Tumgik
#पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ. फ्रेजर बॉय हायस्कूल मैदानात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही सभा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगूर आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यार शिरपूर इथं प्रचारसभा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत.
****
नंदुरबारमध्ये आजपासून ८५ वर्षावरील तसंच दिव्यांग नागरीकांच्या गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी २६९ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एक हजार १५४ नागरीकांनी नोंदणी केली आहे.
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग, तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख फरार आरोपी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं, न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीने नव्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
****
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालयाने तीन ते सहा मे दरम्यान १२ वेगवेगळ्या घटनांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं सुमारे सहा किलोहून जास्त बजनाचं सोनं जप्त केलं. मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, रेडियम प्लेटेड बांगड्या आणि सोन्याचे बार, अशा विविध स्वरुपात हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल चार वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले, तर ४ जण जखमी झाले.
मेहकर- जालना रस्त्यावर किनगाव राजा जवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला.
अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
तर चिखली - जालना रस्त्यावर मालवाहक गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला.
****
व्हिएतनाम मध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. सचिन पाहवा आणि प्रियंका छाब्रा यांनी मिश्र दुहेरीच्या ३५ वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीने देखील सुवर्ण पदक जिंकलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे  शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, विदर्भात काल गोंदियासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या पाच दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Tumblr media
मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, बदलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा, मका हे पीक जमीनदोस्त झाले असून, सोंगणीला आलेल्या या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पुन्हा अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल सायंकाळ पासून काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात असलेल्या गहू, चना, संत्रा, आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. तसेच उकाड्यापासून त्रस्त शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा, असं चित्रही पाहायला मिळालं. जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना
मुंबई : राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१  कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Nanded : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली
Nanded : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली
Nanded : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली नांदेडमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नांदेड: सध्या नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतीत घुसल्याने हजारो हेक्टर…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई -प्रतिनिधी गेले दोन दिवस राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. कोकणात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरुच आहे. काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला तर जळगाव जिल्ह्यात पुराने मोठे नुकसान झाले आहे. येत्या 24 तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणातील पालघरमध्ये रेड अलर्ट तर ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांना फटका
सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांना फटका
सोलापूरः सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदारी हजेरी लावली आहे. शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. मंगळवारी व बुधवारी हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, व विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. विविध ठिकाणी निर्माण झालेल्या चक्रीय वात स्थितीमुळं हा पाऊस पडेल, असं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
अमरावतीत एक लाख हेक्‍टरवरील पिकांना फटका
अमरावतीत एक लाख हेक्‍टरवरील पिकांना फटका
Tumblr media
[ad_1]
अमरावती ः सप्टेंबरमधील संततधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार,  जिल्ह्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ८१२ हेक्‍टर क्षेत्रातील पिके उद्‌ध्वस्त झाली असून ४२ हजार ८५० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे.
जिल्ह्यात ६ लाख ८० हजार ७४० हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याचा कृषी विभागाचा अंतिम अहवाल आहे. यामध्ये मूग १५,९२९, उडीद ४९३३, कापूस २ लाख ४४ हजार, सोयाबीन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
११ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकित कुठेही अपप्रचार घडू नयेत, प्रलोभन तसंच आमिषांचा वापर होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून देखरेख ठेवावी, तसंच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी काल अकोला इथं मतदारसंघात यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या आढावा बैठकीत दिले.
निवडणुकीत कायदा, सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जावी, आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग यांनी सजग राहून चेक पोस्टवर तपासण्या कराव्यात,  असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले.
****
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी तसच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भात भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्यात नुकताच करार करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीच्या विकसनाचा, अंमलबजावणीचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च भारतीय स्टेट बँकेने उचलला आहे.
****
धार्मिक भावना भडकवणाऱ्या पाच जणांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करुन वादग्रस्त पद्धतीनं मजकूर तयार करणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत'सेल्फी विथ सिग्नेचर' ही विशेष मोहीम बीड जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. या मोहीमेत 'सेल्फी विथ सिग्नेचर' असे फलक लावण्यात येतील तसंच मतदानाबद्दल जनजागृती करण्यात येईल.
****
भंडारा जिल्ह्यात काल रात्री सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. आज सकाळी सुध्दा जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका भाजीपाला पिक तसंच आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे दोन हजार ८०० बचत गट निर्माण करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.
समृद्ध पर्यावरणासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन.
आणि
राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा प्रारंभ.
****
कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज दिले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे निर्देश यावेळी मदत आणि पुनर्वसन तसंच कृषी विभागाला देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावं. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना यानिमित्त प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे दोन हजार ८०० बचत गट निर्माण करण्याचा निर्णयही राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला. राज्यातल्या पंधराशे महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची पदं भरण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची मदत घ्यायचं यावेळी निश्चित झालं. यामुळं गट ब मधली अराजपत्रित, गट क आणि गट ड मधल्या ७५ हजार पदांच्या भरतीचा मार्ग सोपा झाला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं या बैठकीत ठरलं. यामुळं एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. भूविकास बँकेच्या मालमत्तांचं शासनाकडे हस्तांतरण केलं जाणार आहे. साखर कारखान्यांना गाळप क्षमता १२५० मेट्रीक टनांवरुन अडीच हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवण्यासाठी सरकार भाग भांडवल पुरवेल, असा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.
****
राजकीय आणि सामाजिक आंदोलनामुळं यंदाच्या ३० जून पर्यंत दाखल झालेले खटले मागे घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. ऐच्छिकरित्या वाहनं भंगारमध्ये काढणाऱ्यांना व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहेत. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळं शासनाला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे. ‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगानं वाढवण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण करण्यात आलं असून माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ विभागातील राजपत्रित पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आली आहेत. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचं भागभांडवल ३११ कोटी रुपये करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत २०० कोटींची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
समृद्ध पर्यावरणासाठी प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची मुंबईत शपथ दिली, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले –
अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान, क्लायमेट चेंज, ग्लोबल वार्मिंग हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचं समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करतीये आपलं निसर्गाशी अतूट असं नातं आहेच परंतु हे सण साजरे करत असतांना फटाक्याची आतिषबाजी जी काही दिवाळीत होते, त्याचं ध्वनी आणि हवेचं जे काही प्रदूषण वाढतं परंतु गेल्या चारपाच वर्षांपासून आपण प्रयत्न केल्यामुळे, जनजागृतीमुळे हे कमी होत आहे.
राज्यात एकल वापर प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासन जास्तीत जास्त प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी यात मोठा सहभाग घेऊन सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यामध्ये हातभार लावावा, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरुन पंधरा लाख रुपये करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाचा मराठा समाजातल्या तरुणांना मोठा फायदा होणार असून या योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
                                   ****
भारताला वैद्यकीय पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज अहमदनगर इथं पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या अत्याधुनिक वैद्यकीय आणि कर्करोग उपचार केंद्राचं लोकार्पण झालं, त्यावेळी मांडवीय बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडल्यामुळं देशातल्या आरोग्य व्यवस्थेत अमुलाग्र बदल होत आहेत असं मांडवीय यावेळी म्हणाले.
****
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. सुमारे अडीच हजार कोटी रुपये या अंतर्गत जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे बळीराजानं खचून जाऊ नये. राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करताना त्याची भरपाई थेट देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आलं असून सध्या सुमारे आठ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचं प्रमाणीकरण झालं आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचं सहकार मंत्री अतुल सावे यावेळी म्हणाले.
****
जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या अठरा वर्षीय रुद्रांक्ष पाटील याला रोख दोन कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्या अभिनंदनाचा ठरावही आज करण्यात आला. कैरो इथं झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतल्या दहा मीटर रायफल प्रकारात रुद्रांक्षनं सुवर्णपदक पटकवलं आहे.
****
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या पनवेल सचिवाला आणि इतर दोन सदस्यांना आज अटक केली. आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही अटक करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड-पनवेल जलद रेल्वे आज निर्धारित वेळेपेक्षा चार तास दहा मिनिटं उशिरा धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी सहा वाजून २० मिनिटांनी नांदेड इथून सुटणारी ही रेल्वे या विलंबामुळं रात्री साडे दहा वाजता सुटेल.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचा स्वच्छता मुकादम ईस्माईल शमशू पठाण याला सहा हजार रुपयांची लाच घेतांना आज अटक करण्यात आली. पठाण यानं सफाई कामगाराची गैरहजेरी सफाई निरीक्षकांना न पाठवण्यासाठी ही लाच मागितली होती, त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला लाचेच्या रकमेसह अटक केली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जबर तडाखा, गारपिटीने द्राक्ष बागांचे नुकसान
सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जबर तडाखा, गारपिटीने द्राक्ष बागांचे नुकसान
सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जबर तडाखा, गारपिटीने द्राक्ष बागांचे नुकसान सांगली जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जबर तडाखा बसला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खासकरून द्राक्ष बागांना गारपिटीचा तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अवकाळी पावसाचा फटका हापूसला, बाजारपेठेत आवक कमी
अवकाळी पावसाचा फटका हापूसला, बाजारपेठेत आवक कमी
अवकाळी पावसाचा फटका हापूसला, बाजारपेठेत आवक कमी यंदा अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदा इतर पिकांसह हापूस आंब्याला देखील अवकाळी पावसाचा फटका पडला आहे. त्यामुळे कोंकणातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून नवी मुंबईतील वाशी बाजार पेठेत येणाऱ्या हापूस आंब्याचा पेट्यांची आवक कमी झाल्यामुळे आणि दर तेवढेच…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा उत्पादकांना फटका
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा उत्पादकांना फटका
Tumblr media
[ad_1]
नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या पावसाने नगर जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसामुळे खरिपातील ८ हजार ६४९ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याशिवाय सुमारे १ हजार ११ हेक्टरवरील कांदा रोपांची नासाडी झाल्याचा अंदाज आहे.  जिल्ह्यात खरिपात साधारण २५ हजार हेक्टरच्या जवळपास कांदा लागवड झाली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०३ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** राज्याच्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस ** महिलांविरूद्धचे गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम सुरू ** हिंगोली, नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परीषद महाविकास आघाडी तर सांगली भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात. आणि ** इंदू मिलमधलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षांत उभारण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन **** राज्याच्या अनेक भागात काल गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. हिंगोली जिलह्यात आखाडा बाळापूर, वसमत, हयातनगर, वारंगा फाटा आणि नांदापूर परिसरात, नांदेड जिल्ह्यात माहूर, वाई, नांदेड या भागात हा अवकाळी पाऊस पडला. माहूर तालुक्यात काल पहाटे गारांचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. उस्मानाबाद जिल्ह्यातही काल पहाटे काही भागात गारपीट झाली. औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे. विदर्भातही नागपूर, वाशिम, अमरावती जिल्ह्यात काल पहाटे गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बोर, पेरू, डाळींब, आंबा या फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. **** राज्यात महिला आणि बालकांबाबतच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, महिला आणि बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवरचे गुन्हे रोखण्यासाठी ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम राज्यभरात सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला हा संदेश दिला. सायबर गुन्ह्यांचं वाढणारं प्रमाण चिंताजनक असून, त्याहीपेक्षा या गुन्ह्यांचं वारंवार बदलणारं स्वरूप जास्त गंभीर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ‘सायबर सेफ वुमन’ मोहीमेअंतर्गत आज राज्यभरात जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी व्याख्यानं, कार्यशाळा आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. **** शीख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी यांची जयंती काल सर्वत्र उत्साहानं साजरी झाली. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये या निमित्तानं झालेल्या शबद कीर्तन, गुरुग्रंथ पठण, लंगर वाटप आदी कार्यक्रमांत शीख बांधव भक्तीभावानं सहभागी झाले. यानिमित्त नांदेड इथं राष्ट्रीय स्तरावर गोल्डन हॉकी स्पर्धा घेण्यात आली. औरंगाबाद इथं यानिमित्त धावणी मोहल्ला इथल्या गुरुद्वार्यातून नगर किर्तन काढण्यात आलं. यात शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बिहारमध्ये पाटणासाहेब या गुरु गोविंदसिंह यांच्या जन्मस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये जगभरातून आलेले हजारो शीख बांधव सहभागी झाले. **** हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची ��त्ता कायम राहिली आहे. काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गणाजी बेले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनिष आखरे यांची निवड झाली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजपप्रणित आघाडीला पराभवाचा धक्का देत, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्राजक्ता कोरे, तर उपाध्यक्षपदी शिवाजी डोंगरे विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेना, रयत विकास आघाडी आणि घोरपडे गटानं भाजपला साथ दिली. नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नांदेडचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदांची आज निवडणूक होत आहे. **** बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या घेण्याचे मात्र निकाल १३ जानेवारीपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही के जाधव यांनी दिले आहेत. सभेला उपस्थित न राहिलेल्या सहा सदस्यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात या सदस्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे, त्यावर काल हा निर्णय दिला. पाच अपात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार बहाल न करण्याचा निर्णय न्यायालयानं कायम ठेवला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** मुंबईत इंदू मिलमधलं नियोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षांत उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. काल सकाळी स्मारक परिसराची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. १४ एप्रिल २०२२पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंड्याचे आमदार डॉ तानाजी सावंत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं उस्मानाबाद इथं शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची काल खासदार ओमराजे निंबाऴकर यांच्या कार्यालयात बैठक झाली. सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. **** जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणला सुरुवात झाली असून, बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेतलं कर्जखातं आणि बचतखातं आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर नगरपरिषदेनं तुळजाभवानी मंदिर परिसरात प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. प्लास्टिाक वापरणाऱ्या भक्तांची देखील चौकशी केली जात असून, दंड वसूल करण्यात येत आहे. **** नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचे हप्ते सुरळीत चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचं पोर्टलवरचं नाव हे आधार कार्डप्रमाणे असल्याची खात्री करावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातल्या चार लाख १९ हजार ३३२ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्याचं काम पूर्ण झालं आहे. **** बीड जिल्ह्यातल्या लाडझरी इथले भारतीय सैन्यदलातले जवान महेश तिडके यांच्या पार्थिव देहावर काल लाडझरी इथं शासकीत इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाबमधल्या भटिंडा इथं कार्यरत असताना, दाट धुक्यामुळे दुचाकीला अपघात झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. **** हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथं शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बसस्थानक परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. **** भारतीय कापूस महामंडळ -सीसीआयच्या माध्यमातून जालना आणि बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आतापर्यंत एकूण ८६ हजार ७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयनं कापसाला प्रतिक्विंटल साडेपाच हजार ते पाच हजार ३०० रुपयांपर्यंत दिला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ४५ कोटी ८२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ही कापूस खरेदी मार्चपर्यंत सुरू राहणार असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस खरेदीत वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत अठरा कैद्यांनी विविध अभ्यासक्रमासाठी पदवी प्रवेश परीक्षा दिली. कारागृहाच्या शिक्षण विभागात अनेक कैदी, टिळक मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. कैद्यांच्या भावी जीवनासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षणाचा लाभ होत असल्याचं कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितलं. **** राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डी पी त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्रिपाठी यांच्या निधनामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला उत्तम संसदपटू आपण गमावला, अशी भावना कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुऴे यांनीही दुख: व्यक्त केलं. त्रिपाठी यांचं काल सकाळी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते सदूसष्ठ वर्षांचे होते. **** अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुजय विखे, आमदार सुधीर तांबे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांनी वाघ यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. कृतिशील जीवन जगलेले वाघ यांच्या स्मृती चिरंतन राहतील, या शब्दात पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम; अमित शहा यांचा मुंबई दौरा स्थगित ** भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ** वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपनं बोलावलेली बैठक शिवसेनेकडून रद्द ** न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती; १८ नोव्हेंबरला घेणार शपथ आणि ** सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व जिल्ह्यात उद्या एकता दौडचं आयोजन **** राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम आहे. शिवसेनेनं सत्तेत बरोबरीच्या भागीदारीची मागणी केली आहे, त्यात मुख्यमंत्रीपद अडीच- अडीच वर्ष विभागून देण्याच्या मागणीचा समावेश आहे. दरम्यान, भाजप विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईत बैठक होत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी निरीक्षक असतील. राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. भाजप आणि शिवसेनेत सत्तेचं समान वाटपं करण्याचं ठरलं होतं, मात्र यात मुख्यमंत्री पदाचं समान कालावधीसाठी वाटप करण्याचा निर्णय झाला नव्हता, असं भाजपच्या सूत्रानं सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं. याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर आपल्यासमोर कोणताही निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. राज्यात आपल्या नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्यासोबतची भेटही रद्द झाली आहे. दरम्यान, राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत, असं राज्यसभेतले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. **** भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपाने बोलावलेली आजची बैठक शिवसेनेनं रद्द केली आहे. सत्ता वाटपाच्या पन्नास पन्नास टक्के वाटपाच्या समीकरणावर चर्चा झालेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणत असतील, तर चर्चेसाठी कोणताही मुद्याच नसल्याने, बैठक रद्द केल्याचं, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कॅमेऱ्यासमोर केलेलं विधान मुख्यमंत्री मान्य करत नसल्याचं, राऊत यांनी नमूद केलं. **** शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडावा, उपमुख्यमंत्रिपद घ्यावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी, असंही आठवले यावेळी म्हणाले. **** दरम्यान, सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून ठोस काही प्रस्ताव आला तर विचार केला जाईल, असं माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष स्वत:हून शिवसेनेकडे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. *** नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. बालदी यांनी या संदर्भातलं पत्र काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलं. **** न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते १८ नोव्हेंबरला आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार १७ नोव्हेंबरला संपणार आहे. न्यायमूर्ती बोबडे यांच्या पदाचा कार्यकाळ सतरा महिन्यांचा असणार आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. **** राज्याचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. त्यांच्याकडे देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच��या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होणार आहे. यानिमित्त राज्यात जिल्हा मुख्यालयं, महत्त्वाची शहरं असा विविध ठिकाणी रन फॉर युनिटी - एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. **** राज्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी अकोला इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बुलडाणा तालुक्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची काल कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागासोबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचना डवले यांनी केली. नांदेड जिल्ह्यातले भोकरचे आमदार अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना केली. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही काल नांदेड तालुक्यातल्या सावंगी, पुयणी, वाडी बुद्रुक, चिखली आदी गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचमाने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, पीक विमा कंपनीनं नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशी मागणी विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची शिवसेनेच्या वतीनं आज पाहणी करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व आमदार, नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे जिल्ह्यात आठही तालुक्यातल्या विविध गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. **** नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. यामुळे कांद्याचे भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. **** भाऊबिजेचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी पाड्यावर अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. काँग्रेस नेत्या डॉ स्वाती वाकेकर आणि डॉ संदीप वाकेकर यांनी आदिवासी बांधवाना ओवाळून भेटवस्तू वाटप केल्या. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान या गावातही स्वरानंद संचच्या वतीनं संगीत दिवाळी पहाट हा भावगीत, भक्तीगीत तसंच मराठी हिंदी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमानं भाऊबीज साजरी करण्यात आली. औरंगाबाद शहरात काल भाऊबिजेच्या दिवशी हेल्यांचा सगर काढला जातो. यावेळी पशुपालकांनी शहरातला बिबी का मकबरा, फकीरवाडी इथलं श्रीकृष्ण मंदीर आणि नवाबपुऱ्यात सजवलेल्या हेल्याचं पूजन करुन त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. सगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोटूळ ते लासूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचं एका स्थानिक शेतकऱ्यानं लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे मुंबई-नांदेड-हैदराबाद मार्गावरच्या गाड्यांची गती ताशी ३० किलोमीटरपर्यंत कमी केली जाणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल, असं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. **** पंढरपूर -रिसोड एस टी बसचा काल परळी शहराजवळ संभाव्य अपघात दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे टळला. या धावत्या बसच्या मागच्या दोन चाकांच्या जोडीपैकी एक चाक निखळून पडल्याचं पाहताच, गणेश यतोंडे आणि रोहित सातपुते या दोन तरुणांनी बसचा पाठलाग करून ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. बसमधल्या सुमारे साठ प्रवाशांनी या दोघांनी सतर्कतेनं अपघात टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 October 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.०० ****
भाजपनं शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यासंदर्भातील आश्र्वासन कधीही दिलेलं नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यावर त्यांनी गेल्या अठरा फेब्रुवारी रोजी एका पत्रकार परिषदेत या संदर्भात केलेल्या एका विधानाची चित्रफीत शिवसेनेनं आज समाज माध्यमांवर प्रसारित केली. मुख्यमंत्र्यांनी यावरील आपला शब्द फिरवला आहे, असं या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. या पार्श्र्वभूमीवर महायुतीतील या पक्षांमध्ये सत्तेतील वाट्यासंदर्भातील संघर्ष अद्याप कायम असल्याचं जाणवत आहे.
***
शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडावा, उपमुख्यमंत्रीपद घ्यावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी, असंही आठवले यावेळी म्हणाले.
***
राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे सुमारे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत, असं भाजप समर्थक राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
***
रिझर्व बँकेनं पंजाब आणि महारा���्ट्र सहकारी बँकेतील ठेवी सुरक्षित असल्याची खात्री द्यावी आणि या बँकेचं पुनरुज्जीवन करावं, अशी मागणी या बँकेच्या खातेदारांनी केली आहे. नवी मुंबईत रिझर्व बँकेच्या कार्यालयासमोर या बँकेचे खातेधारक आज जमा झाले होते, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं खातेधारकांच्या रक्कम काढण्यावर मर्यादा घातली आहे.
***
परतीच्या मुसळधार पावसामुळे विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती अकोला इथं पत्रकारांना दिली. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर, पातूर, बार्शीटाकली, तेल्हारा आणि आकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
***
बुलडाणा तालुक्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी काल कृषी, मृदा आणि जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी केली. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागाच्या यंत्रणेसोबत विमा कंपनी प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना डवले यांनी दिल्या. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहिम स्वरूपात पूर्ण करावे, असे निर्देश बुलडाणा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी यासंदर्भात आढावा बैठकीत काल दिले.
***
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातले नवनिर्वाचित आमदार मोहनराव हंबर्डे यांनी काल सोनखेड सर्कल मध्ये शेतावर जाऊन पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करतांना एकही शेतकरी विसरून राहू नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना हंबर्डे यांनी कृषि विभागाचे कर्मचारी आणि तलाठी यांना केली.
***
या नुकसानीच्या पार्श्र्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानाची माहिती वैयक्तिकरित्या संबंधित विमा कंपनीचे समन्वयक अथवा ज्या बँकेत विमा हप्ता भरला आहे, त्या बँकेकडे विहित नमुन्यात त्वरीत सादर करावी, असं वाशिम जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोटुळ ते लासुर रेल्वेरुळा दरम्यान एका स्थानिक शेतकऱ्यानं रुळाला तडे गेल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळं मुंबई-नांदेड-हैदराबाद मार्गावरील गाड्यांची गती कमी केली जाणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. अपघात टाळण्यासाठी या रेल्वे मार्गावरील गती मर्यादा ३० किमीपर्यंत निश्चित केली असुन, दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याची ग्वाही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
***
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील पाताळगंगा पुलावरून वाहून गेल्यानं एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी पाणी वाहत असतांना दुचाकीस्वार ज्ञानेश्वर मुंढे, या तरूणानं पुलावरून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला, त्यात तो पुरात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह एका झाडाला अडकलेला सापडला आहे.
//***********//
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २७  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वा.
राज्य विधानसभा निवडणुकीकरता आजपासून चार ऑक्टोरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. पाच ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत. एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. **** राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते आज दुपारी मुंबईत सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालय परीसरात जमा होऊ नये, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. मात्र ईडीनं आतापर्यंत पवार किंवा अन्य कोणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं नसल्याचं स्पष्ट केलं असून पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. **** औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव येत्या एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. *** कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. कश्यपनं पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण कोरियात इंचिऑन इथं सुरू असलेल्या य स्पर्धेत कश्यपनं काल मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा २१-१७, ११-२१, २१-१२ असा पराभव केला. **** सातारा जिल्यातील जोरदार पावसामु्ळं सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्याला दिलासा मिळाला आहे. मागील पंधरा वर्षात प्रथमच आटपाडी तालुक्यात पूर आला आहे. खानापूर तालुक्यातील सुलतानगादे धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** दरम्यान, नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबक आणि सुरगाणा इथं भात आ��ि नागलीची पिकं धोक्यात आली आहेत. अनेक तालुक्यांत बाजरी, मका आणि कांद्याची पिकं खराब झाली आहेत. काढणीवर आलेल्या भाता बरोबरच हंगाम पूर्व द्राक्ष पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. आद्रता वाढणार असल्यानं चाळीतील कांदा पिकं सडण्याची भीती कृषी खात्यानं व्यक्त केली आहे. ****
0 notes