Tumgik
#उलगडल
mazyagoshti · 3 years
Text
पृथ्वी २.० : भाग १
ही कथा आहे एका नव्या पृथ्वीची, सुरुवात एका नव्या युगाची. मानव प्रजाती वाचवण्याची एक धडपड, ज्यात मानवाला ते लोक मदत करतात, ते लोक कोण असतात? ते मानवाला जीवन वाचवण्यासाठी का मदत करतात? ते परग्रही लोक आणि आपल्यामध्ये काही नात आहे का? या सारख्या अनेक प्रश्न मनात सोडून जाणारी ही कथा. जीवन कधीच थांबत नाही त्याला एक मार्ग बंद झाल्यावर तो लगेच जगण्यासाठी दुसरा मार्ग उघडतो.
आपण रात्री जेव्हा आकाशाकडे पाहतो तेव्हा मनात प्रश्न येतो, की आपण ह्या संपूर्ण विश्वात एकटेच आहोत का? या प्रश्नाच उत्तर मानव कित्येक वर्षापासून शोधतोय आपल्या आकाशगंगेतील पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे, जिथे मानव राहू शकतो, जिथे जीवन आहे, पाणी आहे, वातावरण आहे, जीवनाला आवश्यक असणारे सर्व घटक पृथ्वीवर आहेत, पण आपल्याला आपल्या जन्माचा रहस्य फारसं उलगडल नाही. या विश्वाची निर्मिती कशी झाली? हा एक मोठा प्रश्न आपल्याला सतावतोय त्याची उत्तरे आपल्याकडे अजून नाहीत.
या सगळ्यात आपण हे विसरून जातो की आपण या जगात एकटेच आहोत का? आपल्याला कोणी आकाशातून पाहताय का? आपल्या वर कोणी लक्ष्य ठेऊन आहे का? या विश्वातील २०० कोटी दीर्घिका आहेत ज्या आत्तापर्यंत आपल्या ज्ञात आहेत, पण हा आकडा अजून फार मोठा असण्याची शक्यता दाट आहे. त्या पैकीच कुठेतरी जीवन असण्याची शक्यता आहे. तिथे कुठेतरी जीवनाचे अस्तित्व असेल का ? या अथांग विश्वात आपल्या सारखं किंवा आपल्या पेक्षा प्रगत असं कोणी तरी असेल का? आपण ज्या प्रमाणे त्यांचा शोध घेतोय त्याचप्रमाणे ते देखील आपला शोध घेत असतील का? आपण ज्यांना शोधतोय त्यांनी आपल्याला अगोदरच शोधलाय का?
या सारखे असंख्य प्रश्न रोज माझ्या डोक्यात गोंधळ घालायचे, पण त्या घटनेनंतर माझे आयुष्याच बदलून टाकलं.
तसा मी एक खगोलशास्त्रज्ञ एका सरकारी संस्थेसाठी मी काम करत होतो, जी संस्था मानवाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत होती. कारण इथे पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व धोक्यात आले होते. ह्या परिस्थितीला मानवच जबाबदार होता. पृथ्वीवर प्रदूषणाची पातळी भयानकरीत्या वाढली होती. मानवाने विज्ञानात जेवढी प्रगती केली, तेवढीच पृथ्वीला हानी ही पोहचवली होती. जागतिक हवामान बदलाचे मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसु लागले होते. आम्हाला आमची चूक समजली पण फार उशिरा, वेळ हातातून निघून गेली होती. तरी ही मनुष्य पृथ्वीला वाचवण्याचे प्रयत्न करत होता. मानवी जीवन वाचवण्याच्या प्रयत्नात होता. मानवाच्या हातात फार कमी वेळ होता. परिस्थिती हात बाहेर जात होती. सर्वस्तरातून प्रयत्न चालूच होते. विविध विचार समोर येत होते. तसेच ते फेटाळले ही जात होते. एक वेळ अशी येणार होती की मानवाला पृथ्वी सोडण्यावाचून पर्यायच उरणार नव्हता. पृथ्वीला पर्यायी ग्रहाचा शोध सुरु होता त्यासाठी लागाणरे तंत्राज्ञान मानवाला विकसित करायचे होते. त्यासाठी मानावाचे प्रयत्न चालूच होते. पण एक मोठा प्रश्न होता की एवढया लोकांना दुसऱ्या ग्रहावर न्यायचं कसं, जरी पृथ्वीवरील सर्व साधन संपत्तीचा वापर करून असे करायचे ठरवले, तरी ते शक्य नव्हतं कारण पृथ्वीवर आता तेवढी साधन संपत्तीच शिल्लक राहिली नव्हती. दुसरा मार्ग म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात, जर मानव जामात टिकवून ठेवायची असेल तर एका दुसऱ्या ग्रहावर नव्याने जीवनाचे बीज रोवावे लागणार होते. हाच एक मार्ग होता, पृथ्वीवरील जीवन टिकवण्याचा. पृथ्वीवरील सर्व सरकारी वैज्ञानिक संस्था यावर काम करत होत्या. मी देखील त्या संस्थेचा एक भाग होतो. त्या मिशनसाठी मानवी भ्रूण, काही वनस्पतीं प्राण्यांचे नमुने जतन करून ठेवले होते. आमची टीम पृथ्वी सारख्या दुसऱ्या ग्रहाच्या शोधात होती. पण हाती काहीच लागत नव्हत. मानवाला प्रयत्न चालूच ठेवावे लागणार होते कारण त्याला ही मनुष्य प्रजाती टिकून ठेवायची होती.
माझे ही प्रयत्न सुरूच होते, मी त्या कामासाठी माझ्या फार्म हाउसवरील प्रयोगशाळेत होतो. या कामा बरोबरच एका दुसऱ्या कामात ही मी व्यग्र होतो. मला त्यांचा शोध घ्यायचा होता, मला पराग्रह्या मध्ये विशेष रस. मला खात्री होती की या विश्वात दुसर कोणी तरी नक्की असणार, म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होतो. मी विविध प्रकारचे संदेश अवकाशात वेगवेगळ्या दीर्घिका मध्ये पाठवाचो आणि त्यांच्या उत्तराची वाट बघायचो त्या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नव्हत. या आधी माझ्यासारख्या विचारांचे खूप लोक होते पण हाती काहीच लागत नसल्याने त्यांनी हा विचार सोडून दिला होता. पण मी काही आशा सोडली नव्हती. मला खात्री होती की एक न एक दिवस ते आपल्याशी संपर्क साधणार, विश्वास होता की कधीतरी आपली त्यांच्याशी नक्की भेट होणार आणि माझा तो विश्वास खरा ठरला.
त्या रात्री मी नेहमी प्रमाणे जेवनांनंतर आकाश निरीक्षणासाठी गच्चीवर गेलो. तेवढ्यात एक चमत्कार झाला. माझ्यासाठी तो चमत्कारच होता. कारण बहुदा त्यांना माझा संदेश मिळाला होता. माझा रिसीवर बीप करत होता. त्याला कहीतरी सापडला होत. मी तो आवाज ऐकून लगेचच माझ्या संगणका जवळ गेलो. तिथे एक बायनरी अंकांची मालिका रिसीव झाली होती. तो संदेश काही चुकून रिसीव झाला नव्हता. तर तो पाठवला होता. पृथ्वीवरील इतर उपकरणामुळे अनेक वेळा संदेश यायचे पण तो संदेश नेहमी सारखा त्रुटी संदेश नव्हता. मी लगेच तो संदेश डिकोड करायला घेतला. एक प्रोग्राम च्या मदतीने मी तो संदेश डिकोड केला. तो संदेश असा होता “Hello we are Coming !”. हे वाचल्यानंतर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. “आम्ही येतोय !” पण कधी ते काही नमूद नव्हते. मला पुन्हा शंका झाली म्हणून मी तो सिग्नल पुन्हा तपासुन बघितला. तेव्हा माझी खात्री पटली की तो संदेश त्यांनीच पाठवलाय म्हणून , कारण तो सिग्नल ज्या रेन्ज मधून रिसीव झाला होता त्या रेन्ज मधून ट्रान्समिट करायला इथे कोणालाच परवानगी नव्हती. त्यामुळे तो सिग्नल पृथ्वी वरील नक्कीच नव्हता. तो पराग्रहीयानीच पाठवला असावा. माझ्या इतक्या वर्षांची मेहनत फळास आली होती. त्यांच्या अस्तित्वाची एक छोटीशी खूण माझ्या हाती लागली होती.
क्रमश:
0 notes