Tumgik
#ajkalchyamuli
mvartalive · 5 years
Photo
Tumblr media
बंडखोर ब्लॉग : आजकालच्या मुली, लग्न आणि भावनांचा बाजार ! Written By Suraj Mokashi आपणा सर्वांना वाटत असेल की ‘स्त्री’ जातीवर समाजाने खूप अन्याय केलेत, हो हे आधीच्या पिढ्यांपुरतं मान्यही केलं पण आताच्या पालकांना माझा साधा सवाल आहे की सध्या मॉडर्न होता होता आपल्याला जे संस्कार आपल्या पूर्वजांकडून मिळाले ते आपण आपल्या मुलींना(काही अपवाद सोडले)तर देतोय का? आपण निदान ह्याचातरी विचार करतोय का? आपली संस्कृती किती लयास चालली आहे, मी इथे कापडे, राहणीमान याबाबत बोलत नाहीये. कालानुरूप त्यात बदल होणारंच, त्यात वावगं काहिच नाही. लग्न…लग्न हे आताच्या मुलींना बंधन वाटू लागलं आहे. ‘वुमन एम्पोवरमेन्ट’ च्या नावाने काही मुलींना एवढं उर्मट बनवून ठेवलं आहे की, त्या जराही कॉम्प्रोमाईझ करायला तयार होत नाही आहेत. थोडं काही बिनसलं की लगेच घटस्फोट देणे किंवा सासु-सासऱ्यांसोबत जरा काही वाजलं की सेपरेट राहायचं, चालले माहेरी रहायला अशी धमकी देणे असं सर्रास घडत आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला मुलीच चुकीच्या असतात. पुरुषांमध्येही वाईट गुण आहेतच की पण त्यांना लाईनवर कसं आणायचं हे तुमच्या हातात असतं आणि निसर्गाने अशी अद्भुत देणगी तुम्हाला दिलेली आहे. अशावेळी टोकाचा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही निदान हा देखील विचार करत नाही की लग्न तोडल्याने फक्त तुम्हालाच त्रास होत नाही तर तुमच्यासोबत दोन फॅमिली मधील मेंबरनाही याचा मानसिक त्रास होतो. आणि कशाही प्रकाराचा मानसिक त्रास हा शारीरिक त्रासापेक्षा काकणभर अधिक वेदनादायी असतो. असे काही वागण्यापेक्षा जर तुमचं कोणावर प्रेम असेल तर मग ते आपल्या पालकांना सांगा. नाही मानले तर पटवून  द्या त्यांना, थोडा वेळ जाईल पण नक्कीच समजून घेतील ते. पण विनाकारण सगळं मनात ठेवून दुसऱ्यासोबत लग्न करून अथवा जर नवीन नाते जोडण्याच्या कंडिशन मध्ये लग्नाला होकार देऊन नंतर भर मांडवात लग्न तोडून आपल्या पालकांसमवेत दुसऱ्या कोणाची लाईफ, त्याच्या फॅमिली चे स्वप्न उध्वस्त करून त्यांना मानसिक त्रासाच्या खोल डोहात बुडवू नका. गेल्या जमान्याच्या मानाने आता निदान तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजावाच. “Find Until You Didn’t Get Best”. ( सविस्तर लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला किंवा फेसबुक पेज ला भेट द्या) #maharashtravarta #surajmokashi #marathimuli #ajkalchyamuli #maharashtra #maharashtriantradition #indiantradition #maharashtrawarta #arthaat #arthat https://www.instagram.com/p/BxfYHrLAhdt/?utm_source=ig_tumblr_share&igshid=17hvyljzbbkfc
0 notes