Tumgik
#सेन्सेक्स
mazhibatmi · 2 months
Text
Share Market Today: आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला जातांना दिसत नाही आहे. सलग 5 दिवस सुरू असलेला तेजीचा कल आज मोठ्या घसरणीसह थांबला. प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 मोठ्या तोट्यासह व्यवहार करत आहेत.
शेयर बाजारात सलग 5 दिवसांची वाढ आज थांबताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह उघडले. आज सकाळी 10.39 वाजता बीएसई सेन्सेक्स 644 अंकांनी घसरून 81,223 अंकांवर व्यवहार करत होते. गुरुवारी सेन्सेक्स 81,867 अंकांवर बंद झाला, आज 81,345 अंकांवर मोठ्या घसरणीसह उघडला. वृत्त लिहिपर्यंत सेन्सेक्स 80,995 अंकांच्या नीचांकी आणि 81,345 अंकांच्या उच्चांकाच्या दरम्यान व्यवहार करत होता.
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, नेमकं काय घडलं?
https://bharatlive.news/?p=184657 फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, नेमकं काय ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचं, कामाचं योग्य नियोजन, एकाग्रता महत्वाची - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
विषय आशयघन आणि प्रभावशाली असेल तर चित्रपट देशाच्या सीमापार प्रेक्षकांपर्यंत जातो- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं मत.
जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्यानंतर अहमदनगर काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त.
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झाला उपविजेतेपद.
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल.
आणि
भारत-न्यूझीलंड दरम्यान रांचीत आज सात वाजता पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना.
****
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचं, कामाचं योग्य नियोजन, एकाग्रता महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं.
कोणतंही काम करताना त्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचं सांगताना पंतप्रधान म्हणाले –
अगर माँ की गतीविधीओं को ढंगसे ऑब्जर्व करोगे तो भी आपको एज ए स्टूडंट अपना टाईम मॅनेजमेंट का महत्व क्या होता है और टाईम मॅनेजमेंट माने दो घंटे, चार घंटे, तीन घंटे यह नहीं। मायक्रो मॅनेजमेंट चाहीए। किस विषय को कितना टाईम देना है, किस काम को कितना टाईम देना है और इतना बंधन भी नहीं डालने है की बस छह दिन तक यह करुंगाही नहीं, क्यूंकी मुझे पढना है। वरना आप थक जाओगे आप ढंगसे उसको डिस्ट्रीब्यूट किजिए समय को।
परीक्षा ही आयुष्यभर सुरु राहणार आहे, त्यामुळे एका परीक्षेत नक्कल करुन पास जरी झाले, तरीही आयुष्यभर नक्कल नाही चालणार. त्याउलट मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच अपयश येणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले. स्मार्टली हार्ड वर्क म्हणजेच योग्य नियोजन करुन काम केल्यास नक्कीच यश मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
पालकांनी आपल्या पाल्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, मात्र या अपेक्षा सामाजिक दबावाखाली ठेवल्या जात असतील, तर ते योग्य नाही, असं पंतप्रधान म्हणाले. पालकांच्या अपेक्षांना विद्यार्थ्यांनी आपली क्षमता आणि दृढ निश्चयाची जोड द्यावी, असं त्यांनी सांगितलं. परीक्षा हे जीवनाचं अंतिम ध्येय नाही, हे लक्षात ठेवून परीक्षेल��� सामोरं जावं, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर इथून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते.
औरंगाबाद इथं होली क्रॉस शाळेत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे उपस्थित होते.
****
चित्रपट क्षेत्रात प्रांतीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट असा काही प्रकार नसतो, जर विषय आशयघन आणि प्रभावशाली असेल तर तो चित्रपट देशाच्या सीमापार प्रेक्षकांपर्यंत जातो, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत आज शांघाय सहकारी संघटनेच्या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव इतर देशातील चित्रपट उद्योगांशी संपर्क आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करतात, असं ते म्हणाले. आता सामाईक इतिहास, संस्कृती, परंपरा आणि नागरीकीकरणावर आधारीत चित्रपटांची संयुक्तपणे निर्मिती करण्याची वेळ आली असल्याचंही मंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. या महोत्सवात या वर्षी १४ देशातील ५८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. येत्या ३१ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार असल्याचं ते म्हणाले.
****
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज ८७४ अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही २८७ अंकांची घसरण झाली.
येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, पण त्या आधीच शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून येत्या २९ जानेवारीला रविवारी सकाळी ११ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा सत्त्यानवावा भाग असणार आहे.
****
अहमदनगरचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना समर्थन देत सोळुंखे यांनी काल राजीनामा दिला. अन्य काही पदाधिकाऱ्यांनीही तांबे यांना पाठिंबा दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर प्रदेश काँग्रेसनं ही बरखास्तीची कारवाई केली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
****
भगवान बुद्धांच्या अस्थिधातू कलशासह आलेल्या धम्मपदयात्रेचं आज औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी अस्थिधातू कलशाला अभिवादन केलं आणि या धम्मपदयात्रेत सहभाग घेतला. शहरातल्या जालना महामार्गावरुन मार्गक्रमण करत जात असलेल्या या धम्मयात्रेतल्या अस्थि कलशाला आणि भिक्खू संघाला अनुयायांनी मोठ्या संख्येनं ठिक ठिकाणी अभिवादन केलं. तसंच भिक्खू संघाद्वारे महापरित्राणपाठ आणि बोधीपूजा करण्यात आली. शहरानजिक तीसगाव इथल्या बोधीसत्व ध्यान साधना केंद्रात ही धम्मयात्रा आज मुक्कामी असणार आहे. आंतराराष्ट्रीय ११० बौद्ध भिक्खू संघ थायलंडची ही धम्मपद यात्रा परभणीहून निघाली असून मुंबईच्या चैत्यभूमीला जाणार आहे.
दरम्यान, या धम्मपदयात्रेनिमित्त वाहतूक कोंडी होवू नये म्हणून शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीत आज भारताच्या रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात ब्राझीलच्या राफेल मॅटोस आणि लुईसा स्टेफनी या जोडीनं सानिया - रोहन जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला.
दरम्यान, सानिया मिर्झाची ही शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. आपल्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच मेलबर्नमधून केली होती, शेवटचे ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी यापेक्षा चांगलं मैदान दुसरं कोणतंच असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झानं सामना संपल्यानंतर दिली.
****
एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरी गाठली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्युझीलंडनं निर्धारीत २० षटकांत नऊ बाद १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं श्वेता सेहरावतनं फटकावलेल्या ६१ धावांच्या जोरावर पंधराव्या षटकातच दोन गडी गमावून हे लक्ष साध्य केलं.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातला स्पर्धेतला अन्य उपांत्यफेरीचा सामना थोड्या वेळापूर्वीच सुरु झाला आहे. यांत विजयी होणाऱ्या संघासोबत भारताचा येत्या रविवारी अंतिम सामना होईल.
****
भारत-न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रांची इथं संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.
****
जकार्ता इथं आयोजित इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा पुरु�� एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. आज दुपारी झालेल्या या सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाटन ख्रिस्टेनं सेनला पराभूत केलं. स्पर्धेतील महिला दुहेरीच्या प्रकारांतही आज भारताच्या तनीशा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांच्या संघाला जपानच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत आणि प्रियांशू राजवत यांचं, तर महिला एकेरीत सायना नेहवालचं पहिल्या फेरीतच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाली नसल्याचं प्रशासनानं सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत प्रशासन सतर्क असल्याचं जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळवलं आहे.
****
जी-ट्वेंटी स्टार्टअप सहभाग गटाची सुरुवातीची पहिली दोन दिवसीय बैठक उद्यापासून हैदराबादमध्ये सुरु होत आहे. या बैठकीत जी-ट्वेंटी देशांचे प्रतिनिधी, निरीक्षक देशांचे आमंत्रित सदस्य, बहुपक्षीय संघटनांचे प्रतिनिधी आणि भारतीय स्टार्टअप परिसंस्थेचे सदस्य सहभागी होत आहेत.
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
शेअर बाजाराचा आढावा, 19 डिसेंबर, लेखक प्रसाद जोशी
शेअर बाजाराचा आढावा, 19 डिसेंबर, लेखक प्रसाद जोशी
निफ्टी निर्देशांक, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तसेच इतर सर्व निर्देशांकामध्ये जे काही मागील आठवड्यामध्ये भरपूर वाढ झाली होती त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा घेण्याचे धोरण वापरल्याने तसेच अमेरिकेमध्ये मंदि येणार असे वातावरण तसेच महागाई आटोक्यात येत नाही व एका बाजूला व्याजदर वाढतच आहेत अशा कोंडीमध्ये बाजार सापडलेला होता. त्यामुळे मागील आठवड्यामध्ये बाजारामध्ये सर्वत्र नकारात्मक वातावरण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
मारुतीने किमती वाढवून ग्राहकांकडून संपूर्ण खर्च वसूल केला, चौथ्या तिमाहीत 51 टक्के बंपर नफा
मारुतीने किमती वाढवून ग्राहकांकडून संपूर्ण खर्च वसूल केला, चौथ्या तिमाहीत 51 टक्के बंपर नफा
नवी दिल्ली. मारुती सुझुकीने शुक्रवारी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 58% वाढ झाली आहे. कच्च्या मालाची वाढलेली किंमत आणि जगभरात सुरू असलेली सेमीकंडक्टरची समस्या असतानाही कंपनीने हा नफा कमावला आहे. कंपनीच्या या नफ्याचे कारण कारच्या किमतीत वाढ आणि प्रमोशनमध्ये कपात असे निर्णय असल्याचे मानले जात आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीने जानेवारी ते…
View On WordPress
0 notes
tukeshdayare · 4 years
Text
सेन्सेक्स निफ्टी क्या है |what is sensex nifty in indi
सेन्सेक्स निफ्टी क्या है |what is sensex nifty in indi
सेन्सेक्स निफ्टी क्या है. अगर आप शेअर मार्केट में नीवेश करते है. तो आपको सेन्सेक्स और निफ्टी के बारे मे जरूर पता होना चाहिये. की आखिर sensexऔर Nifty क्या है आज हम आपको what is sensex and Nifty in hindi मे बतायेंगे . सेन्सेक्स और निफ्टी क्या है ये जानने से पहले आपको NSE और BSE क्या है यह जानना होगा . आपमेसे जरूर कुछ लोगो को NSE और BSE क्या है ये पता होगा लेकिन कुछ लोगो को ये नही पता है. तो सबसे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
‘मिशन बिगीन अगेन’च्या घोषणेनंतर सेन्सेक्सची उसळी मुंबई : गेल्या अडीच महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्याटप्यात शिथिल करण्याच्या सरकारच्या घोषणेने आज (दि. १ जून) मुंबई शेअर बाजाराने चांगलीच उसळी मारली आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, बेअर अटॅकचे कारण काय?
https://bharatlive.news/?p=178620 सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, बेअर अटॅकचे कारण काय?
पुढारी ऑनलाईन : ...
0 notes
shrish · 5 years
Text
गिरावट
सामयिक कालखंड बड़े ही रोचक एवं अद्भुत वैचारिक तत्वों से फलीभूत मालूम पड़ता है। सबसे ज़्यादा अगर होड़ दिखती है तो वो है किसी भी विचार को सही /ग़लत के पैमाने पे तुरंत तोल कर एक स्टिकर लगा देने की। और देखें तो लोग बहुत आत्मीयता से इस स्टिकर की हिफ़ाज़त करते हैं। चाहें वो घर परिवारों के वाट्सऐप्प ग्रुप हों, चाय की टपरी  के संवाद हों या दफ़्तर में भोजनवकाश के दौरान की चर्चाएँ हों। ये स्टिकर हर जगह मौजूद रहता है और इसके सिपहसलार भी।
संभवत: इस लेख के शीर्षक को देख कर भी कुछ अपेक्षाएँ उपजी हों, तो पहले शीर्षक को ही समझ लिया जाए। अव्वल तो जो ऐसा मानते या सोचते हों की गिरावट एक नकारात्मक शब्द है, तो थोड़ी राहत दें बेचारे शब्द को। ऐसा नहीं है । फ़र्ज़ कीजिए किसी के उच्च रक्त चाप की बात हो, तो उसमें गिरावट जीवनदायी है । उसी तरह गरमी जब लू और ताप से जानलेवा हो जाए, तब तापमान में गिरावट भी एक जीवनदायी या सकारात्मक संकेत है । 
बहरहाल हम ये नहीं कहना चाह रहे हैं की गिरावट के बारे में सब कुछ अच्छा ही है । सेन्सेक्स में हो जाए तो व्यापारों पे फ़र्क़ पड़ता है , चरित्र में हो जाए तो पूरे समाज पे फ़र्क़ पड़ जाता है । मुद्दे की बात ये है की गिरावट एक क्रिया का विशेषण है। माने क्रिया की विशेषता या गुण दर्शाने वाला शब्द। और इसे सामयिक एवं प्रासंगिक पहलुओं से जोड़ के समझना चाहिए।
समस्या स्टिकर लगा देने तक होती या उसके बचाव में चर्चाओं तक होती तो कोई बड़ा  प्रभाव शायद न पड़ता। दर असल यह स्टिकरआपा इतना ज़्यादा प्रयोग में आ चुका है की अब ऐसा होना या करना प्राकृतिक या मानव प्रवृति का हिस्सा सा ही बन गया है। 
हम लोग हर समय क़रीब तीन पीढ़ियों के सम्पर्क क्षेत्र में जीवन व्यतीत करते हैं । मोटे मोटे तौर पे देखा जाए तो ऐसा ही है, और अपवाद तो  नियम की पुष्टि ही करते हैं । अब जो पीढ़ियाँ पहले की हैं, वो रिश्तों को निभाने के लिए समय,पैसा, स्वास्थ्य, और चिंतन का निवेश करते थे और उनकी मनोवृति आज भी ऐसी ही है। शुभचिंतन उनके विचार की रीढ़ रहता है । सामयिक पैमानों में जुकरबर्गीयन (फ़ेस्बुक) विचार ने सत्ता हथिया ली है । वाट्सऐप  पे मुख़्तलिफ़ क़िस्म के समूहों में भी होड़ है । उधर जुकरबर्ग का फ़ेस्बुक बर्थ्डे रिमाइंडर देता है और इधर वाट्सऐप की स्पर्धा चालू हो जातीं है । 
अब ऐसी संज्ञा या उदाहरण देने में भी उन शुद्ध हृदय के मानुषों से मुआफ़ी माँगता हूँ जो घुन की तरह पिसा महसूस कर रहे हों । परंतु इस विचार को पूरा करता हूँ। 
अब जो पीढ़ी इतना कुछ निवेश करती रही हो उसके लिए थोड़ा जटिल है इस बात को आराम से समझ पाना की एक मेसेज ही काफ़ी था तो कहीं हम ज़्यादा तो नहीं करते रहे आज तक । बहरहाल मुझे लगता नहीं वो ऐसा सोचते होंगे क्यूँकि यही पीढ़ियाँ या इनसे ऊपर वाली पीढ़ियाँ, बेनेफ़िट आफ डाउट देने में भी अव्वल हैं । वो ये सोच मन बहला लेते हैं की समय बदल रहा है बच्चा ऑफ़िस में है और मेसेज भी एक अगर कर दे रहा है तो काफ़ी है । 
टेक्नॉलजी को बहुत क़रीब से कभी देखा तो नहीं है लेकिन उसके मंसूबों पे शक गहराता जा रहा है। की वो पास ला रही है या दूर रहने के बहाने दिए जा रही है । आज तो ये लेख लिख भी रहे हैं , के जाने कल ये सोच रहे हों की यही सही है, या की इतना भी क्या था जो क़ीमतें दीं पीढ़ियों ने । 
लिखने का ऐसा विचार नहीं था । आज पिताजी का जन्मदिन है । घर वाले वाट्सऐप  ग्रुप पे आज बड़ी मात्रा में शुभकामनाएँ भी आयीं। सभी के शुभचिंतन एवं स्नेह के लिए मन में आभार और प्यार भी है । शाम को दफ़्तर से घर के रास्ते में पिताजी से बात हुई , अब जन्मदिन था तो हम दोनों की दावत बनती थी । विचारों के भोजन और भजन में हम दोनों ही बौद्धिक तत्वों को ख़ास पसंद करते हैं और सामाजिक विमर्श एक बड़ा हिस्सा रहता है चर्चाओं का । उसी एक चर्चा में शब्द निकला और लेख की प्रेरणा हुई । हम दोनों ने हँसते हँसते इस बात पे बात समाप्त की , कि  एक साल में दो बार जन्म दिन मना  है घर वाले वाट्सऐप  ग्रुप “कुटुंब” पे । जुकरबर्गीयन (फ़ेस्बुक) विचार प्रयास तो करता है सत्ता हथियाने की लेकिन कठिन है डगर उनकी भी ।
संज्ञा या स्टिकर नहीं देंगे किसी भी विचार को। लेकिन ऐसा लगता है की रिश्तों के निवेश में गिरावट आयी है । सही ग़लत का स्टिकर लगाना मुनासिब ना होगा क्यूँकि जो असली निवेशक हैं उन्होंने आज तक नहीं लगाया ।
जन्म दिन की शुभकामनाएँ पिताजी !
1 note · View note
nashikfast · 2 years
Text
१ डिसेंबर : शेअर बाजार आढावा : प्रसाद जोशी
१ डिसेंबर : शेअर बाजार आढावा : प्रसाद जोशी
काल जागतिक बाजारांमध्ये तेजी बघायला मिळाली त्याची मुळे भारतीय बाजारांमध्ये सुद्धा तेजी येणार आहे विश्लेषकांचा अंदाज व त्यामुळे आज सुद्धा परत बाजारामधील बहुसंख्य इंडेक्स हे नवनवीन उच्चांक स्थापन करत आहेत.मुंबई स्टॉक एक्सचेंज चा सेन्सेक्स आज 63357 वर उघडून 63583 ही उच्चांकी पातळी गाठून शेवटी 632849 वर बंद झाला. सेन्सेक्स मधील खालील शेअरने भरीव कामगिरी दाखवली त्यातULTRATECH CEMENT 2.86% वाढ, TATA…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 February 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यावर भारताचा भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
·      रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरातल्या शेअर, रोखे आणि कमोडिटी बाजारात मोठी घसरण
·      अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची निदर्शनं तर भारतीय जनता पक्षाची मलिकांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी
·      राज्यात कोविड संसर्गाचे एक हजार १८२ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ६८ बाधित
·      बारावी परिक्षेच्या पाच आणि सात मार्च रोजीच्या भाषा विषयांच्या परीक्षा, आता पाच आणि सात एप्रिलला घेणार
आणि
·      पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ६२ धावांनी विजय
****
युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यावर भारताचा भर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत काल चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान म्हणाले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत पंतप्रधानांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, रशियानं युक्रेनविरोधात लष्करी कारवाई सुरु केल्यानंतर तिथली हवाई सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणायला गेलेलं एअर इंडियाचं विमान काल पुन्हा दिल्लीला परतलं. युक्रेनमधली परिस्थिती तणावपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताचे युक्रेनमधले राजदूत पार्थ सत्पथी यांनी, तिथं अडकलेल्या नागरिकांनी संयम बाळगत परिस्थितीचा सामना करावा, असं आवाहन केलं आहे. केयिव्ह इथलं भारताचं दुतावास कायम कार्यरत राहील, अत्यावश्यक मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर दूरध्वनी करावा, अशा शब्दांत त्यांनी तिथं अडकलेल्या भारतीयांना आश्वस्त केलं आहे. यासाठी युक्रेनमधल्या दुतावासानं, अधिक ३८० - ९९ ७३ ०० ४२ ८, आणि ३८० - ९९ ७३ ०० ४८ ३ हे मदत क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं देखील नागरिकांच्या मदतीसाठी, दिल्लीत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. याअंतर्गत नागरिकांना, १८ ०० ११ ८७ ९७, अधिक ९१ ११ २३ ०१ २१ १३, आणि अधिक ९१ ११ २३ ०१ ४१ ०४ हे मदत क्रमांक, तसंच [email protected] हा ईमेल आयडी उपलब्ध करून दिला आहे.
****
युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांची  सुरक्षा आणि त्यांच्या परतीच्या व्यवस्थेसाठी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. उद्योग, व्यवसाय तसंच शिक्षणानिमित्त अनेक महाराष्ट्रीयन युक्रेनमध्ये आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्र सरकारच्या माध्यमातूम या नागरिकांशी संपर्क ठेवावा, विशेषतः विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरातल्या शेअर, रोखे आणि कमोडिटी बाजारात काल मोठी घसरण झाली. यामुळे देशातल्या शेअर बाजारातल्या गुंतवणुकदारांचं १० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातले शेअर बाजार काल सात महिन्यातल्या निचांकी पातळीवर पोहोचले. बाजार बंद झाले, तेव्हा सेन्सेक्स तब्बल दोन हजार ७०२ अंकांनी कोसळून, ५४ हजार ५३० अंकांवर बंद झाला होता. निफ्टीनंही ८१५ अंकांची घसरण नोंदवली आणि १६ हजार २४८ अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाचे दर मात्र सात वर्षातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. लंडनच्या बाजारात २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलानं १०५ डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडली होती.
****
यंदा भारताच्या आर्थिक वाढीबाबत मूडीज या अमेरिकी पत मानांकन संस्थेनं आपला अंदाज सात टक्क्यावरुन साडे नऊ टक्के केला आहे. २०२० मध्ये देशभर लागू केलेली टाळेबंदी आणि गेल्या वर्षी आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर, अपेक्षेपेक्षा अधिक सुदृढ आर्थिक सुधारणाचा दाखला देत, मुडीजनं, भारताच्या आर्थिक वाढीबाबत आपल्या अंदाजात दुरुस्ती केली आहे. पुढच्या वर्षीसाठीचा अंदाज मात्र साडेपाच टक्केच कायम ठेवला आहे.
****
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं मंत्री, खासदार, आमदारांनी मुंबईत मंत्रालयातल्या महात्मा गांधी स्मारक परिसरात काल निदर्शनं केली. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शनं केली. दरम्यान, भारतीय जनता पक्षातर्फे मलिक यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच खुलताबाद, सिल्लोड, नांदेड, परभणी इथं निदर्शनं करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६२ हजार ६५० झाली आहे. काल १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या स���सर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ६७५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ५१६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख चार हजार ७३३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १० हजार २५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हिंगोली जिल्ह्यात २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद १२, उस्मानाबाद नऊ, लातूर आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी आठ, बीड पाच, नांदेड तीन, तर जालना जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावी परिक्षेच्या वेळापत्रकात किंचित बदल केला आहे. बारावीच्या पाच आणि सात मार्च या दिवशी होणार असलेल्या भाषा विषयांच्या परीक्षा, पाच एप्रिल आणि सात एप्रिलला घेण्यात येतील, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार पाच मार्चची हिंदी तसंच जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन या विषयांची परीक्षा, आता पाच एप्रिलला नियोजित वेळेत होईल. सात मार्चला नियोजित असलेली मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, अरेबिक, मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली आणि उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली या विषयांची परीक्षा, आता सात एप्रिलला नियोजित वेळेत होईल. याव्यतिरिक्त इतर परिक्षांच्या तारखा तसंच वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
नांदेड, जालना, पुणे आणि गडचिरोली इथं जिल्हा रुग्णालयांत हृदयरोगा संबंधित उपचारांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्याकरता, कामाचं अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता काल देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याकरता ३२ कोटी २३ लाख वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चारही रुग्णालयांत, स्थापत्यविषयक कामकाज करण्यासाठी सहा कोटी, आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी, २६ कोटी २३ लाख आणि वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग शहरात `प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत`, सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्वावर एक हजार घरकुल उभारण्यासाठी प्राथमिक कार्यवाही करण्याच्या सूचना, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना दिल्या आहेत. जनता दरबारादरम्यान त्यांनी ही सूचना केली. शहराच्या पाणी पुरवठ्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरात अर्धवट राहिलेल्या विकास कामांची पाहणी करून, या कामांना नियमानुसार मुदतवाढ देत ते तातडीनं करण्याबाबतही, पाटील यांनी  मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं श्री नागनाथ मंदिराची महाशिवरात्रीची यात्रा कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काल यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडं ठेवणार असल्याचं संस्थानच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
लखनौ इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ६२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित षटकात १९९ धावा करत, श्रीलंका संघासमोर २०० धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना श्रीलंकेचा संघ २० षटकात सहा बाद १३७ धावाच करु शकला. भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यरनं प्रत्येकी दोन, यजुवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. १० चौकार आणि तीन षटकारांसह ८९ धावा करणारा इशान किशन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.  
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा परिसरातल्या एका गावात काल होणारा बालविवाह, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला. अल्पवयीन मुलीच्या पालकांचं यावेळी समुपदेशन करण्यात आलं. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, बालविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच यांच्या सतर्कतेमुळे, हा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं.
****
0 notes
wegwannews · 3 years
Text
5 दिवसांच्या घसरणीवर लागली रोख, गुरुवारी बाजाराची कशी राहील वाटचाल...
5 दिवसांच्या घसरणीवर लागली रोख, गुरुवारी बाजाराची कशी राहील वाटचाल…
नवी दिल्ली : 25 जानेवारी रोजी आजच्या व्यवसायात भारतीय बाजारांमध्ये स्मार्ट रिकव्हरी दिसून आली आणि सलग 5 दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला गेला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 366.64 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 57,858.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 128.90 अंकांच्या किंवा 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 17,278.00 वर बंद झाला. जागतिक संकेतांमध्‍ये काल बाजाराने पुन्हा एकदा अंतर खाली उघडले. यूएस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nigranidainik · 3 years
Text
भारतीय शेयर बजारमा भारी गिरावट
भारतीय शेयर बजारमा भारी गिरावट
११ माघ, एजेन्सी । सोमबार भारतीय शेयर बजारमा भारी गिरावट आएको छ । याे समाचार तयार पार्दासम्म बम्बई स्टक एक्सचेन्जको सेन्सेक्स १ एक हजार ९ सय ५४ अंकले गिरावट भएर ५७ हजार ८२.८४ विन्दुमा खरिदबिक्री हुँदैछ । भारतमा पहिलो कारोबार दिन सेन्सेक्सले सबैभन्दा उच्च स्तर ५९ हजार २३.९७ विन्दु छोएको थियो भने सबैभन्दा तल्लो स्तर ५६ हजार ९ सय ८४.०१ विन्दुमा झरेको थियो । भारतीय शेयर बजारमा आज लगानीकर्ताहरुलाई साढे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
शेअरबाजार उघडताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला; निफ्टीही ३८० अंकांनी खाली
शेअरबाजार उघडताच सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला; निफ्टीही ३८० अंकांनी खाली
मुंबई : सोमवारी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १,२५७.५६ अंकांनी कोसळून ४७,५७४.४७ अंकांवर स्थिरावला होता. तर निफ्टीदेखील ३७९.१० अंकांनी घसरुन १४,२३८वर स्थिरावलेली पहायला मिळाली. शेअर बाजारात या आठवड्यामध्य मोठ्या प्रमाणात चढ-उतार पहायला मिळू शकतो. या आठवड्यातील कोरोना प्रसार, जागतिक स्तरावरील घडामोडी आणि मोठ्या कंपन्यांच्या तिमाही अहवालावर शेअर मार्केटची दिशा ठरणार आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
इस्राईल- हमास युद्धामुळे बाजाराचा मूड बिघडला, सेन्सेक्स, निफ्टी घसरले
https://bharatlive.news/?p=161466 इस्राईल- हमास युद्धामुळे बाजाराचा मूड बिघडला, सेन्सेक्स, निफ्टी ...
0 notes
nashikfast · 2 years
Text
30 नोव्हेंबर शेअर बाजार आढावा : प्रसाद जोशी
30 नोव्हेंबर शेअर बाजार आढावा : प्रसाद जोशी
निफ्टी सेन्सेक्स व क्रिकेट यांचे काहीतरी नाते असावे वा निफ्टी व सेन्सेक्सला क्रिकेट आवडत असावे. कारण आजचा सलग तिसरा दिवस आहे म्हणजे आजची हॅट्रिक आहे आज रेकॉर्ड नोंदवलेला आहे. जागतिक बाजारांमध्ये चिंतेचे वातावरण असून सुद्धा निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी आज परत नवीन रेकॉर्ड उच्चांक नोंदवलेला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आज 63000 वर गेला. आज सेन्सेक्स 62743.47 वर उघडून 63303 ही उच्चांकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes