Tumgik
#महाराष्ट्र गुन्हे
airnews-arngbad · 26 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह-गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी
राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना
महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भर चौकात शिक्षा द्यावी-आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आणि
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला. त्यापार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता, असं नमूद करत, श्रेय घेण्याच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून, त्यात तांत्रिक-वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबई इथं आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच आणखी चार जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे.
****
दिल्ली मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून, यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळेल, ६ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/inter-district-burglary-gangs-rampage-silver-ornaments-weighing-60-tolas-along-with-gold-ornaments-seized/
0 notes
gajananjogdand45 · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/dried-ganja-worth-rs-33-thousand-750-seized-from-waranga-phata-action-taken-by-local-crime-branch/
0 notes
nandedlive · 1 year
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
Tumblr media
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजर��तमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
Tumblr media
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
lokwadalnews · 1 year
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
1 note · View note
loksutra · 2 years
Text
तू तुझ्या बायकोला सोडून माझ्याशी लग्न कधी करणार? प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली
तू तुझ्या बायकोला सोडून माझ्याशी लग्न कधी करणार? प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली
औरंगाबादच्या पैठण तालुक्यात राहणाऱ्या विवाहितेच्या प्रेयसीने पत्नीला सोडून तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. कोणताही मार्ग न निघाल्याने तरुणाने आत्महत्या केली. प्रियकराची आत्महत्या प्रतिमा क्रेडिट स्रोत: टीव्ही 9 भारतवर्ष ‘बायको सोडून माझ्याशी लग्न कर’. अशा शब्दांत विवाहितेच्या मैत्रिणीने लग्नाचा हट्ट धरला.द पकडले होते. ‘मी करतो… मी बघतो…’ अशी चर्चा आता होत नव्हती. लग्नाच्या बंधनात असताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रामलाल सांगतो,‘अंगात वारं शिरलं,  म्हणून पत्नी गीताबाईला ठार मारलं’!
रामलाल सांगतो,‘अंगात वारं शिरलं,  म्हणून पत्नी गीताबाईला ठार मारलं’!
रामलाल सांगतो,‘अंगात वारं शिरलं,  म्हणून पत्नी गीताबाईला ठार मारलं’! धुळे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण तरीही भारतातील दर्‍या-खोर्‍यात, कड्या-कपारीत दुर्गम भागात रहाणारा आदिवासी समाज अजूनही पूर्णतः अंधश्रद्धेपासून मुक्त झाला नाही. या अंधश्रद्धेपोटी धुळे जिल्ह्यातील, शिरपूर तालुक्यातील, उमर्दा परिसरातील प्रधानदेवी गावात रहाणार्‍या एका निष्पाप विवाहित महिलेचा हकनाक बळी गेला.…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
महाराष्ट्रात माणसावर हल्ला झाल्यानंतर पोलीस तपास "नुपूर शर्मा सपोर्ट" अँगल, 4 जणांना अटक
महाराष्ट्रात माणसावर हल्ला झाल्यानंतर पोलीस तपास “नुपूर शर्मा सपोर्ट” अँगल, 4 जणांना अटक
जखमी प्रतीक पवार रुग्णालयात. मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवाशावर 4 ऑगस्ट रोजी पुरुषांच्या एका गटाने हल्ला केला – त्यात तो गंभीर जखमी झाला – आणि प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाशी त्याचा संबंध असल्याचा आरोप आता पोलीस तपास करत आहेत. आणि दोन महिन्यांपूर्वी इस्लाममध्ये एकापाठोपाठ एक ठिणगी पडली. आतापर्यंत चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल
वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल
मुंबई, दि. 16 : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे. बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून बालाजी स्टील कंपनीची चौकशी करण्यात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 26 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
बदलापूर बाललैंगिक अत्याचार घटनेचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर
मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, नौदल आणि राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापना
परळी वैजनाथ इथं आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप, तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची विभागाची माहिती
आणि
जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर
सविस्तर बातम्या
राज्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच बदलापूरच्या शाळेत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असून, त्याचाच भाग म्हणून शाळांमधे त्वरित तक्रार पेट्या बसवल्या जातील आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच या पेट्या उघडल्या जातील, असं केसरकर यांनी सांगितलं.
दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल काल शासनास सादर झाला आहे. या अहवालातली निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून, शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कल्याण इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतल्या चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी काल निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे कोसळला. या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. पालकमंत्री चव्हाण यांनी सायंकाळी राजकोट इथं जात घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, हा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदलानं खंत व्यक्त केली असून, याप्रकरणी राज्य सरकार आणि नौदलाची एक समिती नियुक्त केली आहे. हा पुतळा पुन्हा एकदा उभारु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला. मात्र, लवकरच अधिक भक्कम पुतळा उभारु असं त्यांनी सांगितलं
****
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने आज पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्रमणी यांच्यासह अनेक मान्यवर या समारोप सोहळ्याला उपस्थित होते. या महोत्सवामध्ये मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विविध वस्तूंच्या ४३५ स्टॉल मधून सुमारे तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली.
****
आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. काल मुंबईत राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या गावांमध्ये पायाभूत सुविधांसह व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, असंही राज्यपालांनी नमूद केलं.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चव्हाण यांचं काल हैदराबाद इथं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या निधानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यसभेच्या राज्यातल्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती, विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
****
क���्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.
****
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून कर्ज मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. द्वारका, मथुरा आणि वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये मध्यरात्री  श्रीकृष्ण जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमी सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
दरम्यान, दहीहंडी उत्सव आज साजरा होत आहे, शहरात अनेक चौकांमध्ये हंडी बांधण्याची तयारी सुरू झाली असून, गोविंदा पथकंही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
****
लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या घाटनांदूर इथल्या वीज उपकेंद्रातील वीज यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे घाटनांदूर आणि जवळगा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा आज सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वीजग्राहकांनी सहकार्य करावं  असं  आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी सव्वा सहा लाख रुपयाच्या गुटख्यासह सुमारे पावणे नऊ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस पथकानं उमरगा इथं औराद पाटी चौरस्ता भागात ही कारवाई करत, एका आरोपीस अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या”पात्र लाभार्थींचे अर्ज येत्या ३१ ऑगस्टपर्यंत भरुन घेण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व्ही.एस.केंद्रे यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अधिकारी कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांची वैयक्तीक भेट घेऊन अर्ज भरून घ्यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
येत्या दोन दिवसात, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 
****
0 notes
marmikmaharashtra · 11 months
Link
https://marmikmaharashtra.com/cultivation-of-cannabis-in-hapsapur-shivara-10-80-lakh-worth-of-goods-seized-father-lake-in-custody/
0 notes
gajananjogdand45 · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/in-just-a-few-hours-the-stolen-jcb-was-seized-the-thieves-and-buyers-from-outside-the-district/
0 notes
nandedlive · 1 year
Text
खारघर उष्माघात प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा-अशोक चव्हाण
Tumblr media Tumblr media
Facebook WhatsApp Twitter LinkedIn नांदेड(प्रतिनिधी)-दि.16 एप्रिल रोजी खारघर मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान 14 लोकांचा मृत्यू झाला. या संदर्भाने ढिसाळ नियोजनाची जबाबदारी सुनिश्चित करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, कॉंगे्रस प्रवक्ते मुन्तजिबोद्दीन उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्ह��ण म्हणाले 13 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम हा अत्यंत ढिसाळ नियोजनाचा असल्याने उष्माघाताने तेथे 14 लोकांचा मृत्यू झाला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो समर्थक येणार आहेत हे माहित असतांना या कार्यक्रमाचे योग्य नियोजन झाले नाही. 14 जणांचा मृत्यू हा शासनाने जाहीर केलेला अधिकृत आकडा असला तरी कार्यक्रम सुरू असतांना जवळपास 500 जणांना रुग्णवाहिकांच्या माध्यमाने रुग्णालयात पाठविण्यात आले होते. व्यासपीठासाठी वातानुकूलीत यंत्रे लावण्यात आली होती. तर अनुयांसाठी साधा मंडप सुध्दा उभारण्यात आला नव्हता. 14 जणांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्या लोकांनी जवळपास 8 ते 10 तासांपुर्वीपासून काही जेवन घेतलेले नव्हते आणि त्यांच्यावर उष्माघात झाला. 13 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय सुध्दा नव्हती. तसेच आपल्याला जागा मिळावी म्हणून लवकर आलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना जेवनाची सोय सुध्दा तेेथे झाली नाही आणि त्यामुळेच हा उष्माघाताचा प्रकार 14 लोकांचा जिवघेवून गेला. दुसऱ्या एखाद्या ठिकाणी असा प्रकार घडला असता तर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन आहे अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन कॉंगे्रस पक्षाच्यावतीने राज्यपालांना आम्ही देणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. या कार्यक्रमाची आणि ढिसाळ नियोजनाची न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी सुध्दा आम्ही करणार आहोत असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भाने बोलतांना ज्यांना अभ्यास नाही असे भाजपचे लोक आम्हाला निवडूण दिले तर आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर देवू असे सांगत आहेत. परंतू कृषी उत्पन्न बाजार समिती कधीच शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव ठरवत नाही. ते केंद्र सरकार ठरवते. तेंव्हा अर्धवट अभ्यासातून अशा बाबी समोर येतात. युपीए-1 आणि युपीए-2 च्या वेळेत शेतकऱ्यांना मिळणारा विविध पिकांचा हमी भाव आणि मोदी सरकारच्या काळात मिळणारा पिकांचा हमीभाव यातील फरक कागदोपत्री दाखवत अशोक चव्हाण यांनी युपीएच्या काळातच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी जादा दर मिळत होता हे सांगितले. शेतकऱ्यांसाठी तयार केलेले काळे कायदे केंद्र शासनाला शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर परत घ्यावे लागले होते याचा उल्लेख सुध्दा अशोक चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे त्याचे पोस्टमार्टम करतांना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शेतकऱ्याला दररोज 33 रुपये मिळणार आहेत याला सन्मान म्हणायचे काय? नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात जाणारे 14 राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. या कामांबद्दल हे काम मी आणले अशा वावड्या उठविल्या जात आहेत. या 14 कामांपैकी 12 कामांची मंजुरी, वर्कऑर्डर सन 2016,2017, 2018 या वर्षात झालेल्या आहेत. ही बाब अभिलेखावर आहे. कोणताही राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर होत नसतो तर तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी होतो. त्यात काही भाग नांदेड जिल्ह्याचा असतो. नांदेड जिल्ह्यातील कामाची स्वतंत्र मंजुरी मिळत नसते तर तो राष्ट्रीय महामार्ग असतो आणि त्याच हिशोबाने त्याची मंजुरी मिळत असते. मी आणले, मी केले, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. अभिलेखावर सर्व काही उपलब्ध आहे Post Views: 89 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Read the full article
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल
वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल
मुंबई, दि. 16 : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे. बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून बालाजी स्टील कंपनीची चौकशी करण्यात…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
महाराष्ट्र हादरला..अल्पवयीन मुलीच्या अंगावरील चावे पाहून आईने विचारले तर ..
महाराष्ट्र हादरला..अल्पवयीन मुलीच्या अंगावरील चावे पाहून आईने विचारले तर ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना ठाणे येथे समोर आलेली असून एका खासगी क्लासच्या इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीवर भिवंडी येथील काल्हेर भागात एका खोलीत हात बांधून सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून तिला मारहाण करून चावे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी पहाटे बेड्या ठोकलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
मुंबई विमानतळावर 13 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पोटात 87 कॅप्सूल लपवल्या होत्या, आरोपी पकडला
मुंबई विमानतळावर 13 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पोटात 87 कॅप्सूल लपवल्या होत्या, आरोपी पकडला
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कस्टम विभागाच्या पथकाने 13 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. आरोपीने पोटात कोकेनच्या ८७ कॅप्सूल लपवून ठेवल्या होत्या. मुंबई विमानतळावरून 13 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क मुंबईतील ड्रग्जच्या तस्करीविरोधात सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 13 कोटी रुपयांची औषधे…
Tumblr media
View On WordPress
0 notes