Tumgik
#ब्रिगेडच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सावरकरांवरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये जुंपली, ब्रिगेडच्या सभेतच भास्कर जाधवांचे खडेबोल
सावरकरांवरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये जुंपली, ब्रिगेडच्या सभेतच भास्कर जाधवांचे खडेबोल
सावरकरांवरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये जुंपली, ब्रिगेडच्या सभेतच भास्कर जाधवांचे खडेबोल नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत एक विचित्र तणाव निर्माण झाला.   संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता.   त्यात ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. त्याला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उत्तर देत खडे…
View On WordPress
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
चालू वर्षासाठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तूर, उडीद आणि मसूर खरेदीवरची मर्यादा रद्द
प्राथमिक कृषी पतसंस्थेला देशभरात दोन हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं उघडण्यास परवानगी
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा काल राज्यभरात उत्साहात साजरा
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादीत महाराष्ट्रातल्या सदुसष्ट शैक्षणिक संस्थांचा समावेश
जालना इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू
मोसमी पावसाचा प्रवास मंदावण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
आणि
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून लंडन इथं कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना
****
केंद्र सरकारनं चालू वर्षासाठी, मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद आणि मसूर डाळीच्या खरेदीवरची ४० टक्क्यांची मर्यादा रद्द केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून कोणत्याही मर्यादेशिवाय, किमान आधारभूत किमतीला डाळींची खरेदी करता येईल. सरकारकडून किफायतशीर किमतीला या कडधान्यांच्या खरेदीची खात्री मिळाल्यावर, या धान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आगामी खरीप आणि रब्बी पेरणीच्या हंगामात तूर, उडीद आणि मसूर या पिकांच्या पेरणीचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. डाळींची साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात दोन जून रोजी, अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ लागू करून तूर आणि उडीद डाळीच्या साठवणीवर मर्यादा लागू केली होती. डाळींचे घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, गिरणी मालक आणि आयातदार यांच्यासाठी ही मर्यादा लागू आहे.
****
प्राथमिक कृषी पतसंस्थेला देशभरात दोन हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रं उघडण्यास केंद्र सरकार परवानगी देणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. यापैकी एक हजार जन औषधी केंद्रे या वर्षी ऑगस्टपर्यंत आणि पुढची एक हजार केंद्रे डिसेंबरपर्यंत उघडली जातील. या निर्णयामुळे पतसंस्थेचं उत्पन्न वाढवण्यासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, तसंच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना परवडणाऱ्या किंमतीत औषधं उपलब्ध होणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा काल राज्यभरात उत्साहात साजरा झाला. किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक सोहळा राहिला नसून, तो एक लोकोत्सव झाला असल्याचं, संभाजी राजे छत्रपती यावेळी म्हणाले. राज्यातले पन्नास किल्ले शासनानं आपल्या ताब्यात दिल्यास शासनाकडून काहीही निधी न घेता स्वखर्चानं त्या किल्ल्यांचं संवर्धन करू, असा प्रस्तावही त्यांनी दिला. पाचाड इथं शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीबाबत छत्रपतींनी समाधान व्यक्त केलं. शिवराज्याभिषेक समितीनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन झालं. यावेळी 'शिव वंदना' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
कोल्हापूर इथं नवीन राजवाड्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर युवराज यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानिमित्त झांज पथक, बँड वादन, पोवाडे आणि मर्दानी खेळ सादर करण्यात आले. सोलापूर इथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत फेरी आणि व्याख्यान घेण्यात आले.
****
‘शासन आपल्या दारी‘ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती आणणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं या कार्यक्रमाला सुरुवात करताना बोलत होते. सरकार आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी हा उपक्रम राज्यभरात राबवला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शहात्तर कोटी रुपयांचा लाभ आजच्या एका दिवसात देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमधल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या नऊ वर्षातली कारकीर्द हा देशासाठी सुवर्णकाळ असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. 
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. ही समिती उद्या द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दर गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच पाच टक्क्यांच्या खाली, म्हणजे चार पूर्णांक सात टक्क्यांवर आला असून, हा दर उतरला असला तरी, समिती प्रमुख व्याज दरांच्या स्थितीत बदल करणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर आर्थिक धोरण समितीची ही पहिलीच बैठक आहे.
****
राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसंच वीज साठवणुकीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या, उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत राज्य शासनाचे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टोरंट पॉवर ��िमिटेड यांच्याशी राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातलं हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान असून, उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे राज्यातल्या शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातली विजेची वाढती मागणी भागवता येणं शक्य होणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातली ताजी यादी काल जाहीर झाली असून, त्यात महाराष्ट्र तीन वर्षांनी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे, राज्यातून प्रकल्प बाहेर गेले, असा आरोप करणाऱ्यांना योग्य ते उत्तर मिळालं आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
****
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादीत महाराष्ट्रातल्या सदुसष्ट शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या अकरा, तसंच शंभर सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत, दहा विद्यापीठांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शंभर संशोधन संस्थांच्या यादीत राज्यातल्या पाच तर अभियांत्रिकी संस्थांच्या यादीत आठ संस्थांचा समावेश आहे. राज्यातल्या तीन महाविद्यालयांना आणि नऊ व्यवस्थापन संस्थांनाही या यादीत स्थान मिळालं आहे. देशातल्या शंभर सर्वोत्कृष्ट औषधीय संस्थांच्या यादीत राज्यातल्या अठरा संस्था असून, त्यात औरंगाबादच्या वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, या संस्थेला ऐंशीवं स्थान मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयात राज्यातली दोन तर दंत महाविद्यालयांच्या यादीत राज्यातली सात महाविद्यालयं आहेत.
****
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती जाहीर केली. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ संजय घनश्याम भावे यांची नियुक्ती झाली आहे.
****
दलित पॅंथर संघटन���च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम काल नागपूर इथं साजरा झाला.  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पँथर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चळवळीदरम्यानचे आपले अनुभव कथन केले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला किमान एक मंत्री पद मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
राज्यात नवीन वाळू धोरण राबवण्यास सुरुवात आहे. वर्धा, भंडारा, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली या केंद्रांवर वाळू विक्रीला सुरुवात झाली असून, या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करत आहेत. यासाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजे १२ हजार ६३३ ब्रास वाळूची विक्री झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे.
****
जालना तालुक्यातल्या सामनगाव इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये भागवत इंगळे, त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा प्रशांत इंगळे, तसंच भागवत आणि ओमकार पडूळ या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेली मुले बुडत असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी भागवत इंगळे हे पाण्यात उतरले. मात्र त्यांच्यासह सर्व बालकांचा बुडून मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
****
गुजरातच्या पोरबंदरच्या दक्षिणेला अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येला सरकण्याची, आणि त्याचं रूपांतर चक्री वादळात होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या स्थितीमुळे मोसमी पावसाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, केरळमध्ये मान्सूनचं आगमन होण्याला उशीर होऊ शकेल. मात्र देशभरातल्या एकूण पावसावर याचा फारसा परिणाम होणार नाही, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, नऊ आणि दहा तारखेला मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आजपासून लंडनच्या ओवल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. २०२१ ते २०२३ च्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ६६ पूर्णांक ६७ अंकांनी तालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला दोन - एकनं हरवून ५८ पूर्णांक आठ गुण मिळवत अंतिम फेरीतलं स्थान पक्कं केलं.
****
दक्षिण कोरियात सुरु असलेल्या आशियाई २० वर्षांखालील ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत भारताच्या सिद्धार्थ चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत शारुक खाननं, भालाफेकमध्ये शिवम लोहकरेनं, तर लांब उडी प्रकारात सुश्मितानं रौप्य पदक जिंकलं. आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत शकीलनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले गटानं देखील काल या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं.
****
जर्मनीतल्या सुहल इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. पुरुषांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात अमनप्रीतसिंहनं सुवर्ण पदक जिंकलं. तर महिलांच्या २५ मीटर सांघिक प्रकारात मेघना सादुला, पायल खत्री आणि सीमरनप्रीत कौर यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत आतापर्यंत पाच सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकून भारत पहिल्या स्थानावर आहे.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत, पी राजवत तसंच अर्जुन आणि ध्रुव कपिला या जोडीनं काल दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांना मात्र पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.  
****
दिव्यांगांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शासनानं हाती घेतलेल्या, “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी”, या अभियानाची अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. या अभियानाबाबतच्या पूर्वतयारीसाठी  झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. उपक्रमाच्या यशासाठी जिल्ह्यातल्या दिव्यांगांचं गावनिहाय सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. किमान ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याची शिफारस कृषी विद्यापीठानं केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कृषी विभाग लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात एक विशेष मोहीम राबवणार आहे. आजपासून येत्या बारा तारखेपर्यंत चालणाऱ्या ‘खरीपाची तयारी कृषी विभाग आपल्या दारी’, या मोहिमेतून आधुनिक लागवड तंत्रज्ञान, पिकांवरच्या रोगांचं नियंत्रण आणि कृषी विभागाच्या प्रमुख योजना, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत आज परभणी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात विविध नामांकित उद्योजक आणि कंपन्या सहभाग नोंदवणार आहेत. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर सहभाग नोंदवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात की..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या सोबत युती करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून हा निर्णय म्हणजे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ‘ असा आहे असे म्हटले आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
जळगावात जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेची स्थापना !
https://bharatlive.news/?p=94446 जळगावात जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेची स्थापना !
जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ...
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
किल्ले रायगडासह राज्यभरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा.
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर.
जालन्यात चौघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू.
आणि
मोसमी पावसाचा प्रवास मंदावण्याची शक्यता.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा साडे तीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा आज राज्यभरात उत्साहात साजरा झाला. किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक सोहळा राहिला नसून तो एक लोकोत्सव झाला आहे असं संभाजी राजे छत्रपती यावेळी म्हणाले. राज्यातले पन्नास किल्ले शासनानं आपल्या ताब्यात दिल्यास शासनाकडून काहीही निधी न घेता स्वखर्चानं त्या किल्ल्यांचं संवर्धन करू, असा प्रस्तावही संभाजीराजे छत्रपतींनी दिला. पाचाड इथे शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीबाबत छत्रपतींनी समाधान व्यक्त केलं. शिवराज्याभिषेक समितीनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यानिमित्त मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन होत आहे. यावेळी ‘शिव वंदना’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.
कोल्हापूर इथे नवीन राजवाड्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर युवराज यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानिमित्त झांज पथक, बँड वादन, पोवाडे आणि मर्दानी खेळ, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोलापूर इथंही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत फेरी आणि व्याख्यान असे कार्यक्रम घेण्यात आले.
****
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती आणणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं या कार्यक्रमाला सुरुवात करताना ते आज बोलत होते. सरकार आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी हा उपक्रम राज्यभरात राबवला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शहात्तर कोटी रुपयांचा लाभ आजच्या एका दिवसात देण्यात आला.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. ही समिती येत्या गुरुवारी द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दर गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच पाच टक्क्यांच्या खाली, म्हणजे चार पूर्णांक सात टक्क्यांवर आला असून, हा दर उतरला असला तरी, समिती प्रमुख व्याजदरांच्या स्थितीत बदल करणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर आर्थिक धोरण समितीची ही पहिलीच बैठक आहे.
****
राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसंच वीज साठवणुकीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत राज्य शासनाचे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टोरंट पॉवर लिमिटेड यांच्याशी राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातलं हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान असून, उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे राज्यातल्या शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातली विजेची वाढती मागणी भागवता येणं शक्य होणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातली ताजी यादी आज जाहीर झाली असून, त्यात महाराष्ट्र तीन वर्षांनी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे, राज्यातून प्रकल्प बाहेर गेले, असा आरोप करणाऱ्यांना योग्य ते उत्तर मिळालं आहे, अशी भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. मविआ सरकारच्या काळात राज्यानं पहिला क्रमांक गमावला होता, तो युती सरकारनं परत मिळवला, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाला किमान एक मंत्री पद मिळावं, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भातली किमान एक जागा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.
****
राज्यातल्या नागरिकांना बांधकामयोग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासह अनधिकृत उत्खननाला आळा घालण्याच्या दृष्टीनं राज्यात नवीन वाळू धोरण राज्यात राबवण्याला सुरुवात आहे. वर्धा, भंडारा, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली या केंद्रांवर वाळू विक्रीला सुरुवात झाली असून, या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करत आहेत. यासाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होत आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ४७३ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यातल्या १० हजार १६५ ब्रास वाळूची विक्री झाली आहे, तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजे बारा हजार सहाशे तेहतीस ब्रास वाळूची विक्री झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे.
****
जालना तालुक्यातल्या सामनगाव इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये भागवत जगन्नाथ इंगळे, त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा प्रशांत इंगळे, तसंच भागवत कृष्णा पडूळ आणि ओमकार कृष्णा पडूळ या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेली मुले बुडत असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी भागवत इंगळे हे पाण्यात उतरले. मात्र त्यांच्यासह सर्व बालकांचा बुडून मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
****
गुजरातच्या पोरबंदरच्या दक्षिणेला अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येला सरकण्याची आणि त्याचं रूपांतर चक्री वादळात होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या स्थितीमुळे मोसमी पावसाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, केरळमध्ये मान्सूनचं आगमन होण्याला उशीर होऊ शकेल, मात्र देशभरातल्या एकूण पावसावर याचा फारसा परिणाम होणार नाही, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. 
आज नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात, येत्या नऊ तारखेला लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात तर दहा तारखेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
राज्यातल्या धनगर आणि मेंढपाळांचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन आज अमरावती इथे घेण्यात आलं. या अधिवेशनात मेंढपाळांना व्यवसाय वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. मेंढपाळांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात, त्यांची भटकंती थांबवण्यासाठी अर्ध बंदिस्त शेळी-मेंढी पालनासाठी शासनानं मदत करावी तसंच त्यांना चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, या मागण्यांचे ठराव यावेळी शासनाला पाठवण्यात आले.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
औरंगाबादच्या कीर्तनकार महाराजांची पॉर्न क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद वाढला, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी गृहमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
औरंगाबादच्या कीर्तनकार महाराजांची पॉर्न क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद वाढला, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी गृहमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
तृप्ती देसाई तृप्ती देसाई म्हणतात की, दोन व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने झालेले शारीरिक संबंध सीमा भिंतीच्या आत ठीक आहेत, पण हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. याप्रकरणी देसाई यांनी ���हाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करून संबंधित कीर्तनकार महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद (महाराष्ट्र)औरंगाबादजिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 3 years
Text
' रबरी लिंगाचं प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं ' तृप्ती देसाईंनी घेतली राज्य सरकारची बाजू
‘ रबरी लिंगाचं प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं ‘ तृप्ती देसाईंनी घेतली राज्य सरकारची बाजू
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून असाच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. पण ही योजना चर्चेत आल्याचं कारण म्हणजे या कीटमध्ये एक रबरी लिंग देण्यात आलं आहे. त्यावरून अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. सदर प्रकाराबद्दल तृप्ती देसाई म्हणाल्या, “लोकसंख्या ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years
Text
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेक
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेक
लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली…
View On WordPress
0 notes
vinitraje · 4 years
Text
वाघ्याचा इतिहास आणि राजकारण
वाघ्याचा इतिहास आणि राजकारण
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा…
View On WordPress
0 notes