress
0 notes
sbsoni8761-blog · 6 years
Video
instagram
ये है डी एम के नेता सेल्वाकुमार , कैसे नर्स पर हॉस्पिटल में अपनी मर्दानगी दिखा रहा ...करतूत देखें इस हैवान की! दोस्तो इस विडियो को इतना शेयर करें कि ये गृहमंत्री राजनाथ और प्रधानमंत्री मोदी त�� पहूँच जाये ताकि इस दुष्ट को सजा दिलाई जा सके! निवेदक: एस एन रोहिल्ला एडवोकेट https://www.instagram.com/p/BozOeOslmlM/?utm_source=ig_tumblr_share&igshid=11ugshab5ecib
0 notes
ds-hospital · 2 years
Text
Tumblr media
0 notes
aajkareporter-blog · 7 years
Text
कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सर गंगा राम हॉस्पिटल में भर्ती, सायं 4 बजे मिली छुट्टी
कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सर गंगा राम हॉस्पिटल में भर्ती, सायं 4 बजे मिली छुट्टी
हिमाचल प्रदेश में होने वाली आगामी विधानसभा चुनाव को लेकर कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अपने शिमला यात्रा पे थी, शुक्रवार को राष्ट्रीय राजधानी वापस लायी गयी और पेट में गड़बड़ी की शिकायत के बाद उन्हें सर गंगाराम अस्पताल भर्ती किया गया। उनके पुत्र और पार्टी उपाध्यक्ष राहुल गांधी ने बताया कि चिंता की कोई बात नही है और अब वो पहले से काफी बेहतर है। सर गंगाराम अस्पताल के अध्यक्ष डी एस राणा ने हमने उन्हें…
View On WordPress
0 notes
topnews123 · 7 years
Text
ग्रेस पब्लिक स्कूल में फिजियोथेरेपी कैंप लगाया गया ।
ग्रेस पब्लिक स्कूल में फिजियोथेरेपी कैंप लगाया गया ।
जंडियाला गुरु 21 सितंबर (कुलज��त सिंह ):- ग्रेस पब्लिक स्कूल में अमनदीप हॉस्पिटल द्वारा फिजियोथेरेपी कैंप लगाया गया । इस कैंप में डॉ अमनदीप कौर ने घुटनों ,कमर ,जोड़ों ,सर्वाइकल की दर्द को कसरत द्वारा कैसे कम किया जा सकता है के बारे में जानकारी दी ।
इस अवसर पर डॉ अमनदीप कौर को स्कूल के एम डी डॉ जे एस रंधावा और प्रिंसिपल रमनजीत कौर ने हरिमन्दिर साहिब का चिन्ह देकर से सम्मानित किया ।इस मौके पर उनके…
View On WordPress
0 notes