Tumgik
#नामांतराचा
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार-सिल्लोड इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
जानेवारी ते मे दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी ५९६ कोटी रुपये मदत मंजूर
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात नेमबाज मनू भाकर अंतिम फेरीत, तर बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक
आणि
भारत श्रीलंका एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णित
****
रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दिव्या रामदास सपकाळ या महिलेचा अर्ज स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला आणि त्यावर तिची स्वाक्षरी घेऊन तो अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पुढील प्रक्रियेसाठी सुपूर्द केला. पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी, न्यायालय माझ्या बहिणींना न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...
“ही योजना आम्ही निवडणुकीसाठी आणलेली नाही. माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे. विरोधकांच्या पोटात दुखतंय. त्यांचा पराभव दिसू लागलाय. म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी. पण मला विश्वास आहे, माझ्‍या लाडक्‍या बहिणींवर कोर्ट, न्यायालय देखील अन्याय करणार नाही. तो देखील न्याय देईल.’’
राज्यातल्या महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणं हे सरकारचं ध्येय्य असून, ही योजना म्हणजे सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर असल्याची भावना व्यक्त करत, ही योजना कायम सुरू राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री युवा अप्रेंटिंसशीप योजना, मराठवाड्याचा दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तसंच वॉटरग्रीड प्रकल्पाचं पुनरुज्जीवन, विविध उद्योगांची उभारणी, आदी विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.
या कार्यक्रमापूर्वी सिल्लोड शहरातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.
**
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, आदर्श नागरी पतसंस्थेच्या शिष्टमंडळासोबत विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तसंच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. सोमवारपासून या ठेवीदारांना पैसे परत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज स्वीकारले जातील, पुन्हा इंग्रजीतून अर्ज करण्याची गरज नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला अर्जदारांनी बळी पडू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामांतराच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. शहरांच्या नामांतराचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे, तसंच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत सविस्तर आदेश दिले असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.
दरम्यान, या प्रकरणी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी अजून हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबद्दल भाष्य करण्यास नकार दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातील विविध भागात जानेवारी ते मे या कालावधीतील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ५९६ कोटी २१ लाख ९५ हजार रुपयांचा मदतनिधी वितरीत करण्यास राज्य सरकारनं मंजूरी दिली आहे. नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. पात्रता फेरीत तिने ५९० गुण मिळवत दुसरं स्थान गाठलं आहे. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत.
बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत काल लक्ष्य सेनने चीनी तैपेईच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. पहिला गेम १९-२१ असा गमावल्यावर लक्ष्यने जोरदार खेळ करत पुढचे दोन्ही गेम्स २१-१५, २१-१२ असे जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली.
ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारे हे दोघेही पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत.
हॉकीत काल भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तीन दोनने पराभव केला. कर्णधार हरमनप्रीतसिंहने दोन तर अभिषेकने एक गोल केला.
आज या स्पर्धेत नेमबाजी, तीरंदाजी, गोल्फ, नौकानयन, आदी प्रकारात भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिला सामना काल अनिर्णित राहिला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत आठ बाद २३० धावा केल्या. भारतीय संघही ४८ व्या षटकांत २३० धावांवर सर्वबाद झाला. मालिकेत पुढचा सामना उद्या होणार आहे.
****
५५ व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज १६ ऑगस्ट पर्यंत चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन दुचाकीस्वारांचा कालव्यात पडून मृत्यू झाला. आखाडा बाळापूर इथं घडलेल्या या घटनेत दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्याने ती कालव्याच्या कठड्यावर आदळून त्यावरील दोघे कालव्यात पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात स्तनपान सप्ताहाला परवापासून प्रारंभ झाला. स्त्री रुग्णालयामधील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसंच रुग्णांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४७ हजार ८४६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्यानं महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं अधिक सुलभ झालं आहे.
****
शेती विकास योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपमध्ये पिकांची अचूक नोंद करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
****
बीड काल स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यातून बीड मतदारसंघात शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचं, क्षीरसागर यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने काल शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसरात या अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थांचा लक्षणीय सहभाग होता.
****
लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता करात ऑगस्ट महिन्यासाठी ५% सुट योजना लागू केली आहे. संबंधित सर्व मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच रुग्ण आढळले. सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण आहेत, यापैकी केवळ एका रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवलं आहे.
****
अंबाजोगाई तालुक्यातील साकुड इथले रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा, स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान, १७ जुलैला त्यांचा मृत्यू झाला होता,
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Maharashtra : शिंदे सरकारची आज तिसरी कॅबिनेट; नामांतराचा निर्णय निकाली लागणार?
Maharashtra : शिंदे सरकारची आज तिसरी कॅबिनेट; नामांतराचा निर्णय निकाली लागणार?
Maharashtra : शिंदे सरकारची आज तिसरी कॅबिनेट; नामांतराचा निर्णय निकाली लागणार? Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
औरंगाबादच्या नामांतरावर राज्य सरकारच नाही गंभीर , केंद्रीय मंत्र्यांची संसदेत कबुली
औरंगाबादच्या नामांतरावर राज्य सरकारच नाही गंभीर , केंद्रीय मंत्र्यांची संसदेत कबुली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता सोडण्याच्या वेळी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबाद धाराशिव असे नामकरण केले होते त्यानंतर शिंदे सरकारनेदेखील औरंगाबादचे छत्रपती संभाजी आणि उस्मानाबादचे धाराशिव असा नामांतराचा निर्णय जाहीर केला मात्र या नावांना मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा लागतो तो अद्याप शिंदे सरकार यांनी सादर केलेला नाही अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे . मुख्यमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

ambajogaimirror · 2 years
Text
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला होता. 
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र : औरंगजेब तुमचा नातेवाईक कधीपासून झाला? ठाकरे सरकारच्या बदलीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी शिंदे सरकारला सवाल केला
महाराष्ट्र : औरंगजेब तुमचा नातेवाईक कधीपासून झाला? ठाकरे सरकारच्या बदलीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी शिंदे सरकारला सवाल केला
संजय राऊत (फाइल फोटो) राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले. यालाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. त्यात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच ठाकरे सरकारचे निर्णय थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ठाकरे सरकारने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 04 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं आतापर्यंतची सर्वात मोठी जनजागृती मोहिम हाती घेतल्याचं आयोगानं काल सांगितलं. विविध सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या संस्थांनी या जनजागृती मोहिमेसाठी आयोगाला सहकार्य केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६ पूर्णांक १४ टक्के, तर तर दुसर्या टप्प्यात ६६ पूर्णांक ७१ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे, मात्र हे प्रमाण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानापेक्षा कमी आहे, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी होत आहे. या टप्यात राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटण इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ��ातारा इथं प्रचारसभा घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. परराष्ट्र व्यापार संचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश त्वरित लागू होणार असून, त्यासाठी किमान ५५० प्रति मेट्रिक टन निर्यात किंमत असणं गरजेचं आहे. गेल्याच महिन्यात केंद्रानं सहा देशांना ९९ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
गाडे यांनी दलित अत्याचार स्कॉलरशीप गायरान हक्कांसाठी लढा दिला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. १९७७ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव मांडला. काँग्रेसच्या कार्यकाळात गाडे यांनी परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातल्या साखरीनाटे गावातल्या डोंगरी बंदरावर काल मतदान जनजागृतीसाठी नौका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात २० नौका सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघामधे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शाहीर आणि तमाशा कलावंतांच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम काल राबवण्यात आला. यावेळी मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं. श्रीरामपूर प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
****
सांगली इथं लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलं. सांगली जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. लातूर लोकसभा मतदारसंघातल्या 27 उमेदवारांनी यावेळी आपला खर्च तपासणीसाठी सादर केला.
****
परभणी इथलं जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर भरव��्यात येत आहे. सहा मे पासून १५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात खो-खो, बास्केटबॉल, रग्बी तसंच ॲथलेटीक्सच्या विविध प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू तसंच शाळांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघादरम्यान सामना होणार आहे. बंगळुरु इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mumbai University: राज्यपाल,”स्वातंत्र्यवीर सावरकर”, छात्रभारती,”शाहू महाराज”! वसतिगृह नामांतराचा वाद
Mumbai University: राज्यपाल,”स्वातंत्र्यवीर सावरकर”, छात्रभारती,”शाहू महाराज”! वसतिगृह नामांतराचा वाद
Mumbai University: राज्यपाल,”स्वातंत्र्यवीर सावरकर”, छात्रभारती,”शाहू महाराज”! वसतिगृह नामांतराचा वाद Mumbai University: या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे, असा प्रस्ताव राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला असतानाच छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मात्र छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केलीये. मुंबई : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) मागील काही…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
औरंगाबाद नामांतरावरून आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध!
Tumblr media
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना दुसरीकडे औरगांबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून आघाडीत धुसफूस सुरू झाले असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेच्या अनिल परब यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर काँग्रेस नाराज असल्याचे वृत्त आहे. आज सकाळी सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेचा एकही प्रतिनिधी सहभागी झाला नाही. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मांडला होता. त्याच प्रस्तावावर आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेसकडून शिवसेनेनं घेतलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेत बंड केलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही औरंगाबादच्या नामांतरावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेकडून दीर्घकाळ याची मागणी करण्यात येत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर या नामांतराचा मुद्दा भाजप, मनसेकडून उपस्थित करण्यात येत होता. पोलिस भरती प्रक्रिया तात्काळ राबविणार : वळसे पाटील दरम्यान, राज्यात आता ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती होणार आहे.पोलीस भरतीला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या भरती संबंधिची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या भरतीसाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. राजयतील पोलीस भरती ही दोन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुस-या टप्प्यातील सात हजार २३१ पदांसाठीची ही भरती आता करण्यात येणार आहे. काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुस-या टप्प्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या संबंधी प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात येणार असून तसे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. Read the full article
0 notes
rajnetanewscom · 4 years
Text
औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराचा वाद चिघळणार? CMO च्या ट्वीटमध्ये धाराशिव-उस्मानाबाद उल्लेख
मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद रंगलेला असताना आता उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दाही कळीचा ठरण्याची शक्यता आहे.  उस्मानाबादमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची माहिती देताना ‘धाराशिव-उस्मानाबाद’ उल्लेख करण्यात केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादशी संदर्भात निर्णय झाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 4 years
Text
#Ahmednagar #Congress #Maharashtra महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरांच्या नामांतरास केलेला विरोध जनतेच्या दृष्टीने स्वागतार्ह : पीपल्स हेल्पलाईन
#Ahmednagar #Congress #Maharashtra महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरांच्या नामांतरास केलेला विरोध जनतेच्या दृष्टीने स्वागतार्ह : पीपल्स हेल्पलाईन
अहमदनगर ः जी मंडळी कोरोनाच्या संकट काळात बिळात जाऊन लपून बसली, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर विकासाला चालना देण्याऐवजी अशा लोकांनी आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद,अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.जातीचा व पैशाचा वापर करून ही मंडळी सत्तेमध्ये आली.तर लोककल्याण, विकास वविवेकापासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years
Text
Aurangabad rename: औरंगाबाद विमानतळाचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज करा; मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र - aurangabad airport name change as chhatrapati sambhaji maharaj airport; cm uddhav thackeray writes letter to central
Aurangabad rename: औरंगाबाद विमानतळाचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज करा; मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र – aurangabad airport name change as chhatrapati sambhaji maharaj airport; cm uddhav thackeray writes letter to central
मुंबईः औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राज्यात राजकारण रंगलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर काढावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्यासंबंधी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना लिहलं आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes