Text
DAY 1
नाशिक इगतपुरी July /30, 2023
10 दिन का विपश्यना शिविर आज हमने नासिक में इगतपुरी के इंटरनेशनल सेंटर में पूरा किया है। हमने यह शिविर में सेवा दी थी। तो यहां आने की बात बहुत ही अच्छा फील हो रहा है। पहली बार में अकेले घर से दूर तक पहली बार ही आया । मैं 10 दिन पहले लातूर से मुंबई आया था मुंबई से नासिक में इगतपुरी में आया । इतना ही हो गए जब 2 साल पहले इसी दिन मुझे यह सुझाव आया था कि मैं अपना ब्लॉकिंग करूंगा तू तो सर पहले इसी दिन में नहीं ब्लॉकिंग गया था। आज से मैं अपनी भाषा बदलो मैं हिंदी में ही ब्लॉक करूंगा जो मन में आया जो कुछ किया या किसी से बातें करूंगा सिर्फ खाली यह लिख दूंगा।


0 notes
Text
9 Sept 2021
Patoda
आज मुळे मामाच्या दारात शूटिंग होती.खूप चांगला प्रतिसाद भेटला.आज काहितरी नवीन घडणार होत.महेश आला आनी ,आम्ही इथ मनुच्या घरात मेकअप करत होतो.सर्वप्रथम रमेश चा मेकअप केदला.त्याचा लूक चेंज केलाच
0 notes
Text
Patoda
25 August 2021
आज एका व्यक्तीच्या स्टेटस मुळे आक्खाच्या आक्खा दिवस बोर गेला..
झोपितन उठल्यास मामा न youtube चा aaccount काढायाची कल्पना दिली.
रात्री गोट्या पाशी हा विषय काढला.त्यान फिक्स केल आनी आम्ही एक channel काढलं.
रात्री 11 च्या दरम्यान कॉलेज चा निकाल लागला.चांगल्या मार्काने पास झालो.
दुसर्या दिवशी पोहायला जायच होत.खास यासाठी की उद्द्या शूटिंग काढायाची होती.
3 वाजले मला channel ला नीट करायला.खुप कष्टानंतर शेवटी मी यशस्वी झालो.
0 notes
Text
Pune
15 August 2021
आज पेपर झाला म्हणून निवांत होत.तरिही मला काल सारखीच लवकर जाग आली.उठुन सुदर्शन क्रिया केली.आनी तसच बसलो.सगळे झोपीतच होते.म्हणून मी तसच झोपलो.मोबाइल बघत बघत झोपलो होतो.आज फिरायला जायचे होते ते म्हणजे कोंढाना किल्ला वर.खुप ऐकल होत त्याबद्दल म्हणून जायचंच होत.माऊन कृष्णा ला बोलाउन घेतले.मी,काका,मामा,कृष्णा व राम असे सगळेच निघालाव.खुप लांबवर गेलो.पण तिथ गेल्यावर समजल की आज 15 आगस्ट मुळ सगळं बंद आहे.तिथुनच वापस याव लागल.
0 notes
Text
Pune
14 August 2021
आज पेपर होता त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलो.तरी पाच वाजले होते.काका ला जायचं होतं म्हणून दोघांनाही उठवलं होतं. मी उठलो की ब्रश करून सर्व प्राप्त विधी आठपून मग लगेच सुदर्शन क्रिया केली. आणि माऊन मला लगेच नाश्ता आणून दिला. मामा मी आणि काका पेपर ला गेलो.काका ला त्यांच्या कंपनीत सोडून मग पेपर ला गेलो. लगेच तिथे गेल्या गेल्या मास्क घेतले. पेपरला प्रेम्यचीची वाट बघत मी नादात बाहेर उभा होतो प्रेम मिळाला अन तिघेजण पेपर ला गेलो पेपरला जाताना एकदम शेवटच्या कोपऱ्यात माझा नंबर आला. होता पेपर ला गेलो पेपर देत असताना बरा गेला पेपर परंतु m.c.q. असल्यामुळे काही अडचण येत नव्हती. नंतर पेपर चालू असताना,
0 notes
Text
Pune
13 August 2021


आज सकाळी पाच वाजता पुण्यात उतरलो.स्वारगेट ला उतरुन चालतो तोवर खुप आटो वाले विचारले कुठ जायच ते .तिकिटा मधे खुप फसवितात इथले लोक.100 रु मधे दोघाला धायरी ला धायरेश्वर मंदीरा पाशी सोडल.घरी यायला पाच वाजले.पाच ला येउन बोलत बसलो.थोड्या वेळान झोपी गेलो.आनी 10 वाजता उठलो.संकेत आनी राम सोबत ओळख झाली दोघेही संगीता माऊचे मुल आहेत.मग मी त्यांच्या सोबत कॉलेज बघायला गेलो.कॉलेज त्यांच्या घरापासून 10 मिनीटच्या अंतरावर होते.मी कॉलेज ला गेलो.आनी वापस येउन अभ्यास केला.नंतर जेवन करुन झोपी गेलो.झोपेतून उठल्यास माउन तिच्या मैत्रिणीकडे नेले.त्याचाही स्वभाव मस्त होता.वापस येउन अभ्यास केला.



Good night

0 notes
Text
Patoda
12 August 2021
आज पुण्याला निघायच आहे त्यामूळे सगळी तयारी झाली होती.परंतू मामा ची गाडी येणार आहे की नाही हे जोपर्यंत फिक्स होत नाही,तोपर्यंत आज जायच की नाही हे सांगता येत नाही.मामा आज लवकरच गेला होता माजलगावला.आज गाडीची जामिन करायची होती.त्यामुळे मामाला काल पाठवलीलेले आठ हजारातून पाच हजार मला काकानि अकाउंट ला पाठवले.आज जायच होत.तितक्यात😸 दिसली.भारी वाटल.घरात गेलो.तुषार ना झोका बांधायाला बोलावले.मला गेल्या वर्षीच आठवले.थोडस मन नाराज झाल.वापस घरी आलो.बसलो.भैड्याचा डब्बा द्यायला चालतच गेलो.डब्बा दिला.गेलाव तसच चालत आलो.थोडस बसलो,आनी चटई घेउन मळ्यात गेलो.चिंचच्या झाडाखाली चटई आथरली आनी रील्स बघत बसलो.थोडासा अभ्यास पन केला.आनी तसच जुन्या आठवनी मधे गुंतलो.तितक्यात शरद ची आई आनी बायको जोडव हरवले म्हणून शोधण्यासाठी आले होते.त्याना ते सापडल नाही.मग शरद आला.त्यालाही सापडल नाही.मी त्याच्यासोबत घरी गेलो.तर घरी नांदडी चे मामा आले होते.मी बाहेर च थांबत होतो.मग मी मामाला फोन करुन घेतला,आनी बैग भरुन ठेवण्यासाठी इस्त्री ला कपडे टाकले.मग सुरज ला फोन लावून power bank मागितली त्याने ती मला दिली नाही.
मी मागत आसतना बप्पा तिथ आले.आनी म्हणले की गाडी कुठ आहे.आंब्याला दवाखान्यात जायच आहे.कारण विचारल तर त्यानी संगितल की वैशीला दवाखान्यात घेउन जायच आहे.मी काय झालय ते पाहण्यासाठी गेलो तर ती रडत होती.कारण विचारन्याची गरज नव्हती.आज प्रथम तिन दवाखान्यात घेउन चला म्हणाली.गाडी नव्हती काय कराव ते सुचत नव्हत.मग मी सुरज ला त्याच्या मित्राला फोन लावायला संगितलो त्यान सध्या गाडी नाही,थोड्या वेळान देतो म्हणाला.पन तितका टाईम नव्हता.वैशीची हालत पाहवत नव्हती.सकाळपासुन रडत होती.मग मी भाऊची गाडी मागितली.भाऊनी लगेच दिली.नंतर मी बप्पा आनी वैशी गाडीवर गेलो.आनी काकी आटो ना आल्या.मला पुण्याला जायच होत.पन मला वैशीला दवाखान्यात घेउन जान योग्य वाटल.गाडी फुल स्पीड मधे होती.बप्पा गाडी हलू चालव म्हणत होते.पन मी त्याना धरुन बसा म्हणालो .गनिमत गाडी पाण्याच्या टाकीवर आल्यास बंद पडली.पैट्रोल संपल होत.बप्पा कडुन शंभर रुपये घेतले.आणि पेट्रोल टाकले.वर्ल्या दवाखान्यात नेल.आनी मी चिट्टि काढायला गेलो.वापस आलो.तिला डॉक्टर ने इंजेक्षण दिल.मी घरी आलो .पाच वाजले होते.आनी मला 8-9 ला निघायच होत.साडे पाच ला घरी पोहचलो.
0 notes
Text
Landsea
7 August 2021
सकाळचे 4 वाजले होते.उठुन वाचत बसलो होतो.....
वाचता वाचता केंव्हा झोप लागली ती समजलच नाही.नंतर सव्वा सहा वाजता रानी वैनिचा फोन आला फोनची रिंग ऐकुन झोपेतून उठलो आणि विचार केला की ईतक्या लवकर फोन येत नाही आज कसा काय आला.घाबरत घाबरत फोन वर बोलत होत्या.काय बोलत होत्या ते त्यानाच समजत नव्हत..रडत रडत जनाकाकु वारल्या म्हणाल्या.
0 notes
Text
Latur
3 August 2021
आज सकाळी लवकर उठुन gat -b साठी तयारी करत होतो.परंतू साधारण 12 च्या दरम्यान लोंढ्या आला आणि करमत नाही म्हणल आणि बसला .मलाही आज केस स्ट्रेट करायचे होते.म्हणून मी त्याला लातूर ला जायच म्हणून निघालो गाडी होती सोबत म्हणून निघाल्यास संदीप म्हणला की उद्धव भैय्याच्या आईला पण लातूर ला यायचय.लोंढ्या सोबत होता म्हणून मी नाही म्हणलो आणि त्या येन्याच्या आधिच निघालो.जाता जाता किर्ती चौकात गेल्यास संदीप ना फोन केला आणि कुठ आहेस विचारल.मी म्हणलो 5 नंबर चौकाच्या पुढ गेलो आहे.मग आम्ही उद्द्योग भवन पाशी गेलो जेन्टस पार्लोर मधे गेल्यास त्यानी सांगितल की आंबाजोगाई रोड ला 1 दुकान आहे कृष्णा नावाच तिथ गेल्यास तुम्हाला staitning करुन मिळेल.म्हणून दोघ जन गेलाव. मग तिथ गेल्यास त्यानी भाव सांगितला की दिड हजार रुपये.मग आम्ही नकार दिला आणि शिवाज�� चौकात आहे तिथ गेलो.तिथ गेल्यास त्यांनिही तोच भाव सांगितला.मग आम्ही मित्राच्या ओळ्खीवर हत्तेकोर्नर वर गेलो.तिथही तोच भाव सांगितला.मग आम्ही लगेच.नकार दिला आणि शुभ्याच्या दुकानात गेलाव.तिथ खुप वेल बसल्यावर 3 च्या आस पास घराकडे निघालाव.आल्या आल्या ल्याब्र्या जवळ आला. नंतर जेवन केल्यास बसलो.मिराबाई आली होती.जनाबाई ला दवाखान्यात दाखल केला होता.मला ती चल म्हणून मागे लागली.मी पप्पाला सांगायला गेल्यास वापस येतांना पायाला खुप लागले.रक्तस्राव होत होता.आज्जीन पट्टी केली.आणि नंतर निघालाव.त्याना MIT मध्ये ऐडमीट केल होत.दवाखान्यात पोहचलाव.
0 notes
Text
Sealand....
30 July 2021
आज सकाळी साडे सहा वाजता लातूर गाडी होती.त्यामूळ लवकर उठायच होत. पण उशिरा झोपल्यामूळे मला जाग आली नाही.दादा ना आणि आइनही उठविल तवा कुठ जाग आली.उठलो की लगेच अंघोळ केली आणि फुल व हाराळ आणायला गेलो.आज गावात दोन कंदोरी होती .1 बाळ्याच्या पोराची आणि 1 बब्ल्याच्या पोराची.आणखिन 1 होती ती म्हन्जे बापुच्या भाच्याची पण ती बाहेर गावी होती.आणि त्यामूळे बापुन औटौ केला होता .त्याच औटौ मधे स्टैंड वर आलो,आणि तिथ राहूल होता त्याला थोडा वेळ बोलत उभारलो.गाडी उशिर करत होती.9.40 झाले होते.गाडी आली.र्म्द घेतली आणि निघालो.मुरुड गाडीने तांदुळज्यापर्यंत आलो.पण तिथे खुप उशिर होत होता.काही वेळाने कळंब ते लातूर गाडीने आलो.तिकिट 30 रु आहे.गावात उतरलो घरी आलो.मामा पप्पा आणि संदीप घराची सफाई करत होते काल घरात साप निघाला होता.त्यामूळे सफाई चालू होती.आल्या आल्या वैष्णविन स्वागत केल.चहा करुन दिला.लगेच गाडी ची चावी घेउन कॉलेज वर निघालो bonafide आणायची होती.म्हणूनच पाटोद्यावरुन आलो होतो.जात असताना हरंगूळ फट्यावर अभिषेक चे आन्ना दिसले.अभिषेक च्या पप्पानी त्याना मारले होते म्हणुन गावातून निघुन लातूरला चालत निघाले होते.त्यांची ही पहली वेळ नव्हती.मी अभिषेक ला फोन केला परंतू काकुंनी फोन उचलला,आणि हकीकत सांगितली.मी आण्णाला जाऊ नका म्हणत होतो पण ते ऐकत नव्हते.मी निघालो.मला उशिर होत होता.कॉलेज वर पोहोचलो bonafide घेतली.आणि फॉर्म भरण्यासाठी xerox centre वर गेलो.पण ते बंद होते.तितक्यात जुना कॉलेज चा मित्र भेटला.तो चांगला गाने म्हणत होता.मी त्याला गाण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केल.त्याचे वडिल 3 महिन्यापूर्वी वारले होते,त्याच्याकडून समजल.त्याची सांत्वना केली.फॉर्म भरायला उशिर होत होता म्हणून दुसर्या cafe वर जाण्याच ठरविल.बस स्टैंड कड निघालो.भुक पण लागली होती.दयानंद गेट वर नाश्ता केला.तसच पुढ निघालो.तितक्यात मामाला आंबाजोगाईल जायच होत.म्हणून लवकर यायला सांगितल.मी होकार दिला आणि मोबाइल बंद करुन गोलाईकड गेलो.तसच वापस आलो.फोन वर फोन येत होते .मामाला अर्जंट होत.म्हनुन मी गाडी स्पीड ना पळवली आणि.अशोक होटेल पासुन गावात 18 मिनिटात आलो.घरी आल्या आल्या मामा संदीप आणि वैष्णवी पाटोद्याला निघाले मला जायच होत पण चौघे जन बसत नव्हते म्हणुन मी नकार दिला.ते तिघच गेले.घरात येऊन उपिट खाल्ल आणि योग निद्रा करत झोपी गेलो.5 वाजले होते.उठायला उठुन फ्रेश होउन सोमा कडे गेलो.खुप वेळ बसलो तिथेच मूड बरा होता आज माझा....
घरी आलो वापस.थाय मिठाचा खुप घानेरडा वास येत होता.आजी कडे जाऊन गप्पा मारत बसलो.खुप दिवस झाले होते आज्जिला बोलून तात्या जवळ्याला गेले होते.गवळण चा अचानक 3 दिवसात लग्न झाला होत,त्याबद्दल आज्जी बोलत होती.मलाही दु:ख वाटत होत.सुरज भाऊजा सोबत करायच होत तिला पण काकाना मंजूर नव्हत.कारण त्यानाच माहिती.त्यांचा राग येत होता.पण जाऊद्या......
10.30 झालेत पण थाय मीठा च्या वासाने झोप येत नाही...
Gat -B चा फॉर्म भरला......
आजच स्टेटस

तुम वह सत्य हो
जहाँ मैं बार बार लौट कर आता हूँ।😓
वह शक्ति जिसके बल पर
अपने को ललकारता हूँ, जूझता हूँ
पराजित होता हूँ फिर जयी बन जाता हूँ...😀
KULDEEP WAGHMARE ........
0 notes
Text
Patoda
29 july 2021
रात्री उशिरापर्यंत बच्चन साहेबांची दिवसाची टिपणी वाचली, त्यामुळे अडीच ते तीन पर्यंत जागीच होतो. रात्री जागल्यामुळे सकाळी उठायला उशीर होत होता.परंतु आईने लवकर उठविले. तरीबी सहा वाजून गेले होते उठल्याउठल्या दळण दळत होतो.झोपेतच असल्यामुळे झोपेतच दळत होतो. आंघोळीला उशीर होत होता.दादा आई खूप महाग लागले अंघोळ कर म्हणून, तरी टाळाटाळ करून उशीर झालाच. लगेच मळ्यातून फुल आणि हाराळ आणले.कुपनचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे कुपन आणायचं होतं. त्यामुळे अंघोळ लवकर केली. दादा रानात गेले होते. आईही रानात निघाली होती.मी मी सर्व काम आठपून कोपन ला कोपन आणायला निघालो. तिथे गेल्यास सर्वात आधी ज्याच्याशी नफरत आहे तो व्यक्ती तिथे दिसला. तिथे एक मित्र भेटला त्याच्याशी बोलत बोलत त्याच्या घराकडे गेलो.आणि वापस आलो तर पाहतो की आम्ही जिथे बसलो होतात तीथ एक मुलगी उभी होती. आम्ही दोघे तिथे बसलो परंतु ती सतत आमच्याकडे पाहत होती.मी confuse झालो. नजर अंदाज करून असा मी असा अंदाज बांधला की आपला अवतार खराब असेल त्यामुळे आपल्याकडे पाहत असेल.परंतु ती अनोळखी असल्यामुळे सतत पाहत होती.मी मित्राला सांगितलं. त्याने तिच्याकडे खुन्नस देऊन पाहिल. तिने त्याच्याकडे तिरस्कार भावनेने बघितलं. आणि त्याच्यावर हात उगारला तो तसाच बाहेर निघून गेला (घाबरून).नंतर ती माझ्याकडे सतत पाहत होती.नजर खाली करायच नाव घेत नव्हती. मी खाली मान घालून बसलो होतो.पहिला विरह सहन होत नव्हता; त्यामुळे आता कोणाकडे पाहण्याची इच्छा होत नव्हती.तरीही तीच्याकडे पाहिले परंतु ती मला ओळखीची वाटत होती. तोंडाला बांधले होते त्यामुळे नीट चेहरा ओळखू येत नव्हता परंतु दिसायला सुंदर होती. शरीरशृष्टी बर्यापैकी होती. मित्र बाहेर गेल्यामुळे ती सतत माझ्याकडे पाहत होती तिचा मोठा भाऊ तिच्यासोबत होता परंतु बाहेर थांबला होता.तिच्यकडे आणि तिच्या भावाकडे पाहुन ती चांगल्या घरची होती आस समजत होती.
बहुत ज़ोर से हँसे थे हम, बड़ी मुद्दतों के बाद,😓
आज फ़िर कहा किसी ने, मेरा ऐतबार कीजिये।😟
तसाच घरी आलो.सदु तात्याही कोपन ला आले होते. त्यांचा पाय खूप मोडला होता,तरीही ते पंचवीस ते तीस किलोचे पोते डोक्यावर घेऊन घरी येत होते.मला माझ्या मनात आले की त्यांचे घेऊन जावे, परंतु माझ्याही खांद्यावर ओझे असल्यामुळे मी ती घेऊ शकलो नाही. दोन खेपा केल्या आणि काकी च ही घरी आणून ठेवलं.घरी येऊन मनोजच्या सलापाला टाकण्यासाठी लोखंडी खिळे आणायला गेलो. आणि घरी येऊन झोपन्याचा प्रयत्न करू लागलो.
17.15 pm
खूप वेळ झाली होती झोप घेऊन..थोडसं घरच काम करायचं होतं. झाडून घेणे आणि भांडी घासणे.आईला रानातून यायला उशिर होत होता.दिवसभर काम करुन आई थकून जात होती.त्यामूळे आईचे काम मिच करत होतो.सर्व काम आवरले.आवरत असताना मला पंडीत काकांनी फोन केला.उंदरीची बाई आली होती.तिला स्टैंड वरुन आणायच होत.गाडी घेउन यायला सांगितल होत.ती नुकतीच तिची मुलगी वारली होती धारुळ ची.त्यामूळे ती लोखंंडी वरुन आली होती....
मी सूरज ला फोन करुन आणायला सांगितलो.तो धानोरयाला पिग्मी गोळा करायला जाणार होता तरिही,त्यान बाई ला आनुन सोडल.तो घराकडे आल्यामुळ मला भी सोबत येऊ दे म्हणल.त्याच्यासोबत गेलो जाताना एक र्म्द घेतली आणि त्याला एक राजनीवास मीच घेतला.येताना त्याने मला वाढदिवसाची पार्टी दोघच करू म्हणाला.काल त्याच्याकडून त्याच्या मित्रानी पार्टी घेतली होती.मनोजने फोन करुन बोलावून घेतल त्याच्याजवळ बसलो खुप वेळ.ओंकार भैयाला परीक्षेच tension आल आहे.त्याच्याशी गप्पा मारत बसलो तिथक्यात जामदराचा बल्या आला आणि त्याने मला कंदोरी ला येण्यासाठी सांगितल.पण मला जान होणार नाही.कारण;उद्या सकाळी कॉलेज वर जाऊन bonafide आणायच आहे.Gat-B चा फॉर्म भरायचा आहे.उद्द्या शेवटची तारीख आहे.घरी येऊन जेवन केल.आणि कुणाल ला फोन लावून बाहेर बोलावून घेतल.काल आला नसल्यामुळ आज तो आला.upsc बद्दल आणि वेगवेगळ्या गप्पा मारल्या.तो जास्त दिवस थांबत नसल्यामुळे रोजच्या मित्राला बोलन झाल नाही.11 पर्यंत बाहेरच auto मधे बसलो.शेवटी त्याची आबई बोलवायला आली.आणि आमची सभा संपली....
KULDEEP....🙏
0 notes
Text
28 July
Hi everyone today I am open the thumblr account.
And this is my first post.
Now introducing myself,I am KULDEEP MARUTI WAGHMARE. At Bhoisamudraga tq:dist: LATUR and state:MAHARASHTRA
I am belonging to small farmer family.and I am a well educated jobless.
1 note
·
View note