Tumgik
wordpicker · 3 years
Text
#The love life
You messaged her first.
She replied.
You became friends.
You fall for her and proposed her.
She accepted.
After sometime she was mad for you.
Completely in love she was.
Texting you whole day and late nights talk.
After some days you start thinking she is mad or what ,completely frustrated you are.
You start ignoring her.
She cried every minute but still love you alot.
Then u came to know that things are not working.
u decided to leave.wow.
She was burst in tears.
Completely heart broken and collapsed.
That moment change her so called life.
You made her lifeless creature.
I just want to ask one thing.
Why dude?can u imagine..
I think , u don't...
Don't damage girls life ,her future.if u can't marry her.plz understand..
It's not simple as u think.
!!!...
1 note · View note
wordpicker · 3 years
Text
#माझी_शाळा_लय_भारी
लहानपण सरले ,संपले भातुकलीचे खेळ
शाळेत जाण्यासाठी जमलाय ,आता लहानग्यांचा मेळ
बालवाडीतच भरलीय ,शाळेत जाण्याची ओढ
मुळाक्षरांची जोड , नि भाताचा स्वाद गोड
'क' ची वाटी गोल, नि 'ख' ची पद्धत न्यारी
अक्षरांची ओळख ,मनात उत्सुकता भारी
भांडाभांडीची मजा ,नि मित्रमैत्रिणींची संगत
जोडसाखळीचा डाव ,नि खेळण्याची गंमत
नवनवीन पुस्तके ,नि शिक्षक माझे गुरु
नव्या उमेदीने आता,अभ्यास झाला सुरु
#वाघ_सरांची शिकवणी, वर्गात शांतता सारी
पाढे पाठांतराला मात्र, पाठीवर शाबासकी प्यारी
लहान शाळा संपली ,मोठ्या शाळेकडे भरारी
प्रश्नांच्या दुनियेत आता,चालेल का हुशारी
हुशार मुलांची शाळा, मनात आली भीती
इंग्रजीचे मोठे धडे ,दिले ताईने हाती
घेतली जागा बेंचने ,आता भुईवरच्या दप्तराची
चायना पेनचे लिखाण, ओढ मात्र शिकण्याची
गोड हसमुख चेहरा ,नि पालन कडक शिस्तीचे
खोल पाया शिक्षणाचा, नियम #झावरे_सरांचे
#मिंडे_सरांचा धाक ,नि हिंदी-इतिहासाचा तास
मान्य साऱ्या अटी ,नि प्रश्नोत्तरांची रास
संख्यारेषेवर बेरीज वजाबाकी,गणिताची गंमत भारी
अचूक उत्तर -मार्क पूर्ण,#शेळके_सरांची पद्धतच न्यारी
नीळा लिटमस तांबडा, अभ्यास पूर्ण विज्ञानाचा
#कापुसकर_सरांची शिकवणी,नि प्रयोगांच्या सिद्धांतांचा
माझी मायबोली मराठी ,नि चित्रकलेला वाव
आहे प्रेमळ आणि शांत , #शेलार_सरांचा स्वभाव
हस्ताक्षराचे कौतुक ,नि पाठांतराची जोड
#वाळुंज_सरांची छडी ,आता नाही कशाची तोड
दर आठवडयाला चाचणी,पुस्तकं झाली पाठ
एका कमी मार्काला,आता #बोडके_सरांशी गाठ
संगणकाचे ज्ञान,नि #जाधव_सरांचा तास
जो करेल अभ्यास ,तोच होईल पास
मनात आले वादळ,नि इंग्रजीची धाकधुक
#राशीनकर_मॅडमचा तास, शिकवणी ही अचूक
स्वच्छ आणि सुंदर ,धडे शाळेच्या परिसराचे
कौतुक आहे फार, #शिपाई_मामांच्या कामाचे
झुंज प्रत्येक संकटाशी,नि #सोबत_मित्रमैत्रिणींची
पाणावलेल्या डोळ्यांतून,नि शाळेतल्या आठवणींची
जोड आहे शिक्षणाची,घ्यावयास उंच भरारी
आशिर्वाद पाठी शिक्षकांचा, माझी शाळा लय भारी
😊!!!...
2 notes · View notes
wordpicker · 3 years
Text
#Reality-The acceptance of truth
जसेजसे आपण मोठे होत जातो, तसे आई-वडील सांगतात..Reality मध्ये जगायला शिकलं पाहिजे ..तशी reality ची concept च जरा वेगळी आहे..काहीशी न समजणारी...
आता,प्रवास सुरु झाला तो reality च्या शोधाचा..
पृथ्वीची गती, मानवी चक्र आणि घड्याळाचे काटे म्हणजे reality कि experiences,unexpected things,risk, uncertainty...
कदाचित दोन्हीही.
मग अनुभवाने शिकवले. Reality तर अशी life living संज्ञा आहे,कि त्यात status,comparison,emotions,satisfaction,असे सगळे part येतात.एक clear cut गोष्टच म्हणावे लागेल...
काही अंशी ,reality एक विश्वासदेखील म्हणता येईल.अगदी डोळे बंद करून जग पाहण्यासाठीचा विश्वास..काही unaccepted गोष्टी accept करण्याचे सामर्थ्य म्हणजे reality...
खरेतर, किती great आहे ना reality ची concept..खूप मोठं बळ असाव लागतं, विस्कळीत झालेल्या गोष्टी सावरायला.तूटलेल्या स्वप्नांना पुन्हा नव्याने उभारी देउन मोठं व्हायला.अगदीच विखुरलेल्या गोष्टी शोधायला.संपलेल्या गोष्टी मागे सोडून नव्या उमेदीने जगायला..खरच खूप guts असावे लागतात ...
Finally समजले, reality is the acceptance of truth ..😊!!!...
2 notes · View notes
wordpicker · 3 years
Text
#An Imaginary World
प्रत्येक व्यक्तिच अस एक Imaginary World असते. आणि त्यात एक imagination storage. ,तो आनंद काही वेगळाच असतो, जेव्हा सत्य घटनांशी imaginations जुळून येतात.
जीवनात अगदी प्रथमच मुंबई शहर पाहुन Imaginary part आणि real part चे साम्य आहे असे समजले. वारुळात मुंग्या कमी पडतील एवढी माणसांची गर्दी आणि त्या गर्दीतील निरनिराळ्या वेशातील निरनिराळी माणस: ..शांततेचा तर कवडसाही सापडणार नाही तिथे.पावसाची सर जमिनीवर पडते आणि तिथेच पाण्याचा साठा तयार होतो ,हा अनुभव काही विलक्षणीय होता.अगदी train मधे बसताना ,भावाच्या हाताला हात पकडावा लागला. तेव्हा तर बालपण च जागे झाले.
मग माझे दुसरे imagination चे विश्व सुरु झाले....Practical आणि Professional आयुष्य .जणूकाही माणूसपणच हरवलय त्यात ..मोठमोठ्या buildings आणि मोठमोठ्या रस्त्यांची connectivity.तो रस्ता फक्त मार्ग दाखवतोय पण मार्ग मात्र काढत नाही.आकाशाकडे बोट दाखवावे तर आकाश सापडत नाही आणि जमिनीकडे पहावे तर माती. खरच मग वाटले गावच मस्त आहे.शांतता आणि त्या शांततेत स्वतः च विश्व.. एवढं मोठ विश्व की माणुसपण ,आपूलकी, प्रेम,विश्वास यांची कमतरता भासणारच नाही.पण पाहता पाहता एक विचार समोरच्या टेकडी वर जाऊन आदळला आणि reverse सांगू लागला ...फक्त आणि फक्त imaginations 😊!!!...
2 notes · View notes
wordpicker · 3 years
Text
#समाधानी आयुष्य
थोडी पडतात उत्तरे हजारो प्रश्नांच्या दुनियेत , कारण सापडत नाही मार्ग विखुरलेल्या वाटांना..हे असे आणि ते का तसे यातच का जाते आयुष्य ,का नाही उमगत वेगळेपणाची खरी गंमत..रंग रुपावरून का ती तुलना पण काळा असेल तरच आहे ना गोरे असण्याला महत्व..हे हवे नी ते हवे का असावे अपेक्षांचे ओझे , जगायला तर पूरेसे असते आपुलकीचे नाते ..चूक की बरोबर यावर का तंटे , तुटणाऱ्या नात्यापेक्षा हे आहे का मोठे.. हा श्रेष्ठ नि तो कनिष्ठ हे का ठरवायचे ,छोट्याशा गोष्टीचे कर्तुत्व होऊ नाही शकत का डोंगराएवढे.. हे सकरार्थी आणि ते नकारार्थी हे का बोलायचे ,पारखेल ना ते नजरेला नि जाणवू दे ना मनाला.. अवगत चालतात गोष्टी नि चुकलेले रस्ते कारण महत्वाचे काय तर समाधानी असणे..😊!!!..
2 notes · View notes
wordpicker · 4 years
Text
♥️माहेरचा उंबरठा नि साथ तुझी♥️...
लग्नाची तयारी सुरू झाली होती ,सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मीही जरा सुखावले होते.पण मनात जरा चलबिचल सुरूच होती .सगळ काही बदलण्याची भीती.नावापासून स्वभावापर्यंत .माझं गाव ,कुटुंब , माणसं आणि स्वतःच जग.
जिव्हाळ्याचा आणि मायेचा ओलावा असणाऱ्या साध्या घरात जन्मलेली ,अगदी छोट्याशा गावात वाढलेली मी .पण त्या गावाचा आणि गावातील प्रेमळ माणसांचा मनात आदर असलेली.जिथे येऊन मन सुखावतं ते माझ गाव.
लग्न- प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील दुसरे पर्व ,आयुष्य बदलणारे आणि दोन कुटुंबांना जोडणारी दोर. तो क्षण आलाच.." मुलगी म्हणजे परक्याच धन" आता खरोखर मनातून जाणवायला लागलं होत.सगळ्या आठवणी ओंजळीत घेवून साठवत होते आणि ती ओंजळही वेचलेल्या क्षणांना उजाळा देऊन ओसांडून वाहातच होती .पाणावलेल्या डोळ्यांनी ..
माझी आजी म्हणते ,प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो. नशिबात जे असतं तेच मिळतं..आयुष्यातील प्रत्येक नाती आणि बंध नशिबानेच जुळतात.पण यात एक अपवाद पण सांगते की कर्माच्या पुढे नशीब धावत नाही..
जिचा तोंडावरून हात फिरविण्याने मला जग विसरल्याचा भास होतो अशी माझी आजी .जिच्याशी मैत्रिणीसारखे तासनतास गप्पा मारू शकते एवढी प्रेमळ." सोनू पुण्याला आहे असे म्हणून ,मी येइपर्यंत ,माझ्यासाठी जपून पेढ्याचा बॉक्स ठेवते ना तू ,खूप गोड वाटते ग ते"
काकडा, हरिपाठ नि आध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी ज्यांनी माझ्यापुढे नेहमी हट्ट केला असे माझे बाबा.थोडे कडक पण तितकेच प्रेम करणारे.." सगळ्यांच्या नजरेतून लपवून आपण जेव्हा बिस्किटांचे पुडे संपवायचो ना ,त्याची सर आता कोणत्याही खाऊला येत नाही" .आज असायला हवे होतात तुम्ही ..खूप Miss करतेय तुम्हाला.
जिला माझ्या अभ्यासातले काही माहीत नसले तरी माझी मुलगी काहीतरी चांगल शिकतेय असे नेहमी म्हणनारी माझी आई.थोडीशी रागीट पण तेवढीच हळवी ,मायाळू . " जास्त जागरण करत बसू नको ,जीवाला खात जा ,कारण तू आहेस तर हे सगळ. अस म्हणतेस ना नेहमी ,ते खूप मोलाचं वाटते ग"..
येणाऱ्या वाईट चांगल्या परिस्थितीत जगायला शिकवणारे माझे वडील.अतिशय शांत.माझ्या मुलीने स्वावलंबी व्हावे यासाठी नेहमी झगडणारे.ज्यांच्या डोळ्यात मला माझ्यासाठी अथांग प्रेम दिसते असे. " माझ्या मागे तुम्ही म्हणत असता ना ! ,माझी लेक आहे ना चुका काढायला नि शिकवायला ..खूप भारी वाटतं ते."
कुणी विचारलं ना , देवापेक्षा जास्त प्रेम कुणावर करते तू ? तर ते माझ्या भावावर .शाळेत हाताला हात धरून न्यायचास मला ."आई बोलायची ,हात सोडायचा नाही हा तिचा लहान आहे ना तुझ्यापेक्षा ?." ते वाक्य तू एवढं लक्षात ठेवलंस की आजवर मला कोणत्याही परिस्थितीत एकटीला सोडलं नाहीस.कधी सकरार्थी मार्ग निवडायला ,कधी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यायला ..नेहमी असतोस. खर सांगू ,आयुष्यात कोणतेही दुःख पचवू शकते फक्त तुझ्या डोळ्यांत येणारे पाणी सोडून. " नेहमी म्हणतोस ना ,you are unique piece ...this sentence is most precious for me."
माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या छोट्याश्या smile साठी ,माझ्या सुखासाठी प्रयत्न करतच असते अशी माझी बहिण. चिडचिड न करता शांतपणे गोष्टी सोडवल्या जाऊ शकतात हे शिकवणारी आणि मला जीवापाड जपणारी. " तुझ्यासाठी हे simple आहे असे जेव्हा म्हणतेस ना तेव्हा खर सगळ काही सोपे होऊन जाते ग.. "
आणि ज्याच्याशी आयुष्याची गाठ बांधली जाणार असा प्रेमळ तू..
माहेरच्या उंबरठ्याच्या आठवणींत चालायचेय तुझ्या पावलांसोबत आणि नात्यांनी घट्ट बांधलेल्या आपल्या कुटुंबांना ,मायेच्या ओलाव्याने ठेवायचय जोडून.व्हायचय भाग तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखाचा .आपल्यातील विश्वासाच्या बंधाला करायचंय आणखी मजबूत.कधी चिडायचय , ओरडायचय आणि तितकंच प्रेम करायचय , बिघडलेल्या गोष्टींचा त्रास घेऊन तुझ्यापाशीच येऊन खूप रडायचय. तुझ्यासोबतच हारायचय आणि जिंकण्याची स्वप्न बघायचीय.तुझ्या चेऱ्यावरील गोड हास्याचे कारण बनायचय.हातात हात घट्ट धरून द्यायचीय तुझी आयुष्यभरासाठी साथ😊!!!...
4 notes · View notes