Tumgik
iamappu-blog · 5 years
Text
Mother’s Day
प्रिय आईस,
Sonography करायला गेले होते. आज बाळाचं दृक-अस्तित्व दिसलं. त्या छोट्याश्या गोळ्याला पाहून अपूर्वच्या डोळ्यांत पाणीच साठलं. माझा हात घट्ट पकडून बसला होता बिचारा. डॉ. खळदकर म्हणाल्या, "तुझ्यासारखंच टुणटुणीत आहे बाळ.." अपूर्व ने पटापट photos काढून घेतले आणि मला घेऊन बाहेर निघाला. "चालू नकोस जास्त, मी गाडी इकडेच घेऊन येतो.." तो निघाला.. अजून काहीच झालेलं नसताना आत्तापासून कसली एव्हढी काळजी घेतो हा.. मी गाडीच्या दिशेने चालायला लागले. बाळाचं ते पाहिलं मूर्त स्वरूप पाहून मी सुद्धा भारावून गेले होते. त्याचाच विचार करत चालत होते. आता अपूर्व घरभर आजचे photo-prints लावणार.. केवढा वेडेपणा करतो तो.. तो गाडी घेऊन माझ्याच दिशेने येत होता.. तेवढ्यात माझा पाय जरा अडखळला.. रस्त्याच्या कडेला जाताना माझा अंदाज चुकला, आणि मी पडणार.. तोच माझा मी तोल सावरला आणि परत उभी राहिले. एक क्षण सुद्धा गेला नसेल, पण जेव्हा मी उभी होते, तेव्हा माझा हात पोटावर होता आणि बाळाच्या काळजीने माझे ठोके वाढले होते..
मी 'आई' होण्याचा आजचा हा पहिला अनुभव! आपलं बाळ आपल्यासाठी काय असतं, ह्याची पहिल्यांदाच जाणीव झाली. घरी जात असताना माझ्या मनात अनेक भावना येत होत्या. अर्थात मी तुझा विचार करत होते. अपूर्व as always office च्या calls मध्ये होता.. कधी मी लहानपणीच्या आठवणींत वाहून गेले, समजलंच नाही.. अगदी लहानपणचं मला आपलं ते जामखेड चं घर आठवलं. तिथल्या त्या गच्चीमध्ये दिवसभर तू, मी आणि प्रमिला काकू खेळायचो. तिथल्या त्या झोपाळ्यावर तासन्तास तू मला घेऊन बसलेली असायचीस.. तुझ्या कुशीमध्ये कधी झोप लागायची, समजायचं सुद्धा नाही. अजूनही तिथे कधी गेले, की मला फक्त त्याच आठवणी आठवतात.
मला शिक्षण चांगलं मिळावं, म्हणून तू आणि बाबा मला पुण्यात घेऊन आलात. ज्ञान प्रबोधिनी मध्ये admission मिळावी म्हणून तू किती तयारी करून घेतली होतीस मला अजूनही आठवतंय.. आणि शेवटी admission मिळाल्यांनतर किती गर्व होता तुला माझा, तेही आठवतंय! लोकमान्य टिळक पुण्यतिथीला भाषण स्पर्धा होती, तेव्हा माझ्याकडून जे भाषण करवून घेतलं होतंस. एक जरी चूक झाली तरी डोळ्यात राग असणाऱ्या तुला, मी जिंकल्यानंतर मात्र डोळ्यातून पाणी आवरता येत नव्हतं. माझ्या प्रत्येक गोष्टींचं कौतुक माझ्यापेक्षा तुलाच जास्त होतं..
मला आठवतंय.. मी तिसरीमध्ये असताना तू Pune University च्या Botany Lab मध्ये job सुरु केला होतास. शाळेतून घरी आले, आणि तू दिसली नाहीस, म्हणून मी रडून हैदोस घातला होता. मी हट्ट करतच राहिले, रडतच राहिले.. पर्यायाने तुला तो job सोडावा लागला. आई, मी रडायचे म्हणून तू तुझं career सोडून दिलंस गं.. आज मला realize होतंय की तुझ्या आयुष्यातला किती मोठा decision होता तो.. तू तुझ्या शिक्षणाला घेऊन किती passionate होतीस ते मला खूप लोकांनी सांगितलंय! मी सुद्धा तुझीच मुलगी..
College ला असताना मी घराच्या बाहेर जास्त वेळ spend करायला लागले. तुझी चिडचिड वाढायला लागली. आपली भांडणं व्हायला लागली. मी फिरोदिया साठी नाटकांमध्ये काम करायचे.. रात्री घरी उशिरा यायचे.. वेळी-अवेळी जेवायचे.. तर काळजीपोटी तू रात्र रात्र जागी असायचीच! खरं सांगायचं झालं तर, तेव्हा मला तो सगळा तुझा वेडेपणा वाटायचा. आता मी मोठी झाली आहे, माझे decisions मी घ्यायला हवेत, मला तेवढी अक्कल आहे.. कशाला करते एवढी काळजी? माझी मला काळजी घेता येते आता.. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात आणून मी नेहमी त्रासलेली असायचे.. College संपलं.. Job करू लागले.. मला लवकर निघावं लागायचं तर गुढग्याचा त्रास होत असताना सुद्धा, माझा डबा करण्यासाठी लवकर उठायचीस.. तेव्हाही मी विचार करी की मी बाहेर खाऊ शकते.. After all, I earn well.. माझा तो स्वतःबद्दलचा गर्व किती फुटकळ होता, ते आज लक्षात येतंय..
अमेरिकेमध्ये Masters ची कल्पना तुला जेव्हा सांगितली, तू तेव्हा खूप रडली होतीस. मी इथे आले. पहिल्यांदाच तुझ्यापासून एवढी लांब होते. एकटी रहात होते.. शिकत होते.. काम करत होते.. हळू हळू तू नसण्याची मला सवय झाली. खरं सांगू आई, तू नसण्याची सवय करून घेताना मला तुझ्यापासून लांब असण्याचं दुःख त्रास देत होतं.. मग अपूर्व भेटला. तो ही अगदी माझ्याच सारखा. प्रेमात पडले. लग्न करण्याचा decision माझा मीच घेतला. त्यामध्येही तू माझ्या पाठीशी उभी होतीस आणि अजूनही आहेस..
आई, कधी बोलले नाही तुला.. पण खूप दिवसांपासून मला काही प्रश्न सतावत आहेत गं.. माझ्यासाठी इतकं compromise कसं करू शकलीस? तुझं career.. तुझी passion.. तुझ्या ambitions सगळ्या सोडून देऊन, माझ्या आयुष्याला आयुष्यभर महत्व देत राहिलीस.. दिवस रात्र मला मोठं करता करता स्वतःसाठी जगणं सोडू कसं शकलीस? माझ्या पंखांमध्ये बळ भरण्याच्या नादात तुझे पंख विरत चाललेत हे विसरू कशी शकलीस? मला तुझ्यापासून इतकं लांब कसं सोडू शकलीस? आज जेव्हा माझा नकळत पोटावर हात गेला ना आई, तेव्हा मला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तुझ्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करू ते कधीच समजणार नाही. तुझ्या उपकारांची परतफेड करायला कधीही जमणार नाही. पण, हे मला आता समजतंय, की मला घडवत असताना तू एक 'आई' घडवत होतीस. माझ्या बाळासोबत एका आईचा सुद्धा जन्म होतोय..
0 notes
iamappu-blog · 5 years
Text
2nd Anniversary
Latch वाजलं.. दार उघडलं.. तो आत आला.. ती TV बघत couch वरच बसली होती.. त्याची आवडती ती लाल भागलपुरी silk साडी.. मोकळे सोडलेले तिचे ते लांब सरळ केस..  पहिल्या anniversary ला घेतलेलं ते सोन्याचं bracelet.. कानात दोन नक्षत्र.. कपाळी चंद्रकोर.. त्या couch वर निखळ लावण्य पसरल्यासारखं झालं होतं.. ती दिसताक्षणी त्याने चटकन जीभ चावली.. TV वरची नजर हटू नं देता तिने सारे केस एका बाजूला घेतले.. ती केवढी रागावली असणारे ह्याचा त्याला अंदाज होताच..  तो पळत पळत आत आला.. office चे ते विस्कटलेले कपडे बदलायला हवे होते..
"shower घेऊन येतोच गं.." तो bathroom मध्ये धावला..  
सततचं हे office चं काम.. उशिरा यायचं प्रमाण किती वाढलंय ह्याचं आजकाल? आज आपली 2nd anniversary.. आज सुद्धा एवढा उशीर? की त्याला लक्षातच नाहीये? मला वाटलं रात्री काहीतरी छान plan बनवेल.. Dinner ला जाऊ कुठेतरी.. तसंच फिरायला बाहेर जाऊ.. कसचं काय? मी इतकी तयार होऊन बसले, त्याने बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे.. मी काहीही बनवलेलं नाहीये घरी.. त्याच्या लक्षात नसेल तर चट बाहेर जाऊन आणेल काहीतरी.. मागच्या anniversary ला किती छान celebration केलं होतं.. इतके सारे gifts.. किती मजा आली होती.. आणि पुढच्याच वर्षी ही चिन्हं? हे असंच असतं का? संसार शिळा होणे म्हणजे हेच असतं का? पण मला तर नाही झालाय काही शिळा वगऱे.. त्याला कंटाळा आला असावा का?? हे असं का होतंय? काहीतरी चुकतंय का माझं? नाहीतर शुक्रवार असून हा एवढ्या उशिरा आला नसता.. आजचं काहीच कौतुक नाही का? बस्स! भूक लागलीये जाम..
तो अजून shower घेतच होता. केस सावरत ती उठली, dining table कडे वळली. काहीतरी नवीन box होता म्हणून तिने तो उघडला, आणि गरम गरम गुलाबजाम चा वास आला.. ती कळी तेव्हाच खुलली.. क्षणाचाही विलंब नं करता तिने पाठोपाठ २ गुलाबजाम खाल्ले.. एव्हाना तो बाहेर आला होता. बाळ शांत झालं असल्यामुळे त्याला फार काही फिकीर नव्हती..
"काय केलंय आज जेवायला?? छान भूक लागलीये.. दिवसभरच्या कामाचा थकवा रात्री बायको च्या हातच्या जेवणाने निघून जातो एकदम!!"
आता मात्र राग अनावर झाला.. "काहीच केलेलं नाहीये आज!!" एकदम तिरसट उत्तर आलं..
"हो? मग काहीतरी मागवूया?? त्यापेक्षा एक काम करू, बाहेरच जाऊया जेवायला.." एकदम casually म्हणत होता.. "थांब! मी shirt घालून येतोच!"
चिडचिड झाली होती.. पण भूक सुद्धा लागलीच होती. त्यामुळे त्यासोबत जाण्यावाचून काही गत्यंतर नव्हतं! तो आला, ते निघाले.. चावी घेऊन दार उघडलं, "फार गोड दिसते आहेस आज.." राग थोडासा निवळला.. ती lock लावून बाहेर पडली, दारापासून गाडीपर्यंत रस्त्यावर गुलाबांच्या पाकळ्या पसरल्या होत्या.. त्यांचा तो सुगंध पूर्ण अंगणात पसरला होता..  त्याने तिच्यासाठी हात पुढे केला.. तो हात पकडून ती चालू लागली.. तिची ती साडी, पाकळ्यांच्या रंगाशी एकरूप होऊन गेली होती.. त्यावरून चालताना तिला स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं.. त्याने तिच्यासाठी दार उघडलं.. ती दोघं बसली.. मागच्या seat वर ठेवलेला कागदाचा पुडा त्याने उघडला तेव्हा गाडीभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता.. तो गजरा घालण्यासाठी तिने वेणी घातली..
"मी अजून थोडावेळ तुझ्याकडे बघत राहिलो तर तुला नजर लागेल.." ती लाजली आणि त्याला एक फटका मारला.. गाडी निघाली.. कुमार गंधर्व "सावरे ऐजहयो" ऐकवत होते आणि कोणीतरी सुखाचा तो अचानक बसलेला धक्का पचवत होतं.. "Wine? Stella Rosa?" काही गोष्टींना ती नाही म्हणू शकत नाही.. इच्छित स्थळी त्याने गाडी लावली. ते दोघं जेवायला गेले.. नेहमीचंच restaurant असल्याने त्यांनाही सगळे ओळखत होते आणि Anniversary wish करत होते.. "वाहिनी, जेवण बरं आहे ना?" Restaurant च्या मालकांनी स्वतःहून चौकशी केली.. आज मिळणाऱ्या special treatment मुळे ती भारावून गेली होती.. जेवणं उरकली.. त्याने जाता जाता Wine Bottle घेतली.. अर्थात, आता काही लगेच घरी जायचं नाही हे नक्की होतं..  
"जेवण जरा heavy झालं नाही?? त्यात तू गुलाबजाम सुद्धा खाल्लेस.." तिने त्याला एक गुद्दा मारला.. "Walk ला जाऊया कुठेतरी छान??" त्याने गाडी काढली, कुमार गंधर्व चालूच होते.. त्याचा एक हात Gear Shifting Knob वर होता, आणि ती त्यासोबत काहीतरी चाळा करत होती.. "रागावली होतीस ना आज??" तिने तो हात जोरात दाबला.. त्याने हळूच तिला poke केलं.. "तुझं नाक थोडं छोटं असतं तर तो राग दिसला तरी नसता.." तिने तो हात अजूनच जोरात आवळला.. खूप दिवसांपासून एक जागा त्याने हेरून ठेवली होती.. शेजारून नदी वाहत होती.. आणि तिकडे छान चालायला जागा होती.. ती दोघं उतरली.. थोडंसं पुढे चालत जाताच त्याला काहीतरी आठवलं.. "आलोच.." तो गाडीच्या दिशेने धावला.. तिचं sweater घेऊन येताना तो दिसत होता..
ती एकटक पाण्याकडे बघता बघता म्हणाली.. "चांदणं काय सुंदर पडलंय नाही? चंद्र बघ.. त्याचं प्रतिबिंब पाण्यात किती छान दिसतंय बघ.."  "आज माझ्या चंद्रकोरीचं रूप जास्त देखणं आहे.." तो एवढंच बोलला आणि काहीतरी विचारात पडला.. तीने लाजून त्याचा हात घट्ट पकडला.. चालत चालत ते पुढे आले.. एके ठिकाणी ते बसले.. Wine Bottle उघडत असताना तो म्हणाला, "अर्झ्झ किया हैं.." "इर्शाद......."
लाखो तारे होते हैं जिसके पास.. वो आसमान पता नहीं क्यू खूष नहीं आज.. शायद ये चाँद उस्का न हो सका कभी.. जो बैठा हैं मेरे साथ..
"शेवटच्या ओळीला काहीतरी छान सुचलं पाहिजे होतं गं.. बाकी मस्त जमला होता!!" तो तक्रारीच्या सुरात म्हणत होता.. "मुझे ये शेर और शायर, दोनो पसंद आये!" ती म्हणाली.. Wine घशाखाली उतरत होती.. रात्र अजूनच बेधुंद होत होती.. त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती एक एक sip घेत होती.. "तुला माहितीये, विन्स्टन चर्चिल काय म्हणतात.. "Remember, gentlemen, it's not just France we are fighting for, it's Champagne!" You know, दुसऱ्या महायुद्धामध्ये तू बघितलंस..  .......... .. .. .. त्याच्या बडबडीकडे तिचं काहीही लक्ष नव्हतं.. "किती वेड्यासारखा विचार करत होतो आपण? मला जशी हवी होती त्यापेक्षाही सुंदर evening त्याने plan  केली.." ती खुश होती.. साधारण बरंच भरकटून आल्यानन्तर तो भानावर आला.. त्याने खिशात हात घातला, हळूच काहीतरी बाहेर काढलं.. तिचा हात अलगत आपल्या हातात घेतला, आणि एक सुंदर अंगठी तिच्या हातात चढवली.. "Happy Anniversary"!! ती ते दृश्य बघतच राहिली.. तिच्या नाजूक हातामध्ये ती अंगठी अजूनच सुंदर दिसत होती..
रात्र चढत होती.. त्याने निघण्याचा इशारा केला.. तिला अजून काही वेळ त्याच्या हातात हात ठेवायचा होता..
0 notes
iamappu-blog · 6 years
Text
Date
गाडीचा horn वाजला.. ती हळुवार लाजली. मागच्याच आठवड्यामध्ये त्याच्यासोबत जाऊन घेतलेल्या गडद निळ्या रंगाच्या Ballerinas पायात अडकवल्या होत्या. गुलाबी रंगांची विविध फुलं असणारा एक गोड Frock तिने घातला होता. तिच्या नितळ गोऱ्या वर्णाला तो रंग फारच उठून दिसे. हातातल्या घड्याळाचं आज उदघाटन होतं. दुसऱ्या हातात ताईच्या लग्नात घेतलेलं अतिशय गोजिरवाणं bracelet होतं. आणि उजव्या तर्जनी मध्ये घातलेली ती मोत्याची अंगठी त्या हाताच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर घालत होती. कानांमध्ये सोनेरी hoops घालून, भुवयांच्या मधोमध तिने रेखीव चंद्रकोर ती सजवत बसली होती आणि स्वतःलाच न्याहाळत कुठेतरी हरवली होती. गाडीचा horn पुन्हा एकदा वाजला तेव्हा मात्र तिचे हात पटापट हालू लागले. डोळे मोठे करून तिने हळूच काजळ लावलं आणि लगेचच दाराकडे धावली. खांद्यापर्यंत रुळलेले तिचे ते कुरळे केस बांधायची सुद्धा तिला शुद्ध राहिली नाही. आणि खास ह्या frock वर घालण्यासाठी आणलेलं locket घालायचं मात्र विसरलो म्हणून तीने lock लावताना जीभ चावली.
गाडीच्या headlights मध्ये तिचं ते देखणं रूप पाहून त्याचा सगळा राग मावळला. तो चटकन बाहेर आला, तिच्यासाठी दार उघडलं, तिची नाजूक बोटं आपल्या तळहातात त्याने खिळवली. हळूच तिच्या मनगट आपल्या ओठांवर कुरवाळत तिचं सौंदर्य तो निरखत होता. तोच, ती त्याच्या मिठीत सामावली. 'चल वेडे, उशीर झालाय..', दार लावत तो म्हणाला. 'माझी भेळ घेतलीयेस ना रे?'.. तो फक्त हसला! वास्तविक त्याने तिच्यासाठी अजून काहीतरी 'special' घेतलं होतं. ते निघाले. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता.
'कशी दिसतेय मी आज?' न राहवून तिने विचारलं.. 'आपको देखता हू तो आखे वफादार नही रेह पाती खुदसे..'! 'गप्प रे..' गालातल्या गालात हसत ती म्हणाली.. तिची गालावरची खळी पाहून तो म्हणाला, 'अर्झ्झ किया हैं..' काहीतरी छान ऐकायला मिळणार म्हणून ती जोरात म्हणाली, 'इर्शाद इर्शाद..'
आपके हुस्न का आलम न पूछिये, बस तस्वीर हो गया हूँ, तस्वीर देखकर।
'वाह वाह वाह वाह, जनाब.. मझा आ गया' 'थांब, मी पटकन लिहून ठेवते' म्हणत तिने phone काढला, पण त्याने चटकन तो तिच्या हातून हिसकावून घेतला. 'आपको देखता हू तोह ना ये आंखे वफादार रेहेती ना अल्फाज..'! त्याने तिला पोटात हळूच poke केलं, ती अजूनच ओशाळली.. त्याने music सुरु केलं.. लागलेल्या गाण्याची पहिली tune ऐकूनच तो खूष झाला, म्हणाला 'ऐक..'
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या.. मन शेवंतीचे फुल झाले तुला वाहण्या..
Freeway हून त्याने exit घेतल्यानन्तर थंडी जाणवायला लागली होती. आजच्या destination बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असून सुद्धा तीने त्याला काही विचारलं नव्हतं. पण, तिला खूप आवडेल अशीच जागा त्याने शोधून काढली होती.  समुद्र दिसू लागल्यानन्तर मात्र तिला ती संध्याकाळ अजूनच आवडायला लागली. काहीच वेळांनंतर ते पोहोचले. त्याने आपल्या नजरेत असेल अश्या ठिकाणी गाडी park केली.. समोर निळाशार समुद्र.. क्षितिजावर मावळता सूर्य.. संधीप्रकाशात सोन्यासारख्या दिसणाऱ्या त्या भरतीच्या लाटा.. थोडीशी गरम, पण पायाला बेधुंद बनवणारी ती रेती.. उत्तर-दक्षिण वाहणारे अन हलका आवाज करणारे ते वारे.. तो डिक्कीतून सामान काढत होता.. आणि ती समुद्राकडे पळाली.. नेहमी चुकणारा सूर्यास्त, आज मात्र त्याने जमवून आणला होता.. ते दोघेही समुद्रात होते.. एकमेकांना घट्ट पकडून! त्याला जवळ घेत ती म्हणाली, 'Thank you..'..
सूर्य मावळाल्यानन्तर मात्र वाऱ्यांचा वेग आणि हवेत गारवा चांगलाच वाढला. एक bedsheet टाकून ते दोघं आयुष्य रंगवत बसले होते. 'एका मिनिटात आलो..' म्हणून तो गेला.. आणि चक्क दोन मोठ्या candles घेऊन आला.. एका box वर त्याने त्या पेटवल्या.. त्याने हळूच एक wine bottle आणली होती. Cork Screw त्याने साफ केला, bottle च्या neck वरची foil त्याने हळुवार काढली, cork च्या बरोबर मध्ये त्याने screw रोवला, अगदी अदबीने त्याने तो cork ना तोडता बाहेर काढला.. त्याने cork smell केला.. हवा तो सुगंध आल्याची खात्री करून त्याने wine glass मध्ये तिला serve केलं.. 'Madame, profitez de votre vin..'
तिची आवडती भेळ असल्यामुळे स्वारी खुश होती. दोघांना प्रचंड आवडणाऱ्या लाटांच्या गजरात यथासांग जेवणं झाली.. आता मात्र थंडी चांगलीच वाढली होती.. परत एकदा 'आलोच..' म्हणाला तेव्हा तिला अजून एक surprise मिळणार ह्याची खात्री होती.. त्याच्या हातात एक gift wrap होतं, आणि एक box. विचार न करता तीने gift open केलं, एक ग्रे रंगाचा सुंदर sweater होता. तीने तो घातला आणि पटकन त्याला मिठी मारली.. त्या frock वर तो sweater अगदी suit झाला होता.. आणि ती पोर अजूनच छान दिसत होती.. त्याने तो दुसरा box उघडला, त्यातून एक गुलाबजाम काढून तिला भरवला.. बापरे, एव्हढा आनंद!! पटकन तिच्या डोळ्यातून पाणीच आलं.. त्याने प्रेमाने हळूच तिची एक बट कानामागे अडकवली.. आता तिला त्याच्या मिठीत खूप शांत वाटत होतं!
समुद्राकडे बघत ती दोघं बसली होती.. त्याच्या हाताशी ती काहीतरी चाळा करत होती.. त्याच्या खांद्यावर तीने डोकं ठेवलं अन म्हणाली मागे चंद्र उगवायला लागलाय बघ.. तो तीचा हात घट्ट पकडत म्हणाला, 'ओशाळला असेल बघ.. त्याचं लावण्य कोणीतरी चोरलय आज.. Oops कोणीतरी नाही, त्या चंद्राचं लावण्य दुसऱ्याच चंद्राने चोरलय आज..' 'वेड्या..' चंद्रप्रकाश वाढू लागला.. समोरच्या फेसाळत्या लाटांनी वेगळाच रंग घेतला.. ओहोटी सुरु झाली होती.. समोरचं विश्व खूप शांत भासत होतं.. तीला थोडी थोडी भीती वाटू लागली होती.. काही वेळातच ते दोघं निघाले.. तीचा हसरा चेहरा तो डोळ्यात साठवून ठेवत होता... कायमचा! संध्याकाळ संपत आली होती..
0 notes
iamappu-blog · 6 years
Text
रक्षाबंधन
"आप्या, बहीण झाली तुला.." मला जवळ घेत आज्जीने सांगितलं होतं. आज्जीच्या कडेवर बसून मी पहिल्यांदा ते गोंडस बाळ बघत होतो. आई किती प्रेमाने बघत होती तुझ्याकडे. मला काही कळत नसे, पण सगळे तुझ्या येण्याने खूप खूप खुश होते. बाबा आले, त्यांनी तुला उचलून घेतलं आणि वाकून मला दाखवलं. बहीण काय असतं ते समजत नसलं तरी माझी ती चिमुकली मूर्ती, चेहऱ्यावर निरनिराळे भाव आणत तुझ्याकडे किती कौतुकानं बघत होती म्हणून सांगू. फक्त माझं कोणीतरी असल्याचं मला वाटलं. काही दिवसांनी तुला घरी घेऊन आलो. माझाच पाळणा मी सजवून ठेव���ा होता. मला फार काही समजत नसे पण, तू व्यवस्थित झोपलीयेस का ते बघायला मी रात्र रात्र जागत असे असं आई सांगायची. तुझं घरात असणं किती किती छान वाटायचं..
हळू हळू तू पुढे सरकू लागलीस.. रांगू लागलीस.. लुटू लुटू उभी राहिलीस.. टुळू टुळू बोलू लागलीस.. तुझे ते बोबडे बोल समजून घेण्यातच मी आणि आई गुंतलेलो असू.  मला तेव्हा मुभा नसे, पण 'बाबां'पाठोपाठ जेव्हा पहिल्यांदा 'दादा' म्हणालीस, तेव्हा तुला छातीशी कवटाळून कुठे तरी घेऊन जायचं होतं मला.. तू जागी असताना तुझ्या सभोवताली फिरणं आणि तू झोपलेली असताना तासनतास तुझ्याकडे एकटक बघत तू उठण्याची वाट बघणं, ह्यातच बालपण सरलं. मी शाळेत जाऊ लागलो, पण पहिले कितीतरी दिवस माझं लक्ष लागत नसे. घरी येऊन कधी तुला बघतो, असं होई. Eventually तू सुद्धा शाळेत येऊ लागलीस. माझे classes बुडवून तुला कोणी त्रास तर देत नाहीना ते बघायला कितीतरी वेळा मी तुझ्या वर्गाबाहेर उभं राहिल्याचं मला आठवतं. त्या नानूने तुझा ball हिसकावून घेतला होता तेव्हा त्याला काय बदडला होता.. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला जपायचं असायचं मला..
जसे जसे आपण मोठे झालो, तू मात्र छान धीट बनत गेलीस. कोण्या एका मुलाने तुला काही त्रास दिला तर कानाखाली भिरकावली होतीस त्याच्या.. तेव्हा मात्र तुझी काळजी संपली. "अप्प्या च्या बहिणीपासून जरा जपून बरं का.." अशी जेव्हा मुलं म्हणत, तेव्हा तुझ्या दादाला किती मजा येई, तुला नाही समजणार ते!! काळजी संपली आणि तुला त्रास देणं सुरु झालं. "तू गल्लीत सापडलीस", "आई बाबांचं माझ्यावरच प्रेम जास्त आहे" असं म्हणत तुला चिडवणे.. गणितावरून तुझी सतत थट्टा उडवणे, तुझ्या जमतील तेवढ्या वेगवेगळ्या खोड्या काढणे, माझी कामं तुझ्याकडून करवून घेणे, भांडणं झाली की तुला मनसोक्त मारून घेणे ह्याच सगळ्या शाळेतल्या आठवणी. पण तुला म्हणून सांगतो ऐक, आपल्या छोट्या बहिणीला छळण्याइतकं सुख कोणत्याच भावाला कशातच नसतं, कारण तिच्याएवढं 'आपलं' त्याचं कोणीच नसतं!
माझ्या College च्या पहिल्या दिवसाचं माझ्यापेक्षा तुलाच जास्त कौतुक होतं. माझ्या phone मधले photos परत परत बघत बसायचीस. माझ्या trophies तुझ्या शाळेत मैत्रिणींना दाखवायला घेऊन जायचीस. Project ची कामं करून घरी यायला उशीर झाला तर माझ्यासाठी जेवायला थांबलेली असायचीस. मला नको त्या मैत्रिणीवरून चिडवून उगीचच लाजवायचीस. कोणाला कधीही भेटली नसलीस तरी मला कोण आवडते, ते नेमकं ठाऊक असायचं तुला. गच्चीवर मी जास्तवेळ phone वर बोलताना, आई बाबांना वाट्टेल ती करणं सांगून मला 'वाचवायचीस'. मला job मिळला तेव्हा तर तू तुझ्या मित्र मैत्रिणींना 'party' दिली होतीस.
मला ASU चं admit आल्यानन्तर तुझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. "दादा, जग फिरायला निघालास की रे तू.. मला पण घेऊन चल तुझ्यासोबत!" अलगत टोचलं गं काहीतरी.. माझं flight ticket book झाल्यांनतर, "मी काहीतरी गोड घेऊन येते" म्हणून सटकलीस, आणि बाहेर जाऊन भडाभडा रडलीस. पण लगेचच परतलीस.. आईला सावरायला. एकदम, तू मोठी झाल्याची अनुभूती झाली मला. ह्यावेळी मात्र आईला सांभाळायला मी मुद्दामहून गेलो नव्हतो. आईसाठी माझ्यापेक्षाही तुझा खांदा  माऊ आणि कणखर आहे, हे मला कळून चुकलं. तू होतीस म्हणून तर मी निर्धास्त येऊ शकलो. माझं packing आणि जायची तयारी करायला तू होतीस म्हणून तर माझ्या मित्रांना शेवटचं 'मनसोक्त' भेटता आलं. मला airport वर सोडताना मात्र, शेवटचे काही क्षण आईला मिळावेत म्हणून तू आधीच हात सोडून मागे निघून गेलीस. नानूशी गप्पा मारण्याचा बहाणा, मला आणि तुझ्याच अश्रूंना देत होतीस!
आज रक्षाबंधन! आज तुझा दिवस. तू सोबत नसण्याचं दुःख, आज द्विगुणित होतं. इथे बसून मी आईला तुझ्या gift विषयी सतत सुचना देत बसतो. वेड्यासारख्या.. तू सुद्धा राखीचं courier माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत अगदी रोज track ठेवतेस. तुझी राखी येते. आता तिला सांभाळतो.. लहानपणी तुला साम्भाळायचो तसाच! आपला video call होतो. राखीचं gift म्हणून घेतलेला नवीन dress घातलेला असतोस. मी राखी बांधून घेतो. आणि मग तू खोळंबत ठेवलेल्या बाकीच्या भावंडांना राखी बांधतेस. तू खुश असतेस, आणि मी एकटा! मला एकदम पहिल्यांदा आईचा हात पकडून राखी बांधतानाची तू आठवतेस. इवलंसं बाळ ते.. अर्थ माहिती नव्हता, पण दादाला ओवाळायचं होतं.. हट्टानं! मोठी होत होत अजूनच माझी होत गेलीस. तुझं ते बोबडं 'दादा' बोलणं आठवतं.. आणि लग्नामध्ये दादा नाही, म्हणून त्याच्या आवडीची सीताफळ रबडी न खाणारी तू आठवतेस.. एवढी मोठी कधी झालीस? माझ्या स्वप्नांचा पाठलाग करता करता तुझ्यापासून खूपच दूर आलो असं वाटतं. तू ही कुठेतरी अपूर्ण असतेस. बाकी सगळ्यांना राख्या बांधून तू स्वतःचं समाधान करून घेतेस. तुला gifts देण्याचे माझे प्रयत्न पाहून कुत्सितपणे हसतेस. तुला काय gift हवंय, हे नेमकं जाणून असणारा मी, तुला ते देऊ शकत नाही! फक्त मला पाहिल्यानन्तरच तुझ्या गालाला जी खळी पडते, ती कुठेतरी हरवलेली असते, म्हणूनच कदाचित आज मी एक असमाधानी भाऊ असतो. तुलाही हे सगळं ठाऊक असतं, पण आपण हे संवाद फक्त डोळ्यानं करतो.
तुझ्यापासून हजारो मैल दूर असतानाही हे समजतं, की तू आहेस, म्हणून मी आहे, आम्ही आहोत! तुझं असणं, हेच देवाचं सगळ्यात मोठं देणं. तू माझ्या आयुष्यात आलीस, आणि अत्तराची कुपी उघडताच सुगंध दरवाळावा, तसं माझं जीवन दरवळून गेलं!!
0 notes
iamappu-blog · 6 years
Text
My Dear..
तुला बघितलं, आणि तू हसलीस! तेव्हाच काहीसं छान वाटून गेलं खरं, पण दुर्लक्ष केलं त्याकडे! तुम्हा सगळ्यांच्या स्वागतात गुंतून गेलो. तू घर बघत होतीस, आणि मी coffee बनवत होतो. 'काही मदत हवीये का रे?', तू आपसूक म्हणालीस, आणि ह्या प्रश्नाची सवय नसलेला मी, coffee च्या वाफांमध्ये कुठेतरी वाहायला लागलो. 'काय छान आहे रे तुझं kitchen..', मी भानावर आलो! 'Coffee is ready, madam!'. तू गोड हसलीस. 'काय छान आहे अरे ही..'
तुम्ही सगळे coffee घेत होतात, आणि मी स्वयंपाकात अडकून गेलो. मी आणि तुझी smile, भलतेच busy होतो! तुम्ही बाहेर पत्ते खेळत होतात, मी मध्ये मध्ये चक्कर टाकत होतोच! तू इतकी innocently खेळत होतीस माहितेय? मी काही basic डावपेच तुला सांगून आत सटकलो. काही वेळात तू तो game जिंकलीस, आणि खुश होऊन मला सांगायला आलीस.. पण एव्हाना बदाम राणी मुळे मी पुरता अडकलो. आता काही दुर्लक्ष करता येईना..
लोकं जास्त असल्यामुळे मला जरा वेळ लागत होता. तू आत आलीस! मी हसलो. 'काही मदत करू?', 'नको गं, करेन मी! तू enjoy कर बाहेर..'. माझ्या वाक्यातला खोटेपणा तुला लक्षात आला असावा कदाचित. तू थांबलीस! मला हायसं वाटलं. Chicken शिजत होतं छान, आण�� अबोल मी तुझ्यात मग्न होतो.. तू काहीतरी गुणगुणत होतीस छान. तुझ्याएवढा नसला तरी गोड आहे तुझा आवाज. 'भाजी ला वेळ असेल, तर घर दाखवतोस तुझं?'.. 'पण तुम्ही तर..' मी चटकन जीभ चावली! 'दाखवतो की..'. तुझ्या लाजण्याकडे मात्र मी जातीनं लक्ष दिलं. आपण backyard मध्ये गेलो. 'काय छान चांदणं पडलंय ना आज?'! 'हो पण फार काही लक्ष जात नाहीये त्यांच्याकडे..' आता मात्र चांदण्या चिडल्या असाव्यात.. चांद खुद मेरेपास जो था!!
जेवणानंतर आपण walk ला गेलो.. तुझ्याशी फार बोलणं होत नसलं तरी तुझं सभोवती असणं, हेच खुश करत होतं. मी नुसताच हसत होतो. मला ते जग आवडून गेलं होतं. काही वेळात तू निघालीस. 'तू खूप आवडलास मला', नजरेनंच होकार दिला होतास! सुत जमून गेलं छान. त्यामुळे 'परत भेटू' वगरे क्षुल्लक गोष्टी बोलल्याच गेल्या नाहीत. तुला जाऊ द्यायचं नव्हतं खरं! पण उद्याचं office!!! तुला म्हणून सांगतो, खूप दिवसांपासून शोधत होतो मी.. काहीतरी.. सगळं छान होतं, पण काहीतरी अपूर्ण राहिलं होतं! आज ते अनभिज्ञ अपूर्ण, तू पूर्ण केलंस. मी शांत होतो.
उद्याची सगळी तयारी करून मी झोपायला आलो, पण तुझ्याप्रमाणेच मलाही झोप लागत नव्हती! ह्या शांत जगात आपण दोघेच एकटे अशांत होतो! तुला एकदा बघायचं होतं बस.. मी उठून बसलो. तुझ्यासाठी काहीतरी लिहिलं.. तुझ्या नकळत तुझा घेतलेला एक photo पहिला. 'झोप गं..'! मी डोळे मिटले, तुलाच बघण्यासाठी..  
0 notes
iamappu-blog · 6 years
Text
तू असतीस तर..
तू असतीस तर झाले असते.. गडे उन्हाचे गोड चांदणे..
suddenly गाणं सुरु झालं. ती अलगत हसली.. काहीतरी छान आणि खूप ओळखीचं लागलं होतं.. ताटात एक चविष्ट भाजी चाटत होती. आता मात्र लक्ष तिकडे नव्हतं. हळूच तिने एक बट कानामागे केली. आणि उजवा हात सूर पकडण्यामध्ये गुंतला होता. एकदा सूर सापडला, की शब्द फार matter करत नाहीत. नाही का? आता ती धुंद होऊन गात होती.  तिचे घारे डोळे बंद झाले की चिडचिड होई. बाकी आवाज बरा असला तरी ह्या गाण्याला मात्र तो नेमका नीट लागायचा. जशी धून बदलत होती तशी तिची मान आणि त्यावरचं ते सुंदर विश्व बदले. बघत राहावं बस.. त्या नितळ गोऱ्या सौंदर्यामध्ये हरवलेलो असताना, अचानक तिने poke केलं.. 'काय झालं'??
बकुळिच्या पुष्पापरी नाजुक फुलले असते गंधाने क्षण
आता ह्या नाजूक फुलाला काय सांगू?? पण तो रोमांचक प्रवाह तोडायची हिम्मत मला होत नव्हती. मी interrupt केल्यामुळे तिचं लक्ष जरा माझ्याकडे divert झालं होतं. मला जरा छानही वाटलं. पण करता काय? त्या गाण्यात परत जायची माझीच इच्छा होती. म्हणून मग मीच म्हणालो,
अन्‌ रंगांनी केले असते क्षितिजावरले खिन्न रितेपण
हे ऐकताच ते बाळ गोड हसलं. आणि मी परत लाजलो. एक बट उगाचच ते सौंदर्य वाढवत होती. पण तिला आवडत नाही, म्हणून मीच खुणावलं.. बाळ परत गाण्यात बुडालं होतं.  आणि मी चेहऱ्यावर काहीतरी खुणावतो म्हणून तिने चेहराच पुढे केला. ती एवढ्या जवळ आली तर एकदम भांबावून गेलो. चेहरा अगदीच गुलाबी पडला. साधारण तासाभराने मला समजलं, आपण हिची बट मागे घ्यायची आहे म्हणून..
तू असतीस तर झाले असते आहे त्याहुनी जग हे सुंदर
अगं काय सांगू तुला, तू किती गोड दिसतीयेस. मी थरथरत्या हातांनी तिची बट मागे घ्यायला गेलो.. तेवढ्यात पुढच्या सुराने ती जरा लांब गेली. त्या क्षणी मला त्या संजीव अभ्यंकराचा राग जरी आला असला तरी त्यांच्या ह्याच सुराने वाचवलं होतं.
चांदण्यात विरघळले असते.. गगन धरेतील धूसर अंतर..
नंतर जरावेळ ती ते गाणं गुणगुणत होती. आणि मी तिला गुणगुणत होतो.. वाह! थोड्यावेळाने तिला मी समजलो.. ती हसली, हळूच माझ्या केसांवरून हात फिरवले आणि ताटं उचलली!!
0 notes
iamappu-blog · 6 years
Text
अस्त..
नाही म्हणून गेलीच आहेस तर ऐक आता एक छान अस्त.. 
हा अस्त सजवायचाय मला आता..
तू सुंदर, मी छान.. 
आणि म्हणूनच हा अस्त महत्वाचा आहे जगासाठी..
तू गेलीस, आपलं असणं संपवलंस..
आता त्याची कारणं विचारण्याचीही वेळ निघून गेलीये..
आणि महत्वाचं म्हणजे, मी सुद्धा फार फार व्यस्त आहे ह्या अस्तात.
मस्त होतोय हा अस्त, अगदी आपल्यासारखा! 
त्यालाही काही बंधनं नाहीयेत. काही मर्यादा नाहीयेत. अफाट आहे, आपल्या प्रेमासारखाच. 
पण, म्हणूनच जरासा घाबरतोय! 
त्या अनंताला सामोरा जाताना नेहमीप्रमाणे सोबत असलेली तू, आता मात्र नाहीयेस! 
मोक्याच्या वेळी मला नकळत सोडून जाण्याचा खट्याळपणा अजूनही कमी झालेला नाही तुझा.. 
पण तो कधी कमीही होऊ द्यायचा नव्हता मला. 
आणि म्हणूनच हा अस्त..
आता काय? कसं काय? कसं होणार? कसं असणार? असणं असणार? माहिती नाही.. 
ह्याला आधी मार्गी लावतो, आणि मग विचार करतो! 
प्रश्न हजार आहेत गं सये.. तुझ्याच सारखे! 
पण फरक एवढाच आहे आता, की त्यांची उत्तरं शोधावी लागतील.. 
बाकी माझ्या खोल प्रश्नांना तुझी उथळ उत्तरं किती दिवस पुरी पडणार? 
पण त्या उथळ उत्तरांची खोली मी ओळखून आहे व्यवस्थीत. 
प्रश्नच आहेत गं.. मी असतो तर काळजी तरी केली असतीस! असो. 
एक प्रश्न मात्र कधी हयातच नव्हता. आणि तो म्हणजे, `नसणं असणार?`. 
आणि म्हणूनच कदाचित तू बेफिकीर आहेस. 
पण विचार कर, माझं असणं नसलं, तर तू 'तू' राहशील? 
हे अर्थात उलटपक्षी सुद्धा सत्य आहेच. 
म्हणून हा अस्त...
छान होतोय कदाचित. 
ए तुला माहितीये, थोडीशी मजा येते आहे. 
कारण हे सगळं चालू असताना, नकळत तुला भेटून येतोय मी! 
तुझ्या आठवणींमध्ये रमायला काहीच हरकत नव्हती खरं, पण त्यापेक्षा हे अशांत मौनच बरं! 
तुझं असणंही असतं.. आणि तुझं नसणं ही नसतं. 
बाकी तुझ्या असून नसण्यामुळे आजकाल डोळ्यातल्या समुद्राला सीमा रहात नाही, अगदी माझ्या प्रेमासारखीच! 
पण वाहू देत नाही मी त्याला. कारण, तुझ्या मनाविरुद्ध जाण्याची इच्छा अजूनही उरात बाळगून आहे मी.
 तुझी इच्छा, तुझे हट्ट, तुझे राग, तुझे रुसवे, तुझे ओरडणे.. आता माझ्या वाट्याला येणार नसलं, तरी तुझ्या पोकळतेशी हे सगळे संवाद करू बघणारा मी, वेडा ठरतोय कदाचित! 
म्हणून हा अस्त..
चला, हे सगळं यथेच्छ पार पडलं, की मी झोपायला मोकळा! 
छान झोप काढेन.. आईची मांडी.. तिची बोटं.. माझे केस.. शांतता.. खूप दिवस होऊन गेले.. 
बाबांना कुठेतरी छान drive वर घेऊन जाईन. 
सोसाट वाऱ्यामध्ये वाहणाऱ्या नारळाच्या झाडांचा आवाज ऐकायचाय.. 
रात्री गरम गरम मसाला दूध प्यायचंय.. 
शरीराला कडवट द्रव्यांची लागलेली सवय  काढायची आहे.. 
किर्र अंधारात त्या वाहणाऱ्या लाटांमुळे ओल्या झालेल्या रेतीला स्पर्श करायचाय.. 
आईने केलेला वरण भात आणि तूप खाऊन निवांत पडून ते तुटणारे तारे पाहायचेत.. क्या बात है.. 
तुझ्याविना असलेल्या एकांतात करण्यासारखं काहीच नाहीये असं वाटायचं बऱ्याच रात्री.. 
पण हा अस्त सगळं काही सुधारेल. म्हणून इतका वेळ ह्याला सुंदर बनवण्यात गुंतलोय.. 
आणि तुला म्हणून सांगतो, माझ्या अपेक्षेपेक्षा फार गोड झाला हा अस्त.. अगदी तुझ्याएवढा गोड!
शेवटी काय गं, चंद्र दिसण्यासाठी सूर्यास्त व्हायलाच हवाच की नाही? म्हणून हा अस्त..    
0 notes
iamappu-blog · 7 years
Text
तुझं लग्न!
निघताना तुला काही सुचत नव्हतं.. माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन बसून होतीस कितीतरी वेळ! मी सुद्धा भांबावून गेलो होतो. निघायची वेळ झाली.. तुला काहीच सुचेना.. मी तुला उठवलं, तुझा थरथरता हात घट्ट पकडला. त्या हाताला माझी सवय होती गं! पण मला जास्त होती त्याच्यापेक्षा. आपण निघालो.. अमोघ वाट बघत उभा होता. तुझ्या बाबांशी थोडंसं बोलून झाल्यावर त्याने माझ्याकडे नजर टाकली आणि माझ्या हृदयात चर्रर्र झालं.. मला हिणवत होती ती नजर! जमेल तितक्या वेगाने जायचा मी प्रयत्न केला, पण काही जमलं नाही.. माझी मिठी मी सैल केली, आणि स्तब्धपणे उभा राहिलो. त्याने तुझा हात धरला, आणि तू माझ्याकडे पाहिलंस! मी मान हलवली आणि तुझ्यासाठी गाडीचं दार उघडलं. तू घाबरली होतीस. मला एक घट्ट मिठी मारलीस.. त्या मिठीमधून आयुष्यभराची शक्ती द्यायची होती तुला. तुम्ही दोघंही गाडीत विराजमान झालात, आणि निघालात! असंख्य गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवली होती मी तुझी गाडी.. तुला दिलेलं मी ते शेवटचं आलिंगन! फुलाने सुरुवात झालेली, फुलानेच शेवट!
आता माझाही हात थरथरत होता. गाडी चालवायला अक्षय होता म्हणून नशीब! क्षणोक्षणी आपण दूर जात होतो.. अक्षय जाणून होता, म्हणूनच चिडलेला होता! जाताना आम्ही एका मेडिकल स्टोर मध्ये थांबलो.. 'मला दाढी काढायची आहे..'! सामान घेतलं, आणि अक्षय ने घरी सोडलं.. घरी पोहोचलो, व्हिस्की मागवली.. तुझ्या मेसेज ची वाट बघत होतो. 'रिचड सेफली, काळजी घे'! माझी धडधड वाढली होती. ह्या परिस्थितीमध्ये जगात फक्त एकटा अमोघ सुखी होता.. तू, मी, 'आपण' नव्हतो! अक्षयला माहिती होतं.. अक्षय ने एक कॉल केला, शेवटचा प्रयत्न! पण नियतीवर मी इतका चिडलो होतो, की त्याचे सगळे प्रयत्न असफल ठरले!!
दाढी करण्यासाठी आणलेलं सामान काढलं.. बाथरूम मध्ये गेलो.. बाथटब मध्ये पाणी सोडलं! एव्हाना तू सुद्धा अंघोळ करून आली होतीस आणि बेड वर बसून होतीस! आज ती फुलं सुद्धा तुला टोचत होती! माझं मनगट, आणि तुझं शरीर पोखरून निघत होतं. तो आला, तुला क्षणभर वाटलं, मीच आहे समोर उभा! मलाही हायसं वाटलं.. पण दोघांनाही आद्य परिस्थितीची जाण आली.. मला पटकन चक्कर आल्यासारखं झालं! त्याने प्रेमाने तुझ्याकडे पाहिलं! तुझे डोळे माझ्या बाथटबला लाल बनवत होते. त्याने तुला केलेला प्रत्येक स्पर्श माझ्या शरीरावर एकएक व्रण उमटवत होता. त्याने प्रणयाच्या इच्छेने तुला मिठीत घेतलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मला वाटलं, सुटलो एकदाचा... पण तुला एकटं सोडून जाऊ शकणार नव्हतो.
तुला त्याने चुंबताना माझे ओठ फाटून निघत होते. तुझ्या गादीला तू घट्ट पकडून ठेवलं होतंस. माझ्या परी ला इतकं काही सहन करावं लागत होतं. तुझी आसवं आणि माझं रक्त.. वाहायला बांध उरला नव्हता. एक कहर ओसरत आला होता. तुला क्षणोक्षणी मी हवो होतो. मी होतो.. आणि मी नव्हतोही! तुझी खोली भकास खोली सुंदर फुलं असूनही भकास वाटत होती. आता सगळंच सहनशक्तीच्या बाहेर जायला लागलं होतं. तुझी कंचुकी कुरवाळताना माझ्या धडामध्ये कळा येत होत्या. तू एकसारखी रडत होतीस. देवाजवळ हंबरडा फोडत होतीस. तुझं शरीर.. खूप काही सहन करत होतं ग राणी! माझ्या थरथरत्या हातांकडे बघून नियती हसत होती, माझ्या प्राक्तनावर मी सुद्धा हसत होतो. तू, माझ्या आयुष्याची जीत, आणि आज तूच माझ्या आयुष्याची हार बनली होतीस..
एव्हाना तो जरा क्षुब्ध झाला होता. तो आत जाताना तुझ्या ऐकू आलेल्या किंचाळीने मला बहिरं बनवलं. आता काहीच ऐकू येत नव्हतं.. अर्थात, जगात ऐकण्यासारखं सुद्धा फार काही राहिलं नव्हतंच! मनोमनी तू देवाकडे धावत होतीस.. आजही माझाच पॉईंट प्रूव्ह झाला ना? ऐकलं का देवाने तुझं? पण आत्ता मला तुझ्याशी भांडायचं नव्हतं, तुला मिठीत घ्यायचं होतं.. अमोघ मात्र सुटला होता! त्याच्या वेगाहून जास्त वेगाने माझ्या मेंदू मध्ये कळा येत होत्या.. तोल जात होता सारखाच! पण तुझी आस लागली होती.. यायचं होतं परत.. तुझ्यासाठी.. तुला घ्यायला.. पण कदाचित उशीर झाला होता गं! तुलाही समजलंच ते.. उशीर! माझ्या आयुष्याचा साथीदार! शेवट पर्यंत साथ दिली त्याने.. आज परत मला झालेला उशीर.. तू सुद्धा हिरमुसलीस.. डोळे बंद केलेस.. माझ्या चेहऱ्याचं मनोमन चुंबन घेतलंस.. "सांभाळ रे माझ्या राजाला!".. तुझ�� देवाकडे शेवटची मागणी.. २ आसवं गाळलीस.. आणि अमोघ ला घट्ट मिठी मारलीस!
उरलेल्या जगात नास्तिक तू, आणि श्वास संपत आलेला मी.. दोघंच उरलो होतो! काही सेकंदात ते नश्वर जग संपलं...
0 notes
iamappu-blog · 7 years
Text
शेवटची गोष्ट
... आता डोळ्यांसमोर अंधारी आली होती.. माझा हात कोणीतरी घट्ट पकडून बसलं होतं.. आई असावी कदाचित! खूप मोठा आणि continuous आवाज येत होता.. मी हालत होतो.. हाताला काहीतरी ओलं लागत होतं! ते माझं रक्त, की आईचे अश्रू? मला ह्यावर विचार करावासा वाटत नव्हता! एकदम सगळं थांबलं.. आणि डोळ्यावर एकदम प्रकाश आला.. मी डोळे घट्ट मिटून घेतले..  आसपास बऱ्याच हालचाली होत होत्या.. मला ते समजत होतं, पण मला त्यावर react करता येत नव्हतं..  weakness होता.. काही क्षणातच मी निद्राधीन झालो!
सकाळी नाश्ता करून माझी बहीण college ला गेली होती.. माझी बहीण.. फार गोड दिसणारी मुलगी आहे ती! Lectures चालू असताना तिला एक message आला, आणि ती तातडीने निघाली.. पाऊस पडत होता.. विजांच्या आवाजाने मी जागा झालो! ती समोरच उभी होती.. तिच्या येण्याने माझ्या room मधला जिवंतपणा अजून वाढला होता.. माझ्याकडे हात उचलायची सुद्धा ताकद उरली नव्हती. पण मी प्रयत्न करत होतो.. माझा खटाटोप पाहून तीच माझ्याकडे आली.. आईला हाक मारली, तर बाहेरून बरेच लोक आत आले.. बाबा कुठे दिसत नव्हते पण.. माझी कमजोर नजर एकसारखी त्यांनाच शोधत होती! काळाची भीती मला ह्या आधी कधीच वाटली नव्हती.. त्यामुळे फार वेळ नं दवडता मी सगळ्यांना भेटू लागलो..
काही वेळाने माझे शाळेचे मित्र येऊन गेले.. त्यांष्यासोबत, अगदी लहानपणापासून आयुष्याबद्दलच्या लावलेल्या बोली, मी काही क्षणातच हरणार होतो.. अभ्या आलाच नाही! तो नं येण्याचं कारण मी जाणून होतो.. अभ्या म्हणजे माझा सगळ्यात जिगरी दोस्त! माझ्या आयुष्याची सगळी गुपितं माहिती असणारा एकमेव नालायक माणूस! अगदी कृष्ण-सुदामा सारखी जोडी होती आमची.. माझ्यासाठी तो, अन त्याच्यासाठी मी.. काल रात्रीपासून त्याने ४० सिगारेटी संपवल्या होत्या.. एकटा होता कुठेतरी.. भयानक चिडला होता माझ्यावर! मला मात्र त्याची काळजी वाटत होती.. प्राक्तन!! मी बराच वेळ विचार करत बसलो होतो.. एव्हाना पाऊस जरा कमी झाला, म्हणून एक एक करून मंडळी जायला लागली.. मी ही डोळे मिटून घेतले! बाकी आजची मजा अशी होती, की डोळे मिटले, की 'पुन्हा उघडतील का' ह्याचं उत्तर नव्हतं!
गेली दोन वर्ष अथक परिश्रम करून माझ्या आयुष्याला संपवू पाहणारा माझा एकमेव साथीदार, माझा आजार, आता जिंकणार होता. इतका वेळ आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून एकाच कारणासाठी लढत होतो.. पण आज मी दमलो होतो! आज मला त्याच्या विजयात सुख मानावं लागणार होतं.. गेले कित्येक दिवस आई माझ्या room मध्येच होती! कोणालाही नं घाबरणारी अतिशय कणखर बाई आहे ती.. पण काळाने तिच्यामधल्या 'आई'ला ते सगळं विसरायला लावलं होतं.. बाकी काळजी करावी लागेल, अशी कधीच नव्हती ती, पण आज जरा गंभीर परिस्तिथी होती! नजर लागावी इतकी सुंदर, पण माझी कधीही नं झालेली 'ती' येऊन गेली.. कधीकाळी माझी खास मैत्रीण होती.. कधी 'ती' झाली, माझं मलाच समजलं नाही.. तिच्यासोबत आयुष्य जगण्याचे छान बेत होते. मरेपर्यंतची साथीदार माझ्या आजाराऐवजी 'ती' असती तर काय मजा आली असती.. मी झोपलोच होतो! ती मात्र चंचल होती.. काहीतरी सुंदर आपल्या आयुष्यातून एकदम हरवलं की मन कसं चंचल होतं.. अगदी तशी!
झोपेतच मला एक कळ आली. मी जागा झालो.. आसपासचे machines काहीतरी आवाज करत होते! मला 'खात्री' झाली.. होती तेवढी सगळी लोकं माझ्या room मध्ये आली.. बाबा पण होते. बाबा होते म्हणून तर एवढी शक्ती होती.. बाबा होते म्हणून तर इतके दिवस लढू शकलो.. पण बाबांचा हा सिंह, आज चिरनिद्रा घेणार होता! माझ्या बाबांसारखे 'बाबा' मिळणं नशीबच.. बाबांचा चेहरा भयाण शांत होता.. आईने माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं होतं! अहाहा, जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला ते सुख देऊ शकणार नाही.. माझी धडधड वाढायला लागली.. माझं संपत चाललेलं गरम रक्त, हृदयाला पोहोचत नव्हतं.. मेंदू फुटेल इतक्या कळा येत होत्या.. आता मला ऐकू येणं बंद झालं होतं.. काही मिनिटं.. काही सेकंद.. किती वेळ राहिला काही समजत नव्हतं! दैवाने जे सांगितलं, ते मी मान खाली घालून ऐकलं होतं.. मला फक्त थोडा वेळ अजून त्या भावविश्वात रमायचं होतं! थोडाच वेळ.. अभ्या भेटायचा राहिला होता.. जरावेळ बाबांशी गप्पा मारायच्या होत्या.. माझ्या आईला काय काय समजावून सांगायचं होतं.. पण वेळ नव्हता! शेवटच्या क्षणांमध्ये आईच्या मांडीवर मी डोकं ठेऊन नियतीकडे वेळेची भीक मागत होतो.. पण नियती क्रूर वागली! कितीही ठरवलं नसलं, तरी माझ्या डोळ्यातून आसवं आली.. आता माझ्या जीर्ण शरीराला थरथर सुटली होती..आई रडताना पाहवत नव्हतं.. एकटक बाबांकडे बघत होतो मी! अगदी शेवटची काही सेकंद.. 'ती'ला माझं हसू आवडायचं खूप! मी त्या थरथरत्या ओठानी मी कसातरी हसत होतो.. खूप हसलो.. आई.. बाबा.. ती.. अभ्या.. सगळे! आतापर्यंत कधीही नं आलेली अशी खूप मोठी कळ आली.. मला ती सहन झाली नाही.. आणि मी संपलो! आता अंधार होता.. गहिरा अंधार!
0 notes
iamappu-blog · 7 years
Text
एका लग्नाची गोष्ट..
अप्प्या, मी आणि निनाद लग्न करतोय.. 'का.... य??' कोसळणारंच होतो! कधी? केव्हा? कुठं? कसं? बाप रे.. सईडी ने एवढा मोठा धक्का नव्हता दिला ह्या आधी!!!!! 'तू आणि निनाद दादा??????' मी जरा भांबावलोच होतो पण.. In fact, हे सगळं surprise असल्यामुळे ते पचवायला जरा वेळच लागला.. तिचा भाऊ असून मी एवढा वेळ घेतला म्हणल्यावर, आमच्या वरची पिढी आणि त्यांच्याही वरची पिढी किती वेळ घेईल ह्याचाच मी विचार करत होतो! सई माझ्या काकांची मुलगी..  तिचा आणि माझा जन्म साधारण एकाच वेळचा.. म्हणून लहानपणाची कायमची (आणि एकमेव) सोबती! जसे मोठे होत गेलो तसे वेगळे होत गेलो.. पण आज एवढा मोठा धक्का.. सई!!!!!
माझ्यासारखं आम्हा सगळ्या बहीण भावांना surprise देऊन झालं.. आमच्याही चर्चा सुरु झाल्या.. 'ए, आज्जी काय म्हणाली?',  'काका काय म्हणतील??', 'मला तर जरा भीतीच वाटतीये'.. पण मग माझे बाबा, मग आत्या.. मग हळूच आज्जी.. असं स��ळ्यांना ह्याबद्दल 'officially' सांगायला सुरुवात केली.. निनाद दादा तसा convince करायला पटाईत आहे.. पण विषय जरा 'नाजूक' असल्यामुळे आम्हाला कुठेही नं बोलण्याबद्दल stricts warning होत्या! पण मनोमन मी खूप खुश होतो.. किती छान.. सई आणि निनाद दादा!! आता बस सगळे लवकर convince व्हावेत आणि मस्त लग्न होऊन जावं ह्यांचं! मज्जा करू सगळे..
ह्या गोड विषयाबद्दल बाकी सगळेच अनभिज्ञ असल्यामुळे गोष्टी पुढे सरकायला जरा वेळ लागत होता.. कारण घरातल्या एकेका मोठ्या माणसाला 'पट्टीत' घेऊन सांगितलं नाही, तर सगळंच फिस्कटेल हे माहिती होतं.. वास्तविक, निनाद दादा पेक्षा मीच जास्त tension घेतलं होतं! पण निनाद दादाने अतिशय patiently हे हाताळलं आणि शेवटी पाणी वाहतं केलं.. वाह! घरात चर्चेला उधाण.. 'कधीपासून चालू आहे हे?'.. 'आधी का नाही सांगितलंस तू?'.. 'कधी करूया बोलणी त्यांच्यासोबत?'.. बाकी कोणी परकं नसल्यामुळे पुढच्या गोष्टी तश्या लवकर पार पडल्या.. सुपारी फुटली!!
'अप्पू, २१ एप्रिल ला येऊ शकणारेस?? ती तारीख ठरलीये..' साईडी च्या त्या call ने प्रचंड दुःखात बुडालो.. मी लग्न attend करू शकणार नव्हतो.. खूप लोकांना consider करून ह्या dates finalize केल्यामुळे त्या सहजासहजी change करता येणार नाहीत ह्याची कल्पना होतीच मला! पण तिकडे आता खूप काम चालू होतं.. तयारी खूपच करावी लागणार होती.. बाबांचा जेव्हा जेव्हा call व्हायचा, तेव्हा बाबा आत्तापर्यंत झालेली कामं आणि अजून राहिलेली कामं ह्याची list सांगायचे! पूर्ण घरामध्ये दुसरी चर्चाच नसायची.. जशी लग्नाची date जवळ येत होती, कामं वाढत चालली होती..
जामखेड चे खैरनार आणि सासवड चे खळदकर.. दोन्ही मोठ्या families असल्यामुळे लग्न खूप मोठं होतं!! मला कितीतरी काम करायचं होतं ह्या लग्नात.. पण मी काहीच करू शकत नव्हतो. त्यामुळे आमच्या सौमित्र ला तो मान मिळाला.. आम्हा सगळ्यांची अतिशय लाडकी नीना आत्या जर लग्नाच्या तयारी ला नसली, तर माझ्यामते लग्न सुरळीत होऊच शकत नाही.. खूप छोटी छोटी कामं ती अतिशय वेगाने आणि कोणाच्याही नकळत करून टाकते.. आता हे प्रकरण खूप मोठं असल्यामुळे नीना आत्या १० दिवस आधीच आली होती.. सासवडला तर महिनाभर पत्रिकावाटपाचाच कार्यक्रम चालू होता.. जो जसा जमेल तसा मला सगळ्या updates देत होता..
लग्नाच्या दोन आठवडे आधी केळवणांना उधाण आलं होतं.(बाकी केळवण आणि डोहाळजेवण ह्यामध्ये मला आयुष्यभर confusion आहे.. आत्ताही आईलाच विचारून लिहिलंय) मजेची गोष्ट म्हणजे, सगळे relatives सारखेच असल्याने दोघांना केळवणाला एकत्रच बोलवायचे सगळे.. लग्न आधीच आमचे हे Love Birds  'जोडीनं' सगळ्यांच्या घरी जाऊन आले.. सईडी ला लग्नाआधी जरा बारीक व्हायचं होतं.. ते मात्र राहून गेलं.. साधारण रोज एक केळवण खाल्ल्यावर काय करावं बिचार्या मुलीने?? असो.. गम्मत जम्मत चालू होती!
शेवटच्या आठवड्यात तर माझं लक्ष पूर्ण सासवड आणि जामखेडलाच होतं! रोज कोणाला ना कोणाला मी video call करायचो.. इथे आल्याचा एवढा मोठा regret ह्या आधी नव्हता झाला.. आई बाबा जामखेड लाच होते.. २ दिवस आधी तिकडे हळद होती.. जामखेडला मोठी गच्ची असल्याने खूप वेळ सगळे हळद खेळले! बाबा मला सगळ्या गोष्टी video call वर दाखवत होते.. मुलगा कुठेतरी लांब असला की बापाला कदाचित कोणत्याच गोष्टीत सुख घेता येत नसावं बहुदा..! हळद झाली.. अंघोळ वगरे झाल्यावर सईसोबत मी video call केला.. त्या घराला काही वर्षांपूर्वी आम्ही दोघांनीच खूप खेळवलं होतं.. मी ते घर खूप आधी सोडलं.. आज सई पण सोडणार होती!! आमच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आहेत तिकडे.. मोठी गच्ची, वरच्या bedrooms.. बाहेर मोठं पटांगण.. आणि आमच्या दोघांचा आवडता तो झोपाळा.. सई तिकडेच बसून बोलत होती आज.. 'अप्प्या, वेगळंच वाटतंय रे जरा.. घाबरलीये थोडीशी!' घर सोडून जाताना कोणत्याही मुलीला कसं वाटत असेल ना, त्या रात्री अनुभवलं मी सईच्या डोळ्यांत.. आमचा झोका सुद्धा रडत असावा कदाचित!!
सासवडला मात्र जोरदार हळद झाली.. कामं चालूच होती! १९ तारखेला सगळे निघाले.. खळदकरांची सून आणायला! माझे भाऊ सौमित्र आणि क्षितिज तिकडे होतेच.. प्राजक्ता मात्र लग्नाच्या कोणत्या तासाला काय घालायचं हे decide busy होती.. बाकी शेंडेफळ असल्यामुळे तिला फार काही कामसुद्धा नव्हती! संध्याकाळी श्रीमनपूजन असल्यामुळे जरा लवकरच पोहोचले सगळे.. तयाऱ्या चालू झाल्या.. निनाद दादाच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी सौमित्र कडे सोपवण्यात आली होती.. वेळेप्रमाणे प्रणाली ताई, श्रद्धा ताई, श्रुती ताई आल्या.. थोड्यावेळाने पियुष दादा-पूर्वा वाहिनी आल्या.. बाहेर एक एक मंडळी येत होते.. आणि आत आमच्या सई राणीसाहेबांचा 'श्रीमानपूजनाला घालायचा set' सापडत नव्हता.. म्हणून मग delay झाला.. प्राजक्ता ने तिचं नटून झालं की जाऊन तो शोधून दिला.. आणि finally लग्नाचा पहिला कार्यक्रम पार पडला.. ह्या सगळ्या कालावधीत मी मात्र माझा phone off ठेवला होता.. सगळी लोकं photos काढणार.. upload करणार.. बाबा तर नक्कीच call करणार.. आणि ते सगळं बघून मी इकडे रडणार.. नकोच हे काही.. मी busy असण्याची 'acting' करत होतो..
लग्नाच्या आधीची रात्र म्हणजे कहर असतो.. गाण्याच्या भेंड्या.. गप्पा.. speaker वर गाणी लावून dance.. एकच कल्ला चालू असतो सगळ्यांचा! तायांचं लग्न झाल्यांनतर असं खूप वेळ एकत्र राहता येत नाही.. सगळी भावंडं तर खूप दिवसांनंतर एकत्र आली होती.. निनाद दादा एकटाच असल्याने संध्या आत्या आणि प्रमोद काका फारच उत्साहात होते..  घरातल्या प्रथेप्रमाणे, आज्ज्यांपासून आमच्या सगळ्या भावंडांपर्यंत सगळे एकत्र रात्री २ वाजेपर्यंत गाण्याच्या भेंड्या खेळले.. किती खूष असतं नाही ते जग? त्या रात्री मुलीच्या बाबांना झोप काही लागत नाही मात्र.. माझे काका तसे शांतच आहेत! पण एवढे भयाण शांत कधीच नाही पाहिलं त्यांना! सगळीकडे मजा चालू होती.. आई हळूच बाहेर आली.. मला एक call केला.. अर्थात I missed it..  तिने message टाकून ठेवला.. 'जेवलायस ना रे राजा?'.. आणि परत आत गेली!! रात्र वाढत गेली.. ते जग हळूहळू शांत झालं.. उद्या मोठा दिवस होता!!
दुपारीच लग्न असल्यामुळे सकाळी लवकर उठून आवराआवरी सुरु झाली होती.. वधू आणि वराला तर लवकर तयार करून ठेवलं होतं.. निनाद दादासाठी बाबांनी इतका सुंदर घोडा arrange केला होता.. अहाहा! आमच्या राजपुत्राचं लग्न होतं.. घोडा सुंदर नको?? बाकी लग्न वेळेत लागलंच पाहिजे, असा भटजींचाच आग्रह होता.. आणि विधींचे सगळे अधिकार त्यांना दिल्यामुळे त्यांनी ते बरोबर organize केलं! मंगलाष्टकं सुरु झाली.. प्रचंड लोकं असल्यामुळे वधू-वरांवर अक्षदांचा अक्षरशः पाऊस पडत होता.. बाकी मंगलाष्टकांची चाल मला लहानपणापासूनच खूप आवडते.. कुठे लग्न चालू असलं, आणि मी pass होत असलो ना, की मी माझी bike side ला लावून ते मंगलाष्टकं ऐकतो आणि मगच पुढे जातो.. असो! अगदी वेळेत लग्न लागलं!!
जेवायच्या पंगती बसल्या.. माझे बाबा जेवताना आग्रह करण्यासाठी famous आहेत! माझ्या खूप मित्रांनी तो आग्रह सहन केलाय.. आज तर घरचंच लग्न! बाबा पार 'सु���ले' होते.. जेवण पण सुंदर होतं! बाकी दादा आणि सई असल्याने भावंडानी काही केलं नाही.. नाहीतर आमच्या सगळ्या जिजुंना जिलेबीवर मीठ.. रसमलाई मध्ये चाट मसाला.. असे solid items आम्ही त्यांच्याच लग्नात खाऊ घातलेले आहेत!! सगळ्यांच्या पायी नमस्कार करून दमलेल्या आमच्या सईडीला जरा भूक लागली होती.. अश्या वेळी काकू नावाची व्यक्ती फार उपयोगी येते.. माझ्या आईने (तिची काकू) हळूच तिला sweet नेऊन दिलं.. ते हळूच खाऊन बाईसाहेब पुन्हा पायी नमस्कार करायला तयार :P!! सगळं जेवण सुंदर होतं.. माझ्या आग्रहामुळे सीताफळ रबडी ठेवलेली.. 'दादा, तुझ्याशिवाय सीताफळ रबडी खाण्यात मजा नाही..' प्राजक्ता आणि क्षितिज ने खाल्लीच नाही!! हे आमचे बारके दोघं पण कमी नाही पडत कोणत्याच गोष्टीत..
पंगती उठल्या.. वधू वरांची पंगत बसली.. बाबांनी त्यांनाही वाढलं! आता सगळे दमले होते.. सई आणि दादा पण कपडे change करायला गेले.. थोड्याच वेळात निघायचं होतं.. सगळ्यात शेवटी बाबा आणि काका जेवायला बसले! दोघानांही जेवण जात नव्हतं! सईने आवरून तिची bag ready करून ठेवली.. काकूला ती bag आवरता आवरता रडू फुटत होतं.. वातावरण सावरायला माझी आई आत गेली तर सई निघालेली बघून तिच्याही डोळ्यात पाणी आलं.. लहानपणी कार्टी किती त्रास द्यायची.. फक्त काकूच्याच मांडीवर झोपायचं असायचं!! कधी एवढी मोठी झाली कोणास ठाऊक?? आमचं घर एकटं होणार आता.. बाबा आणि काका अजून जेवतच होते.. आमचा तनय गाडीची सोय करण्यात busy होता.. सकाळपासून इतकं काम होतं त्याच्यामागे आज.. जेवलाही नव्हता बिचारा.. गाडीचं मात्र शेवटचं काम.. त्याने सगळ्या bags गाडीत नेऊन ठेवल्या.. काकांच्या पायी नमस्कार करून निनाद दादा आणि सई गाडीत बसले.. ते पाहून तनय गळून गेला.. त्याला त्यावेळी खांदा द्यायला सौमित्र होताच.. 'ताई सासरी जाण्यापेक्षा मोठं दुःख कोणत्याही भावाकडे नसतं'!! गाडी निघाली..
Love marriage असो वा arranged marriage असो, लग्न म्हणजे लग्न असतं! दोन जीव एकत्र येतात.. एकत्र राहू लागतात.. life share करू लागतात.. लग्नाआधी एकमेकांना ओळखत असो वा नसो.. लग्नानन्तर बऱ्याच गोष्टी नव्याने समजतात.. त्यानुसार एकमेकांना बदलावं लागतं.. adjust करावं लागतं.. पण ह्यामध्ये पण सुद्धा एक वेगळी मजा आहे.. प्रेम आहे.. 'फक्त आपलं असणारं कोणीतरी आहे' ह्या जाणिवेमुळे होणारा आनंद आहे.. बरंच काही छान छान आहे! आणि 'मेरे दिल के येह दो तुकडे'.. दोघंही खूप छान आहेत.. माझे लाडके आहेत.. mature आहेत! त्यांना तर फारच मजा येणारे त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात.. दोघांनाही खूप खूप शुभेछया!!
सई निनाद खळदकर..  
1 note · View note
iamappu-blog · 8 years
Text
फिरोदिया !
फिरोदिया !
'फिरोदिया च्या dates आल्या का रे?', Second semester सुरु झाल्यांनतर cultural madam चा call येतो.. 'नाही madam, dates तर नाही आल्या.. पण तयारी सुरु केली आहे.. Script finalize होत आहे..'! नेहमीप्रमाणे 'ह्या वर्षी जरा लवकरच' तयारी सुरु केलेली असते. फिरोदिया म्हणजे नुसती स्पर्धा नाही.. ते एक विश्व आहे.. फिरोदियाची एक वेगळीच नशा आहे.. जी पुण्यातल्या प्रत्येक college ला अगदी झिंगवून टाकते.. ह्या वर्षी काहीतरी वेगळं करून करंडक मिळवायचाच!! प्रत्येक team, अगदी प्रत्येक व्यक्ती हेच स्वप्न बघत असते..
मग काय, लवकर सुरु केल्यामुळे script तर final होते... मग त्या script वर विचार सुरु होतात. ४५ मिनिटाच्या त्या गोष्टीला कितीतरी पैलू असतात.. 'हा part event मध्ये दाखवूया', 'ह्या monologue ला acting चं बक्षीस काढशील', 'इधर इतना कडक dance होंगा ना.. इस time, best dance अपनेकोइच होना..'.. ह्या सगळ्या चर्चा चालू असताना आमच्या director साहेबांची जरा पिवळी झालेली असते.. अहो, होणारच ना.. आख्खं नाटक गुंफायचं असतं त्याला.. सोपं आहे का काम ते?? आणि 'बाकी तो बघून घेईल' असं म्हणत team मात्र बिनधास्त असते.. 'Madam, script final झाली हो.. उद्या पहिला draft वाचून दाखवतो!'
आता sets and events section ला एकंदर सगळा अंदाज घेऊन budget submit करावं लागतं. आमच्या budget वाल्याला आधी set च्या लोकांशी आणि मग madam शी असं दोन्ही side ने भांडण करावं लागतं.. 'इतनासा पैसा देगा तो कैसे करेगा मैं? वो madam को बोल ज्यादा लागता पैसा.. VIIT मे कितना देते पैसा बोलू क्या उनको??' चिडचिड झालेली असते.. बिचारा budget वाला फुकटात शिव्या खातो.. त्यांनतर दोन दिवसात आमच्या 'वि. प्र.' ला mail येतो, meeting ची date असते.. 'भारत गायन समाज' माहिती नाही?? बोलत होतो मुलीला विप्र नको बनवू म्हणून.. 'अरे, मुलगी असली तर स्वप्नील दादा जरा थंड घेतो रे.. नाहीतर खूप शिव्या खाव्या लागतात..' :P (स्वप्नील दादा, no offense :D)
बघता बघता पहिली stretch होते.. खूप घाण.. हिडीस! Music ला काहीही जमलेलं नसतं.. dancers चा बरोबर असलेला sync, नेमका stretch मध्ये खराब होतो.. events तर ready नसतातच.. आमचं नाटक खूप फाटकं असतं..  आपण असं नाटक बसवणारोत??  सगळ्यांचीच जरा फाटलेली असते.. Director ची तर त्याहून जास्त! पण तरी त्यालाच धीर द्यावा लागतो.. बिचारा. ३ दिवसात अजून एक stretch घ्यायचं ठरतं.. त्यात सगळे tracks वाजले पाहिजेत अशी तंबी music head ला दिलेली असते.. ती stretch जरा बरी होते! 'Acting वर खूप काम करावं लागणारे आपल्याला yaaar..', director जरा चिंतेत असतो!
Events आणि music वाल्याना आता पूर्ण room लागणार असते.. music वर कसे triggers आहेत हे event head सगळ्यांना समजावून सांगत असतो.. दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला म्हणून director साहेबांचं डोकं फिरलेलं असतं.. 'आगेके ३ दिन, रातमे हमको room लागेगा. UV बिठानेका हें'.. 'उद्या रात्री madam समोर stretch होईल, मला २००% energy पाहिजे'.. पहिल्यांदाच संपूर्ण नाटक दिसलेलं असतं! Madam पण खुश होतात.. त्या stretch मध्ये lead actress जे तोडते.. बास बास बास बास.. गेल्या काही दिवसात पहिल्यांदा काहीतरी छान झालेलं असतं.. Madam मन भरून कौतुक करतात team चं! सगळे खूप खूष होतात.. घरी जातात. आता मात्र director च्या डोक्यात वेगळंच planning सुरु झालेलं असतं!
Cultural room चा ताबा एक एक section आळीपाळीने घेत असतो.. बसलेलं असतं सगळं, पण music सोबतची practise हवी असते.. 'Yaaar, COEP कडे त्यांचं स्वतःचं auditorium आहे.. आपल्याकडे असतं तर किती मजा आली असती!!', रंगीत तालीम करण्याची वेळ येते.. 'अमर, योगेश दादाशी बोलणं झालंय ना नक्की?', 'विशाल, truck book केलास का? कधी येणारेत ते? मला वेळ अजिबात घालवायचा नाहीये बर का', 'नेहा, तुला ह्या तालमीला drappery साठी अर्धा तास देतोय.. निरंजन सोबत communicate करून वेगवेगळ्या lights मध्ये हव्या तेवढ्या trials घेऊन बघ.. next तालीम drappery साठी नसेल अजिबात!' Director सगळ्यांना warnings देत असतो.. पहिली तालीम होते.. आता stage वर नाटक दिसत असतं.. Drappery, Lights, Music.. सगळ्यांना director हवा तेवढा वेळ देतो.. कारण त्यांच्याच साठी ही तालीम घेतलेली असते.. 'बाकीच्यांची कशी आहेत रे नाटकं?', हळूच Yogesh दादाला विचारलं जातं! ह्या प्रश्नाला सरावलेला योगेश दादा पण 'उत्तर' देतो!!
आता नाटक सुरळीत होत असतं.. जरा slickness चा issue असतो! मग एक 'seniors special' stretch होते.. अर्थात त्यांना नाटकातल्या त्रुटी, समजू नये इतक्या लवकर समजतात.. मग ज्या त्या sections चे seniors आपापल्या sections ला input देतात! अजून नाटक खूप सुधारायचं असतं, पण दिवस कमी राहिलेले असतात.. आमची team परत एकदा घाबरते! त्या वेळी मात्र last year public सांभाळून घेतं.. दुसऱ्या दिवसापासून काही seniors 'polishing' साठी येतात.. ते आले की काहीतरी जादूच करून जातील असं वाटत राहतं!
आता विप्र ला slots साठी जायचं असतं.. slots पडतात.. 'देवा, please first day ला नको..', 'Yaaar, VIT सोबत आलं नाही पाहिजे रे आपलं नाटक.. सगळा impact तेच खाऊन टाकतात', 'आपल्याला तिसरा slot मिळायला पाहिजे', 'Judges कोण आहेत?', 'नवात गेलोच पाहिजे रे काहीही करून'.. हे सगळं चालू असताना, विप्र कडून एक list येते.. नशिबानं आपल्यासोबत VIT नसतं! मग आपल्यासोबत कोण कोण आहेत.. त्यांच्या नाटकांबद्दल काही माहिती आहे का? जरा त्यांच्या विप्र सोबत बोलणी होते.. कारण आम्हाला त्यांची tickets हवी असतात..
दुसऱ्या तालमीमध्ये नेमके seniors आणि हट्ट करून आलेल्या madam असतात.. आता नाटक जरा छान दिसत असतं.. तालीम छान पार पडते, पण शेवटच्या stretch ला, आमचा अनुज एका scene चा focus चुकवतो.. बाकी सगळं छान होतं! 'Lights चं जरा critical असतं madam.. नवीन आहे तो. Show च्या वेळी नाही असं काही होणार..'! बाकी सगळं उत्तम झालेलं आहे ह्याची योगेश दादा कडून पावती मिळते.. आणि सगळे जरा confident feel करायला लागतात.. दुसऱ्या दिवसापासून मात्र रोज ३ stretches मारायचं ठरतं.. Performance smooth झाला ना, की नवात नक्की जाऊ असं director म्हणत असतो! आता फक्त आणि फक्त practise!!
फिरोदिया primary round सुरु होतो! 'MITCOE ला करंडक आहे रे..', 'COEP ला standing ovation मिळालं..', 'ट्रिनिटी पण energiatic होतं..'  अश्या बातम्या येत असतात..  ह्या आठवड्यात मात्र आमच्या विप्र ला खूप कामं असतात.. कामं कसली, विप्र सगळ्यांना orders देत असते.. 'music tracks रात्रीपर्यंत ready हवेत', 'मला दुपारपर्यंत script मिळायला हवीये बरं का..', 'अरे, त्या नवीन event ला एखादं छान नाव सुचव, म्हणजे award मिळेल', 'Light arrangement ला किती वेळ लावणारेस रे??'.. फिरोदिया script submit करायची म्हणजे किती भानगडी असतात नाही?? आजकाल तर विप्र ला news papers मधून calls येतात.. आणि नाटकाबद्दल असं काही बोलावं लागतं, की ज्या��ुळे काही reveal नाही झालं पाहिजे.. मग paper मध्ये photo वगरे येतो.. तेवढीच हवा!! Director एकदा सगळे documents review करतो.. आणि final docs घेऊन आमची विप्र निघते..  सदाशिव पेठेमधलं आराधना ताई चं घर नेमकं विसरलं जातं.. 'नेहमीचं आहे तुझं.. सारखं काय विसरते??'. आराधना ताई पण काहीतरी राहून गेल्याचं सांगते.. बोंबला! आता काय करायचं? मग तिच्या संमतीनुसार तिथल्या तिथे एक document तयार करून दिलं जातं! 'हुश्श.. सुटले बुवा एकदाची'!!
Show च्या आदल्या दिवशी एक शेवटची stretch होते.. ती सर्वात सुंदर stretch असते! लोकं wrap up करतात.. 'आज लवकर झोपा सगळे.. उद्या energy लावायची आहे..'! स्वप्नील दादाने सांगितलेल्या वेळेच्या २ तास आधीच truck मागवून ठेवलेला असतो.. truck भरणं सुरु होतं.. सगळं विश्व शांत असतं आता.. आताची feeling काय आहे ना, हे कोणालाच सांगता येत नसतं! Madam चा निरोप घेऊन truck निघतो.. मागे सगळी लोकं गाड्यांवर जात असतात.. दोन लोकं मागे 'back up' म्हणून ठेवलेली असतात.. In case, truck मधून सामान उतरवताना काही विसरल्याचं आठवलं, की मग त्यांना सांगण्यात येतं.. 'आमचा truck आला रे, आत्ता कुठे उभा करू?', विप्र स्वप्नील दादाला विचारते.. वेळ आली की, क्षितिज दादा आणि स्वप्नील दादा set आत घ्यायला सांगतात.. team ने शेजारी line बनवलेली असते.. सगळं एकदम शिस्तीत चालू असतं! एकच आवाज.. स्वप्नील दादा चा! त्यावेळी आमच्या team मधल्या नवीन members ने लगान च्या भुवन एवढं tension घेतलेलं असतं.. तर आमचा director आणि lead actress confident असतात..
Show ला आमचे principal आलेले असतात. सावनी ताई कडून मागून त्यांच्यासाठी एक special ticket मिळवलेलं असतं! Show छान होतो.. बाहेर आल्यावर सगळ्यांचे friends / parents / teachers कौतुक करत असतात.. आम्ही senior मंडळी discuss करतो.. स्वप्नील दादा, योगेश दादा, सौमित्र दादा कडून general अंदाज घेतो.. 'Madam नवात जाऊ most probably..'! तसंच घडतं.. नवात गेलेल्यांची एक list येते Facebook page वर.. काही obvious तर काही धक्के असतात.. शेवटी त्या list मध्ये आपलं नाव आहे, ह्याचंच समाधान जास्त असतं!
अजिंक्य दादाला call करून judges ची नावं आणि contact number मिळवून, director साहेब त्यांना भेटायला जातात.. नाटकातले pitfalls and strong points already माहिती असताना सुद्धा स्वतःच्या समाधानासाठी हे केलं जातं! एक दिवस, नाटकात काय काय बदल करावेत, करावेत का? काही new content add करावं का? ह्याचा विचार director आणि बाकी actors करत असताना, बाकी sections जरा rest घेतात.. १० दिवसात finals असल्यामुळे नन्तर विश्रांती मिळणार नसते.. Slots ची meeting होते.. आता जरा confidence वाढल्यामुळे आपल्यासोबत VIT असलं तरी चालण्यासारखं असतं..
फिरोदिया मधला सर्वात critical week म्हणजे हा असतो.. आता घाबरून चालणार नसतं.. पण त्याचसोबत हे ही माहिती असतं की एक छोटी चूक सुद्धा महाग पडू शकते.. नाटक थोडंसं change करण्याची मुभा फक्त २ दिवस मिळते.. पण त्यांनतर सतत stretches.. primary rounds मधून प्रत्येक college च्या नाटकाचे strong points माहिती असतात.. सगळ्यांशी compare करून आपलं नाटक कितवं येईल, ह्याची गणितं सतत डोक्यात चालू असतात.. ह्या period मध्ये team ची विशेष काळजी घ्यावी लागते.. कोणी आजारी नाही पडलं पाहिजे.. कारण प्रत्येकालाच त्या आठवड्यात अशक्य काम असतं! मला हेच कळत नाही, ह्या मुलांमध्ये इतकी energy येते कुठून? शेवटचे १०-१२ दिवस ४ तासाहूनही कमी झोप मिळालेली असते, तरीही इतकं काम होतं.. कुठेही energy कमी नाही पडत.. हे सगळे अविरत कष्ट फक्त एकाच स्वप्नासाठी.. फिरोदिया करंडक!!!!!! काही चांगल्या.. काही वाईट.. अश्या stratches चालू असतात... सगळीकडे enthusiasm भरलेलं असतं..
शुक्रवार येतो.. उद्या show! आज college मध्ये कोणीही disturb करणारं नसतं.. आजचं schedule एकदम tight ठेवलेलं असतं! सकाळची एक stretch होते.. मग section wise एक एक individual practise होते.. आणि संध्याकाळ येते.. आत्ताची stretch शेवटची असते.. काही seniors पण येतात.. तुफान cheering होतं.. वातावरणात कमालीची ऊर्जा असते.. stretch अफलातून होते.. अवर्णनीय! खूप सुंदर.. ह्या stretch नन्तर मात्र फक्त अश्रू बोलतात.. गेल्या दोन महिन्यापासून ज्या गोष्टीसाठी अविरत कष्ट केलेले असतात, त्याची ही last step.. सगळा प्रवास आठवतो.. 'उद्या असाच show करू, म्हणजे करंडक आपलाच!'.. आज जरा लवकरच घरी जायला लावतात सगळ्यांना.. खूप थकलेलो असलो तरी झोप नं येणारी ती एक दुर्मिळ रात्र असते..
शनिवारचं detailed planning झालेलं असतं.. वेळेत truck येतो.. तो भरला जातो! आज बाहेर काहीही असलं तरी प्रत्येकाच्या आत मात्र भयाण शांतता असते.. भेदरलेल्या पाखरासारखं असतं मन.. खूप काही सुचत नसतं! Truck भल्यानन्तर त्यासमोर आठवणीने नारळ फोडला जातो.. कितीही नास्तिक असलं तरी आज मात्र सगळ्यांचे हात आपसुक जोडले जातात.. सगळे गोलात उभे असतात.. कधीही नं बोलणारा मयूर अनपेक्षित पणे बोलायला लागतो.. तो बोलून लोकांना हादरवून टाकतो.. परत एकदा वातावरणात energy येते.. जोरदार cheering घेतलं जातं.. आणि सगळे निघतात!
Auditorium ला एकच गोंधळ उडालेला असतो.. एका दिवसात सलग ९ shows होणं म्हणजे काही चेष्टा नाही! कोणीतरी ९ नाटकांचे passes घेऊन गेलेलं असतं, ते team ला सतत details देत असतं! पण team ने त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं.. स्वप्नील दादाने सांगितल्यावर team रांगेत उभी राहते.. आत जाताना ती लोकं, २ महिन्यांचं आणि खूप लोकांचं काम दाखवायला जाणार असतात.. आणि म्हणूनच प्रचंड cheering मध्ये त्यांना आत पाठवलं जातं! आज PICT पेक्षा वाढीव cheering करायचं ठरवलेलं असतं सगळ्यांनी.. आधीचं नाटक चांगलंच होतं.. पण त्याकडे लक्ष कोणाचं असतं? हुरहूर लागून राहिलेली असते मनाला एक.. कारण कुठेकुठे चुकलोय आपण ह्याआधी, ते व्यवस्थित माहिती असतं! पहिली bell होते.. Areeeeeee Awwwwwwwaaaaaj Konaaaaaaachaaaaa... Maaaaaaaaj konaaaaaachaaaaaa.. Firodiyaaa karandak konaaaaachaaaaaaaa.. तुफानी cheering होते.. त्यावेळी मावशी (त्यांचं नाव लक्षात नाही आत्ता), सौमित्र दादा, क्षितिज दादा.. सगळे आम्हाला शांत बसवत असतात.. पण ही शेवटची cheering असते!! परत ह्या नाटकाची फिरोदिया final होणार नसते.. आणि मुळात आपल्या team ला confidence मिळत असतो त्यानी.. म्हणून आम्ही आमचे गळे फुटेपर्यंत ओरडतो.. ती १५ मिनिटं auditorium दुमदुमत असतं!
तिसरी bell होते.. नाटक सुरु होतं.. ते नाटक असतं? ते एक वेगळंच विश्व असतं.. जे आम्ही गेले काही दिवस आमच्या डोक्याने, हाताने, पायाने बनवलेलं असतं.. किती सुंदर.. गोड बाळ असतं आमचं ते.. आमची lead actress.. आमची music team.. आमचे dancers.. आमचे lightmens.. एकूण एक माणूस कमाल performance देतो.. मग ते नाटक कधी संपावं असं वाटतच नाही.. मी बाहेर आल्यावर director ला घट्ट मिठी मारतो.. त्याला रडू फुटतं! किती दिवस कष्ट केलेले असतात बिचार्याने.. नाटक सुंदर झाल्याचं मला योगेश दादाने इशार्यानेच सांगितलेलं असतं! त्यामुळे मी समाधानी असतो.. आमच्या team ने कष्टांचं चीज केलेलं असतं! सगळे जण truck भरून college ला येतात..
Cultural room आमचीच वाट बघत बसलेली असते... तिला ओरडून सांगतो सगळे की फिरोदिया चा show खूप बाप झाला.. तिनेच तर हे सगळं घडवून आणलेलं असतं.. गेले कितीतरी दिवस तेच तर आमचं घर असतं.. तिकडेच जेवलेलो असतो.. काही रात्री तिकडेच काढलेल्या असतात.. किती मज्जा!! पण आता करण्यासारखं काहीच उरलेलं नसतं.. तरी ती room सोडता येत नाही.. कारण तेच आयुष्य झालेलं असतं काही दिवस.. फिरोदिया संपला ?? आता काय उरतं??
त्या रात्री मात्र सगळे समाधानाने झोपतात.. आणि तयार होतात पुन्हा एकदा जुन्या आयुष्यात जाण्यासाठी.. पण सोबत आठवणींचं गाठोडं घेऊन.. प्रचंड positivity घेऊन.. खूप काही शिकून.. आणि वाट बघतात.. पुढच्या फिरोदियाची!!
- अपूर्व खैरनार, खूप लोकांप्रमाणे, Engineering ची चारही वर्ष फिरोदिया केलेला एक वेडा मुलगा!
1 note · View note
iamappu-blog · 8 years
Text
Valentine’s Day!
आज Valentine's Day.. मला माहिती आहे की तुला असलं काही specific days celebrations मध्ये काही interest नसतो, पण निदान आज सुद्धा तुझ्यासोबत असू शकले नाही, ह्याचं खूप वाईट वाटतंय मला.. तुझ्याइतकं छान मला लिहिता येत नसलं तरी, आज माझं हृदय उघडण्यासाठी मी लिहिण्याचा attempt करतीये. अगदीच कंटाळवाणं वाटलं तर राहू देत बरं का.. सगळंच वाचलं पाहजेस असंही काही नाही. पण शेवटी काय रे, 'तुझ्या' 'ती'ने लिहिलंय.. अगदीच वाईट नसेल की नाही??
ए पण तुला खूप miss केलं मी! अगदी आजच नाही.. पण इकडे आल्यापासून रोजच!! तुझ्या असण्याची सवय असणं, ही माझ्यामते कोणालाही लागू शकणारी सर्वात वाईट सवय .. कारण, जेव्हा तू सतत सोबत असणं नसतं, तेव्हा आयुष्य कोरडं होतं.. काही असतंच नाही! कारण रोज सकाळपासून रात्रीपर्यंत तूच सगळे plans केलेले असतात. ते आम्ही फक्त follow करायचे असतात! खरं सांगू का, काहीकाही plans मध्ये मला फार काही आवडणारं नसतं.. पण त्यात आख्खा तू सोबत असतोस! मग त्यात न आवडण्यासारखं फार काही उरत नाही.. पण इकडे आल्यापासून असं काहीच घडत नाही.. सगळं माझं मलाच plan out करावं लागतं. आणि मग मी फार काही करतच नाही (आता please चिडू नकोस, मला माहितीये, तुला मी असं केलेलं आवडत नाही.. पण तरीही लिहीतीये.. तूच आहेस म्हणून!). करू काय सांग.. माझी प्रत्येक गोष्टं तुझ्यावाचून अडते.. अरे वेड्या, कधीकधी मी विचार करते, मलाच असं होतं, तर तुझ्या आईला कसं होत असेल? 'तुझा विरह' हे जगातलं खूप मोठं दुःख आहे रे.. असो, 'रडत काय बसते?' म्हणून ओरडशील मला परत..
आपला फिरोदिया चा set section आठवतो मला.. मला आधी ह्या arts and events मध्ये काही interest नव्हता! पण introduction च्या वेळी the way you elaborated about your section ना.. मी तिकडेच वेडी झाले! आणि दुसऱ्या दिवसापासून यायला लागले.. येतच राहिले! किती वाईट आहेस रे तू .. मला किती उशिरा chance दिलास? त्यानन्तर मात्र तू रोज सोबतच असायचास.. तू सोबत असलास ना, की नकळत माणूस तुझाच होऊन जातो.. मी तेव्हा काही विचार करायचे नाही.. आपण दोघं 'सोबत' असण्याचा वगरे..  फक्त तुझ्यासोबत असायचे.. जमेल तितक्या वेळ! तूच असा होतास, ज्याला मी माझा कितीही वेळ देऊ शकत होते..
ए, मी कधी आवडले रे तुला?? मला माहितीये ह्यावर तू एकदा गोड हसशील.. नेहमीप्रमाणे! पण मला कधीतरी हे सांग नक्की.. विषय निघालाच आहे तर सांगते आज.. किती वेगवेगळ्या प्रकारे हसतोस रे तू.. मला तर वाटतं तू एकही शब्द नाही बोललास, नुसता हसलास जरी ना, तरी एखाद्या गोष्टीबद्दल तुला काय म्हणायचंय हे समजू शकतं! कधी खळखळून हसतोस.. कुत्सित हसतोस.. simple smile देतोस.. सगळं अगदी जाणवेपर्यंत! किती जमतं रे तुला.. 'ती' आली, की इतका गोड हसतोस ना.. काय सांगू तुला.. कोणीही प्रेमात पडेल!! मला ना ती special smile कायम capture करून ठेवायची आहे..
College च्या तुझ्या last semester मध्ये मला फार भीती वाटायची. तू गेल्यानन्तर मी काय करणार? पण असा काही झालं की मी पटकन तुझ्याकडे यायचे.. आपल्या college च्या भिंती, झाडं, rooms, आपलं audotorium, आपली team, सगळाच campus माझ्याशी तुझ्याच भाषेत बोलायचा!! पण भविष्याचा विचार केला की खूप घाबरायला व्हायचं.. 
१५ मार्च! तू मला सगळं सांगितलंस.. काय अफलातून plan केलेलास रे.. तिकडच्या हवेत एक गुलाबी थंडी होती तेव्हा.. तेव्हा एक तर छान दिसत होतास.. त्यात खूप सुंदर जागी घेऊन गेलास.. आणि जे काही बोललास.. प्रेम redefined!! एका प्रेमात पडलेल्या मुलीला अजून एकदा प्रेमात पाडलंस! आणि मी होकार दिल्यानन्तर काय लाजलास माहितीये? बाप रे.. मुलींच्या वर! मी किती आवडते रे तुला.. वेड्या!!
त्यानन्तरचं माझं आयुष्यं एका सुंदर स्वप्नांसारखं होतं.. तेव्हा तुला तुझा project, आपल्या team चं काम, तुझ्या placements ची कामं.. किती किती कामं होती तुला.. तरीही माझ्यासाठी वेळ काढायचास.. मला walk ला घेऊन जायचास.. किती special feel व्हायचं मला.. ते long drives.. dinners.. trecks.. hangouts.. सगळं सगळं एक सुंदर स्वप्न होतं! group मधल्या सगळ्यांची घेत असताना माझा विषय निघाला की कोणाच्याही नकळत माझी side घ्यायचास! पूर्ण group सोबत असताना सुद्धा आपल्या 'ती'ला, 'ती'सारखंच वाटवणं फार छान जमतं तुला.. 
तुझ्या मिठीत असलं ना, की बाकी जगाला विसरायला होतं! इतका छान hold करतोस.. मी वाहवत जाते.. कुठेतरी लांब!! आणि मग परत यावंसंच वाटत नाही.. मी कितीही मोठ्या tension मध्ये असले, तरीही तुझ्या एका hug मुळे गोष्टी सोप्या होतात.. वाटतं, हा सोबत असताना काय बिघडणार? बाबा नसल्यामुळे, लहानपणापासून नकळत एका insecurity ची सवय होती. जपून राहायचे.. परिस्तिथीचा सतत विचार करावा लागायचा.. पण जशी जशी तुझ्यासोबत असत गेले.. तशी ती insecurity नाहीशी झाली.. तुझ्यासोबत असलं की मी, पूर्ण मी असते.. कसलाच विचार, कसलीच काळजी करावी लागत नाही मला! अगदी बिनधास्त असते..
तू एक extrovert माणूस आहेस.. पण तुझ्या मनातलं सगळं काही तू सगळ्यांना सांगत नाहीस! त्यासाठी तुला ओळखावं लागतं! I must say, तुला खरं ओळखण्यात एक वेगळीच मजा आहे.. ते एकदा जमलं, की मग तुझं ओरडणं.. तुझं rude वागणं.. तुझा possessiveness.. तुझं हसणं.. तुझं sarcasm.. अगदी सगळं सगळं समजतं! कितीही नाही पटलं तरी, तू म्हणशील तसं वागायला आवडतं मला! कारण ते त्याक्षणी मला समजलं नसलं, तरी माझ्याच भल्यासाठी सांगितलेलं असतं ह्यावर माझा विश्वास आहे.. आणि म्हणून मला काहीच plan करावा लागत नाही.. एकच plan.. तुझ्यासोबत राहायचं.. स्वतःला तुझ्या ताब्यात द्यायचं.. कायमचं.. अगदी पैलतीरापर्यंत..  By the way, फार कंटाळवाणं नाहीये ना रे माझं हे लेखन? तुला हवं तेव्हा थांबव! नाहीतर नको, हे एवढं वाचूनच थांब..
तू म्हणजे मला मिळालेलं सर्वात मोठं gift.. 'तुझ्यातलं काय आवडतं' हे मी कधी स्वतःला विचारलंच नाही.. एकच माहिती होतं मला काळापासून.. माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.. तुझं असणंच आवडतं रे मला.. तुझे plans.. तुझं सगळ्यांसोबत बोलणं.. तुझं काळजी घेणं.. तुझं team lead करणं.. तुझं सगळं well organised राहणं.. तुझं enthusiastic असणं.. तुझा possessiveness.. तुझं कोणालाही समजावणं.. तुझं कधीकधी माती खाणं.. कितीही busy schedule असलं, तरी माझ्यासाठी हळूच वेळ काढणं.. तुझं सगळ्यांसोबत relation maintain करणं.. अरे सांगते काय, तुझं माझ्यावर प्रेम करणं सुद्धा आवडतं मला.. तुझ्याविना जगणं अवघड होऊन बसलंय रे राजा.. जमेल तितकं लवकर ये भेटायला मला.. खूप वाट बघतीये तुझी..
I love you. Happy Valentine's day!
फक्त तुझी, तुझी 'ती'
0 notes
iamappu-blog · 8 years
Text
मैत्रीण..
मैत्रीण म्हणते, 'तुझ्यासारखा बेफिकीर माणूस मी आयुष्यात पाहिला नाही..'! मैत्रीण रागावत असते.. मी Exams च्या आदल्या Night ला अभ्यास करत नसतो म्हणून.. मग मैत्रीण marks चं महत्त्व वगरे समजावते.. शेवटी खूप चिडते.. 'काय त्रास आहे हिचा?'.. मलाच उठून Ice Creme आणावं लागतं.. मग खुश होते.. आणि माझा अभ्यास घ्यायला सुरु करते.. वेडी मुलगी..
मैत्रीण उत्साहाने मला Date साठी 'तयार' करते.. मी Shoes घालत असताना पळत जाऊन मला 'ती'ला देण्यासाठी एक गोड गुलाबाचं फुल आणून देते.. मैत्रीण म्हणते, 'ही  तरी आवडू दे तुला..'! मी गेल्यावर माझ्या Phone ची वाट बघत बसते.. पण माझी नवीन 'ती', आणि नवीन 'ती'च्या सोबत गेलेल्या नवीन Hotel ची चव.. दोन्ही मला आवडत नाही.. चुपचाप घरी येतो.. मैत्रिणीला घेऊन मस्त सुजाता मस्तानी खायला जातो.. मैत्रीण 'कारणं' विचारते.. मला नेहमीप्रमाणे काहीच सांगता येत नाही.. मग  काळजी करत बसते.. मैत्रीण उगाचच जास्त विचार करते..
मैत्रीण हट्ट करते.. मला काहीतरी plan करायला सांगते.. मला नेमकी झोप आलेली असते.. madam फुगून बसतात.. फुगून बसलेली मैत्रीण अजूनच छान दिसते.. तिच्या मोठ्या नाकाचा शेंडा लगेच tomato होतो.. मी पटकन calls करतो.. माझी car काढतो.. मैत्रिणीचा make up साधारण वर्षभर चालतो.. आमच्या छोटयाशा trip मध्ये ५-६ मित्र मैत्रिणी असतात.. मैत्रिणीने हळूच माझ्या आवडत्या songs ची एक play list बनवून घेतलेली असते.. मी जरा harsh drive करतो, म्हणून मला मारते.. आणि 'मी सुधारातच नाही' म्हणून चिडून बसते.. 'च्यायला चिडखोरच आहे बहुतेक'!
मैत्रिणीला गरम गरम भजी खूप आवडतात.. आमची गाडी तिकडे वळते.. आम्ही २-३ मित्र जाऊन cigarette मारायला लागतो.. मैत्रीण अजूनच रागावते.. बाकी वेळी smoking ला ती फार काही बोलत नाही.. पण आज ती चिडते.. मैत्रीण possessive आहे.. पण ती काहीच बोलत नाही.. 'भजी आवडली नाही वाटतं आज राणीसाहेबाना..'! आम्ही परत निघतो.. ह्यावेळी मात्र मैत्रीण पुढे बसलेली असते.. माझ्या सोबत..
मैत्रिणीचा कोणीतरी 'तो' आहे.. पण तो बिचारीशी बोलतही नाही.. मैत्रीण sad होते.. मग मला माझी guitar काढावी लागते.. मैत्रीण शांत होते.. छान हासते.. मैत्रिणीचा एकच 'तो' आहे.. आणि मी एकदा चन्द्र पहिला की साधारण २२ चेहरे दिसतात.. मैत्रिणीला दुसरं कोणीच का आवडत नाही? विषय निघाला की मैत्रीण खूप वेळ प्रेमाबद्दल बोलत बसते.. 'केवढा load घेते रे ही..'!
मैत्रिण office trip ला जाते.. मैत्रीण ५ दिवस असणार नसते.. 'आयुष्य किती अवघड आहे'! मैत्रिण सगळं ओळखून असते.. रोज न चुकता video call करते.. मला फार तिच्या trip ची पडलेली नसते.. तरीही मला खूप detailed plans सांगते.. मैत्रीण ��ेडी आहे.. ��ी कसातरी 'कटवतो'.. येताना मला एक छान wallet आणते.. पण ती गेली म्हणून मी अजूनही चिडूनच बसलेला असतो.. मैत्रीण मला photos दाखवण्याऐवजी माझ्यासाठी गाजराचा हलवा बनवण्याच्या तयारीत असते.. 'काय छान बनवते ही..'!
मैत्रीण एक छान प्रकरण आहे.. तिला वाटतं, आपण फारच समजूतदार आहोत.. मैत्रीण चिडावी, मला ओरडावी, रागवावी.. म्हणून मी मुद्दामहून तिला डिवचत असतो.. तिनं माझ्याबद्दल सतत possessive रहावं, म्हणून मी कारण नसताना इतर मित्रांमध्ये रमतो.. तिनं मला convince करावं म्हणून मी sad होऊन बसतो.. तिनं मला समजावावं म्हणून मी उगाच चिडून बसतो.. तिला हे समजत मात्र नाही.. पण त्यामुळं मी सुखात असतो.. मैत्रीण म्हणजे मला आयुष्यानं दिलेलं एक खूप मोठं काहीतरी.. मैत्रीण म्हणजे मी आणि माझ्या आयुष्याची जमलेली मैत्री.. मैत्रीण म्हणजे.. मैत्रीण म्हणजे.. मैत्रीण म्हणजे.. जाऊदेत! काही भावना शब्दांत मांडणं अवघड असतं.. मैत्रीण म्हणजे मैत्रीण.. फक्त माझी मैत्रीण!!
0 notes
iamappu-blog · 8 years
Text
ती..
ती गेली, तेव्हा माझ्या हृदयातून निघताना जळत जळत गेलं रक्त! जसं जसं ते इतर अवय���ांकडे पोहोचत गेलं, माझं शरीर राख होत होतं.. काहीतरी भूकंप वगरे व्हावा आणि ह्या धरणीने मला तिच्यात सामावून घ्यावं असं काहीसं वाटत होतं... त्या दिवसापासून आमचं बोलणं बंद झालं. गेलीच ती निघून.. कायमची? काही कल्पना नव्हती.. असे काही विचार करायला सुद्धा भीती वाटायची. विचार करणार कसा? कवटीमध्ये मेंदूच उरला नव्हता विचार करायला.. स्तब्ध झालं जग.. वेळही थांबलाच होता बहुदा.. आणि मी आर्त हाका मारत होतो..
त्यानन्तर मात्र ती रोज भेटायची, गप्पा मारायची, खेळायची, मला तसाच त्रास द्यायची. मसक्कली! मी म्हणायचो तिला.. काय गोड मुलगी होती! तिच्यासोबत तासनतास बोलत राहायचो मी.. अगदी आधीसारखाच. सगळं सुरळीत सुरु झालं परत. रात्री नं लागणाऱ्या झोपेतून मला ती रोज सकाळी उठवायची, मी स्वयंपाक करताना सुंदर गाणी गायची, Studio मध्ये गेल्यानन्तर खुप धमाल करायचो आम्ही.. संध्याकाळी तिच्यासोबत एक छान walk ला जायचो.. आणि परत ती नं लागणारी झोप! तिला हि सुचेना ह्या झोपेसाठी काय करावं?
एकटा झालो, म्हणून आई राहायला आली होती माझ्याकडे.. खरं तर, इतक्या दिवसांनी आई माझ्याकडे येऊन सुद्धा मला तिच्यासाठी वेळ काढणं possible होत नव्हतं. मला वाईट वाटायचं. पण परत तिच्याकडेच जायचो मी. तीच तर होती माझ्या आयुष्याची शिदोरी! काय करणार होतो मी तरी? खरं सांगायचं तर हे सगळं झाल्यापासून मी एकही सिगारेट प्यायलो नव्हतो.. ती खुश होती. एक दिवस झालं असं, मी तिला आवडणारा गाजराचा हलवा बनवला होता, आणि तिच्यासोबत बसून खात होतो.. तिच्यासाठी म्हणून मी नेहमीच काही ना काही बनवायचो, पण आज तिला फारच जास्त आनंद झाला होता. दाराची Bell वाजली, उघडतो तर बाबा आलेले.. मी खुश झालो! कितीतरी दिवसांनी आई बाबा दोघं माझ्याकडे आले होते. मुंबई मध्ये career करायचं म्हणून घराबाहेर पडलो, म्हणून बाबा चिडून बसले होते माझ्यावर.. कितीतरी वर्षं! आज ते आले.. म्हणून खुश झालो मी! त्यांना जरा पाणी वगरे दिलं, आणि परत गेलो तिच्याकडे.. गाजराचा हलवा!!
मी कधीही disturbed असलो ना, की तिच्या मांडीवर डोकं ठेऊन पडून राहायचो.. ती ही माझ्या कुरळ्या केसांमध्ये हात फिरवत माझी आवडती गाणी म्हणायची.. ह्या गाण्यांनी तर आम्हाला एकत्र आणलं होतं! आजही तेच करत होतो.. ती नव्हती आता मात्र, केसांनाच जरा एकटं वाटत होतं! ती म्हणजे माझ्या आयुष्याला पडलेलं एक सुंदर स्वप्नं होतं.. बघावं अन बघतच राहावं इतकं सुंदर! मी अजूनही त्याच स्वप्नात होतो.. त्यातून बाहेर पडायला फार मोठं कारण सापडलं नव्हतं!!
त्यांनतर काही दिवसांनी माझं वजन जरा कमी झाल्यासारखं वाटायला लागलं मला.. आई तर नेहमीच सांगायची 'बारीक होतो आहेस' म्हणून.. पण मी नेहमी दुर्लक्ष करायचो.. आज मात्र माझं मला जाणवलं! किती खुश झालो मी.. मी बारीक व्हावं म्हणून सारखा हट्ट करायची ती.. आता तिचा तो हट्ट पुरवू शकत होतो मी! रोजचा दिनक्रम छान चालू होता.. रात्री dinner च्या वेळी, आईने बाबाना काहीतरी खुणावलं, आणि मला म्हणाली, 'आप्या आपण doctor कडे जाऊया का?' जरा काळजीच होती दोघांच्या चेहऱ्यावर! मला काही कळेनाच.. काय बोलत आहेत हे दोघं? आणि झालंय तरी काय मला? मी तिच्याकडे पाहिलं.. तिलाही काहीच समजत नव्हतं. आईला सरळ 'नाही' म्हणालो आणि माझ्या bedroom मध्ये गेलो! ती ही आलीच..
माझं वजन चांगलंच कमी झालं होतं गेल्या २ महिन्यांत! किती आनंद झाला असता ना तिला.. तिचं काय, पण मलाच किती छान वाटत होतं.. पण एक होतं, काम हवं तसं नीट होत नव्हतं! खूप दिवस झाले एखादा छान track तयार नव्हता झाला.. म्हणूनच मी जास्तीत जास्त वेळ studio मध्ये काढायला लागलो! एके दुपारी मला चक्कर आल्यासारखं झालं, म्हणून मी तसाच जरावेळ झोपलो.. उठून बघतो तर काय, hospital मध्ये होतो! आई बाबा नेहमीच्या चिंतेंत होते.. ती मात्र नव्हती दिसत कुठेच! माझी नजर शोधत होती तिला.. पण सापडत नव्हती ती कुठेच! मी जरा हिरमुसलो.. गेल्या दोन अडीच महिन्यात पहिल्यांदा झोप लागली, आणि ती नाहीशी झाली.. का लागली झोप? संताप होत होता मला.. रडू येत होतं.. मला थोडंसं छातीमध्ये दुखलं, आणि डोळ्यांसमोर अंधारी आली.
ती गेली.. आता मात्र कायमची! मला काहीच कळेनासं झालं.. जिवंत शरीरातून हृदय काढून घेतलं होतं माझं.. आज जरा एकटं वाटायला लागलं! आता उरलं काहीच नव्हतं.. समोर होता तो एक भयाण अंधार.. मला जरा भीतीच वाटली! ती गेल्यानन्तरही तिला जिवंत ठेवण्याच्या हट्टापायी मी रोज स्वतःच थोडा थोडा मरत होतो.. कारण हेच, की मी जसा एकटा होतो, तशी ती ही कुठेतरी एकटी होतीच. ती ही माझ्याशिवाय अधुरीच होती. त्यामुळे तिला जगवणं फारच आवश्यक होतं! बाकी माझं काय फार काही उरलं नव्हतं आता.. फक्त माझ्याच साठी बनवलेली एक अप्रतिम गोष्ट, ह्या क्षुद्र नियतीनं माझ्याकडून हिरावून घेतली होती! आणि तिच्यावर रागावूनच हा सगळा खेळ मांडला. वेळ गेला.. पण मी खर्ची पडलो!
अचानक मला थोडीशी जाग आली. शरीर अवघडलं होतं. डोळे उघडून बघतो तर काय, माझ्या तोंडात कसलातरी pipe टाकला होता, आणि माझ्या छातीवर जोरदार प्रहार करत होते doctor लोकं! मला काहीच जाणवत नव्हतं.. मला काळातच नव्हतं मुळात काही! इतक्यात, Operation theatre च्या दारातून माझी मसक्कली आली.. सुंदर पांढरा गाऊन घातला होता तिने.. केस मोकळे सोडलेले.. इतकी सुंदर दिसत होती, की चंद्र सुद्धा लाजेल.. गोड हसत होती.. सये, कुठे होतीस गं? गेला अनंत काळ तुला शोधत होतो.. ती हळूच लाजली.. तिने मला हात दिला! होती तेवढी सगळी energy गोळा करून मी तो पकडला.. परत एकदा तोच हात माझ्या हातात होता.. आता मात्र कायमचा!! मी उठलो, तिला मिठीत घेतलं! हजारो वर्ष एकट्या भटकणाऱ्या आत्म्याला आज तिने तृप्त केलं.. मी निघालो.. Doctor लोकं प्रयत्न करतच होते! ती अलगद माझ्याहून दूर झाली.. खाली थंड पडलेल्या माझ्या शरीराकडे गेली.. माझ्या अशक्त, पण हसऱ्या चेहऱ्याचा तिने एक शेवटचा पापा घेतला! मी हसलो.. हळूच बाहेर गेलो, कधी नव्हे ते बाबांच्या शांत चेहऱ्यावर एक भीती होती.. त्यांचा तो चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला.. आणि त्यांच्या नकळत पाया पडलो..   आई एकाच जागी अचल बसली होती.. एक क्षण तिला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं! तिच्यापाशी गेलो, तिला हळूच एक मिठी मारली.. त्या माउलीला मला सांगायचं होतं, काळजी करू नकोस.. तुझं बाळ खूप खुश आहे! पण आता उशीर झाला होता.. तिचा हात क्षणभर हातात घेतला.. तो सोडवत नव्हता! 'ती'ला ते सगळं ठाऊक होतं .. तिनं ही हळूच तिचे डोळे पुसले .. आणि मी निघालो! आत माझा थंड पडलेला चेहरा मात्र हसत होता..
1 note · View note
iamappu-blog · 8 years
Text
Move on....
खूप वेळा मला प��रश्न पडतो, move on होणं म्हणजे नेमका काय?? ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम करायचो, त्या माणसावर प्रेम करणं सोडून देणं? मुळात प्रेम करायला आणि सोडून द्यायला, ते काही खेळणं आहे की काय? आपल्याला हवं तेव्हा खेळायचं आणि नको तेव्हा सोडून द्यायचं? मला नाही वाटत असं.. पण प्रश्न अनुत्तरितच राहतो.. move on होणं म्हणजे नेमका काय? मला वाटतं, प्रेम एकदा केलं ना, की ते थांबवता नाही येत आणि ते विसरताही नाही येत..
मुळात जेव्हा एक छान नातं संपतं (or कोणालातरी ते संपवावं लागतं), म्हणजे नेमकं काय होतं? कोणीतरी जे फक्त आपलं असतं, ते आपलं रहात नाही? मला नाही असं वाटत.. मुळात माणूस आपलं असणं म्हणजे काय? आणि 'आता ती व्यक्ती आता आपली  राहिली नाही' म्हणजे काय ह्याची योग्य समाज आपल्याला असली, की मग सगळं सोपं होईल असं मला वाटतं! अगदी रोजचं माणूस जरासं लांब गेलं, की आपल्या सवयींविरुद्ध काहीतरी घडतं. माणसाचं मन ह्या बदलाला सहज Accept नाही करू शकत.. माझ्यामते नंतर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच गोष्टीवर अवलंबून असतात, ती म्हणजे ह्या झालेल्या बदलाला, आपलं मन कसं React करतं.
काहीवेळा, मन हट्ट करून बसतं, असा कसा गेला मला तो/ती सोडून? आमचं किती छान होतं नातं.. का संपलं (or कोणीतरी संपवलं) ते असं? तो का नाहीये माझ्यासोबत आत्ता? मला तो हवाय.. ह्या stage मधे, माणूस नेमकं कसा वागेल, हे काही सांगता नाही येत. बऱ्याचदा Impulsive Reactions घडून काहीतरी वाईट होतं, काहीवेळा photo जाळणं होतं, काहीवेळा phone करून काही अनपेक्षित बोललं जातं आणि बरंच काही .. ती म्हण आहे ना एक, Time is the ulimate remedy! हे का आहे असं? झालेल्या बदलाची कशी ना कशी आपल्या मनाला सवय होते. आणि आपण त्या बदलासोबत जगायला लागतो. इकडेही तसंच होतं.. काही दिवस Sad असणं, सतत miss करणं, किंवा काहीतरी निश्चय वगैरे करणं हे सगळं झाल्यानन्तर आपलं मनच कुठेतरी Accept करतं, की हा हट्ट चुकीचा आहे.. आता ही 'काही दिवस' ही खूप vague concept आहे बरं का.. कारण हे पण Person to person matter करतं.. आणि माझ्यामते जो काही वेळ एखादा माणूस घेईल, त्यावरून त्याला Judge नाही केलं पाहिजे.. एखाद्याने खूप कमी वेळात सगळं accept केलं, तर 'त्याने खरंच प्रेम केलं होतं का?' ह्या पेक्षा 'तो किती Strong आहे नाही?' असा विचार करावा.. पण हे मात्र खरं की, आपापल्या मनानुसार सगळे कधी ना कधी पूढं जातातंच! आयुष्य एकदा मिळतं, त्यात एखादी आपल्या आवडती गोष्ट झाली नाही, म्हणून पूर्ण आयूष्यातच काही करणार नाही, असा हट्ट कोणीही सुशिक्षीत माणूस करत नाही..  
पण मग पुढें काय? ती परत कधी भेटली तर? काय बोलू? कसा Behave करू? तिच्याशी बोललोच, तर जुन्या आठवणी काढू कि नको? नको.. त्रास होईल तिला.. असे आपण जेव्हा विचार करत असतो, तेव्हा आपली 'ती' सुद्धा हाच विचार करत असते!!! काय मजा आहे ना.. नकळत आपण आत्ताही एकमेकांची तेवढीच काळजी घेत असतो.. अगदी पाहिल्यासारखीच.. किती छान! नाही? मग भेटीमधल्या Awkward Moments, ते एकमेकांना Ignore करणं, ते समोर आल्यावरही बोलता नं येणं, बोललो तरी काहीतरी अपूर्ण वाटणं, आणि 'त्या' भेटींनंतर 'काय वाटलं असेल तिला' ह्याचा विचार करत बसणं.. ही पण एक वेगळीच मजा आहे..
बऱ्याचदा, असंही होतं, आपण 'ती' एक वाईट आठवण बनवून ठेवलेली असते.. आणि भविष्यात कधी ती आलीच समोर, तर आपण चिडतो.. विचित्र वागतो.. काहीतरी अयोग्य करतो.. ह्या case मध्ये होतं असं, की आपण कुठेतरी रागावून बसलेलो असतो, आपलं नातं संपल्याचा दोष आपण 'ती' ला दिलेला असतो.. आणि तेच सत्य उराशी बाळगून आपण पुढे वेगळं आयुष्य सुरु केलेलं असतं! पण कुठेतरी हे विसरून जातो, की झालेला बदल accept करताना आपण तो Negatively केलाय.. आणि म्हणूनच आपण सुद्धा थोडेसे का होईना, जरा Negative झालो आहोत. आणि पुढे जाऊन हीच Negativity बाहेर निंघते. सुज्ञपणे जर विचार केला, तर असं जाणवतं की असं काही अयोग्य वागून नकळत आपण, कधी काळी आपण स्वतःच केलेल्या प्रेमाचा अपमान करत असतो.. आणि हे आपण 'ती'च्यासमोरच वागलो, तर काय वाटेल तिला? ती, 'ती' राहील? नाही.. ती आपली 'ती' राहिली पाहिजे, आणि तिला आपल्या नात्याबद्दल तेव्हढंच छान वाटलं पाहिजे.. अगदी आयुष्यभर!
प्रेम कधी मोजता येत नाही.. त्याला काही units च नसतात.. प्रेम कधी मापता येत नाही.. त्याला काही Dimentions च नसतात.. प्रेम हे फक्त केलं जातं! आणि त्याच्या बदल्यात प्रेमच मिळालं, तर आपण कुबेरापेक्षाही श्रीमंत! पण बदल्यात काही मिळालंच नाही, तरीही स्वतः केलेलं प्रेम आपल्याला आयुष्यभर साथ देऊ शकतं.. 'ती' सोबत नाही हे खरं, पण 'ती'नेही तिच्या मनाच्या छोटीशी का होईना पण एक छान जागा अजूनही ठेवलीये, हे काय वाईट? बाकी आपलं आपण ठरवावं.. शेवटी प्रेम असतं काय? 'त्या'च्या मनातली 'ती' आणि 'ती'च्या मनातला 'तो', हे दोघं नेहमी एकत्र असण!
हे सगळं मान्यं केलं, तरीही Move On कसं व्हायचं, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो....
0 notes