Tumgik
#यूपीआय
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर
महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं.
****
आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ॲप भूतान, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि फ्रान्स या सात देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जं त्यांच्या हस्ते देण्यात येतील तसंच योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले –
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना झाले
****
दरम्यान, स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंती पर्यंत राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात चालणारं हे अभियान “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले.
****
२७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’म्हणून साजरा केला जातो. ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज नं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा आज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली.
****
0 notes
mdhulap · 10 months
Link
एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार ! Ticket payment for ST travel can be paid online through UPI QR code!
0 notes
Text
देशात यूपीआय पेमेंटस्ची गगनभरारी!
https://bharatlive.news/?p=137879 देशात यूपीआय पेमेंटस्ची गगनभरारी!
कोल्हापूर, राजेंद्र जोशी : UPI Payment : ...
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
.
.
.
.
आणि
****
आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. या गावांमध्ये रस्ते, पिण्याचं शुद्ध पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत, असंही राज्यपालांनी नमूद केलं
****
एक हजार दिव्यांगांना ई-रिक्षासाठी मदत म्हणून १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. आज नागपूर इथं ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तीनचाकींचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत होते. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असून ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचं  येत्या  तीन  आणि  चार सप्टेंबरला मुंबईत आयोजन होत आहे. "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरवठा"हा या परिषदेचा विषय आहे. परिषदेमध्ये सहा मुख्य सत्रे आणि सहा उप-सत्रे होणार असून, शासकीय, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील व्याख्याते आणि पुरस्कार विजेते भाग घेणार आहेत.
****
लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला. गेल्या ४ डिसेंबरला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कर्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज हैदराबाद इथं दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या पार्थिव देहावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चव्हाण यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चव्हाण यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहतांना, जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेलं लोकाभिमुख नेतृत्व हरपलं, अशा शब्दात शोकभावना व्यक्त केल्या.
****
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने उद्या पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल देणार आहे.
****
गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग खड्डे मुक्त करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज या महामार्गाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. खड्डे लवकर भरले जावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. काम रखडण्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई तसंच चांगलं काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पळ न काढता उत्तर द्यायला हवं होतं, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेले ठाकरे यांच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी, ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आ���ा होता.
****
कल्याण इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
बीड जिल्ह्यातील कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतील चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी आज निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.
****
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून कर्ज मंजूर करण्यात आलं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. शहरातल्या पूजा पवार प्रकरणी दोषीवर कडक कारवाईची मागणीही पाटील यांनी केली आहे. 
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा आज समारोप होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी या कृषी महोत्सवाला आज भेट देऊन पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४८ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७२ हजार ८९० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंगापूर, दारणा धरणांसह नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी मथुरा-वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली असून, घरोघरी देखील मध्यरात्री  श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल.
छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आज जन्माष्टमी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
अकाउंट नंबर, ऑनलाईन देणगी महत्वाची माहिती
अकाउंट नंबर, ऑनलाईन देणगी महत्वाची माहिती
पंतप्रधान केअर फंड ऑनलाईन देणगी | पंतप्रधान काळजी निधी खाते क्रमांक | नागरी मदत आणि स्वयंचलित कॉशलेसमध्ये देणगी द्या पंतप्रधानांनी यूपीआय कोडची काळजी घेतली [email protected] प्रदर्शन सिटीजन असिस्टेंड आणि रिलिफ इन इमरजेंसी सिचुएशन फंड यानी पंतप्रधान काळजीवाहू निधी केंसंत आज दिनांक २ देश मार्च २०२० रोजी देशातील जनता कोरोना विषाणूचा लढाईत सहकार्याने प्रयत्नशील राहिली ती माननीय श्री. पीएम कॅर फंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years
Text
जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट
जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट
रिलायन्स जिओ ने आपल्या जिओ फोन युजर्सला मोठे गिफ्ट देत यूपीआय पेमेंट सपोर्ट देणे सुरू केले आहे. जिओ फोन मध्ये स्मार्टफोन यूजर्सप्रमाणे यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरू होते.
बीजीआरच्या रिपोर्टनुसार जिओ फोन युजर्सला यूपीआयचा सपोर्ट जिओ पे अ‍ॅपमध्ये मिळत आहे. सध्या हे फीचर्स ठराविकच युजर्सला मिळाले असून, हळूहळू अन्य लोकांना देखील याचा सपोर्ट मिळेल. जिओ…
View On WordPress
0 notes
Text
भाजीवाल्याकडे यूपीआय, पीएमपीमध्ये का नाही?
https://bharatlive.news/?p=130501 भाजीवाल्याकडे यूपीआय, पीएमपीमध्ये का नाही?
पुणे :  नोटबंदी झाली त्याला ...
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
देशातल्या यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या संख्येनं गेल्या महिन्यात नवा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात यूपीआयद्वारे दोन लाख कोटीपेक्षा अधिक रकमेचे १४० लाखांहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळानं दिली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यूपीआय व्यवहारांच्या संख्येत ४९ टक्क्यांनी, तर किमतीत ३९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
****
अग्निपथ योजनेची अंमलबजावणी ही सेना आणि राष्ट्र उभारणीत, युवा शक्ति राखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणांपैकी एक असल्याचं, सरसेनाअध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आयएनएस चिल्का मधल्या अग्निवीरांना संबोधित करताना ते काल बोलत होते.
****
तेलंगणामध्ये विधानपरिषदेच्या मेहबुबनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारत राष्ट्र समितीने विजय मिळवला आहे. बीआरएसच्या नवीन कुमार रेड्डी यांनी काँग्रेसच्या मान्न जीवन रेड्डी यांचा अवघ्या १०८ मतांनी पराभव केला.
****
गुजरात सहकारी दूध विपणन महामंडळानं अमूल दुधाचा दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढवला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली.
****
आसाममध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, १३ जिल्ह्यातल्या ५६४ गावांमधल्या पाच लाखाहून अधिक नागरीकांना पुराचा फटका बसला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, आठ हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती क्षेत्राचं नुकसान झालं आहे. राज्यात आतापर्यंत पावसाशी निगडीत विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात मालेगांवच्या रिधोरा इंटरचेंज जवळ नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातली असण्याची शक्यता असून, मृतकांची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
नांदेड शहर आणि परिसरात काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यासाठी पाच जूनपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 25 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
कोरोनाच्या जे एन-वन व्हेरियंटचे देशभरात तीन हजार ७४२ रुग्ण;नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन
महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून व्यक्त
सावनेरचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाकडून रद्द
नाताळ निमित्त सर्वत्र येशू जन्माच्या देखाव्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
      आणि
ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय
****
देशभरात कोरोनाच्या जे एन - वन या व्हेरियंटनं बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात कोरोनाच्या या नव्या स्वरुपानं बाधित एकूण तीन हजार ७४२ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोना प्रतिबंधक आणि सुरक्षाविषयक नियमांचं पालन करत राहावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. या व्हेरियंटचे महाराष्ट्रात नऊ रुग्ण असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून, आपण घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचं, सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल एक महिला कोरोना बाधित आढळून आली. सध्या शहरात चार बाधितांवर उपचार सुरु आहेत.
****
देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विकसित भारत यात्रेदरम्यान संवाद साधत होते. या यात्रेच्या माध्यमातून गरजूंना पायाभूत सुविधा प्राप्त हो��न, पुढच्या २५ वर्षांत देशाचा महासत्तेपर्यंत प्रवास पूर्ण होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...
दुनिया का सबसे बडा देश बनना हैं. तो इस साल सरकारी योजनाओं कों सौ प्रतिशत लोगों तक पहुंचा करके, विकास के गती को आगे बढाना है. बुनियादी चिजो का अर्थ है, यानी स्वस्थ का कार्ड पहुंच जायेगा. गरिब के लिए स्वनिधी योजना पहुंच जायेगी. अगर उज्वला योजना पुरी हो जायेगी,घर घर बिजली का काम पुरा हो जायेगा. हर एक के पास पंतप्रधान आवास पूरा हो जायेगा. तो इसके बाद, पच्चीस सालों मे भारत को महाशक्ती बनाने के यात्रा की ओर ले जायेगा. हमारा विकास ऐसा होना चाहिए देश मे, स्त्री पुरुष समानता हो,बल्की की विकास की गाडी मे महिलाओ की आर्थिक संपन्नता, महिलाओ को रोजगार के अवसर बढने चाहिए.
यादव यांनी या यात्रेदरम्यान, फळ विक्रे��ा तसंच शहाळे विक्रेता यांच्याशी संवाद साधला. फळ तसंच शहाळे खरेदी करून, त्यांनी यूपीआय पेमेंट द्वारे विक्रेत्याला पैसे अदा केले. जय भवानी नगर तसंच सातारा परिसर इथं झालेल्या कार्यक्रमात यादव यांनी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. जय तुळजा भवानी बचत गटाच्या महिलांनी आठ लाखांचं कर्ज घेऊन सुरू केलेल्या कापड दुकानासही त्यांनी सदिच्छा भेट दिली. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थींनी आपले अनुभव सांगितले.
****
नांदेड महापालिका हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. याअंतर्गत शहरातल्या हडको आणि नमस्कार चौक या भागात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
परभणी जिल्ह्यातलया बोरवंड बुद्रुक इथं काल या यात्रेदरम्यान, शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणी करून त्यांना कार्ड वाटप करण्यात आलं.
****
संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आलं असून, लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत काल सकाळी मुंबईत वरळी इथं स्वच्छता मोहिमेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
****
नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाने रद्द केलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यव्हार केल्याप्रकरणी, नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह इतर पाच जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सचिवालयाने केदार यांचं सदस्यत्व रद्द केलं.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून साजरी केली जात आहे. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणच्या चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करुन प्रार्थना करण्यात आली. या निमित्तानं चर्चच्या प्रांगणात येशूच्या जन्माचा देखावा उभारण्याची प्रथा आहे. आजही दिवसभर कॅरोल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह महासंघ निलंबित केला आहे. पुढच्या आदेशापर्यंत महासंघाला आपलं काम स्थगित करण्याचे निर्देश क्रीडा मंत्रालयानं दिले असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात काल चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं विजयासाठी दिलेलं ७५ धावांचं आव्हान, भारतीय संघानं दुसऱ्या डावात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती. सामन्यात सात बळी घेणाऱ्या स्नेहा राणा हिला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.
****
धाराशिव इथं २२ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचं आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते काल उदघाटन झालं. धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धा उद्यापर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक आणि मार्गदशक दाखल झाले आहेत. दरम्यान, या स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात आमदार कैलास पाटील तसंच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार विजेती तीरंदाज अदिती स्वामी, तिचे मार्गदर्शक प्रवीण सावंत, आंतरराष्ट्रीय तीरंदाज आर्यन गरड यांचा गौरव करण्यात आला.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली आहे. उप मुख्य प्रशासकपदी भाजपा जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अशासकीय प्रशासकीय मंडळात अन्य १४ जणांचा समावेश आहे.
****
लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काल हर घर दस्तक मोहिमेंतर्गत घरोघरी भेट देत प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना असलेल्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं, आश्वासन गोजमगुंडे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
११ ऑगस्ट २०२३ सकाळी ११.०० वाजता****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं काल चांद्रयान - तीननं पाठवलेली दोन छायाचित्रं प्रकाशित केली आहेत. यामध्ये चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर लॅण्डर हॉरिझॉन्टल वेलोसिटी कॅमेराने काढलेलं चंद्राचं छायाचित्रं, तसंच यानानं प्रक्षेपण केलं त्या दिवशीचं लँडर कॅमेऱ्यानं पृथ्वीच्या टिपलेल्या विहंगम छायाचित्राचा समावेश आहे.
दरम्यान, चंद्राच्या दिशेनं झेपावणाऱ्या या चांद्रयानाची कक्षा काल आणखी कमी झाली. आता चांद्रयानाचा सर्वात दूरचा परिभ्रमण बिंदू १ हजार ४३७ किलोमीटर आणि सर्वात जवळचा बिंदू १७४ किलोमीटर अंतरावर आहे.
****
आरोग्य आणि वैद्यकीय उत्पादनांची जाहीरात करताना वैद्यकीय व्यावसायिक म्हणून भूमिका करणाऱ्या मान्यवरांनी, आपण प्रमाणित डॉक्टर किंवा आरोग्य विषयक तज्ञ असल्याचं जाहीर करावं,असे निर्देश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिले आहेत. या क्षेत्रातल्या प्रसिद्ध मान्यवरांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या संदर्भात ग्राहकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच या उत्पादनांचा वापर करावा, असा निःसंदिग्ध इशारा जाहिरातीत दिला पाहिजे असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यसभेत काल फार्मसी सुधारणा विधेयक २०२३ मंजूर झालं. जम्मू काश्मीर फार्मसी कायदा २०२१ अंतर्गत नोंदणी झालेल्या व्यक्तीची नोंदणी, फार्मसी कायद्यांतर्गत होण्याची तरतूद या विधेयकात आहे. टपाल कार्यालय विधेयकही काल राज्यसभेत गोंधळातच मांडण्यात आलं.
****
पैशांच्या देवाणघेवाणीच्या डिजिटल पद्धतीतलं पुढचं पाऊल कॉनव्हर्सेशनल पेमेंटस म्हणजे बोलून यूपीआय व्यवहार करण्याचं तंत्रज्ञान वापरण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेनं मांडला आहे. सुरुवातीला हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलून हे व्यवहार करता येतील आणि नंतर अन्य भारतीय भाषांमध्येही सुविधा उपलब्ध होईल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. 
****
डासांमुळे होणाऱ्या हत्तीरोगाला आळा घालण्यासाठी वार्षिक देशव्यापी औषध मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सुरुवात केली. ही मोहिम महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये राबवली जाणार आहे.
//*************//
0 notes
Text
यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि काय आहेत त्याचे फायदे?
https://bharatlive.news/?p=117134&wpwautoposter=1691463911 यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि काय आहेत त्याचे फायदे?
पुढारी ...
0 notes
Text
यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि काय आहेत त्याचे फायदे?
https://bharatlive.news/?p=117134 यूपीआय क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि काय आहेत त्याचे फायदे?
पुढारी ...
0 notes
Text
SBI Server Down: एसबीआय सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाइन आणि यूपीआय सेवा प्रभावित
https://bharatlive.news/?p=80454 SBI Server Down: एसबीआय सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाइन आणि यूपीआय सेवा ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राष्ट्रीय स्तरावर बहुराज्य सहकारी निर्यात संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी भीम-यूपीआय’चा वापर करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
आर्थिक शिस्त न बाळगता सत्ताधारी पक्ष भरमसाठ घोषणा करत असल्याची विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मकर संक्रांत-भोगी हा दिवस राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याचं कृषी विभागाचं आवाहन
अजिंठा- वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ, प्रसिद्ध दिग्दर्शक समीक्षक अरुण खोपकर यांना पद्मपाणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उस्मानाबादचा मुंतजिर सरनौबत आणि पुण्याचा प्रतीक जगताप यांचा ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश 
आणि
भारत - श्रीलंका संघात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीनं सुरू करुन मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये सध्या ५५ हजारांपेक्षा अधिक पदं रिक्त आहेत. राज्य संवर्गातली सुमारे दोन हजार पदं संचालनालयामार्फत, आणि नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरची ‘क’ आणि गट ‘ड’ गटातली पावणे चार हजार पदं, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेतल्या निवड समितीमार्फत भरली जातील. मुंबई महानगरपालिकेतल्या सुमारे साडे आठ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे.
सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. डिसेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत इमारत बांधकाम परवानगीसाठी ॲपवर आधारित प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राष्ट्रीय स्तरावर बहुराज्य सहकारी निर्यात संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यांनी काल ही माहिती दिली. यामुळे देशातल्या सहकारी उद्योगांसाठी निर्यातीचं दालन खुलं होणार असल्याचं ते म्हणाले. या बरोबरच बहुराज्यीय सहकारी सेंद्रीय संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावाला, तसंच बहुराज्यीय सहकारी बियाणे संस्था स्थापन करायला देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या संस्थेच्या माध्यमातून शेती उत्पादनांमधली कमतरता भरुन येईल त्याचप्रमाणे शेतीचं उत्पादनही वाढू शकेल, असंही भूपेंद्र सिंग यांनी सांगितलं.
****
‘भीम-यूपीआय’ या डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपवरुन होणाऱ्या व्यवहारांवर, प्रोत्साहन म्हणजेच इन्सेटिव्ह देण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासोबतच तीन बहुस्तरीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.
केंद्र सरकारनं एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असं नाव दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला एक जानेवारीपासून मंजुरी दिली आहे. ८० कोटी गरीब आणि अतिगरीब लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
****
सत्ताधारी पक्ष कुठलाही विचार न करता, आर्थिक शिस्त न बाळगता भरमसाठ घोषणा करत असल्याची टीका, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज काल औरंगाबाद इथं अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून दाखल करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात पाऊण लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या, पुढच्या अधिवेशनात हा आकडा आणखी वाढेल, अशी शक्यता पवार यांनी वर्तवली. ते म्हणाले...
‘‘आजपर्यंत राज्याच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. ह्यांची पहिली पावसाळी अधिवशेनाची पुरवणी आणि आताची पुरवणी, दोन्ही पुरवणीची जर बेरीज मारली तर पाऊण लाख कोटीची आहे. अजून शेवटची पुरवणी मागणी मार्चची येणार आहे. ती बजट अधिवेशनाच्या आधीची येते. ती पंचवीस-एक हजारांची आली तर एक लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या? मग नियोजन काय? मग आर्थिक शिस्त काय? त्याच्यामध्ये जर असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ॲडिशनल एक लाख कोटी रूपये आले, तर हे पैसे कसे जमा होणार आहेत? मग पहिल्या कामाला काही कात्री लागणार आहे का? काहीच कळायला मार्ग नाही.’’
दरम्यान, सत्तेतील सरकारनं सूडबुद्धीने वागू नये, ईडीच्या प्रत्येक कारवाईमागे राजकीय रंग असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं काल छापे मारले. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. आपल्यावरचे सगळे आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले..
‘‘कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही, आणि नोटीस नाही ईडीची. या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही. यापूर्वी, चार वर्षांपूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या. किरीट सोमय्यांनी काही आरोप केले होते दीड वर्षांपूर्वी. आणि काही तक्रारी आणि पत्रकार परिषदा घेऊनसुद्‌धा त्यांनी काही आरोपसुद्‌धा माझ्यावर केलेले होते. त्याची सर्व उत्तरं मी तीन पत्रकार परिषदा घेऊन त्यावेळेला दिलेली होती.’’
दरम्यान, या कारवाई विरोधात मुश्रीफ समर्थकांनी काल कागल बंदची घोषणा दिली होती, मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं होतं.
****
विधान परिषदेच्या पाच जागांसाठीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याची घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. काल मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. अमरावती आणि नाशिकची जागा काँग्रेस लढवणार असून, कोकणात शेकाप, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि नागपूर इथं शिवसेना जागा लढवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी काल विक्रम काळे यांच्यासह सात जणांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत दहा जणांनी १७ अर्ज दाखल केले आहेत. उद्या अर्जांची छाननी होणार आहे.
****
शिवसेनेला पक्षांतर्गत निवडणुकीला परवानगी द्यावी, किंवा न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पक्षप्रमुख पदाची मुदत वाढवावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे. त्यापार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आल्याचं खासदार अनिक देसाई यांनी सांगितलं.
****
सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात हा पुरस्कार मिळाला असून, काल कॅलिफोर्निया इथं झालेल्या सोहळ्यात संगीतकार एम एम किरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
संयुक्त राष्ट्रसंघानं २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं मकर संक्रांत-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन”म्हणून साजरा करावा, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे. या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्र, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचं लागवड तंत्रज्ञान, यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांच्या उपहारगृहांमध्ये, पौष्टिक तृणधान्यांच्या वेगवेगळ्या रुचकर पाककृती तयार करुन, त्यांचा अंतर्भाव आरोग्यदायी पदार्थ या सदराखाली हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ पर्यटकांना वर्षभर उपहारगृहात उपलब्ध देणं, स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं प्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी हुरडा पार्टीचं आयोजन करणं, पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचं प्रदर्शन आणि विक्री करणं, यासारखे उपक्रम राबवण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दिल्या आहेत.
****
मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंगोत्सव साजरा करताना वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असं आवाहन महावितरणने नागरिकांना केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी, पतंग उडवताना वीजयंत्रणेमध्ये अडकलेला पतंग किंवा मांजा, लोखंडी सळई किंवा काठीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करू नये, यामुळे पतंगाच्या मांजामधील धातुमिश्रित आवरणामुळे विजेचा धक्का लागून अपघात तसंच जीवितहानी होऊ शकते. वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन, महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त दिला जाणारा यंदाचा पद्मपाणि जीवन गौरव पुरस्कार, प्रसिद्ध दिग्दर्शक समीक्षक अरुण खोपकर यांना प्रदान करण्यात आला. आठव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते या तीन दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन झालं. या उद्घाटन सोहळ्यात संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, आणि कमलकिशोर कदम यांच्या हस्ते, खोपकर यांना पद्मपाणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. औरंगाबाद शहरातल्या प्रोझोन मॉलमधल्या चित्रपटगृहात येत्या १५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात विविध देशांमधले अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
****
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उस्मानाबादचा मुंतजिर सरनौबत आणि पुण्याचा प्रतीक जगताप यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करत, वरिष्ठ गट माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात झालेल्या ८६ किलो वजनी गटात, नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना, स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. याच गटात सोलापूरच्या राहुल काळेने औरंगाबादच्या मोईन शेखला चितपट केलं. वाशीमच्या सचिन पाटीलने बीडच्या अनिकेत गोरे वर ४-१ अशी मात करताना स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला.
****
भारत आणि श्रीलंका संघात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज कोलकाता इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
****
राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जीवन देणाऱ्या नदीचं संवर्धन करावं लागेल, त्यातूनच मानवी जीवनाचा विकास घडेल, असा विश्वास रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत, लातूर जिल्ह्यात मांजरा नदी जलसंवाद यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी, ते काल बोलत होते. सारसा इथं मांजरा नदीवरील पुलावर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी काल या जलसंवाद यात्रेचं स्वागत केलं, बीड जिल्ह्यातून आणलेला यात्रेचा जलकलश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या जलकलशासह गावातून फेरी काढून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
****
महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात गेल्या नऊ महिन्यांत वीज चोरी विरोधातल्या धडक मोहिमेत, दोन हजार ५२९ प्रकरणं उघडकीस आली. यात वीजचोरांना चार कोटी ६१ लाख रुपयांची देयकं आकारण्यात आली आहेत. देयकं न भरल्यास वीजचोरांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत असून, १७५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद शहरवासियांचा २० वर्षांपासूनचा पाण्याचा त्रास थांबवा, तसंच संबंधित कंत्राटदाराच्या देयकाबाबत मूल्यमापन करावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या ओरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत. जायकवाडीपासुनच्या पाणी योजनेचं काम मागील चार महिन्यात केवळ दहा ते २० टक्केच झालं असून, यासंदर्भात नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने याचं मूल्यमापन करावं, असं न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी सांगितलं. यासंदर्भात पुढची सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे.
****
न्यायाधीशांच्या दिशेनं चप्पल भिरकावणाऱ्या आरोपीला नांदेड जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सहा महिने शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात काल दत्ता हंबर्डे या गुन्हेगाराला साक्षीसाठी बोलावलं असता, त्याने अचानक न्यायाधीश बांगर यांच्या दिशेनं चप्पल भिरकावली. त्यावर त्यांनी कुठलाही युक्तिवाद न करता आरोपीला आपल्या अधिकारात ही शिक्षा सुनावली.
****
बीड जिल्ह्यात काल राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन झालं. अंबाजोगाई इथल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र शासनातर्फे ११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे.
****
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने धडक दिल्यानं ते जखमी झाले. अमरावती जिल्ह्यात रहाटगावनजीक काल सकाळी ही घटना घडली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
‘भीम-यूपीआय’ वरून होणाऱ्या व्यवहारांवर इन्सेटिव्ह देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
वैनगंगा नळगंगा प्रकल्पातून मराठवाड्यालाही पाणी देणं शक्य - उपमुख्यमंत्र्यांना विश्वास.
सत्ताधारी पक्ष आर्थिक शिस्त न बाळगता घोषणा करत असल्याची अजित पवार यांची टीका.
भोगी हा सण “पौष्टिक तृणधान्य दिन”म्हणून साजरा करावा - कृषी विभागाचं आवाहन.
आणि
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उस्मानाबादचा मुंतजिर स���नौबत अंतिम फेरीत दाखल.
****
‘भीम-यूपीआय’ या डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपवरुन होणाऱ्या व्यवहारांवर, प्रोत्साहन म्हणजेच इन्सेटिव्ह देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासोबतच तीन बहुस्तरीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून’ गरिबांना मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.
****
विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, गरज भासल्यास मराठवाड्यालाही यातून पाणी देणं शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज अमरावती इथं पदवीधर मतदार संघ निवडणुकीत डॉक्टर रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या संवाद सभेला संबोधित करत होते. आम्हाला सत्ता ही फक्त समाजाच्या विकासासाठी हवी आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात पाच हजार शासकीय नोकऱ्या जाहीर केल्या. या नोकऱ्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला. आम्ही मात्र पदवीधरांचा विचार करून पन्नास हजार शासकीय जागा काढल्या आहेत. या सर्व जागा पारदर्शक पद्धतीने भरल्या जाणार असून कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
****
सत्ताधारी पक्ष कुठलाही विचार न करता आर्थिक शिस्त न बाळगता भरमसाठ घोषणा करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी केली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज औरंगाबाद इथं अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून आज दाखल करण्यात आला. त्यानंतर पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात पाऊण लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या, पुढच्या अधिवेशनात हा आकडा आणखी वाढेल, अशी शक्यता पवार यांनी वर्तवली. ते म्हणाले –
आजपर्यंत राज्याच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. ह्यांची पहिली पावसाळी अधिवशेनाची पुरवणी आणि आताची पुरवणी, दोन्ही पुरवणीची जर बेरीज मारली तर पाऊण लाख कोटीची आहे. अजून शेवटची पुरवणी मागणी मार्चची येणार आहे. ती बजट अधिवेशनाच्या आधीची येते. ती पंचवीस-एक हजारांची आली तर एक लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या? मग नियोजन काय? मग आर्थिक शिस्त काय? त्याच्यामध्ये जर असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ॲडिशनल एक लाख कोटी रूपये आले, तर हे पैसे कसे जमा होणार आहेत? मग पहिल्या कामाला काही कात्री लागणार आहे का? काहीच कळायला मार्ग नाही.
दरम्यान, सत्तेतील सरकारने सूडबुद्धीने वागू नये. ईडीच्या प्रत्येक कारवाईमागे राजकीय रंग असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर आज सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापे मारले. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. आपल्यावरचे सगळे आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले –
कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही, आणि नोटीस नाही ईडीची. या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही. यापूर्वी, चार वर्षांपूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या. किरीट सोमय्यांनी काही आरोप केले होते दीड वर्षांपूर्वी. आणि काही तक्रारी आणि पत्रकार परिषदा घेऊनसुद्‌धा त्यांनी काही आरोपसुद्‌धा माझ्यावर केलेले होते. त्याची सर्व उत्तरं मी तीन पत्रकार परिषदा घेऊन त्यावेळेला दिलेली होती.
दरम्यान, या कारवाई विरोधात मुश्रीफ समर्थकांनी कागल बंदची घोषणा दिली आहे, हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.
****
माजी मंत्री बच्चू कडू यांना आज सकाळी अमरावती इथं रस्ता ओलांडताना भरधाव असलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. अमरावती इथल्या खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर इथं हलवण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या शैक्षणिक कामाचं मूल्यांकन करण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे. अॅकॅडमिक परफॉर्मेन्स इंडिकेटर-एपीआयद्वारे हे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचं आज सकाळी दीर्घ आजारपणामुळे निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मुळच्या कुसुम सुखटणकर यांनी आपली बहीण कुमूद यांच्यासोबत १९४५ मध्ये मराठी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. ग. दि. माडगुळकर यांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असं ठेवलं होतं. ‘लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’ ‘राम राम पाव्हणं’ या जुन्या चित्रपटांसह ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ ‘टिंग्या’ हे त्यांचे अलीकडच्या काळातील गाजलेले चित्रपटं आहेत.
****
सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात हा पुरस्कार मिळाला असून, आज कॅलिफोर्निया इथं झालेल्या सोहळ्यात संगीतकार एम एम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
संयुक्त राष्ट्रसंघानं २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं मकर संक्रांत-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे. या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्र, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचं लागवड तंत्रज्ञान यांच�� माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांच्या उपहारगृहांमध्ये पौष्टिक तृणधान्यांच्या वेगवेगळ्या रुचकर पाककृती तयार करुन त्यांचा अंतर्भाव आरोग्यदायी पदार्थ या सदराखाली हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ पर्यटकांना वर्षभर उपहारगृहात उपलब्ध देणं, स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं प्रादेशिक कार्यालयाच्या ठिकाणी हुरडा पार्टीचे आयोजन करणे, पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन आणि विक्री करणे यासारखे उपक्रम राबवण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक श्रद्‌धा जोशी यांनी दिल्या आहेत.
****
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उस्मानाबादचा मुंतजिर सरनौबत आणि पुण्याचा प्रतीक जगताप यांनी आप��पल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करत वरिष्ठ गट माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्यापूर्वी सकाळच्या सत्रात झालेल्या ८६ किलो वजनी गटात नांदेडच्या विजय पवारने उस्मानाबादच्या हर्षवर्धन लोटकेला थेट चितपट करताना स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.
****
फॉरेन लँग्वेज असोसिएशन तर्फे डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या, फ्रेंच भाषा परीक्षेत, ५वी ते ७ वी गटात औरंगाबाद इथल्या, हर्सूल महानगरपालिकेच्या केंद्रीय शाळेतल्या आर्यन राजगुरे याने देशात अकरावा आणि जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. त्याच्या या यशाबद्दल मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपायुक्त नंदा गायकवाड शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी अभिनंदन केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं १९ आणि २० जानेवारी रोजी दोन दिवसीय पद्मभुषण कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंडित शौनक अभिषेकी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तुम्ही फोनपे, गुगलपे पेटीएम वापरताय का? तुमचं अकाउंट दुसरं कुणी वापरतंय का?
तुम्ही फोनपे, गुगलपे पेटीएम वापरताय का? तुमचं अकाउंट दुसरं कुणी वापरतंय का?
तुम्ही फोनपे, गुगलपे पेटीएम वापरताय का? तुमचं अकाउंट दुसरं कुणी वापरतंय का? Author,पूर्णिमा तम्मारेड्डी यूपीआय, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे डिजिटल पेमेंट्स सेगमेंटमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.   बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात…
View On WordPress
0 notes