Tumgik
#प्रवेशपत्र
newjobupdate27 · 3 months
Text
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेसासाठीच्या नीट परिक्षेतल्या गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परिक्षेप्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील कामकाज पुकारल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही विरोधकांनी नीट प्रकरणी चर्चेची मागणी लाऊन धरली. काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती जगदीप धनखड यांनी सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.  
****
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलै पर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारने आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अवकाळीमुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजाराहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करण्याऱ्या एन डी व्ही आय प्रणालीद्वारे नुकसानीचं मोजमाप होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी मागणी करतील तेवढा निधी मंजूर केला जाईल, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
पुणे पोर्शे काल अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांची आणि पुण्यात इतर पब्जवर केलेल्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. अंमली पदार्थांच्या सुळसुळ��टामुळे पुण्याचं नाव खराब होत असून, याप्रकरणी पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणाल्या दोषी पोलिसांना निलंबित केलं असून, पोलिस आयुक्तांनी अतिशय कार्यक्षमतेने कारवाई केल्याचं सांगत ही मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याला उत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रवींद्र धंगेकर, जितेंद्र आव्हाड यांनीही घोषणा देत सरकारचा निषेध केला.
****
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं जामिन मंजूर केला आहे. सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयानं गेल्या ३१ जानेवारीला अटक केली होती.
****
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक वर आगमन सेवा सुरु असून, तिथून होणारी उड्डाणे आज दुपारी दोन वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
****
नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणी लातूर पोलिस दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत. इरन्ना कोनगुलवार आणि दिल्लीतून सूत्र हलवणारा गंगाधर यांच्या माध्यमातूनच गुणवाढी संदर्भात आर्थिक व्यवहार केले जात होते अशी माहिती, याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी संजय जाधव याने चौकशीदरम्यान दिली. त्याचबरोबर प्रवेशपत्र सापडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही आता कसून चौकशी केली जात आहे.
****
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा पार पडली. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहोळा उद्या अलंकापुरीतून पंढरी���्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
****
नांदेड महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमेअंतर्गत काल दोन क्विंटल प्लास्टिक जप्त केलं, तर ६० हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेच्या विशेष पथकाने जुना मोंढा परिसरात ही कारवाई केली.
****
टी -ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बर्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. 
****
0 notes
samaya-samachar · 6 months
Text
परीक्षा केन्द्र खर्चको नाममा सिरहामा प्रधानाध्यापकद्वारा अवैध असुली
मुकेश कुमार यादव सिरहा, १० चैत।  सिरहाको एक सामुदायिक विद्यालयको प्रधानाध्यापकले माध्यमिक शिक्षा परीक्षा (एसइई)को परीक्षा केन्द्र खर्च भन्दै विद्यार्थीसँग अबैध रकम असुलि  गरेको पाइएको छ।   अर्नामा गाउँपालिका-२ जनता माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरीको प्रधानाध्यापक सरोज यादवले प्रति विद्यार्थी एक हजार देखि पाँच हजारसम्म परीक्षा केन्द्र खर्च असुल गरेको पाइएको हो।    परीक्षाको प्रवेशपत्र लिन पुगेका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marketingstrategy1 · 2 years
Text
Up Board Exam:हाईस्कूल व इंटरमीडिएट की परीक्षाओं की तैयारियां तेज, डबल लॉक में रखे जाएंगे प्रश्नपत्र - Paper Keep In The Dubble Lock
यूपी बोर्ड परीक्षा 2023 – फोटो : अमर उजाला ग्राफिक्स विस्तार यूपी बोर्ड की हाईस्कूल व इंटरमीडिएट की परीक्षाओं की तैयारियां तेजी पर हैं। अधिकांश विद्यालयों में प्रवेशपत्र बांटे जा चुके हैं। जबकि कुछ जगहों पर इनका वितरण जारी है। प्रायोगिक परीक्षाएं हो चुकी हैं। इसके साथ ही केंद्रों पर उत्तर पुस्तिकाएं भी पहुंच गई हैं। प्रश्नपत्र की सुरक्षा को लेकर बोर्ड सतर्क है। उसने केंद्रों पर प्रश्नपत्रों को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मुंबई विद्यापीठाच्या विधी परीक्षेत प्रवेशपत्रांचा सावळागोंधळ
मुंबई विद्यापीठाच्या विधी परीक्षेत प्रवेशपत्रांचा सावळागोंधळ
मुंबई विद्यापीठाच्या विधी परीक्षेत प्रवेशपत्रांचा सावळागोंधळ Law Exam:मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची सत्र परीक्षा तोंडावर आली असतानाही २२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणेच सुरू होते. त्यामुळे ते परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात होते. हा अडथळा सोडवून त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र बोर्ड अॅडमिट कार्ड: महाराष्ट्र बोर्डाने एचएससी अॅडमिट कार्ड जारी केले आहे, येथे डाउनलोड करा
महाराष्ट्र बोर्ड अॅडमिट कार्ड: महाराष्ट्र बोर्डाने एचएससी अॅडमिट कार्ड जारी केले आहे, येथे डाउनलोड करा
{“_id”:”6203bd9655a0e71d7d633b25″,”slug”:”Maharashtra-board-admit-card-2022-heres-how-to-download-maharashtra-hsc-hall-ticket-msbshse”,”प्रकार”:”वैशिष्ट्य- story”,”status”:”publish”,”title_hn”:”महाराष्ट्र बोर्ड ऍडमिट कार्ड: महाराष्ट्र बोर्ड एचएससी ऍडमिट कार्ड जारी केले आहे, येथे डाउनलोड करा”,”वर्ग”:{“title”:”शिक्षण”,”title_hn”: ” शिक्षण”,”स्लग”:”शिक्षण”}} एज्युकेशन डेस्क, अमर उजाला द्वारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kuldeepsonimp · 4 years
Link
बरकतउल्‍ला विश्‍वविद्यालय भोपाल मध्‍य प्रदेश 2020
Download Admit Card  10/09/2020
Download Question 10/09/2020 To 14/09/2020
Submitt Question book 15/09/2020 To 16/09/2020
1 note · View note
newjobupdate27 · 1 year
Text
How To download the Maharashtra Talathi Recruitment Admit Card
How To download the Maharashtra Talathi Recruitment Admit Card, follow the steps below: Visit the Maharashtra Government Revenue Department website. Click on the "Collect and Job" tab. Click on the "2023 Maharashtra Talathi Recruitment" link. Click on the "Download Admit Card" link. Enter your application number and date of birth. Press the "Download Admit Card" button. Your admit card will be downloaded to your computer.
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.
****
इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.
****
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे.  काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाह���र सभा घेतल्या आहेत.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.
****
भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
UGC NET फेज 2 परीक्षा सिटी लिंक उद्या सक्रिय होईल, प्रवेशपत्राची तारीख तपासा
UGC NET फेज 2 परीक्षा सिटी लिंक उद्या सक्रिय होईल, प्रवेशपत्राची तारीख तपासा
नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA 13 सप्टेंबर 2022 रोजी UGC NET फेज 2 परीक्षा सिटी लिंक सक्रिय करेल. परीक्षा सिटी लिंक उद्या NTA च्या अधिकृत साइट nta.ac.in वर सक्रिय केली जाईल. प्रवेशपत्र 16 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित उमेदवारांना ऑनलाइन प्रदर्शित केले जाईल. परीक्षा देणारे उमेदवार UGC NET च्या अधिकृत साइटवर परीक्षा केंद्र तपासू शकतात. UGC-NET ची अंतिम टप्पा 2 परीक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 (विलीन…
View On WordPress
0 notes
marketingstrategy1 · 2 years
Text
Ukpsc:आठ फरवरी को जारी होंगे Pcs मुख्य परीक्षा के प्रवेश पत्र, वेबसाइट पर होंगे अपलोड - Ukpsc: Admit Card For Pcs Main Exam Will Be Released On 8 February
उत्तराखंड लोक सेवा आयोग – फोटो : अमर उजाला फाइल फोटो विस्तार उत्तराखंड लोक सेवा आयोग की ओर से राज्य सिविल प्रवर अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा के लिए अभ्यर्थियों के प्रवेशपत्र आठ फरवरी को जारी किए जाएंगे। आयोग के सचिव जीएस रावत ने बताया कि पीसीएस मुख्य परीक्षा का प्रश्नपत्र नए सिरे से तैयार किया जा रहा, जिससे आयोग ने मुख्य परीक्षा तिथि को बदल कर 23 व 26 फरवरी 2023 को तय की है। इस परीक्षा के लिए आयोग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Agniveer Recruitment: अग्निवीर भरती! प्रवेशपत्र जारी,अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
Agniveer Recruitment: अग्निवीर भरती! प्रवेशपत्र जारी,अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
Agniveer Recruitment: अग्निवीर भरती! प्रवेशपत्र जारी,अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध 40 हजार पदांच्या भरतीसाठी यंदा 85 मोर्चे काढण्यात येणार आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या मोर्चांना सुरुवात होईल. अशावेळी उमेदवारांनी वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो. भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती (Agniveer Recrruitment)  रॅली सुरू होणार आहेत. संकेतस्थळावर अधिसूचनाही जारी करण्यात आली…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
MPSC गट क भरती मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, mpsconline.gov.in येथे डाउनलोड करा
MPSC गट क भरती मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, mpsconline.gov.in येथे डाउनलोड करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गट क भरती मुख्य परीक्षा 06 ऑगस्ट 2022 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. MPSC गट क भरती मुख्य प्रवेशपत्र जारी केले प्रतिमा क्रेडिट स्रोत: twitter महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क भरती मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thakurbabanews · 2 years
Text
नगर प्रहरीको प्रारम्भिक स्वास्थ्य परिक्षण र परिक्षा नेपालगन्जमा हुने मिति तोकियो
नगर प्रहरीको प्रारम्भिक स्वास्थ्य परिक्षण र परिक्षा नेपालगन्जमा हुने मिति तोकियो
३० साउन, बाँके : कोहलपुर नगरपालिकाको लागि आवश्यक नगर प्रहरीको प्रारम्भिक स्वास्थ्य परिक्षण (वेयरिङ चेक) र शारीरिक तन्दुरुस्ति परिक्षा कर्णाली प्रदेश प्रहरी तालिम केन्द्र नेपालगन्जमा हुने भएको छ। नगरपालिकाको सूचना अनुसार, आउने महिनाको भाद्र ४ गते शनिवार बिहान ९ बजेदेखि सुरु गरिने जनाएको छ। उक्त सूचनामा एक घण्टा अगाडी नै परीक्षार्थीहरु आ-आफ्नो प्रवेशपत्र सहित उपस्थित भ��सक्नु पर्ने बताएको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
नीट यूजी प्रवेशपत्र जाहीर
Tumblr media
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येर्णा­या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टसाठी प्रवेशपत्र जारी होण्याची विद्यार्थी ब-याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अखेर एनटीएने प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. यावेळी नीट यूजी २०२२ परीक्षेसाठी १८ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. १७ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. यासाठी परीक्षेसाठी उमेदवार थेट लिंकद्वारे प्रवेशपत्र पाहू शकतील. ते डाउनलोड करण्यासाठी त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरावे लागेल. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      राज्यात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ११ पथकं तैनात; ८ जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी.
·      संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वंकष विकास करण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न -उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही.
·      जम्मू काश्मीरमधील अनेक भागात पाऊस;अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित.
आणि
·      बर्मिंगघम कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा भारतावर सात गडी राखून विजय; मालिका दोन-दोनने बरोबरीत.
****
राज्यात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल - एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल - एसडीआरएफची ११ पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसंच एनडीआरएफची ९ आणि एसडीआरएफची ४ अशी एकूण १३ पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. आज त्यांनी कोकणातल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आवश्यक सूचना केल्या.
राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ८ जुलैपर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा तसंच जालना जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कुलाबा इथं ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सुरू असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सुमारे २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या सुमारे साडे बावीस टक्के इतकं आहे.
****
आपण आग्रह धरला असता, तर मुख्यमंत्रिपद सहज मिळालं असतं, पण सत्ता मिळवणं हे आपलं ध्येय नाही, त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा माझा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी मान्य केल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करून आपण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा असेल, असं फडणवीस यांनी सांगितलं. वैधानिक विकास मंडळ तसंच औद्योगिक वीज अनुदानाचा विषय, विदर्भ-मराठवाड्यातल्या मागास क्षेत्राचा विकास आणि संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वंकष विकास करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात सत्तांतर तसंच राष्ट्रपती निवडणूक यामुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तत्पूर्वी मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न असेल, असं, फडणवीस म्हणाले.
****
पूर्व उच्च प्राथमिक अर्थात पाचवीची शिष्यवृती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक अर्थात आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै २०२२ रोजी राज्यात सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र १ जुलैपासून संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी छापील प्रवेशपत्र सर्व परीक्षार्थींना तत्काळ वितरीत करावेत, परीक्षार्थी तसंच पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावेत, असं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या १९८ कोटी ९ लाख ८७ हजाराहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. दोन कोटी ५८ लाख ७५ हजार लचीकर सत्रातून हे उद्दीष्ट साध्य करण्यात आलं. आतापर्यंत तीन कोटी ६९ लाखांहून अधिक मुलामुलींना या लसीची मात्रा देण्यात आली.
****
जम्मू काश्मीरमधील अनेक भागात पाऊस सुरु असल्यामुळे अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात पुढील २४ ते ३६ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पहलगाम आणि बालटाल भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या ३० जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४० हजार २३३ भाविकांनी येथे भेट दिली आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्यांना आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या महापूजेचं निमंत्रण देण्यात आलं. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह मंदिर समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या सत्तांतरानंतर वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आज, मतदारसंघात परतले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात आणि आतिषबाजी करत त्यांचं जंगी स्वागत केलं.
शिंदे गटात जाण्याचा निर्णय आपण फक्त तालुक्याच्या विकासाठी घेतला. एकाच वेळी ४० आमदार एक भूमिका घेत असतील तर ही समजण्यासारखी गोष्ट असल्याचं बोरनारे म्हणाले. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोष देत नाही, मात्र त्यांच्या बाजूला असलेल्या चार बडव्यांना दोष देईल. क��रण याच लोकांनी आम्हाला बाजूला करण्याचं काम केलं. त्यामुळे आम्ही हा उठाव केल्याची प्रतिक्रिया आमदार बोरनारे यांनी दिली.
****
हिंगोलीतील शिवसेनेचे एकमेव आमदार संतोष बांगर हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोलीतील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. संपर्कप्रमुख आनंद जाधव या बैठकीला उपस्थित होते.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगघम इथं झालेला पाचवा कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडने सात गडी राखून जिंकला आहे. इंग्लंडच्या जो रूट्स आणि जॉनी बेस्ट्रो या दोघांनी अनुक्रमे १४२ आणि ११४ धावांची तडाखेबंद खेळी केली, त्यामुळे, इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या या विजयामुळे ही पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन - दोन अशी बरोबरीत सुटली. जॉनी बेस्ट्रो याला सामनावीर तर जो रूट याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आलेल्या या मालिकेतला पाचवा सामना कोविड प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला होता.
****
औरंगाबादच्या करमाड परिसरात दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे करणारी जालना शहरातील टोळी औरंगाबाद गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे. या टोळीनं नंदकिशोर जैस्वाल यांना आणि त्यांच्या साथिदाराला करमाड परिसरात अडवून त्यांच्याकडील दोन लाख २५ हजार रुपयांची रक्कम लुबाडली होती. या टोळीतल्या सात जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील तीन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात एक जुलै ते १५ जुलै या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जात आहे. दर वर्षी होणाऱ्या एकूण बालमृत्यूच्या सात टक्के बालमृत्यू अतिसारामुळे होत असतात. पावसाळ्यात याचं प्रमाण वाढत असतं. हे विचारात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने आशाताई आणि आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ओ आर एस चे पाकिट वाटप करत आहेत. अतिसार असलेल्या बालकांना १४ दिवसांसाठी झिंकची गोळी ही दिली जात आहे. या काळात बालकांना आणि पालकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावं यासाठी स्वच्छ हात धुण्याची प्रात्यक्षिकही घरोघरी करून दाखवली जात आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी याचा उपयोग होत आहे.
****
0 notes