Tumgik
#पॅलेस
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे, “आज दुपारी बालमोरल येथे राणीचे शांततेत निधन झाले,” The post ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस appeared first on द वायर मराठी. बालमोरल (स्कॉटलंड): ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी आणि सात दशके राष्ट्राची प्रमुख म्हणून भूमिका असलेल्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह 600 कंपन्या चिंताग्रस्त झाल्या; जाणून घ्या, काय आहे त्यामागचे कारण
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह 600 कंपन्या चिंताग्रस्त झाल्या; जाणून घ्या, काय आहे त्यामागचे कारण
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ सीडीया ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंड बालमोरल प्रासादात निराकरण. त्या ९६ वर्षांच्या. राणी एलिझाबेथ यांनी ७हून अधिक दशके ब्रिटन, तसेच काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटीश वसाहती राष्ट्रप्रमुख पदाधिकारी. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळली व्यक्ती हा विक्रमी राणी एलिझाबेथ यांच्या नावावर आणि ब्रिटनमधील सैनिकांना राणी एलिझाबेथ यांच्या व्यक्तीला राजसिंहासनावर कोणीही ओळखले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 5 months
Text
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
महायुतीचं सरकार राज्याला विकासाकडे नेण्यासाठी कटिबद्ध - शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.
पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही - उद्धव ठाकरे यांचा दावा.
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर.
��णि
औरंगाबाद परिमंडलात गेल्या महिन्यात दोन कोटी रुपयांची वीजचोरी उघड.
****
महायुतीचं सरकार राज्याला विकासाकडे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज धुळ्यात शासन आपल्या दारी या उपक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. विकासाला साथ देण्यासाठी शिवसेना-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 
दरम्यान, पोलीस, रुग्णवाहिका सेवा देणारे आणि अग्निशमन दल यांनी योग्य समन्वय साधला तर अधिक प्रभावीपणे काम करता येणे शक्य होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात कुलाबा इथं आज महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक आहेत, पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातल्या पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारी पोलीस ठाणे आणि अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतं, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज अमरावती इथं पत्रकारांशी बोलत होते. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज अमरावती इथं झाला, या मेळाव्याला मार्गदर्शन करताना, सत्ता संघर्षासाठी आणि राजकारणासाठी वापरला जाणारा पैसा हा मेळघाटातील कुपोषण संपवण्यासाठी वापरला तर ते समृद्ध होईल असं मत ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपल्यावर घरी बसून राहल्याची टीका सगळेजण करतात, मात्र आपण घरी बसलो होतो, कोणाची घरं फोडली नाही, असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचं खासगी वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
शिक्षण हक्क कायदा- आरटीई अंतर्गत राज्यात आतापर्यंत ८० हजार ९४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत, तर २० हजार ९०१ जागा रिक्त राहिल्या आहेत. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना एक लाख एक हजार ८४६ जागांवर खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे. या जागांवरील प्रतिक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सात जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती.
****
राज्यात आतापर्यंत सरासरी २२७ पूर्णांक ३ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील ४७ पूर्णांक १३ लाख हेक्टर म्हणजे केवळ ३३ टक्के इतकी पेरणी झा���ी असल्याचं कृषि विभागानं सांगितलं आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल. सध्या पेरणीची कामं संथ गतीनं होत असून यात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या, तसंच भात वाफ्यांची कामं सुरू आहेत.
****
धुळे शहरात आज एका सराफा पेढीतून एक कोटी दहा लाख रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतल्या आग्रारोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफा पेढीतून पहाटे अज्ञात व्यक्तींनी पेढीच्या मागील बाजुच्या शटरचे कुलुप तसंच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, दागिन्यांसह दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली, अशी माहिती स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश जोरावलमल चौधरी यांनी दिली.
****
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. या कार्याची दखल घेऊन ट्रस्टच्या विश्वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचं, रोहित टिळक यांनी सांगितलं. येता एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या एकशे तिनाव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
महिला आणि बाल कल्याण मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. क्रीडा, सामाजिक उपक्रम, विज्ञा आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी १८ वर्षांखालील बालकं यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
****
छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रोने एसएसएलव्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा काढून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं इस्रोच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या यानाच्या निर्मितीसह त्याच्या संचलनाची जबाबदारीही खासगी क्षेत्राला दिली जाण्याची शक्यता या अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. हे यान दहा किलो पेक्षा कमी वजनाचे नॅनो उपग्रह तसंच शंभर किलो पेक्षा कमी वजनाच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी वापरलं जाईल. व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवेच्या माध्यमातून भारताचा अंतराळ उद्योग २०२५ पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत १३ अब्ज अमेरिकी डॉलरचं योगदान देईल, असं एका अहवालात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या चिंदर गावात अज्ञात रोगाने गेल्या तीन  दिवसात तब्बल ३६ जनावरं दगावली आहेत. यामुळे चिंदर इथल्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातल्या बऱ्याच जनावरांमध्ये या रोगाची लक्षणं दिसत आहेत. पशूवैद्यकीय विभागाची पथकं चिंदर गावात कार्यरत असून आजारी जनावरांवर उपचार सुरू आहेत. दगावलेल्या जनावरांची उत्तरीय तपासणी करून ते नमुने पुणे इथल्या प्रयोगाळेत पाठवण्यात आले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वीजचोरीविरोधात औरंगाबाद परिमंडलात गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन हजार तीनशे एकोणीस जणांवर कारवाई करून दोन कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. नागरिकांनी विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर टाळावा तसंच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या संचालक मंडळासाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात ऐंशी पूर्णांक छप्पन टक्के इतकं मतदान झालं. उद्या या निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत २१ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले होते. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यात या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यातल्या नागरीकांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
****
भारतीय रिझर्व बँक आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि जी-20 च्या भारतातील आयोजना संदर्भात तालुका स्तरावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या परीक्षेत हदगाव तालुक्यातल्या तामसा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनी पूर्वा लाभशेटवार आणि समृद्धी ठमके यांचा प्रथम क्रमांक आला. १४ तारखेला मुंबई इथं या संदर्भात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणींचं निवारण करण्यासाठी उद्या सकाळी अकरा ते दीड या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून तक्रारीचं निवेदन द्यावे, अचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयमधील प्रवेशाची मुदत उद्या संपते आहे. औरंगाबाद इथं आयटीआय संस्थेत एकूण ३६ व्यवसायामध्ये ५३ तुकड्या उपलब्ध असून एक हजार १६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्त्तीण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी आझाद ग्रूप व यूवाराज्य यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा युवा आयकॉन २०२३ पूरस्कार���ने सन्मानीत
Tumblr media
नांदेड प्रतिनिधी आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य यांच्या संयूक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते यावर्षी हे पूरस्काराचे पहिले वर्षे आहे यावर्षी चा आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य चा यूवा आयकॉन २०२३ चा पूरस्कार हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे दि.२/४/२०२३ रोजी हा पूरस्कार सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांना सर्व मान्यवरांच्या शूभहास्ते देवून त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसूंदर शिंदे उदघाटक सौ सविता संतोष मूरकूटे प्रमूख पाहूणे म्हणून सेवाभावी संस्था सेलू च्या उपध्याक्षा सौ.सुमनबाई आनंतराव शिंदे माजी छत्रपती शंभूराजे इंग्लीश स्कूल कंधार च्या अध्यक्षा सौ.प्रा डॉ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे व सल्लागार समिती मह्णून यूवाराज्य वृत्तपत्राचे मूख्य संपादक अजित पाटील साहित्यीक धाराशीव शिराळे सहशिक्षक विनोद गवते जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे कार्यकारिणी सदस्य प्रा.दिपक रायफळे विनीत आझाद ग्रूप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर कापसे एकल्व्य हॉस्टेल चे संचालक प्रा.गणेश आनंतराव शिंदे जिया ग्रुप पूणे च्या अध्यक्षा ज्योतीताई कापसे एकल्व्य मूलींचे हॉस्टेल च्या संचालिका ऋतुजा गणेश शिंदे आदिंची उपस्थिती होती. त्यांना हा पूरस्कार देवून गौरविण्यात आल्या बद्दल त्यांचे सर्वत्रीक कौतूक होत आहे व सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांचे त्यांचा मित्र परिवार हितचिंतक विवीध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक जोशी,देशमूख,महाजन,पसारकर,मूळे,पाठक,आौंढेकर,पोटे,बोर्डे,कनकदंडे,भालेराव,नेकलीकर,कूलकर्णी,कान्हेकर परिवार व सामाजीक कार्यातील सहकारी या सर्वानी त्यांचे आभिनंदन केले आहे. Read the full article
0 notes
journalist27 · 1 year
Text
सूर्यातीर
दीपक मोहिते,
पर्यटन व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज,
येत्या २५ जाने.रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन असून कोरोनाच्या अडीच वर्षानंतर आपण हा दिन उत्साहात साजरा करणार आहोत.दरवर्षी जागतिक पर्यटन दिन २७ सप्टें.साजरा करण्यात येत असतो.१९४८ पासून हा दिवस साजरा होत असून देशाच्या स्वातंत्र्यानंतर पर्यटनाला चालना मिळावी,यासाठी सर्वप्रथम पर्यटन परिवहन समितीची स्थापना करण्यात आली.त्यास देशभरातून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन प्रादेशिक कार्यालयाच्या संख्येत वाढ करण्यात आली.दिल्ली,मुंबई,
कोलकत्ता व चेन्नई येथे पर्यटन कार्यालये सुरू करण्यात आली.५० वर्षानंतर १९९८ मध्ये पर्यटन व दळणवळण मंत्रालयाला तो जोडण्यात आला.देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचे फार मोठे योगदान असून रोजगार व अर्थांजन,या दोन महत्वाच्या विषयावर केंद्र व राज्यसरकारानी लक्ष केंद्रित केले व गेल्या सात दशकात पर्यटन व्यवसायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला काही अंशी हातभार लागला.देशाच्या सकल उत्पादन निर्देशांकावर ( जीडीपी ) या व्यवसायाचा खोल प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.
आपल्या देशात असंख्य प्रेक्षणीय पर्यटनस्थळे असून ती पाहण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी पर्यटक येत असतात.या माध्यमातून देशाचा आर्थिक स्तर उंचावत असतो,तसेच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असतात.गेल्या ७५ वर्षात दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढल्यामुळे पर्यटकांचा मुक्तसंचार वाढत गेला.त्यामुळे पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली.कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी पर्यटन क्षेत्रात सरासरी २३ टक्के वाढ होत असे.आता तर शिक्षण मंत्रालयाने पर्यटन व्यवस्थापन व नियोजन हे अभ्यासक्रम महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट केले आहेत.आपल्या तसेच पाश्चात्य देशातील पर्यटन कंपन्यांनी या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे उद्योग क्षेत्रासोबत या क्षेत्राला झळाळी आली आहे.या क्षेत्रात माहिती सहा.गाईड ( मार्गदर्शक ) टूर ऑपरेटर,ट्रॅव्हल एजन्सी,हॉटेल्स व विमान कंपन्या,यामध्ये रोजगाराच्या मोठ्याप्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत.टूर ऑपरेटर्स प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात.पर्यटन व हॉटेल क्षेत्र ही दोन्ही क्षेत्र एकमेकांशी जोडली गेली आहेत.
देशासाठी आर्थिक स्रोत तसेच तरुणांना रोजगार मिळवून देणारे क्षेत्र,अशी ओळख निर्माण झाली असून अनेक पर्यटन कंपन्या आता या क्षेत्रात उतरल्या आहेत.तसेच या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाणही मोठ्याप्रमाणात होत असते.आपली संस्कृती व पूर्वजांची महती परदे��ातील पर्यटकाना होते,ही एकप्रकारची महत्वाची उपलब्धी असल्याचे मानण्यात येते.
२०१८-१९ या वर्षात सुमारे सव्वाकोटी पर्यटक भारतात आले होते.२०१९-२० व २०२१-२२ या दोन वर्षात हे प्रमाण कोरोनामुळे खालावले होते,आता त्यामध्ये सुधारणा होत आहे.सालाना आपल्या परकीय चलनामध्ये पावणे दोन लाखाची भर पडत असते.परकीय चलनाच्या आवकमध्ये सरासरी १२.८ % वाढ होत असते.देशांतर्गत पर्यटनाचाही त्यास चांगला हातभार लागत असतो.यासोबत सांस्कृतिक,धार्मिक,
वन्यजीव,कृषी पर्यटन,अशा विविध संकल्पनामुळे पर्यटक आकर्षक होत असतात.द गोल्डन चॅरियट,डेक्कन ओडिसी,पॅलेस ऑन व्हील्स,रॉयल राजस्थान,इ.राजेशाही रेल्वेने भारतीय पर्यटनामध्ये मोलाची भर टाकली.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपल्या पर्यटनाने अद्याप बाळसे धरलेलं नाही.देशांतर्गत पर्यटनवाढीसाठी जे प्रयत्न होणे आवश्यक होते,ते अपेक्षित वेगाने होऊ शकले नाहीत.हे माध्यम आर्थिक व रोजगार निर्मिती या दोन क्षेत्राच्या वृद्धीसाठी किती महत्वाचे आहे,याविषयीचे आकलन नोकरशाहीला खूप उशीराने झाले खरे,पण आता स्थिती सुधारत आहे.तरुण देखील या क्षेत्रात आपले करियर करू लागले आहे,ही आशादायक बाब आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून येणारे परकीय चलन,हे प्रत्येक देशाच्या अर्थकारणाला बळकटी देणारे असते,त्यामुळे गेल्या २० वर्षात जगातील प्रत्येक देशाने पर्यटनवाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.या व्यवसायामुळे पर्यटन स्थळाचा व त्याभागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानाही बदल घडून येत असतात.या व्यवसायाला आवश्यक असणारे निवास,भोजन,माहिती,
वाहतूक व मनोरंजन इ.व्यवस्थेसोबत विविध उत्पादनाला मागणी होत असते.अशाप्रकारे परिसर विकासालाही चालना मिळते.पर्यटनात स्थानिक नागरिकांचा सहभाग हा त्याच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणारा ठरतो.हल्ली या व्यवसायाने ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृती,
साहित्य व लोकजीवन यास सुगीचे दिवस आले आहेत.
यावर्षी " पर्यटन व विकास," परस्पर संबंध,यावर विचार व्हायला हवा.कोरोनानंतर डबघाईला आलेल्या अनेक देशांनी इतर उद्योगासोबत या व्यवसायाला प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे.आपल्या सरकारनेही त्यावर काम करण्याची गरज आहे.भारताचा प्राचीन इतिहास व पर्यटनस्थळांची संख्या लक्षात घेता,जगभरातील पर्यटक पहीली पसंती देत असतात.ही संधी असून ती आपण दुर्लक्षित करता कामा नये.अनेक तरुण-तरुणी आता या व्यवसायात करियर करू पाहत आहेत.त्यास सरकारकडून प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे.कृषी पर्यटन,या संकल्पनेला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.त्यास सरकारकडून प्रतिसाद मिळाल्यास बऱ्यापैकी रोजगार निर्मिती होऊ शकते.
आपल्या राज्यात अजिंठा-वेरूळ,निसर्गरम्य कोकण,तिर्थस्थळे,
महाबळेश्वर,माथेरान ही थंड हवेची स्थळे,प्रतापगड,रायगड व किल्ले,इ.पर्यटनस्थळे पर्यटकाना खुणावत असतात.या सर्व ठिकाणी सरकारने योग्य प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करायला हव्यात.याबाबत गुजरात,राजस्थान व केरळ राज्यांनी जे धोरण आखले आहे,त्याचा अवलंब आपणही करायला हवा.केरळ राज्य हे पर्यटन क्षेत्रात नावाजलेले राज्य,या राज्यात फारसे उद्योगधंदे नाहीत,त्यामुळे त्यांनी पर्यटन क्षेत्र वाढीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.केरळ राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे.या राज्याला जसा निसर्गरम्य समुद्राकिनारा लाभला आहे,तसा तो आपल्यालाही लाभला आहे." कोकणचा कॅलिफोर्निया," करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांनी कॅलिफोर्निया नको,पण केरळ करण्याचे स्वप्न उराशी बाळगायला हवे.
गुजरात सरकारने आपल्या राज्यात तीन वर्षांपूर्वी " स्टॅच्यु ऑफ युनिटी," उभारून अवघ्या जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.तीन वर्षांच्या काळात जगभरातील अनेक देशातील व आपल्या अशा एकूण कोट्यवधी पर्यटकांनी भेटी दिल्या.या परिसरात गुजरात सरकारने पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा या पाश्चात्य देशाला लाजवणाऱ्या अशा आहेत.
केवळ उद्योगधंदे व व्यापार या दोन क्षेत्रातुनच आर्थिक आवक होते,अशा मानसिकतेमधून बाहेर येऊन पर्यटन व्यवसाय देखील हातभार लावणारे आहे,हे समजण्याची गरज आहे.
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित ’26/11 मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित ’26/11 मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत…
View On WordPress
0 notes
छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्यसभा खासदार श्री. उदयनराजे भोसले यांची लोकसभा प्रवास योजना प्रदेश प्रभारी मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी जलमंदिर पॅलेस,सातारा येथे सदिच्छा भेट घेतली ..! (at Asabewadi) https://www.instagram.com/p/CksXBt2g6Yl/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग, 'या' बेस्ट बसेसचे मार्ग बदलले
पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग, ‘या’ बेस्ट बसेसचे मार्ग बदलले
पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग, ‘या’ बेस्ट बसेसचे मार्ग बदलले पवईच्या हीरानंदानी (Hiranandani Powai Area) मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आगल्याची माहिती मिळत आहे. सकाळी सहा वाजण्याच्या आसपास आग लागल्याची घटना घडली. आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला लागलेली आग खूपच भीषण आहे. अद्यापही आग धुमसतीच आहे. अग्निशमन दलाला लेव्हल…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
क्वीन एलिझाबेथ II च्या मृत्यूचा निरोप दुर्मिळ दुहेरी इंद्रधनुष्य बकिंघम पॅलेसवर दिसला व्हिडिओ पहा
क्वीन एलिझाबेथ II च्या मृत्यूचा निरोप दुर्मिळ दुहेरी इंद्रधनुष्य बकिंघम पॅलेसवर दिसला व्हिडिओ पहा
राणी एलिझाबेथ II मृत्यू: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या वयाच्या ९६ वर्ष अंतिम निर्णय. बंकिंग पॅलेसने अधिकृतपणे माहिती दिली आहे. स्कॉटलँडमध्ये गुरुवारी ८ सप्टेंबरला त्यांचा शेवटचा श्वास होता. प्रदीर्घ काळापासून त्यांची प्रकृती खराब होती मात्र शेवटीस काल त्यांची प्राणज्योतवली. महाराणी एलबेथ यांच्या लढून लोकशाही झाॅल, कलाकार अशा अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. पण प्रत्यक्ष निसर्गाने देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Palkhi | महाराष्ट्रातील संतांचे विठोबा हे दैवत - बाबूू चिपाडे
#Palkhi | महाराष्ट्रातील संतांचे विठोबा हे दैवत - बाबूू चिपाडे #Ahmednagar
Palkhi | निवृत्तीनाथ पालखीचे सनी पॅलेस मित्र परिवारातर्फे स्वागत Palkhi | अहमदनगर (दि २५ जून २०२२)- गेल्या कित्येक वर्षांपासून दर वर्षी वारकरी भक्त आषाढी-कार्तिकीला विठोबा माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पदयात्रा करतात. या वारीत गरीब-श्रीमंत, जात-पात, रंगरुपाचा भेद नसतो. अशा या वारीत आगळी-वेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रातील संतांचे विठोबा हे दैवत आहे, असे प्रतिपादन बाळू चिपाडे यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राज्यभरात सामाजिक न्याय दिन साजरी.
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन करण्याचा निर्णय.
आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज.
आणि
अकोला जिल्ह्यात बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त.
****
थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, सामाजिक न्याय दिन म्हणून आज राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
मुंबई इथं मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. २५० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या या वस्तीगृहाला माता रमाई यांचं नाव देण्याची घोषणा शिंदे यांनी केली.
वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर इथलं मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतीगृह आणि बार्टी अंतर्गत पुण्याच्या येरवडा संकुल इथल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभही शिंदे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे केला.
विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री दीपक केसरकर, आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ इथं, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाच्या दुसऱ्या टप्यातल्या कामाचा शुभारंभही पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. या टप्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नुतनीकरण तसच त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर कलादालनाची निर्मिती करण्यात येणार आहे.
औरंगाबाद इथं छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लातूर इथं महानगरपालिकेच्यावतीने शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकाला आरक्षण देवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केलं, तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाज घटकासाठी काम करण्यासाठी पाठबळ दिलं, असं लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी म्हटलं आहे. शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. शाहू महाराजांचे विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक असून, त्या विचारांचा अंगीकार सर्वांनी करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
परभणी इथं अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी शाहू महाराज त्यांच्या प���रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यवतमाळ इथं यानिमित्त रन फॉर सोशल जस्टिस, ही दौड काढण्यात आली. समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. नंदुरबार इथ समता दौडचं आयोजन करण्यात आलं, दरम्यान, तालुका क्रिडा संकुलात गावित यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
वाशिम इथं शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यांत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. या निमीत्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून समता दिंडी काढण्यात आली.
****
राज्यातल्या उमरी आणि पोहरादेवी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असं शिंदे म्हणाले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
****
शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचं घर मिळणं आवश्यक आहे, त्यासाठी ही योजना मोहीमस्तरावर राबवण्यात यावी, अशा सूचना राज्याचे खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या आहेत. नाशिक इथं शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत, ते बोलत होते. जिल्ह्याला मिळालेल्या एकूण उद्दिष्टापेक्षा अधिकच्या उद्दिष्टांची मागणी करण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागातील कोणताही आदिवासी बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, असं भुसे म्हणाले. सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी योजनेच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन अधिकाधिक घरकुलांचे प्रस्ताव मंजूर करावेत, असे निर्देश भुसे यांनी दिले आहेत.
****
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व सुविधा आणि संदर्भ ग्रंथांनी युक्त अशी सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन केली जाणार आहेत. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी ही माहिती दिली. ते नंदूरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात शासकीय मुलींच्या वसतीगृह तसंच आश्रमशाळांच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन तसंच उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते. आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध करुन देणार असल्याचं गावीत यांनी सांगितलं. यावर्षी राज्यात ५६ नवीन शाळांच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली असून, त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ३० शाळांचा समावेश असल्याची माहिती गावित यांनी यावेळी दिली.
****
पंढरपूर इथं आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा, येत्या २९ तारखेला साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत. आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने ६५ एकर परिसरामध्ये मुक्कामाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची राहण्याची सोय होणार आहे. दिंडी सोबत आलेले वारकरी दरवर्षी या परिसरात तंबू तसंच राहूट्या उभारून यात्रा कालावधीमध्ये मुक्कामी राहतात. या ठिकाणी प्रशासनाने शुद्ध पेयजल, २४ तास वीजपुरवठा, मुबलक प्रमाणात स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीत‎ सोडलेले पाणी चंद्रभागेत पोहोचलं आहे. त्यामुळे यात्राकाळात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी‎ चंद्रभागा स्नानाची सोय झाली आहे.
****
अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम समाजासमोर यावेत, अंमली पदार्थ्याच्या सेवनामध्ये अडकलेली पिढी नशेच्या विळख्यातून बाहेर यावी, असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी म्हटलं आहे. आजच्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या सेवन, विक्री आणि वाहतकीवर निर्बंध यावेत, असं अग्रवाल म्हणाले.
****
अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी धुळे पोलीस दलातर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीत पोलिस अधिकारी, खेळाडू आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या फेरीच्या समारोपाप्रसंगी सर्व स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली.
****
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा औद्योगिक वसाहतीत बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकून आठ लाख पाच हजार ९५० रुपयांचा खताचा साठा जप्त केला आहे. पंचायत समिती आणि कृषी विभागानं ही संयुक्त कारवाई केली असून या संदर्भात तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारखान्याचे संचालक राहुल नामदेव सरोदे यांच्याविरुद्ध शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर पोलीसांनी दुचाकी चोरांच्या टोळीला अटक केली आहे. साक्री तालुक्यातल्या शेंदवड इथून शामील पांडु बागुल याला आणि त्याच्या इतर साथीदारांना पोलीसांनी आज ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजार रूपये किंमतीच्या २० दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ही चोरांची टोळी पकडल्याबद्दल पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पिंपळनेर पोलीसांच्या पथकाला दहा हजारांचं बक्षिस दिलं आहे.
****
उस्मानाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचं, विद्यापीठात रूपांतर करण्याची मागणी, सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवण्यासह, जिल्ह्याचा शैक्षणिक निर्देशांक उंचावण्यासाठी, स्वतंत्र विद्यापीठ होणं आवश्यक असल्याचं, यासंदर्भातल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
0 notes
digimakacademy · 4 years
Text
सुपरस्टारने लॉकडाउनमध्ये केला साखरपुडा, या तारखेला होणार लग्न
सुपरस्टारने लॉकडाउनमध्ये केला साखरपुडा, या तारखेला होणार लग्न
[ad_1]
तेलंगणा- टॉलिवूड स्टार नितीन आणि त्याची गर्लफ्रेंड शालिनी कंडूकुरीअनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या एप्रिल महिन्यात त्यांचं लग्नही होणार होतं. पण लॉकडाउनमुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. पण नुकताच या जोडप्याने साखरपुडा पार पाडला असून येत्या २६ जुलै रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. नितीन आणि शालिनीने…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान - महासंवाद
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, ८ :  महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार प्रदान  करण्यात आला. येथील ताज पॅलेस मध्ये दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, श्री. पोपळघाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान - महासंवाद
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, ८ :  महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार प्रदान  करण्यात आला. येथील ताज पॅलेस मध्ये दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, श्री. पोपळघाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि…
View On WordPress
0 notes