Tumgik
#इंग्लंडला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी लाहोर – कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंड संघातील अनेक खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना अज्ञात विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू व सपोर्ट स्टाफ अचानक कसे आजारी पडले याचा शोध आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञ घेत आहेत. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 October 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश;राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्यसरकारला नोटीस
आरोग्यासह विविध समस्यांवर चर्चेसाठी विधीमंडळाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी
बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ;इंग्लंडला हरवत न्यूझीलंडची विजयी सलामी
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारताची तीन सुवर्णपदकांना गवसणी
****
राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातल्या आरोग्य सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाही दिलेले आहेत, त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं.
**
शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल द्यावा, असं त्यात म्हटलं आहे.
****
दरम्यान, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी काल नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसंच रुग्णांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही काल या रुग्णालयाला भेट दिली. शिंदे सरकार संवेदनाहीन असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातल्या डॉक्टरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिष्ठाता आणि बालरोग विभागातल्या डॉक्टरांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे या रुग्णालयात आई आणि नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
****
आरोग्यासह राज्यातल्या विविध समस्या हाताळण्यात शिंदे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून, या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचं दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिलं. शासकीय रुग्णालयांमधल्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांवर कारवाई करावी, मृत रुग्णांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी, शासनसेवेतली पदं कंत्राटी स्वरुपात भरण्याचा शासननिर्णय तत्काळ रद्द करावा, आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं आणि अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोध केला आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची कोविड काळातली देय नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आठ दिवसात दिल्यास, पीक विमा कंपन्यांवर कारवाईचा इशारा, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेत सहभागी असलेल्या सहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांकडून दोनशे चोवीस कोटी रुपये येणं बाकी आहे, कोविड ही जागतिक आपत्ती होती, त्यामुळे कंपनीने सहकार्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.
****
सिक्कीम मध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १८ वर पोहोचली असून, २६ जण जखमी झाले आहेत. तर लष्कराच्या सैनिकांसह सुमारे शंभरावर लोक बेपत्ता आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातले सैनिक पांडुरंग तावरे यांचाही समावेश आहे. ते पाटोदा तालुक्यातल्या काकडहिरा इथले रहिवासी आहेत.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या काल बहीण-भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. अश्विनी जाधव आणि रोहित चव्हाण असं यांचं नाव असून, ते दोघं कपडे धुण्यासाठी ता तळ्यावर गेले असताना ही दुर्घटना घडली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा इथं देखील कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. दीपक, सानिया आणि कृष्णा सुरवसे अशी त्यांची नावं असून, हे तिघेही आई-वडिलांना कपडे धुण्यात मदत करण्यासाठी तलावावर गेले असता हा अपघात झाला.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं ५० षटकात नऊ बाद २८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघानं ३७व्या षटकात एक गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. भारताचा या स्पर्धेतला पहिला सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियासोबत चेन्नईत होणार आहे.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल १२ व्या दिवशी भारतानं तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारत २१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ३३ कांस्य पदकांसह एकूण ८६ पदकं जिंकून पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
‘‘तिरंदाजीत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सुवर्ण पदक पटकावलं. पुरुष संघानं दक्षिण कोरियाचा, तर महिला संघानं तैवानचा पराभव केला. स्क्वॅश मध्ये मिश्र दुहेरी प्रकारात दिपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं. स्क्वॅश मध्येच पुरुष एकेरीत सौरव घोषालनं रौप्य, तर कुस्तीमध्ये अंतिम पंघालनं कांस्य पदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये एच. एस. प्रणॉयनं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या पुरुष कबड्डी संघानं अ गटातलं प्रथम स्थान कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.’’
****
दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध सोयी सवलती मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. हिंगोली इथं काल 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' या उपक्रमात ते बोलत होते. दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध प्रमाणपत्रांचं यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आलं.
****
काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी अधिष्ठातांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं. नांदेडच्या रुग्णालय अधिष्ठातांना स्वच्छतागृहाची सफाई करायला लावणारे खासदार हेमंत पाटील यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धुळे इथंही या मागणीसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं.
****
पर्यावरणविषयक पत्रकारितेसाठी अर्थ जर्नालिझम नेटवर्क या संस्थेच्या अक्षय ऊर्जा कार्यशाळेला काल छत्रपती संभाजीनगर प्रारंभ झाला. आयआयटी पवईच्या प���्यावरण विभागातले प्राध्यापक डॉ. श्याम असोलेकर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ पर्यावरणासाठी जागरूकतेने प्रयत्न करण्याची गरज डॉ असोलेकर यांनी व्यक्त केली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातून संवादक, तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले आहेत. काल पहिल्या दिवशी, प्रयास चे अश्विन गंभीर, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे महाव्यवस्थापक विनोद शिरसाट आदींनी मार्गदर्शन केलं.
****
`मेरी माटी - मेरा देश` अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे काल शहरात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, नागरिकांनी यावेळी कलशात माती संकलित केली. ही माती दिल्ली इथं अमृत वाटिकेसाठी पाठवली जाणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गेवराई इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या संस्थेतल्या सर्व कर्मचारी प्रशिक्षणार्थींनी उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरही स्वच्छ केला.
वडवणी इथंही काल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह डॉ. बाबासाहेब अंबेडकर चौक आणि महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
****
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जनतेशी संवाद साधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात सुरु असलेल्या होऊ दे चर्चा या उपक्रमात काल माजी खासदार चंद्रकांत खैरे सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचा पराभव निश्चित असल्यानं त्या धास्तीनं सरकार निवडणूक घेत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. या उपक्रमाअंतर्गत पक्षाचे नेते जनतेशी संवाद साधत आहेत.
****
0 notes
marathiessay · 4 years
Text
Essay On Mahatma Gandhi In Marathi
Tumblr media
Essay on Mahatma Gandhi in Marathi: महात्मा गांधीजींना आपण सर्व ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखतो तसेच महात्मा गांधीजी “बापू” या नावानेही ओळखले जात. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. मोहनदास लहानपणापासूनच आज्ञाधारक होते. त्यांना लहानपणापासूनच शिस्तीची सवय होती. त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती तसेच खरे बोलायची सवय होती.
महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय काण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली. तेथील हिंदी लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले.
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा
2 notes · View notes
pustakansh · 2 years
Text
पॅलेस्टाइन - इस्रायल - एका अस्तित्वाचा संघर्ष
पॅलेस्टाइन – इस्रायल – एका अस्तित्वाचा संघर्ष
१९१६ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान इंग्लंडला ‘ॲसिटोन’ नावाच्या रसायनाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत होती. बंदुकीच्या गोळ्या तसेच इतर दारुगोळ्यामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. फ्रान्स विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी इंग्लंडला ३०००० टन ॲसिटोन ची गरज होती. त्यावेळी ब्रिटिश लष्कराशी संबंधित विभागात काम करणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांनी ही गोष्ट रसायनशास्त्रज्ञ आणि झियोनिस्ट विचारसरणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IND vs ENG: ऋषभ पंतबद्दल युवराज सिंगचे ४५ मिनिटांचे संभाषण ट्विट, इंटरनेटवर तुफान चर्चा युवराज सिंगचा उल्लेख होताच लोक प्रश्न विचारू लागले
IND vs ENG: ऋषभ पंतबद्दल युवराज सिंगचे ४५ मिनिटांचे संभाषण ट्विट, इंटरनेटवर तुफान चर्चा युवराज सिंगचा उल्लेख होताच लोक प्रश्न विचारू लागले
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी वनडे: मँचेस्टरमधील तिसऱ्या वनडेत भारताने इंग्लंडला ५ गडी राखून पराभूत करून वनडे मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर युवराज सिंगचे एक ट्विट काही वेळातच व्हायरल झाले. हे ट्विट ऋषभ पंतबद्दल होते. युवराजने ट्विटमध्ये सूचित केले की सामन्यापूर्वी मी आणि भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज यांच्यात 45 मिनिटे संभाषण झाले आणि परिणामी, ऋषभ पंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपले पहिले शतक…
Tumblr media
View On WordPress
#IND vs ENG तिसरा एकदिवसीय स्कोअरकार्ड#इंग्लंड क्रिकेट संघ#ऋषभ पंत#ऋषभ पंत का पहला ओडी शतक#ऋषभ पंत बातम्या#ऋषभ पंतची कारकीर्द#ऋषभ पंतचे पहिले एकदिवसीय शतक#ऋषभ पंतचे पहिले वनडे शतक#ऋषभ पंतचे वनडेतील पहिले शतक#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#टीम इंडिया#भारत विरुद्ध इंग्लंड २०२२#भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी वनडे#भारताचा इंग्लंड दौरा#भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव केला#भारताने तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा पराभव केला#भारतीय क्रिकेट संघ#युवराज सिंग#युवराज सिंग ऋषभ पंतसोबत ४५ मिनिटे संभाषण#युवराज सिंगचे ट्विट#हार्दिक पांड्या#हार्दिक पांड्यासोबत ४५ मिनिटे संभाषण#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
darshaknews · 2 years
Text
IND vs ENG 1st T20: भारताने इंग्लंडसमोर ठेवले 199 धावांचे लक्ष्य, हार्दिकने झंझावाती अर्धशतक ठोकले
IND vs ENG 1st T20: भारताने इंग्लंडसमोर ठेवले 199 धावांचे लक्ष्य, हार्दिकने झंझावाती अर्धशतक ठोकले
इंग्लंड विरुद्ध भारत 1ली T20I, द रोझ बाउल साउथम्प्टन: साउथहॅम्प्टनच्या द रोज बॉल स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम खेळून इंग्लंडला 199 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडून हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 51 धावांची स्फोटक खेळी खेळली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा 24 आणि इशान किशन 08 धावांवर…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years
Text
विक्रमी वर्ल्डकप विजेतेपदापासून भारत एक पाऊल दूर; आज इंग्लंडविरुद्ध फायनल, कोणाचे पारडे जड! - india vs england final of the under-19 world cup today;india will go on to win the fifth icc world cup
विक्रमी वर्ल्डकप विजेतेपदापासून भारत एक पाऊल दूर; आज इंग्लंडविरुद्ध फायनल, कोणाचे पारडे जड! – india vs england final of the under-19 world cup today;india will go on to win the fifth icc world cup
नॉर्थ साउंड (अँटिग्वा): आठव्यांदा फायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारताचे लक्ष्य आहे ते इंग्लंडला नमवून १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कपचे जेतेपद (England U19 Vs India U19 Final) पटकावण्याचे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता व्हिवियन रिचर्ड्स मैदानावर ही अंतिम फेरी रंगणार आहे. भारताने अशी कामगिरी केली तर हे भारताचे पाचवे युवा जग्गजेतेपद ठरेल. सध्याचा फॉर्म बघता जेतेपदासाठी यश धुलच्या भारतालाच ‘फेव्हरिट’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
भारत 151 धावांनी विजयी | 49 बॉल शिल्लक असताना  इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावांवर गुंडाळला; सिराजने 4 घेतले बळी
भारत 151 धावांनी विजयी | 49 बॉल शिल्लक असताना  इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावांवर गुंडाळला; सिराजने 4 घेतले बळी
 लंडन : भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत हरवून 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या नाबाद 89 धावांच्या भागीदारीमुळे भारताने 272 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लिश संघ 120 धावांवर सर्वबाद (ऑलआउट) झाला. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. त्याने जोस बटलर, मोईन अली,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 3 years
Text
ब्रेकिंग न्यूज: बीसीसीआयने डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या 20 पुरुष पथकाची घोषणा केली
ब्रेकिंग न्यूज: बीसीसीआयने डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या 20 पुरुष पथकाची घोषणा केली
  भारतीय संघाने या सामन्यासाठी जंबो पथक निवडले. या संघात मधल्या फळीत सर्वाधिक चार सलामीवीर, फलंदाजांसह दोन किंवा तीन विकेटकीपर, 8 ते 9 वेगवान गोलंदाज आणि सुमारे 5 फिरकीपटू निवडले गेले. पथकाच्या सदस्यांची यादी होताच, आता सर्व खेळाडू इंग्लंडला रवाना होतील जेणेकरून तेथील परिस्थितीशी जुळवून घेता येईल. माध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या जंबो पथकामागील एक मोठे कारणही पुढे येत आहे, असे झाल्यास टीम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
इंग्लंडमध्ये हापूस निर्यातवाढ शक्य 
रत्नागिरी ः इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून, त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे. त्याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून, हापूसची निर्यात ३० ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत रत्नागिरीतून पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  देशभरातून दरवर्षी विविध प्रकारच्या आंब्यांची पन्नास हजार टन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
IND vs ENG : टीम इंडियानं इंग्लंडला 100 रन्सनी हरवलं; रोहित, शमी आणि बुमरानं असा मिळवून दिला विजय
https://bharatlive.news/?p=182109 IND vs ENG : टीम इंडियानं इंग्लंडला 100 रन्सनी हरवलं; रोहित, शमी आणि बुमरानं असा ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
औरंगाबाद इथं आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच लोकार्पणासह छत्रपती संभाजीनगर नामफलकाचं अनावरण
राज्यातल्या दुष्काळी पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीवर अनाठायी खर्च-विरोधकांची टीका
राज्यगीतातले शब्द सार्थकी ठरवण्यासाठी सरकार कार्यरत-सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची येत्या सहा ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
आणि
उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन;विभागात विविध कार्यक्रमांना उत्साहात प्रारंभ
****
औरंगाबाद इथं आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन तसंच महानगरपालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी राज्य मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य, विविध विभागांचे सचिव आणि अधिकारी वर्ग औरंगाबाद शहरात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आज सकाळी शहरात येणार असून, नऊ वाजेच्या सुमारास शहरातल्या विविध प्रकल्प इमारतींचं ऑनलाईन भूमीपुजन, लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं ई - भूमीपुजन, सातारा आणि देवळाई परिसरातल्या मलनि:स्सारण योजनांचं ई भूमीपुजन, हसूल इथल्या घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युमेंट्री फिल्म आणि पोस्टल कव्हर प्रकाशन होणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुका-जिल्हा-विभाग नामकरण फलकाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे.
सकाळी ११ वाजता स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होईल, आज रात्री क्रांती चौकात होणार्या गर्जा मराठवाडा या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण उद्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमांमुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
****
राज्यात दुष्काळ असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अनाठायी खर्च होत असून, येणाऱ्या काळात याचा जाब द्यावा लागेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, २०१६ मध्ये औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचं काय झालं, असा सवालही राऊत यांनी विचारला.
काँग्रेस पक्षानेही मंत्रिमंडळ बैठकीसाठी होणाऱ्या खर्चावरून सरकारवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने जनतेच्या पैशाची उधळपट्टी करुन स्थानिकांच्या जखमेवर सरकार मीठ चोळत असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यगीतातले शब्द सार्थकी ठरवण्यासाठी आपलं सरकार कार्यरत असल्याचं, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यानं घेण्यात आलेल्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिरक वितरण सोहळा, काल औरंगाबाद इथं झाला, या सोहळ्यात पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुनगंटीवार बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडला जात असल्याचं त्यांनी सांगितलं...
‘‘मी अशा काळामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री झालो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साडे तीनशेवा सोहळा आहे. आणि हे माझं सौभाग्य आहे, की ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनखं आणायला आम्ही नोव्हेंबरमध्ये चाललोय. आणि या ऊर्जेतून आमचा महाराष्ट्र, जे राज्यगीत आम्ही निश्चित केलंय, त्याचे शेवटचे शब्द यथार्थ आणि सार्थकी करेल, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..’’
राज्यात ७५ नाट्यगृह उभारण्यात येत असून, लातूर आणि परभणी इथल्या नाट्यगृहांच्या प्रलंबित कामं पूर्ण केलं जाईल, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं...
‘‘जी नाट्यगृह जीर्ण झालेली आहेत, त्यांना संजीवनी देण्याचा उपक्रम आहे. आपण निर्णय केला की आता ७५ ठिकाणी नवीन सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आता तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा लोकांना असा मंच उपलब्ध व्हावा. लातूर आणि परभणी या दोन्हीही जिल्ह्याची नाट्यगृहं अर्धवट आहेत. ही दोन्ही नाट्यगृहं मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमापासून तुम्ही ताबडतोब पूर्ण करावे, अशा सूचनाही आपण यानिमित्ताने दिल्या.’’
****
शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा असल्याचं प्रतिपादन, राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे 'शिखर सावरकर' पुरस्कार, राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत राजभवनात झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्यांच्या वारशाचं जतन केल्यास आणि जबाबदार पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून किल्ल्यांचं संरक्षण होईल, आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असं राज्यपालांनी सांगितलं. ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांना 'शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर मोहन हुले यांना 'शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावर्षीचा 'शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार' ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या 'दुर्गवीर प्रतिष्ठान' या संस्थेला देण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं येत्या सहा ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावलं आहे. दोन्ही गटांनी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहावं असा आदेश आयोगानं दिला आहे. निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप आदेश १९६८ च्या तरतुदींनुसार या प्रकरणी, आयोग सविस्तर चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांनी १९९९ मधे स्थापन केलेल्या या पक्षातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट वेगळा झाला असून ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा या गटाने केला आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठात आज मराठवाडा मुक्तिसंग्रामावर परिसंवाद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या परिसंवादात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर, निवृत्त न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, प्राध्यापक सुहास पळशीकर, प्राध्यापक गोपाळ गुरु, आणि मुकुंद कुलकर्णी यांचं सत्र होणार आहे. कांचनवाडी इथं विधी विद्यापीठात हा कार्यक्रम होणार आहे.
औरंगाबाद इथल्या क्रांती चौकातून काल विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. सुमारे पाच हजारावर विद्यार्थी यात सहभागी झाले, या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासनं, मुष्टीयुद्ध, तसंच लेझीमची प्रात्यिक्षिकं सादर केली.
वेणुताई चव्हाण कन्या प्रशालेत किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. वयात येतांना होणारे शारिरीक-मानसिक बदल, मासिक पाळी, आहार, व्यायाम या��िषयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
**
मुक्तिलढ्याचे विविध आयाम लक्षात घेतल्याखेरीज मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं महत्त्व समजणार नाही, असं मत, अभ्यासक सारंग टाकळकर यांनी व्यक्त केलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. निजामी राजवट आणि मुक्तीसंग्राम याबद्दल टाकळकर यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ रश्मी बोरीकर यांचं यावेळी 'लढ्यातील महिला क्रांतिकारक' या विषयावर व्याख्यान झालं. स्वतःच्या जीवाची, अब्रूची पर्वा न करता या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रं पुरवण्याचं काम केलं, आणि मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावली, असं बोरीकर यांनी सांगितलं.
****
हैदराबाद मुक्तीच्या लढ्यात मराठवाड्याचा सिंहाचा वाटा असल्याचं, इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं, मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
दरम्यान, बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रभात फेरीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांना काल प्रारंभ झाला. बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी आयोजित होत असलेल्या ‘गाथा मुक्तीलढ्याची’ या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त परभणी इथं गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. आज विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येत आहे. उद्या सायंकाळी मराठवाड्याची लोकधारा या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. पाथरी इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘पीएम रन फॉर स्कील’ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात 'जिल्हाधिकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या दारी' ही मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कळमनुरीच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी काल आखाडा बाळापूर इथं हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून, प्रभातफेरी काढली, तसंच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुरभाजी पाटील हेंद्रे यांच्या घरी भेट देऊन, त्यांचा सत्कार केला. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कोंडबाराव पाटील जरोडकर यांच्या वारसांचाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सत्कार केला.
वसमत इथं मराठवाडी बोलीचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या 'मराठवाडी बोली, बोलू कौतुके' या समूहाच्या सभासदांचा कथाकथन आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर झाला.
****
नांदेड इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त आज आणि उद्या मॅराथॉन आणि जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पुरुष आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे.
****
मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. काल वाकेथॉन” वॉक फॉर नेशन ही प्रभातफेरी काढण्यात आली. विविध ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामाच्या शौर्यगाथा स्वातंत्र्यवीरांच्या इतिहासाचं वाचन करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी पथनाट्याद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत ७५ दिवे लावून तसंच ७५ हजार वृक्षांची लागवड करून हा उत्सव साजरा केला जात आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामातल्या सशस्त्र लढ्याच्या आठवणी अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या आहेत. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात टाकळगाव इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव पिंपळे यांनी या लढ्यात निजामाच्‍या पोलिस चौक्या उध्वस्त करण्याची जबाबदारी पार पाडली, आज ७५ वर्षांनंतरही ही आठवण सांगताना, त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. ते सांगतात...
‘‘आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी २२ कॅम्प टाकले. प्रत्येक केंद्रामध्ये ३०/३५ माणसं होते. त्या केंद्रात दारुगोळा सगळा भरपूर होता. तिथून हत्यारं न्यायचे, बॉम्ब न्यायचा, आणि तहसील कार्यालयं उध्वस्त करायचे, करोडगिरी नाके उध्वस्त करायचे, माझ्यासंगट बारा कार्यकर्ते होते. चकलांबा, तलवाडा, गेवराई, पिंपळनेर, आणि बीड पाच पोलिस स्टेशन उध्वस्त केले. आणि मग रझाकारांनी बायांवर अत्याचार सुरू केला. अन मग तिकडून हे हे करत रणगाडे धाड धाड करीत आले अन खटा खटा खटा करत यंत्रणा ताब्यात घेतली, अन १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्त झाला.’’
****
राज्यातल्या ७५ नद्यांमधला गाळ काढण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं, नदी की पाठशाला अंतर्गत, मन्याड नदी किनाऱ्यावरील १५० शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. काल सिद्धदयाळ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते या शिबीराचा प्रारंभ झाला. आमदार जितेश अंतापूरकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ.जयंत कुळकर्णी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत १८ सप्टेंबर पर्यंत तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे.
****
माजी मंत्री आदित्य ठाकरे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी पैठण इथं शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
****
लातूर जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातले सर्व पाणीसाठे हे फक्त पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहेत. इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करून नये, तसंच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असं आवाहन लातूर पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
जालना शहर महानगरपालिकेत काल अभियंता दिवस साजरा करण्‍यात आला. सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया यांच्या स्मृतिंना अभिवादन करून, महापालिकेच्या विविध विभागातल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मधल्या शेवटच्या सामन्यात काल भारताला बांग्लादेशकडून सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलंबो इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशनं प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला भारतीय संघ शेवटच्या षटकात २५९ धावांवर सर्वबाद झाला.
या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे.
****
हवामान
औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
marathinewslive · 4 years
Text
भारताने 2 दिवसांत दुस Test्यांदा कसोटी सामना जिंकला | भारत विरुद्ध इंग्लंडः आतापर्यंत दोन दिवसांत 21 दिवसांत कसोटीची समाप्ती झाली आहे, दुस the्यांदा भारताने विजय मिळविला असून या संघाने सर्वाधिक 9 वेळा विजय मिळविला आहे.
भारताने 2 दिवसांत दुस Test्यांदा कसोटी सामना जिंकला | भारत विरुद्ध इंग्लंडः आतापर्यंत दोन दिवसांत 21 दिवसांत कसोटीची समाप्ती झाली आहे, दुस the्यांदा भारताने विजय मिळविला असून या संघाने सर्वाधिक 9 वेळा विजय मिळविला आहे.
डिजिटल डेस्क, अहमदाबाद. येथील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिस third्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले आणि या लांब स्वरुपात दोन दिवसांत दुसर्‍यांदाच कसोटी सामना जिंकला. जून 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या दिवशी भारताने आपला पहिला कसोटी सामना जिंकला होता, जेव्हा त्यांनी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years
Text
पहिल्या डावात केवळ 112 धावांवर इंग्लंडला गुंडाळले
पहिल्या डावात केवळ 112 धावांवर इंग्लंडला गुंडाळले
अहमदाबाद-प्रतिनिधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लं यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात केवळ 112 धावांवर इंग्लंडला गुंडाळून गोलंदाजीनंतर टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 99 धावा केल्या. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा 57 आणि अजिंक्य रहाणे एका धावांवर नाबाद परतला. तत्पूर्वी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
करोनानंतरच्या पहिल्या मालिकेत इंग्लंडचा दणदणीत विजय
करोनानंतरच्या पहिल्या मालिकेत इंग्लंडचा दणदणीत विजय
[ad_1]
करोनानंतर पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला आहे. या मालिकेतील आजच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने २६९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका २-१ अशी जिंकली आहे.
या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद यांनी इंग्लंडला धावा करण्यापासून रोखण्यासाठी टिप्स दिल्या, असा खुलासा इंग्लंडचे माजी प्रशिक्षक
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद यांनी इंग्लंडला धावा करण्यापासून रोखण्यासाठी टिप्स दिल्या, असा खुलासा इंग्लंडचे माजी प्रशिक्षक
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घकाळापासून त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे. एक काळ असा होता की तो मैदानात फटकेबाजी करायचा, शतक ठोकायचा, विक्रम मोडायचा आणि इतिहास रचायचा. मात्र, नोव्हेंबर 2019 पासून तो शतकासाठी तळमळत आहे. त्याच्या तंत्रातील दोष शोधण्यात अयशस्वी झाल्यानंतर, अनेक दिग्गज आणि तज्ञांनी त्याच्या खराब फॉर्मसाठी नशिबाला दोष दिला आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू…
Tumblr media
View On WordPress
0 notes