Tumgik
#पंजाब नॅशनल बँक
airnews-arngbad · 25 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ. फ्रेजर बॉय हायस्कूल मैदानात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही सभा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगूर आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यार शिरपूर इथं प्रचारसभा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत.
****
नंदुरबारमध्ये आजपासून ८५ वर्षावरील तसंच दिव्यांग नागरीकांच्या गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी २६९ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एक हजार १५४ नागरीकांनी नोंदणी केली आहे.
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग, तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख फरार आरोपी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं, न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीने नव्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
****
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालयाने तीन ते सहा मे दरम्यान १२ वेगवेगळ्या घटनांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं सुमारे सहा किलोहून जास्त बजनाचं सोनं जप्त केलं. मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, रेडियम प्लेटेड बांगड्या आणि सोन्याचे बार, अशा विविध स्वरुपात हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल चार वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले, तर ४ जण जखमी झाले.
मेहकर- जालना रस्त्यावर किनगाव राजा जवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला.
अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
तर चिखली - जालना रस्त्यावर मालवाहक गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला.
****
व्हिएतनाम मध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. सचिन पाहवा आणि प्रियंका छाब्रा यांनी मिश्र दुहेरीच्या ३५ वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीने देखील सुवर्ण पदक जिंकलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे  शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, विदर्भात काल गोंदियासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या पाच दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कर्जदारांची मोठा झटका; जास्त भरावा लागणार EMI, 'या' बँकांनी व्याजदरात केली वाढ
कर्जदारांची मोठा झटका; जास्त भरावा लागणार EMI, ‘या’ बँकांनी व्याजदरात केली वाढ
कर्जदारांची मोठा झटका; जास्त भरावा लागणार EMI, ‘या’ बँकांनी व्याजदरात केली वाढ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या आठवड्याच्या अखेरीस आपला द्वि-मासिक चलनविषयक धोरण निर्णय घेणार आहे. त्यापूर्वी आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेचे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट वाढवण्यात आले आहे आणि आता ते १ ऑगस्ट, २०२२ पासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या आठवड्याच्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
या बँका दुचाकी वाहनांसाठी १० टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देत आहेत, तपशील पहा
या बँका दुचाकी वाहनांसाठी १० टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देत आहेत, तपशील पहा
सरकारी मालकीची बँक ऑफ इंडिया ही या विभागातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. बँक टू व्हीलरसाठी ६.८५ टक्के व्याजाने कर्ज देत आहे. या व्याजदरावर, 1 लाख रुपयांच्या कर्जावर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3,081 रुपयांचा EMI भरावा लागेल. ,
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना या आर्थिक वर्षात ५ हजार कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून बँकांनी इतिहास घडवावा - डॉ. हेमंत वसेकर
ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना या आर्थिक वर्षात ५ हजार कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून बँकांनी इतिहास घडवावा – डॉ. हेमंत वसेकर
नवी मुंबई, 28: राज्यस्तरीय बँकर्स काँक्लेवमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील  स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांना पतपुरवठा करण्याचे निश्चित केलेले उद्दिष्ट 100% पूर्ण करणाऱ्या बँकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, UCO बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा तसेच HDFC बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना या आर्थिक वर्षात ५ हजार कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून बँकांनी इतिहास घडवावा - डॉ. हेमंत वसेकर
ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना या आर्थिक वर्षात ५ हजार कोटींपेक्षा जास्त पतपुरवठा करून बँकांनी इतिहास घडवावा – डॉ. हेमंत वसेकर
नवी मुंबई, 28: राज्यस्तरीय बँकर्स काँक्लेवमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील  स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांना पतपुरवठा करण्याचे निश्चित केलेले उद्दिष्ट 100% पूर्ण करणाऱ्या बँकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, UCO बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा तसेच HDFC बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचा…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
आजपासून सर्वत्र बँका सकाळी ९ ला उघडणार
Tumblr media
आरबीआयचा आदेश, ग्राहकांची होणार सोय नवी दिल्ली : सोमवार दि. १८ एप्रिलपासून देशभरातील बँका आता सकाळी ९ वाजतापासून उघडणार आहेत. त्यामुळे देशभरातील विविध बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. अर्थात, ग्राहकांना आपले बँकिंग काम करून घेण्यासाठी एक तास अतिरिक्त मिळणार आहे. हा आदेश देशातील ७ सरकारी आणि २० खाजगी बँकांना लागू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत आदेश जारी केला असून, सोमवारपासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार सकाळी ९ वाजता देशभरातील बँका उघडतील. मात्र, बँका बंद करण्याच्या वेळेत कुठलाही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या या नव्या आदेशामुळे ग्राहकांना आपले बँकेचे कामकाज करून घेण्यासाठी सोमवारपासून आणखी एक तास अतिरिक्त मिळणार आहे. देशभरात भारतीय स्टेट बँकांसह ७ सरकारी बँका आहेत. याच्याश्विााय देशात २० पेक्षा अधिक खाजगी बँका आहेत. खाजगी बँकांमध्ये सिटी युनियन बँक, डीसीबी बँक, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय, एचडीएफसी आदी बँकांचा समावेश आहे. या सर्वच बँकांना आता सकाळी १० वाजताऐवजी ९ वाजताच कामकाज सुरू करावे लागणार आहे. याचा बँक ग्राहकांना फायदा होणार आहे. या आहेत सरकारी बँका पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक भारतीय स्टेट बँक कॅनरा बँक युनियन बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसिज बँक युको बँक Read the full article
0 notes
punerichalval · 3 years
Text
महाघोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार; ब्रिटनने दिली प्रत्यार्पणास मंजुरी
महाघोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार; ब्रिटनने दिली प्रत्यार्पणास मंजुरी.....
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला अखेर भारतात आणण्यात येणार आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरवच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताला मोठं यश मिळालं असून नीरववर कारवाई करणं सोपं जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारतात येणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पण कागदपत्रांवर सही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 18 October 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : १८ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 October 2022
Time 07.10 AM to 07.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाची माघार, मात्र अन्य उमेदवारांमुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक होणार
देशात द्रवरूप नॅनो-युरियाच्या वापराला प्रोत्साहन, ‘भारत’ या एकाच ब्रॅण्ड नावानं युरियाची विक्री करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
राज्यातल्या एक हजार ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर, सर्वाधिक जागा जिंकल्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा
औरंगाबाद जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दरवाजांच्या दुरूस्तीसाठी, भरीव तरतूद करण्याचं पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं आश्वासन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युवक महोत्सवातल्या ढिसाळ नियोजनाबद्दल विद्यार्थी, कलावंत तसंच परीक्षकांमध्ये रोष
जालना जिल्ह्यात ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार
आणि
मराठवाड्यात परतीचा पाऊस सुरुच, अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान 
सविस्तर बातम्या
मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपला उमेदवार मागे घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही घोषणा केली, त्यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अन्य सात उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यानं, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, भाजपनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आभाराचं पत्र लिहिलं आहे. आपण केलेल्या विनंतीला मान देऊन, या निवडणुकीला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण आभारी असल्याचं, राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही भाजपला असंच आवाहन केलं होतं, त्यांनी भाजपच्या या निर्णयाचं स्वागत करत, समाधान व्यक्त केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब, तसंच या निवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं.
****
देशात शेतीसाठी द्रवरूप नॅनो-युरियाच्या वापरला प्रोत्साहन दिलं जाईल, त्याचप्रमाणे ‘भारत’ या एकाच ब्रॅण्डच्या नावानं युरियाची विक्री केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चं उद्घाटन करताना बोलत होते. नॅनो युरिया शेती प्रक्रियेसाठी किफायतशीर माध्यम ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रसायनं आणि खंत मंत्रालयाच्या सहा हजार किसान समृद्धी केंद्रांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. या केंद्रांद्वारे देशभरातली खतांची किरकोळ दुकानं प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये टप्प्या टप्प्यानं रुपांतरीत केली जातील. देशभरातल्या तीन लाख ३० हजार खत किरकोळ विक्री दुकानांचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा १२ वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते काल जारी करण्यात आला. थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत एकूण १६ हजार कोटी रुपये शे���कऱ्यांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात आले.
****
या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण औरंगाबाद इथं कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात कागजीपुरा इथं शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती, कराड यांनी यावेळी दिली. हे प्रशिक्षण केंद्र १५ एकर जागेवर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड आणि पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं १५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना केंद्र सरकारनं सुरु केल्या आहेत, त्यांचा फायदा घ्यावा आणि जुने तंत्रज्ञान सोडून नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट - अपघात प्रवण क्षेत्र संबंधित विभागांनी तातडीने दुरुस्त करावेत, असे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रस्ता सुरक्षा विषयक उपाययोजना आणि  सुधारित धोरण ठरवण्या संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते. राज्यात २३ ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसंच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वर्षातून किमान तीन वेळा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्यभर हेल्मेट सक्तीची प्रभावी अमंलबजावणी करावी, वाहनचालक प्रशिक्षण संस्थांचं बळकटीकरण करावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना, ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली आहे, त्यांचा वाहन परवाना काही दिवस किंवा महिन्यांसाठी निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी काल मतदान झालं. सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत झालेल्या मतदानात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका वाड्रा, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदान केलं. मुंबईमधून २३७ मतदारांपैकी २२९ जणांनी मतदान केलं, आठ जण गैरहजर होते. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर असे दोन उमेदवार आहेत. मतमोजणी उद्या होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. ठाकरे आणि पवार यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावं, यासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निमंत्रण दिलं होतं, हे निमंत्रण दोन्ही नेत्यांनी स्वीकारलं.
****
राज्यातल्या १८ जिल्ह्यांमधल्या एक हजार ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगानं १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातल्या काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे प्रत्यक्षात १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आलं. भारतीय जनता पक्षानं सर्वात जास्त जागा मिळाल्याचं दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना केला. ते म्हणाले...
Byte …
८८९ ग्रामपंचायतींची माहिती आमच्याकडे आहे. या ८८९ पैकी जवळ जवळ ३९७ ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे. आणि आमच्या सेाबत असलेली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती ८१ ठिकाणी निवडून आली आहे. जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ती ८७ ठिकाणी आहे, काँग्रेस १०४ ठिकाणी आहे, एनसीपी ९८ ठिकाणी आहे, अपक्ष ९५ ठिकाणी आहे. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सगळ्यात मेाठा पक्ष म्हणून याठिकाणी निवडून आला आहे.
विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी फडणवीस यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जर पक्ष चिन्हावर लढलीच जात नाही, तर मग कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हे कसं समजलं, असा प्रश्न पवार यांनी विचारला. ग्रामपंचायत निवडणूकही पक्षचिन्हावर लढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
Byte….
चिन्हावरनिवडणूकहोतनसतानातुम्हालाकसं कळलं की हाकुठल्या पक्षाचाआहे. माझं तरम्हणणं आहे, जरस्थानिकस्वराज्य संस्थानाइतरठिकाणीचिन्हाचं वाटपहोतं, तरग्रामपंचायती मध्ये पणचिन्हावरनिवडणुकाझाल्यापाहीजे. म्हणजेमग स्पष्ट चित्रत्याठिकाणीकळेल.
****
अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ या योजनेचा आरंभ, मुंबईत येत्या २० ऑक्टोबरला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकऱ्यांना या कार्यक्रमात प्रोत्साहन प्रमाणपत्र मिळणार असल्याचंही सावे यांनी सांगितलं.
****
कमी पटसंख्या असल्याचं कारण पुढे करून राज्यातल्या हजारो शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं घातला असेल, तर त्याला विरोध केला जाईल, असं विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल बारामती इथं बोलत होते. शिक्षण आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय योग्य ठरणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या सुमारे तीन हजार दरवाजांच्या दुरूस्तीसाठी, भरीव तरतूद करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सर्व विकासकामं पूर्णत्वास नेणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य राहणार असल्याचं भुमरे यावेळी म्हणाले.
बैठकीच्या सुरूवातीला खासदार इम्तियाज जलील यांनी वैजापूर इथल्या पशुवैद्यकीय इमारतीच्या बांधकामाचा मुद्दा मांडून, या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली. यावर पालकमंत्र्यांनी या प्रकरणात दोषी कंत्राटदार तसंच अधिकाऱ्य���ंवर चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या युवक महोत्सवात ढिसाळ नियोजनाबद्दल विद्यार्थी, कलावंत तसंच परीक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. या महोत्सवात वादविवाद स्पर्धेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला. जनरेटरची व्यवस्था नसल्याने वीज पुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा न करता, स्पर्धकांनी स्पर्धा सुरूच ठेवली. सभागृहात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसंच विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असल्याने स्पर्धकाचा आवाज परीक्षकांपर्यंतही पोहचत नव्हता. त्यामुळे स्पर्धेत वारंवार व्यत्यय येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
तुकडाबंदी कायद्यामुळे भुखंडासंबंधी बंद असलेली दस्त नोंदणी तत्काळ सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व सामान्य हक्क बचाव कृती समितीच्या वतीनं, कालपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. यापूर्वी ज्या दस्त नोंदणी झालेल्या आहेत त्या दस्तांची मुद्रांक नोंदणी तात्काळ सुरु करण्यात यावी, सर्व ग्रामपंचायत हद्दीतील नमुना क्रमांक आठ वरील मिळकतीची दस्त नोंदणी सुरु करण्यात यावी, गावठाण हद्दीतील सर्व मिळकतीची दस्त नोंदणी तात्काळ सुरु करण्यात यावी, आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आल्याची माहिती, कृषी समितीचे उपाध्यक्ष दत्तू हिवाळे यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड घाटात नियोजित बोगद्याचं काम करण्यात यावं, या मागणीसाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं अंधानेर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या कामासंदर्भात खोटी आश्वासनं दिली गेली असून, खर्च मोठा असल्याचं सांगून हा बोगदा प्रलंबित ठेवला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद-माहोरा रस्त्यावरील एका जिनिंगजवळ काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेसह तिची दोन मुलं आणि भावाचा समावेश आहे. अपघातग्रस्त सर्वजण बुलडाणा जिल्ह्यातल्या माळवंडी येथून देऊळगावराजा इथल्या बालाजी यात्रेसाठी जात असताना दुर्घटना घडल्याचं पोलिस सूत्रांन सांगितलं. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
निपुण भारत या मिशन अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातल्या एक हजार ९२७ अंगणवाडी सेविकांना १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान आकार अभ्यासक्रम अंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उपळा इथल्या अंगणवाडी केंद्रात करण्यात आलं.
****
मराठवाड्यात परतीचा पाऊस सुरुच असून, अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालं. पावसामुळे शहरी भागातले रस्ते बंद झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यातले मध्यम आणि लघु जलसिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
औरंगाबाद शहर आणि परिसरातही मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातल्या काही भागात काल जोरदार पाऊस झाला. मांजरा धरणाचे दोन दरवाजे काल बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या चार दरवाजातून सुमारे साडे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, एक हाजर ६४८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसंच लोअर दुधना प्रकल्पाचे देखील १२ दरवाजे उघडण्यात आले असून, एक हजार १२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पूर नियंत्रण विभागानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही काल ममुसळधार पाऊस झाला. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानं पुण्यातले रस्ते जलमय झाल्याचं वृत्त आहे.
***
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं ७ गडी गमावून १८६ धावा केल्या. विजयासाठी १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  ऑस्ट्रेलियाचा संघ १८० धावाच करु शकला.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पीएनबी घोटाळा; ईडीकडून नवे आरोपपत्र दाखल, मेहुल चोक्सीसह पत्नी प्रीतीवरही आरोप
पीएनबी घोटाळा; ईडीकडून नवे आरोपपत्र दाखल, मेहुल चोक्सीसह पत्नी प्रीतीवरही आरोप
पीएनबी घोटाळा; ईडीकडून नवे आरोपपत्र दाखल, मेहुल चोक्सीसह पत्नी प्रीतीवरही आरोप पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, त्यांची पत्नी प्रीती आणि इतरांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. प्रीतीविरोधात ईडीने ही पहिली तक्रार दाखल केली आहे. २०१७ पासून प्रीती फरारएएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार या पीएनबी घोटाळ्यात प्रीती यांनी आपले पती…
View On WordPress
0 notes
jobmarathi · 2 years
Text
पंजाब नॅशनल बँकेत 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी बँक नोकऱ्या 2022 भरती येथे तपशील जाणून घ्या- बँक नोकऱ्या 2022: पंजाब नॅशनल बँकेत 12वी पास तरुणांसाठी भरती, तपशील येथे जाणून घ्या
पंजाब नॅशनल बँकेत 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी बँक नोकऱ्या 2022 भरती येथे तपशील जाणून घ्या- बँक नोकऱ्या 2022: पंजाब नॅशनल बँकेत 12वी पास तरुणांसाठी भरती, तपशील येथे जाणून घ्या
बँक नोकऱ्या 2022: इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in ला भेट द्या आणि अर्ज भरा. पंजाब नॅशनल बँक भर्ती 2022: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. पंजाब नॅशनल बँक 12वी पास उमेदवारांसाठी भरती आहे. या भरतीअंतर्गत, बीरभूम, पूर्वा बर्धमान, गोपालगंज आणि चंपारणसह अनेक कार्यालयांमध्ये शिपाईची रिक्त पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी
नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झालेल्या नीरव मोदीच्या जामीन याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे.
लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. यापूर्वी तीन वेळा न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळली होती. 19 मार्च रोजी नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
नीरव…
View On WordPress
0 notes
darshaknews · 4 years
Text
#PNB #ATM एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमात हि बँक करत आहे मोठा बदल
#PNB #ATM एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमात हि बँक करत आहे मोठा बदल
Tumblr media Tumblr media
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: देशातील दुसरी मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 डिसेंबर पासून एटीएम (ATM) मधून पैसे काढण्याच्या नियमात काही बदल करत आहे. PNB ग्राहकांना चांगली बँक फॅसिलिटी देण्यासाठी आणि फ्रॉड एटीएम ट्रांझाक्शनपासून वाचण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बँक वन टाइम पासवर्ड आधारित कॅश विड्रॉल प्रणाली सुरू करणार आहे.
1 डिसेंबरपासून ही नवी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याकरता…
View On WordPress
0 notes
thebusinesstimes · 4 years
Photo
Tumblr media
पीएनबीतर्फे लडाख शहिदांना श्रद्धांजली मुंबई :देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँकिंग संस्था, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी ) यांनी शोक व्यक्त करण्यासाठी लडाखचा शहीद सिपाही कुंदन कुमार ओझा याच्या कुटूंबियांना भेट देऊन आणि पीएनबी विमा पॉलिसीचे ८. १३ लाख फक्त २४ तासात हुतात्म्याच्या पत्नीच्या नावे जमा केले आहेत. शहीद सैनिकाने पीएनबीकडून दोनविमा पॉलिसी घेतल्या होत्या.झारखंडमधील साहिबगंजच्या दिहारी खेड्यातील रवीवासी असलेले ओझा २०११ मध्ये भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. लडाखच्या गलवान खोऱ्यातचिनी सैन्यासह झालेल्या हिंसक सामन्यात कर्नल बी संतोष बाबू आणि हवलदार पलानी यांच्यासह ते शहीद झाले होते. आशा कोविड-१९ लसीची… व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…
0 notes
headlinesind · 4 years
Text
मोदी-चोक्सीचे १३५० कोटींचे दागिने जप्त, ईडीची कारवाई | पुढारी
मोदी-चोक्सीचे १३५० कोटींचे दागिने जप्त, ईडीची कारवाई | पुढारी
[ad_1]
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 
कोट्यवधींचा घोटाळा करून भारतातून पळ काढणा-या हिरा उद्योगपती नीरव मोदी आणि मेहुल चौकी यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. हाँगकाँग येथील कंपन्यांकडून ईडीने मोदी आणि चोकसी यांचे १३५० कोटींचे हिरे, मोती, दागिने जप्त करून परत आणले आहेत.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा करून नीरव मोदी आणि मेहुल चोकसी देश सोडून पळून गेले आहेत.
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
शेतीसाठी द्रवरूप नॅनो-युरियाच्या वापरला प्रोत्साहन;‘भारत’ या एकाच ब्रॅण्डच्या नावानं युरियाची विक्री-पीएम किसान सन्मान संमेलनात पंतप्रधानांची घोषणा.
औरंगाबाद जिल्ह्यात कागजीपुरा इथं शेतकरी प्रशिक्षण केंद्र तर म्हैसमाळ इथं सी डॉप्लर रडार यंत्रणा उभारली जाणार.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपचा उमेदवारी अर्ज मागे; राजकीय पक्षांकडून निर्णयाचं स्वागत.
आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवातल्या ढिसाळ नियोजनाबद्दल रोष व्यक्त.
****
युरियाच्या उत्पादनामध्ये भारत आज स्वावलंबी होण्याच्या मार्गावर असून, यापुढे शेतीसाठी द्रवरूप नॅनो-युरियाच्या वापरला प्रोत्साहन दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चं उद्घाटन करताना बोलत होते. नॅनो युरिया शेती प्रक्रियेसाठी किफायतशीर माध्यम ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजपासून युरियाची विक्री ‘भारत’ या एकाच ब्रॅण्डच्या नावानं केली जाईल असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
रसायनं आणि खंत मंत्रालयाच्या सहा हजार किसान समृद्धी केंद्रांचं उद्‌घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या केंद्रांद्वारे देशभरातली खतांची किरकोळ दुकानं प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये टप्प्या टप्प्यानं रुपांतरीत केली जातील. देशभरातल्या ३ लाख ३० हजार खत किरकोळ विक्री दुकानांचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा १२ वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते आज जारी करण्यात आला. थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत एकूण १६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात आले.
****
दरम्यान, या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण औरंगाबाद इथं कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात कागजीपुरा इथं शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती, कराड यांनी यावेळी दिली. हे प्रशिक्षण केंद्र १५ एकर जागेवर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड आणि पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं १५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना केंद्र सरकारनं सुरु केल्या आहेत, त्यांचा फायदा घ्यावा आणि जुने तंत्रज्ञान सोडून नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी म्हैसमाळ इथं सी डॉप्लर रडार बसवण्यात येणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.
****
मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही घोषणा केली. त्यामुळे आता या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अन्य उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यानं, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मतदान आणि मतमोजणी होणार आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दरम्यान, भाजपनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. काल आपण केलेल्या विनंतीला मान देऊन आपण भाजपचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभारी असल्याचं, राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही काल असंच आवाहन केलं होतं, त्यांनीही आज भाजपच्या या निर्णयाचं स्वागत करत, समाधान व्यक्त केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनिल परब, तसंच या निवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
****
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान झालं. सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत झालेल्या मतदानात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियंका वड्रा, पी. चिदंबरम, जयराम रमेश यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदान केलं. मुंबईमधून २३७ मतदारांपैकी २२९ जणांनी मतदान केलं ८ जण गैरहजर होते. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर असे दोन उमेदवार आहेत. मतमोजणी बुधवारी होणार आहे.
****
राज्यात विविध १८ जिल्ह्यांमधल्या एक हजार ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काल झालेल्या मतदानाची आज मोजणी सुरु आहे. काल याठिकाणी सरासरी ७४ टक्के मतदान झालं. काही निकाल हाती आले असून, आज सायंकाळी उशीरापर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे
पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामंपचायतीचे निकाल हाती आले. त्यामध्ये भाजपने १४, राष्ट्रवादी काँग्रेसने १०, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं सहा, बाळासाहेबांच्या शिवसेनेनं चार, तर काँग्रेस तसंच मनसेनं प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.
****
अमरावती जिल्ह्यात सोमठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचीपदी प्रहार पक्षाचे अनिल मावस्कर निवडून आले. सदस्याच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीतही बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा उमेदवार निवडून आला.
****
रायगड जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून बहुतेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसल्याचं चित्र आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या मुळगावी म्हणजे खरवली इथं त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला. महाविकास आघाडीचे चैतन्य महामूनकर विजयी झाले. अलिबाग तालुक्यातील वेश्वी या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीत शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झाला आहे. आमदार जयंत ��ाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो. वेदर नवगावमध्ये देखील शेकापला पराभव स्वीकारावा लागला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात १९ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून यात तब्बल १३ ग्रामपंचायतीत सरपंच पदी महिला निवडून आल्या आहेत. नऊ ग्रामपंचायती अपक्षाचा ताब्यात गेल्या आहेत. कांग्रेसने पाच, बाळासाहेबांच्या शिवसेनेनं तीन तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या युवक महोत्सवात ढिसाळ नियोजनाबद्दल विद्यार्थी कलावंत तसंच परीक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. या महोत्सवात वादविवाद स्पर्धेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला. जनरेटरची व्यवस्था नसल्याने वीज पुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा न करता, स्पर्धकांनी स्पर्धा सुरूच ठेवली. सभागृहात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसंच विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असल्याने स्पर्धकाचा आवाज परीक्षकांपर्यंतही पोहचत नव्हता. त्यामुळे स्पर्धेत वारंवार व्यत्यय येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
तुकडाबंदी कायद्यामुळे भुखंडासंबंधी बंद असलेली दस्त नोंदणी तात्काळ सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व सामान्य हक्क बचाव कृती समितीच्या वतीनं आजपासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. यापूर्वी ज्या दस्त नोंदणी झालेल्या आहेत त्या दस्तांची मुद्रांक नोंदणी तात्काळ सुरु करण्यात यावी, सर्व ग्रामपंचायत हद्दीतील नमुना क्रमांक आठ वरील मिळकतीची दस्त नोंदणी सुरु करण्यात यावी, गावठाण हद्दीतील सर्व मिळकतीची दस्त नोंदणी तात्काळ सुरु करण्यात यावी, आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे उपाध्यक्ष दत्तू हिवाळे यांनी यावेळी दिली.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सराव सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं ७ गडी गमावून १८६ धावा केल्या. विजयासाठी १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८० धावाच करु शकला. 
****
फीफा १७ वर्षाखालील महिलांच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा साखळी सामना भुवनेश्वर इथं ब्राझील विरुद्ध होणार आहे. रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानं भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Patanjali Credit Card: बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं क्रेडीट कार्ड लाँच, किती लिमिट आहे जाणून घ्या
Patanjali Credit Card: बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं क्रेडीट कार्ड लाँच, किती लिमिट आहे जाणून घ्या
Patanjali Credit Card: बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं क्रेडीट कार्ड लाँच, किती लिमिट आहे जाणून घ्या बाबा रामदेव यांच्या पतंजलीने देशातील सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे. या क्रेडिट कार्डद्वारे पतंजली आणि पंजाब नॅशनल बँक संयुक्तपणे ग्राहकांना तीन…
View On WordPress
0 notes