Tumgik
Video
youtube
माणूस हाच ग्रंथ ' मी ' राजेंद्र खेर Human Library episode 8
0 notes
Quote
नमस्कार,केवळ एका वर्षासाठी मी ‘भगवद्गीते’वरील या ब्लॉगचा डोमेन घेतला होता तो दोन दिवसात संपत आहे. पहिले जवळपास सहा महिने रोज आणि मग थोड्या कालावधीच्या गॅपनंतर लाकडाउनच्या काळातही मी हा ब्लॉग लिहिला. रोज सकाळी जवळपास तीन तास या लेखनासाठी कारणी लागत होते. पण आता इतर कार्यबाहुल्यामुळे एवढा वेळ देणं शक्य होणार नाही. तथापि, हा संपूर्ण ‘गीताशास्त्र’ ग्रंथ प्रकाशनासाठी जवळपास तयार आहे. इ-बुक आणि छापिल स्वरूपातही तो येत्या काही दिवसांत अ‍ॅमेझॉनवरून जगभर उपलब्ध होईल. जे वाचक मोठ्या आवडीनं आणि आत्मीयतेनं ब्लॉग वाचत होते, मला प्रोत्साहन देत होते त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.राजेन्द्र खेरRajendra Kher     Visit for my books:-www.rajendrakher.nethttps://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/07/163.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् । मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ॥7/13॥ दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥7/14॥ अर्थ: या तीन (सत्त्व, रज, तम) गुणमय भावांनी (त्रिगुणात्मक मायेनं) मोह पावलेलं हे सर्व जग, या गुणांहून वेगळा आणि विकाररहित अशा मला (परमेश्वराला) जाणत नाही. कारण, माझी त्रिगुणात्मक दैवी माया तरून जाण्यास दुस्तर आहे. जे मला शरण येतात तेच ह्या मायेतून तरून जातात. * एखादं सुंदर चित्र माणसाचं मन मोहून घेतं. पण त्या चित्रामागचे हात कुणाला दिसत नाहीत. मातीच्या घटामागचे हात कुणाचे होते हे कळत नाही. ते जाणून घ्यायची सुद्धा माणसाला आवश्यकता वाटत नाही! दृश्य जग हे परमेश्वराचं हस्तकौशल्य असतं. त्याची कलाकृती सर्वांना दिसत असते; परंतु त्यामागचं हस्तकौशल्य कुणी जाणून घ्यायचा सहसा कोणी प्रयत्न करत नाही. फूल कसं उमलतं हे माणसाला समजत नाही. तो फक्त फुलाचा सुगंध घेत बसतो. माणूस असा मायेत गुरफटून जातो. ज्यानं घडवलं त्याला विसरून जे घडलं ते पाहण्यातच किंवा त्याचा उपभोग घेण्यातच अडकून जाणं याला ‘माया’ म्हणतात. सहजासहजी या मायेचं उल्लंघन करता येत नाही. ते उल्लंघन करायचं म्हटलं तरी ती गोष्ट तितकी सोपी नसते. जे संपूर्णत: भगवंताला शरण जातात तेच या मायेचं उल्लंघन करू शकतात. माणसाची प्रवृत्ती बहुधा बहिर्मुख असते. बाह्यजगत पाहताना त्याला या जगताच्या निर्मात्याविषयी मुळीच भान नसतं. चित्रपटाचा खेळ पाहण्यात तो रंगून जातो. परंतु; चित्रपट बनवणार्‍याचं कौशल्य (तत्त्वत:) त्याच्या खिजगणतीतही नसतं. सामान्य माणूस अग्नीऐवजी धुरात, सागराऐवजी शंख-शिंपल्यात, आकाशाऐवजी उल्केत आणि कॅमेराऐवजी फोटोत रमून जातो. तिथेच तो निर्मात्याचा शोध घेत रहातो! उदाहरण म्हणून हे विचार आहेत. अन्यथा परमात्मा उल्केतही आहे आणि शंखशिंपल्यातही आहे. मात्र मृगजळात जलाचं अस्तित्व कधी सापडू शकत नाही. आपलं शरीर कसं चालतं, इंद्रियं, मन, बुद्धीसहित शरीरांतर्गत यंत्रणा कशी चालते आणि ती कोण चालवतो याचं भानही माणसाला नसतं. हीच ती माया! अत्यंत गुंतागुंतीचं असं हे शरीर आपोआप निर्माण झालं किंवा निसर्गत: बनलं असं जर एखादा बुद्धिवादी म्हणत असेल तर आपण केवळ त्याला नमस्कार करू शकतो! ही माया कशी आहे? काही उदाहरणांनी ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मृगजळ हे आपल्या दृष्टीला दिसतं; पण ते खरं नसतं. म्हणजेच ते अवास्तविक - unreal असतं. परंतु, आपण घरातल्या टी.व्ही.वरच्या एखाद्या (‘डिस्कव्हरी’सारख्या) चॅनेलवर आफ्रिकेचं जंगल पहात असतो. एकाएकी वीज जाते आणि समोर प्रत्यक्ष दिसणारं आफ्रिकेचं जंगल नाहीसं होतं. पण टी.व्ही.वरून जंगल नाहीसं झालं म्हणजे प्रत्यक्षात ते नव्हतंच असं समजायचं का? म्हणजे टी.व्ही.वर दिसणारं जंगल हे मायिक (illusionary) होतं; परंतु अवास्तविक (unreal) नव्हतं. ते आफ्रिकेत होतंच. विमानातून प्रवास करताना झोप लागून आपल्याला स्वप्न पडलं की, आपण बैलगाडीतून प्रवास करत आहोत! अर्धवट जाग आल्यानंतर जर आपण शेजार्‍याला, बैलगाडीतून कसे छान जात आहोत असं सांगितलं तर तो सांगेल, ‘अहो, बैलगाडी कुठची? आपण तर विमानप्रवास करत आहोत!’ पण आपला अनुभव त्याला सांगेल, ‘अहो काय सांगता? मी तर बैलगाडीतून चाललो आहे! मला तसा साक्षात अनुभव आत्ता मिळला आहे!!’ हीच ती माया! म्हणजे, विमानातून प्रवास करत असतानाही आपण बैलगाडीतून चाललो आहोत, असा इंद्रियांनी अनुभव देणं हा मायेचा प्रभाव असतो. तथापि, विमान आणि बैलगाडी या दोन्ही गोष्टी अस्तित्वात असतातच - त्या कुणीतरी बनवलेल्या असतात. विमानात पडलेल्या स्वप्नातली बैलगाडी खरी नसली तरी ती प्रत्यक्षात कुठेतरी असतेच. कुणीतरी बनवलेली असतेच. त्याचप्रमाणे भौतिक पदार्थांचा इंद्रियांना मिळणारा अनुभव हा जरी मायिक भाग असला तरी देहासह, त्यात असलेल्या अगम्य यंत्रणेसह जे विश्व बनलेलं आहे ते कुणीतरी - कोणा बुद्धिमानानं नक्कीच बनवलेलं आहे. त्याचा अनुभव मायिक असला तरी त्याचं अस्तित्व नक्कीच आहे! म्हणून महान दार्शनिक पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, हे विश्व उत्क्रान्त झालेलं नसून ते निर्मितच आहे. आता हे अफाट, गुंतागुंतीचं विश्व आणि त्यातले अब्जावधी जीव भगवंतांनी कोणत्या शक्तीनं बनवले हे समजणं शक्य नाही. ते कल्पनेतून साकारलेले आहेत का अत्यंत छोट्या सूत्रांमधे तयार करून त्याचा वैश्विक आविष्कार केलेला आहे हे कळणं कठीण आहे. त्यालाच शरण गेल्याशिवाय ते समजणं शक्य नाही. हे विश्व म्हणजे कोणत्यातरी अत्यंत प्रबळ अशा शक्तीचा आविष्कार आहे हे आपण मानायलाच हवं. दूरवरचं अज्ञात विश्व आपल्या आवाक्याबाहेरचं आहे; पण आपल्या जवळच्या मेंदूची ज्ञात संरचना अल्पशी जाणूनही थक्क व्हायला होतं. मानवी मेंदूत 86 कोटी न्यूरॉन्स (पेशी) असतात. या न्यूरॉन्सचा परस्परांमध्ये एकप्रकारचा बंध असतो. या बंधातून अतिवेगवान असं सेल्युलर नेटवर्क (जाळं) सिद्ध होतं. या मेंदूस्थित न्यूरॉन्सच्या गटात अंगभूत (built-in) एक मिती ते चार मिती आकार मुळातच सामावलेले असतात. सृष्टीकडे बघताना अनेक मितीय आकार मेंदूमध्येच तयार होत असतात. उदा. एखादं त्रिमितीय (3D) फूल आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या 3 मिती मुळातच मेंदूत सेट केलेल्या असतात. तीच गोष्ट द्विमितीय किंवा अन्य मितींसदर्भात घडते. संशोधकांच्या मते, या भूमितीय स्थानकातून व्यक्ती 11 मिती (तत्त्वत:) पाहू शकते! त्यामुळे आपण जे ‘बघतो’ तो मेंदूत सेट केलेला पूर्वनियोजित कार्यक्रमच बघत असतो! पृथ्वीवर आपण तीन मितींमधे वास्तव्य करतो. देह सोडल्यानंतर द्विमितीय जगतात जीव प्रवेश करतो असं म्हणतात. आता एखादं घड्याळ प्रत्येक मितीतल्या व्यक्तीपुढे ठेवलं तर ते त्या त्या व्यक्तींना कसं दिसेल? आपल्या त्रिमितीय जगतात घड्याळाचं जे रूप दिसतं त्यापेक्षा ते द्विमितीय किंवा इतर अनेक मितीय जगतात भिन्न भिन्न दिसणार हे उघड आहे. मग कोणत्या मितीत दिसणारा आकार खरा मानायचा? त्रिमितीत दिसणारा, चार मितीत दिसणारा का अकरा मितीत दिसणारा? पृथ्वीवर एक मैल सरळ दूर दिसणारी गोष्ट शुक्रावर वर आकाशात दिसू लागते. जितकी वस्तू दूर तितकी ती वर दिसते! खरं काय समजायचं? हीच ती मुद्दाम तयार केलेली माया! या मायेचं उल्लंघन सहसा करता येत नाही. पूर्वनियोजित कार्यक्रम (program) सेट केलेल्या मेंदूच्या (म्हणजे केवळ बुद्धीच्या) आधारानं आपल्याला परमतत्त्व जाणणं कदापि शक्य नाही ही गोष्ट यावरून सिद्ध होते. रोबोमधे जो प्रोग्रॅम तयार केलेला असतो तेवढ्याच कक्षेत तो कार्यरत राहतो. म्हणून एखादा मनुष्य जेव्हा म्हणतो, की माझ्या बुद्धीला पटेल त्यावरच मी विश्वास ठेवतो, तर ती गोष्टच भ्रामक असते; फसवी असते. परमेश्वराच्या या कालबद्ध, प्रवाही आणि मायिक जगतापासून अलिप्त होण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्यालाच आत्यंतिक प्रेमानं शरण जाणं हाच एकमेव मार्ग आहे. योगाभ्यासात आपला श्वास पूर्णपणे थांबतो. याचा अर्थ आपण कालबद्ध विश्वापासून म्हणजेच मायेपासून स्वत:ला स्वतंत्र ठेवतो; आणि मायेच्या निर्मात्याला जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. अन्यथा ही त्रिगुणात्मक माया तरून जाणं अतिशय दुष्कर आहे. आता भगवंताला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न उरतोच. देवाच्या मूर्तीपुढे साष्टांग लोटांगण घातलं म्हणजे शरणागत अवस्था येईल का, याचा विचार झाला पाहिजे. गीतेतले हे श्लोक वरवर दिसतात तितके साधे नाहीत. त्यांचा उलगडा करणं फार कठीण काम आहे. या श्लोकांमधे भगवंत त्रिगुणांचा - सात्त्विक, राजस, तामस - उल्लेख करतात. त्रिगुण आले की अस्मिता, अपेक्षा, स्पर्धा, षड्रिपू, भावभावना, महत्त्वाकांक्षा - सारं काही आलंच! सारं जग या त्रिगुणात्मक व्यवहारात अडकलेलं आहे. त्रिगुणांशिवाय व्यवहार चालणं शक्य नाही. भगवान मात्र गुणातीत आहे. याचाच अर्थ त्याला जाणायचं असेल तर त्याच्यासारखंच गुणातीत व्हाव लागेल हे उघड आहे. सत्त्वगुणाच्या आधारानं गुणातीत अवस्था येऊ शकते. कारण तीन गुणांपैकी हा गुण श्रेष्ठ आहे. सत्त्वगुण अंगिकारला तर पुढचा मार्ग प्रकाशित होत जाईल. तो मार्ग म्हणजे विचारमयता, प्रेममयता आणि भावमयता. बुद्धी हे विचारांचं माध्यम असतं. त्या आधारानं जाणीवपूर्वक पुढचा मार्ग आक्रमित केला पाहिजे. त्याचवेळी मन वैश्विक मनाशी जोडण्याचा (योग) अभ्यास साधला पाहिजे. मानवी जीवन योग्य रीतीने जगत असतानाच स्व-अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर वृत्तीत प्रेममयता आली पाहिजे. भगवान सर्वव्यापक आहे. त्याच्याशी एकदम योग साधणं कठीण आहे. त्यामुळे त्यानं निर्माण केलेल्या जीवांविषयी प्रेमभाव वृद्धिंगत व्हायला हवा. पुढे निसर्गात परमेश्वर पाहता आला पाहिजे. इतर जीव, निसर्ग आणि आपला दैवी संबंध प्रतीत झाला पाहिजे. त्यानंतर ईश्वरी प्रतिभेचा मनाला स्पर्श व्हायला हवा. त्यातून भावमयतेचा मार्ग प्रकाशित होतो. पण निराकारात भाव स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळे भगवंताच्या सुंदर मूर्तीत भाव ओतता आला पाहिजे. म्हणजे परमतत्त्वाविषयीची वैचारिक समज प्रथम बुद्धीत स्थिरावली पाहिजे. तो आपल्याही शरीरात वसून असल्यामुळे स्व-अध्याय, प्रेमभावातून ईश्वर-इतर जीव-निसर्ग आणि आपण यांचा असलेला दैवी संबंध ध्यानात घेणं आणि भावमयता जोपासून ईश्वराच्या व्यक्त स्वरूपावर भावमयतेतून शरणागत होणं हाच राजमार्ग आहे. केवळ एकाच अवस्थेतून शरणागत होणं कठीण आहे. विचारविहीन भावमयता अथवा प्रेमविहीन शुष्क विचारमयता उपयोगाची नसते. अशातर्‍हेनं वृत्ती झाली तर खर्‍या अर्थानं भगवंताना शरण जाणं होईल. अशातर्‍हेनं जो भगवंताला पूर्णत: शरण जातो, तो मात्र ही माया तरून जातो. सारांश: मायेच्या चक्रातून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा अभ्यास आणि प्रार्थना (संपूर्ण शरणागती) साधली तरच मायेची सरसीमा माणसाला पार करता येईल, सत्य आविर्भूत होईल आणि मोक्षाच्या मार्गावर त्याचा प्रवास सुरू होईल. * * *राजेन्द्र खेर आणि ‘विहंग’ची पुस्तकं खरेदी करण्यासाठी:- https://www.instamojo.com/vihangpublications/https://www.kobo.com/us/en/ebook/the-song-of-salvation
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/07/the-way-to-know-the-lord.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये । मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥7/12॥ अर्थ: जे जे सात्त्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ (भाव) आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असं जाण. मी त्यांच्या आश्रयानं नाही; परंतु; ते मात्र माझ्या आश्रयानं आहेत. * हा श्लोक गहन आहे. भगवंतापासून सर्व सृष्टी तयार झाली आणि भगवान त्याचं उपादान कारणही आहेत. मग ते सात्त्विक, राजस आणि तामस या तिन्ही भावांमधे का नाहीत, असा प्रश्न पडतो. या श्लोकावर जाणकार पंडितांनी पुष्कळ विचारमंथन केलं आहे. पण ह्या श्लोकातलं गूढ उलगडत नाही. परा-अपरा प्रकृती त्यातल्या सर्व भावांसह भगवंतांमुळे निर्माण झाली आहे तर मग सात्त्विक, राजस आणि तामस वृत्तींच्या प्रभावात भगवंत का नाहीत हा प्रश्न आहे. प्राण्यांच्या कर्मामुळे जे सात्त्विक, राजस आणि तामस भाव उत्पन्न होतात ते सर्व माझ्यापासूनच निर्माण होतात. त्या सर्वांचं मूळ कारण पर-अपर प्रकृतीच्या द्वारे मीच आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतातही. पण पुढे म्हणतात, मी कारण असलो तरी मी त्यांच्या आश्रयाला नाही. सात्त्विक भाव सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेला असतो. रजोगुणापासून उत्पन्न झालेल्यांना राजस आणि तमोगुणापासून उत्पन्न झालेल्या भावांना तामस असं म्हणतात. (14व्या अध्यायात या त्रिगुणांच्या वैशिष्ट्यांविषयी भगवंतांनी अधिक विवेचन केलं आहे.) सात्त्विकादी सर्व पदार्थ जरी परमेश्वरापासून निर्माण झालेले असले तरी संसारी लोक परमेश्वराऐवजी या त्रिगुणांमध्येच अधीन झालेले असतात. परमेश्वरापासूनच निर्माण झालेल्या पदार्थांमध्ये परमेश्वर मात्र अधीन होत नाही. उलट ते पदार्थ त्याच्या अधीन असतात. कारण तोच एक सत्य आहे. ते पदार्थ कल्पित आहेत. त्यामुळे त्या पदार्थांच्या गुणदोषांचा परमेश्वरावर परिणाम होत नाही. इतिहासाचार्य महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी म्हटलं आहे, मनुष्य जितका प्रगत होत जाईल तेवढे प्राचीन सिद्धान्त खरे ठरत जातील. या दृष्टिकोनातून आपण आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचा या श्लोकासंदर्भात विचार करू. फेसबुक, वॉटस्अ‍ॅप, ट्विटर वगैरे सॉफ्टवेअर्स बनवली गेली, लोक ती वापरू लागले. रोज परस्परांना शुभेच्छा देऊ लागले, माहिती फॉरवर्ड करू लागले, मतप्रदर्शन करू लागले किंवा शिव्याही घालू लागले! आता ज्यांनी ही सॉफ्टवेअर्स बनवली त्यांच्याकडे लोकांनी परस्परांना दिलेल्या शुभेच्छा अथवा घातलेल्या शिव्या यांचं श्रेय जातं का? अर्थात, हे केवळ व्यावहारिक उदाहरण आहे. शब्द आला की मर्यादा या आल्याच! शब्द हा फसवा असतो. विचारविनिमयाचं दुसरं कोणतंही साधन नसेल तर शब्दाचाच आधार घ्यावा लागतो. शब्द हा द्वैत सृष्टीतला असतो. अद्वैताचं स्वरूप त्यामुळे समजू शकत नाही. अमर्याद परमेश्वराच्या प्रतिभेची ओळख होऊ शकत नाही. ती अनुभवावीच लागते. आणखी काही उदाहरणं आपण बघू. सागरापासून शंख-शिंपल्यांची निर्मिती होत असते. पण त्या शंख-शिंपल्यात सागर सामावलेला नसतो. अग्नीपासूनच धूमाची निर्मिती होते. परंतु त्या धूमात (धुरात) अग्नी नसतो. समुद्र मंथनातूनच हलाहल विष निर्माण झालं. पण त्या हलाहलात समुद्र सामावलेला नसतो. आकाशातून उल्कापात होतो. परंतु त्या उल्केत अनंत आकाशाचं दर्शन कधी घडत नाही. अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर, कॅमेरामुळे फोटो निघतो; पण फोटोत कॅमेरा नसतो! याउलट H2O मुळे पाणी होत असलं तरी पाण्याला पाहून H2O चं भान येऊ शकत नाही. म्हणजे पाण्यात ते दिसत नाहीत. सृष्टीत वास करून असणारी चैतन्य शक्ती सामान्यत: अशीच दिसत नाही, ध्यानात येऊ शकत नाही. पदार्थांचं स्वरूप जितकं विकृत होत जातं तितकं त्याचं कारण आणि त्याला व्यापून असणारं मूलतत्त्व गूढ-गहन होत जातं. मग प्रकृतीच्या अधीन होऊन जीवाकडून जी बरी-वाईट कृत्यं होतात त्याचं श्रेय तरी कुणाचं मानायचं? तर, मूल (परम)तत्त्व जरी सृष्टीला व्यापून असलं आणि यच्चयावत् जीवांचं अव्यक्त आश्रयस्थान जरी परमात्मा असला तरी जीवाकडून होणार्‍या कर्माच्या परिणामांना ‘त्रिगुण’ कारण ठरत असतात. त्रिगुणात्मक प्रकृतीच्या चांगल्या-वाईटात परमेश्वर नसतो. परमेश्वरापासून निर्माण झाल्यावर जो तो प्राणी आपापल्या सत्त्व-रज-तम आदी भावगुणांनुसार कर्म करीत असतो; आणि आपल्या कर्मानुसार आपलं अनेक जन्मांचं भविष्य ठरवीत असतो. आपल्यापासूनच निर्माण झालेल्या या यंत्रणेत परमेश्वर हस्तक्षेप मात्र करीत नाही. अपग्रेड अथवा तत्सम विषय सोडला तर फेसबुक, वॉटस्अ‍ॅप, ट्विटर इत्यादींचे निर्माते त्यांनीच बनवलेल्या सॉफ्टवेअरमधे हस्तक्षेप करीत नाहीत!! आपण एवढाच निर्णय करू शकतो की, सत्त्व-रज-तम आदी त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वराच्या अधीन झालेले असतात. परंतु परमेश्वर त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे भूतसृष्टीतील जे जे वाईट आहे ते चांगल्याबरोबर त्याच्यात सामावलेलं असतं. कारण परमेश्वरच त्यांच्या उत्पत्तीचं आदीकरण असतो. असं असूनही त्यांच्या बर्‍यावाईटात परमेश्वर भागीदार नसतो किंवा सहभागी नसतो.  सारांश: सात्त्विक-राजस-तामस हे त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वरापासूनच निर्माण झाले असले तरी त्या पदार्थांच्या चांगल्या-वाईट कर्मांमध्ये परमेश्वर नसतो. ते त्रिगुण मात्र परमेश्वरामध्ये सामावलेले असतात. * * *राजेन्द्र खेर आणि ‘विहंग’ची पुस्तकं खरेदी करण्यासाठी:- https://www.instamojo.com/vihangpublications/Five Stars on Goodreads!https://www.goodreads.com/book/show/17783140-the-song-of-salvation
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/07/the-Lord-is-not-in-the-good-and-bad-deeds.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् । बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥7/10॥ बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् । धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥7/11॥ अर्थ: हे पार्था, सर्व भूतांचे (जीवांचे, पदार्थांचे उत्पादक तत्त्व) सनातन बीज मी आहे, असे समज. बुद्धिमान लोकांची बुद्धी मी आहे आणि तेजस्व्यांचे तेजही मी आहे. बलवानांचे आसक्ती आणि वासनारहित बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल कामही मी आहे. * एखादी गोष्ट आपल्या आकलनाच्या बाहेर असेल तर त्यातला जाणकार सांगतो, ‘तू असं समज.’ समुद्रातील पाण्याची वाफ होऊन त्याचे आकाशात ढग तयार होतात. ते ढग एकमेकांवर आदळले की गडगडाट होतो. हे विज्ञान छोट्या बालकाच्या आकलनाच्या बाहेरचं असतं. त्यामुळे वडील त्याला सांगतात, ‘अरे, वर आकाशात म्हातारी दळण दळते आहे असं समज.’ अर्जुन जरी ज्ञानी भक्त असला तरी भगवान त्याला याच भूमिकेतून सांगत आहेत, ‘सर्व जीवांचं सनातन बीज मी आहे, असं समज!’ थोडक्यात तू फार खोलात शिरू नकोस, ते कळण्याच्या पलीकडचं आहे! अर्थात हे सांगणं आपल्यासाठी आहे; अर्जुनाला ते नक्कीच कळलेलं असणार. जे नित्य-नूतन असतं त्याला ‘सनातन’ म्हणतात. म्हणजे जे कधीच नाश पावत नाही ते सनातन! त्यामुळे जेव्हा जेव्हा जीवसृष्टी आकाराला येते तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे हेच सनातन बीज कारण असतं. वृक्षापासून बीज होतं आणि बीजापासून पुन्हा वृक्ष. पण वृक्षाचं ते बीज नष्ट होणं शक्य असतं. पण हे सनातन बीज कधी नष्ट होऊच शकत नाही. जीवसृष्टी नष्ट झाली तरी ते सुप्तावस्थेत निरंतर असतंच असतं. सर्व भूतमात्र हे परमेश्वरापासूनच निर्माण झालं आहे. सर्व जीवांच्या उत्पत्तीचं अनादी कारण परमेश्वरच आहे. माळेमधील फुलं जशी दोर्‍यांमध्ये गुंफलेली असतात त्याप्रमाणे सर्व जीव परमतत्त्वामध्ये गुंफलेले असतात. त्या परमतत्त्वाच्या आधारानंच सर्व जीव वास करून असतात. परंतु हे जीव जरी आदितत्त्वाच्या आधारानं राहतात, तरी ते आदितत्त्व सर्व चांगल्या गोष्टींमध्येच वास करून असतं. भगवान म्हणतात, ‘जे विवेकसंपन्न पुरुष असतात, त्या लोकांची विवेकशक्ती मीच आहे. तेज म्हणजे प्रगल्भता, धीटपणा, स्वाभिमान आणि अस्मिता या गुणांनी युक्त असलेल्या पुरुषांमधलं तेज मी आहे. बलवान लोकांमधलं काम-राग विरहित म्हणजे तृष्णा-आसक्ती विरहित बल मी आहे. काम-राग यांनी युक्त असलेलं बल मी नाही. जीवांमधला धर्माच्या विरुद्ध नसलेला काम मी आहे. म्हणजेच जो धर्मसंमत, धर्ममान्य काम आहे तो मी आहे. याचा अर्थ शरीर जिवंत राहण्यासाठी आणि सृष्टिचक्र चालावं म्हणून अगदी आवश्यक असलेला ‘काम’ हा भगवंत आहे. अन्न-वस्त्र-जल-निवारा आदी वस्तूंची यथायोग्य इच्छा धरणं हा धर्ममान्य काम आहे. पुष्कळांना वाटतं, बुद्धी माझी आहे. नक्कीच असते; परंतु त्यामागची प्रेरक शक्ती जीवाची नसते. मेल्यावरही काही काळ मेंदूमधील घटक कार्यरत असतात. पण जीवाला त्याचं भान असतं का? झोपल्यावर बुद्धी काय काम करते? त्यावेळी केवळ ‘स्थिती’ असते. मनुष्य जागा झाला की ‘स्थिती’सह ‘वृत्ती’ कार्य करू लागते. मग ‘मी’, ‘माझं’ वगैरे सुरू होतं. भगवंतांना अपेक्षित खरा बुद्धिमान कोण? तर आपली बुद्धी भोगाकडे न वळवता ज्ञानाकडे वळवणारा खरा बुद्धिमान! ज्याच्यामधे ही समज निर्माण झाली त्याची बुद्धी भगवंताची! अनेकांना विषय-तृष्णा-वासनांची पूर्ती करण्यासाठी भगवंत हवा असतो. एरवी ते मौजमजा, चंगळवादामधेच गुंतलेले असतात. म्हणजे गरज वाटली तर भगवान! याउलट खरा बुद्धिमान भगवंताशी नित्य जोडलेला असतो आणि जीवनव्यवहारातील प्राप्त उपभोग घेत रहातो. म्हणजे एक मानसिकता भोगवादाला जोडलेली राहून गरजेपुरती - स्वार्थापोटी भगवंताला जवळ करते तर दुसरी मानसिकता भगवंताला नित्य जोडलेली राहून विचारपूर्वक जीवनाचा यथोचित उपभोग घेत रहाते. भगवंतांच्या दृष्टीनं हा खरा बुद्धिमान! ‘बला’च्या बाबतीतही असंच. मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग तृष्णा आणि आसक्तीरहित करता आला तरच ते दैवीबल ठरतं; अन्यथा ते असुरी बल होईल. असुरी बल उद्दिपित झालं तर त्यातून उन्मत्तपणा, भांडणं, उच्छृंखलता, द्वेष, दंगा, लढाया आदी उत्पन्न होतात. म्हणून बल हवं; पण ते असुरी असता कामा नये - ते दैवी हवं. राजा विश्वामित्रानं वसिष्ठांच्या आश्रमातून कामधेनू पळवली तेव्हा वसिष्ठांनी प्रतिकार केली नाही. सामर्थ्य असूनही ते शांत राहिले. अर्थात त्यांनी शांतिबलाचा वापर केला. याउलट शंभर अपराध सहन केल्यावर श्रीकृष्णांनी भर सभेत शिशुपालाचा शिरच्छेद केला. दोन्ही ठिकाणी बल हे होतंच; पण दोन्ही बलं काम-राग विवर्जित होती. इथे जे ‘बल’ भगवंत सांगतात ते सामान्य माणसांमध्येही असतं. आपल्या या बलाचा वापर आपण आखाड्यात करीत नाही एवढंच! परंतु आपल्या प्रत्येक कृतीमागे बळ असतंच. एखाद्या व्यक्तीचा काम करण्याचा झपाटा किंवा आवाका प्रचंड असतो. तो जो झपाटा किंवा आवाका असतो तो ‘मी आहे,’ असं भगवान सांगतात. ज्या ‘कामा’ला एरवी दूर सारलं जातं किंवा कमी लेखलं जातं त्या ‘कामा’लाही भगवंतांनी जवळ केलं आहे. अविवेकी कामामुळेच सारा दुराचार घडतो. म्हणून कामाला त्याज्य ठरवलं जातं. परंतु भगवंत सांगतात, ‘धर्ममान्य म्हणजेच धर्माला विरोध न करणारा असा जो शिष्टसंमत ‘काम’ आहे तो मी आहे.’ ‘काम म्हणजे तृष्णा, स्वार्थी इच्छा किंवा संकल्प; आणि राग म्हणजे आसक्ती. जी गोष्ट मिळणं कदापि शक्य नाही हे माहीत असूनही त्या विषयाची अभिलाषा धरणं म्हणजे ‘कामविकार.’ एखादा विषय जरी कष्टानं मिळाला तरी तो नष्ट न होता अधिकाधिक मिळावा अशाप्रकारची जी मनोवृत्ती असते तिलाच ‘आसक्ती’ म्हणतात. यामधे हव्यासाची आणि असुरक्षिततेची भावना असते. भगवंतांना अपेक्षित असा जो खरा ‘बुद्धिमान’ असतो तो स्वत:ला कधी असुरक्षित ठरवत नाही. असुरक्षिततेची भावना मनावर दडपण आणते. त्यातूनच मनाचे रोग उद्भवतात. म्हणून भगवंतांना जोडण्याचा अभ्यास साधला पाहिजे. या जोडण्याच्या क्रियेलाच ‘योग’ म्हणतात. ‘योग’ म्हणजे केवळ योगासनं नव्हेत! ‘योग’ साधण्यासाठी आवश्यक असणारं शरीर-माध्यम हे निरोगी, सदृढ असावं यासाठी योगासनं करायची असतात. ‘योग’ हे त्याचं अंतिम साध्य असतं आणि योगासनं हे साधन! (‘योगा’ हा चुकीचा शब्द सध्या रूढ आहे. तोंडात ‘योग’ हा खरा शब्द बसवावा! त्याचा प्रचारही करावा.) ‘वासना’ ही जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. ती मुळीच वाईट नाही. वासनाच नसेल तर जगणंच अशक्य होऊन जाईल. वासना ही जीवाला पोषक असते; तथापि तिनं विकृती धारण करता कामा नये. ती धर्माधिष्ठित हवी. ‘धर्म’ म्हणजे अनावस्था दूर करून सृष्टीला सुव्यवस्थितपणे धारण करणारी शक्ती. या सुव्यवस्थित मार्गात वासनांमुळे अनावस्था आणण्याचा प्रयत्न झाला तर ती परमेश्वरी शक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गानं किंवा माध्यमातून मनुष्यनिर्मित अनावस्था दूर करतेच करते. त्यासाठी स्वार्थलोलुप मनुष्याला ती बंधनातही टाकते - घरात बसवते!! त्याच्या सृष्टीवरील अविवेकी आक्रमणाला लगाम घालते. जीवनाच्या उत्क्रांतीसाठी, विकासासाठी आवश्यक असणार्‍या निसर्गनियमांचं पालन करूनच जीवनविकास केला पाहिजे. त्याविरुद्ध जाणारी वासना मनुष्यासाठी मुळीच हितावह नाही. धर्माच्या विरुद्ध न जाणारा ‘काम’ हा ईश्वरी सत्तेचा अंश आहे. त्यावर शांतपणे विचार झाला पाहिजे.वैदिक संस्कृतीनं ‘कामा’चा स्वीकार केला आहे. त्याला मानाचं स्थान परमेश्वराच्या मान्यतेमुळे प्राप्त झालं आहे. सारांश: सर्व गुणांमध्ये, चांगल्या गोष्टींमध्ये परमेश्वर तत्त्वाचा वास असतो. त्याच्याच प्रेरणेनं वरील सार्‍या क्रिया घडून येत असतात. * * *राजेन्द्र खेर आणि ‘विहंग’ची पुस्तकं खरेदी करण्यासाठी:- https://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/i-am-in-ultimate-best.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: । प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ॥7/8॥ पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्वास्मि विभावसौ । जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥7/9॥ अर्थ: है कौन्तेया, जलातील रस मी आहे. चंद्र-सूर्यामधील प्रभा (कांती) मी आहे, सर्व वेदांतील प्रणव (ॐकार), आकाशातील शब्द (ध्वनी), मनुष्यांमधील पौरुष (कर्तृत्वशक्ती) मी आहे. पृथ्वीमधील शुद्ध गंध (सुगंध) आणि अग्नीमधील तेज (उष्णता) मी आहे. प्राणिमात्रांमधील जीवन (जीवनशक्ती) आणि तपस्व्यांचं तप (निष्काम कर्मप्रेरणा - झिजण्याची वृत्ती) मी आहे. * सर्व सृष्टिजाताला व्यापून त्याच्या पलीकडेही तोच परमात्मा आहे. दहाव्या अध्यायातील 42व्या श्लोकात एकांशानं व्यापून उरल्याचं वर्णन आहे. त्रिगुणात्मक जगातील अनेकत्व जरी परमेश्वरापासून निर्माण झालं असलं, तरी ते अनेकत्व त्याच्या निर्गुण स्वरूपात नसतं. पण त्रिगुणात्मक विश्वात परमेश्वर कुठे कुठे आहे ते भगवंत सांगतात. उदकातील रस मी आहे. चंद्र-सूर्यांमधील प्रभा, वेदांमधील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषांमधील पौरुष मी आहे. पृथ्वीतील सारा सुगंध, अग्नीतील दीप्ती, प्राणिमात्रांतील म्हणजे यच्चयावत् पदार्थांमधील आणि भूतांमधील जीवनशक्ती, ध्यान-उपवास करणार्‍या तपस्वी लोकांतील तप म्हणजे निष्काम कर्मप्रेरणा मी आहे. या दोन श्लोकांमधून भगवंतांनी ज्या गुणांचा उल्लेख केला आहे त्याचा विचार करू. या श्लोकांमधून ईश्वरानं आपलं ‘स्वत्व’ अथवा चैतन्यरूपी सत्तेचा निर्देश केलेला आहे. या श्लोकांमधील हे नऊ घटक केवळ प्रातिनिधिक आहेत. उदा. चंद्र-सूर्याच्या निर्देशांत सृष्टीतील सर्व ग्रहगोल गृहित आहेत. चंद्र-सूर्यामधील तेजरूपी सत्ता ईश्वराची आहे. त्यांच्यामधून तेजच काढून घेतलं तर चंद्र-सूर्यांना काही अर्थच उरणार नाही. या दोन ग्रहगोलांचा मुद्दाम उल्लेख केलेला दिसतो. कारण एक गोल स्वयंप्रकाशित आहे तर दुसरा परप्रकाशी आहे. म्हणजे ग्रहगोलांमधील तेज कसंही असलं तरी त्यातली तेजरूप सत्ता ईश्वराची आहे. या जड गोलांमधे खेळणारं ते आत्मतत्त्व प्रकाशरूपानं प्रतीत होत असतं. यानंतर वेदांचा उल्लेख केला आहे. वेद म्हणजे ज्ञान. दैवी ज्ञानाचा प्रसार करणारा कोणताही अपौरुषेय ग्रंथ हा ‘वेद’ असतो. म्हणूनच वेदांच्या संदर्भात ‘वेदा वै अनंता:’ असं म्हटलं आहे. वेद हे वाचायचे नसतात; त्यांचं पठण होत असतं. पठणातून जो नाद उत्पन्न होतो. नादातूनच सर्व सृष्टीचा उद्भव झालेला आहे. आजचं विज्ञान त्याला vibrations म्हणतं. परंतु, हा नाद म्हणजेच प्रणव - ॐकार. म्हणून या अद्याक्षरानंच वेदांचा प्रारंभ होतो. या ॐ मधे ‘अ’ ‘उ’ आणि ‘म’ दडलेले आहेत. अर्थात अकार, उकार आणि मकार व्यक्त होतात. या तीन मात्रांमधून विश्वाची उत्पत्ती-स्थिती आणि लय दर्शवली आहे. हे सारभूत प्रणवरूप शब्दब्रह्म ही ईश्वरी सत्ता आहे. यामधे सारं ज्ञान दडलेलं आहे. यानंतर ‘आकाशा’चा उल्लेख आहे. आकाश म्हणजे पंचतन्मात्रांमधील पहिली मात्रा. यातून विश्वाचं नामरूपात्मक अस्तित्व अनंत स्पंदनांच्या हालचालींमधून दृग्गोचर झालं. आकाश आणि प्रणव ॐकार हे दोन्ही उल्लेख एकापाठोपाठ विनाकरण केलेले नाहीत. आकाशाचा उल्लेख हा शब्दरूप गुणवाचक आहे तर ॐकाराचा उल्लेख हा चैतन्यदर्शक आहे. म्हणजे आकाशाचा शब्दरूप गुण सृष्टीतील जड (matter) घटक बनवतो, त्यातले विविध आकार घडवतो तर ॐकाररूपी प्रणव त्या जड सृष्टीत चैतन्य भरून सृष्टीला कार्यरत करतो. प्रणवरूपी ॐकार चैतन्यवाचक आणि ज्ञानवाचक आहे. म्हणजे तो ज्ञानोत्पत्तीचा उगम आहे. म्हणूनच भारतात ॐकार साधना प्राचीन कालापासून प्रचलित आहे. मग भगवान ‘पौरुषा’चा उल्लेख करतात. पौरुष म्हणजे पराक्रम - यश:प्राप्तीचं साधन. जीवनातल्या उत्क्रांतीसाठी ‘पौरुषा’ची आवश्यकता असते. या पौरुषत्वामुळेच जीव शिवाशी जोडलेला रहातो. कारण पौरुषत्वात इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती अंतर्भूत असतात. पृथ्वीवरच्या रखरखलेल्या भूमीवर जेव्हा पहिल्या पावसाचा शिडकावा होतो तेव्हा मृद्गंध पसरतो. हा गंध अतिशय सुखद असा असतो. हा सुगंध पौरुषानं सिद्ध होत नाही तर तो मुळातच पृथ्वीमधे दडलेला असतो. कालपरत्वे तो अनुभवायला येतो. म्हणूनच तो दैवी असतो. पृथ्वीमधला सुगंध म्हणजेच मृत्तिकेचा अत्यंत उल्हसित करणारा सुगंध. विभावसु म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे स्थूलस्वरूपातील चैतन्य. यातील तेज हे ईशसत्तेचं दृष्टिगोचर स्वरूप आहे. यालाच वैश्वानर म्हणतात. प्राणिमात्रांमधील जीवनशक्ती ही भगवंताचीच आहे तर तपस्व्यांमधील जे तप:सामर्थ्य असतं ते सामर्थ्यही ईश्वराचंच आहे. यामधे क्षुधा, तृषा, शीतोष्णादी परिस्थिती सहन करण्याचं सामर्थ्य हे त्याचंच. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारं तितिक्षारूपी बळ हेही भगवंताचंच! म्हणजे सृष्टीला आपल्या सर्वप्रकारच्या शक्तींनी अंतर्बाह्य व्यापून उरलेला आणि सृष्टीचा विलय झाल्यानंतरही उरलेला तो एकमात्र ईश्वर असतो. रात्री निद्राधीन झाल्यानंतर आपण स्वप्नसृष्टीत प्रविष्ट होतो. स्वप्नसृष्टीतल्या प्रसंगांची, माणसांची त्यांच्या बलाची, गुणांची, निसर्गाची, प्रकाशाची, अंधाराची - थोडक्यात, स्वप्नातल्या सर्व चराचराची निर्मिती आपल्या ‘मी’ पासूनच होत असते. जागृती आल्यानंतर ती स्वप्नसृष्टी नाहीशी झालेली असते. उरलेला असतो ङ्गक्त ‘मी!’ त्याचप्रमाणे सृष्टीमध्ये परमेश्वर भरून राहिलेला असतो आणि सृष्टी नाहीशी झाल्यानंतर केवळ ‘तो’च उरलेला असतो. जो नाहीसा होतो तो सारा मायेचा पसारा असतो. त्या पसार्‍यातले आपले य:कश्चित राग-लोभादी प्रकार, अहंकार, मनोविकार हे सारं काही लुप्त होतं. ‘एलिस इन वंडरलॅन्ड’ मधील राजा झोपलेला असतो. त्याला उठवलं तर सार्‍यांचंच अस्तित्व लुप्त होणार असतं. कारण त्यांचं अस्तित्व हे राजाचं स्वप्न असतं! परमेश्वर सतत जागृत असतो तरी हा स्वप्नवत् मायेचा खेळ सुरूच असतो. परमेश्वराची ही ओळख इंद्रियातीत आहे. शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श अशा क्रमानं आपण प्रत्येक पदार्थाची वेगळी वेगळी ओळख करून घेतो. तरी पण वस्तूपासून मिळणार्‍या आनंदात एक प्रकारची अखंडता असते. हाताला चव कळत नाही, तर जिभेला वस्तू दिसत नाही. पण या गोष्टींना एकाच सूत्रानं बांधलेलं आहे. त्यामुळे स्पर्श-रसादी आनंद अखंडपणानं अनुभवास येतो. मात्र इंद्रियांना एकत्रित बांधणारं सूत्र (परमेश्वर) कोणत्याही इंद्रियानं ओळखता येत नाही. तो इंद्रियातीत आहे. सारांश: त्रिगुणात्मक चराचरात परमेश्वर व्यापून उरला आहे. हे अनेकत्व त्याच्या निर्गुण स्वरूपात मात्र नसतं. * * *https://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/the-real-nature-of-supreme-being.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगत: प्रभव: प्रलयस्तथा ॥7/6॥ मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥7/7॥ अर्थ: सर्व सृष्ट पदार्थ या दोन प्रकृतींपासून निर्माण होत असल्यामुळे मी (परमात्मा) सर्व (जड-चैतन्यात्मक) जगताचं उत्पत्तीस्थान आणि लयाचं कारण आहे हे जाण. हे धनंजया, माझ्याहून तत्त्वत: भिन्न असं दुसरं काही नाही. सूत्रात ओवलेल्या मण्यांच्या समूहाप्रमाणे हे सर्व (जग) माझ्यामध्ये गुंफलेलं आहे. * परा-अपरा या दोन प्रकृतींपासूनच सर्व जगताची निर्मिती होते. परमेश्वराच्या या दोन प्रकृती सर्व भूतांचं कारण असल्यामुळे परमेश्वरच जगाचं कारण आहे, हे उघड आहे. परमेश्वरच जगाची उत्पत्ती आणि विनाश आहे. परमेश्वराशिवाय या विश्वात दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. माळेच्या सूत्रात माळेचे मणी जसे ओवलेले असतात त्याप्रमाणे परमेश्वरामध्येच सर्व चराचर विश्व गुंफलेलं असतं. म्हणजे परमेश्वर विश्वाचं कारणही आहे आणि सूत्रही आहे. या श्लोकांत फार मोठा अर्थ दडलेला आहे. परमेश्वरापासून जग निर्माण झालं आणि परमेश्वर हेच जगाचं सूत्र आहे. पुरुषापासून स्त्रीला मूल होतं; पण त्या मुलात तो पुरुष नसतो. इथे मात्र तसं नसतं. ‘कारण’ही तोच आणि ‘कर्म’ही तोच! मणीही तोच आणि त्याचं सूत्रही तोच! म्हणूनच सर्वांभूती परमेश्वर असं म्हटलेलं आहे. पाण्यापासून बर्फ निर्माण होतो. पण बर्फातही पाण्याचं अस्तित्व पूर्णपणे असतंच! एवढंच नाही तर बर्फ निर्माण करणारा तोच आणि त्याचा नाश करणाराही तोच! सृष्टिकर्ता तोच, सृष्टीचा उपभोक्ता तोच आणि सृष्टीचा नाश करणाराही तोच! वॉशिंग मशिन जरी बनवलं तरी ते स्वत:हून धुण्याचं कार्य करू शकत नाही. त्यासाठी वीजरूपी चेतना आवश्यक असते. पण केवळ वीज असूनही उपयोगाचं नाही. विजेसह मशिनला निर्माण करणारे, प्रवाहित-संचालित करणारे ‘हात’ हवेत. म्हणजे मशिन आणि वीज आपणहून निर्मित आणि कार्यरत होत नाहीत. त्यासाठी त्याचा निर्माता आणि व्यवस्थापक आवश्यक असतो. केवळ ‘अपरा’रूपी मशिन्स् आणि ‘परा’रूपी वीजेच्या आवाक्याबाहेरच्या या गोष्टी आहेत. इथे मशिनचा निर्माता, विजेचा निर्माता, मशिन, त्यांना संचालित करणारा व्यवस्था���क हे एकरूप आहेत हे विशेष! सृष्टीची संकल्पना करणारा, तिला निर्माण करणारा, संचालित-प्रवाहित करणारा आणि स्वत:ही त्यात असणारा असा हा निर्माता कोण असेल? कशाप्रकारे त्यानं या सृष्टीची निर्मिती केली असेल? हा प्रश्न नक्कीच आपल्या बुद्धीबाहेरचा आहे. पण आपण गीतेतल्या श्लोकांच्याच आधारानं थोडीफार कल्पना करू शकतो. भगवद्गीतेचा एक श्लोकही आपलं जीवन घडवू शकतो; पण गीतेचा समग्र अभ्यास करायचा झाल्यास आणि आपली समज अधिक प्रगल्भ करायची झाल्यास पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकापासून 18व्या अध्यायातील अंतिम श्लोकापर्यंतचा विचार करावा लागतो. या विहंगावलोकातून आपल्याला सृष्टी, सृष्टीचं सर्जन, जीव आणि जीवामधे असणारी तत्त्वं यांचं ओझरतं ज्ञान होऊ शकतं. म्हणूनच प्रस्तुत श्लोकासाठी तिसर्‍या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा संदर्भ महत्त्वाचा वाटतो. त्यात भगवान सांगतात, ‘पूर्वी (कल्पारंभी) प्रजापती ब्रह्मदेव यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना म्हणाला, या (यज्ञाच्या) योगानं तुम्ही आपलं संवर्धन करून घ्या. हा (यज्ञधर्मच) तुमचं इष्ट मनोरथ पूर्ण करणारा कामधेनू होवो.’ यज्ञात संकल्प महत्त्वाचा असतो. संकल्पाच्या पाठोपाठ कर्म प्रारंभित होतं. तेच यज्ञकर्म ठरतं. म्हणजेच सृष्टिसर्जनाच्या या विशाल यज्ञीय कार्यात सर्वप्रथम ‘संकल्प’ केला गेला. संकल्प हा मनाशी निगडीत असतो. कल्पना करणं हे मनाचं कार्य असतं. म्हणजेच कल्पनेत मन हे असतंच - असावंच लागतं. मनाशिवाय कल्पना शक्य नाही. प्रत्यक्ष कागदावर चित्र काढण्यापूर्वी चित्रकारानं ते चित्र सर्वप्रथम मनोमन ‘बघितलेलं’ असतं. मगच ते कागदावर व्यक्त होतं. प्रत्येक सर्जनाच्या संदर्भात हाच नियम लागू होतो. म्हणजेच जी सृष्टी निर्माण झाली - व्यक्त झाली त्याआधी त्याची कल्पना केली गेली हा निष्कर्ष आपण काढू शकतो. वैश्विक मनानं (ब्रह्मदेव) प्रथम सृष्टीची कल्पना केली. अर्थातच जे जे पदार्थ-जीव आदी सृष्टीत तयार झाले त्या त्या प्रत्येकात विश्वनिर्मात्याचं मन हे होतंच - आहेच. या अर्थानंच ‘तो’ सृष्टी व्यापून आहे. ते मनच जर सृष्टीतून काढून घेतलं तर सृष्टीचं अस्तित्वच उरणार नाही! स्वप्नातून जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा स्वप्नसृष्टी नाहीशी झालेली असते. आपल्या मनानंच ती स्वप्नसृष्टी निर्माण केलेली असते. त्यात राग-द्वेष, स्पर्धा-अभ्यास, नातेसंबंध, करियर, देश-विदेश, ब्रह्मांड - सर्व काही असतं. जाग येताच ते सर्व नामशेष होतं. या स्वप्नातील घटकांचा स्वप्नात राहूनच स्वतंत्र प्रज्ञेनं शोध घेण्याचं ठरवलं, त्याचे उलट-सुलट सिद्धान्त मांडले, तंत्रज्ञान विकसित केलं तरी ती सारी उठाठेव व्यर्थच म्हणावी लागेल. जे नाहीच त्याचा शोध तरी कसा घेणार? स्वप्नातल्या सृष्टीचा शोध कसा घेणार? तो शोध लागणं कदापि शक्य नाही. त्यासाठी ज्या मनानं हे सारं निर्माण केलं त्या मनाचाच विचार करावा लागेल; आणि जेव्हा ‘त्या’ मनाचाच विचार करू लागलो तर जागृती येईल आणि जीवनरूपी आभासी स्वप्नसृष्टी खलास होऊन जाईल. मग जाणीव (ज्ञान) होईल की, खरोखर त्या सृष्टीचं अस्तित्व हे नव्हतंच मुळी! पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबातच आपण सारे शोध घेत राहिलो होतो. बेशुद्ध व्यक्तीच्या दृष्टीनं विश्व-ग्रहतारे-जीव-भौतिक शास्त्रं - सारं काही संपलेलं असतं! म्हणजेच मन अस्तित्वात आलं तरच सृष्टी अस्तित्वात येते; अन्यथा नाही हा सिद्धान्त आपण मांडू शकतो. ब्रह्मदेवाच्या वैश्विक मनानंच (संकल्पानं) सृष्टीचं सर्जन केलं, असं शास्त्र सांगतं. अब्जावधी ग्रह-तारे, जीव, मानव-अतिमानव, त्यांच्या वृत्ती, शरीरांतर्गत क्रिया, सूक्ष्म सृष्टी, कर्मानुरूप जन्म-मृत्यूचा खेळ, हा सारा वैश्विक पसारा निर्माण करणं - त्याचं डिझाईन करणं हे केवळ मनानंच शक्य आहे. इजिप्तचा पिरॅमिड म्हटलं की आपलं मन डोळ्यांपुढे तो पिरॅमिड त्वरित उभा करतं. त्यासाठी कोणते दगड आणावे लागत नाहीत किंवा प्लॅन बनवावा लागत नाही! वैश्विक मनानं अशा संकल्पातूनच सृष्टीची निर्मिती केली. इतकंच नाही तर त्या विशाल वैश्विक मनानं आपल्याच मनातून अब्जावधी मनं निर्माण केली. ती मनंही ठराविक मर्यादेत राहून विचार करू लागली - सर्जन करू लागली! पर्यायानं जे जे सर्जन (creation) होतं त्याचा उद्भव वैश्विक मनातूनच होतो असंच म्हटलं पाहिजे. तेच सर्व निर्मितीचं मूळ आहे. म्हणूनच परमेश्वर वेगळा आणि ‘मी’ वेगळा, तंत्रज्ञान वेगळं, सृष्टी वेगळी, परग्रहावरील मानव वेगळे असं होऊच शकत नाही. एकाच एकसंध वैश्विक मनाच्या अब्जावधी बिंदूवत मनांमधून सर्जन झालेल्या या गोष्टींची मालकी वास्तविकत: एकाच वैश्विक मनाची! या दृष्टिकोनातू या श्लोकाचा विचार केला तर परा-अपरा प्रकृतीसह सर्व विश्व परमतत्त्वापासूनच निर्माण झालं आणि परमतत्त्व या विश्वाला स्व-संकल्पामुळेच आत-बाहेर व्यापून उरलं, हा निष्कर्ष निघू शकतो. म्हणूनच विभिन्न तत्त्वांनी भरलेल्या या विश्वात एकप्रकारची अखंडता राहिलेली आहे. विश्वात केवळ विभिन्न तत्त्वं एकत्र येत नाहीत तर या तत्त्वांच्या पाठीशी एक दैवी शक्ती सदैव कार्यरत असते. ती शक्ती या सर्व तत्त्वांना जोडते. प्रकृती आणि पुरुष (spirit-matter) मिळून एकंदर पंचवीस तत्त्वं आहेत, असं सांख्य मानतात. सांख्यांची स्वतंत्र प्रकृती गीतेला मान्य नाही. मुंडकोपनिषदातही परमपुरुषापासून प्राण, मन, सर्व इंद्रियं, आकाश, वायू, अग्नी, पाणी व पृथ्वी हे निर्माण होतं, असं वर्णन आहे. प्रकृतीची विभिन्न तत्त्वं जरी मान्य केली तरी ती सर्व परमपुरुषापासून निर्माण झाली आहेत हे सत्य मागे उरतंच. त्या परमपुरुषाला ग्रहगोलांसह प्रत्येक जीवाचं स्वतंत्र डिझाईन करावं लागलं नाही. त्याचा केवळ संकल्प त्याला कारण ठरला! त्याचं वैश्विक मन कारण ठरलं. त्या मनातूनच निघालेली अब्जावधी मनं सर्जन करू लागली, कार्य करू लागली. परंतु; पर्यायानं हे त्या वैश्विक परममनाचंच कार्य ठरलं - ठरत आहे! स्वप्नामधल्या सृष्टीची उत्पत्ती आणि लयाचं स्थान हे मनच असतं. मनाचाच हा खेळ आहे आणि उत्पत्ती आणि लय याचा भ्रामक अनुभव मनामुळेच आपल्याला मिळत असतो. याच दृष्टिकोनातून ब्रह्म सत्य ठरतं बाकी सारं आभासी! आपलं प्रत्येकाचं मनच जर त्या वैश्विक मनाचं प्रतिबिंब आहे तर आपण कोणते संकल्प केले पाहिजेत याचा ज्यानं-त्यानं विचार केला पाहिजे. मनात कोणते विचार आणायचे, कोणते सोडायचे, कोणत्या विचारांनी सकारात्मक ऊर्जा मिळवायची हे आपणच ठरवायचं असतं. आणि जे जे आपण ठरवणार असतो ते ते केव्हातरी होणारच असतं - घडणारच असतं. मला बरं नाही, माझी कुवत नाही, असे विचार मनामधे उद्भवले तर मन आणि मनाबरोबर शरीरही दुबळं होऊ लागतं. मला काही झालं तर? मला साथीचा रोग झाला तर? माझं पुढे कसं होणार? अशाप्रकारच्या नकारात्मक विचारांनी मन ग्रासून गेलं तर आपणच आपलं तसं भविष्य रचत जातो. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ ही म्हण यथार्थ आहे. ब्रह्माच्या वैश्विक मनात आपलं छोटं मन अशा कुविचारी संकल्पांचा उद्भव करत असतं. याउलट, मला काहीही होत नाही, मी दीर्घायुषी आहे, मला कोणतीही चिंता नाही, मी देवाचं काम करतो; माझं वाईट काही होऊच शकत नाही, माझं वर्तनच असं आहे की; देव माझं वाईट करणारच नाही असे सत्संकल्प मनाला उभारी देतात. वैश्विक मनाकडे तसे संदेश जातात - ते नित्य गेले पाहिजेत. ज्या विचारांचं प्रस्फुरण होतं ते विचार पुन्हा आपल्याकडेच आपण केलेल्या विचारांचा प्रभाव घेऊन परत येत असतात, हा वैश्विक सिद्धान्त आहे. असे नित्य संदेश आणि मनाची प्रगल्भता ‘त्रिकाल संध्येतून’च साध्य होते. प्राचीन ऋषींनी ही त्रिकाल संध्या म्हणूनच पृथ्वीवरच्या मनुष्याला वेगवेगळ्या शब्दात विकासार्थ दिली. ती यथोचित केली तर नकारात्मक विचार दूर होतील. म्हणून उत्तम संगत, सद्विचार, सात्त्विक वृत्ती यांच्या आधारानंच इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तेच भगवंत या श्लोकात सांगत आहेत. परमेश्वराच्या या प्रेममयी विराट स्वरूपाची नुसती कल्पना जरी करून पाहिली तरी थक्क व्हायला होतं. ते स्वरूप बुद्धीत स्थिरावतच नाही. सारांश: परा-अपरा प्रकृती या परमेश्वरापासून निर्माण झालेल्या असून त्या प्रकृतींपासूनच दृश्य-अदृश्य सृष्टी निर्माण झाली. तिचा कर्ता-करविता-नाशकर्ता भगवंतच आहे. सारं विश्व भगवंतरूपी सूत्रात गुंफलेलं आहे. त्याचंच सर्जनशील मन सृष्टीच्या मागे आहे. हा सातवा श्लोक मंत्रमय श्लोक आहे. * * *For Books by Rajendra Kher:-https://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/do-we-create-the-world.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥7/4॥ अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥7/5॥  अर्थ: ही माझी प्रकृती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली आहे. हे अर्जुना ही (माझी) अपरा प्रकृती होय... जिनं हे सर्व जग धारण केलं आहे, अशी माझी हिच्याहून वेगळी जीवभूत (श्रेष्ठ अशी) परा प्रकृती आहे असं समज. * अर्जुनाच्या मनात ज्ञानाची गोडी निर्माण करण्याकरता भगवंतांनी त्याला ‘परा’ आणि ‘अपरा’ प्रकृतींविषयी सांगितलं आहे. या चार ओळींच्या श्लोकांमधे पराकोटीचा अर्थ दडला आहे. तो समजण्यासाठी बुद्धीची कक्षा विशाल केली पाहिजे. परब्रह्माशिवाय जे दिसतं किंवा दिसत नाही तिला ‘प्रकृती’ म्हणतात. सर्व गुणांसंह पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभुतं आणि अहंकार, दृश्यादृश्य वस्तू, त्यांचे गुण आणि क्रिया ह्यांचा अंतर्भाव ‘अपरा प्रकृती’त होतो. या नाशिवंत जड अपरा प्रकृतीपासूनच शरीर, इंद्रियं, प्राण आणि अंत:करण हा जड समुदाय बनला आहे. अपरा प्रकृतीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास भूस्तरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, गणितशास्त्र, मानसशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान, माणूस-निसर्ग आणि मानवाला अद्याप माहीत नसलेली शास्त्रं या गोष्टींचा अंतर्भाव अपरा प्रकृतीमध्ये होतो. आजचं भौतिकशास्त्रज्ञ वैश्विक तरंग (कॉस्मिक रेज्), अणू, फील्ड - अर्थात ईथरवर होणारी चेतनेची स्पंदनं ही विश्वाच्या निर्मितीचं कारण आहे अशातर्‍हेचा विचार मांडतात. कणादसारखे द्रष्टे ऋषी परमाणू हे विश्वाचं आदिकारण आहे, असं मानत होते. तर न्यायशास्त्रकारांच्या मतानुसार प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रहस्थान ही वस्तुज्ञान करून घेण्याची साधनं आहेत. सांख्यदर्शनानं प्रकृती-पुरुष यांना द्वैत समजून त्यांनी त्याची पंचवीस तत्त्वं सांगितली आहेत. या प्रकृतीला ओळखण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं तो ‘ज्ञाता’ होतो. म्हणजे समजण्याचा विषय हा ‘ज्ञेय’ आणि समजणारा ज्ञाता! ही समजण्याची शक्ती जीव नावाच्या प्रकृतीत असते. ह्या प्रकृतीलाच ‘परा प्रकृती’ म्हणतात. त्या जीवरूप प्रकृतीच्या योगानं सर्व इंद्रियादिकांचं धारण होतं. परमेश्वराची तीच जीवरूप परा प्रकृती जगात प्रवेश करते आणि सर्व जगत् धारण करते. परा प्रकृतीबद्दल जर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास, पदार्थात पहिली चेतना उत्पन्न करणार्‍या गतीसह ध्वनी, प्रकाश, उष्णता, विद्युत, चुंबकीय तत्त्व अशा विविध शक्तींचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. सत्-असत्, पुण्य-पाप, प्रकाश-अंधकार, उष्ण-थंड, सुंंदर-कुरूप, विनम्रता-अहंकार, भरती-ओहोटी, सूर्योदय-सूर्यास्त, कला-विकला अशी विसंवादी द्वंद्वस्वरूपं हे भगवंताच्याच परा-अपरा प्रकृतीचं दर्शन आहे. विश्व काय आहे, कशाचं बनलेलं आहे, याचं संशोधन हजारो वर्षं भौतिक, तात्त्विक आणि आध्यात्मिक दृष्ट्या चाललेलं आहे. भौतिक शास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ, न्यायशास्त्री, तत्त्वज्ञ, अतींद्रिय अनुभवी, ज्ञानी विचारवंत या सृष्टिकर्त्याचा, सृष्टीच्या कारणाचा आणि कार्याचा शोध घेत आहेत. निर्मात्याचं कार्य (म्हणजे विश्व) तर दिसत आहे. तथापि, या ‘कार्या’चा म्हणजेच जीवांसह संपूर्ण भौतिक सृष्टीचाही शोध आपण घेऊ शकत नाही हे वास्तव आहे. सृष्टीचं ‘कारण’ सुद्धा अद्याप समजलेलं नाही. मग या अगम्य सृष्टीचा निर्माता कोण, या प्रश्नाचं उत्तर सापडणं किती कठीण! हा एक असा सापळा आहे की एखाद्याला उत्तर सापडलं तर त्याचं स्वतंत्र अस्तित्वच राहू शकत नाही. कारण आपण कोणत्या कारणाचं आणि कर्त्याचं कार्य आहोत हे समजलं म्हणजे कार्याची कर्त्यात समप्ती होणार हे उघड आहे. थोडक्यात, आत्मज्ञान झालं म्हणजे ‘मी-तो’ हा भेदच उरत नाही! कारण सृष्टीचा कर्ता, कारण आपणच ठरतो आणि सृष्टी हे आपलंच कार्य ठरतं. ते एकरूप झालं की मागे काहीच शेष उरत नाही. कोणत्या ‘अपरा’ प्रकारांनी सृष्टी बनवलेली आहे याचा भगवान स्पष्ट उल्लेख करतात. ते प्रकार थोडक्यात पाहू:- पृथ्वी:- जे जे जड पदार्थ असतात ते ते ‘पृथ्वी’ तत्त्वात येतात. यामध्ये सृष्टीतले सर्व ग्रह-तारे, खनिजं, मानव-अतिमानवांसह अब्जावधी जीव, अन्न इत्यादी या सर्व सिस्टिमस्चा पृथ्वी-तत्त्वात अंतर्भाव होतो. थोडक्यात पृथ्वीतत्त्व म्हणजे एक कल्पानातीत विशाल असं ‘हार्डवेअर’ आहे! आप:- ‘आप’ म्हणजे जल. जल हे द्रवरूप असतं. विश्वातील जल, नद्या-सागर, जीवांच्या अंतर्गत असणारी रसायनं, चयापचय क्रिया, जीवाची तहान भागवणारं पाणी इत्यादी. ‘आप’शिवाय सृष्टीतल्या जीवांचं अस्तित्वच संभवणार नाही. तेज:- तेज हे चेतनास्वरूप असतं. तेज असल्याशिवाय पदार्थांना गतीच मिळणार नाही. नुसती मोटार असून उपयोगाचं नाही. त्याला गती देणारी ऊर्जा तर हवीच. वायू:- वायूमुळेच सृष्टीत हालचाल राहते. शरीरांतर्गत उदान, समान, अपान वगैरे जे वायू असतात त्यामुळेच जीव कार्यरत होऊ शकतो. प्राणवायूसह अनेक वायूंमुळेच जीव जिवंत राहू शकतो. परस्पर उपयुक्त असे असंख्य वायू सृष्टीत आहेत. प्रत्येक जीवाभोवती अव्यक्त असे कोष असतात. ते कोष वायू आणि तेज यांनी बनलेले असतात. त्यात प्लाझा आदी द्रव्य असतात. विचार आणि कर्म यांनुसार त्या कोषांना निळा, पिवळा, पांढरा असे रंग प्राप्त होतात. कर्माचं रेकॉर्ड आणि कोषांचं स्वरूप यांवरून जीवाच्या मनोवृत्तीचा ताळेबंद क्षणात मांडला जाऊन जीवाला पुढील जन्म त्यानुरूप प्राप्त होत असतो. आकाश:- सृष्टीतला फार मोठा भाग आकाशानंच व्याप्त आहे. आकाश नसतं तर पदार्थांना गती मिळण्यासाठी जागाच उरली नसती. अकाश हे शब्दधारकही आहे. सृष्टीत जे जे घडत आहे त्याची नोंद या आकाशतत्त्वातच होत असते. ‘थिऑसॉफीमधे ‘आकाशिक रेकॉर्ड’ हा शब्द त्यामुळेच आला. आकाशामधे जर जीवांच्या कार्य-कर्मांची नोद झालीच नसती तर पुनर्जन्म आणि पर्यायानं सृष्टीचं रहाटगाडगं चालू राह्यलंच नसतं. सारं काही स्थिर - स्टॅटिक राहिलं असतं. भगवंतांनी मन-बुद्धी-अहंकार यांनाही ‘अपरा’ म्हणून संबोधलं आहे. मन:- मन नसतं तर इंद्रियांकडून मिळणार्‍या कोणत्याही प्रेरणा स्वीकारल्याच गेल्या नसत्या. राग-द्वेष-मद-मोह-मत्सर आदी षड्रिपूंना जागाच उरली नसती. आसक्ती, प्रेम, अस्मिता, अभिलाषा, दया, करुणा आदी भावभावना राहिल्याच नसत्या. कर्माची प्रेरणा देणार्‍या वासनाही निर्माण झाल्या नसत्या. पर्यायानं जीव म्हणजे केवळ जड पुतळे झाले असते. मनाचेही दोन प्रकार आहेत; एक अंतर्मन आणि दुसरं बहिर्मन. अंतर्मन विशाल आहे. तिथे पूर्वजन्मांचे संस्कार, कर्मांचा ताळा या गोष्टी समाविष्ट होत राहतात. अंतर्मनाचा (वायरलेस!!) संपर्क आकाशाशी असतो - थोडक्यात वैश्विक मनाशी असतो. त्यामुळे जीव काय करतो, काय विचार करतो याचं संपूर्ण रेकॉर्ड आकाशस्थित वैश्विक मनाला समजत असतं. नुसता जीव निर्माण करून निर्मात्यानं त्याला मुळीच मोकळा सोडलेला नाही! त्याची नाडी त्यानं स्वत:च्या हातात ठेवली आहे!! मनामधे भगवंतांनी आणखी एक गुण भरला आहे. जागेपणी बुद्धीत अविरत असा विचारांचा साठा भरला जात असतो. त्यामुळे बुद्धीची क्षमता कमी होते. ती पुन्हा वाढवण्यासाठी बुद्धीत नोंद झालेल्या विचारांचं पुनर्आयोजन (defragmentation) करणं आवश्यक होतं. मनाला स्वप्नात गुंतवलं की बुद्धी विचारांच्या फायलींचं पुन्हा आयोजन करते. अशातर्‍हेनं मन आणि बुद्धी यांचाही मेळ घातला गेला आहे. बुद्धी:- प्राणिसृष्टीला ठराविक मर्यादेत बुद्धी दिली आहे; तर मनुष्याच्या बुद्धीच्या कक्षा प्राण्यांपेक्षा विशाल बनवल्या आहेत. बुद्धी विचार करते. मन उधळलेलं असतं. बुद्धीच नसती तर प्रत्येक जीवाच्या उधळलेल्या मनानं सृष्टीत कल्लोळ माजवला असता. पण सारासार विवेक करणारी बुद्धी मनावर अंकुश ठेवू शकते. स्वत:वर संस्कार करू शकते. आत्मविकासाचा विचार करू शकते. मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार आहे इत्यादी विचार मनुष्याची बुद्धी करते. प्राण्यांना अगदीच मर्यादित बुद्धी असल्यामुळे ते सहजप्रेरणेनं जगत रहातात. त्यांच्याकडे हे विचार नसतात. तथापि, मनुष्यालाही बुद्धी मर्यादित स्वरूपातच मिळालेली आहे. ठराविक कक्षेच्या पलीकडे बुद्धी म्हणजे विचार जाऊच शकणार नाही अशी योजना केली आहे. अहंकार:- हे शरीर म्हणजे ‘मी’ आहे, हा अहंभावच नसेल तर जीव कशासाठी कर्म करणार? मनात उद्भवणार्‍या वासना तरी कुणाशी जोडल्या जाणार? ‘मी’ची समजच नसेल तर मनुष्य स्वत:साठी कर्म तरी कशाला करणार? ‘तुझं-माझं’ होणारच नाही. ते झाल्याशिवाय कर्माचं रेकॉर्ड भरणारच नाही. वासना-राग-द्वेषादी भाव उद्भवणारच नाहीत. पुनर्जन्माला कारण ठरणारे विचार आणि कर्मं होणारच नाहीत. ‘अहं’चं पोषण करणं ही इतिकर्तव्यता संभवणारच नाही. म्हणजे विश्व निर्माण करून विश्वाला गती देण्यासाठी, सृष्टिव्यापार चालण्यासाठी आणि जीवांना या खेळात अडकवण्यासाठी या अपरा प्रकृतीची ही थक्क करणारी यंत्रणा निर्मात्यानं निर्माण केली. इतकं सांगून भगवान म्हणतात, या ‘अपरा’ प्रकृतीला धारण करणारी, हिच्याहून वेगळी अत्यंत श्रेष्ठ अशी माझी जीवभूत ‘परा’ प्रकृती आहे. आपण या निर्मितीचा चकित करणारा केवळ ओझरता आढावा घेतला. तेवढ्यानंही आपल्याला भगवंताच्या विशालतेचं दर्शन होतं. या परा-अपरा प्रकृतीमधून संपूर्ण विश्वाची संरचना कशी झाली आहे ते भगवंतांनी थोडक्यात सांगितलं आहे. पाच हजार वर्षांपूर्वी हे ज्ञान भगवंतांनी कथन केलं आहे. आजही ते कालबाह्य झालेलं नाही - ते तसं होणं शक्यही नाही. किंबहुना विश्वरचनेचं चिरंतन सत्य भगवंतांनी सहजगत्या उलगडून दाखवलं आहे. पण ते खोलवर जाऊन जाणणं फार कठीण आहे. एक गोष्ट मात्र या श्लोकातून नक्कीच सूचित होते. ती म्हणजे, हे विश्व निर्मितच आहे आणि त्याचा निर्माताही आहे! आणि जे जे निर्माण होतं त्याला आरंभही असतो आणि अंतही असतो!! सारांश: नाशिवंत जड वस्तूंचा अंतर्भाव अपरा प्रकृतीत होतो आणि त्या जड वस्तूंना दिल्या जाणार्‍या पहिल्या चेतनेसह गती, विद्युत, चुंबकीय तत्त्व अशा शक्तींचा अंतर्भाव परा प्रकृतीत होतो. * * *
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/how-the-universe-was-created.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.  Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत:॥7/3॥ अर्थ: सहस्त्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच (ज्ञानाच्या) सिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्नवादी सिद्धांपैकी (परोक्षज्ञान्यांपैकी) एखादाच मला तत्त्वत: जाणतो. * परमात्मस्वरूपाचं ज्ञान केवढं दुर्लभ असतं, हे या श्लोकावरून समजून येतं. ते ज्ञान मिळविण्यासाठी हजारो लोकांमधला एखादाच सिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतो आणि असा प्रयत्न करणार्‍या हजारोंमधील एखाद्यालाच परमात्मस्वरूपाचं तत्त्वत: ज्ञान होत असतं. (म्हणजे in principle ज्ञान होत असतं.) ज्ञान होणं ही गोष्ट इतकी कठीण असण्याचं कारण म्हणजे ज्ञान हे तर्कानं कधी जाणता येत ना��ी, विवेकानं कधी समजत नाही किंवा जाणिवेनंही ज्ञानाचं आकलन करता येत नाही. सिद्धी मिळाल्या किंवा केवळ इंद्रियं ताब्यात ठेवली की ज्ञान झालं असं कित्येकांना वाटतं. परंतु केवळ इंद्रियं ताब्यात ठेवूनही कार्यभाग होत नाही. आत्मतत्त्वाचा सम्यक् बोध होणं यालाच ज्ञान म्हणतात. नुसता बोध होऊनही उपयोग नसतो. तर तो बोध प्रत्यक्ष कार्यवाहित आला म्हणजे माणूस खर्‍या अर्थानं आत्मज्ञानी अथवा आत्मसाक्षात्कारी होतो. ज्या मेंदूमुळे आपण विचार करतो तो मेंदू आपण पाहू शकत नाही. ज्या डोळ्यांनी आपण पाहतो त्या डोळ्यांना आपल्याला बघता येत नाही. मग देव दाखवा, असं आपण कोणत्या बौद्धिक आधरावर म्हणू शकतो? ‘स्व’ला पाहता आलं तरच परमतत्त्व अनुभवायला येऊ शकतं. हे परमात्मज्ञान सर्वांना, सहजगत्या आणि अल्पशा प्रयत्नांनी साध्य होण्यासारखं नाही. कारण ती मानवी जीवनाची प्राथमिकता नसते. जीव बाह्य विश्वातच रमलेला असतो. त्यातच तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. या सुखापलीकडच्या चिरंतन आनंदाविषयी तो साशंक असतो. त्यामुळे जे समोर दिसतं, इंद्रियांना अनुभवायला येतं त्यातलंच सुख मिळवणं ही मनुष्याची जीवननिष्ठा बनते; तीच इतिकर्तव्यता ठरते. त्यातच त्याचा पुरुषार्थ कारणी लागतो. धर्म-अर्थ-काम-मोक्ष या पुरुषार्थाच्या नैसर्गिक प्रेरणा असतात. यांचा अनुक्रम काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष असा असतो. यांपैकी ‘काम’ आणि ‘अर्थ’ या दोन पुरुषार्थांच्याच मागे मनुष्य आयुष्यभर लागतो. हे पुरुषार्थ गाजवताना मनुष्याच्या वाट्याला क्लेशच येतात. परंतु; हे दोन पुरुषार्थ ‘धर्मा’नं नियंत्रित करता आले तर मात्र तितके क्लेश होत नाहीत. अन्यथा पुरुषार्थ गाजवता गाजवता दु:खच पदरात पडतं. तथापि धर्माचा अवलंबन करण्यातही मनुष्याचा उद्देश इंद्रियसुखच मिळवण्याचा असतो. त्यामुळे जरी धर्माधिष्ठित पुरुषार्थ गाजवून त्यानं सुखोपभोग मिळवले तरी त्यातून तृप्ती मिळू शकत नाही. एखाद्याला वाटतं, खूप नावलौकिक मिळावला तर मी सुखी होईन तर कुणाला वाटतं; भरपूर पैसा मिळवला म्हणजे मी सुखी होईन. पण अशा सुखांनी अंतिम तृप्ती येऊ शकत नाही. कारण हे सारं मिळवूनही इतर दु:खं-क्लेश व्यक्तीला हैराण करतात. तृप्ती तर दूरच रहाते. दैववशात अथवा पूर्वकर्मांनुसार जर मनुष्याला सत्याचं भान आलं तर मात्र तो इंद्रियातीत सुख-दु:खांपलीकडचा विचार करू लागतो आणि तेव्हाच त्याला ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची आठवण होते. ‘मोक्ष’ म्हणजे एक असीम आनंदाची अवस्था आहे, एवढ्या माहितीवरच बहुतांशी मुमुक्षू अडकून पडतात. पण तो आनंद मिळवण्यासाठी झटून अविरत प्रयत्न करणारे अत्यंत विरळा असतात; आणि अशा अत्यंत अल्प-स्वल्प मुमुक्षूंपैकी एखादाच सिद्ध ते अंतिम परमतत्त्व तत्त्वत: - in principle जाणतो. सिद्धी म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य मिळवणं असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. तर ईश्वरस्वरूपाला यथार्थपणे जाणण्याचा पराकोटीचा प्रयत्न असा अर्थ आहे. परमस्वरूप तत्त्वत: जाणणं म्हणजे जीव-जगत् आणि जगदीश हे सर्व एकच आहे या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं! ईश्वराला जाणण्याची क्रिया अतिदुर्लभ अशीच आहे. शास्त्रशुद्ध प्रयत्नांनीच ती जाणण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. परमेश्वराविषयी अनासक्ती असणं हे आत्मज्ञानामधलं सर्वात मोठं विघ्न असतं. खरोखर परमेश्वराविषयी कुणाला प्रेम वाटत असतं? त्याला भेटण्याची ओढ कुणाला असते? बहुतेक कुणालाही परमेश्वर नको असतो; त्याची कृपा हवी असते! माणसाला परमेश्वराकडून केवळ भौतिक गोष्टी हव्या असतात. ज्यांना भौतिक गोष्टी नको असतात त्यांना जीवनातून सुटका तरी हवी असते किंवा मोक्ष तरी हवा असतो. कित्येक जीव जीवनाला कंटाळलेले असतात म्हणून त्यांना मृत्यू हवा असतो. याचा अर्थ या सर्वांना परमेश्वरच हवा असतो असं म्हणता येत नाही! म्हणून आत्मज्ञानासाठी प्रथम परमेश्वराविषयी आसक्ती वाटली पाहिजे. त्याच्याविषयी आत्यंतिक प्रेम वाटलं पाहिजे; आत्यंतिक ओढ वाटली पाहिजे. केवळ ‘दाता’ म्हणून परमेश्वराकडे बघून उपयोगाचं नसतं. ‘तू मला हे दे त्या बदल्यात मी तुला ते देईन!’ ‘मला इन्क्रिमेन्ट दे, मी तुला दोन महिन्यांचा पगार देईन’ ‘मला पास कर; मी तुला पेढे देईन’ ‘माझं लग्न जमू दे; मी तुला एक हजार प्रदक्षिणा मारीन’ ‘मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दे; मी तुला सोन्याचं सिंहासन देईन!’ ही अशी सौदेबाजी - आणि तीही देवाशी(!!) करणं - याला भक्ती म्हणता येईल का याचा ज्यानं-त्यानं विचार करावा. अशा सौदेबाजीतून परमतत्त्व जाणता येऊ शकत नाही. परमेश्वराकडून कुणाला भौतिक भोग हवे असतात; तर कुणाला मोक्ष हवा असतो! म्हणजे ‘स्व’प्रेरित आणि ‘स्व’पोषित गोष्टींसाठीच परमेश्वराला (किंवा त्याच्या मूर्तिमंत स्वरूपाला) शरण जायचं का, हा खरा प्रश्न आहे. भौतिक अडचणी किंवा संकटं येतच असतात आणि त्यासाठी परमेश्वराला शरण जाणं कदापि गैर नाही. किंबहुना परमेश्वरालाच शरण गेलं पाहिजे. पण भौतिक अविवेकी लाभासाठी परमेश्वराशीच सौदा मांडणं मात्र गैर आहे. केवळ स्वार्थासाठी त्याचे पाय(?) धरायचे का किंवा त्याच्याशी अशी सौदेबाजी करायची का, याचा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारची स्वार्थी भक्ती पाहून परमेश्वराला किती क्लेश होत असतील! कुणालाही ‘मी’ नको आहे; केवळ माझी कृपा हवी आहे; हे जाणून त्याला काय वाटत असेल? तो सारं निरपेक्ष भावानं मनुष्याचंच जीवन नव्हे; तर सृष्टीचं चक्र चालवतो हे तात्त्विक दृष्टीनं जरी खरं असलं तरी त्याच्याकडे केवळ भोगेच्छा पुरवून घेण्यासाठी जात असू तर हा भाव निदान क्लेशकारक तरी वाटायला हवा. बरं, परमेश्वर आपली माता आहे; त्याच्याकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार, हा भाव जरी गृहित धरला तरी आपले त्या मातेशी खरंच काही पुत्रवत् संबंध प्रस्थापित झाले आहेत का याचाही विचार व्हायला पाहिजे. शिवाय, आपण त्याला भले माता मानू; पण त्यानं आपल्याला पुत्र/पुत्री मानलं पाहिजे ना! त्या मातेची आपण अशी कोणती कामं केली आहेत म्हणून तिनं आपल्याला काही द्यावं? उलट आपल्या बाळांना केव्हा, काय आणि किती द्यायचं असतं ते माताच जाणत असते. खर्‍या बाळांना मातेकडे काही मागायची आवश्यकताच भासत नसते! म्हणून केवळ व्यावहारिक भूमिका घेऊन परमात्म्याकडे कधी जाऊ नये. राक्षस-असुर परमेश्वराकडे अमरत्व मागतात. सामान्य व्यक्ती भौतिक तृप्ती मागतात. पण ज्ञानी भक्त स्वत:च परमेश्वर होऊन जाण्याची इच्छा धरतो. काही काळानं ही इच्छासुद्धा गळून पडते आणि एखादा ज्ञानी आपोआप तत्सम होऊन जातो! त्यासाठी प्रथम त्याचा आणि आपला संबंध जाणून घेतला पाहिजे, तो दृढ केला पाहिजे. मग त्याच्याकडे मागणी तर होणार नाहीच; उलट कृतज्ञता भाव दृढ होऊन भगवंत मातेस्वरूप होऊन जाईल. तोच आपली दखल घेईल. त्याच्याकडे काही मागण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी दृढ श्रद्धा हवी आणि ‘मोक्ष’ या अंतिम पुरुषार्थाची जाणीव व्हायला हवी. जन्मोजन्मींच्या संस्कारातून ती होत असते - होणारच असते. याप्रमाणे कोट्यवधींमधला एखादाच त्याला तत्त्वत: जाणतो. केवढी ही माया परमेश्वरानं रचली असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी! ते ज्ञान इतकं सहज कुणालाही मिळत नाही. ‘कठोपनिषदा’त नचिकेता आणि यम यांचा यासंदर्भात संवाद आहे. वाजश्रवा ऋषींचे पुत्र वाजश्रवस स्वर्गप्राप्तीसाठी ‘विश्वजित’ नामक यज्ञ करत असतात. यज्ञात दान देणं हा मुख्य विधी असतो. वाजश्रवस ऋषी-अध्वर्यूंना दान देताना भाकड गायींचं दान देत असतात. त्यांचा सात्विक वृत्तीचा पुत्र नचिकेता तो प्रकार पहात असतो. तो मनाशी विचार करतो, अशा दानामुळे स्वर्ग तर नाहीच; उलट नरकात जाण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण ना���डत्या गोष्टीचं दान करणं महापाप असतं. नचिकेता विचार करतो, ‘दान हे आवडत्या गोष्टीचंच केलं पाहिजे... मी तर त्यांचा सर्वांत आवडता आहे...’ आपल्या वडिलांजवळ जाऊन तो विचारतो, ‘बाबा, माझं दान तुम्ही कुणाला करणार?’ तो एकसारखी भुणभुण लावतो तेव्हा वाजश्रवस चिडून म्हणतात, ‘मी तुला यमाला देऊन टाकणार आहे!’ ते ऐकून नचिकेता स्वत:च तिथून निघतो आणि यमाकडे जातो. यमाच्या प्रासादापाशी जाताच तिथले रक्षक त्याला अडवतात. तो येण्याचं कारण जाणून घेतात. मग सांगतात की, यमदेव बाहेरगावी गेले आहेत; तीन दिवसांनी परत येतील. नचिकेता त्या प्रासादापाशीच तीन दिवस तसाच उपाशी बसून रहातो. चौथ्या दिवशी यमराज येतात तेव्हा द्वारपालांकडून त्यांना सारी हकीगत समजते. एक ब्राह्मण-ऋषिपुत्र तीन दिवस आपल्या दाराशी उपाशी थांबून आहे. ब्रह्मपुत्राला उपाशी ठेवल्यामुळे आपला सर्वनाश होऊ शकतो; महापाप लागू शकतं. त्या पापातून सुटका करून घेण्यासाठी यमराज नचिकेताला तीन वर देतो. पहिला वर मागताना नचिकेता म्हणतो, ‘यमराज, माझ्या पित्याचा माझ्यावरचा राग शांत होऊन ते माझं प्रेमानं स्वागत करतील असा मला वर द्या.’ यमराज त्वरित तसा वर देतात. त्याच वेळी त्यांना नचिकेत्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटतं. कारण वडिलांनी त्याचं प्रेमानं स्वागत करणं म्हणजे यमाच्या कचाट्यातून त्यानं सुखरूप परत जाणं! दुसरा वर मागताना नचिकेता म्हणतो, ‘स्वर्गाची प्राप्ती अग्नीमुळे होते. यमराजांची तिथे सत्ता चालत नाही. त्या अग्नीच्या साधनेचं स्वरूप, ज्ञान आणि विनियोग क्रिया यांचं ज्ञान मला द्या.’ लगेच यमराज त्याला अग्निविद्या देतात. मग नचिकेता तिसरा वर मागतो, ‘मृत्युपश्चात जीवन, जीव, ब्रह्म यांचा संबंध आणि आत्मज्ञानाचे उपाय मला सांगा!’ ते ऐकून यमराज म्हणतात, ‘तू दुसरं काहीही माग; पण मृत्यूचं ज्ञान मागू नकोस.’ पण नचिकेता हटून बसतो. तेव्हा यमराज म्हणातात, ‘मी तुला त्रैलोक्याची संपत्ती, राज्य, दैवी उपभोग, अप्सरा, रथ, गायन-वादन साधनं, शतायुषी पुत्र, हत्ती, गोधन, सोनं-नाणं - सारं सारं काही देतो. पण मृत्युपश्चात ज्ञानाचा आग्रह धरू नकोस.’ नचिकेता म्हणतो, ‘यमराज, ज्या अर्थी तुम्ही मला मृत्युपश्चात ज्ञानाच्या बदल्यात एवढी मोठी संपत्ती देऊ इच्छिता त्या अर्थी या ज्ञानाचं मोल त्यापेक्षा नक्कीच अधिक आहे. आता तर मला तेच ज्ञान हवं!’ नचिकेत्याची अढळ वृत्ती पाहून अखेर यमराजांना ते ज्ञान नचिकेताला द्यावं लागतं. या त्याच्या दृढ वृत्तीलाच ‘नचिकेता वृत्ती’ म्हणतात. थोडक्यात परमतत्त्वाचं ज्ञान इतकं सहज कुणाला मिळत नाही. ज्ञानाच्या बदल्यात एखाद्या सामान्य व्यक्तीनं नक्कीच भोगांना प्राधान्य दिलं असतं. कारण सामान्य व्यक्ती सहसा या मायेतून सुटू शकत नाही. दुर्योधनानं कृष्णाकडे सैन्याचीच मागणी केली आणि अर्जुनानं कृष्णाची! मृत्युपश्चात जीवनाचं ज्ञान जर इतकं दुर्लभ आहे तर परमेश्वराला जाणून घेणं किती कठीण असेल! विज्ञान, बुद्धी, विचार, प्रतिभा यापलीकडचं ते ज्ञान आहे. कोट्यवधी लोकांमधला एखादाच त्याला तत्त्वत: - in principle - जाणू शकतो. सारांश: आत्यंतिक प्रेमासक्तीनं परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न करणार्‍या हजारोंमधील कदाचित आपणच ‘एखादे’ ठरू आणि त्याला तत्त्वत: जाणू! * * *www.rajendrakher.nethttps://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/knowledge-of-the-supreme-is-extremely-rare.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.  [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  अध्याय सातवा --*--ज्ञानविज्ञानयोग * श्रीभगवानुवाच ---*---मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥7/1॥ ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत:। यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥7/2॥ अर्थ: (श्री भगवान म्हणाले) हे पार्था, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, माझाच आश्रय करून कर्मयोग आचरीत असता तुला माझं ज्याप्रकारानं अथवा ज्या विधीनं पूर्ण आणि नि:संशय ज्ञान होईल ते ऐक. विज्ञानासहित हे ज्ञान काही शेष न ठेवता मी तुला सांगतो; जे जाणल्यानं या लोकी पुन्हा दुसरं काहीही जाणायचं शिल्लक रहात नाही. * पहिल्या सहा अध्यायात इंद्रियनिग्रह करून काम-क्रोधादी शत्रूंना ठार मारावं हे सांगितलं आहे. त्यामुळे परमेश्वर सर्व भूतांमध्ये (जीवांमध्ये) आणि सर्व भूतं परमेश्वरामध्ये समाविष्ट असल्याचं आकलन होतं. हे ज्ञान-विज्ञान जाणल्यानंतर परमेश्वराचं पूर्ण ज्ञान होऊनही कर्मं न सोडता कोणत्या विधींनी मोक्ष मिळतो हे आता पुढल्या सहा अध्यायांमधून भगवंतांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच पहिल्या सहा अध्यायात ‘त्वम्’ पदार्थाचा स्वधर्म सांगितला. जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा नाही; म्हणून तू आत्मप्रत्ययवान् हो, असा अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला. ही गोष्ट प्रत्यक्षात कशी आणायची? ‘त्वम्’चं शुद्धीकरण कसं करायचं, हे आता भगवान विशद करून सांगत आहेत:- ‘माझ्यामध्ये चित्त एकाग्र कर. माझा आश्रय घे. माझं ध्यान कर.’ आता ध्यान तरी परमेश्वराच्या कोणत्या स्वरूपाचं करायचं, हा प्रश्न उपस्थित होतो. भगवंत सांगतात, जसा जीवाचा अधिकार किंवा योग्यता तसा त्याचा परमेश्वर! इंद्रियांना महत्त्व देत असू तर देवही तसाच असेल. प्राणाला महत्त्व देणं ही त्याच्या पुढची पायरी. त्यानंतर मन येतं. मग आत्मस्वरूपाचं ध्यान. म्हणजेच ‘आत्माराम’ ही अंतिम स्थिती होय. आपली ईश्वराविषयीची जशी कल्पना असेल त्याप्रमाणे ईश्वर लहान-मोठा होतो. परंतु; हा प्रवास देखील परमतत्त्वाच्या दिशेनंच होत असतो. वाटेत असे थांबे येणारच असतात. प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका लहानवयात सर्वश्रेष्ठ-ज्ञानी वाटत असतात. मग आजोबा-काका-मामा ज्ञानी वाटतात. पण बालक जसा जसा मोठा होत जातो तसतशी त्याची मतं आणि आदर्श बदलत जातात. अनुभवानं त्याची समज बदलत जाते. पूर्वीचे समज तोच खोटे ठरवतो. आधी मूर्तीतला परमेश्वर खरा वाटतो. मग गुरू सर्वश्रेष्ठ वाटतो. जसजशी समज प्रगल्भ होत जाते तसतसा जीव देहांतर्गत तत्त्वाकडे आकृष्ट व्हायला लागतो. विचारशक्ती आणि कल्पानाशक्ती जसजशी प्रगल्भ होत जाते आणि या शक्तींना जेव्हा प्रतिभेचा स्पर्श होतो तेव्हा परमात्म्याविषयीची समजही उन्नत होत जाते. आता भगवान ज्ञान-विज्ञानाविषयी सांगणार आहेत. त्यानंतर जाणायचं काही शेष उरणार नाही, अशी ते अर्जुनाला ग्वाही देत आहेत. हे ज्ञान म्हणजे शाळेतल्या धड्यातला अभ्यास नाही! म्हणूनच त्यांनी पृथकत्वानं अनेक विषय समजावलेले नाहीत. उदा. विश्वात किती ग्रहगोल आहेत, किती प्रकारची रसायनं-संयुगं-प्राणी आहेत असं त्यांनी सांगितलेलं नाही. पण (भ्रमामुळे) पृथकत्वानं दिसणार्‍या या सृष्टीमागे कोणतं तत्त्व आहे, ते कसं आहे यावर त्यांनी भर दिला आहे. योगस्थ होऊन ईश्वराची अपरोक्षानुभूती (direct experience) घेणं हेच ज्ञान-विज्ञान. द्वापारयुगात उज्जयिनीमध्ये शिखिध्वज नावाचा मोठा राजा होऊन गेला. हा राजा सर्वगुणसंपन्न होता. चूडाला नावाच्या एका सर्वगुणसंपन्न अशा सुंदर कन्येशी त्याचा विवाह झाला. अनेक वर्षं दोघांनी जीवनाचा यथेच्छ उपभोग घेतला. यथावकाश राजाला विरक्ती आली. सर्वसंगपरित्याग करून तो तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. राजप्रासादात असतानाच चूडालाही विरक्ती झाली. तिला आत्मतत्त्वाची ओळख पटली. ज्ञान हेच परमश्रेष्ठ आहे, हे तिला कळून चुकलं. तीसुद्धा मग अरण्यात गेली. राजाला भेटण्यापूर्वी तिनं एका ब्रह्मकुमाराचं रूप धारण केलं. मग तपाचरण करणार्‍या राजाला भेटून तिनं त्याला एक गोष्ट सांगितली:- विंध्यपर्वतात एक मोठा हत्ती होता. एके दिवशी त्याला एका शिकार्‍यानं सापळा रचून लोखंडी जाळ्यात पकडलं. पण हत्तीनं त्या शिकार्‍याला काही कळायच्या आत ते जाळं आपल्या दोन मजबूत दातांनी तोडून टाकलं. ते समजताच तो शिकारी झाडावर चढून बसला. पुन्हा उठून हत्ती त्या झाडाखालून जाऊ लागताच त्यानं हत्तीच्या डोक्यावर उडी मारली. पण त्याचा अंदाज चुकला आणि तो खाली पडला. ते पाहून हत्तीला त्याची दया आली. त्याला इजा न करता तो पुढे निघून गेला. असं असूनही शिकार्‍यानं त्या हत्तीला पुन्हा पकडण्यासाठी एक खड्डा खणला. वर गवत अंथरून खड्डा झाकून टाकला. पुन्हा जेव्हा हत्ती तिथे आला तेव्हा तो बरोबर त्या खड्ड्यात पडला - अडकला; कमालीचा दु:खी झाला... चूडालेनं राजाला या गोष्टीचं तात्पर्य सांगताना म्हटलं, ‘राजा, या गोष्टीतला हत्ती तू आहेस. हत्तीला पकडणारा शिकारी म्हणजे अज्ञान होय. अज्ञानानंच तुला आशा-पाशाच्या लोखंडी जाळ्यात अडकवलं. पण विवेक आणि वैराग्य या दोन दातांनी तू आशारूपी जाळं तोडून टाकलंस; आणि तेच अज्ञान पुन्हा तुझ्यावर झडप मारत असताना ते खाली पडलं. परंतु; त्या अज्ञानाला त्यागरूपी खड्गानं मारून न टाकता तू त्याला सोडून दिलंस. त्यामुळे ते पुन्हा उठलं आणि आपल्या पराभवाची आठवण ठेवून त्यानं तुला या तमोरूपी खड्ड्यात पुन्हा डांबून ठेवलं. राजा, या अज्ञानरूपी खड्ड्यातून तू बाहेर ये आणि अज्ञानरूपी शत्रूच्या नाशासाठी पुन्हा चिकाटीनं प्रयत्न कर!’ राजानं चूडालेला ओळखलं. त्याच्यासाठी ती नवी ओळख होती. तिच्या उपदेशाचा त्याला तेव्हाच अर्थबोध झाला. दु:ख हे अज्ञानात असतं; आणि सुख हे ज्ञानात असतं, हे त्याला समजून चुकलं. अज्ञानरूपी सुख हे नाशवंत असतं तर; ज्ञानरूपी आनंद हा चिरंतन टिकणारा असतो. कारण त्या ज्ञानात शुष्कता नसून भावमयताही सामावलेली असते. परमात्मा असा ज्ञानगम्य आहे. आपण कोणत्या चष्म्यातून त्याच्याकडे बघतो हा खरा प्रश्न आहे. आपण जर अंतर्गोल काचेतून एखादी वस्तू बघत असू तर ती छोटी दिसेल आणि जर बहिर्गोल काचेतून बघत असू तर ती मोठी दिसेल. म्हणून आपण आपली विचारशक्ती किंवा कल्पनाशक्ती जर उच्च पातळीवर नेली तर भगवंताचं स्वरूपही भव्य-उदात्त आणि उच्चतम् बनेल. मी-तो हा भेदच उरणार नाही. सारांश: भगवान म्हणतात की, हे ज्ञान एकदा प्राप्त झालं की काहीही जाणून घ्यायचं शिल्लक रहात नाही. परमेश्वरज्ञानाचंच समष्टीरूप म्हणजे ज्ञान आणि व्यष्टिरूप म्हणजे विज्ञान. म्हणजे अनेकाचं एकत्व म्हणजे परमात्मा आणि सृष्टीचं पृथक् पृथक् रूप म्हणजे विज्ञान. जे पिंडी तेच ब्रह्मांडी; जे ब्रह्मांडी तेच पिंडी. सागरजल जरी मडक्यात भरलं तरी त्यात आणि सागरजलात भिन्नत्त्व येत नाही. * * *www.rajendrakher.netFor books:- https://www.instamojo.com/vihangpublications/For eBook: https://www.amazon.in/Geetambari-Marathi-novel-Bhagavad-Gita-ebook/dp/B081K54VRX
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/%20knowledge-of-Paramatman-depends-on-ones-perception%20.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.  Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिक:। कर्मिभ्यश्वाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥6/46॥ योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना । श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मत: ॥6/47॥ अर्थ: तपस्वी (हठयोगी) लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानी पुरुषांपेक्षाही तो (योगी) श्रेष्ठ आणि कर्मठांपेक्षा देखील (त्याला) श्रेष्ठ मानतात. म्हणून हे अर्जुना तूकर्मयोगी हो. (कर्मत्याग न करता कर्मतत्पर हो.) तथापि, सर्व योग्यांमध्येही जो माझ्या (परमेश्वराच्या) ठिकाणी अंत:करण ठेवून श्रद्धेनं मला भजतो त्यालाच मी अत्यंत श्रेष्ठ योगी समजतो. *अरण्यामध्ये जाऊन हठयोगाचं आचरण करणारे तपस्वी, ज्ञानी म्हणजे सांख्यमार्गानं कर्मांचा त्याग करून सिद्धी मिळवणारे सांख्यनिष्ठ, कर्मी म्हणजे नुसती काम्य कर्मं करणारे प्रसादी आणि स्वर्गादी फलांची अपेक्षा करणारे कर्मठ मीमांसक, या सार्‍यांना त्यांच्या मार्गानं काही सिद्धी मिळतातच; परंतु भगवंत सांगतात, या सार्‍यांपेक्षा कर्मयोग्याचा कर्मयोग हाच मार्ग श्रेष्ठ आहे. योगस्थ होऊन तू कर्मं कर; कर्मयोग श्रेष्ठ असल्यामुळे तू कर्मयोगी हो असं भगवंत म्हणतात. कित्येक लोक तपस्वी असतात तर कित्येक ज्ञानमार्गी असतात. कित्येक तपस्वींना सिद्धी प्राप्त झाल्या असतात. सिद्धी मिळाल्या म्हणजे ती व्यक्ती ब्रह्मज्ञानी झाली अथवा खरी योगी झाली असं होत नाही. Autobiography of Yogi या योगी योगानंद लिखित आत्मचरित्रात ‘पर्फ्यूम सेंट’ नामक एका सिद्धाचा प्रसंग योगानंदांनी वर्णन केला आहे. तो सिद्ध हवा त��� सुवास त्याच्या शरीरातून निर्माण करायचा. योगानंदांनी त्याच्या या सिद्धींचं कौतुक केलं. तेव्हा तो म्हणाला, ‘ही सिद्धी मिळवण्यासाठी मी तीस वर्षं साधना केली आहे!’ योगानंदांनी विचारलं, ‘मग तुम्हाला देवदर्शन झालंच असेल!’ तेव्हा काहीसं खजिल होत तो सिद्ध म्हणाला, ‘सिद्धी प्राप्त करताना मी कधी देवाचा विचारच केला नाही!’ थोडक्यात त्या योग्याला जरी एक सिद्धी मिळाली होती तरी परमात्मस्वरूप मुळीच समजलेलं नव्हतं हेच सिद्ध होतं. त्यामुळे तप आणि ज्ञान जर ‘योगा’नं (‘योग’ म्हणजे परमतत्त्वाशी जोडलं जाण्याचा भावपूर्ण अभ्यास) भरलेलं असेल तरच तो खरा ‘योग’ होतो; केवळ सिद्धी मिळून योगी होता येत नाही. उलट सिद्धी म्हणजे परमतत्त्वाकडे जाणार्‍या मार्गातले सापळे असतात. त्यात अडकलं की पुढचा प्रवास खंडित होतो. सिद्ध व्यक्ती भरकटू शकते. तिचा संप्रदायही होतो; पण ती परमेश्वरापासून मात्र दुरावते. म्हणून कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम जर झाला तरच खरा योग साधला जातो. जो खरा भक्त असतो त्याच्यामध्ये हा त्रिवेणी संगम संभवतो. खरा भक्त हा कर्मयोगीच असतो. कारण तो ईश्वरार्पण बुद्धीनं अहंभाव त्यागून कर्म करतो. संसार त्यागून तो रानावनात भटकत बसत नाही किंवा स्व-प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. भगवान जाणून घेण्याची समज असणं हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. भगवंत हा सर्वव्यापक आहे आणि त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली आहे, हे ज्ञान कर्मयोग्याला असतं. समर्पित वृत्तीनं तो जीवन जगत असतो. केवळ लोकसंग्रहार्थ तो कर्मं करतो. गृहिणी जेव्हा स्वयंपाक सिद्ध करते तेव्हा घरच्या मंडळींनी आणि पाहुणे-मंडळींनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यावा हा त्यामागाचा हेतू असतो. त्यामुळे अन्नामधे खडे येऊ नयेत यासाठी ती धान्य निवडते. भाजीपाला नीट धुवून घेते. स्वच्छता सांभाळते. हा झाला ‘भक्तिभाव’. पदार्थ कसे बनवायचे, भाजीमध्ये तिखट, मीठ किती घालायचं, पोळ्या कशा करायच्या हे माहीत असणं म्हणजे ‘ज्ञानयोग’ आणि प्रत्यक्ष भावपूर्ण अंत:करणानं पाकसिद्धी करणं, गॅसवर भांडी चढवून त्यात पदार्थ करणं हा झाला ‘कर्मयोग!’ म्हणजे, एखादी व्याख्या माहीत असणं वेगळं आणि त्या व्याख्येनुरूप कर्म करणं वेगळं! प्रेमाची व्याख्या माहीत असणं वेगळं; आणि प्रत्यक्ष प्रेम करणं वेगळं! असा दोहोंमधे भेद आहे. स्वत: ज्ञान मिळवणं आणि मिळालेलं ज्ञान समाजालाही करून देण्यासाठी निष्काम बुद्धीनं कर्म करणं यामधे असं ज्ञानसिंचन करणारा कर्मयोगी केव्हाही श्रेष्ठ ठरतो. कर्मामध्ये भक्ती मिसळली म्हणजे दुधात साखर घातल्यावर जशी गोडी येते तशी गोडी कर्मयोगातही येते. असाच कर्मयोगी भक्त भगवंताला प्रिय होतो. कर्मयोगी अनेक असतील तर त्यातून कुणाला श्रेष्ठ ठरवायचं असा प्रश्न पडला तर जो भक्तीपूर्वक कर्मयोगाचं आचरण करतो त्याला श्रेष्ठ मानावं, असं भगवान सांगतात. कर्मयोगाला भक्तीची जोड मिळाली म्हणजे सुवर्णाला सुगंध प्राप्त झाल्याप्रमाणेच होतं. गृहस्थाश्रमी पुरुषाला जशी सुयोग्य पत्नीची साथ लाभदायक ठरते त्याप्रमाणे कर्मयोगाला भक्तियोगाची साथ लाभदायक ठरते. केवळ कर्मयोग करून सिद्धी प्राप्त झाली तर शुष्कपणा येण्याचा संभव असतो, पण भक्तीचा ओलावा त्यात मिसळला तर कर्मयोगातली शुष्कता नाहीशी होते. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ असा यातून अर्थ निघत नाही, तर कर्माला भक्तीची जोड मिळाली पाहिजे असं भगवंतांचं सांगणं आहे. कारण एकदा का सिद्धी प्राप्त झाली, की भक्ताला भक्ती करण्याची गरज भासत नाही. मग अशा अवस्थेत तो भक्ती करणं सोडून देईल. पण भगवंत सांगतात, तू श्रद्धापूर्वक कर्मयोग करताना तुझी भक्ती चालूच ठेव. पुढे काही करायचं उरलं नसलं, काही साध्य करून घ्यायचं नसलं तरी या पूर्णत्वाच्या अवस्थेनंतरही भक्ती सुरू ठेव. श्रद्धेनं माझीच उपासना कर. ध्यान कर. भक्ती ही कृती नसून वृत्ती आहे आणि ही वृत्ती कधी सुटता कामा नये. आतापर्यंत भगवंतांनी जीवाला विकासासाठी अत्यावश्यक असणार्‍या गोष्टी सांगितल्या. ज्याला आत्मविकास साधायचा आहे, त्यानं किंवा ज्याला आत्मस्वरूप जाणून घ्यायचं आहे, त्यानं कर्म, ज्ञान, संन्यास यांचं क्रमश: आचरण केलं पाहिजे. संन्यास म्हणजे केवळ सर्वसंगपरित्याग करून रानावनात वास्तव्य करणं नव्हे! विश्वनिर्मात्याचं सर्वव्यापित्व जाणून विहित कर्म निष्काम बुद्धीनं केलं पाहिजे. विश्वनिर्मात्याचं स्वरूप कसं आहे? नारायणोपनिषदात त्याचं वर्णन आहे:- यच्च किञ्चितजगत्सर्वं दृश्यते श्रूयतेऽ पि वा। अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण: स्थित:॥ परमतत्त्व जाणण्यासाठी शास्त्रशुद्ध मार्गानंच मार्गक्रमणा केली पाहिजे. कर्माचा त्याग न करता प्रथम संकल्पांचा त्याग करावा. मग विषयांचा संन्यास घ्यावा. त्यासाठी ध्यानयोग साधायला हवा. म्हणजे चित्तशुद्धी होऊन आत्मसाक्षात्कार होतो. अर्थात आत्मसाक्षात्कारानंतर श्रेष्ठत्व प्राप्त झालं तरी श्रद्धापूर्वक त्याचं सतत ध्यान केलं पाहिजे. थोडक्यात, परमेश्वरावर आत्यंतिक निष्ठा ठेवून, त्याच्याशी सदा युक्त राहून जीवनव्यवहार साधणारा ‘योगी’ परमेश्वराला अधिक प्रिय असतो. सारांश: जो श्रद्धेनं अंत:करणपूर्वक परमेश्वराला भजतो आणि आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतरही केवळ त्याच्यासाठीच कर्मं करतो तो कर्मयोगी सर्वश्रेष्ठ समजला जातो. सारांश: ज्ञान प्राप्त झाल्यावर हृदयात भक्ती ठेवून योग्यानं लोकसंग्रहार्थ कर्मं केलीच पाहिजेत. कर्मयोगी ही श्रेष्ठतम अवस्था आहे. परमेश्वरासाठी नियत कर्मं करीत राहणं यातच खरा पुरुषार्थ असतो. म्हणून तू कर्मयोगी हो आणि युद्धाचं हे कर्म नि:शंक होऊन कर असं भगवंत अर्जुनाला सांगतात. 6वा अध्याय इथे संपला. पुढचा 7वा अध्याय ‘ज्ञानविज्ञानयोग’ * * *www.rajendrakher.net
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/who-is-the-greatest-yogi-in-the-eyes-of-God.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् । एतद्धि दुर्लभतरंं लोके जन्म यदीदृशम् ॥6/42॥ तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूय: संसिद्धौ कुरुनन्दन ॥6/43॥पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि स: । जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥6/44॥ प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिष: । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥6/45॥  अर्थ: अथवा ज्ञानवान योग्यांच्याच कुळात तो जन्म पावतो. अशातर्‍हेचा हा जन्म या जगामध्ये नि:संशय अति दुर्लभ असतो. हे कुरुनन्दना, त्या ठिकाणी पूर्वजन्मींच्या संस्कारानं युक्त असलेला बुद्धियोग पुन्हा प्राप्त होतो. त्यापुढे तो पुन्हा (पूर्ण) योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो. . . पूर्वजन्मीच्या त्याच्या त्या अभ्यासामुळेच इच्छा नसली तरी तो (पूर्ण सिद्धीकडे) कर्मयोगाकडे ओढला जातो. ज्याला योगाची (नुसती) जिज्ञासा जागृत झाली तोदेखील शब्दब्रह्माच्या (शब्दज्ञानापेक्षा श्रेष्ठ होऊन) पलीकडे जातो. प्रयत्नांनी (योगाभ्यास) उद्योग करता करता पापापासून शुद्ध होत योगी अनेक जन्मांनंतर सिद्धी मिळवून अखेर परमगतीला पोचतो.  *भगवंतांनी इथे पुनर्जन्माचा सिद्धान्तही मांडला आहे आणि पुनर्जन्मात मागील जन्माचे संस्कार कसे चिकटून येतात तेही कथन केेलं आहे. ईश्वरानं बनवलेला हा जणू एक विशाल ‘प्रोग्रॅम’ आहे. त्याचा कार्य-कारणभाव ठरलेला आहे. त्यात कोणीही बदल करू शकत नाही. ‘फेसबुक’ हे मार्क झुकरबर्गनं तयार केलं. एकदा तो ‘कार्यक्रम’ तयार केल्यानंतर सभासद हवे ते फोटो टाकतात, एकमेकांशी बोलतात (chatting) किंवा व्हिडिओज् टाकतात. त्यामध्ये मार्क झुकरबर्ग, निर्माता असूनही, हस्तक्षेप करत नाही. प्रत्येकाला मर्यादित का होईना; फेसबुक वापराचं स्वातंत्र्य असतं. त्याप्रमाणे या वैश्विक कार्यक्रमात प्रत्येक जीवाला विचार आणि कर्मस्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या कर्मानुरूप जीव आपला पुढचा प्रवास ठरवीत असतो. उत्तम लोकात राहून आलेला योगी ‘शुचिश्रीमान’ घराण्याप्रमाणे पुढच्या साधनेसाठी योग्यांच्याही कुळात जन्म पावतो. अशा योग्यांना आपल्या पूर्व कर्मांची स्मृती असावी. म्हणूनच ते योग्यांच्या कुळात जन्म घेऊन पुन्हा विकासार्थच कर्मं करण्यासाठी प्रवृत्त होतात. आत्मा हा अमर असल्यामुळे त्यावर लिंगशरीराद्वारा या जन्मी जे थोडेबहुत संस्कार होतात तेच पुढे कायम राहून हा योगभ्रष्ट झालेला पुरुष पुढील जन्मी पुन्हा त्या स्तरापासून पुढे साधनेला प्रारंभ करतो. म्हणजे कर्मयोगाचं थोडंसं आचरणदेखील वाया जात नाही. पुढील जन्मी मागच्या शिदोरीत भरच टाकली जाते. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध यांचे प्रभाव हे प्रत्येक जीवाला भोगावेच लागतात. क्रियमाण तात्काल भोगलं जाते. संचितात कर्मं जमा होतात. ती प्रारब्धरूपानं भोगली जातात. परंतु; निष्काम कर्मं किंवा थोडाबहुत साधलेला कर्मयोग माणसाला ब्रह्मप्राप्तीच्या दिशेनंच नेत असतो. ही साधना व्यक्तीला पुढील जन्मी कामी येते. तिथून पुढचा अभ्यास सुरू करता येतो. श्रीमंत घराण्यात जन्म झाला तरी योगाभ्यास पुढे चालू राहील असं मात्र निश्चयानं सांगता येत नाही. कारण योगाभ्यासापासून परावृत्त करणारी विषयसुखाची साधनं श्रीमंत कुटुंबात सहज उपलब्ध असतात. त्यामुळे जर आपल्याला उत्तम, शुद्ध आचार-विचाराचं कुल प्राप्त झालं असेल तर विषय-वासनांमागे वेळ न दवडता आपल्या जन्माचा मूळ हेतू ध्यानात घेऊन त्यानुरूप विकासार्थ कर्मं करायला हवीत. त्यासाठी सात्त्विक वृत्तीच्या जनांशी मित्रता ठेवायला हवी. अन्यथा भोगांकडे ओढणारे विषय सहज दाराशी येतात. अखेर प्रत्येक जीव एक ना एका जन्मात ब्रह्मरूप होतोच होतोे. त्याचा कालावधी आपल्या कर्मानुसार ठरत असतो. म्हणून माणसानं या जन्मापासूनच कर्मयोगाला प्रारंभ करायला हवा. आपण जीवनात काहीतरी बनायचं, काही मिळवायचं ठरवतो. पण कालपरत्वे परिस्थितीच अशी येते आणि शरीरांतर्गत संस्कारच आपल्याला अशा वळणावर आणतात की, आपण विकासासाठी कर्मं करायला प्रवृत्त होतो. म्हणजे आपली इच्छा असो वा नसो; आपण आपोआप पूर्णसिद्धीच्या दिशेनं खेचले जातो. आदल्या जन्मात चित्तशुद्धी झाली असेल, तर पुढल्या जन्मात निष्काम कर्म करण्याची बुद्धी होते. पूर्वजन्मी ज्याचा जसा अभ्यास असेल तसा त्याचा ओढा असतो. एखादा केवळ कर्म करत असेल तर त्याचा कर्माकडे ओढा असतो. एखादा ज्ञानसाधना करत असेल तर ज्ञानप्राप्तीकडे किंवा अभ्यासाकडे ओढा असतो. वैदिक यज्ञयागादि काम्य कर्मं श्रद्धेनं केली जातात. वेद म्हणजे सर्व सृष्टीच्या पूर्वी असणारा शब्द अर्थात शब्दब्रह्म होय. शब्दब्रह्म आणि निर्गुण परब्रह्म असे ब्रह्माचे दोन प्रकार आहेत. शब्दब्रह्मापलीकडे म्हणजे मंत्र-तंत्रांद्वारा भोगप्राप्तीसाठी सकाम कर्मं करण्याच्या प्रवृत्तीपलीकडे मनुष्य जातो. शब्दब्रह्मामध्ये प्रगती साधली की आपोआपच मनुष्य निर्गुण ब्रह्माकडे खेचला जातो. लोखंड जसं चुंबकाकडे खेचलं जातं त्याप्रमाणे पूर्वजन्मीचा अभ्यास त्याला शब्दब्रह्माच्या पलीकडे नेतो. स्वल्पारम्भा: क्षेमकरा: या नीतीनं टाकलेलं छोटं पाऊल हे सुद्धा मनुष्याला प्रगतिपथावर नेतं. रहाटगाडगं एकदा सुरू झालं की शेताला पुरेसं पाणी मिळाल्याखेरीज ते थांबवून चालत नाही. त्याप्रमाणे जिज्ञासा निर्माण झाली की सिद्धी प्राप्त होऊन शब्दब्रह्माच्या पलीकडे मनुष्य पोचल्याखेरीज रहात नाही. चित्रपटाचा मध्यंतर झाला म्हणजे चित्रपट संपला असं होत नाही. प्रयत्न जितके अधिक तितकं श्रेय अधिक मिळतं. म्हणूनच योगी प्रत्येक जन्मामध्ये खूप प्रयत्न करतो आणि प्रयत्न करतानाच तो एखाद्या जन्मात पापरहित होऊन जातो. प्रत्येक जन्मामध्ये शुद्ध संस्कार घेत घेत योगी ज्ञानी बनतो. त्या योगसिद्धीच्या बळावर तो परमगतीला पोचतो. सारांश: गतजन्मीच्या कर्मानुसार किंवा अभ्यासानुसार मनुष्याला इच्छा नसली तरी पूर्णत्वाच्या दिशेनं तो ओढला जातो. (निष्काम) योगाची इच्छा झाली तरी तो शब्दबंबाळाच्या पलीकडे जातो. प्रयत्नानं अनेक जन्मांनंतर माणसाचं पाप नष्ट होतं. तो शुद्ध होऊन परमगतीला पोचतो. . . कर्मयोगाची मागच्या जन्माची आपली शिदोरी बरोबर घेऊन जीव बुद्धिमान लोकांच्या कुळात जन्म पावतो. त्या जन्मात त्याचा योगसिद्धीच्या दिशेनं अजून पुढचा प्रवास सुरू होतो.  *   *   * www.rajendrakher.net
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/the-ultimate-journey-towards-moksha.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती: समा: । शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥॥ अर्थ: तो योगभ्रष्ट पुण्यवानांच्या लोकाला प्राप्त होऊन (तिथे) दीर्घकाल वास केल्यानंतर शुद्धाचरणी आणि वैभवशाली कुलामध्ये पुन्हा जन्म पावतो. * काही कारणपरत्वे योगाभ्यास अर्धवट राहिला, तर असे योगभ्रष्ट मुनी प्रथम थेट उत्तम लोकाला जातात; आणि तिथे दीर्घकाल राहून पुन्हा पृथ्वीवरच्या एखाद्या वैभवशाली पुण्यशील कुलात जन्म घेतात. या सृष्टीत अनेक लोक आहेत. प्रत्येक लोकातल्या जीवाच्या अवस्था वेगळ्या. जे उत्तम लोक असतात तिथले जीव अत्यंत विशुद्ध, तरल, प्रेममय आणि कल्पनातीत सुंदर असतात. रोग, भय, चिंता तिथे नसतात. त्यांना सृष्टीचं ज्ञान असतं. परमेश्वराच्या अस्तित्वाची त्यांना निश्चिती असते. तिथलं आयुर्मान प्रदीर्घकालीन असतं. अशा ठिकाणी दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर योगभ्रष्ट मुनी आपल्या पुढच्या अभ्यासासाठी आणि विकासासाठी पुन्हा पृथ्वीवरच्या पुण्यवान, शुचिश्रीमान कुळात जन्म घेतात. जर मनुष्यानं नुसतं कर्म केलं असेल तर तो ‘श्रीमान’ होतो. त्यांना पैसा मिळतो, श्रीमंती मिळते. ‘शुचिना’ म्हणजे जे पुण्यवान आहेत, शुद्धाचरणी आहेत ते. पण ‘शुचिश्रीमान’ म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर धनसंपदा असूनही जे त्याचा अपव्यय करीत नाहीत असे. स्वत:च्या आणि दुसर्‍यांच्या विकासासाठी ते या देवदत्त संपत्तीचा विनियोग करतात. याउलट जे संपत्तीचा विनियोग स्वत:करताच करतात असे लोक कंजूष वृत्तीचे असतात. त्यांना ‘शुचिश्रीमान’ न म्हणता कवडीचुंबक म्हणावं लागतं. कंजूषवृत्ती ही विकासामध्ये घातक ठरत असते. याउलट मिळालेल्या धनाचा चार लोकांसाठी, चांगल्या कामासाठी विनियोग झाला तर ते कर्म विकासाला पूरक ठरतं. आदल्या जन्मात ज्यांनी भगवंतासाठी कार्य केलं आहे, भगवंताकडे दृष्टी ठेवून विकासासाठी कर्मं केली आहेत, ते या जन्मात ‘शुचिश्रीमान’ म्हणून जन्म घेतात. त्यांना मिळालेलं वैभव ते पवित्र कार्यात वापरतात. त्यामुळे त्यांचं वैभवही शुद्ध आणि पवित्र असतं. जडत्वाकडून तरलतेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. अनावश्यक पुटं गळून पडली म्हणजे उरतं ते शुद्धत्व. एका फ्रेंच शिल्पकारानं म्हटलं आहे, ‘मी शिल्प कोरत नाही; शिल्प��भोवतीचा अनावश्यक भाग तेवढा काढून टाकतो!’ दिव्य लोकांमधे केवळ शुद्धत्वच जाऊ शकतं - निवास करू शकतं. मलिनता तिथे जाऊच शकत नाही. दिव्यलोक हा पुण्यवानांचा लोक (स्तर) असतो. आता प्रश्न उपस्थित होऊ शकतो, की ‘पुण्यवान’ म्हणजे तरी काय? वाममार्गानं धन मिळवून स्व-प्रतिष्ठेसाठी देणग्या दिल्या किंवा स्वार्थी दृष्टिकोनातून लोकांना तीर्थयात्रा घडवल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुण्यवान म्हणता येईल का? (दुसरं वाईट काम करण्यापेक्षा लोकांना तीर्थयात्रा घडवणं चांगलंच!) स्वार्थ आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अनावश्यक क्रिया करून पुण्यवान होता येतं का हाही प्रश्न आहे. तथापि, स्वार्थयुक्त भक्ती हे विकासाच्या मार्गावरील पहिलं पाऊल मात्र म्हणता येईल. भक्ती म्हणजे केवळ कृती नाही; ती समज आहे, असा पू. पांडुरंगशास्त्री सिद्धान्त मांडतात. म्हणजेच पुण्यवान होण्यासाठी वृत्तीत भक्तीविषयीची समज निर्माण झाली पाहिजे. ही समज ‘बुद्धिग्राह्य’ असते. परंतु; केवळ बुद्धीचा पर्याय एकांगी होतो. त्यामुळे बुद्धीसोबत ‘भाववृद्धी’ही झाली पाहिजे. ‘विचार’ हे बुद्धीचं क्षेत्र असतं तर ‘भाव’ हा अंत:करणाचा गुणधर्म असतो. बुद्धीसह भावभक्तीतूनच पुण्यकारक अनन्यभक्ती सिद्ध होते. बुद्धिग्राह्य समज:- विशिष्ट विचारधारेचा प्रभाव, संगत, यश, प्रतिष्ठा, पदव्या किंवा काही कटु अनुभव यांमुळे एखादी व्यक्ती देवाच्या अस्तित्वालाच आव्हान (Challenge) देते. हे आव्हान देताना आपला अभ्यास, अनुभव, पात्रता, व्यासंग यांचा विचार नसतो. ‘मी देवाला मानत नाही’ असं चार लोकांत सांगताना एखाद्या व्यक्तीला प्रतिष्ठाही वाटत असते. पण जेव्हा जीव-जगत-जगदीश, सृष्टिनिर्मिती, विश्वाची विशालता-अनंतता, विश्वातील अनेक स्तर, द्विमितीय सृष्टीपासून (ज्ञात झालेल्या) अकरा मितीय सृष्टीचं स्वरूप, सृष्टीचं सौंदर्य, मनाचे कप्पे आणि मनोव्यापार, प्राणांचं स्वरूप, त्रिगुणात्मक प्रकृती, शरीरांतर्गत अगम्य रासायनिक क्रिया, मेंदूचं (3% ज्ञात) स्वरूप, जन्म-मृत्यूचं रहस्य, कालाची परिमाणं इत्यादी विचार जेव्हा व्यक्ती करू लागते तेव्हा विश्व व्यापून उरलेल्या महान शक्तीविषयी समज बुद्धीत उतरू लागते. विश्व आणि विश्वनिर्मात्याचा विचार करताना एक गोष्ट अनुभवातून व्यक्तीच्या ध्यानात येऊ लागते. ती म्हणजे, आपल्या बुद्धीत हे विश्वत्म-ज्ञान उतरू शकत नाही. कितीही विचार केला तरी बुद्धीच्या मर्यादा उघड पडू लागतात. मग सृष्टीचं हे सर्जन पाहून भाव फुलायला लागतो. किती विशाल, किती बुद्धिमान असेल विश्वनिर्माता, अशी समज बुद्धीत दृढ होऊ लागते. भाववृद्धी:- बाह्य सृष्टीत त्या परमतत्त्वाचं अस्तित्व शोधायला जसजशा मर्यादा पडू लागतात तसतशी व्यक्ती अंतर्मुख होऊ लागते. विश्वव्यापक तत्त्व आपल्या छोट्याशा शरीरातही वास्तव्य करून आहे, याची जाणीव होऊ लागते. मग भाव वृद्धिंगत होऊ लागतो. पण ते तत्त्व जाणण्याची प्रक्रिया सोपी मात्र खासच नसते. कारण इंद्रियातीत तत्त्वं डोळ्यांना दिसू शकत नाहीत. जे दिसतं त्याविषयी मन प्रतिसाद देत असतं आणि बुद्धी निर्णय करत असते. जे जे बाह्यत: दिसतं, ऐकलं जातं त्यानुरूप आपल्या अंत:करणात सकारात्म अथवा नकारात्मक पडसाद उमटतात. चित्रपटात एखाद्या लहान मुलाला मारताना बघितलं की आपलं अंत:करण कळवळतं. म्हणजे जे दृश्य आपण पाहतो त्यावर अंत:करणातूनच प्रतिसाद दिला जात असतो. इथेच मूर्तिपूजेला प्रारंभ होतो. विश्वव्यापक परमेश्वर जरी अव्यापक मूर्तीत नसला तरी आपल्या डोळ्यांसाठी - उपासनेसाठी परमेश्वराच्या अशाच सुंदर मूर्तीची आवश्यकता असते. निर्विकल्प समाधीत रमणार्‍या योग्यांसाठी अशा मूर्तस्वरूपाची आवश्यकता नसते; मात्र सामान्यांसाठी त्याची नितांत आवश्यकता भासते. ईश्वराच्या अशा सुंदर सजवलेल्या मूर्तीची पूजा-अर्चना करून, उपासना करून अथवा ध्यान करून अंत:करणात भाववृद्धी होऊ लागते. निसर्गामधेही परमतत्त्वाचं दर्शन होऊ लागतं. ही भाववृद्धी अंत:करण शुद्ध करू लागते. शुद्ध अंत:करणाला तसाच दैवी प्रतिसाद मिळू लागतो. मग असा ‘भक्त’ जाणीवपूर्व अथवा समजपूर्वक स्व-विकासार्थ कर्म करू लागतो. त्या कर्मात वासना नसते, मागणी किंवा शुष्कताही नसते. किंबहुना भावानं भक्ताच्या अंत:करणात ओलावा निर्माण होऊ लागतो. निष्काम वृत्तीनं असा भक्त कर्मयोगाचं आचरण करू लागतो. अशी बुद्धीसहित श्रद्धाभावानं केलेली कर्मं ही पुण्यस्वरूप असतात. व्यक्ती जेव्हा अशी पुण्यस्वरूप कर्मं करू लागते तेव्हा ती विकसित होत जाते. मृत्युपश्चात असे उन्नत जीव मग पुण्यवानांच्याच स्तराला प्राप्त होतात. त्या स्तरावर ते दीर्घकाल आत्मज्ञानात्मक पुण्यकर्मातच विकास पावत जातात आणि मग पुढील वेगवान विकासासाठी पुन्हा पृथ्वीवरच्या एखाद्या शुद्धाचरणी वैभवशाली कुटुंबात जन्म घेतात. कारण पृथ्वीवर सतत उद्भवणार्‍या आव्हानांना समर्थपणे आणि ईश्वरनिष्�� भावातून दृढतेनं तोंड देण्यात व्यक्तीचा अधिक विकास होत जातो. वेगवान विकासासाठी पृथ्वीस्तरच योग्य असतो. हा श्लोक खूप गहन आहे. पण या भगवद्वचनावर पराकोटीचा विश्वास ठेवून शुद्ध-निष्काम कर्मं प्रारंभित केली पाहिजेत. प्रत्येक कर्म जणीवपूर्वक शुद्ध आणि स्वविकासार्थ होत आहे किंवा नाही याचं भान ठेवायला हवं. प्रत्येक जन्मातली अशी साधना उत्तरोत्तर विकासासाठी कारणीभूत होते आणि अखेरीला उत्तम गती प्राप्त करून देते. आदल्या जन्मातली अर्धवट साधना अशातर्‍हेनं व्यर्थ जात नाही; आणि त्यामुळे प्रत्येक पुढला जन्म हा श्रेष्ठ जन्म येतो.  सारांश: ज्यामुळे जन्माचं सार्थक होईल असं कर्म हातून घडायला हवं. निष्काम कर्मयोगी विकासार्थ कर्म करून उत्तम लोक प्राप्त करून घेतो. तिथे दीर्घ काल राहून पृथ्वीवरच्या शुचिश्रीमान घरात आणखी विकासासाठी जन्म घेतो. * * *www.rajendrakher.nethttps://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/pure-deeds-lead-man-to-the-world-of-virtue.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥6/40॥ अर्थ: हे पार्था, इहलोकी काय किंवा परलोकी काय अशा पुरुषाचा कधीच विनाश होत नाही. कारण कल्याणकारक कर्मं करणार्‍या कोणत्याही पुरुषास बाबा रे दुर्गती मिळत नाही. * श्लोक 37, 38 आणि 39मध्ये अर्जुन विचारतो, ‘कृष्णा, मन श्रद्धायुक्त होऊनही ज्याचं मन साम्ययोगापासून ढळलं आहे अशी व्यक्ती योगाचरण अपूर्ण राहिल्यामुळे कोणत्या गतीला जाते? म्हणजेच योगाभ्यास करत असताना मध्येच जर मृत्यू आला तर केलेला अभ्यास किंवा कष्ट फुकट जातात का? श्रद्धा असूनही प्रकृतीमुळे हातून पुरेसा प्रयत्न किंवा संयमन झालं नाही तर अशा वेळेस मन योगाभ्यासातून चलित होतं. मग अशा (अ-यति) व्यक्तीला कोणती गती मिळते? काम्यबुद्धीनं कर्म न केल्यामुळे स्वर्गादी फळही नाही आणि साम्यबुद्धी पूर्णत्वास न आल्यामुळे मोक्षही नाही अशी (‘न घर का ना घाटका’) स्थिती होते का? आपणच माझ्या संशयांचं निरसन करू शकता.’  अशा तर्‍हेचे प्रश्न अर्जुनाच्या मनात उपस्थित होतात. बंदुकीतून एखादी गोळी फुसकी निघते, किंवा फटाक्यांमधला एखादा बार फुसका ठरतो तशी ही अर्धवट साधना फुसका बार तर होणार नाही ना? फुटलेल्या ढगाप्रमाणे असा पुरुष मधल्यामध्ये नाश तर पावत नाही ना? अर्जुनाच्या या शंकांचं निरसन करताना भगवंत त्याला आश्वासन देतात की, इहलोकी किंवा परलोकी अशा पुरुषाचा कधीच विनाश होत नाही. जो कल्याणकारक (दैवी) कर्मं करतो त्याला कधीही दुर्गती प्राप्त होत नाही. सामान्य माणूस आयुष्याच्या मध्यावर साधनेला सुरुवात करतो. परंतु; मध्येच त्याला वाटतं की, आता काय आपल्या आयुष्याची पंधरा-वीस वर्षंच उरली आहेत. एवढ्या थोड्या कालावधीत काही हे ज्ञान अभ्यासानं संपादन करता येणार नाही. असा विचार करून ती व्यक्ती अभ्यास सोडून देते. कामही सोडून देते. आज नाही तर उद्या करू, या जन्मात नाही होणार; पुढच्या जन्मात बघू, अशी त्या व्यक्तीची विचारसरणी होते. त्यावर हे उत्तर आहे. कर्मं जर कल्याणकारक असतील तर मृत्यूमुळे त्यांचा विनाश होत नाही. पुढल्या जन्मात त्याचं कर्मफल प्राप्त होतं. म्हणजे नव्या जन्मात कर्माचा पुन्हा ‘श्रीगणेशा’ करावा लागत नाही. मागील पानावरून पुढील पानावर कर्म ओढलं जातं. भगवान सांगतात, अर्जुना! तू फक्त कामाला लाग. पुढचं सर्व मी पाहीन. आपल्या बचत खात्यामध्ये (saving bank account) जी रक्कम शिल्लक असते ती प्रत्येक वर्षी आपल्या खात्यात पुढे (Carry forward) ओढली जाते. प्रत्येक वर्षी आपल्याला आपलं खातं नव्यानं उघडावं लागत नाही - खातं renew करावं लागत नाही. त्याप्रमाणे आपलं कर्म किंवा अभ्यास हा प्रत्येक जन्मात पुढे ओढला जातो - Carry forward केला जातो. नव्यानं कर्माचं किंवा अभ्यासाचं खातं प्रत्येक जन्मात उघडावं लागत नाही. सृष्टिकर्त्यानं रचलेला हा एक अतिविशाल वैश्विक खेळ आहे. कर्म, कर्माचे भोग, ते भोगण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा जन्म, जीवाचा विकास, त्यानुरूप वरच्या श्रेष्ठ स्तरांवर जन्म, कर्म निकृष्ट झालं तर अधोगती अर्थात निम्न स्तरांवर जन्म, पुन्हा विकास, पुन्हा कर्म, कर्मानुरूप पुन्हा जन्म हा खेळ अव्याहत सुरू आहे. या खेळात कर्म कायम बरोबर असतं. कर्माचं हे फोल्डर नाश पावत नाही. अन्नमय शरीराचा त्याग केल्यानंतरही ते फोल्डर अर्धजाणीवयुक्त मनाला चिकटूनच असतं आणि पुढील जन्मात त्यातल्या फाइल्स् पुन्हा उघडल्या जातात. मागील जन्मात जेवढा विकास झाला असेल त्यापुढे व्यक्ती आणखी विकसित होत जाते. ‘अहं ब्रह्मास्मि’ची आत्मानुभूती होणं ही विकासाची अंतिम पायरी असते. दुर्लक्षित झालेला किंवा मुद्दाम दुर्लक्षित केला गेलेला महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला म्हणतो, 'My brain is only a receiver, in the universe there is a core from which we obtain knowledge, strength and inspiration. I have not penetrated into the secrets of this core, but I know that it exist.' (माझा मेंदू केवळ रिसिव्हर आहे. विश्वात एकमात्र हिरण्यगर्भ आहे जिथून आपल्याला ज्ञान, बल, आणि प्रेरणा मिळत असते. मी त्या रहस्यापर्यंत पोचलेलो नाही; पण मला माहीत आहे, की त्याचं अस्तित्व आहे.) टेस्लाचं असंही म्हणणं होतं की, आपण या विश्वात एकटे नाही. अनेक स्तरांवर जीव-जमाती आहेत. 20 जुलै 1931 मध्ये ‘टाइम’ मॅग्झिनला दिलेल्या दुर्मिळ मुलाखतीत टेस्ला म्हणतो, आपल्यासारखेच या संपूर्ण विश्वातल्या अनेक स्तरांवर जीव आहेत. तेही सुखदु:खांचा अनुभव घेत असतात. भगवान त्याचाच निर्देश करून आणखी पुढे जाऊन सांगतात की, जीवाबरोबर गेलेलं कर्म पुढील जन्मी कामी येतं. कल्याणकारी कर्मं केली तर ती सुद्धा नाश पावत नाहीत. पुढील जन्मी ती कामी येतात. मृत्यूनंतरच्या अस्तित्वावर आता अनेक वैज्ञानिकांचा, डॉक्टर्सचा आणि अनुभवी सामान्य जनांचा विश्वास आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरा तर पुनर्जन्म, स्वर्ग-पाताळस्तर मानतेच. उन्नत स्तर प्राप्त करण्याचा तात्त्विक-आध्यात्मिक मार्गही सांगते. एवढंच नाही तर अंतिम मोक्षाच्या स्थानाचाही ती निर्देश करते. अविश्वास न दाखवता आपण भग���ंतांना अपेक्षित शुद्ध कर्म केलं पाहिजे. सारांश: मनुष्यानं कल्याणकारक कर्मं करीत रहावीत. त्या कर्माच्या खात्याचा जमा-खर्च भगवंतच ठेवत असतो. त्यामुळे त्याच्यावर विसंबून शुद्ध, सात्विक आणि पर-कल्याणकारी कर्मं करावीत. * * *For hard copy purchase in India:-https://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/the-one-who-does-good-deeds-does-not-destructed.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥6/35॥ असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मति:। वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायत: ॥6/36॥  अर्थ: हे अर्जुना, नि:संशय मन हे चंचल असून निग्रह करण्यात अत्यंत कठीण आहे; परंतु हे कौंतेया, अभ्यासानं आणि वैराग्यानं याचा निग्रह करता येतो. ज्याचं अंत:करण स्वाधीन नाही, त्याला योग प्राप्त होणं कठीण आहे, असं माझं निश्चित मत आहे. पण अंत:करण ताब्यात आणून प्रयत्न करीत गेल्यास उपायानं (हा योग) प्राप्त होणं शक्य आहे. * 33व्या आणि 34व्या श्लोकांत अर्जुन म्हणतो, ‘भगवंता, साम्यबुद्धीनं युक्त असा हा योग तुम्ही सांगितलात खरा; पण मन हे चंचल असल्यामुळे ते साम्य टिकेल, असं मला वाटत नाही. कारण मन हे अतिशय चंचल, उच्छृंखल, अनावर आणि चिवट असल्यामुळे वायूप्रमाणे त्याचा निग्रह करणं अत्यंत दुष्कर आहे, असं मला वाटतं.’ बुद्धीचा सारखेपणा किंवा समत्व यालाच योग म्हणतात. ही कर्मयोगाची व्याख्या भगवंतांनी मागेच सांगितली होती. या आधीच्या श्लोकांमधून त्या साम्ययोगाचं वर्णन भगवंतांनी केलं होतं. त्यावर मनाच्या चंचलपणामुळे साम्यबुद्धीनं प्राप्त होणारा हा कर्मयोग कायम टिकणारा नाही. मनाचा निग्रह करणं हे वार्‍याची मोट बांधण्याप्रमाणे कठीण आहे, असं अर्जुनाला आता वाटत होतं. अर्जुनाची ही शंका मान्य करून भगवान सांगतात, की प्रथम जे दुर्घट दिसतं तेच सवयीनं आणि दीर्घोद्योगानं (निदिध्यासानं) अखेर सिद्ध होतं. (25 आणि 26व्या श्लोकात सांगितल्यानुसार) अभ्यास म्हणजे कोणतीही गोष्ट पुन: पुन्हा करणं तर वैराग्य म्हणजे निरिच्छपणा. यांमुळे चित्तवृत्तींचा निरोध होतो. याचा अर्थ, समाधी साधण्यासाठी नाक धरून आयुष्य अभ्यासातच घालवावं असं भगवंतांना अभिप्रेत नाही. बुद्धीची समता प्राप्त करून घेण्यासाठी साधन म्हणून चित्तनिरोध आणि समाधी यांचं वर्णन केलं आहे. साम्यबुद्धीनं प्राप्त होणारा हा योग (कर्मयोग) मनु-इक्ष्वाकु या परंपरेनं भागवत धर्मातून आलेला आहे; पातंजल योगसूत्रातून घेतलेला नाही. जनकासारख्या महान राजांनी या निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं आहे. असा हा योग अभ्यासानं, वैराग्यानं साध्य होतो. पण ज्याचं अंत:करण आपल्या ताब्यात नाही त्याला हा योग मिळवणं कठीण आहे. पण जर अंत:करण ताब्यात असेल तर प्रयत्नांनी हा योग साध्य होतो. मन चंचल असणं स्वाभाविकच असतं. ते तसं नसलं तर जीवन जगणं अशक्य होऊन जाईल. एकाच गोष्टीचा ते कायम विचार करीत राहिलं तर काय होईल याचा नुसता विचार केलेला बरा! त्यामुळे मनाच्या या गुणाला धक्का न लावता ते स्थिर कसं होईल याचा अभ्यास साधायला हवा. मनाचे दोन कप्पे मानले गेले आहेत. जाणीवयुक्त मन (Concious mind) आणि अर्धजाणीवयुक्त (Sub-conscious mind) मन. (मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइडनं मनाचे हे दोन कप्पे सांगितले तर गौडपादाचार्य यांनी मनाचे चार कप्पे सांगितले आहेत.) जाणीवयुक्त मन हे बाह्य विश्वात रमलेलं असतं; तर अर्धजाणीवयुक्त मन जन्मोजन्मींचा कर्मांचा आणि अनुभवांचा भार वाहत असतं. हिमखंडाचा 1/8 भाग जसा पाण्याखाली अव्यक्त झालेला असतो त्याप्रमाणे हे विशाल मन अव्यक्त असतं. वैश्विक मनाशी त्याचा नित्य संपर्क असतो. त्यामुळे बाह्य मनाला स्थिर करताना त्याचा ‘योग’ या अंतर्मनाशी झाला पाहिजे. या प्रक्रियेत बाह्य मनावर योग्य ते संस्कार केले गेले पाहिजेत. अकारण धावणार्‍या मनाला हळू हळू ताब्यात आणणं जमलं पाहिजे. त्यासाठी बाह्य पदार्थांविषयी असणारी आसक्ती प्रथम कमी केली पाहिजे. वासनांवर ताबा मिळवला पाहिजे. इथे भगवान वैराग्य आणायला सांगत आहेत. वैराग्याशिवाय मन स्थिर होणं शक्य नाही. वैराग्य म्हणजे सारं काही सोडणं नव्हे. वैराग्य ‘विषयां’विषयी आलं पाहिजे - पदार्थांविषयी नाही. याचा अर्थ विरागी वृत्तीनं दारू प्यावी किंवा निरपेक्षभावानं चोराला चोरी करण्यात मदत करावी असा मात्र होत नाही. आपण काय करतो, काय खातो, कुणाशी संगत करतो, कोणते संस्कार उचलतो याचाही विचार झाला पाहिजे. त्यालाच ‘सारासार विवेक’ म्हणतात. शेगावच्या गजानन महाराजांनी त्याचं उदाहरण दाखवून दिलं आहे. जेवताना मीठ-लिंबूसह सारे पदार्थ त्यांनी एकत्र केले आणि अन्नग्रहण करून शरीरधर्म पाळला. याचा अर्थ असा की, त्यांनी भोजन करणं टाळलं नाही तर भोजनाला ‘विषय’ बनवलं नाही - आवडीच-नावडीचं ठरवलं नाही. जीवनातील भोग भोगत असतानाच आणि शरीरधर्म पाळत असतानाच विचारात अशी अलिप्तता आणली तर मन स्थिर होऊ लागतं. सतत भोगांची इच्छा करणारं बाह्य मन हे गढूळ होऊन गेलेलं असतं. ते शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध विचारातील जनांमधे राहून मन शुद्ध होऊ लागतं. त्यासाठीच सत्संग-स्वाध्याय केला पाहिजे. शुद्ध आणि स्थिर झालेल्या मनालाच ‘चित्त’ म्हणतात. मन शुद्ध आणि स्थिर झालं की, बाह्य विश्वात राहूनही ते संभ्रमित होत नाही. अशा तर्‍हेचा स्व-अध्याय (अभ्यास) आणि विषय-वैराग्य साध्य झालं तर मन स्वाधीन होऊ लागतं. ते विषयांचा गुलाम न राहता विषयांना गुलामीत ठेवू लागतं. ‘योगवासिष्ठा’मध्ये आकाशशरीरिणी ‘विद्याधरी’ आणि वसिष्ठ यांचा संवाद आहे. ती विद्याधरी म्हणते, ‘चित्ताची शुद्धी स्व-अध्यायामुळे होते. सततच्या अभ्यासामुळे आत्मसिद्धी प्राप्त होते. अभ्यासामुळे अज्ञ हा तज्ज्ञ होतो. हळुहळू पर्वताचंही चूर्ण करता येतं. अभ्यासामुळेच शरसंधान अचूक साधता येतं. अज्ञानरूपी व्याधी विचारांच्या अभ्यासामुळे नाहीशी होते. मात्र जो अभ्यास करीत नाही, त्याला इष्ट सिद्धी प्राप्त होत नाही.’ अभ्यासाबरोबरच वैराग्याचीही आवश्यकता असते. वैराग्य आलं म्हणजे आसक्ती उरत नाही. आसक्ती नसल्यामुळे चित्त विषयांकडे आकृष्ट होत नाही. वैराग्य नसेल तर ज्ञानीसुद्धा मोहात अडकतो! सारांश: अभ्यासानं आणि वैराग्यानं मनोनिग्रह साधतो. मन ताब्यात आलं की प्रयत्नानं योग साध्य होतो. * * *For hard copy:-https://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/to-control-mind-requires-study-abhyaas-and-asceticism-vairagya%20.html
0 notes
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.[I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.    Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher---*---  सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन: ॥6/29॥यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥6/30॥सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थित:। सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥6/31॥आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।सुखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत: ॥6/32॥अर्थ: ज्याचं मन योगयुक्त झालं आहे तो समदृष्टीनं प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्म्याला पहातो आणि आत्म्याच्या ठिकाणी प्राणिमात्र आहेत असं पहातो. जो मला (परमेश्वराला) सर्वत्र पहातो आणि सर्व सृष्टी माझ्या (परमेश्वराच्या) ठिकाणी पहातो त्याला मी कधी दृष्टिआड होत नाही. तो मला कधी अंतरत नाही. . . एकत्व-बुद्धी (साम्यावस्था) प्राप्त झालेला योगी सर्व भूतमात्रांत वास असणार्‍या मला भजतो, तो योगी सर्वप्रकारची कर्मं करीत असूनही माझ्यामध्येच (दंग) असतो. हे अर्जुना, सुख असो वा दु:ख असो; आपल्याप्रमाणे इतरांना अशा सम दृष्टीनं जो सर्वत्र सारखं पहातो तो योगी उत्कृष्ट मानला जातो.*या श्लोकांमधून आध्यात्मिक दृष्टीनं आणि भक्तीच्या दृष्टीनं ब्रह्मात्मैक्य स्थिती सांगितली आहे. ही ब्रह्मात्मैक्य दृष्टी मोक्ष आणि कर्मयोग या दोहोंचाही पाया आहे. सर्वभूतात्मैक्य-ज्ञान हेच सर्व अध्यात्माचं आणि कर्मयोगाचं मूळ होय. या अवस्थेला पोचल्यावर उपास्य, उपासक आणि उपासना ही त्रिपुटी लोप पावते. द्वैत संपून अद्वैताची अनुभूती येते. पाण्यावरचा तरंग वार्‍यामुळे उत्पन्न झालेला असतो. तो पाण्याहून वेगळा नसतो. त्याप्रमाणे आत्मा हा परमात्म्याहून निराळा नसतो. मायेमुळे किंवा प्रकृतीमुळे तो वेगळा भासतो एवढंच. हे अपरोक्ष ज्ञान (Direct knowledge) जेव्हा होतं तेव्हा ब्रह्मात्मैक्य दृष्टी येते आणि सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा आणि आत्म्यामध्ये सर्व भूतमात्र दिसू लागतात.   भागवत धर्मात वासुदेवरूपी परमेश्वरापासून संकर्षणरूपी जीव उत्पन्न झाला आणि पुढे संकर्षणापासून प्रद्युम्न म्हणजे मन आणि प्रद्युम्नापासून अनिरुद्ध म्हणजे अहंकार निर्माण झाला, असं म्हटलं आहे. परंतु अध्यात्मदृष्ट्या जीव हा परमेश्वराचा सनातन अंश आहे हे सत्य उपनिषदांच्या आधारानं वेदसूत्रांमध्ये सांगितलं आहे. ‘जे पिंडी तेच ब्रह्मांडी’ या सूत्रानुसार पिंडामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये एकच आत्मा वास करून असतो. हेच सत्य या श्लोकांमधून सांगितलं आहे. जो आत्मा माझ्यामध्ये आहे, तोच सर्व भूतमात्रांत आहे याची जाणीव योग्याला होते. ही अनुभूती वर्णन करून सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥‘भागवत पुराणा’तही याच अवस्थेचं किंवा तत्त्वाचं समर्थन केलं आहे. मी निराळा, परमेश्वर निराळा आणि लोक निराळे अशी भेदबुद्धी मनात न ठेवता मी आणि भगवान एकच आहोत, सर्वभूतांंमध्ये तेच तत्त्व आहे आणि सर्व भूतं (जीव) भगवंतात आणि आपल्यामध्ये आहेत असं जो समजतो तो भागवतांमध्ये श्रेष्ठ मानला जातो.एकदा का ब्रह्मात्मैक्य स्थिती प्राप्त झाली की योग्याला सर्वत्र परमेश्वरच दिसू लागतो. कावीळ झालेल्या मनुष्याला सारं जग पिवळं दिसतं त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार झाला की सर्व सृष्टी ईश्वरमय दिसू लागते. चित्त हळू हळू एकाग्र करून निर्विकल्प समाधीची ही अवस्था प्राप्त करून घेता येते. मनाचा अभ्यास करून जो मनाला शांत करतो तरीही ज्याचं मन जागरुक आणि गतिशील रहातं तोच या स्थितीचा अनुभव घेऊ शकतो. मनाला शांत करणं ही गोष्ट अवघड असते. त्यातून मन शांत झालंच तर ते जागरुक ठेवणं अवघड! जागरुक झालं म्हणजे पुन्हा विचार येतात; आणि विचार यायला लागले की शांती भंग पावते! म्हणून मनाची प्रशांत अवस्था ही एक कठीण गोष्ट आहे. हळुहळू अभ्यासानंच ती साध्य होते. त्यासाठी जीवनात सात्त्विकता आणली पाहिजे. यालाच इंग्रजीमध्ये simple living and high thinking म्हणतात. नोकरी-व्यवसाय-करियरमधले ताणतणाव कायम वागवत राहिलं तर मन शांत होऊ शकत नाही. हे सारं इथेच राहणार आहे. जे बरोबर येणार आहे अथवा जे विकासासाठी आवश्यक आहे त्याचाच विचार झाला पाहिजे. तरच मन शांत होऊ शकतं. डोक्यात भोगाचे आणि ताणतणावाचे विचार ठेवून मन कधीच शांत होऊ शकत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आटापिटा केला किंवा ठरवलेली गोष्ट मनासारखी झाली नाही आणि अपयश पदरी पडलं तर मन अशांत होतं. पूर्वी घेतलेल्या कटु अनुभवांच्या स्मृतीनंही मन अशांत होतं. संबंधित मित्रानं/मैत्रिणीनं अथवा जवळच्या संबंधित व्यक्तीनं क्लेश दिले असतील तर मनावर त्याचा विपरीत परिणाम कायम रहातो. मनावर ओरखडे उमटतात. विषययानुरूप ते उफाळून वर येतात आणि मनाला अशांत करतात. यातून सुटण्याचा एकच मार्ग. तो म्हणजे, हा सारा आपल्याच पूर्वकर्माचा खेळ आहे अशी मनाची वारंवार समजूत घालून मनाला शांत करणं. किंवा आपल्याला शिकवण्यासाठी - आपल्या विकासासाठीच अशा व्यक्ती आपल्या जीवनात आल्या आहेत अशी मनाची समजूत घालणं. मागच्या जन्मी आपणच केलेल्या कर्माचे हे हिशेब चुकते होत आहेत असं समजून सारं काही विसरून जाणं जमलं पाहिजे. मनाची अशी धारणा करणं यालाच ‘क्षमा’ म्हणतात. क्षमा करणं हा आपल्याच विकासाचा एक टप्पा असतो. मनानं वर्षानुवर्षं धरून ठेवलेले असे ताण सैल झालेे की मन शुद्ध आणि प्रगल्भ होऊ लागतं. मनाला नवोन्मेष प्राप्त होतो. अभ्यास आणि निदिध्यास यातूनच मन शांत होऊ शकतं. म्हणून, अभ्यासोनि प्रकटावे, असं समर्थ रामदास म्हणतात. तो व्यावहारिक उपदेश असला तरी तो तत्त्वज्ञानासंदर्भातही लागू होतो. दुसर्‍याच्या हृदयातही परमात��मा वसून आहे, हा भाव दृढ होऊ लागतो. त्यामुळे सभोवतालच्या इतर सर्व जीवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. तो वैश्विक बनत जातो. मनाची एकप्रकारची धारणा होत जाते. ती दैवी बनत जाते. जीव शांत होत जातो. ‘शांती’ मिळण्याची दोन ठिकाणं असतात आणि ती दोन परस्पर विरुद्ध टोकांवर असतात. भोगमय जीवन हे एक टोक आणि परमात्मा हे दुसरं टोक! परमात्मा तर दिसत नाही. मग जे दिसतं, इंद्रियांना अनुभवायला मिळतं त्या भोगमय जीवनात शांती मिळवण्यासाठी व्यक्ती आटापिटा करते. पण त्यातून केवळ अल्पकाळच शांती मिळते.        आपण ज्याला ‘शांती’ म्हणतो त्याचे तृप्ती, शांती, प्रशांती आणि परमशांती असे  प्रकार आहेत. तृप्ती:- आवडीचा पदार्थ खाल्ला की मन तृप्त होतं. भूकेनं व्याकुळ शरीराला अन्न मिळालं की तृप्ती येते. संग करून झाला की तृप्तीच नव्हे; तर काही काळ निरिच्छाही येते.शांती:- हवं ते मिळालं, यश पदरात पडलं किंवा एखादं आवडीचं संगीत ऐकायला मिळालं की मन शांतदान्त होऊन जातं. तृप्तीच्या थोडी वरचढ ही अवस्था असते. प्रशांती:- इथे आत्मिक शांतीला प्रारंभ होतो. नित्य भोगात रमलेलं मन आत्मिक सुखाकडे वळवलं जातं. ध्यानात ही प्रशांती मिळू लागते. निष्काम कर्मात, देवदर्शनात, गुरूसेवा करताना, दुसर्‍याची मनोभावे सेवा करताना जे आत्मिक सुख मिळू लागतं त्यात एकप्रकारची ‘प्रशांती’ दडलेली असते. परमशांती:- इथे योगी आत्मभावातच रमून जातो. केवळ शरीर धारण केलं असल्यामुळे तो शरीरधर्म अनासक्त भावानं पाळत असतो. एरवी तो नित्य आत्मानंदात रमलेला असतो. परम म्हणजे अंतिम, आत्यंतिक अशा आत्मसुखात तो रमून जातो. जीवानं शिवाजवळ अर्थात परमतत्त्वाजवळ जाण्याची ती अनुभूती असते. त्यात परमशांती असते.  अशा अभ्यासातून आणि निदिध्यासातून मन शांत झालं की तो योगी ज्या पद्धतीनं वागतो त्या सार्‍या कृत्यांची जबाबदारी परमेश्वरावर असते. त्या योग्याचं राहणीमान, त्याचं दैनंदिन वर्तन कसंही असलं तरी त्याच्यामागे परमेश्वर सतत उभा असतो. म्हणजेच कोणतंही कर्म करीत असताना किंवा कोणत्याही अवस्थेत असताना हा योगी परमेश्वराला वेगळा मानू शकत नाही. परमात्म्याशी त्यानं अशा रीतीनं तादात्म्य साधलेलं असतं. सर्वव्यापक ईश्वरामध्येच, त्याच्या ध्यानामध्येच तो योगी दंग असतो. परंतु; केवळ त्या ध्यानावस्थेत एका जागी स्थिर न राहता इतरांकडेही तो त्याच एकत्व बुद्धीनं पाहतो. अध्यात्मज्ञानानं प्राप्त झालेल्या या साम्यबुद्धीचा तो व्यवहारातही वापर करतो. सर्व कामं तो लोकसंग्रहार्थ करीत असतो. मनाच्या अशा धारणेमुळे तो कर्म करीत राहिला तरी त्याची फळस्वरूप बाधा त्याला होत नाही. तो या कर्माच्या खेळातून सुटलेला असतो. सर्वांभूती एक आत्मा ही दृष्टी सांख्य आणि कर्मयोग या दोन्ही मार्गात सारखीच आहे. पातंजल योगातही समाधी साध्य झाल्यावर हीच अवस्था प्राप्त होते. परंतु सांख्य (संन्यासी) पातंजल योगी (तपस्वी) या साम्यबुद्धीचा व्यवहारात उपयोग करीत नाहीत. ते कर्मांचा त्याग करतात. परंतु जो कर्मयोगी आहे, तो मात्र कर्मांचा त्याग करीत नाही. सर्वांचं सुख-दु:ख आपलं मानून त्यात तो सहभागी होतो. लोकसंग्रहासाठी कर्मं करीत राहतो. अर्थात ही कर्मं करीत असूनही तो त्या कर्मांमध्ये नसतो. प्रशांती लाभलेला, ईश्वराशी तादात्म्य पावून प्राप्त कर्म यथोचित करणारा असा योगी भगवंतांसाठी ‘उत्कृष्ट’ असतो.सारांश: ‘जे पिंडी तेच ब्रह्मांडी’ याचा साक्षात अनुभव घेऊन जो योगी सर्व प्राणिमात्रांकडे समदृष्टीनं बघतो. तो परमेश्वराला अंतरत नाही आणि परमेश्वर त्याला कधी दूर ठेवत नाही.ईश्वराशी तादात्म्य पावलेल्या योग्याच्या सार्‍या कर्मांचं दायित्व परमेश्वरानं उचललेलं असतं. सम्यक्ज्ञाननिष्ठ असा हा योगी सर्वांभूती एकतत्त्व पाहतो. त्याच भावनेनं तो निष्काम कर्म करीत राहतो. परमशांतीचा लाभ त्याला झालेला असतो. तो भगवंतांच्या दृष्टीनं ‘उत्कृष्ट’ असतो.*   *   *
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/who-is-the-best-in-gods-eyes.html
1 note · View note
Quote
In this my Marathi blog-posts, I have focused on Bhagavad-Gita thoughts and teachings. I will try to present new thoughts relevant to:- how to live inspirational tension-free happy life, get out of depression, frustration, stress and attain spiritual bliss, how to overcome life after death cycle, and also write about heaven - Swarg - different plains, reincarnation, existence of God and Devas etc.   [I intent to write these inspirational posts in English as well!] ही लेखमाला आवडली तर अवश्य subscribe करा.   Bhagavad-Gita Commentary  - Rajendra Kher ---*---  यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्। ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्॥6/26॥ प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैती शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥6/27॥ युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मष:। सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यनं सुखमश्रुते ॥6/28॥ * अर्थ: चंचल आणि अस्थिर मन इतस्तत: धावतं. तिथून त्याचा निग्रह करून त्याला आत्मवश करावं. रजोगुण नाहीसा झाल्यामुळे ज्याच्या मनाला उत्तम प्रशांती लाभली आहे, जो पापपुण्यविरहित झाला आहे, अशा ब्रह्मस्वरूप योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होतं. आत्म्यामध्ये मन सर्वकाळ स्थिर करणारा योगी पापांपासून मुक्त होतो आणि अनायसे ब्रह्मप्राप्तीस्वरूप आत्यंतिक सुख भोगतो. * मन चंचल होण्याचं कारण म्हणजे रजोगुणाची वृद्धी. मनुष्यामध्ये तीन वृत्तींचा अंतर्भाव असतो. या तीन वृत्ती म्हणजे:- सात्त्विक-राजस-तामस. (या प्रत्येक गुणाची वैशिष्ट्यं पुढे विस्तारानं येणारच आहेत.) रजोगुणात ‘पाहिजे-पाहिजे’ वृत्ती बळावलेली असते. सतत काहीतरी मिळवण्याचा हव्यास, पद-पैसा-प्रतिष्ठा यांची अविवेकी अभिलाषा, सतत नव्या वस्तू विकत आणूनही समाधान न वाटणं, मौजमजा करूनही मनाला तृप्ती न येणं, नव्या नव्या विषयांच्या मागे सातत्यानं धावाधाव करणं हे रजोगुण वाढल्याचं लक्षण असतं. अनेक लोकांवर आपला प्रभाव असावा, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं - आपला उदो उदो करावा अशी रजोगुणी व्यक्तीची अपेक्षा असते. ज्याला योग साध्य करायचा आहे त्यानं अशा धावणार्‍या मनाचा लगाम घालून जाणीवपूर्वक निग्रह करायला हवा... आणि मग मनाला बुद्धीच्या छत्राखाली आणून पुढे आत्मस्वरूपात लीन करावं. गौतम बुद्धांनी पुढे जे निर्वाण सांगितलेलं आहे किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञ जे निर्वाण सांगतात त्यात फक्त बाह्य विश्वाला विसरायला सांगितलं आहे. म्हणजे बाह्यवस्तुलक्ष्यी ध्यान ते बंद करायला सांगतात. परंतु; या श्लोकांतून भगवंत ब्रह्मनिर्वाणाची स्थिती सांगतात. बाह्य वस्तुमात्राचं ध्यान बंद केल्यावर पाठोपाठ लगेचच अंत:करणाल्या आत्मप्रतितीला (अनुभूतीला) प्रारंभ झाला पाहिजे. म्हणजे जिथे निर्वाणाची स्थिती संपते तिथून ब्रह्मनिर्वाणाची अवस्था सुरू होते. विश्वाला विसरणं ही पहिली पायरी झाली. त्याच्यापुढे ईश्वराचं भान होऊन त्यात तल्लीन होणं ही पुढची पायरी झाली. आणि निर्विकल्प समाधी ही तर सर्वोच्च अशी अवस्था आहे. आत्म्याची अनुभूती या अवस्थेत यायला लागते. ज्याचं मन प्रथमपासून प्रसन्न आहे, तो या श्रेष्ठतम स्वरूपाच्या अनुभूतीचा अभ्यास करू शकतो. रजोगुण हा या मार्गात विघ्न आणतो. एका धनाढ्य माणसाचे अनेक फ्लॅटस् होते. ते सर्व त्यानं भाड्यानं दिले होते. माणसाला वाटत असतं, प्राप्त परिस्थिती अशीच कायम रहाणार आहे. पण काळ कधी थांबत नसतो. एक दिवस तो धनाढ्य माणूस गंभीर आजारी पडला आणि कोमात गेला. बायको-मुलं त्याच्या भोवती जमा झाली. तेवढ्यात तो धनिक काही क्षण भानावर आला आणि आपल्या मुलाला म्हणाला, ‘अरे, त्या एका फ्लॅटचं भाडं यायचं राहिलं आहे तेवढं बघ!’ मृत्यूच्या दारातही लोभ आणि आसक्ती सुटत नाही! अशी व्यक्ती काय योग साधणार? रजोगुणवृद्धीचा हा परिणाम असतो. चित्ताच्या एकाग्रतेतून हा रजोगुण नाहीसा होतो तेव्हा व्यक्ती शांत होऊ लागते. सतत काही मिळविण्याचा हव्यास थांबला की मग मनाला एकप्रकारची शांती येते. आत्मिक शांतीची अनुभूती मिळाली की बाह्य जगतातील सुखसमृद्धीचं मोल वाटेनासं होतं. मनाची जी शांती इथे अभिप्रेत आहे, ती झोपेतली किंवा गुंगीतली शांती नव्हे. प्रगाढ झोपेत मन शांत असतं. किंवा गुंगीचं औषध देऊन ते शांत केलं जातं. पण त्यापेक्षा सर्वोच्च शांती म्हणजे प्रशांत अवस्था. योग्याला अशी अवस्था अनुभवता येते. असं शांत मन हे जागरुकही असतं आणि गतिशीलही असतं. ते साधलं तर आत्मानुभूती येते. आत्मस्वरूप कळलं म्हणजे त्याहून अधिक कोणतंही सुख मिळवायचं उरत नाही. सुखाची ही परमेाच्च अवस्था असते. मनातले लोभ-मोह आदी दोष शांत झाले की योगी ब्रह्मिभूत होतो. मग विनासायास हा योगी या अंतिम सुखाचा उपभोग घेतो. म्हणजेच ब्रह्मानंद लुटतो. आत्म्यामधे तल्लीन राहणारा योगी पापांपासून मुक्त होतो, असं भगवान सांगतात. जो पापपुण्य विरहित झालेला आहे अशा ब्रह्मस्वरूप योग्याला परमशांतीचा लाभ होतो असंही ते सांगतात. याचा उलगडा केला पहिजे. आपण चांगली कर्मं केली तर चांगली फळं प्राप्त होतात; वाईटाची वाईट. म्हणजे पापस्वरूप आणि पुण्यस्वरूप कर्मांची फळं ही भोगावीच लागतात. त्यातून व्यक्तीची सुटका होऊ शकत नाही. जन्मेजन्मीचा हा खेळ आहे. जीवनाची साखळी (विसर्ग=उलाढाल) सातत्यानं चालावी यासाठीच हा खेळ रचला आहे. पण त्यातून सुटण्याचा मार्गही भगवंतांनी ठेवला आहे. तोच मार्ग ते प्रकाशित करीत आहेत. आसक्तीरहित होऊन योगाभ्यास केला तर मात्र पाप आणि पुण्य या दोहोंच्याही फळांमधून योगी मुक्त होतो. त्याला परमशांतीचा लाभ होतो. परम म्हणजे अंतिम, उत्कट, पारमार्थिक आणि चिरंतन.परब्रह्माशी ज्याचा नित्यसंबंध आहे, असं ब्रह्मस्वरूप सुख हे अंतरहित, नित्य आणि निरतिशय असतं. सतत योगाभ्यास करणार्‍या प्रतिबंधरहित योग्याला हे सुख सहज प्राप्त होतं. मग तो योगी आणि परमात्मा हे भिन्नत्वही उरत नाही. कर्म करताना परमेश्वराचं दुसरं स्वरूप तो मानतच नाही. तो स्वत:च परमेश्वर स्वरूप होऊन गेलेला असतो.  सारांश: वस्तुनिष्ठ ध्यान संपलं की आत्मप्रतितीला प्रारंभ होतो. तसा तो व्हायला पाहिजे. तरच परमसुखाचा अनुभव घेता येतो. * * *www.rajendrakher.netPurchase online:-https://www.instamojo.com/vihangpublications/
http://www.bhagavadgita-commentary.co.in/2020/06/inspiring-thoughts-of-the-bhagavad-gita-.html
0 notes