amolj619
amolj619
असेच मनातले काहीतरी...
12 posts
अमोल जाधव
Don't wanna be here? Send us removal request.
amolj619 · 10 months ago
Text
अवलंबूनी मार्ग आपला
आपलाच नकाशा असावा
व्हावे एकटेच मार्गस्थ
कधीतरी एकटा प्रवास करावा
विचारांचे गुंते सोडून
नात्यांचे बंध तोडून
आसक्तीचा मोह नसावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
घ्यावी स्वावलंबाची शिदोरी
करावी एकटीच वारी
कुणाचा तिरस्कार नसावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
कुणावर ठेवू नये आशा
सापडतील मग नव्या दिशा
आसमंतात उद्रधनुष्य खुलावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
होईल मग स्वतःची स्वतःशीच ओळख
खऱ्या खोट्याची होईल पारख
जणू नवा जन्म मिळावा
कधीतरी एकटा प्रवास करावा...
- अमोल जाधव
1 note · View note
amolj619 · 6 years ago
Text
25th anniversary
काय लिहावे तुमच्याबद्दल स्मरत नाही स्मरुनी,
आठवणीना देतो उजाळा विचार थोड़ा करुनि
काय करावा, कसा करावा कुठुन करावा प्रारंभ
आपल्या व्यक्तिमत्वाला आहे का मुळी एकच विशिष्ट रंग?
अनेक नात्यांच्या रंगछटानी बहरलेले आपले आयुष्य,
प्रत्येक नाते मोलाने जपन्यात आहात आपण दक्ष
लहानासमोर लहान होता , मोठ्यान समोर मोठे
एवढे वागण्यात साधेपन आजकाल पहायला मिळते कुठे?
आयुष्यात माझ्या नेहमीच लाभो तुमचे मार्गदर्शन
सदैव लाभो तुमचा सहवास, हेच माझे अभीष्टचिंतन
निरोगी राहो तुमची काया, पूर्ण होवोत सर्व इच्छा
शतायुषि व्हावे तुम्ही हीच आमची सदिच्छा !!
- अमोल जाधव
1 note · View note
amolj619 · 7 years ago
Text
होय, मी माणसांना बदलताना पहिलय...
होय, मी माणसांना बदलताना पहिलय
सोईप्रमाणे मुखवटे बदलून, वावरताना पहिलय
होय, मी माणसांना बदलताना पहिलय...
कधी आपली पड़ती बाजु संभाळताना
कधी श्रीमंतीमुळे उन्मत्त होताना पहिलय
होय, मी माणसांना बदलताना पहिलय....
एका ताटात जेवणाऱ्याना, एकमेकांचा घास घेताना पहिलय
कधी स्वार्थी तर कधी कृतघ्न होताना पहिलय
होय, मी माणसांना बदलताना पहिलय...
गरजेपुरता मैत्री करताना पहिलय
स्वतःच्या फायद्यासाठी विश्वासघात करताना पाहिलय
होय, मी माणसांना बदलताना पहिलय...
गरीब श्रीमंत भेदभाव करताना पहिलय
नात्यांमध्ये सुद्धा तसे वर्गीकरण करताना पहिलय
होय, मी माणसांना बदलताना पहिलय...
जिवंत असताना माणसाला किंमत नाही
मेल्यावर मात्र जगासाठी खोटे रड़ताना पहिलय
होय, मी माणसांना बदलताना पहिलय...
कवी- अमो��� जाधव
0 notes
amolj619 · 7 years ago
Text
ओळखलेत का सर मला
दारात आला कोणी,
शरीर होते रंगवलेले
अंगावरती पाणी
'कलर' लावू का थोडासा
म्हणाला वरती पाहून,
पुढे सरकला किचिंत मग
हात पुढे सरसावुन
मन राखण्याकरिता त्याचे मग मी
लावून घेतला रंग,
'हैप्पी होली' म्हणून सुद्धा
हा स्तब्ध, एका जागी दंग
खिशाकड़े हात जाता माझा
लागला आशेने पाहुनी,
५० रूपयात काय होते साहेब
क्वार्टर झाली महाग, आता दया २०० ची देणगी
साहेब तुम्ही देवमाणुस
देऊन गेला पदवी,
चालण्यात त्याच्या वेगळीच लकब
कधी झुके उजवीकड़े तर कधी बाजु डावी
किचनमधून सौ. बरसल्या
२०० झाले का एवढे स्वस्त,
मी म्हणालो ओलखलेस का ह्यांना
हे तर आपले कचरेवाले गृहस्थ
रंगाच्या ह्या सणात
एक दिवस सगळे माफ़ असते,
बाकि दिवस सगळ्या जातीपातीची माणसे
आज मात्र सगळे 'कलरफुल' असते
लेखक : अमोल जाधव
0 notes
amolj619 · 8 years ago
Text
प्रेम म्हणजे प्रेम असते ....
दाटून आले आभाळ, मन भरून आले, जुन्या आठवणींच्या साठवणीने, मनात काहुर केले.
पहिल्या पावसाचा पहिला तो सुवास, जलबिंदुचा आभाळातून जमिनिवरचा प्रवास.
जलधारांच्या वर्षावात प्रेयसिला घेऊन कवेत, काहीतरी जादू वाटते थंड शीतल हवेत.
एका छत्रित चालण्याची मज्जा काही औरच, पावला पावलात अडखळण्याची गंमत असते फारच..
लांब पल्याचा रस्ता मग वाटू लागतो आखुड, संपू नए लवकर असाच असतो मूड.
मक्याचे कणिस, भजी आणि फक्कड़ चहा, शेयरिंग करून खाण्यात प्रेम वाढते हे खरे की, अंधश्रधा ??
श्रावणाच्या ��िरवळीसारखे प्रेम देखील बहरत असते, कुणीतरी म्हंटलेच आहे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते ....
कवी - अमोल जाधव
0 notes
amolj619 · 8 years ago
Text
काल सहजच कुणीतरी who is ur best friend ? असा प्रश्न केला. मी मात्र त्याला जास्त महत्व न देता सफाईने टाळला. थोड्या वेळाने ट्रेन सुरू होताच तोच प्रश्न माझ्या मनावर घोंघावू लागला . कोण आहे माझा best friend ज्याला मी सगळ काही शेअर करतो . कोण आहे ज्याच्या समोर मी आरश्यासारखा साफ राहतो ? कोण आहे जो माझे गुपित एतरांशी शेअर नाही करत ? कोण आहे जो मला कधीच एकटे सोडत नाही . विचार करता करता माझ्या डोळ्यासमोर खूप व्यक्तींचे चेहरे येऊन गेले पण कोणताच चेहरा स्थिर नाही राहिला . अश्या या प्रश्नांचा भडिमार चुकवण्यासाठी मी earphones लावले आणि माझी आवडती गाणी ऐकू लागलो आणि त्यात हरवून गेलो . आणि तेव्हा मला पटले की माझे best friend हे दुसरे तिसरे कोणी नसून माझी favorite songs आहेत . जे कोणत्याही चांगल्या किवहा वाईट प्रसंगात मला कधीच एकटे सोडत नाहीत , जे selfish नाहीत . आयुष्यात प्रत्येक माणूस हा एका क्षणापर्यन्तच आपल्या बरोबर असतो. शेवटी आयुष्याच्या गणितात भागाकर, गुणाकार, बेरीज, वजाबाकी करून बाकी उरतो ते फक्त आपणच ....... अमोल जाधव
0 notes
amolj619 · 8 years ago
Text
कार्यालयीन नाराजीचे गूढ़....
रोजच्या जीवनातील स्पर्धेपेक्षा शालेय जीवनातील स्पर्धा कितीतरी चांगल्या होत्या…
एकत्र अभ्यास करणे, एकमेकांच्या अडचणी दूर करणे, ‘तू हे केलेस का’ ?, अरे हे कन्फर्म येणार आहे ! हे तर असे सांगायचो की जणू पेपर आपणच सेट केलाय..😁 कधी कुणाची ईर्षा वाटायच�� नाही की हां आपल्या पुढे जाईल तर आपले महत्त्व कमी होईल. उलट आपल्या वर्गातला विद्याथी पहिला आला की दहा जणांना सांगायचो की माझ्या वर्गातला पहिला आला.. किती निरागस होतो आपण.. बाहेरच्या जगाची काहीच माहिती नसायची कारण आपले विश्व होते आपली शाळा.
कुठे गेला तो निरागसपणा ?? काळाच्या काळ्याशार डोहात कुठे हरवला का तो ?? पैसे कमवायच्या आणि पदउनक्ति करायच्या नादात आपण आपल्यातली माणुसकी तर विसरलो नाही ना हा आपणच आपला विचार करायला हवा. आज कार्यालयीन कामात 'माणसे शाळा’ करतात हां वाक्यप्रचार सर्रास ऐकायला मिळतो. इथे शाळेच्या असा अर्थ काढला जातो. स्वताच्या फायद्यसाठी कट-कारस्थानांची जाळे विणन्यामध्ये अनेक जण आपली ऊर्जा आणि बुद्धि वाया घालवतात. आपला सहकर्मचारी आपल्या पुढे जाऊ नये याची पदोपदी काळजी घेतली जाते. आपला स्वार्थ साधण्यासाठी आपली सत्सदविवेकबुद्धि गहाण ठेवली जाते. मग हळूहळू गट पडतात आमची माणसे आणि तुमची माणसे… ह्या माणसांच्या शीतयुद्धामध्ये नुकसान होते ते फक्त आणि फक्त त्या कार्यालयाचे, संघठनेचे, संस्थेचे. माणूस हळूहळू अश्या विकृतिकडे झुकत जातो ज्याचे त्यालाच भान राहत नाही. एक गोष्ट कळत नाही सर्व कर्मचारी हे त्या कार्यालयासाठी कीव्हा संस्थेसाठी कार्यरत असतात मग 'आमची माणसे’ ह्याची नक्की व्याख्या तरी काय ?? अशाच गटबाजीमुळे मग माणसे दुखावली जातात आणि कार्यशील माणसे आपल्यातली कार्यश्रमता कमी करतात… “तो नाही करत तर मी का करू?” “शेवटी कितीही काम केले तरी काय उपयोग?” अशी प्रश्न बळावतात. कार्यालयातील वातावरण दूषित होते. परिणाम, फक्त नुकसान… मग ते वैयक्तिक असो, कार्यालयाचे असो कीव्हा संस्थेचे असो.
काही गोष्टी आपण फक्त सुविचार म्हणून ऐकतो व विसरतो; गरज आहे आपल्यातल्या त्या शाळकरी मुलाला जिवंत ठेवणे. कितीही अडचणी आल्या तरी आपल्या कार्यालयाच्या व संस्थेच्या प्रति निष्ठा ठेवणे. मनापासून केलेले कोणतेही काम कधी वाया जात नाही असे मलातरी वाटते. फक्त थोडा वेळ दया आणि विश्वास ठेवा त्या परमेश्वरावर…
0 notes
amolj619 · 9 years ago
Text
जगण झाले महाग आणि मरण झाले स्वस्त चारही बाजु चिंता आणि विचारानी घातलेय गस्त
प्रश्नांच्या ह्या अथांग सागरात, उत्तर शोधण्यात सगळेच व्यस्त जगण झाले महाग आणि मरण झाले स्वस्त
मतलबीया दुनियेत एकटा एकाकी पड़लोय, परके झालेत आपले आणि जवळचे झालेत त्रयस्थ जगण झाले महाग आणि मरण झाले स्वस्त
भविष्याचा मार्ग चुकलोय, वर्तमानाचे राहिले नाही स्वारस्य जगण झाले महाग आणि मरण झाले स्वस्त
जगण झाले महाग आणि मरण झाले स्वस्त चारही बाजु चिंता आणि विचारानी घातलेय गस्त
लेखक - अमोल जाधव
0 notes
amolj619 · 9 years ago
Text
कधीतरी वाटे मना...
कधीतरी वाटे मना, एकदातरी selfish व्ह्यवे झुगारून टाकावी सर्व बंधने, मुक्त होऊन जगावे रोजचीच दगदग, रोजचीच कटकट रोजच्याच् धवपळीत, चार क्षण हक्काचे मिळावे कधीतरी वाटे....... नात्यांच्या या बाजारातून थोड़े बाहेर यावे आकाशाचे लावून पंख दाही दिशा उधळावे कधीतरी वाटे...... नसतील चिंता, नसतील दुरावे नसतील टंटा, नसतील फुगवे अशा स्थळी काही काळ विसावे कधीतरी वाटे..... भविष्याची काळजी नको भुतकाळाच्या आठवणी नको आजचा दिवस शेवटचा म्हणून जगावे कधीतरी वाटे मना, एकदातरी selfish व्ह्यवे कधीतरी वाटे मना..... लेखक - अमोल जाधव
0 notes
amolj619 · 11 years ago
Text
शिवजयंती संकल्प...
आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपति शिवाजी महाराजांची जयंती आहे. आजपासून सुमारे साडे तीनशे ते चारशे वर्षापुर्वी शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या पोटी एका अद्वित्यिय व साहसी मुलाचा जन्म झाला. संपूर्ण महाराष्ट्राला गुलामगिरीतुन मुक्त करून स्वराज्याची स्थापना करण्याचे अशक्यप्राय असे कार्य महाराज्यांनी शक्य करून दाखवले. कित्येक वर्ष मोघल साम्राज्याचे हाल व पिळवणुकीपासून त्रस्त झालेल्या जनतेस स्वराज्याची चव चाखवली आणि मग त्यानंतर मराठ्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. आज देखील आपण जे मराठी सण अभिमानाने आणि जल्लोषाने साजरे करतो ते देखील महाराज्यांच्या कृपेनेच... सगळे सण आपण साजरे करतो मग आजच्या दिवसाला का आपण ��वढे सहज घेतो. फक्त सोशल नेटवर्क साइट्स किव्हा व्हाट्स ऍप मधुन फ़ोटो शेयर करायचे की झाली आमची शिवजयंती ..? माझ्या मते आजचा दिवस पण एका सणाप्रमाणे साजरा झाला पाहिजे. महाराज्यांच्या प्रतिमेची पूजा करून आजचा दिवसाची सुरवात केली पाहिजे. घरात गोड जेवण केले पाहिजे. एकमेकाना शुभेक्छा दिल्या पाहिजेत (व्हाट्स ऍप वरुन सुद्धा चालतील) त्याचप्रकारे फक्त आजचा एक दिवस नाही तर एक संकल्प केला पहिजे की ज्याप्रकारे महाराजानी अन्यायविरुद्ध आवाज उठवला होता; त्याचप्रकारे आपण देखील कुठे अन्याय होत असेल तर तो सहन नाही करायचा. त्या विरोधात आवाज उठवायचा आणि वेळेप्रसंगी गनिमिकावा देखील करायचा कारण आपल्या महाराजांची शिकवण आहे की, शत्रु कितीही मोठा असो, गनिमिकाव्यासमोर झुकतोच झुकतो. स्त्रियांना संरक्षण दया. कारण शिवाजीला जन्म देणारी एक स्त्रीच् होती हे विसरु नका. चला संकल्प करुया ! जय जिजाऊ, जय शिवराय !
1 note · View note
amolj619 · 11 years ago
Text
स्त्रीशक्ति नमो नमः
स्त्री शक्ति कीती पावरफुल आहे याची आज एक नव्याने प्रचिती आली. सर्विस रोडला पोलिस चेकिंग चालू होती. येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व सर्व बाइक्सना पोलिस थांबवत होते. त्यात एक बाइकवाला सरळ पोलिसांच्या बाजूने निघुन गेला त्यावर एका हवालदाराने कटाक्ष टाकला पण त्याला थांबवले नाही. कारण त्याच्या मागे एक बाई (त्याची बायको असावी) बसली होती. खरच ते म्हणतात ना "एका कर्तृतवान पुरुषामागे एक स्त्री असते"... साक्षात् शंकर भगवानाला आदिशक्तिच्या पायाखाली झोपावे लागले होते तर पोलिस काय त्यासमोर.. सध्या ज्या काही बातम्या वाचतो किव्हा पाहतो त्यात बलात्काराच्या बातम्याचे प्रमाण 30% पर्यन्त वाढले आहे. स्त्री म्हणजे साक्षात् आदिशक्ति, आणि एका स्त्रीवर केलेला अन्याय म्हणजे साक्षात् देवीचा अपमान आहे. एतिहास साक्षीदार आहे की ज्याने स्त्री जातीचा अपमान केला त्याचा विनाश अटळ आहे. 'महाभारत' आणि 'रामायण' यांची निर्मितिचे कारण सुद्धा एका स्त्रीचा केलेला अपमान आहे. शाळेमध्ये आता मूल्यशिक्षणाबरोबर स्वरक्षेचे धड़े देणे ही आता काळाची गरज झाली आहे असे ��ाझे मत आहे. डान्स क्लास्सेस बरोबर आता बॉक्ससिंग आणि कराटेचे क्लासेस लावणे पण तेवढेच गरजेचे झालेय. आपले पूर्वज अगदी राजे महाराजे सुद्धा आपल्या मुलींना तलवारबाजी तसेच लढाईचे शिक्षण देत असत. राणी ताराबाई, झाशीची राणी हे उदाहरणे आहेत आपल्या डोळ्यासमोर... मग आपण देखील हे शिक्षण सक्तीचे करायला हवे. उच्च शिक्षणबरोबर तडफदार आणि कणखरपणा देखील महिला सबलीकरणासाठी अत्यंत महत्वाची गरज आहे. ज्याप्रमाणे शिख बंधुना कट्यार ठेवणे कायद्यामध्ये मान्य आहे तसेच एखादे हत्यार स्त्रीकडे असणे कायद्याने मान्यता दिली पहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीमधील लावा बाहेर आला की सर्व प्राणिमात्रांचा सर्वनाश होतो त्याला कोणीच थांबवु शकत नाही त्याप्रमाणे स्त्रीशक्तिचा उद्रेक झाला तर त्यासमोर देखील कोणीच तग धरु शकणार नाही. जर महिला सशक्त आणि सामर्थ्यवान झाल्या तर स्वतचे रक्षण त्या स्वता: करू शकतील आणि मग कोणीही भडवा तिला हात लावताना दहा वेळा विचार करेल... जय आदिशक्ति माते नमः
1 note · View note
amolj619 · 11 years ago
Text
असेच मनातले काहीतरी...
काही दिवसांपूर्वी आमच्या मैनेजमेंट बिल्डिंगच्या समोर असलेल्या आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजचा annual day होता. dj च्या तालावर संपूर्ण तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. वेळ पुढे सरकत होता परंतु त्यांचा जोश तासागणिक वाढतच होता. माझे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर असल्याने संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेणे मला शक्य होत होते. माझ्याबरोबर माझ्या स्टाफ मधील देखील काही कर्मचारी ते दृश्य पाहत होते व ते पाहताना प्रत्येकजण आपल्या कॉलेजच्या स्मृतिना उजाळा देत असणार अशी खात्री मला वाटत होती कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हास्याचि लकेर उमटत होती. ते पाहत असताना मला एक जाणवले की प्रत्येक मुला-मुलींचा एक ग्रुप होता. त्यात काही ग्रुप त्यांच्या वेशभूषेवरुन मोठ्या श्रीमंत घरातली वाटत होती तर काही त्यांच्या साध्या वेशभूषेमुळे सामान्य घरातील वाटत होती. परंतु दोन्ही ग्रुप तितक्याच उत्साहात व आनंदात नाचत होती. मी देखील ११वीत असताना असाच फरक काही काळ जाणवला होता पण इंट्रा कॉलेज बुद्धिबळ स्पर्��ेत तृतीय पारितोषिक मिळाल्यामुळे माझी ओळख वाढण्यास मदत झाली. तेव्हा ज्या मुलांकडे पैसे असायचे, बाइक किव्हा गाड़ी असायची त्यांचा ग्रुप प्रत्येक गोष्टीत पुढे असायचा कारण पैशाच्या जोरावर खूप काही गोष्टी त्यांना सहज करणे शक्य होत असे. पण त्यामुळे बाकी मुले मागे होती अशातलाही काही भाग नव्हता परंतु जेव्हा पैशाचा विषय यायचा तेव्हा त्याना थोडा काढता पाय घ्यावा लागत असे. मग ते days असोत, cultural असो, annual असो किव्हा अजुन काही असो. पण मला नेहमी तेव्हा असे वाटायचे की प्रत्येकाच्या सुखाच्या व आनंदाच्या परिभाषा वेगळ्या होत्या. काही बाइकने फिरायचे तर काहीना एकत्र स्टेशन पर्यन्त चालत जाण्यात मज्जा वाटायची, काहि होटल्समधे नाश्ता करायला जायचे तर काही वन बाय टू वडापाव खाऊन खुश असायचे. आयुष्यात देखील असेच असते असे मला वाटते. प्रत्येकाच्या सुखाच्या परिभाषा वेगळ्या असतात. लाखो करोडो रुपये कमवुन देखील अनेक जणांना संसारसुख मिळत नाही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक चिंतेचा भाव असतो तर काही मोजक्याच पैश्यात घर चालवून देखील आपल्या कुटुंबाबरोबर खुश असतो व त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य असते. कुणाला त्याच्या बिज़नेसमध्ये करोडोचे कॉन्ट्रैक्ट मिळाल्याने जे सुख मिळते तेच सुख एखाद्या गरिबाला आजच्या दिवसात पोट भरून जेवलो ह्यामुळे मिळते. आयुष्यात माणसाने समाधानी असणे फार गरजेचे आहे असे मला वाटते परंतु ह्याचा अर्थ आपण प्रगति करू नये किव्हा आहे तसेच राहावे असा मुळीच नाही. कारण स्वताला विकसित करणे हा सृष्टीचा नियम आहे आणि जो काळाप्रमाणे विकसित होत नाही तो नष्ट होतो हा इतिहास आहे. माणसाने ध्येयवादी नक्कीच असावे पण भविष्याची एवढीपण चिंता करू नये की ज्यामुळे तुमचा वर्तमान स्वतासाठी जगायचेच विसरून जाल. मग जेव्हा वार्धक्यत सगळे गप्पा मारत असतील भूतकाळाची; तेव्हा तुम्ही विचार कराल की, अरे! अशी मज्जा आपण कधी केलिच नाही.. कोणीतरी म्हंटलेच आहे "हर पल यहाँ, जी भर जीयो. जो है समां कल हो ना हो.......😉
1 note · View note