Tumgik
#पदाधिकाऱ्यांनी
airnews-arngbad · 9 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
स्वहिताआधी देशहिताचा विचार करावा-उपराष्ट्रपतींचं आवाहन;राज्यभरातल्या संविधान मंदिरांचं लोकार्पण
देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा काल पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी राज्यसरकार सकारात्मक-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
केंद्र तसंच राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याची शरद पवार यांची टीका
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्‌घाटन
****
स्वहिताच्या आधी देशहिताचा विचार करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. राज्यभरातल्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं काल मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून दूरदृश्य पद्धतीनं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय राज्यघटना ही फक्त मिरवण्यासाठी नसून, तिचा गाभा समजून घेण्याची गरज धनखड यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी संविधान मंदिरांचं लोकार्पण करण्याचा हा क्षण अविस्मरणीय आहे, या मंदिरांमुळे राज्यघटनेबद्दल जागृती वाढेल, असा विश्वास धनखड यांनी व्यक्त केला. राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र आरक्षण हा भारताचा, राज्यघटनेचा आत्मा आहे. युवा पीढीनं सर्वत्र राष्ट्राचा गौरव वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं.
उपराष्ट्रपती धनखड यांनी काल नागपूरमध्ये रामदेवबाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन केलं. या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरात 'एक पेड मां के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण केलं.
****
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झारखंडमध्ये रांची इथं पार पडला. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ३२ हजार कोटी रुपयांचा थेट मदतीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही काल करण्यात आलं. सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा असेल, आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून, या निर्णयाबाबत आश्वस्त केलं.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
केंद्रातलं तसंच राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. धुळे जिल्ह्याल्यात शिंदखेडा इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणे राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका पवार यांनी केली.
****
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं, जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं देखील काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पैठण इथल्या संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.
****
अभियंता दिन काल साजरा झाला. नागपूर इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍कार तसंच उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार देखील यावेळी वितरीत करण्‍यात आले.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच आवश्यक सूचना केल्या.
लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. उद्या सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पर्यायी मार्गाची व्यवस्था असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत आपण दररोज माहिती घेत आहोत. मस्कतमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत गणेश घुगे यांनी माहिती दिली..
‘‘दरवर्षी आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करतो. गणपतीसाठी आम्हाला एक ठिकाण आहे रूई म्हणून. तिथे आम्हाला भारतातून गणेशमूर्ती इम्पोर्ट करतात. आणि ते आणून आम्ही इथे सण साजरा करतो. ढोलताशाचा गजर वगैरे इथं काही प्रकार नाही. आणि प्रसाद दोन वेळेला असतो. सकाळ संध्याकाळ प्रसाद करतो. गणपतीची आरती करतो. भजन करतो. आणि आनंदाने हा सण आम्ही इथे साजरा करतो.’’
****
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद - मिलाद- उन - नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त आज सर्वत्र मिलाद महफिल आणि सीरत संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे. ईद निमित्त ठिकठिकाणी मिलाद जुलूस देखील काढले जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
ईद-ए-मिलाद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज सार्वजनिक सुटी कायम ठेवण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातली परिपत्रकं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल जारी केली.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात भरवण्यात आलेल्या, दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. खासदार भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
उद्या १७ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.
****
दरम्यान, उद्या साजरा होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रसारित होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी माहितीपट पाहावा असं आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीबरोबरच पशुपालन या जोडधंद्याकडेही वळावं, असं आवाहन कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या मोहा आणि सिरसाळा इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते.
दरम्यान, अंबाजोगाई इथले ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन काल धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किन्हाळकर, आमदार नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होत्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
परभणी इथं काल धनगर समाजाच्या वतीनं मेघालयचे राज्यपाल सी.एच.विजयशंकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.इंद्र मणि उपस्थित होते. आर्थिक प्रगतीसाठी शिक्षणावर भर देण्याची गरज विजयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली.
****
केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि कांदा निर्यातीला दिलेलं प्रोत्साहनाचं, आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी स्वागत केलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी आधारभूत केंद्र पुढच्या काही दिवसात सुरू होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रितेश मोरे असा या मुलाचा नाव असून तो गणेशपूर पिंप्री इथलं रहिवासी होता.
****
0 notes
6nikhilum6 · 30 days
Text
Pimpri : शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणणारच – माजी महापौर कविचंद भाट
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाची सत्ता (Pimpri) आल्यावर पिंपरी चिंचवड शहरात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त असे निदर्शनात येते. पुन्हा शहराचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा आमदार निवडून आणणारच हा संकल्प करावा, असे मत माजी महापौर कविचंद भाट यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड…
0 notes
imranjalna · 1 month
Text
कोलकत्ता येथील महिला डॉक्टरचा हत्येचा निषेधार्थ वैद्यकीय सेवा राहणार बंद
आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती Medical services will remain closed to protest the killing of a woman doctor in Kolkata जालनाः कोलकत्ता येथील एका महिला डॉक्टरची बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जालना आयएमएच्या वतीने शनिवारी संपूर्ण वैद्यकीय सेवा (खाजगी) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात कोलकत्ता येथील शासकीय वैद्यकीय…
0 notes
nashikfast · 5 months
Text
काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
नाशिक (प्रतिनिधी): धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते मात्र डॉ. शेवाळे यांना राजीनामा देणे महागात पडले असून त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
mhlivenews · 1 year
Text
पूनम महाजनांच्या मतदारसंघातील नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत ‘उलटी गंगा’ वाहताना दिसत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
शरद पवार यांच्या प्रेमापोटी, कार्यकर्त्यांनी घेतला हा निर्णय...
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार जर आपल्या निर्णय मागे घेत नसतील तर आमचेही राजीनाने घ्या अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
अखेर ' त्या ' प्रकरणात मनसेची इन्ट्री , कथित पतीच्या विरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्रात एक अजब प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून लग्नाच्या आमिषाने एका तरुणीला पळवून मुंबई आणि ठाणे येथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील करण्यात आला. ��दर तरुणीच्या कथित पतीसह सहा जणांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीला आणलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी उत्तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 2 years
Text
पदाधिकाऱ्यांकडूनच पाचगणी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान
सातारा (महेश पवार) : पाचगणी नगरपालिकेची मिळकत ऑन व्हिल्ज एम्युजमेंट पार्क तथा कोकणरत्न हॉलिडेज् यांना कवडीमोल दरात भाडे कराराने देवून प्रस्थापित राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केले आहे. हा नियमबाह्य करार तात्काळ रद्द करावा तसेच मुख्याधिकारी यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरविकास मंत्रालयाकडे आकाश रांजणे यांनी केली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा
“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा
“सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावणार…” मनसे नेत्याचा इशारा उस्मानाबाद – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गटासह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताहेत. त्यासोबतच अंधारे यांनी मागील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अंधारे यांची धाराशिव येथे होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. राज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायिक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या संमेलनाना सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत पंतप्रधानांच्या हस्ते या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आयोजित या दोन दिवसीय संमेलनात प्रारुप आराखडा, समाविष्ट न्यायालयीन कक्ष, न्यायिक सुरक्षा, खटल्यांचं व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासह जिल्हा न्यायपालिकेच्या मुद्द्यांवर पाच सत्र होणार आहेत. उद्घघाटन कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्‍यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल तसंच अटॉर्नी जनरल आर. व्यंकटरमणी उपस्थित आहेत.
****
राज्यातील आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधल्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ’२५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. या कार्यक्रमानुसार,  राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढली आहे.
****
राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दुध अनुदान जमा होईल, अशी माहिती पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे. राज्यातल्या सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी. राज्य सरकारकडून २५६ कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. कागदोपत्री तयारी पूर्ण होताच दुध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं मोहोड यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक अतिशय गांभीर्यानं घ्यावी, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या राज्यस्तरीय महिला आणि युवा पदाधिकारी अधिवेशनात काल ते बोलत होते.
आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं चालला आहे, हेही  पवार यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर शहर महानगरपालिकेमार्फत वर्षाच्या सुरुवातीला नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी देण्यात आलेल्या विविध सवलतींची आज ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे . चालू वर्षात जवळपास २१ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांनी कर सवलतींच्या लाभ घेतला असून या माध्यमातून लातूर महापालिकेनं २५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आजही सर्व क्षेत्रीय कार्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे
****
१९६५ आणि १९७१ च्या युध्दात सहभागी झालेले आणि समर सेवा स्टार मेडल तसंच पूर्वी स्टार किंवा पश्चिमी स्टार मेडल मिळालं आहे, अशा माजी सैनिकांसाठी युद्ध सन्मान योजना सुरु करण्याचं प्रस्तावित आहे. या युद्धात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिक, शहीदांच्या पत्नींना केंद्रिय सैनिक बोर्डाकडून एकरकमी १५ लाख रुपये देण्यासंदर्भात युद्ध सन्मान योजना तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या युद्धांमध्ये सहभागी परभणी जिल्ह्यातल्या माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज येत्या ५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं नुकतीच मान्यता दिली. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडं पाठवला असून त्यानंतर अंतिम ���ान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच शासनाकडं पाठवला जाईल, अशी माहिती नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी काल दिली.
****
येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 3 months
Text
शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न आ.कैलास गोरंटयाल यांच्यामुळे लागला मार्गी
शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करत मानले आभार The question of transfer of teachers’ request was cleared by MLA Kailas Gorantyal जालना दि. ६ (प्रतिनीधी) जालना जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांचा प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांचे आभार…
0 notes
nashikfast · 2 years
Text
कामगार  मंत्री  सुरेश खाडे यांना आयटकचे निवेदन
कामगार  मंत्री  सुरेश खाडे यांना आयटकचे निवेदन
नाशिक:  महाराष्ट्र चे कामगार मंत्री  सुरेश  खाडे नाशिक दौऱयावर आले असता त्यांना   आयटक पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये  नाशिक जिल्हयात बंद पडलेल्या औद्योगिक कारखाने सुरु करण्या संदर्भात पुढाकार घ्यावा,बांधकाम कामगारांना १० हजार रु. बोनस त्वरीत दया. ३.बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी, नुतनीकरण, लाभाचे एकूण १५ लाख अर्ज तवरीत निकाली काढावेत, घर कामगार मोलकरीण,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कणकवली शहर भाजपच्या इशाऱ्या नंतर पटकीदेवी ते नागवे रस्त्याचे काम सुरू !
कणकवली शहर भाजपच्या इशाऱ्या नंतर पटकीदेवी ते नागवे रस्त्याचे काम सुरू !
दोन दिवसांपूर्वीच भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला होता इशारानगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेधले होते आमदार नितेश राणे यांचे लक्षनरडवे रोडवरील देखील “ते” खड्डे आठवड्यात बुजवणार कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी ते नागवे रोड ची दुरावस्था झाल्याने त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी हे काम तात्काळ करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपच्या वतीने देण्यात आल्यानंतर त्याची गांभीर्याने पालकमंत्री रवींद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes