hemant-the-veteran
hemant-the-veteran
Untitled
2 posts
Don't wanna be here? Send us removal request.
hemant-the-veteran · 5 years ago
Text
प्रश्नचिन्हां खालचं टिंब.
कोणाच्याही मनातल जे जे काही आहे ते इथ कुठ तरी  येणार आहे.
कधी कधी भरल्या ढगाखाली बसल की वाट्त आपण असच घुप्प भराव आणि गडगडून धप्प कन  कुठ तरी कोसळाव पण ते माझ्या  हातात नाही कारण एकच ते म्हणजे तो वारा एखाद्या आडमुठ्या सारखा तो जागचा हालतच नाही. मग मला माझ दोओंद सम्भालत तसच उभ राहावं लागत. जड पणान हालताही येत नाही किवा मोकळ होता येत नाही. जर त्या वेळेला खाली कुठ तरी ओसाड माळावर एखादा शेतकरी आशेन माझ्या कड बघत असेल तर वाटत जाव कोसळाव त्याच्यावर एकदा थंड करावी त्याची जमीन पडून, सुखवाव त्याला त्याच्या शेतात वाहणारे पाण्याचे ओघळ वाहताना पाहून पण मी असहाय्य असतो.थोड्या वेळान खडबडून जागा झाल्या सारखा वारा जागा होतो.मलां एका जागी बघून त्याला चेव येतो तो मला ढकलायचा प्रयत्न करतो माझा जडपणा त्याला आवरत  नाही मी त्याला सागत असतो आरे जरां जोर  लाव पण मला इथच त्या ओसाड माळावर कोसळायचय. मग मात्र तो पिसाटतो कुठून तरी त्याला अजून बळ मिळत आणि तो शेतात घुसलेल्या एखाद्या सांडा सारखा माझ्या अंगावर  येतो.असहाय्य मी भरकटतो. दूर कुठ तरी फेकला जातो. तीथ सर्व हिरवगार असत तुडुंब पाणी भरलेलं असत.माझ भरल पोट मला  असह्य होत आता मी इथच कोसळणार असतो. लांबून मला तो ओसाड माळ दिसतो.भकास जीव दिसतो. आणि माझ्या डोळ्यातून  पाण्याची धार निघते.मी तिथच कोसळतो. भरल्या ओहोळातून वाहत जातो. कुठ कोसळायच हे माझ्या हातात नसत. का नसत.. का नसत ????????  
0 notes
hemant-the-veteran · 5 years ago
Text
my first
My name is hemant joshi. i make blogs now
1 note · View note