Tumgik
#मी वसंतराव
marathicelebscom · 1 year
Text
मी वसंतराव चित्रपटाचा JioCinema वर होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
मी वसंतरावने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात, 21 तारखेला JioCinema होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर   जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या ह्या सिनेमाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नव्हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
प्रत्येकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेटवण्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.
ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
नळदूर्गच्या अलियाबाद पुलाचं राष्ट्रीय स्मारक तसंच हुतात्मा बचिंतरसिंग यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार-केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांचं आश्वासन.
आणि
मराठी पत्रकार परिषदेचे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर.
****
प्रत्येक नागरिकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेटवणं अनिवार्य झालं असून, त्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भोपाळ इथं पहिल्या दोन दिवसीय अखिल भारतीय जल परिषदेचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केलं. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन अभियान हे राज्याच्या विकासाचे प्रमुख मापदंड असून, नागरीक, सामाजिक संघटनांनी जलसंधारणाशी संबंधित मोहिमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पाणी बचतीसाठी केंद्र सरकारने अटल भूजल संरक्षण योजना सुरु केली असून, या योजनेला आणखी व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.
****
ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, शिवाय स्थानिक उद्योगांना जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथं ऑरिक या औद्योगिक नगरीत आज या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारोहात मुख्यमंत्री दूरदृश्यसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून बोलत होते. ते म्हणाले –
वस्तूंची मागणी, रोजगार निर्मिती आणि उत्पादन या तिन्ही बाबत राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. याला सरकारचं उद्योगपूरक धोरणदेखील कारणीभूत आहे. या प्रदर्शनामुळे केवळ करोडो रुपयांची उलाढाल होणार नाही, तर स्थानिक उद्योगांना देशात आणि देशाबाहेरही ओळख मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास मला वाटतो.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी या वेळी बोलताना, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष्य गाठण्यात एमएसएमईची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मी एम एस एम ई बद्दल थोडंसं बोलणार आहे. कारण उद्योग हा अत्यंत महत्वाचा आहे. उद्योगांमुळे उत्पन्न वाढतं. देशाच्या तीस टक्के जीडीपी हा एम एस एम ई मुळे आहे. त्याचबरोबर जॉब क्रियेशनमध्ये एम एस एम ई महत्वाची आहे. सहा करोड जॉब एम एस इम ई मुळे मिळतात. आणि आपल्���ा देशाची फाईव्ह ट्रिलिलन जर बनवायची असेल तर एम एस एम ई चा अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलेल्या भाषणात लघु उद्योजकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील, असं आश्वासन देत, विकासाच्या बाबतीत मराठवाडा मागे राहणार नाही, असं नमूद केलं. हे प्रदर्शन राज्यातल्या इतर शहरातूनही भरवलं जावं, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –
तुमच्या शक्य असलेल्या सगळ्या मागण्या या शिंदे-फडणवीस सरकारकडनं मान्य केल्या जातील. या मराठवाड्याच्या भूमीतनं, या एक्स्पोमधनं अनेक उद्योजक निर्माण होऊ शकतात एवढी ताकत या एक्स्पोमध्ये आहे. आणि म्हणून हे मुंबईला झालं पाहिजे, पुण्याला झालं पाहिजे, नागपुरला देखील झालं पाहिजे, आमच्या कोकणामध्ये झालं पाहिजे. आणि नक्की उद्योग विभाग काय आहे, कशा पद्धतीनं इंडस्ट्री चालते, हे ग्रामीण भागातल्या उद्योजकांना देखील कळलं पाहिजे.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातल्या विविध शहरांमधून साडे सहाशेपेक्षा अधिक उद्योजकांनी आपापले स्टॉल उभारले आहेत.
****
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई शहर भेटीवर असून त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी झालेल्या संभाषणात योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या इथं महाराष्ट्र भवन उभारण्यास जागा देण्याची तयारी दर्शवली. आदित्यनाथ यांनी राजभवनात असलेल्या क्रांतिगाथा या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली तसंच संग्रहालयात असलेल्या शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन केलं. संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
****
महाराष्ट्रातली गुंतवणूक भाजपशासित उत्तर प्रदेशात पाठवण्याचा सध्याच्या सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी व्हावं यासाठीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, असा आरोपही पटोले यांनी केला. मुंबईत चित्रपटसृष्टीशी संबंधित उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याच्या प्रयत्नांना राज्य सरकार मदत करत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. 
****
लव्ह जिहाद विरुद्ध भाजप शासित राज्यात करण्यात येत असलेले कायदे हे घटनेतील हक्काचे उल्लंघन करणारे असल्याने बेकायदेशीर आहेत असा दावा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. सध्या देशपातळीवर लव्ह जिहाद विरुध्द कायदा करण्यासाठी काढण्यात येणारे मोर्चे कायदेशीर नसल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच देशात लव्ह जिहाद पेक्षाही बेरोजगारी-महागाई असे अनेक प्रश्न असून सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचा साक्षीदार असलेल्या नळदूर्ग इथल्या ऐतिहासिक अलियाबाद पुलाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळावी, तसंच या पुलाच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेले सैनिक बचिंतरसिंग यांचं याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथल्या अलियाबाद पुलाला भेट दिल्यानंतर बोलत होते. याचबरोबर त्यांनी हुतात्मा सैनिक बचिंतरसिंग यांच्या प्रतिमेचं पूजन करुन त्यांना अभिवादन केलं.
****
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी वर्तवला आहे. सोलापूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी काळात देशात समान नागरी कायदा येणार असल्याचं सूतोवाचही त्यांनी यावेळी केलं. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे जुन्या विषयांवर भाष्य करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटीप्पणी करण्याशिवाय दुसरं काही काम नसल्याची टीका मंत्री मिश्रा यांनी केली. काँग्रेसमुक्त भारत हे फक्त भाजपचं नव्हे तर जनतेचं अभियान असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबाद विभागातील पैठण, लातूर विभागातल्या औंढा नागनाथ यासह मोहाडी, धामणगाव, अमळनेर, जत, महाड, पुरंदर हे तालुका पत्रकार संघ मानकरी ठरले आहेत. स्मृतीचिन्ह, आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा लातूर जिल्ह्यात चाकूर इथं लवकरच होणार असल्याचं, परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.
****
शांकंभरी नवरात्र महोत्सवातील आजच्या सातव्या माळेनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. तसंच आज दुपारी शतचंडी होमहवनला आरंभ झाला त्यानंतर दुर्गासप्तशती पठणाचा कार्यक्रम झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
औरंगाबाद महानगरपालिकेतल्या सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानदा कुलकर्णी यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.
****
औरंगाबाद इथल्या एन्व्हार्यमेंटल रिसर्च फा��ंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी आणि एमआयटी संस्थेच्या वतीनं उद्यापासून नवव्या पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या तीन दिवसीय महोत्सवाचं उद्धाटन उद्या सकाळी अकरा वाजता एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या पक्षी महोत्सवाअंतर्गत परवा सात तारखेला सुखना धरण परिसरात पक्षी निरीक्षण तर आठ जानेवारीला जायकवाडी पक्षी अभारण्यात पक्षी निरीक्षण होणार असल्याची माहिती आयोजक डॉ.दिलीप यार्दी यांनी दिली आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत परवा मुंबईत झालेला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'मी वसंतराव'च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री !
‘मी वसंतराव’च्या निमित्ताने उलगडणार भाई आणि वसंताची मैत्री !
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफल ‘मी वसंतराव' १ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला...
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफल ‘मी वसंतराव’ १ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला…
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मोठे नाव म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. ठुमरी, दादरा आणि गझल हे हिंदुस्तानी गायकीचे प्रकार त्यांनी अत्यंत सहजतेने सादर केले. कला ही कलाकाराच्या आयुष्याचा आरसा आहे, असे मानणाऱ्या वसंतरावांनी आपले अवघे जीवन, शास्त्रीय संगीताबरोबरच मराठी नाट्यसंगीतासाठी अर्पण केले. आणि त्यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने, त्यांच्या भूमिकेने आणि गायकीने संपूर्ण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
skrafikhsir · 4 years
Photo
Tumblr media
🎓 महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद ,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री.अशोक ढवण सरांच्या हस्ते *महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद परभणी* शाखेचे *जिल्हा प्रवक्ता आणि सोशल मीडिया प्रमुख* म्हणून नियुक्ती करण्यात आली. *माननीय व्यंकटराव जाधव सर* ( प्रदेशाध्यक्ष:महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र) आणि स्थानिक पदा-धिकाऱ्यांनी जो विश्वास आणि स्नेह दाखवून अद्यापर्यंत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन मला उपकृत केलें त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. 💖 *आपलाच स्नेहाकिंत आभारी:* 🔰 *विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.* 🎓 _(Educator & Motivator)_ "Stay Hungry & Stay Foolish." 🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.* _"Nurturing Potential Through Education"_ The educational revolution movement initiatived By SK Rafikh Sir... 🔰 *A Foundation For Education , Knowledge and Development*✍🏻 📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:* 👍🏻 *Like My Facebook Page:* https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻 (at वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani) https://www.instagram.com/p/B6u85raHCtx/?igshid=1vnswrqdk3av0
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
वडार समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची आर्थिक तरतूद करणार - मुख्यमंत्री
वडार समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची आर्थिक तरतूद करणार – मुख्यमंत्री
वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपआराखडा तयार करून त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर वडार समाजाचा मेळावा झाला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘वडार समाजाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या…
View On WordPress
0 notes
Text
पालघरच्या कृतिकाचे कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश
पालघरच्या कृतिकाचे कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश #thane #swimming #competition #palghar #virar #krutika_vartak #individual_championship_trophy
जितू घरत : कै. श्री. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ, समन्वय प्रतिष्ठान ठाणे व ठाणे जिल्हा जलतरण संघटना आयोजित, मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे (प) येथे झालेल्या “कोकण विभागीय जलतरण स्पर्धा – २०१८” या स्पर्धेत पालघरच्या  कृत्तिका नंदन वर्तकने कोकण विभागामधून घवघवीत यश संपादित केले.
तिने १०० मी. Butterfly, १०० मी. Backstrock आणि २०० मी. Individual Medley (IM) मध्ये प्रत्येकी एक – एक सुवर्ण पदकाची…
View On WordPress
0 notes
veeritesblog · 7 years
Photo
Tumblr media
*****Pandit Abhisheki, Academic, Activist, Artiste , Composer & Singer .. ***the great exponent of Agra Gharana **but above all the only Hindustani Vocal Artiste who made enormous contribution in fusion of Gharanas, *revival of Marathi Musical Play or मराठी संगीत नाटक (Katyar Kaljaat Ghusli कट्यार काळजात घुसली .. The Dagger Pierced the Heart ), *great composing and singing of emotional lyrics or मराठी भावगीत, *singing of film songs (गोमू माहेरला जाते हो नाखवा)... ****************************************** The great Marathi playwright Purushottam Darvhekar, it seems , wrote his play Katyar keeping in his mind the great musical talent of Pt Abhisheki Buva. The play is notable on various grounds. It argues quite effectively through the plot that mad insistence of a Gharana or a particular musical style associated to a particular founder of that style and a particular geographical or cultural association with which his Gharana or origin is recognised.. such insistence that the style of one Gharana should never be mixed with the other Gharana .. such madness is harmful for the sustenance of Hindustani Classical Music itself. Pt Bhanushankar , Ustad Aftab Hussein Bareilleywaley , Sadashiv (a child and a grown up artiste) , Uma and Zarina these are the main characters. I have the audio tape of the stage performance No 211 with me. The play is not only written by Purushottam Darvhekar but it's also directed by him. I don't think anywhere in India such a playwright is there who had thorough knowledge of classical music, excellent command on dramatic technique and who has set his play in one part of India but the play moves between a Sansthan (a princely state) in North India and Miraj in Maharashtra. (I have already explained the great contribution of this town in my blog on Pu La Deshpande's Peston Kaka). Just because of the lack of translations of regional plays in India the great contribution of such playwrights is totally neglected. Until today , in the two hundred years history of Marathi Musical Plays (starting in Sangli by Bhave) there are almost least or no attempts to translate great plays like Sangeet - Sharada (a play on child marriage by Deval more than 100 years ago) Saubhadra, Sanyasta Khadga, Swayamwar , Preeti Sangam .. or any of these and many other Sangeet Nataks (musical plays) into English. If Katyar had been translated at least in Hindi , it would have rocked the Indian Stage, it would have been translated from Hindi into English. It's difficult but not impossible. The compositions can be retained in Marathi and just the dialogues can be translated. This was not done all these any decades but fortunately Subodh Bhave and Desai (in my tape , there is one Hemchandra Desai who is Asst Producer) brought this marvelous work of dramatic art in the most effective medium of cinema recently and it rocked. It captured young minds and attracted them to Natyasangeet. The plot of the play is like this. Pt Bhanushankar is the court room singer (दरबारी गायक) of a princely state in North India. It's most covetous position in contemporary India of British Times. However, he is totally devoted to music and has least regard for this so called Royal Status. He wants music to stay in the young hearts and each one must try to learn music as the search of his soul and not for the sake of honour. He once heard the performance of Ustad Aftab Hussein Bareilleywale. Those who have heard Pt Abhisheki and Pt Vasantrao Deshpande can imaging what type of great jugal bandi ..( simultaneous presentation of two artistes) it would have been .. because Pt Bhanushankar was performed by Pt Abhisheki and Ustad by Pt Vasantrao (who had stayed in the house of Begum Akhtar in Bara Bunky near Ayodhya just to learn Thumri .. the light aspect of classical .. I'm making these notes for the sake of my scholar friends in Bareilley like Dr Purnima Anil) .. the tape which I have has Pt Bhargavram Achrekar as Pt Bhanushankar. Panditjee invited Ustad Bareilleywale to the annual music competition in the state in which one who wins is given the honour of the courtroom singer. Ustad and his family came to stay in the state. His wife , like Macbeth's wife is quite ambitious lady. She mixed and offered some potion in Panditjee's food on account of which he lost his voice. Meanwhile Panditjee made a trip to Miraj to treat his I'll wife. There he used to perform his riyaz in a Shiva temple. Sadashiv who was a small child heard his riyaz and made an appeal to him to teach him music. Panditjee consented. Before Sadashiv came to the state Panditjee has lost his voice and also the position of the court room singer. Sadashiv makes same appeal to Ustadji who is now the court room singer. He has got the Katyar .. the dagger (very much a reminder of the dagger in Othello with which he kills himself) which he can now use to kill someone in exclusive situation and the state law will not punish him with a charge of a murder. (This reminded me of Shylock in Merchant of Venice who wanted to kill his rival Antonio but Portia saves him in the garb if a man lawyer , arguing that he can't shed a single drop of blood while taking a pound of flesh from the body of Antonio.. बूंद ना गिरा एक लहू का... लागी करेजवा कटार ... this whole concept, it seems to be taken from Merchant of Venice but it's so creatively and aesthetically mingled with the plot on Indian Music by Darvhekar that I want to grade him as the best contemporary Indian Playwright ... just waiting to be translated ) .. Ustad is about to use this special permission of murder to kill Sadashiv because he has mixed the style of Panditjee with the style of the Ustad .. Panditjee appears on the scene. Whether Sadashiv defeats Ustad in the competition and wins the status ..? for Sadashiv the applause of the audience and appreciation of his Guru is more important than any honour or wealth. Readers of the blog are requested to arrange audio performance of my tape for them in which further discussion can take place. The contribution of the playwright from Vidarbha region in Maharashtra.. Purushottam Darvhekar and his combination with excellent music composed by Pt Abhisheki from Goa .. all these things are par excellence in the field of music and Indian stage. Recently a very famous woman artiste (Jaipur Gharana) in Indian Classical passed away. The well known Marathi daily in its editorial did not even mention Pt Abhisheki. It shocked me. I wrote this note on Katyar on that day .. I first put in my so called whatsapp group , then on Facebook. Just one artiste, a faculty in the music Dept of Mumbai University, Mrudula Dadhe-Joshi commented on it. Many Marathi persons did not utter a single word on it. I was further unhappy. Therefore I added many more details and completed this blog. Which will probably be read by large number of people in the world. 17-5-17 at 5 am (sharing on FB ) Post Script in Marathi : हो हो , खूपच! तशी तर विदर्भाने संपूर्ण राज्याची सांस्कृतिक काळजी घेतली आहे , व चांगल्या रीतीने घेतली आहे, हेच कट्यार ने सिदध होते. आज सकाळी 'कट्यार ...' मूळ नाटकाची टेप ऐकताना मला पेपरला पत्र लिहावेसे वाटले, विदर्भातले दारव्हेकर ज्या style ने उर्दू मराठी लिहीतात आणि उत्तरेतल्या संस्थानातल्य बुवांना थेट मिरजेतल्या सदाशिवाला भिडवतात ... + गोव्याच्या अभिषेकींकडून अजरामर संगीत बसवून घेतात ... खॅांसाहेब कोण तर पुन्हा नागपूरचेच वसंतराव ... हा सगळा मेळ विदर्भ व त्यात नागपुराने घातला आहे हे बघून ... मला लिहावेसे वाटले की वेगळा विदर्भ झाला तर महाराष्ट्राचा आत्माच काढून घेतला जाईल .. कोल्हापूर मिरज गोवा (दक्षिण) , औरंगाबाद .... तिकडे हैद्राबाद व इकडे नागपूर (उत्तर) असा सर्व महाराष्ट्र संयुक्तच हवा, उलट बेळगाव गोवा त्यात हवे ... राजकीय लोकांना काही हे अपील होत नाही ... यशवंतरावांसारखे सांस्कृतिक व्यक्तिमत्व सध्याचे नेतृत्व दाखवते का ते बघावे लागेल .. पण मूळ 'कट्यार' ऐकताना दारव्हेकर अभिषेकी वसंतराव ...त्यांची महान प्रतिभा.. याची दखल अलिकडे एका प्रसिद्ध दैनिकाने घेतली नाही.... परवाच्या गायिकेविषयी लिहीताना त्या पेपरने या महान कलाकार पं अभिषेकी बुवा आणि या लेखकाची आठवण केली नाही ... ब्लाॅग लिहून मी अभिषेकी बुवांना आदरांजली वाहिली , भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूक भागवली ... अभिषेकी गोव्याचे व त्या गायिका देखील तेथीलच पण संगीत नाटकाला जीवदान देणारे , ताईंच्या अगोदर संगीतातल्या घराणेशाहीला विरोध करून या नाटकातून तो मांडणारे , नृत्यामधे Ph D असलेले बुवा मात्र महाराष्ट्र विसरला ... खूप वाईट वाटतं याचं ... : डाॅ आर् वाय् शिंदे , वाई ( लिटरेचर लॅंग्विजिस् वाॅट्सप् ग्रूप वरील मूळपोष्ट १९-४-१७, ब्लाॅग वर संपादन करून पुन:प्रकाशित १६-५-१७ पहाटे ५ वा )
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान.
स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ;शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणा.
औरंगाबाद इथल्या ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक.
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर.
आणि
तृतीयपंथियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडून व्यक्त.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून ‘सुमी’ चित्रपटाला पारितोषिक प्रदान करण्यात आला. ‘मी वसंतराव’ चित्रपटातल्या गायनासाठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं.
****
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या दिल्लीत शहरी स्वच्छता महोत्सवात स्वच्छ राज्यं आणि शहरांचा सन्मान करण्यात येणार आहे. विविध श्रेणींमधील १६० हून अधिक पुरस्कार यावेळी प्रदान केले जाणार आहेत
****
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ होण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा असून इच्छाशक्ती द्वारेच ही कामं साध्य होऊ शकतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, येणाऱ्या काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. स्वच्छता मोहितेत खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअप्सना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
या अभियानांतर्गत शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली. ०२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या ९० दिवसांच्या कालावधीत शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन शहरांना अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी तसंच पाच कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या कचरामुक्ती अभियानांतर्गत राज्यातली सर्व शहरं कचरामुक्त करणं अभिप्रेत आहे. त्यानुसार घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचरा संकलीत करणं, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करणं, वैयक्तिक शौचालयांसह, आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची उभारणी, आदी उद्दीष्ट निर्धारित करण्यात आली आहेत. येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचं अभियानही हाती घेण्यात आलं आहे.
या अभियानाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी राज्य शासनाने १२ हजार ४०९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून या अभियानातंर्गत शौचालयं उभारणी, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, मल जल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली आहे, रेपो दर आता पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्नातली वाढ १३ पूर्णांक पाच टक्के राहिली आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.
****
निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. सरसेनाध्यक्ष चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
सहावी भारतीय मोबाईल काँग्रेस उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होत आहे, या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी फाईव्ह-जी सेवेचा शुभारंभ करणार आहेत. फाईव्ह जी तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल. ४ आक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं वर्धा इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप, ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, तसंच ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह “हॅलो ऐवजी वंदे मातरम्” या अभियानाचे संकल्पक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मॅगसेसे पुरस्कार विजेते तसंच जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या अत्याधुनिक औद्योगिक वसाहत ऑरिक सिटीत आतापर्यंत सात हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली असून आठ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ऑरिकचे मुख्य व्यवस्थापक सुरेश काकानी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑरिक सिटीत आयटी आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात उद्योजकांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ऑरिक सिटीत आतापर्यंत १७४ भूखंडांचं वितरण झालं असून ५० उद्योगांचं काम प्रगतीपथावर असून लवकरचं हे उद्योग सुरु होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार राजकीय तसंच अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १३ नोव्हेंबरला औरंगाबाद इथं हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
तृतीयपंथियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं पाहिजे, असं आवाहन नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केलं आहे. नांदेड इथल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मिशन गौरी या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर कुलगुरू बोलत होते. किन्नरांना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाअंतर्गत ज्या सुविधा लागतील त्या, उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही कुलगुरू डॉ भोसले यांनी दिलं. किन्नरांप्रती असलेला संवेदनेचा धागा या लघुपटामार्फत अत्यंत कुशलतेने हाताळल्या बद्दल कुलगुरूंनी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांचं विशेष कौतुक केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही लहान मुले पळवून नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही असं जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. वास्तविक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडलेला नाही. चौकशीअंती या फक्त अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं कलवानिया यांनी सांगितलं. सामाजिक माध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपाला आज २९ वर्ष झाली. या भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना किल्लारी इथं आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अन्य अधिकारी तसंच ग्रामस्थांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करत, दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन केलं. पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य दृष्टीने शक्तिशाली होताना प्राणिमात्रांच्या कल्याणाचा देखील विचार केला पाहिजे असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई शहर आणि परिसरातील प्राण्यांसाठी सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णवाहिका आज रुजू झाल्या, राज्यपालांनी या रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 September 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली असून, आता रेपो दर पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण देशांतर्गत उत्पन्नातली वाढ ही अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून, ही वाढ १३ पूर्णांक पाच टक्के आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं.
कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्धाचा, जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातल्या ग्रामीण भागात मागणी वाढली असून, गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.
****
निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी देशाचे दुसरे सरसेनाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. सरसेनाध्यक्ष चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन युद्धातल्या हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं  वितरण होणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मराठी चित्रपट ‘फ्यूनरल’ ला गौरवण्यात येणार आहे, तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून ‘सुमि’ चित्रपटाला पारितोषिक देण्यात येईल. ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात येणार आहे.
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं आंतरराष्ट्रीय अमंली पदार्थाच्या तस्करीचं जाळं नेस्तनाबुत करण्यासाठी गरुड ही विशेष मोहिम सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरपोल आणि अंमली पदार्थ विरोधी दलाच्या समन्वयानं ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शोध मोहिम, धाडी आणि अटकसत्र राबवणार आहे. यामध्ये आतापर्यंत १७५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याक़़डून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
****
पावसाळा संपत असताना यंदा राज्यातल्या धरणांमधल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा कोकण विभागात सर्वाधिक ९३ पूर्णांक २२ टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागात सर्वात कमी ८७ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातली लहान मोठी ३४ धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.
****
कांदा निर्यातीबाबत केंद्र शासनाच्या धोरणामुळे उत्पादकांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप करत काल नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं. किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत खरेदी केलेला कांदा सरकारने बाजारात आणू नये, कांदा निर्यात बंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने भरपाई द्यावी, जीवनावश्यक वस्तुंच्या सुचीतून कांद्याला कायमस्वरुपी वगळण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्ह्यातल्या विकास कामांचा काल आढावा घेतला. विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. क्रीडा प्रेमी आणि खेळाडू यांच्या मागणीनुसार विभागीय संकुलामधल्या सर्व सुविधा दोन ऑक्टोबरपासून रविवारी सुद्धा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही भुमरे यांनी दिले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात ज्या शिधापत्रिकाधारकांची आधार क्रमांक जोडणी झालेली नाही, त्यांच्यासाठी जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दोन ऑक्टोबर रोजी विशेष शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी ही माहिती दिली. आधार क्रमांक जोडणी झाली नसल्यास त्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही भोसले यांनी दिला.
****
अहमदाबाद इथं सुरु असलेल्या ६३व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटीलने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं. यासोबतच राज्याचं सुवर्ण पदकाचं खातं देखील उघडलं आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष रग्बी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. राज्याच्या महिला खोखो संघाने यजमान गुजरात संघाचा एक डाव आणि सहा गुणांनी पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज संसदेत निरोप समारंभ;नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा सोमवारी शपथविधी
·      महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक स्टार्ट अप्सच्या माध्यमातून सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध
·      ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर;'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सुमी हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट तर राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार
·      राज्यातल्या ११५ नगर परिषदा आणि नऊ नगर पंचायतींसाठी २८ तारखेला तर महापालिकांसाठी २९ जुलैला ओबीसी आरक्षण सोडत
·      बंडखोर आमदार-खासदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी-युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचं आव्हान
आणि
·      वेस्ट इंडीजविरूद्ध पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा तीन धावांनी विजय
****
सविस्तर बातम्या
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आज संध्याकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. तर नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ येत्या सोमवारी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रविवारी देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी अनेक पद्म पुरस्कार विजेते आणि आदिवासी नेते उपस्थित होते.  
****
या वर्षात सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्ट अप्स सुरु झाले असून, त्यातून सर्वाधिक सुमारे दीड लाख रोजगार उपलब्ध झाल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारने २०१६ साली स्टार्ट अप इंडिया अभियान सुरु केलं होत. तेव्हापासून राज्यातले स्टार्ट अप उद्योग वाढत असून २०२२ साली त्यांची संख्या १३ हजार ५१९ झाली आहे. या स्टार्ट अप्स मुळे चालू वर्षात उपलब्ध झालेल्या रोजगारांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४६ हजार १३२ आहे. त्याखालोखाल कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.
****
विकसित आणि उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय रुपयाची स्थिती मजबुत असल्याचं, भारतीय रिझर्व बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बँक आँफ बडोदाच्या वार्षिक संमेलनात बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असून, महागाई दर स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचं सरासरी विदेशी कर्ज कमी होत असून परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्याची माहितीही दास यांनी दिली.
****
देशभरात सर्वोच्च न्यायालयाची विभागीय पीठं स्थापन करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या विचाराधीन असून, या संदर्भात निर्णय प्रतिक्षित असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं आहे. काल लोकसभेत प्रश्नकाळात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
युनिक आयडेन्टीफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया - यु आय डी ए आय नं देशभरातल्या पाच लाख ९८ हजार ९९९ बनावट आधार कार्ड रद्द केले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. गेल्या जानेवारी महिन्यापासून बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या ११ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मोबाईल क्रमांक, पत्ता किंवा फोटो आदी तपशील अपडेट करण्यासाठी यु आय डी ए आय च्या अधिकृत संकेतस्थळ तसंच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी, असं आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे.
****
६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला, तर गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ, सुराराय पोत्रू या तमिळ चित्रपटानं पटकावलं.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून काल नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अभिनेता अजय देवगण आणि तमिळ अभिनेता सूर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे.
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला, तर सायना चित्रपटातल्या गीतांसाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सिद्धार्थ मेनन, अभिनीत जून, किशोर कदम अभिनीत अवांछित, गोदाकाठ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म म्हणून गौरवण्यात आले आहेत.  टकटक या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी अनिश गोसावी, तर सुमी हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला असून, यातल्या भूमिकेसाठी आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकर प��रस्कार जाहीर झाला आहे. फनरल हा मराठी चित्रपट सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे . चित्रपटस्नेही राज्याचा पुरस्कार मध्यप्रदेश राज्याला जाहीर झाला आहे.
****
राज्यातल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून साडे सात लाख रुपये शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून, हे शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन महामंडळानं केलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ५१५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख २९ हजार ९१० झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ५१ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ४४९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ६७ हजार २८० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, काल बी ए फाईव्ह या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. हे दोन्ही रुग्ण परराज्यातले असून, सध्या ते पुणे जिल्ह्यात राहात आहेत. राज्यात या नव्या व्हेरियंट बाधितांची संख्या आता १६० झाली आहे.
****
मराठवाड्यात काल १६३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ५०, औरंगाबाद ४२, लातूर ३०, जालना १७, बीड १५, तर नांदेड जिल्ह्यातल्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या ११५ नगर परिषदा आणि नऊ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागासप्रवर्ग, मागासप्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी २६ तारखेला याबाबतची नोटीस जाहीर होणार असून, गुरुवारी २८ तारखेला आरक्षण सोडत काढली जाईल. २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत या आरक्षणावर हरकती दाखल करता येणार आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या महापालिकांमध्ये २९ जुलैला इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सीबीएसईने दहावी तसंच बारावी परीक्षेचे निकाल काल जाहीर केले. दहावी परीक्षेचा निकाल ९४ टक्के तर बारावी परीक्षेचा निकाल ९२ पूर्णांक ७१ टक्के लागला असल्याचं सीबीएसई मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.
****
हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
बंडखोर आमदार आणि खासदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, असं आव्हान शिवसेनेचे युवा  नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शिवसंवाद यात्रेत बोलत होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बंडखोरांनी पाठीत खंजीर खुपसला, ही गद्दारी राजकीय स्वार्थासाठी होतीच मात्र माणुसकीसाठीही होती, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
****
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन- स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत, राज्यभरातल्या बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी, पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी ही माहिती दिली. पायाभूत तसंच इतर सेवा-सुविधा, अंतर्गत रस्ते, सामाईक लिलावगृह, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीकरण, गोदाम, शीतगृह सुविधा, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, आदी निकषांवर ही क्रमवारी जाहीर होणार आहे.
****
औरंगाबाद इथं आज राज्यस्तरीय विधीज्ञ परिषद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती अभय ओक या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. शहरातल्या एमजीएम अभिमत विद्यापीठातल्या रुक्खिणी सभागृहात सकाळी दहा वाजता या परिषदेला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
दरम्यान, राज्याच्या महाअधिवक्तापदी मराठवाडातल्या विधिज्ञांना संधी देण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचच्या वतीनं करण्यात आली आहे. विकास मंचचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही मागणी केली. समन्यायिक प्रतिनिधित्वाच्या अनुषंगानं यासंदर्भात लक्ष घालणं अत्यंत आवश्यक असल्याचं दाते यावेळी म्हणाले. उद्या होत असलेल्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषदेत याबाबत चर्चा व्हावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रोहित यादव यांनी अमेरिकेतल्या ओरेगॉन इथं होत असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या 'अ' गटातल्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने ८८ पूर्णांक तीन नऊ मीटर आणि रोहीतनं ८२ पूर्णांक चार दोन मीटर अंतरावर भाला फेकला. या स्पर्धेत भारताच्या एल्धोज पॉल यानं पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
****
वेस्ट इंडीजसोबत कालपासून सुरू झालेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं तीन धावांनी जिंकला. त्रिनिदाद इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला बोलावलं, भारतीय फलंदाजांनी ५० षटकांत सात बाद ३०८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ सहा गडी गमावून ३०५ धावाच करू शकला. ९९ चेंडूत ९७ धावा करणारा शिखर धवन सामनावीर ठरला. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.
****
ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचं काल पुण्यात प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखनासाठी ते मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध होते. उद्या' नावाच्या त्यांच्या कादंबरिला २०२० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी तो नाकारला होता.
****
सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारण्याची सूचना अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी चौधरी यांना पत्राद्वारे केली आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसरात काल दुपारी १ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.
****
लातूर इथल्या साईबाबा जनता सहकारी बँकेच्या कामकाजावर रिजर्व्ह बँकेनं निर्बंध घातले आहेत. या बँकेला रिजर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय ठेवी घेणं किंवा कर्जवाटप करता येणार नाहीत. पुढच्या सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील.
****
जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी २०२२ च्या निवडणुकांसाठी गट आणि गणांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयांमध्ये सदर याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. मतदार याद्यांबाबत काही हरकती, सूचना असेल तर संबंधितांनी तहसील कार्यालयात येत्या २५ जुलैपर्यंत दाखल कराव्यात, असं सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हा अधिकारी शर्मिला भोसले यांनी कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार.
·      भारतीय नावीन्य निर्देशांकात ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर.
·      युआयडीएआय कडून देशभरातील सुमारे सहा लाख बनावट आधार कार्ड रद्द.
आणि
·      औरंगाबाद इथं उद्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषदेचं आयोजन.
****
६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला, तर गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आज नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अभिनेता अजय देवगण आणि तमिळ अभिनेता सूर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे.
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना मी वसंतराव या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला तर सायना चित्रपटातल्या गीतांसाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सिद्धार्थ मेनन अभिनीत ‘जून’, किशोर कदम अभिनीत ‘अवांछित’, ‘गोदाकाठ’ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म म्हणून गौरवण्यात आले आहेत. ‘टकटक’ या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी अनिश गोसावी, तर ‘सुमी’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकर पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘फनरल’ हा मराठी चित्रपट सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. चित्रपटस्नेही राज्याचा पुरस्कार मध्यप्रदेश राज्याला जाहीर झाला आहे.
****
नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६ पूर्णांक ६ शतांश गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचं अहवालात म्हटलं आहे. आज दिल्लीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. ‘मुख्य शहरांच्या’ श्रेणीत कर्नाटकाचा प्रथम क्रमांक असून यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ‘ईशान्य आणि डोंगरी प्रदेशातील राज्ये’ या श्रेणीत मणिपूर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. तर ‘केंद्रशासित प्रदेश आणि शहरी राज्ये’ या श्रेणीत चंडीगढ अग्रस्थानी आहे. महाराष्ट्र हे एक महत्त्वपूर्ण राज्य असून काही स्तंभात राज्यानं चांगलं प्रदर्शन केलं आहे, तर काही स्तंभात सुधारणेची आवश्यकता असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
****
विकसित आणि उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय रुपयाची स्थिती मजबुत असल्याचं भारतीय रिझर्व बैंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बँक आँफ बडोदाच्या वार्षिक संमेलनात बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत असून महागाई दर स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाचं सरासरी विदेशी कर्ज कमी होत असून परकीय चलनाचा पुरेसा साठा असल्याची माहितीही दास यांनी दिली.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३७ लाख सहा हजार ९९७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ३० लाख ९७ हजार ८१९ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ सीबीएसईचे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. देशात १६ विभागात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल ९२ पूर्णांक ७१ टक्के लागला असल्याचं सीबीएसई मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
देशभरात सर्वोच्च न्यायालयाची विभागीय पीठं स्थापन करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या विचाराधीन असून, या संदर्भात निर्णय प्रतिक्षित असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत प्रश्नकाळात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
युनिक आयडेन्टीफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडिया - युआयडीएआय ने देशभरातील पाच लाख ९८ हजार ९९९ बनावट आधार कार्ड रद्द केले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
गेल्या जानेवारी महिन्यापासून बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या ११ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मोबाईल क्रमांक, पत्ता किंवा फोटो आदी तपशील अपडेट करण्यासाठी युआयडीएआय च्या अधिकृत संकेतस्थळ तसंच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी, असं आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे.
****
हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. आजच्याच दिवशी १९४७ मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारला गेला होता, त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथं उद्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती अभय ओक या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. शहरातल्या एमजीएम अभिमत विद्यापीठातल्या रुक्खिणी सभागृहात सकाळी दहा वाजता या परिषदेला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
दरम्यान, राज्याच्या महाअधिवक्तापदी मराठवाडातल्या विधिज्ञांना संधी देण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचच्या वतीनं करण्यात आली आहे. विकास मंचचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली. समन्यायिक प्रतिनिधित्वाच्या अनुषंगाने यासंदर्भात लक्ष घालणं अत्यंत आवश्यक असल्याचं राजेंद्र दाते यावेळी म्हणाले. उद्या होत असलेल्या राज्यस्तरीय विधीज्ञ परिषदेत याबाबत चर्चा व्हावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातही काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिक इथल्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट - मेरीच्या भूकंप मापन यंत्रात या धक्क्यांची नोंद झाली. या भूकंपावेळी जमिनीत मोठा आवाज झाल्याचं नागरिकांना जाणवलं. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात रहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नंदुरबार पोलीस दलाकडून २५ हजार झाडं लावली जाणार आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते झाड लावून करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या आवारात विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते एक एक झाड लावण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक साहित्याचं एक दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागरिकांसाठी खुल्या असलेल्या या प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी सांगितलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन…”, अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट चर्चेत
“आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन…”, अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट चर्चेत
“आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन…”, अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट चर्चेत पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे. पण ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे वैयक्तिक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्य��� रविवारी होणारी पूर्व परीक्षा तुर्तास स्थगित
** कोविड लसींअभावी मुंबईतली अनेक लसीकरण केंद्र आज बंद
** परभणी इथं कोविड केंद्र तसंच लसीकरण केंद्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी
आणि
** औरंगाबाद इथं २३ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे ७३२ रुग्ण  
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातली कोविड स्थिती लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांची सुरक्षा, विविध राजकीय पक्षांचं या संदर्भातलं मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
****
कोविड प्रतिबंध लसीचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतली ७१ पैकी २६ लसीकरण केंद्र आज बंद आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. आज मुंबईत कोविड लसींच्या एक लाख ७६ हजार मात्रा पोहोचण्याची आशा आहे. जोपर्यंत लसीच्या या मात्रा मिळत नाहीत, तोपर्यंत लसीकरण स्थगित करावं लागल्याचं महापौरांनी सांगितलं.
नवी मुंबईतली खाजगी आणि महापालिकेची अशी सर्व लसीकरण केंद्र आज बंद ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत १ लाख ४३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. नवी मुंबईत कोरोना लसीकरणासाठी महापालिकेची २६ आणि १६ खाजगी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
****
राज्यपालांनी केंद्राकडे कोविड लसीच्या वाढीव मात्रा पुरवण्याची मागणी करावी, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यात हातावर पोट असलेला कष्टकरी कामगार तसंच छोटे व्यापारी अडचणीत आहेत, त्यांना थेट आर्थिक मदत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं, दरेकर यांनी यावेळी सांगितलं.
****
प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी, नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.  
नमस्क���र मंडळी मी पद्मजा फेणाणी जोगळेकर सध्या करोना पुन्हा फार मोठ्या प्रमाणात फैलावतोय तरी सर्वांनी स्वत:ची आणि घरच्यांची काळजी घ्या. विनाकारण बाहेर फिरु नका. इच्छा असूनही कोणाचा कोणाशी भेटण्याचा योग येत नाही. तरी आपण आपली आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. कारण ‘जान है तो जहान है’. घरी रहा सुरक्षित रहा. धन्यवाद.
****
राज्यात रक्ताचा तुडवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक काँग्रेसनं राज्यभर रक्तदान शिबिरं आयोजित करून, २५ हजार पिशव्या रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षीही युवक काँग्रेसच्या पुढाकाराने २८ हजार ५०० रक्तपिशव्यांचं संकलन केल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं घालून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच ही रक्तदान शिबीरं घेतली जातील, असही तांबे या वेळी म्हणाले.
****
पुणे इथं रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किंमतीनं विकत असल्याचं निदर्शनास आल्यानं महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातल्या तीन रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या मध्ये आदित्य बिर्ला रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय आणि पिंपरी इथल्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचा समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यातील रेमडीसेव्हर इंजेक्शनचा काळा बाजार रोखून खरेदी-विक्रीसाठी नियमावली तयार करुन पारदर्शकता आणावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचं पत्र संघटनेनं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं.
****
गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात काल आग विझवतांना मृत्युमूखी पडलेल्या तीन हंगामी वनमजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
देशात प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा प्रत्यक्ष कराच्या रुपात नऊ लाख ४५ हजार कोटी रुपये महसूल जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. या आर्थिक वर्षात दोन लाख ६१ हजार कोटी रुपये परतावा जारी केल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात कोविडच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज शासकीय रुग्णालयातल्या कोविड केंद्र तसंच लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शहरातील अन्य कोविड केंद्रांचीही या पथकानं पाहणी केली. कोविड केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत या पथकाने व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यापूर्वी आज सकाळी या पथकाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज २३ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २२ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत तर एक रुग्ण जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथला आहे. मृत रुग्णांमध्ये १२ पुरुष आणि ११ महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या ९४ हजार ३५ झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ७३२ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक २१६ रुग्ण बीड तालुक्यातले असून अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात प्रत्येकी १२७, केज ६७, गेवराई ५५, परळी ४८, माजलगाव ३५, पाटोदा २६, वडवणी आठ आणि शिरुर इथल्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
****
नाशिक इथले विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र हिरामण येवले यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. मागील १२ दिवसांपूर्वी कोविडची लक्षणं आढळल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
****
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पात्र नागरिकांनी कोविड लस घेण्याचं आवाहन परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी केलं आहे.
जिथं जिथं लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी उपलब्धतेनुसार आणि आपल्या क्रमानुसार विशेषत: जेष्ठ जे नागरिक आहेत त्यांनी प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावं आणि इतरांनी लस उपलब्ध होईपर्यंत शासनाने आणि आरोग्य यंत्रनेने घालून दिलेले सर्व नियम आणि निर्बंध यांचं कटाक्षानं पालन करावं.
****
औरंगाबाद जिल्हा प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सप्ताहांत टाळेबंदीसाठी सज्ज झाली आहे. औरंगाबादमध्ये स्थानिक नियमावलीनुसार आज संध्याकाळी आठ वाजेपासून सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत ही टाळेबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी जारी राहणार असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिकांना व��नाकारण बाहेर फिरता येणार नाही.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या कुठल्याही गाडीत तसंच रेल्वे स्थानकावर गर्दी सारखी परिस्थिती नाही. विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी ही माहिती दिली. कोविडपूर्वी विभागातून दररोज एक लाख दहा हजार प्रवासी रेल्वेतून प्रवास करत, सध्या मात्र प्रवासी संख्या दररोज साडे सात हजाराच्या जवळपास आहे. सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या गर्दीच्या चित्रफितींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
`इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएलच्या` १४ व्या स्पर्धेला आजपासून सुरवात होत आहे. यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी होणार आहेत. पहिला सामना सध्याचा विजेता मुंबई इंडियन आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू या दोन संघात चेन्नई इथं होणार असून, विजेतेपदाचा सामना ३० मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. गेल्यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आली होती. या वर्षीही कोविड संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांविना या स्पर्धा होणार आहेत.
//*********//
0 notes
skrafikhsir · 4 years
Photo
Tumblr media
🎓 महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद ,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री.अशोक ढवण सरांच्या हस्ते *महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद परभणी* शाखेचे *जिल्हा प्रवक्ता आणि सोशल मीडिया प्रमुख* म्हणून नियुक्ती करण्यात आली. *माननीय व्यंकटराव जाधव सर* ( प्रदेशाध्यक्ष:महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र) आणि स्थानिक पदा-धिकाऱ्यांनी जो विश्वास आणि स्नेह दाखवून अद्यापर्यंत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन मला उपकृत केलें त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. 💖 *आपलाच स्नेहाकिंत आभारी:* 🔰 *विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.* 🎓 _(Educator & Motivator)_ "Stay Hungry & Stay Foolish." 🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.* _"Nurturing Potential Through Education"_ The educational revolution movement initiatived By SK Rafikh Sir... 🔰 *A Foundation For Education , Knowledge and Development*✍🏻 📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:* 👍🏻 *Like My Facebook Page:* https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻 (at वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani) https://www.instagram.com/p/B6u8o67nLbU/?igshid=8x06t2vnvhjb
0 notes
skrafikhsir · 4 years
Photo
Tumblr media
🎓 महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद ,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री.अशोक ढवण सरांच्या हस्ते *महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद परभणी* शाखेचे *जिल्हा प्रवक्ता आणि सोशल मीडिया प्रमुख* म्हणून नियुक्ती करण्यात आली. *माननीय व्यंकटराव जाधव सर* ( प्रदेशाध्यक्ष:महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र) आणि स्थानिक पदा-धिकाऱ्यांनी जो विश्वास आणि स्नेह दाखवून अद्यापर्यंत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन मला उपकृत केलें त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. 💖 *आपलाच स्नेहाकिंत आभारी:* 🔰 *विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.* 🎓 _(Educator & Motivator)_ "Stay Hungry & Stay Foolish." 🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.* _"Nurturing Potential Through Education"_ The educational revolution movement initiatived By SK Rafikh Sir... 🔰 *A Foundation For Education , Knowledge and Development*✍🏻 📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:* 👍🏻 *Like My Facebook Page:* https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻 (at वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani) https://www.instagram.com/p/B6u8j4GHjlb/?igshid=ius324chio7f
0 notes