Tumgik
#india_australiatestcricket
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी दिवस-रात्रीची अपेक्षित : गिलखिस्ट  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पुढीलवर्षी भारतीय क्रिकेटचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघांत दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळविला जाईल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍडॅम गिलखिस्टने व्यक्त केली आहे. या प्रस्तावाला भारताकडून दुजोरा मिळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. 2018-19 च्या दौऱयामध्ये दिवस-रात्रीचा कसोटी सामना खेळण्याची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताकडे केली होती पण भारताने या प्रस्तावाला नकार दर्शविला होता पण आता या घटनेनंतर वर्षभराच्या कालावधीत भारतीय क्रिकेट संघ कोलकाता येथे 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यात दिवस-रात्री खेळ करण्यास तयार झाला आहे. भारतीय संघाची ही दिवस-रात्रीची पहिली कसोटी ठरणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष सौरभ गांगुली कोहलीच्या संघाला या नव्या प्रस्तवावर विश्वासात घेतील अशी आशा गिलखिस्टने व्यक्त केली आहे. पुढील उन्हाळी मोसमात ऑस्ट्रेलियात आयसीसीची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात येणार असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्रीचा कसोटी सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा गिलखिस्टने ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागातर्फे आयोजिलेल्या समारंभात व्यक्त केली. दिवस-रात्रीचे कसोटी सामने पहावयास मिळावे याची मला अधिक उत्सुकता आहे. याचा कसोटी खेळावर कोणताच विपरित परिणाम दिसून येत नसल्याचे आढळून आले आहे. दिवस-रात्रीच्या कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जात आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 11 कसोटी सामने दिवस-रात्रीचे खेळविले गेले असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाच सामने खेळले आहेत. 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दिवस-रात्रीचा पहिला कसोटी सामना खेळविला गेला होता. अलिकडच्या कालावधीत कसोटी सामन्याला प्रेक्षकांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याचे गिलखिस्टने सांगितले. भारत ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मलिकेला आजही शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे 47 वर्षीय गिलखिस्टने म्हटले आहे. #tarunbhartnews #tbdsocialmedia #India_Australiatestcricket #daynighttest #AdamGilchrist (at New Delhi) https://www.instagram.com/p/B4hQnZMhes9/?igshid=1525htshvmi4u
0 notes