Tumgik
#मुख्यमंत्र्यांच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूर लपूनछपून करतेय सुट्टी एन्जॉय; ‘तो’ खास फोटो झाला व्हायरल….
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूर लपूनछपून करतेय सुट्टी एन्जॉय; ‘तो’ खास फोटो झाला व्हायरल….
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूर लपूनछपून करतेय सुट्टी एन्जॉय; ‘तो’ खास फोटो झाला व्हायरल…. मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जाहनीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची वाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 17.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध-पंतप्रधानांचं प्रतिपादन 
आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती
दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता
आणि
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम लढत
सविस्तर बातम्या
ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, पंतप्रधानांनी काल दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातल्या तीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या गाड्यांचा समावेश आहे.
****
देशभरात आजपासून 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा र��बवण्यात येणार आहेत.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिध्दार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मराठवाड्याचा मुख्य ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोर्कापणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते,नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा इथं फिनिक्स फाउंडेशनतर्फे उद्या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचं औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कार्यवाही केली नसल्याचं, विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासकामांच्या शंभरहून अधिक घोषणा करण्यात आल्या मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागण्यासांठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मान्य कराव्यात, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.  
****
आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे.
हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसुळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासननिर्णयही काल जारी झाले.
****
दृष्टीहीन आणि कर्णबधीर प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे.
****
 दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज, अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. महापालिकेनं शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली असून, निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.
नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. जिल्ह्यात आज अडीच हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी नांदेड शहरातील ९ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सव्वीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रं उभारण्यात आली आहेत.
****
जालना इथं घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रीम हौद तयार कण्यात आला आहे, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली इथं मोदकाचा गणपती अर्थात विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे एक लाख ५१ हजार मोदकांचं वाटप केलं जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात काल चारशे दहा गणेश मूर्तींचे विसर्जन झालं, तर आज अनंत चतुर्दशीला सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं परवा १९ सप्टेंबर रोजी तर परंडा इथं उद्या १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
****
परभणी इथं दरवर्षी प्रमाणे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काल सामुहिक विवाह सोहळा पार पडला, यंदा या सोहळ्यात ४० जोडपी विवाहबद्ध झाली. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं ��ाजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आज आपण थायलंडमधल्या गणेशोत्सवाविषयी अर्पिता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ या...
महाराष्���ट्रीयन पद्‌धतीनं गणपतीची पूजा आणि स्थापना होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. पुजेचं साहित्य इथं सहज उपलब्ध असतं. पण उकडीचे मोदक देखील आता गेले काही वर्ष आम्ही महाराष्ट्रीयन गृहणींकडून बनवून घेतो. इथल्या काही सभासदांचं थायी मित्र सुद्धा गणपतीच्या दर्शनाला अगदी आवर्जून येतात. भारताची कमी वाटणार नाही असं ढोल, ताशा, मोदक, आरत्या, अथर्वशीर्ष हे सगळं करत तो एक अर्धा दिवस का होईना पण खूप आनंदात घालवतो.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. काल उपान्त्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केलं. कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन, तर जर्मनप्रितसिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथे झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात एकशे तेरा स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
****
बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ची ई पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता मोबाइल ॲपवरून करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. या हंगामाची ई पीक पहाणी करण्यासाठी शासनाने २३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात आज ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत धाराशिव जिल्ह्यात कालपर्यंत तीन लाख ९२ हजार ४२४ महिलांचे अर्ज लाभासाठी पात्र ठरले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख तीन हजार ८५१ महिलांनी अर्ज केले आहेत.
****
बीड इथं काल बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या काही नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ पूर्णांक ३४ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 15 days
Text
Alandi:आळंदी मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
एमपीसी न्यूज -आळंदी येथे शिवसेना(शिंदेगट) आळंदी शहर प्रमुख (Alandi)राहुल चव्हाण यांचे आळंदी शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे( जनसंपर्क कार्यालय) उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दादासाहेब भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इरफान भाई सय्यद शिवसेना उपनेते, भगवान पोखरकर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख, शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार, नितीन गोरे…
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण मुंबई, दि. १७:  महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार,  गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान…
View On WordPress
0 notes
Video
youtube
अंगणवाडी सेविकाने थेट मुख्यमंत्र्यांच्या पायावर डोकं ठेवले..
0 notes
nashikfast · 1 year
Text
शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार : अतुल लोंढे
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीमधून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाला होता तोच जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. “ही…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
अक्षय भालेराव हत्या प्रकरण : ‘त्या’ जातीयवादी गुंडांना फाशी द्या; संविधान मैत्री संघाचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन
0 notes
cinenama · 1 year
Text
''त्या' दुचाकी चालकांवर कारवाई करणार का?'
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीत मोटार वाहन नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. गोव्याचे पोलीस महासंचालक दखल घेऊन सर्व उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर हेल्मेट न घालता भाजपचे झेंडे घेऊन दुचाकी चालविणाऱ्यांचा व्हिडीयो जारी करुन,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 25 : मांग गारुडी समाजाच्या मागण्या आणि अडीअडचणींसंदर्भात संघटनांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ.सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॅा. प्रशांत नारनवरे, बार्टीचे…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
महाराष्ट्र लाचार आहे असे दाखवण्याचा ' हा ' प्रयत्न
महाराष्ट्र लाचार आहे असे दाखवण्याचा ‘ हा ‘ प्रयत्न
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहोचलेला असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याला काही सीमा राहिलेली नाही. दुर्दैवाने कर्नाटकला ठणकावून सांगण्यात महाराष्ट्राचे सत्ताधारी नेते बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीव��� राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ‘ महाराष्ट्र लाचार आहे ‘ असे दाखवण्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सीक्रेट हॉलिडेसाठी जान्हवी कपूर मालदीवमध्ये?
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सीक्रेट हॉलिडेसाठी जान्हवी कपूर मालदीवमध्ये?
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सीक्रेट हॉलिडेसाठी जान्हवी कपूर मालदीवमध्ये? Janhvi Kapoor in Maldives: अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे आणि ख्रिसमसआधी ती ही सुट्टी चक्क एक्स बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय. Janhvi Kapoor in Maldives: अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे आणि ख्रिसमसआधी ती ही सुट्टी चक्क एक्स बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
कांदा निर्यातीसाठी किमान मूल्याची अट रद्द-गहू साठवणुकीच्या मर्यादेतही कपात
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर
आणि
आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
****
कांदा निर्यातीसाठीची किमान मूल्याची अट केंद्र सरकारनं रद्द केली आहे. कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी प्रतिटन साडे पाचशे अमेरिकी डॉलर मूल्य मर्यादा होती, ही मर्यादा हटवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारातल्या संधीचा लाभ घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गव्हाची साठेबाजी तसंच दरवाढ रोखण्यासाठी वितरण व्यवस्थेतले घाऊक तसंच मोठ्या विक्रेत्यांसाठी साठवणुकीची मर्यादा तीन हजार मेट्रिक टनांवरून दोन हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. पुढच्या ३१ मार्चपर्यंत ही मर्यादा लागू असेल.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं.
दरम्यान, देवे��द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरं परवडणाऱ्या दरात उभारली जाणार असून, म्हाडाच्या माध्यमातून ती मंजूर केली जाणार आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील दोन हजार ३० सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी येत्या १९ सप्टेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याच दिवशी रात्री बारा वाजेच्या आत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा अर्जदारांना करता येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर येत आहेत. परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडे ११ वाजता मुख्यमंत्र्यांचं लातूर विमानतळावर आगमन होईल, तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे प्रस्थान करतील. सायंकाळी सव्वा चार वाजता लातूर मार्गे ते विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. परांडा इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं उपोषणास बसलेल्या राजश्री उंबरे यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने क��ल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वेरूळ इथल्या शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना निर्देश दिले.
****
हिंदी राजभाषा दिवस आज साजरा होत आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन होईल. हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांचं देशाला उद्देशून संबोधन आज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे.
****
अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे शहर आता श्री विजयपुरम म्हणून ओळखलं जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. ऐतिहासिक चोल साम्राज्याचा नौदल तळ या ठिकाणी होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक क्रांतिकारक इथं बंदिवासात होते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचा ध्वज भारतीय भूमीवर प्रथम इथंच फडकावला होता, याकडे शहा यांनी या संदेशातून लक्ष वेधलं आहे.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबवण्याचे तसंच फिरती पथकं तैनात करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले आहेत.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात, हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात तर जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली.
दरम्यान, राहुल गांधी यांना धमकी प्रकरणाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने काल राज्यभर भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलतांना, राहुल गांधी यांनी आरक्षण बंदींबाबत कोणतंही विधान केलं नसल्याचा दावा केला.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत माहिती आपण जाणून घेत आहोत. ब्रिटनमध्ये साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत जयश्री काशिद यांनी माहिती दिली:
“मातीच्या मूर्ती लंडनमध्ये मिळतात. त्यातल्या बऱ्याच मूर्ती भारतातून आलेल्या असतात. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अर्थ समजावून जयश्री दंडवते काकू अनेक वर्षापासून पूजा सांगत आहे. दूरवरुन लोक दर्शनाला येत असल्याने प्रसाद हा जेवणासारखा असतो. पूर्णपणे वर्गणीतून हा उत्सव साजरा केला जातो. लंडनपासून अर्ध्या तासावर असलेल्या साऊतंड सी या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी एक दिवस स्थानिक प्रशासन परवानगी देते. त्या दिवशी आसपासच्या भागातील शेकडो लोक किनाऱ्यावर जमतात. त्यामुळे भारतातच चौपाटीवर विसर्जन सुरु आहे की काय असं एक क्षण वाटून जातं.’’
****
आशियायी हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत चीन, जपान, मलेशिया आणि कोरियाला हरवत उपांत्यफेरी गाठली आहे.
****
लष्करात भरतीचं आमिष दाखवून विविध राज्यातल्या शंभराहून अधिक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या एकाला अहमदनगर इथ अटक करण्यात आली आहे. ही टोळी प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं आज सकाळी दहा वाजता उद्घाटन होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्���ेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा परवा सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं वाळूजनजीक शिवराई फाट्यावर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दीड महिन्याच्या मुलासह त्याची आई आणि आजीचा समावेश आहे
****
0 notes
darshanpolicetime1 · 9 months
Text
विधानसभा  लक्षवेधी
वाळूजमधील भूसंपादन आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल– मंत्री उदय सामंत नागपूर, दि. 15- सिडको महामंडळाच्या वाळूज (छत्रपती संभाजीनगर) प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 मार्च 2023 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वाळूज प्रकल्पामधील आवश्यक जमिनीचे संपादन आणि सद्यस्थितीबाबत लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि सिडकोचा प्रस्ताव आदी बाबी विचारात घेऊन…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
बीपीएमएस प्रणाली सुरू होईपर्यंत सर्वच प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारा
बीपीएमएस प्रणाली सुरू होईपर्यंत सर्वच प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारा
माजी आमदार प्रमोद जठार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी योग्य त्या सूचना देण्याचे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांकडून आश्वासन कणकवली सिंधुदुर्ग जिल्हयातील रजिस्टर कार्यालय, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, बँकेतील कर्जप्रकरणे अशा सर्व शासकीय कार्यालयातील मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR ) नुसार ( Building Plan ) Management System ( BPMS ) संगणकीय प्रणालीचे काम गेले 2 महिने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवरायांच्या घोषणा देण्यावर बंदी : जितेंद्र आव्���ाड
ठाणे : कळव्यामध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याबद्दल जो गुन्हा दाखल केला तो अत्यंत चुकीचा असून गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करा जर घोषणा देणे गुन्हा असेल तर आम्हीही पोलिस ठाण्यात घुसून घोषणा देऊ असा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ठाणे पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes