Tumgik
#आमचे
drprashantkale · 2 years
Text
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि  
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप  
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यासह सर्वच मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला मूर्ती दिली. आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून, ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात्र गणेशमूर्ती घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई तसंच प्रसाद खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही या विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षा�� ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पाव��ाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
Text
थांब थांब तू जरा पावसा
नको वाटतो पाऊस आताफिटली ना रे हाऊस आता ।निरोप घे ना तू जरासायेशील नंतर जाता जाता ।रस्ते भरले नाल्या भरल्याधरा ही थकली पिता पिता ।पाणी पाणी चिखल साराहोईल कसा तो असाच रीता ।थांब थांब तू जरा पावसाशेत पिकू दे आमचे आता ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
ajaymane1 · 1 month
Text
तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा कोठे मिळतील? | PEC Translation
आजच्या जागतिक संवादाच्या युगात, विविध भाषांमध्ये समजून घेणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामध्ये विशेषतः स्पॅनिश भाषा अत्यंत महत्त्वाची ठरते. स्पॅनिश सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे, आणि त्यामुळे स्पॅनिश भाषांतर सेवा शोधणाऱया लोकांची संख्या देखील वाढत आहे. जर तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा शोधायच्या असतील, तर PEC Translation एक उत्कृष्ट विकल्प आहे.
PEC Translation मध्ये आमच्या सेवांचे स्वरूप
PEC Translation ही एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित भाषांतर संस्था आहे, जी विविध भाषांमध्ये भाषांतर सेवा प्रदान करते. स्पॅनिश भाषांतरात आम्ही खासकरून खालील सेवांचा समावेश करतो:
तांत्रिक भाषांतर: तांत्रिक दस्तऐवज, वापरकर्ता मार्गदर्शक, सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक सामग्रीच्या भाषांतराच्या बाबतीत आमच्या तज्ञांकडे गहन ज्ञान आहे.
व्यावसायिक भाषांतर: करार, अहवाल, विपणन साहित्य आणि इतर व्यावसायिक दस्तऐवजांसाठी उच्च दर्जाचे भाषांतर.
वैद्यकीय भाषांतर: वैद्यकीय दस्तऐवज, रोगनिश्चितीचे अहवाल, आणि औषधांची माहिती यांसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचे अचूक भाषांतर.
नैतिक भाषांतर: साहित्य, कविता, कथा आणि इतर सांस्कृतिक साहित्याची भाषांतर.
वेब स्थानांतर: वेबसाइट आणि ऑनलाइन सामग्रीचे स्पॅनिश भाषेत स्थानांतर, जेणेकरून तुमच्या व्यवसायाची जागतिक स्तरावर उपस्थिती मजबूत केली जाऊ शकते.
आमचा अनुभव आणि तज्ञता
PEC Translation मध्ये आमच्याकडे अभियांत्रिकी, वैद्यक, साहित्य, संगीत आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये तज्ञ असलेल्या भाषांतरकांचा एक मोठा संघ आहे. आमचे भाषांतरक स्पॅनिश भाषेमध्ये तरबेज असून, त्यांच्याजवळ स्थानिक संस्कृतीची पूर्ण माहिती असते. हे सुनिश्चित करते की तुमच्या सामग्रीमध्ये ना केवल भाषेसंबंधी योग्यतेचा विचार केला जातो, तर सांस्कृतिक संदर्भही विचारात घेतला जातो.
सेवांचा दर्जा
आमच्या सेवांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी, PEC Translation कडून आपल्याला उच्चतम स्तराचे भाषांतर प्राप्त होते. प्रत्येक प्रोजेक्टसाठी कस्टम प्रोसेस विकसित करण्यात येते, ज्यामुळे तुमच्या गरजांनुसार भाषांतराची गुणवत्ता उत्तम राहते. आमची गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया युक्ती पद्धतीनुसार चालते, ज्या अंतर्गत प्रत्येक भाषांतरावर पुनरावलोकन केले जाते.
किमती आणि बजेट
PEC Translation कडून स्पॅनिश भाषांतर सेवा घेताना, तुम्ही उच्च गुणवत्ता कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळवू शकता. आमच्या किमती प्रतिस्पर्धात्मक आहेत आणि आम्ही सर्व स्तरांवरच्या व्यापारांसाठी अनुकूलित योजना उपलब्ध करतो. प्रोजेक्टची लांबी, विषय, आणि वेळेच्या गरजा यावर आधारित किमतीतील साधे समायोजन केले जातात.
सानुकूलित सेवा
PEC Translation मध्ये, आम्ही प्रत्येक ग्राहकाची वैयक्तिक गरज ओळखतो आणि त्यानुसार सानुकूलित सेवा देतो. तुमच्या प्रोजेक्टच्या खास मागण्या, डेडलाइन, किंवा विशिष्ट शैलीशी संबंधित कोणतेही गोष्टी असल्यास, आमची टीम त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय देऊ शकते.
अंतिम विचार
स्पॅनिश भाषेच्या लोकप्रियतेमुळे, दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा मिळवण्यासाठी PEC Translation एक आदर्श विकल्प आहे. आमच्या तज्ञांच्या ज्ञानामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या सर्वोत्तम साधनांमध्ये गुंतवणूक करता येईल. आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या भाषांतर आवश्यकतांसाठी एक पूर्णपणे सानुकूलित अनुभव मिळवा.
तुमच्या आवश्यकतांसाठी दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा हवी असल्यास, PEC Translation तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. आम्ही तुम्हालांच तुम्हाला आवश्यक ते भाषांतर मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत.
संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी कोटेशन मिळवण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा आम्हाला थेट संपर्क करा. आम्ही तुमची सेवा करण्यात आनंदित होऊ.
0 notes
dhanu-j-92 · 2 months
Text
📖 *ज्ञान गंगा* 📖
Tumblr media
.
*कर्म काण्डा विषयी*
*सत्य कथा*
माझे (संत रामपाल दास यांचे) पूज्य गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराज यांना सोळाव्या वर्षी एका महात्म्याचा सत्संग ऐकून वैराग्य प्राप्त झाले. एक दिवस ते शेतामध्ये गेले होते. जवळच एक जंगल होते. त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी एका मृत जनावराच्या हाडांजवळ आपले कपडे फाडून फेकले आणि ते महात्माजींसोबत निघून गेले.
घरातील व्यक्तींनी जेव्हा त्यांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना जंगलामध्ये हाडांजवळ त्यांचे फाटलेले कपडे दिसले. घरच्यांना वाटले, की एखाद्या जंगली प्राण्याने त्यांना खाल्ले असावे. त्यांनी ती कपडे आणि हाडे उचलून घरी आणली आणि अंतिम संस्कार केले. त्यानंतर दहावा, तेरावा, वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी श्राद्ध घालणे सुरूच झाले.
जेव्हा माझे पूज्य गुरुदेव अत्यंत वृद्ध झाले, तेव्हा एकदा त्यांच्या स्वत:च्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना समजले, की ते जिवंत आहेत आणि घर सोडून निघून गेलेले होते. घरच्यांनी सांगितले, की जेव्हा तुम्ही घर सोडून गेला, तेव्हा तुमचा फार शोध घेण्यात आला. शेवटी जंगलामध्ये तुमचे कपडे मिळाले. त्या कपड्यांजवळ काही हाडेही पडल���ली दिसली, तेव्हा आम्हाला वाटले, की एखाद्या हिं��्र प्राण्याने तुम्हाला खाऊन टाकले असेल. आम्ही ते कपडे आणि हाडे घरी आणून अंतिम संस्कार केला.
नंतर मी (संत रामपाल दास) माझ्या पूज्य गुरुदेवांच्या लहान बंधूंच्या पत्नीला विचारले, की जेव्हा आमचे पूज्य गुरुदेव घर सोडून निघून गेले, त्यानंतर तुम्ही त्यांच्या माघारी काय केले? तिने सांगितले, की जेव्हा विवाह होऊन मी या घरी आले, तेव्हा त्यांचे श्राद्ध घातले होते. त्यानंतर मी माझ्या स्वत:च्या हातांनी त्यांचे सुमारे सत्तर वेळा श्राद्ध घातले आहे. तिने पुढे सांगितले, की जेव्हा घरामध्ये एखादे नुकसान व्हायचे, म्हणजे म्हशीने दूध न देणे, म्हशीचे सड खराब होणे किंवा अन्य काही तरी नुकसान, त्यावेळी आम्ही एखाद्या शहाण्या मांत्रिकाकडे जायचो. तो म्हणायचा, की तुमच्या घरी कोणाचा तरी निःसंतान, लग्न न होता मृत्यू झालेला आहे. तेच तुम्हाला दु:खी करत आहे. त्यावेळी आम्ही त्या मांत्रिकाला वस्त्रे, धन इत्यादी द्यायचो.
यावर मी (रामपाल दास) म्हणालो, की हे तर जगाचा उद्धार करत आहेत. हे कुठे कोणाला काय दु:ख देत होते? ते तर आता सुखदाता आहेत. आता तर ते आपल्यासमोरच आहेत. आता तर श्राद्ध घालणे इत्यादी व्यर्थ साधना बंद करा. तेव्हा त्या म्हणाल्या, की ही तर आमची जुनी परंपरा आहे. हे कसे काय सोडू? याचा अर्थ असा, की “आपण आपल्या जुन्या रीती-परंपरांमध्ये इतके लीन झालेलो आहोत” की प्रत्यक्ष प्रमाण असूनही त्या अयोग्य परंपरा आपण सोडू शकत नाही. यावरून ह�� सिद्ध होते, की श्राद्ध घालणे, पितरपूजा करणे इत्यादी सर्व व्यर्थ आहे.
0 notes
bandya-mama · 4 months
Text
एक माणूस खड्डे खोदत असतो. त्याच्या मागून दुसरा बुजवत येत असतो.
हे पाहून Bandya विचारतो, “तुम्ही हे काय करत आहात?
खड्डे खोदणारा म्हणतो, “हा वृक्षारोपणाचा उपक्रम आहे.मला खड्डे खोदण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिले आहे.मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.आम्ही आमचे काम करत आहोत.”
😂😂😂🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes
nashikfast · 5 months
Text
--II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५१४ वा दिवस प्रकृती सर्वदा अगदी काटेकोरपणे प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय्य असे फल देत असते. त्यात तुसभरही इकडेचे तिकडे व्हावयाचे नाही. म्हणूनच आपण कबूल करण्यास राजी नसलो तरीही खरे पाहता आमच्या पात्रतेनुसार आमचे कर्तव्य ठरत असते. आपल्यासमोर जे कर्तव्य असेल, जे आपल्या अगदी हाताशी असेल, ते उत्तम रीतीने पार पाडूनच आपण क्रमशः शक्ती संपादन करु शकू. आणि अशाप्रकारे हळूहळू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
thoratofficials · 7 months
Text
#कालारामभक्त_चारूदत्त के साँथ... लोकप्रिय हिंदी
Bollywood कॉमेडियन Actor मा. अतुल दबंग 🙏🙏
- मुंबई दिव्यांग बौने समाज के प्रतिनिधी... प्रेरणास्थान !
- दिव्यांग समाज के सुधारक एवं, मार्गदर्शक...
- मुंबई फील्म सिटी के प्रसिद्ध ॲक्टर...
- अतुल दबंग उर्फ छोटे सलमान नाम से मशहूर है...
- भक्तीयोग के कुछ पलं...
(संस्थापक - झिरो बहुद्देशीय संस्था)
- In this video / keep note - this is art form of expansion
___________________
- संग्रहित | Famous BOLLYWOOD Film Artist
Comedian & मुंबई Film City Co-Actor
(दिव्यांग सेवार्थ - Zero बहूद्देशीय संस्थाप्रमुख) मा.श्री.अतुल भास्कर इंगळे उर्फ "अतुल दबंग", विशेषतः दबंग २ चित्रपटातून ॲक्टींग करियरची धडाकेबाज सुरवात करत.. आजपर्यंत हिंदी - मराठी - साऊथ - डबिंग चित्रपटांमध्ये भूमिकेचां ठसां उमटविला.. सध्या; नाशिकमध्यें आपल्या आगामीं Bollywood Movie Film शुटींग निमित्त आलेलें असतानां.. व्यस्थ वेळात वेळ काढून.. भेटीचा योग जुळून आला.. आज रोजी...
सुप्रसिद्ध सह-अभिनेते मा.अतुल दबंग ह्यांची नाशिकच्या सुप्रसिद्ध 'भारतीय योगी म. विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर' पंचवटी क्षेत्र यांस अभ्यास निरूपणपर सदिच्छा भेट !
_____________
... #कालाराम_के_वंशज ने दिया #ऐतिहासिक परिचय ...
•• जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त ••
........ HISTORIC RECORDED EVIDENCE ..........
- page - https://www.facebook.com/share/p/bxfcqaiP4h8L19HT/?mibextid=qi2Omg
........... महापौराणिक महापुरोगामी भूमी - नासिक .........
........... महापौराणिक महापुरोगामी भूमी - पंचवटी .........
- Full Story https://youtu.be/NsK-vXl5VUQ
ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञान���श्वर)
___________________
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय #The_Historic_Documentary
https://youtu.be/HkfAZwKPjdI?si=20-SGvdyc13AekXn
Kalarama bhakta charudatta thorat
____________________
• D TV NEWS Official News https://youtube.com/@dattashrayatvnews?si=j4qJ_oBXcYXBcBBm
____________________________________
• संदर्भ / Reference :
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/sg-GPWVnztQ
___________________
______________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/iv0SPDkSDPE
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
#वेदोक्त_मराठा (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
नासिक के जगविख्यात ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज तथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के वारसदार मा. चंदन पुजाधिकारी ने दिया, कालारामभक्त चारूदत्त महेश थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ... 27 july 2015 ... चारूदत्त थोरात यांचे ऐतिहासिक डॉक्युमेंट्री ... ऐतिहासिक चारित्रात्मक परिचय मिडिया दस्तऐवज ... Historic Recorded Evidence
https://dai.ly/k3LF0VoMA3jdXazQe4X
____________________________
__________________________________
वैचारिक व्युत्पत्ती सौंदर्यदृष्टी
______________________________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र
(काळारामभक्त_चारूदत्त_)
____________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
________________________________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
___________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन ज्ञानमंदिर, पंचवटी (महाराष्ट्र) तर्फे
- youtube
_____________________________
____________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________

चारु आकाशाएवढा ••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
_______
• sub topic - चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
• सदर संदर्भ - Archived •
- याचे कारणास्तव - विष्णूभक्त चारुदत्त यांचा
शैक्षणिक संशोधनात्म अभ्यासपर संदर्भ व्याख्या
विवेचन विश्लेषणसहित - बुद्धीप्रामाण्यनिष्ठ सापेक्षतावाद
सिद्धान्त
___________
____________
(आवश्यक टिप - लोकाग्रहास्तव पुनर्प्रसारित)
____________________
______________________
• educational -
#Trending
______________________
______________________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | latest collection page only
charudatta thorat nashika
____________________________
___________________
• UPLOAD BY - || काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
- News Archived Media Network
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/industrial-development-of-hingoli-will-be-done-through-irrigation-chain-chief-minister-eknath-shinde/
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि  
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप  
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यासह सर्वच मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला मूर्ती दिली. आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून, ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात्र गणेशमूर्ती घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई तसंच प्रसाद खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही या विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठा���े हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षात ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
ashadhiekadashi · 7 months
Text
.. #कालाराम_के_वंशज ने दिया #ऐतिहासिक परिचय..
• जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त •
- Full Story https://youtu.be/NsK-vXl5VUQ
........ HISTORIC RECORDED EVIDENCE ..........
Nashik Kalaram Temple Bhakta Charudatta
........... महापौराणिक महापुरोगामी भूमी - नासिक ........
........... नासिक - महापौराणिक महापुरोगामी भूमी ........
_____________________________
___________________________________
ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
_____________________________
_____________________________
________________________________
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय #The #Historic #Documentary
https://youtu.be/HkfAZwKPjdI?si=20-SGvdyc13AekXn
Kalarama bhakta charudatta thorat
__________________________
____________________
•  D TV NEWS Official News Today
https://youtube.com/@dattashrayatvnews?si=vAxmtIlDjUjZq6-0
__________________
____________________________
________________
_________________________
____________________
• संदर्भ / Reference :
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/sg-GPWVnztQ
___________________
_____________________
__________________________
________________
_________________________
____________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/iv0SPDkSDPE
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
___________
_________________________
____________________
#वेद��क्त_मराठा_ (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा_ (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ... 
https://youtu.be/0BLce2yhDms?si=16jHWyhhWecgBDTx
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
________________
_________________________
____________________
नासिक के जगविख्यात ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज तथा, संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के वारसदार नाशिकभूषण पुरस्कार से सन्मानित
मा. चंदन पुजाधिकारी ने दिया,
" कालाराम मंदिर के भक्त चारूदत्त महेश थोरात "  के
वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
27 july 2015 ...
चारूदत्त थोरात यांचे ऐतिहासिक डॉक्युमेंट्री ...
ऐतिहासिक चारित्रात्मक परिचय मिडिया दस्तऐवज ...
Historic Recorded Evidence
https:// dai. ly/ k3LF0VoMA3jdXazQe4X
____________________________
__________________________________
वैचारिक व्युत्पत्ती सौंदर्यदृष्टी
______________________________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र
(काळारामभक्त_चारूदत्त_)
____________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
_____________________________
____________________
______________________________
_____________________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
____________________
______________________________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
_______________________
_________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
___________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन ज्ञानमंदिर, पंचवटी (महाराष्ट्र)
तर्फे - youtube
_____________________________
_____________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ...
माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ...
चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ.. 
____________________
चारु आकाशाएवढा
••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
__________________
• sub topic -  चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
• सदर संदर्भ - Archived •
- याचे कारणास्तव - विष्णूभक्त चारुदत्त यांचा
शैक्षणिक संशोधनात्म अभ्यासपर संदर्भ व्याख्या
विवेचन विश्लेषणसहित - बुद्धीप्रामाण्यनिष्ठ सापेक्षतावाद
सिद्धान्त 
_____________________
______________________
• educational -
#Kalaram_Mandir #काळाराम #कालाराम
#काला #राम #रामभक्त #भक्त #Bhakta
__________________________
_________________________________
__________________________________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | Books | News Today |
latest collection page only
_____________________________
_______________________________
________________________________
• UPLOAD BY -
|| ऐतिहासिक काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चार���दत्त -
- Educational purposes only
- News Archived Media
Network today updates
0 notes
sandeshgangurde · 7 months
Text
Tumblr media
आमचे मित्र तसेच मार्गदर्शक,आदरणीय श्री.संजय शेवाळे जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
0 notes
dattanews253 · 8 months
Text
"अयोध्या रामराज्य" हेतु जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त से चर्चा #देश_का_नंबर_1_Tv_चैनल
- राजधानी #दिल्ली हेडक्वाटर से आया ब्युरो.. भारत के सबसे
बडे मिडिया हाऊस - नैशनल न्यूज चैनल की - सबसे तेज
न्युज ॲंकर - देश की नंबर 1 जर्नलिस्ट - मा.अमृता जी..
& Team - खास.. आई.. || चारूदत्त || से मिलने......!!!
- जरूर देखिये "रामराज्य स्पेशल" -
नैशनल मिडिया कव्हरेज Newsnation TV चैनल पर...
- The Team News Nation ब्युरो (दिल्ली हेडक्वाटर)
(Team - News Nation bureau team)
.................
.......................
............................
...................................
• जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त •
......... महापौराणिक महापुरोगामी भूमी - नासिक ........
- Full Story https://youtu.be/NsK-vXl5VUQ
#ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
___________________
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय #The_Historic_Documentary
https://youtu.be/HkfAZwKPjdI?si=20-SGvdyc13AekXn
Kalarama bhakta charudatta thorat
____________________
• D TV NEWS Official News https://youtube.com/@dattashrayatvnews?si=j4qJ_oBXcYXBcBBm
____________________________________
• संदर्भ / Reference :
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/sg-GPWVnztQ
___________________
______________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/iv0SPDkSDPE
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
#वेदोक्त_मराठा (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
__________________________________
वैचारिक व्युत्पत्ती सौंदर्यदृष्टी
______________________________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षे���्र
(काळारामभक्त_चारूदत्त_)
____________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
________________________
............... • भक्त परिवार अभ्यास निरुपण • .............
________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
___________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन ज्ञानमंदिर, पंचवटी (महाराष्ट्र) तर्फे
via - youtube
_____________________________
____________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________
चारु आकाशाएवढा ••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
_______
• sub topic - चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
• सदर संदर्भ - Archived •
- याचे कारणास्तव - विष्णूभक्त चारुदत्त यांचा
शैक्षणिक संशोधनात्म अभ्यासपर संदर्भ व्याख्या
विवेचन विश्लेषणसहित - बुद्धीप्रामाण्यनिष्ठ सापेक्षतावाद
सिद्धान्त
_______________________
________________
• educational -
#Trending
______________________
______________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | latest collection page only
____________________
____________
• UPLOAD BY - || काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
- News Archived Media Network
0 notes
mumbaiaroma1 · 8 months
Text
अल करामा दुबई मधील आमचे मुंबई स्टाईल फूड रेस्टॉरंट. Ala karāmā duba'ī madhīla āmacē mumba'ī sṭā'īla phūḍa rēsṭŏraṇṭa.
We have a pure veg Indian restaurant in al Karama, Dubai , Uae. Behind centro & Regent place hotel Uae.
Booked your birthday party / kitty party / office event / indoor & outdoor party in mumbai aroma restaurant. Special arrangement for tourist group also.
If you take bulk order so we are giving good packing with good discount. #indian #tourist #indiantourist #grouptours #touristgroup #indianfood #streetfood #streetfoodindia #teatime #teatimesnacks #mumbaifood #foodblogger #foodtravel #authenticfood #authenticindianfood #indianrestaurant #karama #indianrestaurantinkarama #dubairestaurants #dubaifood #dubailifestyle #mumbaiaromarestaurant #dubaifood #dubailife #mydubai #dubaifoodie #dubaifoodies #dubaimall #dubairestaurants #dubaimarina #dubaiblogger #dubaistyle #dubaifoodblogger #dxb #food #dubaifoodbloggers #foodie #dubainight #dubaitag #dubaifashion #dubaievents #dubaicity #dubaieats #dubaibloggers #dubaiinstagram #abudhabi #instafood #dubaifoodgui #mydubai #instagood #foodphotography #foodie #instafood #foodlover #indianfood #zomatouae #yummy #follow #foodgasm #delicious #delivery #food #dubaifoodie #mydubai #dubairestaurants #misal #misalpav #thali #foodstagram #misalpavcombo #instagramreels #reelsinstagram #reelitfeelit #reelsviral #instareels #vada #vadapav#vadapavlove We have #chaat #snacks #indian #south #Maharashtrian #food #gujratifood # Chinese #rolls #juices #Milkshake #bevrages #sweets #pure veg #indian #restaurant #pulao #desert #fooddeliveryservice #Al #Kifaf #oasis #building, #Al #karama, #Behind #Centro & #Regent place #hotel, #dubai #Uae. We deliver food at your door or office #talabat #smiles #noonfood and you can direct to call us also. #043465642 #052 703 1616
0 notes
manju84 · 8 months
Text
🌅 #God_Morning_Monday 🌅
🙏 #KabirisGod 🙏
#हमारीभीसुनो_बुद्धिमानहिंदुओं
#SantRampalJiMaharaj
हिंदू बांधवांनो सावधान
आमचे उद्दिष्ट :- खरे ज्ञान कथन करून जगातील मानवांना सनातन बनवणे कारण पूर्वीचा एकच सनातन धर्म होता असे भूतकाळात दिसून येते. तत्वज्ञानाअभावी आपण धर्मात विभागले गेले जे जगात अशांततेचे कारण बनले आहे.
ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत.
सर्वांचा स्वामी एकच आहे ही गोष्ट जगातील मानव कोणत्याही विरोधाशिवाय मान्य करतात.
पण तो कोण आहे?
ते कसे आहे,
म्हणजे ते साकार किंवा निराकार आहे?
मानवी रूपात की अन्य रूपात?
हे प्रश्नचिन्ह ❓ अजूनही आहे.
आता संत रामपालजी महाराजांनी हे प्रश्नचिन्ह (❓)
पूर्णपणे काढून टाकले आहे.
संत रामपाल जी महाराज अनमोल सत्संग साधन टीव्ही चॅनल ७.३० पहा
1 note · View note