Tumgik
igamravati · 2 years
Text
Purported Advice from a Judge on Son and daughter in law
——————————————————————-
1:- Don't encourage your son and his wife to stay under same roof with you. Best to suggest them to move out, even to the extent of renting a house. It's their problem to find a separate home.
More the distance between you and your children's families, the better is the relationship with your in laws.
2:- Treat your son's wife as his wife, not as your own daughter, maybe just treat her as a friend. Your son would always be your Junior but, if you think that his wife is of the same rank and if you ever scolded her, she would remember it for life.
In real life, only her own mother and not you will be viewed as a person qualified to scold or correct her.
3:- Whatever habits or characters your son's wife has is not your problem at all, it is your son's problem. It isn't your problem as he is an adult already.
4:- Even when living together, make each others businesses clear, don't do their laundry, don't cook for them and don't baby sit their children. Unless, of course, there is a special request by your son's wife and you feel that you're capable and don't expect anything in return.
Most importantly, you shouldn't worry about your son's family problems. Let them settle themselves.
5:- Pretend to be blind and deaf when your son and his wife are quarrelling. It's normal that the young couple do not like their parents to be involved in the dispute between husband and wife.
6:- Your grandchildren totally belong to your son and his wife. However they want to raise their children, it is up to them. The credit or blame would be on them.
7:- Your son's wife need not necessarily respect and serve you. It is the son's duty. You should have taught your son to be a better person so that you and your son's wife relationship could be better.
8:- Do more planning for your own retirement, don't rely on your children to take care of your retirement. You had already walked through most of your journey in life, there are still a lot of new things to learn throughout the journey.
9:- It is your own interest that you enjoy your retirement years. Better if you could utilise & enjoy everything that you had saved before you die. Don't let your wealth become worthless to you.
10:- Grandchildren don't belong to your family, they're their parents precious gift.
—————————————————————-
(Copied and pasted from social media)
0 notes
igamravati · 2 years
Text
#2
चार्लस् पॅान्झी
चार्लस् पॅान्झी या इटली मधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेला इसम होता. हा गडी पहिल्या महायुध्दाच्या काळात अमेरिकत अशी काही करामत दाखवून गेला की त्याचं नाव अजूनही फसवाफसवीच्या आर्थिक योजनांना दिलं जातं.
त्याचं असं झालं की अमेरिकेच्या बोस्टन शहरात हा राहात असताना इटलीतील त्याच्या ओळखीच्या एका इसमाकडून त्याला टपालात इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) आलं. अशा प्रकारचं कूपन चार्लस पहिल्यांदाच पाहात होता. या रिप्लाय कूपनचा उपयोग परत पाठवायच्या लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेण्यासाठी करणं अपेक्षित होतं. हे इंटरनॅशनल कूपन काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे चार्लस् ने कसा लोकांना गंडा घातला ते समजायला मदत होईल.
तर, युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यु.पी.यु.) नावाची सन १८८७ साली स्थापन झालेली व १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग झालेली आंतरराष्ट्रीय पोस्ट संघटना आहे. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी विकसनशील देशांतून विकसीत देशांना पाठविण्यात येणाऱ्या टपालाचे दर कमी ठेवणे, अर्थव्यवस्थांना चालना देणे वगैरे या संघटनेचे उद्देश होते. यु.पी.यु.ने १९०८ साली इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) योजना आणली. व्यवसायीक पत्रं पाठविताना त्यांना उत्तर देण्यासाठी जो टपालखर्च लागेल तो सुध्दा देणं हा शिष्टाचाराचा भाग असायचं. त्यामुळं व्यावसायीक टपालाच्या पाकिटांमधून आय.आर.सी. पाठविण्याची पध्दत सुरु झाली. समजा युरोपातून अमेरिकेला एखादं व्यावसायीक पत्र पाठवायचं तर पत्र पाठवणारी कंपनी लिफाफ्यात आय.आर.सी. सुध्दा टाकायची. अमेरिकेत ज्याच्या नावानं हे पत्र असेल तो आय.आर.सी.त्याच्या स्थानिक पोस्टात घेऊन जायचा व त्याच्या बदल्यात अमेरिकेतून युरोपात ज्या दराने पत्र पाठविता येईल इतक्या किमतीची पोस्टाची तिकीटं त्याला मिळायची. उद्देश हा की ज्या कंपनी कडून पत्र आलं तिला उत्तर देणाऱ्या लिफाफ्यावर मिळालेली पोस्टाची तिकीटं लाऊन उत्तर पोस्ट करावं.
चार्लसच्या चाणाक्ष बुध्दीने या रिप्लाय कूपन्सच्या दोन देशांतील किमतीच्या तफावतीची बाब चटकन हेरली. त्याला आलेलं आय.आर.सी. स्पेनमध्ये त्यावेळी असलेल्या चलनफुगवट्यामुळं अगदी कमी पेसेटांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. हे कूपन स्थानिक पोस्टात देऊन त्याच्या बदल्यात चार्लस् ने बोस्टनहून इटलीला पत्र पाठवण्यासाठी स्थानिक पोस्ट ॲाफिसमधून पोस्टाची तिकीटं घेतली. मात्र पाकिटावर न लावता बाजारात विकून रोखीकरण करण्यासाठी स्वत:कडेच ठेवली. त्याचा शातीर मेंदू काम करायला लागला. अमेरिकन डॅालर्स स्पेनच्या पेसेटा चलनात रुपांतरीत करुन स्पेनमधून आय.आर.सी. खरेदी करायचे आणि अमेरिकेत आणून त्याची पोस्टाची तिकीटे घ्यायची व ती स्थानिक बाजारामध्ये विकून नफा कमविण्याचं त्यानं ठरवलं. प्रयोग म्हणून केलेल्या खरेदी विक्रीमध्ये त्याला त्याच्यामते ४००% नफा झाला.
त्याने यासाठी सरकारी वाटावी अशी खाजगी कंपनी स्थापन केली आणि तिला नाव दिलं सिक्यूरिटी आणि एक्सचेंज कंपनी…… ग्राहकांना तीन महिन्यात पैस दुप्पट करून देण्याच्या योजनेचा उगम झाला. सहाजिकच होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही काही लोकांनी त्याच्या या स्किममध्ये पैसे गुंतवले. ९१ व्या दिवशी त्याच्या दारावर गुंतवणूक करणारांनी व्याजासह पैसे घेण्यासाठी गर्दी केली. त्यांना नक्की काय होणार हे समजत नव्हतं आणि चार्लस् पण लवकर काही सांगत नव्हता. गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला ज्यावेळी वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला गुंतवणूक केलेल्या डॅालर्सवर १००% व्याजासह सगळी रक्कम परत मिळाली. नव्या गुंतवणूक दारांचे पैसे त्याने जुन्या गुंतवणूक दारांना दिले होते. हां हां म्हणता वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली आणि अपेक्षेप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक करायला लोकांची रिघच लागली. चार्लस् वर्षभरातंच अती श्रीमंत झाला. त्याने टोलेजंग घर घेतले रोझ ग्नेक्को नावाच्या महिलेसोबत लग्न केले. कसा काय नफा मिळवतो या प्रश्नाला त्याचे उत्तर होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स (आय.आर.सी.).
आय.आर.सी. योजनेचा कुठे दुरुपयोग होत असल्याचं लक्षात आलं तर यु.पी.यू. कडून दरांमध्ये फेरफार केली जायची. त्यामुळे घोषणा केलेल्या योजनेतून मोठा नफा मिळवणं कठिण होतं. पण चार्लससाठी योजना ही फक्त बोभाटा करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी असल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. वर्षभरात चार्लसने लोकांकडून कोट्यावधी डॅालर्स जमा केले. पत्यांच्या इमल्यासारखी हो योजना बोस्टन पोस्ट या वर्तमानपत्रातल्या लेखमालिके नंतर कोसळली आणि चार्लस गजाआड गेला. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना आश्वासीत केलेल्या पुर्ण व्याजासह मुद्दल परत मिळाले. दुर्देवाने, माणसाच्या लोभी स्वभावाला औषध नसल्याने कित्येकांनी व्याजासह मिळालेले पैसे आणखी फायद्यासाठी परत त्याच्याकडेच गुंतवले. काहींनी ॲाटो रिन्युअलकरत रक्कम वाढवत ठेवली. चार्लसला सुध्दा तेच पाहिजे होते.
आज शंभर वर्षांनंतरही चार्लसच्या या गुन्हेपध्दतीत थोडेफार फरक करून नवनव्या आवृत्या जगभरचे गुन्हेगार बाजारात आणतंच राहातात आणि लोकही फसत राहातात. योजना कोसळल्यावर लोकांना कळते की ती पॅान्झी स्कीम होती म्हणून...
- जयंत नाईकनवरे, आय. पी. एस.
1 note · View note
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेट��ात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes