Tumgik
webmaharashtra-blog · 6 years
Text
शंभरची नोट पडली इतक्या कोटींना
शंभरची नोट पडली इतक्या कोटींना
नवी दिल्ली :
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने 100 रुपयांची नवी नोट प्रसिद्ध केली आहे. पण या नव्या नोटेला एटीएममध्ये जागा करण्यासाठी एटीएम तयार करणाऱ्या कंपन्यांना तब्बल 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. नवीने नोटेचा आकार हा सध्याच्या 100 रुपयांच्या नोटेपेक्षा वेगळा आहे त्यामुळे एटीएममध्ये तिची जागा करावी लागणार आहे. देशभरात 2.4 लाख एटीएम मशीन आहे यात रिकॅलिब्रेट करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च येणार…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
'संजु'...सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी
‘संजु’…सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहाणी
प्रबोध माणगांवकर : ‘बडे बाप कि बिगडी हुई औलाद’ ते दहशतवादी म्हणुन व्यक्तीमत्वावर झालेली चिखलफेक यासह आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गुपीतं दिलखुलासपणे कथन करणाऱ्या संजुबाबा अर्थात संजय सुनिल दत्त या सरमिसळ व्यक्तीमत्वाची रोमांचक कहानी म्हणजे राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजु’ हा चित्रपट.
चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत अर्थात संजय दत्तची भुमिका साकारणरा रणबीर कपुर यासह चित्रपटातून अभिनेत्री सोनम…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
इंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय
इंडियाचा आयर्लंडवर एकतर्फी विजय
दिनेश शिंदे : डब्लिन- बॅट्समन नंतर इंडियाच्या कुलदीप, यजुवेंद्र ने कमाल केली. इंडियाच्या मजबूत बॉलिंग लाईन अप समोर आयर्लंड 132/9 रन बनवू शकली आणि आयर्लंडचा 76 रननी पराभव झाला.
कुलदीप ने 4 व यजुवेंद्र चहल ने 3 विकेट घेतले. 209 रनच्या पाठलाग करताना आयर्लंडकडून जेम्स शेनॉन ने 60 रनची खेळी केली.
आयर्लंड ने इंडिया विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय…
View On WordPress
1 note · View note
webmaharashtra-blog · 6 years
Text
पंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?
पंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?
मुंबई :पीएमबी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदीच्या कायदेशीर प्रत्यार्पणाला सुरुवात झाली. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मुंबईतील पीएमएलए कोर्टाने मंजुरी दिली असून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचलनालयाने पीएमएलए कोर्टात अर्ज केला होता. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी यामधून मागण्यात आली होती. या अर्जाला कोर्टानं मंजुरी दिल्याने नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग काही…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
'रे राया...' च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज !!
वेब महाराष्ट्र टीम : अॅथलेटिक्सवर आधारित मिलिंद शिंदे दिग्दर्शित “रे राया…. कर धावा”  या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटातील गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज मिळाला आहे. कैलाश खेर, जावेद अली यांनी गाणी गायली आहेत. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अजय सुखेजा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अनिता संजय पोपटानी या…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
सपना चौधरीचे खासदार चोप्रांना सडेतोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली : प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगणा सपना चौधरी हिने भाजप खासदाराच्या विधानावर सडेतोड प्रत्युत्तर दिले. माणूस ज्याप्रमाणे विचार करतो, तसे बोलतो. त्यामुळे खासदार चोप्रा यांच्या नजरेत आपण ठुमकेवालीच असल्याची खोचक टिप्पणी चौधरी हिने केली आहे.
भाजप खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांनी सपना चौधरी हिचा ठुमकेवाली असा उल्लेख केला होता. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते.सपना चौधरी काँग्रेसचा…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
'फर्स्ट डांसिंग गर्ल' गौहर जान यांना गुगलचे 'डुडल' अभिवादन
वेब महाराष्ट्र टीम : गुगलने गायक आणि नृत्यांगणा गौहर जान यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त डुडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. गौहर या देशातील पहिल्या गायक आहेत ज्यांचे गाणे ७८ आरपीएम या वेगाने रेकॉर्ड केले होते. जे नंतर प्रसिद्ध अशा ग्रामोफोनवर वाजवले होते.
२६ जून १८७३ मध्ये गौहर जान यांचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये झाला. एंजेलिना येवर्ड असे त्यांचे मुळ नाव आहे. जन्माने…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा
वेब महाराष्ट्र टीम : रविवार रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाची संततधार पुढील चार दिवस अशीच राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण तसेच उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारताच्या अनेक भागात मान्सून दाखल झाला आहे. ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडच्या भागात काही प्रमाणात मान्सून दाखल झाला आहे. रविवारी कोकण, गोवा, मुंबई तसेच…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !
वेब महाराष्ट्र टीम : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट हिंदुस्थानी हॉकीपटू तपन दास यांच्या जीवनावर आधारित आहे. तपन दास यांनी हिंदुस्थानला १९४८ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक येथे हॉकी या खेळासाठी पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. अक्षय कुमार या चित्रपटात तपन दास…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
नरेंद्र मोदी मुंबईत दाखल मुंबई / प्रतिनिधी :  पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील. यावेळी आणीबाणीविरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी यांचे प्रमुख भाषण होणार आहे. 26 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. काँग्रेसची ही दुखरी नस दाबून कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. 26 जूनला आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपने खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विचारमंथन सभेत ते लोकशाही मूल्यांविषयीचे आपले विचार व्यक्त करतीलच, पण याच विषयावर पक्षाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांची मते कार्यकर्त्यांसमोर येतील. पंतप्रधान मोदी हे या विचारमंथन सभेतील प्रमुख संवादक असतील, असे अतुल शहा यांनी म्हटले आहे.
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
पावसाळ्यात या ५ गोष्टी टाळा
वेब महाराष्ट्र टीम : नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा आणि पाऊस थांबल्यानंतर होणारा उकाडा या गोष्टी एकामागोमाग असतातच. त्यामुळं सर्दी – ताप आणि इतर आजारांना साहजिकच आपण निमंत्रण देतो. निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात आपण नक्की काय करू शकतो, कोणत्या चुका टाळू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
छत्री वा रेनकोट घ्यायला विसरु नका : पावसाळ्यामध्ये वातावरण असो वा नसो कायम छत्री अथवा रेनकोट घेऊन जावे.…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
पावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ गाड्यांचे नुकसान
पावसाचा कहर, ढीगाऱ्याखाली १५ कार दबल्या
वेब महाराष्ट्र टीम : अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ जमिनीचा मोठा भाग खचला. या घटनेत जवळपास १५ कार दबल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील बांधकामाविषयी स्थानिकांनी तक्रारी करूनही पालिकेने आजवर डोळेझाक केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1011113757823655936
लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे दुर्घटना…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
सचिन दरेकर यांची 'पार्टी' वेब महाराष्ट्र टीम : आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सूप्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. 'पार्टी' असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला.  नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
VIDEO : 20 वर्षांनी स्टेजवर रेखाची अदाकारी, नृत्यानं आयफाचा माहोल झाला रंगीन
वेब महाराष्ट्र टीम : यंदाचा आयफा पुरस्कार वितरण सोहळा थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये संपन्न होत आहे. जून महिन्याच्या २२ तारखेपासून सुरु झालेल्या या सोहळ्याच्या सांगता समारंभात बॉलिवुडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी २० वर्षाच्या खंडानंतर सलामे इश्क…या गाण्यावर धमाकेदार नृत्य सादर केले. दर���्यान या कार्यक्रमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मिळालेला बेस्ट अॅक्टर पुरस्कार बोनी कपूर यांनी स्वीकारला.
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
जात पडताळणीशिवाय मिळणार प्रवेश ! मुंबई / प्रतिनिधी : सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जातवैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे. यावर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे, परंतु जातप्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार नाही. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम, 2000 (2001 चा महा. 23), यात सुधारणा करण्यासाठी राज्यपाल राव यांना विनंती केली होती. त्यानुसार राज्यपालांनी या सुधारणेसाठी मान्यता दिली आहे. ही तरतूद फक्त सन 2018-19 या वर्षासाठीच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे. आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश काढण्यात आला आहे.
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
पाथर्डीत महिला बस वाहक आणि चालकास बेदम मारहाण अहमदनगर :  पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी परिसरात जमावाने महिला बसवाहक आणि चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. आशा बळे आणि रोहिदास पालवे ही मारहाण करण्यात वाहक आणि चालकांची नावे आहेत. शनिवारी राजेंद्र आठरे आणि चालक पालवे यांच्यात एकमेकांच्या वाहनांना साईट देण्यावरुन शाब्दिक वाद झाला. त्याचा राग मनात धरून आठरेंसह दहा जणांनी पाठलाग करुन बस अडविली. जमावाने चालकाला खाली ओढून दांडके आणि कु्ऱहाडीच्या सहाय्याने  बेदम मारहाण केली.त्यावेळी जमावाने वाहकाकडे असलेले सहा हजार आठशे रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या पालवे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
सई मागणार रेशमची माफी ...
वेब महाराष्ट्र टीम : बिग बॉस मराठीच्या  कालच्या WEEKEND चा डाव या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितले आज एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित आहेत. त्यामुळे घरच्यांना खूप आनंद झाला. कालच्या भागामध्ये रेशम सई आणि मेघावर बरीच नाराज असल्याचे दिसून आले. कानगोष्टीच्या खेळामध्ये रेशमने तिचे मत व्यक्त देखील केले. सईकडून झालेल्या चुकीवरून मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांनी बोलून देखील दाखवले…
View On WordPress
0 notes