Tumgik
#२०१९
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शाळा, शालेय आवार तसंच शालेय वाहतुकीदरम्यान विद्यार्थी सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून सात सदस्यीय समिती स्थापन
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उचलून नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं या रोगाबाबतच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. २०१९ मध्ये सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग या श्रेणीतून मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूर बाललैंगिक अत्याचारासारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नाशिक इथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या प्रस्तावित विद्यापीठात ऐंशी टक्के आदिवासी तर वीस टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश असेल, असं नमूद करत, या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील, असं राज्यपाल म्हणाले. आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असून, राजभवनात आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातला आदिवासी आता एकत्र झाला असून, त्यांच्या पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्यानं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. आज जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आज तिसऱ्या दिवशीही बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली.
हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातल्या ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे. याशिवाय, गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याचाही निर्णय घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उल्हासनगर इथल्या एका बिस्किट कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली. विद्युत यंत्रणेतल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. आज नांदेड तालुक्यातल्या आलेगाव आणि निळा या गावांच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते.
राज्य आपत्कालीन राखीव दलाच्या तुकडीचं मुक्कामाचं ठिकाण धुळे ऐवजी हिंगोली इथे करण्यात यावं, यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळू शके��, अशी मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी केली.
पाटील यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या अतिवृष्टीबाधित भागाचीही पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. आज दुपारी बारा वाजेपासून या विसर्गाला सुरुवात झाली. सध्या धरणात दहा हजार ७४६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास, विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या बंधाऱ्याबाबत काढलेली निविदा तातडीनं रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीत खरबी इथे कयाधू नदीवर बंधारा बांधून ते पाणी ईसापूर धरणात आणि त्यानंतर नांदेडला नेण्याचं प्रस्तावित आहे. याबाबत हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली असून, येत्या १३ तारखेपर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
****
येत्या अकरा तारखेला, बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथले संत जरजरीजरबक्ष यांच्या उर्सनिमित्त जिल्हा प्रशासनानं स्थानिक सुटी जाहीर केली आहे. राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतली कार्यालयं, केंद्रीय प्रशासनाची कार्यालयं आणि बँकांच्या कक्षेतली कार्यालयं सोडून जिल्ह्यातली इतर सगळी शासकीय, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयं, शासकीय कोषागारं आणि महामंडळांच्या कार्यालयांना ही सुट्टी लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
ratosuryan · 2 months
Text
'विश्वभर २३३ करोड मानिस नियमित पर्याप्त खाना पाउन संघर्ष गर्दै'
काठमाडौँ,१२ साउन । विश्वका प्रत्येक ११औं व्यक्ति भोकसँग संघर्ष गरिरहेका छन् । सन् २०२३ को तथ्यांकअनुसार विश्वभर ७३.३ करोड मानिसले पर्याप्त खाना पाउन सकेका छैनन् । एकै समयमा, २०१९ को तुलनामा, तिनीहरूको संख्या १५.२ करोडले बढेको छ । त्यस्तै अफ्रिकाको अवस्था भने अझ खराब छ । अफ्रिकामा प्रत्येक पाँचौं व्यक्तिले खानाको समस्या सामना गर्दछ । विश्वमा खाद्य सुरक्षा र पोषणको अवस्थाबारे हालै सार्वजनिक गरिएको…
0 notes
adbanaoapp-india · 6 months
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
Tumblr media
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
Tumblr media
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
samaya-samachar · 6 months
Text
मोदीको बिरूद्दमा वाराणासीमा कांग्रेसको उम्मेदवार अजय राय
नयाँदिल्ली, ११ चैत । कांग्रेसले आगामी लोकसभा चुनावका लागि ४६ उम्मेदवारको चौथो सूची सार्वजनिक गरेको छ ।    जसअनुसार कांग्रेसले उत्तर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष अजय राईलाई प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदीको विरुद्धमा देशको सबैभन्दा भिआपी सीट वाराणसीबाट उम्मेदवार बनाएको छ। अजय राईले २०१४ र २०१९ मा पनि वाराणसी सिटबाट प्रधानमन्त्री मोदीविरुद्ध चुनाव लडेका छन् । तर, दुवै निर्वाचनमा अजय रायले पराजय भोग्नु परेको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ
निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या ८,८५,६१,५३५ इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४,६३,१५,२५१ तर महिला मतदार ४,२२,४६,८७८ इतकी संख्या होती, तसेच…
View On WordPress
0 notes
mdhulap · 7 months
Link
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी (राज्यस्तर) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय ((जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९)
0 notes
pankaj1973 · 9 months
Text
*🌞~ आज दिनांक 13 जनवरी 2024 रविवार का हिन्दू पंचांग ~🌞*
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
https://youtu.be/oAAXKhpHS7Q?si=Jf3VpDOF5Jkf_29v
*⛅दिनांक - 13 जनवरी 2024*
*⛅दिन - शनिवार*
*⛅विक्रम संवत् - 2080*
*⛅अयन - उत्तरायण*
*⛅ऋतु - शिशिर*
*⛅मास - पौष*
*⛅पक्ष - शुक्ल*
*⛅तिथि - द्वितीया सुबह 11:11 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र - श्रवण दोपहर 12:49 तक तत्पश्चात धनिष्ठा*
*⛅योग - वज्र सुबह 10:14 तक तत्पश्चात सिद्धि*
*⛅राहु काल - सुबह 10:06 से 11:27 तक*
*⛅सूर्योदय - 07:23*
*⛅सूर्यास्त - 06:14*
*⛅दिशा शूल - पूर्व*
*⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 05:38 से 06:30 तक*
*⛅निशिता मुहूर्त - रात्रि 12:22 से 01:15 तक*
*⛅व्रत पर्व विवरण - पंचक (आरम्भ रात्रि 11:35)*
*⛅विशेष - द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । तृतीया को परवल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🌹 सूर्योपासना का पावन पुण्यदायी पर्व – मकर संक्रांति – 15 जनवरी 2024*
*🌹 संक्रांति का स्नान रोग, पाप और निर्धनता को हर लेता है । जो उत्तरायण पर्व के दिन स्नान नहीं कर पाता वह ७ जन्म तक रोगी और दरिद्र रहता है ऐसा शास्त्रों में कहा गया है ।*
*🌹 संक्रांति के दिन देवों को दिया गया हव्य (यज्ञ, हवन आदि में दी जानेवाली आहुति के द्रव्य ) और पितरों को दिया गया कव्य (पिंडदान आदि म��ं दिया जानेवाला द्रव्य ) सूर्यदेव की करुणा-कृपा के द्वारा भविष्य के जन्मों में कई गुना करके तुम्हें लौटाया जाता है ।*
*🌹 मकर संक्रांति के दिन किये हुए शुभ कर्म करोड़ों गुना फलदायी होते हैं । सुर्यापासना और सूर्यकिरणों का सेवन, सूर्यदेव का ध्यान विशेष लाभकारी है ।*
*🌹 इस दिन तो सूर्यदेव के मूलमंत्र का जप करना बहुत हितकारी रहेगा, और दिन भी करें तो अच्छा है । आप जीभ तालू में लगाकर इसे पक्का करिये । अश्रद्धालु, नास्तिक व विधर्मी को यह मंत्र नहीं फलता । यह तो भारतीय संस्कृति के सपूतों के लिए है । बच्चों की बुद्धि बढ़ानी हो तो पहले इस मंत्र की महत्ता बताओ, उनकी ललक जगाओ, बाद में उनको मंत्र बताओ ।*
*मंत्र है : ॐ ह्रां ह्रीं स: सूर्याय नम: । (पद्म पुराण)*
*🌹 यह सूर्यदेव का मूलमंत्र है । इससे तुम्हारा सुर्यकेन्द्र सक्रिय होगा और यदि भगवान् सूर्य का भ्रूमध्य में ध्यान करोगे तो तुम्हारी बुद्धि के अधिष्ठाता देव की कृपा विशेष आयेगी । बुद्धि में ब्रह्मसुख, ब्रह्मज्ञान का सामर्थ्य आयेगा । अगर नाभि में सूर्यदेव का ध्यान करोगे तो आरोग्य-केंद्र सक्षम रहेगा, आप बिना दवाइयों के निरोग रहोगे ।*
*📖 लोक कल्याण सेतु – दिसम्बर २०१९*
*🌹 शनिवार के दिन विशेष प्रयोग 🌹*
*🌹 शनिवार के दिन पीपल के वृक्ष का दोनों हाथों से स्पर्श करते हुए 'ॐ नमः शिवाय' मंत्र का 108 बार जप करने से दुःख, कठिनाई एवं ग्रहदोषों का प्रभाव शांत हो जाता है । (ब्रह्म पुराण)*
*🌹 हर शनिवार को पीपल की जड़ में जल चढ़ाने और दीपक जलाने से अनेक प्रकार के कष्टों का निवारण होता है । (पद्म पुराण)*
*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*
*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*
*📖 ऋषि प्रसाद - मई 2018 से*
https://t.me/asharamjiashram/6496
*🌞संत श्री आशारामजी बापू आश्रम🌞*
0 notes
roger-says · 9 months
Text
0 notes
airnews-arngbad · 27 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आसामच्या नऊ लाख पस्तीस हजारहून अधिक लोकांची आधारपत्रं देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. २०१९ च्या फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या काही बाबींमुळे या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या पंधरा ते तीस दिवसात आपली आधारपत्रं मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ साठी सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांत संबंधितांनी आपली मतं मांडावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी.श्र��निवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीनिवासन हे १९९२ च्या तुकडीचे भारतीय पोलिससेवा बिहार केडरचे अधिकारी आहेत.
****
दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी तीन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बाबेजा यांच्यासमोर दूरदृष्यप्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' -युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं महाराष्ट्रात लागू करण्यासाठी "वित्त विभागाला” प्राधिकृत करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी वॉर्ड, अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक प्रतिजैविक ॲक्रेलिक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे ९९ पूर्णांक ९९ टक्के जिवाणू आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं, यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात  येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने आज शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत ८४ भारतीय क्रिडापटू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
mhlivenews · 11 months
Text
भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत
मुंबई,दि.१०: नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत  दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला. या…
View On WordPress
0 notes
ratosuryan · 8 months
Text
मेसीले जिते फिफा बर्ष खेलाडीको उपाधि
काठमाडौँ, २ माघ । लियोनेल मेसीले फिफा बर्ष खेलाडीको अवार्ड जितेका छन् । गएराती लण्डनमा आयोजित फिफाको बार्षिक कार्यक्रममा मेसीलाई २०२३ को बर्ष खेलाडीको उपाधि दिइएको हो । मेसीले किलीयन एम्बाप्पे र इर्लिंग हालाण्डलाई पछि पार्दै फिफाको बर्ष खेलाडीको अवार्ड जितेका हुन् । मेसीले यस अघि २०२३ को बेलुन डो अर अवार्ड जितेपछि फिफा बर्ष खेलाडीको अवार्ड समेत जितेका छन् । उनले यसअघि २०१९ र २०२२ मा पनि फिफाको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
niranjanadhikari · 11 months
Text
हाम्रा स्वाठ प्रशासान, कुटनीतिज्ञहरुलाई के मतलव!
हामीले ५० नेपालीको मृत्युको अध्ययनपछि मदिरा पनि एउटा मुख्य कारक रहेको पत्ता लगायौं । अब उनीहरूले कुन ब्रान्डको मदिरा खाने गरेका छन, कति मात्रामा खाइरहेका छन्, उनीहरूको डाइट कस्तो छ भन्नेजस्ता विषयमा थप अनुसन्धान गर्नुपर्ने देखियो । कामदारहरूमा प्रोटिनको अवस्था के छ भनेर पनि हेर्नुपर्ने देखियो । ५० नेपालीको मृत्युमध्ये एकतिहाइ कारकचाहिँ अत्यधिक तनाव पनि देखियो ।
अहिले आप्रवासी कामदारहरूमा सबैभन्दा धेरै देखिएको स्वास्थ्य समस्यामा प्रमुख मिर्गौला सम्बन्धी छ । मैले त भन्ने गरेको छु— किड्नी डिजिजेज अ डेथ ट्र्याप । आप्रवासी कामदारको हकमा मात्रै होइन, तपाईं–हाम्रो परिवारकै एक सदस्यमा मात्रै मिर्गौला सम्बन्धी रोग देखियो भने सिंगो परिवारमा असर पर्छ । केही दिनको अन्तरमा डायलसिसमा लैजानका लागि कमाउने एक सदस्य नै खटिनुपर्दा त्यसको असर परिवारको कमाइमा सोझै पर्छ । त्यसमा पनि आप्रवासी कामदारहरू त समाजको पनि तल्लो वर्गका हुन्छन् । सन् २०१९ मा पोखरामा गरिएको एक अध्ययनले डायलसिसको बिरामीले मासिक ३२ हजार रुपैयाँ खर्च गर्नुपर्ने देखाएको थियो । यसैले आप्रवासी कामदारको स्वास्थ्य सिंगो समाजको चासोको विषय हो ।
0 notes
samaya-samachar · 7 months
Text
एकदिवसीय अलराउन्डरको वरीयतामा नाबी शिर्ष स्थानमा, पाँच वर्षपछि शकिब पछि परे
काठमाडौँ, ३ फागुन । अफगानिस्तानका क्रिकेटर मोहम्मद नावी एकदिवसीय अलराउन्डरको वरीयतामा पहिलो स्थानमा पुगेका छन् । अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट काउन्सिल (आईसीसी) ले जारी गरेको नयाँ वरीयता नावीले बंगलादेशका शकिब अल हसनपछि पार्दै शिर्ष स्थानमा उक्लिएका छन् । शाकिब विगत पाँच वर्षदेखि एकदिवसीय अलराउन्डरको वरियतामा नम्बर एकमा थिए । शकिब १७३९ दिनसम्म एकदिवसीय अलराउन्डरको शीर्ष स्थानमा रहे । उनी ७ मे २०१९…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 11 months
Text
भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत
मुंबई,दि.१०: नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना मदत देण्याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत  दि. ११ जून २०१९ रोजी वादळी पावसामुळे भडगावसह रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मिळणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रस्ताव सादर केला. या…
View On WordPress
0 notes
Text
'२०१९ च्या राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवारांनीच दिली'
https://bharatlive.news/?p=157761 '२०१९ च्या राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवारांनीच दिली'
मुंबई; ...
0 notes
gothalokhabar · 1 year
Text
जापानमा होटलको मूल्यमा १५ प्रतिशत वृद्धि
टोकियो, ११ वैशाख । कोरोना भाइरसको महामारी सुरु हुनुअघि सन् २०१९ को सोही अवधिको तुलनामा पछिल्लो त्रैमासिक अवधिमा जापानमा होटलको औसत मूल्य १५ प्रतिशतले बढेको एक सर्वेक्षणले देखाएको छ । विश्वभरका होटल उद्योगको बजार तथ्याङ्क उपलब्ध गराउने अनुसन्धान फर्म एसटीआरले गरेको सर्वेक्षणअनुसार जनवरी–मार्चको त्रैमासिक अवधिमा जापानका होटलको एक कोठाको २४ घण्टाको औसत मूल्य १६ हजार १२५ येन (करिब १२० अमेरिकी डलर)…
Tumblr media
View On WordPress
0 notes