Tumgik
#गैरहजर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“जशी काय मी नोकर आहे” नेताजींच्या पुतळा अनावरण निमंत्रणावरुन ममता बॅनर्जी संतापल्या, सोहळ्याला राहणार गैरहजर
“जशी काय मी नोकर आहे” नेताजींच्या पुतळा अनावरण निमंत्रणावरुन ममता बॅनर्जी संतापल्या, सोहळ्याला राहणार गैरहजर
“जशी काय मी नोकर आहे” नेताजींच्या पुतळा अनावरण निमंत्रणावरुन ममता बॅनर्जी संतापल्या, सोहळ्याला राहणार गैरहजर एका मुख्यमंत्र्यांला उपसचिव अशाप्रकारचे पत्र कसे लिहू शकतो? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’ परिसरात बांधण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
वहितला एक उतारा—मनोदशा
माझ्या वहितला एक उतारा.मला आठवतं हे लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो.शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती.वैताग आला होता.दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं.आजही तसंच वाटत होतं.म्हणून वहितला उतारा वाचत होतो. “मला असं वाटतं की,( मूड ) मनोदशा सतत बदलत असते आणि काही सेकंदात बदलली जाऊ शकते.जीवनातला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ; उस्मानाबाद इथं ३६ तर लातूर इथं ४३ अर्जांची उचल
राज्यात शंभरीतले ५६ हजारावर मतदार; हिंगोली तसंच परभणीत गृह मतदानाची तयारी पूर्ण
निवडणूक कामात हलगर्जी प्रकरणी धाराशिव इथं दोन कर्मचारी निलंबित; नांदेड इथं एका पत्रकाराविरोधात फेकन्यूज प्रकरणी गुन्हा दाखल
आणि
मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस; छत्रपती संभाजीनगर इथं दोघांचा तर बीड जिल्ह्यात एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. या टप्प्यात राज्यात उस्मानाबाद आणि लातूरसह, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिर���-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे.
या सर्व मतदारसंघात १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. २० एप्रिलला अर्जांची छाननी होईल, २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून ७ मे रोजी मतदान होणार आहे.
सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघासाठी काल पहिल्या दिवशी ७७ जणांनी १२२ अर्ज नेले. तर सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून दीपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालं नाही. मात्र उस्मानाबाद इथं १८ व्यक्तींनी ३६ नामनिर्देशनपत्रं तर लातूर इथं काल पहिल्या दिवशी २० जणांनी ४३ अर्ज नेल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ काल गोंदिया इथं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सभा घेतली. आज याच मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे.
वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी काल यवतमाळ इथं डॉक्टर, वकील, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद मेळावा झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याप्रचारार्थ झालेल्या मेळाव्यालाही शिंदे यांनी संबोधित केलं.
पालघरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. ठाकरे यांनी यावेळच्या भाषणात वाढवण बंदराच्या मुद्यावर भर दिल्याचं दिसून आलं.
****
राज्यात शंभरी गाठलेले ५६ हजार ८१० मतदार आहेत. निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा दिली आहे. या सुविधेसाठी इच्छुक असलेल्या पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानासाठी ‘फॉर्म १२ डी’ प्रदान करण्यात येतो.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात एक हजार २५८ मतदारांचं गृह मतदान घेतलं जाणार आहे. यामध्ये एक हजार २० ज्येष्ठ नागरिक, २२६ दिव्यांग आणि अत्यावश्यक सेवेतल्या १२ मतदारांचा समावेश आहे. १४ ते १६ एप्रिल आणि २०-२१ एप्रिल असं दोन टप्प्यात हे मतदान पथकाद्वारे संबंधितांच्या घरी भेट देऊन नोंदवलं जाणार आहे.
****
परभणी मतदार संघातील एकूण एक हजार ६२५ मतदारांचं गृह मतदान नोंदवलं जाणार आहे. यामध्ये ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले एक हजार ३९५ मतदार तर २३१ दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदार संघात १७ ते २४ एप्रिल दरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार संबंधित मतदारांच्या घरी जाऊन हे मतदान नोंदवलं जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या दोन कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक कामात गैरहजर राहून हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या अहवालावरून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे आदेश जारी केले.
****
नांदेड जिल्ह्यात मुखेड इथल्या एका दैनिकाच्‍या तालुका प्रतिनिधीवर चुकीची बातमी प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वस्‍तुस्थिती सोडून दिशाभूल करणारं वृत्त प्रकाशित केल्याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी मुखेड पोलीस ठाण्यात हा गुन्‍हा दाखल केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बुलडाणा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
ईराण आणि इस्राइलची सद्यस्थिती लक्षात घेत पुढील सूचना मिळेपर्यंत या देशांचा प्रवास करु नये असं परराष्ट्र मंत्रालयात��्फे सांगण्यात आलं आहे. सध्या ईराण तसंच इस्राइलमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या दुतावासाशी संपर्क करत स्वत:ची नोंदणी करुन घेण्याचंही आवाहन सरकारनं केलं आहे.
****
मराठवाडा तसंच विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. टंचाई भासत असलेल्या पाणी तसंच चारा पुरवठ्यावर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात काल सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिणामी अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या कांदा तसंच इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झालं. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड इथं वीज पडून एक शेतकरी ठार झाला तर सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्यारवाडी शिवारात वीज पडून एक ३८ वर्षीय महिला ठार झाली, तर तिचा १५ वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे अर्धापूर, मुदखेड, लोहा, भोकर आदी तालुक्यात फळपिकांसह उन्हाळी पिकांचं ही नुकसान झालं आहे. नांदेड शहरासह अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
दरम्यान, राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
लातूर तालुक्यातल्या हरंगुळ इथल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे या तरुणीची ३० मार्च रोजी पुणे इथं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ काल लातूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचं नियोजन तालुकास्तरावर करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल टंचाई आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामं प्राधान्यानं घ्यावी. जेणेकरुन पुढील वर्षी टंचाई निर्माण होणार नाही, अशी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. जिल्ह्यात पशूंसाठी चारा उपलब्धतेबाबत माहिती घेऊन योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितलं आहे.  
****
धाराशिव इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, समता पंधरवाडा सुरु आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे गेल्या १० एप्रिलपासून २५ एप्रिलपर्यंत हा पंधरवाडा सुरु आहे. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरण आणि ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबतही व���शेष मोहीम याअंतर्गत सुरु आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या र. भ. अट्टल महाविद्यालय प्रांगणात भीमज्योती जन्मोत्सव निमित्तानं सुमारे वीस हजार वह्यांपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारली जाणार आहे. या प्रतिकृतीचं आज सकाळी अनावरण होणार आहे. 
****
महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेत काल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं दुसरं पुष्प गुंफलं. अन्य एका कार्यक्रमात जळगाव इथले विचारवंत प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांचं, फुले-आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान झालं.
****
लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगानं काल हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं जिल्हा परिषद शाळेत शाहिरी आणि पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर करण्यात आला.
****
कर्तव्याच्या भावनेतून निवडणूक प्रक्रियेचं काम करण्याचं आवाहन बीड मतदार संघाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं आहे. सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठी काल घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
****
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाप्रमाणे नांदेड इथं राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन पाच मे रोजी करण्यात आलं होतं. मात्र निवडणूक तसंच इतर कारणास्तव ही राष्ट्रीय लोकअदालत आता २७ जुलै रोजी होणार आहे.
****
0 notes
gajananjogdand45 · 3 months
Link
https://marmikmaharashtra.com/96-64-attendance-for-first-paper-486-students-absent/
0 notes
punerichalval · 10 months
Text
मुख्यमंत्र्यांनीच गडकरींना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, पण आता एकनाथ शिंदे चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला गैरहजर राहणार?
मुख्यमंत्र्यांनीच गडकरींना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, पण आता एकनाथ शिंदे चांदणी चौकातील ......
पुणे | 12 ऑगस्ट 2023 : आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार नसल्याची माहिती आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
एखादा गुन्हा करणं आणि तो करून पळून जाणं हे गुन्हा करण्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. मुळात गुन्हा करणं हिच चुकीची बाब आहे. मात्र लोकशाही स्वीकारलेल्या आपल्या देशात कायद्यांच्या कचाट्यातून पळून बिनधास्तपणे समाजात वावरणारे अनेक ठग आपण बघत असतो.
गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हे नाव चर्चेत आले आहे, त्याने केलेल्या पराक्रमुळे आता त्याच्या वडिलांना म्हणजे शाहरुख खानला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी आर्यनला पकडले त्याच रात्री आपला सल्लू भाई शाहरुखला भेटायला गेला बहुदा कोणता वकील कर हे सांगण्यासाठी गेला असावा. दोघांच्या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण आले सोशल मीडियावर जोक्स फिरू लागले होते.
याच ऑक्टोबर महिन्यातील ४ तारखेला एका कॉन्स्टेबलचे निधन झाले होते. रवींद्र पाटील असं त्यांचं नाव, हेच रवींद्र पाटील सल्लू भाईच्या ‘त्या’ केसचे एकमेव साक्षीदार, ज्यांनी अखेरपर्यंत आपली साक्ष बदलली नाही. नेमकी काय घटना आहे चला जाणून घेऊयात…
ती घटना २००२ सालातली सलमान खानला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली. ते कॉन्स्टेबल दुसरे तिसरे कोण नसून रवींद्र पाटील होते. मूळचे धुळ्याचे असलेले रवींद्र १९९८ पासून पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते.
२८ सप्टेंबरची ती काळी रात्र, त्या रात्री सलमान आपल्या एका मित्रासोबत लँड क्रुझर गाडीने वांद्रे परिसरातील एका बारमध्ये गेला. त्यांच्यासोबत रवींद्र पाटील देखील होते मात्र त्यांना बारच्या बाहेर थांबायला सांगितले. तिथून बाहेर पडून ते तिघे दुसऱ्या बारमध्ये गेले, गाडी सलमानच चालवत होता. रात्री २च्या सुमारास ते दोघे बाहेर पडले.
सलमान मद्यधुंद होता तरीदेखील त्याने पुन्हा गाडी चालवली, रवींद्र पाटील यांनी त्याला गाडी न चालवण्याचा सल्ला दिला, मात्र नशेत असलेल्या सलमानने त्याला नकार दिला. सलमानने इतकी दारू प्यायली होती की त्याला रस्त्यावरचे वळण दिसले नाही आणि भरधाव वेगात असलेली गाडी थेट एका बेकरीत घुसली, त्याच बेकरीच्या फुटपाथवर असलेल्या काही मजुरांच्या अंगावरून ती गाडी गेली ज्यात एकाच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले.
सलमान आणि त्याच्या मित्राने शिताफीने तिथून पळ काढला, मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले रवींद्र मात्र तिथेच उपस्थित होते. त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सलमान विरोधात FIR दाखल केली आणि घडलेल्या प्रकाराची रितसर माहिती दिली.
कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले तसेच नोकरीवर गैरहजर राहिल्याने त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. पोलिसांचा ससेमिरा त्यांचा पाठी होताच त्यातच ते गायब झाले. त्याच्या कुटुंबावर देखील दबाव टाकण्यात आला होता, अखेर पोलिसांनी त्यांना महाबळेश्वर येथे पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांचे हाल केले गेले असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यावर ते भीक मागताना देखील आढळून आले होते. एकाकी पडलेल्या रवींद्र पाटीलांनी शेवटी दारूचा आधार घेतला, नंतर ते दारूच्या इतक्या अधिन झाले की त्यांना टीबी झाला आणि ते शिवडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिकडचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकूणच सलमानच्या या केसमध्ये अनेक तर्कवितर्क लावले गेले, एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात ही केस फिरत राहिली जी आजतगायत फिरते आहे. ‘सलमान आपल्या ट्रस्टमधून गरिबांची मदत करतो,ऑपरेशन करतो’, असे युक्तिवाद सलमानबद्दल सहानभूती मिळावी म्हणून वकिलाने केले.
ज्या खात्यात रवींद्र पाटील होते तिकडच्या लोकांनी देखील रवींद्र पाटीलांना मदत केली नाही उलट त्यांनी साक्ष फिरवावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता प्रसंगी लाच सुद्धा ऑफर केली होती, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत रवींद्र पाटील ठाम होते.
0 notes
gtplnewsakola · 1 year
Text
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : 320 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, गैरहजर 17 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला दि. 20 जानेवारी :- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात मतदान यंत्रणेतील 320 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान, या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 17 कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Pradip : तुमच्या किटी पार्टीत तुम्ही…
एकमेकींच्या भानगडींवर तासंतास
बोलत बसता, मग तू रोज कशाला जातेस?
Pradip chi बायको : काय करणार, जी गैरहजर असते…
तिच्याच सर्व भानगडी बाहेर काढल्या जातात.
😄😄😄😁😁😁😆😆😆😅😅😅
0 notes
marathinewslive · 2 years
Text
सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते
सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते
दिगंबर शिंदे, लोकसत्ता सांगली : महापौर निवडीवेळी भाजपमध्ये फूट पाडून भाजपला सत्तेवरून पायउतार  करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव भाजपने स्थायी सभापती निवडीवेळी उलटवून सव्याज परतफेड केली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचेच बहुमत असले तरी राष्ट्रवादीचे दोन सदस्य सभापती निवडीवेळी गैरहजर राहिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आता दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. यामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता!
Tumblr media
Photo Coutesy- Facebook/INC मुंबई | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. हे सर्व भाजपत प्रवेश करणार असल्याचंही कळतंय. काँग्रेसचे बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळात विस्तारात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. तसेच शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. दरम्यान, काँग्रेस पक्षाला मागील काही वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. नुकतंच गुलाम नबी आझाद यांनीही राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला. Online NEWS source Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला संजय शिरसाट राहणार गैरहजर?; म्हणाले,”मी कुठेही…”
मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला संजय शिरसाट राहणार गैरहजर?; म्हणाले,”मी कुठेही…”
मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला संजय शिरसाट राहणार गैरहजर?; म्हणाले,”मी कुठेही…” मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या शिंदे गट आणि भाजपामध्ये सध्या मंत्रीपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या नाराजांमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या नावाचाही उल्लेख आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाच्या सर्व आमदारांसाठी आयोजित केलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
वृक्षारोपण प्रकरण ; विद्यार्थिनीने बनाव केल्याचा चौकशी अहवालात आरोप : अहवाल चुकीचा असल्याचा विद्यार्थिनीचा दावा
वृक्षारोपण प्रकरण ; विद्यार्थिनीने बनाव केल्याचा चौकशी अहवालात आरोप : अहवाल चुकीचा असल्याचा विद्यार्थिनीचा दावा
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण प्रकरण केल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर आदिवासी आयुक्त यांनी चौकशी समिती नेमून, घटनेची माहिती घेतली. वृक्षारोपणाच्या दिवशी विद्यार्थिनी शाळेत हजर नव्हती. दोन महिन्यांपासून शाळेत सतत गैरहजर राहिल्याने कारवाईच्या भीतीतून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 06 March 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
वलयांकित व्यक्तींनी वस्तू किंवा सेवांच्या जाहिराती करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
प्रसुतीसंदर्भातल्या तीन प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची राज्य महिला आयोगाची सूचना
आणि
वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या होळी सणासाठी बाजारपेठा सजल्या;पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरे करण्याचं आवाहन
****
वलयांकित व्यक्तींनी वस्तू किंवा सेवांच्या जाहिराती करण्याबाबत केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या जाहिराती प्रेक्षकांची दिशाभूल करणाऱ्या असू नयेत, तसंच या जाहिराती ग्राहक संरक्षण कायद्याचं अनुपालन करणाऱ्या असाव्यात, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. याशिवाय, या जाहिराती अगदी सोप्या, साध्या भाषेत असाव्यात, तसंच त्यामध्ये जाहिरात, प्रायोजित, सहकार्य, सशुल्क प्रचार असे शब्दसुद्धा वापरले जाऊ शकतील, असं यात म्हटलं आहे. याशिवाय जी उत्पादनं किंवा सेवा संबंधित व्यक्तींनी स्वत: वापरलेल्या नसतील, त्याची जाहिरात या व्यक्तींनी करू नये, अशी स्पष्ट सूचना सरकारने केली आहे. जाहिरातीत केलेले दावे पूर्ण होण्यासारखे आहेत का, याची खात्री या व्यक्तींनी करून घ्यावी, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. धोकादायक पदार्थांमध्ये स्फोटकं, ज्वालाग्रही पदार्थ, विषारी पदार्थ, संसर्गजन्य तसंच क्षारक पदार्थांचा समावेश आहे.
****
कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर इथं गर्भवतीच्या प्रसुतीसंदर्भातल्या प्रकरणांची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या तिन्ही घटनांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची सूचना चाकणकर यांनी आरोग्य संचालकांना दिल्या आहेत. कोल्हापूर इथे रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे एक महिला रस्त्यातच प्रसूत झाली, मात्र आशा सेविका आणि डॉक्टरांनी तत्परता दाखवल्यामुळे आई आणि नवजात बालकाचा जीव वाचला. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर असल्यामुळे एका महिलेची तिच्या आईनंच प्रसूती केली, या घटनेतही आई आणि नवजात बालक सुखरूप आहेत. नागपूरमध्ये मात्र एका अल्पवयीन गर्भवतीनं यूट्युबवर व्हिडिओ पाहून स्वत:ची प्रसूती केली, त्यात नवजाताचा जीव गमावला. या तीनही घटनांची दखल घेत राज्य महिला आयोगानं ही कारवाई केली आहे.
****
आयुष मंत्रालयानं ‘पंतप्रधान योग पुरस्कार 2023‘ साठी अर्ज किंवा नामांकनं मागवली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योग या विषयाच्या  विकास आणि प्रोत्साहनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाकरता हे पुरस्कार दिले जातात. दोन राष्ट्रीय पुरस्कार भारतीय संस्थांना आणि दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय किंवा विदेशी संस्थांना दिले जाणार आहेत. या पुरस्कारांच्या अर्ज किंवा मानांकनाची प्रक्रिया सध्या माय जीओव्ही या मंचावर सुरू असून, येत्या एकतीस तारखेपर्यंत यासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनी, म्हणजेच येत्या एकवीस जूनला विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे.
****
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या एका विशेष न्यायालयानं येत्या वीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मद्य धोरण आणि त्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सिसोदिया गेल्या सव्वीस फेब्रुवारीपासून अटकेत आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो, उद्या, मंगळवारी एक अत्यंत आव्हानात्मक प्रयोग करणार आहे. मेघा-ट्रॉपिक्स-वन हा कालबाह्य उपग्रह इस्रो उद्या नष्ट करणार आहे. यासाठी हा उपग्रह नियंत्रित पद्धतीनं पुन्हा वातावरणात आणून त्यानंतर तो प्रशांत महासागरातल्या एका निर्जन ठिकाणी पाडला जाईल. उष्णकटिबंधीय हवामान आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी एक हजार किलो वजनाचा हा उपग्रह भारत आणि फ्रान्सच्या अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे २०११ साली प्रक्षेपित केला होता. या उपग्रहाचं अपेक्षित आयुष्य तीन वर्षांचं होतं मात्र त्यानं एका दशकाहून जास्त काळ मौल्यवान माहिती पुरवली, असं इस्रोनं म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात मातुलठाण इथल्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यानं आज आपल्या शेतातल्या दीड एकर शेतातील कांद्याची होळी केली. दीड लाख रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडणार नसल्यानं निराश होऊन त्यांनी कांद्याची होळी करण्याचा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कांदाप्रश्नी शासनानं ठोस आणि कायमस्वरूपी भूमिका घेण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यानं केली आहे.
****
वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला होळीचा सण आज साजरा होत असून, सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या, साखरगाठ्या आणि इतर साहित्याची दुकानं सजली आहेत.
होळी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांच्या वापरानं साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असून, नागरिकांना या सणांच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
"यंदाची होळी समस्त महाराष्ट्रवासियांच्या जीवनात रंगांची उधळण, आनंदाची बहार घेऊन येवो आणि समाजातल्या द्वेषभावना, वाईट विचारांचं होळीत दहन होऊन परस्परातला बंधुभाव वाढीस लागो" अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांनी वृक्षतोड न करता, प्रतिकात्मक रुपात होलिका दहन करून सण साजरा करावा, असं आवाहन निसर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, होळी पेटवताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे. होळी पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रं नाहीत याची खातरजमा करावी, भूमिगत वीजवाहिन्यांना होळीच्या उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा वाहिन्यांपासून लांब अंतरावरच होळी पेटवावी, असं आवाहनही औरंगाबाद महावितरणनं केलं आहे.
होळीचा सण सहकुटुंब आणि मित्रांसोबत शांततेत आनंदात आणि कुठलीही नशा न करता साजरा करण्याचं आवाहन छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी केलं आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. ते म्हणाले…
अनेक लोकं मोटरसायकलवर कर्कश हॉर्न वाजवत शहरात फिरतात किंवा दुसऱ्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात. हे सर्व प्रकार टाळले पाहिजे. जेणेकरुन उत्साहात, आनंदात हा होळीचा उत्सव साजरा होईल. मात्र समाजात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही, कुठल्याही प्रकारचे वाद विवाद होणार नाहीत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहील, नाकाबंदी राहील, पेट्रोलिंग राहील. आणि कोणीही व्यक्ती जर हुल्लडबाजी करण्याचा किंवा गडबड करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
धुळे महापालिकेच्या वतीनं आज सर्व पक्षीय पर्यावरणपूरक आणि अंमली पदार्थ विरोधी होळी आणि रंगोत्सव साजरा करण्यात आला. महापालिका आवारात स्वच्छता मोहिम राबवून कचऱ्याची तसंच अंमली पदार्थांची होळी करण्यात आली. या उत्सवात धुळे शहरातली महिला मंडळं तसंच भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षातर्फे सुरू असलेल्या आंदोलनाचा निषेध करत, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज शहरातल्या टीव्ही सेंटर चौकात निदर्शनं करण्यात आली. एमआयएम ही जातीयवादी संघटना असून, ही संघटना औरंगजेब आणि निजामाचा वारसा चालवत शहराचं वातावरण दूषित करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
****
येत्या तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे विभागीय स्तरावरच्या लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणार असलेल्या या उपक्रमानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातले अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करायचे आहेत. जिल्हास्तरावरच्या लोकशाही दिन कार्यक्रमात जे अर्ज निकाली निघाले नाहीत, ते सगळे विभागीय स्तरावरच्या लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असं विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिनात आठ तक्रारी दाखल झाल्या.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
8 वी ते 10 वीचे 29,819 विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत गैरहजर | शाळेत येण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांचे समुपदेशन
मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून शाळेची घंटा (School Reopen) वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आलेला नाही.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची घेणार हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची घेणार हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर चांगलेच भडकले असून रोज संध्याकाळी अशा मंत्र्यांची नावं दिली जावीत असा आदेश दिला आहे. दिल्लीत मंगळवारी भाजपाच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासहित अनेक नेते…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र लाऊडस्पीकर वादावर सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही नाही हजर, मुख्यमंत्री ठाकरेही गैरहजर
महाराष्ट्र लाऊडस्पीकर वादावर सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही नाही हजर, मुख्यमंत्री ठाकरेही गैरहजर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा वाद आणि हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही भाजपमधून आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यापासून दुरावले आहेत. महाराष्ट्रातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes