Tumgik
#रोडवर
6nikhilum6 · 13 days
Text
Talegaon : गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
एमपीसी न्यूज – गांजा बाळगल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एका तरुणाला अटक (Talegaon) केली. त्याच्याकडून 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 11) तळेगाव-चाकण रोडवर मधुबन सोसायटी जवळ करण्यात आली. संदेश दत्तात्रय ठाकरे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मुरलीधर कोकतरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/santatadhar-in-mumbai-water-entered-many-societies-school-holidays/
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
ओडिशातल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात
ऊर्जा विभागाच्या तिनही कंपन्यांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि सर्व भत्त्यांमध्ये वाढ
येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची - छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन
पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन २४ तास सुरु राहणार
आणि
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांचे तीनही रथ ओढण्यास प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. प्रथेला फाटा देत यावेळी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र या तिन्ही भावंड देवतांचा समावेश असलेले अनेक विधी एकाच दिवशी केले जातील. जगन्नाथाची रथयात्रा एक दिवसाची असते, परंतु विशिष्ट खगोलीय व्यवस्थेमुळे, ती या वर्षी दोन दिवस चालणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं इस्कॉनच्या वतीने जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा मार्गाने ही रथ यात्रा भाग्यनगर इथल्या इस्कॉन मंदिरात पोहोचत आहे. या रथ यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
नाशिकमध्ये पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पर्यावरण रक्षणाबाबतही जनजागृती करण्यात आली.
****
आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचं कौशल्य विकसित करा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केलं आहे. नागपूर इथं विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्‍तपणे स्‍थापन केलेल्या वेदिक-महिंद्रा कौशल्‍य विकास केंद्राचं गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाला पेट्रोल-डिझेलमुक्‍त करण्‍याचं आपलं ध्‍येय असल्‍याचं सांगत गडकरी यांनी, डिफेन्‍सच्‍या उपयोगाकरता आऊटर रिंग रोडवर लवकरच नवीन तंत्रज्ञानाने युक्‍त १३२ आसनक्षमता असलेली ट्रॉली बस सुरू करण्‍यात येणार असल्‍याचं सांगितलं.
****
मुंबईमध्यल्या वरळी इथं झालेल्या हिट अँड रन दुर्घटनेतल्या दोषींना पाठीशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. आज पहाटे वरळी इथं एका भरधाव चारचाकीने एका दांपत्याला फरपटत नेल्याची घटना घडली, यात महिलेचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कायद्यासमोर सगळे समान. सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो. त्यामुळे ही घटना जी आहे, याला काही वेगळा न्याय लागणार नाही, वेगळा नियम नाही. जे होईल ते कायदेशीर होईल. कोणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत. आणि कोणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नयेत, यासाठी देखील शासन म्हणून यामध्ये गृहविभाग नक्की उपाययोजना करेल. परंतू या केस मध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती नऊ पैकी नऊ जागा जिंकेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर आज शिंदे यांनी बावनकुळे यांची नागपूर इथं भेट घेतली.
****
राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज निर्मिती, विद्युत वितरण आणि विद्युत पारेषण या कंपन्यांमधले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या यांच्या मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येणार आहे. मुंबईत आज या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता आता ५०० वरुन एक हजार रुपये करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. मागील दहा वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या आहेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी, सरकारवर टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. एकमेकांत भांडण्यात शक्ती वाया न घालवता एकजूट दाखवून आपल्या मागण्या केंद्र सरकारकडून पुर्ण करुन घ्याव्यात, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं.
भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांनी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
****
पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलै पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय दर्शन रांगेत शेड, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालयं तसंच बसण्याची सुविधा करण्यात आली आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. शहरवासीयांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. उद्या ही पालखी तुळजापूरला जाणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बारामती इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाले होते.
****
लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक आजपासून १७ जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. या पथकाकडून दिंडीतल्या वारकऱ्यांना गरजेनुसार मोफत उपचार आणि औषधी पुरवली जाणार आहे.
****
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात राष्ट्रीय अपत्ती दलाच्या पथकाला यश आलं आहे.
नाशिक जिल्ह्यासह शहरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस झाला असून, निर्मला नदीला पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे वस्तीला गेलेल्या एसटी गाड्या अडकून पडल्या आहेत. काही ठिकाणी पडझड होऊन मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातले नदी, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक बंधार्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे. आज दुपारी पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या पाच टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज हरारे इथं सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या २० षटकांत दोन बाद २३४ धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मानं ४७ चेंडुत १०० धावा केल्या.
****
बीड इथल्या पोलिस भरती लेखी परिक्षेच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा नेकनूरजवळ आज अपघाती मृत्यू झाला. दिंद्रड ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक मच्छिंद्र नन्नवरे आणि सिरसाळा ठाण्याचे उपनिरिक्षक रमेश नागरगोजे हे दुचाकीने बीडकडे निघाले होते, त्यावेळी नेकनूरकडे भरधाव जाणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला, यात नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर चारचाकी वाहनचालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जम्मू काश्मीर मधल्या कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सैनिकांना वीरमरण आलं. यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव - भाकरे इथल्या प्रवीण जंजाळ यांचा समावेश आहे.
****
0 notes
imranjalna · 5 months
Text
रेवगाव रोडवर  स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले.Newborn baby girl of  found from Revgaon Road.
जालना शहरात 15 दिवसात  दुसरी घटना.. घटनेने शहरात एकच खळबळ.. बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी नवजात शिशूला उपचारासाठी दाखल केले जिल्हा स्त्री रूग्णालयात.. जालना शहरातील रेवगाव रोडवर स्त्री जातीचे नवजात अर्भक स्थानिक नागरीकांना आढळून आलंय. स्थानिक नागरिकांनी सदर शिशुबाबत बालकल्याण समितीच्या सदस्यांना याची माहिती दिली. बालकल्याण समितीच्या सदस्यांनी रेवगाव येथून सदर नवजात बालकाला ताब्यात घेतलय.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 10 months
Text
टॅक्सी दरीत कोसळल्याने "इतक्या" जणांचा दुर्दैवी मृत्यू
नैनिताल : नैनिताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकच्या छीरखान-रीठासाहेब रोडवर आज सकाळी (दि. १७) भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील ५०० मीटर खोल दरीत टॅक्सी कोसळल्याने ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी खोल खड्ड्यात पडल्याने ७ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
Lucknow:आईचा मृतदेह रुग्णालयात सोडून मुलगा पळून गेला
https://bharatlive.news/?p=172704 Lucknow:आईचा मृतदेह रुग्णालयात सोडून मुलगा पळून गेला
लखनौमधील कानपूर रोडवर ...
0 notes
nandedlive · 1 year
Text
वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात मृत्युपत्र
Tumblr media
आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत झालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा जीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा. मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील. मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे. म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या. माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमान कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे . जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली . मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे. मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही. मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव ….   Read the full article
0 notes
Video
youtube
नाशिक शहरातील उंटवाडी रोडवर असलेल्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या मॉल येथे दह...
0 notes
karmadlive · 1 year
Text
दोन जुलै रोजी रात्री करजगाव कोनेवाडी गावच्या अंतर्गत रोडवर ट्रॅक्टर व दुचाकी (MH20DP6250) ची समोरासमोर धडक झाली होती
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
कानातून रक्तस्राव, डोळा सुजला; दारुवरुन चौघांनी रस्त्यात बेदम मारलं; भीती जीवावर बेतली
धुळे: दारूच्या पैशांच्या वादातूनचार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर दुपारच्या सुमारास घडली त्यामुळे शिरपूर येथे एकच खळबळ उडाली होती.मागील उधारीची कुरापत काढून राजू कोळी नावाच्या व्यक्तीला रस्त्यावर अडवून चौघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत राजू कोळी हा गंभीर जखमी झाला. त्याला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year
Link
#सेनगाव #पोलीस #ठाणे #हद्दीत #गावठी #पिस्टल #जप्त #स्थानिक #गुन्हे #शाखेची #कार्यवाही #crime #news #marmikmaharashtra
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 05 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०५ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.
****
शिक्षण हे सक्षम होण्याचं साधन असून, आदीवासी समुदायाच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राच्या आणि देशाच्या विकासात योगदान द्यावं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला त्या आज संबोधित करत होत्या. यावेळी सुवर्ण पदक आणि पदवी मिळवणार्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असणं, ही गौरवाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांना कौशल्य आणि नैतिकतेच्या निकषावर गुणवत्ता युक्त शिक्षण दिलं जात असल्याचा विशेष आनंद असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं. यावेळी सहा विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी देखील राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आली.
आज राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते कोराडी मंदिर परिसरातल्या भारतीय विद्या भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राचंही उद्घाटन होणार आहे.
****
जी - 20 देशांनी जगासमोरील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एका कुटुंबाच्या भावनेनं काम करण्याचं आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. मुंबईत सुरु असलेल्या जी - २० देशांच्या संशोधन आणि नवोन्मेष विषयक समुहाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत ते आज बोलत होते. भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाच्या काळात, उत्तम भविष्यासाठी जागतिक संशोधन आणि नवकल्पना पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं. जी - 20 राष्ट्रांनी स्वच्छ ऊर्जा स्रोतांच्या दिशेनं संक्रमण घडवून आणण्यासाठी, आणि स्मार्ट ग्रिड, ऊर्जा-कार्यक्षम इमारती आणि टिकाऊ वाहतूक व्यवस्था, यासारख्या पर्यावरणीय नवकल्पनांना चालना देण्यासाठी, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण शक्तीचा उपयोग केला पाहिजे, असं आवाहन जितेंद्र सिंग यांनी यावेळी केलं. आज या बैठकीचा समारोप होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाची आज मुंबईत बैठक होत आहे. आपल्यालाच जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा, दोन्ही गटाकडून करण्यात आला आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
****
राज्यात खरीप हंगामाचं सरासरी पेरणीचं क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्यानं प्रत्यक्षात २० पूर्णांक ६० लाख हेक्टर, म्हणजे १४ टक्केच पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
****
सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवर औद्योगिक वसाहतीत एका टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. कारखान्यातला टॉवेल कच्चामाल आणि कागदी पुट्ट्याला आज पहाटे मोठी आग लागली. कारखान्याच्या वर राहत असलेल्या कामगारांच्या घरात गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास दहा गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. यात दोन कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून पश्चिम रेल्वेनं, ओखा ते मदुराई दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, मुदखेड मार्गे धावेल. ही गाडी सोमवार दहा, १७, २४, आणि ३१ जुलै ला, ओखा इथून रात्री दहा वाजता सुटेल, आणि तीन दिवसांच्या प्रवासानंतर मदुराई ला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी, १४, २१, २८ जुलै आणि चार ऑगस्टला, मदुराई इथून रात्री एक वाजून २५ मिनिटांनी सुटेल, असं रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 
****
सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. ब्लू टायगर्स या नावानं प्रसिद्ध असलेल्या भारतीय फुटबॉल संघाने विक्रमी रित्या नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. यासंदर्भात ट्विट करत ठाकूर यांनी, भारतीय फुटबॉल संघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा ���िल्या.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात किनारी भागात जोरदार पाऊस झाला. देवगड तालुक्यात सर्वाधिक १८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//************//
0 notes
imranjalna · 6 months
Text
जालन्यात  चित्रपट सुरू असताना निलम टाॅकीजला लागली आग. Jalna:Neelam Talkies caught fire while the movie was going on…
प्रेक्षकांनी आपला जीव वाचवत नीलम टॉकीज बाहेर काढता पाय घेतला.. आग लागल्याची घटना घडल्याने उडाली एकच खळबळ.. कोणत्याही प्रकारची हानी नसल्याचे थेटर मालकाची माहिती.. जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या निलम टॉकीज मध्ये रात्री चा शो चालू असताना कुलरला आग लागल्याने थिएटर मध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला यामुळे दर्शकांमध्ये घबराटीचे वातावरण होऊन लोकं सिनेमा हॉलच्या बाहेर पडले. निलम टॉकीज मध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' तुमच्याकडची एक मुलगी मला वेश्यागमनासाठी द्या ' , पुण्यात भलतीच मागणी
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पुणे सातारा रोडवर बालाजी नगर परिसरात एका मसाज सेंटरमध्ये जाऊन आपण पोलीस असल्याची बतावणी करत दीड लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसा��ा सहकारनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अजित मधुकर वाळे ( वय 27 राहणार हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सदर प्रकार हा मॅजेस्टिक मसाज सेंटर येथे घडलेला आहे. आरोपीच्या विरोधात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
' तुमच्याकडची एक मुलगी मला वेश्यागमनासाठी द्या ' , पुण्यात भलतीच मागणी
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पुणे सातारा रोडवर बालाजी नगर परिसरात एका मसाज सेंटरमध्ये जाऊन आपण पोलीस असल्याची बतावणी करत दीड लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसाला सहकारनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अजित मधुकर वाळे ( वय 27 राहणार हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सदर प्रकार हा मॅजेस्टिक मसाज सेंटर येथे घडलेला आहे. आरोपीच्या विरोधात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
बीड : धारूर-केज रोडवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
https://bharatlive.news/?p=154555 बीड : धारूर-केज रोडवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
धारूर; पुढारी ...
0 notes