Tumgik
#मालगाडीतून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चालत्या मालगाडीतून तेल चोरतानाचा VIDEO VIRAL
चालत्या मालगाडीतून तेल चोरतानाचा VIDEO VIRAL
चालत्या मालगाडीतून तेल चोरतानाचा VIDEO VIRAL बिहारमधील चोऱ्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे,हे पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बिहारमधून चोरटे चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत. नुकत्याच झालेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये बिहारमधील चोरांनी पाटण्याच्या प्रशासकीय उपविभाग बिहटा मधून जाणाऱ्या तेल टँकर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 November 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ८३ लाख ३५ हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. दरम्यान काल नवीन ३८ हजार ६१७ रुग्ण आढळल्यामुळे देशात कोविड रुग्णांची एकूण संख्या ८९ लाखांवर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत ४७४ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३० हजार ९९३ झाली आहे. या संसर्गाचा मृत्यूदर एक पूर्णांक ४७ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या ४ लाख ४६ हजार ८०५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
****
कोविडरुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा सरसकट वापर योग्य नसल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे. देशभरातल्या ३९ खासगी तसंच सार्वजनिक कोविड केंद्रांमध्ये केलेल्या चाचण्यांनंतर परिषदेनं ही बाब नमूद केली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९ लाख ३७ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात १२ कोटी ७४ कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
****
भाजप नेते राम कदम यांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. कदम यांनी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, तो दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.
गेल्या १६ एप्रिलच्या रात्री पालघर जिल्ह्यात गडचिंचले परिसरात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ कदम यांनी खार इथल्या आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधल्या संबंधित घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. या यात्रेपूर्वीच पोलिसांनी कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ७७६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४० हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर या आजारानं आतापर्यंत १ हजार १२० रुग्णांचा मृत्यू झाला असुन सध्या ५८२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात हपसापूर इथं एका शेतातून गांजाची एकूण ३४५ झाडे हट्टा पोलिसांनी जप्त केली आहेत. नामदेव सूर्यभान सवंडकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची अंदाजे दोन क्किंटल वजनाची ३४५ झाडं जप्त केली, या गांजाची किंमत सुमारे २१ लाख ८७ हजार २०० रुपये असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोकण रेल्वे विभागात कोलाड ते केरळ मार्गावर धावणाऱ्या रो-रो वाहतुकीच्या मालगाडीतून आज पहाटे एक ट्रक कोसळला. कोलाड इथून गोव्यातल्या वेर्णा इथं जाण्याऱ्या या ट्रकला बांधलेलं साखळदंड तुटल्यानं हा अपघात झाला. अपघातापूर्वी ट्रकचालकानं बाहेर उडी मारल्यानं, तो जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
****
वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कपाशीचं फरदड मुक्त अभियान सुरू आहे. कपाशीवर पडलेल्या गुलाबी बोन्ड अळीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी या अळीचा प्रभाव कपाशीवर होऊ नये यासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अंतर्गत कापूस वेचून झाल्यावर शेतातून कपाशीचे अवशेष काढून जाळून नष्ट केले जात आहेत.  
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत इथले माजी आमदार मुंजाजीराव जाधव यांच्या पत्नी निर्मला जाधव यांचं आज निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. सर्वोच्च न्यायालयातलं विधिज्ञ तथा भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या त्या मातु:श्री होत.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं २५ आणि २६ नोव्���ेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कृषी उद्योजक चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल, गायिका सरोजिनी देशपांडे, आणि दिव्यांग युवक योगेश खंदारे यांना प्रदान केले जाणार आहेत. या महोत्सवाच्या संगीत सभेत प्रसिद्ध गायक कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी हे दिवंगत शास्त्रीय गायक पं. जसराज यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून 'जसरंगी जुगलबंदी' सादर करणार आहेत. या समारोहाचं हे ३५ वं वर्ष आहे.
****////****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
रत्नागिरी : मालगाडीतून धूर, सुरक्षा तपासणी अन् मॉक ड्रिल असल्‍याचे रेल्‍वेकडून स्‍पष्‍ट
https://bharatlive.news/?p=170528 रत्नागिरी : मालगाडीतून धूर, सुरक्षा तपासणी अन् मॉक ड्रिल असल्‍याचे ...
0 notes